पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/64

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

( २३ ) आहे तुज अधि ॥ ३ ॥ असेच करूनी किती । नागविली नाहीं नीति ।। तुकयाबंधु ह्मणे अंतीं । न सोडिसी ते खोडी ॥ ४ ॥ ॥ ८९ ॥ तुज ते सवे आहे ठावें । घ्यावे त्याचे बुडवावें ॥ परि ते आ- ह्यांसवें । आतां न फावे कांहीं ॥ १ ॥ नव्ह सोडायाचे धणी । कट्टे मेळ- विलें करोनी ॥ पाहा विचारोनी । आदी धरोनी काम नाहीं ॥ २ ॥ अवघे राहिले प्रकार । झाल जीवासी उदार ॥ असा हा निर्धार । कळला असावा असेल ॥ ३ ॥ आतां निदसुर नसावें । गांठ पडली कुणब्यासवें ।। तुकयाबंधु ह्मणे राखावें । देवा महत्व आपुलें ॥ ४ ॥ | ॥ ९० ॥ बहु बोलणें नये कामा । धाउनें तें पुरुषोत्तमा । एकाचि वचनें आह्मां । काय सांगणे ते सांग ॥ १॥ देणे आहे की भंडाई । करणे आहे सांग भाई ॥ आतां भीड कांहीं । कोणी न घरी सर्वथा ॥ २ ॥ मानें गेलें जें होऊनी । असो ते धरित नाहीं मनीं ॥ आतां पुढे येथूनी । कैसा काय विचार ॥ ३ ॥ सारखी नाहीं अवघी वेळ । हें तों कळते सकळ ॥ तुकयाबंधु ह्मणे खळखळ । कराची ते उरेल ॥ ४ ॥ | ॥ ९१ ॥ आतां हें न सुटे न चुके । बोल कां दवडिसी फिके ॥ जन लोक पारिखें । अवघे केलें म्यां यासाठीं ॥ १ ॥ नये सरतां नव्हे भलें । तुझे लक्षण कळलें ॥ बैसलासी काढिलें। देहाचे मुळी दिवाळे ॥ २॥ दिस- तोसी बरा बोल कोंवळे । गुण मैंदाचे चाळे । दिसताती ये वेळे । काय करू विसंबोनी ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे देखतां । अंध बाहेर ऐकतां ॥ कैसे व्हावें आतां । इनुकियाउपरी ॥ ४ ॥ ॥ १२ ।। तिहीं ताळ हेचि हाक । ह्मणती पांढरा स्फटिक ॥ अवघा बुडविली लौकिक । सुखेंचि भीके लाविलीं ।। १ ॥ थोंदा नांव शिरोमणी । नाहीं जोडा त्रिभुवनीं ।। ह्मणोनी शाहाणे ते कोणी । तुझे दारी बैसतीना॥२॥ निर्गुण निलाजिरा निनांवा । लंड झोंड कुडा देवा ॥ नागवणा या नांवा । वांचुनि दुजा नाइकों ॥ ३ ॥ सर्वगुणें संपन्न । कळों आलासी संपूर्ण ॥ तुक- याबंधु ह्मणे चरण । आतां जीवें न सोडीं ॥ ४ ॥ ॥ ९३ ।। तोचि प्रसंग आला सहज । गुज धरितां नव्हे काज ॥ न सांडित लाज । पुढे बोज न दिसे ॥ १ ॥ तूं तर म होसी शाहाणा। नये