॥ ८४ । बरा जाणतोसी धर्मनीति । उचित अनुचित श्रीपति ।। करू
येते राती । ऐसी डोळे झोकूनी ॥ १॥ आतां जाव काय कैसा । देसी
तो दे जगदीशा ॥ आणिला वोळसा । आपणां भवता ॥ २ ॥ सेवेचिया
सुखास्तव । बळे धरिलें अज्ञानत्व ॥ येईल पर ही भाव । ज्याचा यासी
कारणा ॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे नाहीं । आतां आह्मां बोल कांहीं ॥ जडो-
नियां पायीं । तुझें त्वांचि घेतलें ॥ ४ ॥
॥ ८६॥ कांहीं विपत्ति अपत्यां । आतां आयुचिया होतां ॥ कार्य
होईल अनंता । पाहा बोलों कासया ॥ १॥ बरें अनायासे झालें । साया-
सेंविण बोले चाले ॥काबाड चुकलें । केलें कष्टावेगळे (॥ २ ॥ बरा सांपडे-
लासी वोजा । वर्मावरी केशीराजा ॥ बोलायासी तुझा । उजुराचि नाहीसा
॥ ३ ॥ तुकयाबंधु ह्मणे दगा । बरा दिला होता वगा । झडकरी चलागा ।
चांग दैवें पावलों ॥ ४ ॥
॥ ८६ ॥ देवा तुजपें माझ्या पूर्वजांचें ऋण । आहे ते कां नेदिसी
अनून । अवगलासी झोंडपणें । परि मी जाण जीवें जिरों नेदीं ॥ १ ॥ कलों
येईल रोकडें । उभा करीन संतांपुढे ॥ तुझे काय एवढे । भय आपुले मागतां
॥ २॥ आजीवरी होत नेणता । तों तुज फावले रे अनंता ।। कवडीचा तो
आतां । पड़ों नेदीन फेर ॥ ३ ॥ ठेविला ये जीवन जीव । ह्मणे तुकयाचा
बांधव ॥ माझा गळा तुझा पाच । एके ठायीं बांधेना ॥ ४ ॥
॥ ८७॥ मागे असताशी कळला । उमस घेउं नसता दिला ॥ तेणेंचि
काळे केला । असता अवघा निवाडा ॥ १ ॥ इतका न लागता उशीर । न
धारित भीडभार । सिद्धासी व्यवहार। कासयासी लागला ॥२॥ असोनियां
माल खरा । किती केल्या येरझारा ।। धरणेही दिवस तेरा । माझ्या भावें
घेतलें ॥ ३ ॥ अझून तरी इतक्यावरी । चुकवीं जनाचार हरी॥ तुकयाबंधु
पणे उरी । नाहीं तरी नुरे कांहीं ॥ ४ ॥
| ॥ ८८ ॥ आतां न राहें क्षण एक । तुझा कळला रे लौकिक ॥ ने
हाल एक । कांहीं केल्यावांचूनी ॥ १ ॥ संबंध पडिला कोणाशीं । काय
रोळे झांकितोसी । नेईन पांचांपाशीं । दे नाहीं तरी वोदूनी ॥ २ ॥ सुखें
वेदीस जाणवलें । नास केल्याविण उगलें ॥ तरि तेही विचारिलें । आली
पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/63
Jump to navigation
Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही
