पान:तुकारामबावांचे बंधु कान्होबा, मुलगी भागूबाई, आणि शिष्य निळोबा यांच्या अभंगाची गाथा.pdf/307

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

तो हा पुंडलीका भेटी । आला उतावेल पोटीं ॥ २ ॥ शिवाचिये ध्यानीं मनीं । योगी चितिती चितनीं ॥ ३ ॥ निळा ह्मणे रमा दासी । ह्मणवी सेऊनियां वरणासी ॥ ४ ॥ ॥ १२८३॥ आळवू आह्मी विठोवासी । नेणों आणिकासी रंजवू ॥ २ ॥ राग केळा घात मात । स्वर संगीन मर्छना ॥२।। ताल ग्राम छंद बंद । गीत प्रवंध कंपित ॥ ३ ॥ निळा ह्मणे प्रेमें वाणी । गर्जवू गुण श्रीहरिया ॥ ४ ॥ ॥ १२८४ ।। वमती पायांपासीं । रििद्ध सिद्धि मुक्ति दासी ॥ ५ ॥ तो हा उभा कटीकर । राही रुक्माईचा वर ॥ २ ॥ भुक्ति मुक्ति दासी वांटी। दर्शनें चि फुकामाठीं ॥ ३ ।। निळा ह्मणे चिंतिती मुनीं । ज्याते ध्यानीं अनुदिनी ॥ ४ ॥ ॥ १२८५ ॥ कैवल्याचा गाभा । व्यापुनियां ठेला नभा ॥ १ ॥ तो हा सगुण बेपधारीं । उभर चंद्रभागे तीरीं ॥ २॥ धुंडिती पुराणें । वेदश्रुती ज्याकारणें ॥३॥ निळा ह्मणे अवघे देव । ज्याचे ह्मणवितात अवयव ॥४॥ ॥ १२८६॥ इंद्रादिकां देवां । पदीं स्थापुनी बांटी सेवा ॥ १ ॥ तो ही येउनी पंढरिये । इदेवरी उभा ठाये ॥२॥ चिंतिती चतुरानन । ईश्वराचे ध्येय जो ध्यान ॥ ३ ॥ निळा म्हणे ज्याते गीतीं । सदा वेदश्रुती गाती ॥ ४ ॥ ॥ १२८५ ।। उपनिषदांच्या मतीं । ज्याच्या स्तुतीवादें मुमती ॥ १ ॥ तो हा सुंदर नागर । इटे उभा कटीकर ॥ २ ॥ रमा होऊनियां दासी । निय सेवीत चरणांसी ॥ ३ ॥ निळा म्हणे लीला चि करी । ब्रह्मांडाच्या भरोवरी ॥ ४ ॥ ।। १२८८ ॥ येक उनी वेदा । जेणे आणियेलें बोधा ॥ १ ॥ तो ही पंढरपुरनिवासी । नित्य उभा भक्तांपासी ॥ २॥ सूर्या अंगीं कांती । ज्याच्या प्रकाशाची दीप्ती ॥ ३ ॥ निळा म्हणे दिलें। चंद्रासी अमृते चि भरिलें ॥ ४ ॥ | ॥ १२८० ॥ नेऊनियां बळीं । जेणे घातला पाताळ ॥ १ ॥ तो हो देवाचाही देवो । इटे उभा देउनी पावो ॥ २॥ शेषाचे शयनीं । होता निदत अनदिनीं ॥ ३ ॥ निळा म्हणे करी। मंथन श्रीराचे सागरीं ॥ ४ ॥