पान:ज्योतिर्विलास.pdf/174

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. आणि प्रजापति यांची गतिस्थिति काढण्याची कोष्टके तयार केली.. सर्व ग्रहांची आकर्षणे हिशेबांत घेऊन गुरु आणि शनि यांची गणिताने काढिलेली स्थिति वेधास बरोबर मिळे. परंतु इ० स० १७८१ पूर्वी प्रजापतीचा वेध बरेच वेळा झाला होता, तेव्हांची त्याची स्थिति आणि नंतरची स्थिति यांचा मेळ बसेना. तेव्हां प्रजापतीच्या पलीकडे असलेल्या एकाद्या ग्रहाच्या आकर्षणामुळे असे होते की काय ह्याबद्दल विचार करण्याचे पुढील ज्योतिष्यांवर सोपवून इ० स० १७८१ नंतरच्या वेधांस मिळतील अशी प्रजापतिकोष्टके बोर्डने केली. पुढे त्या कोष्टकांवरून गणिताने काढिलेली प्रजापतीची स्थिति आणि प्रत्यक्ष वेध ह्यांत इ० स० १८३०मध्ये २० विकलांचे अंतर पडूं लागले; १८४० मध्ये ९० विकलांचे पडूं लागले; आणि १८४४ मध्ये तर २ कलांचे अंतर पडले. नुसत्या डोळ्यांनी पहाणारास हे अंतर म्हणजे काहीच नाही. दोन कलांच्या अंतराने असलेले दोन ग्रह नुसत्या डोळ्यांनी एकच दिसतात. परंतु दुर्बिणीने हे अंतर सहज समजू लागले. आमच्या जुन्या पंचांगांतील ग्रह आणि आकाशांतील ग्रह ह्यांत हल्ली कधीकधी ह्याच्या शंभर पट अंतर पडते. ते आमच्या गांवीही नाही. परंतु युरोपियन ज्योतिष्यांस सदरहु २ कलांचे अंतर सहन होईना. जिज्ञासा त्यांस स्वस्थ बसू देईना. शोध सुरू झाले. इंग्लंदांतील जान आडाम नामक तरुण विद्वानानें गणित करून प्रजापतीला उपाधि करणारा ग्रह सूर्यापासून अमुक अंतरावर आहे, त्याचे द्रव्य अमुक आहे, त्याची कक्षा अशा प्रकारची आहे, व तो अमुक ठिकाणी आहे, असे १८४५ च्या आक्टोबरांत ग्रिनिच येथील वेधशाळेचा मुख्य अधिकारी प्रो० एरी ह्यास कळविले. परंतु त्याने वेध घेतले नाहीत. दुसऱ्या एका इंग्लंदच्या ज्योतिप्याने १८४६ च्या आगष्टांत वेध घेतले त्यांत तो ग्रह आला होता, परंतु ग्रह असा आळखला नाही. फ्रान्सांतील ज्योतिषी लव्हरिअर याने गणित करून अज्ञात महाचा मान इ० स० १८४६ च्या जूनमध्ये प्रसिद्ध केली. इ. स. १८४७ च्या आरभी त्याचा भोग ३२५ अंश आहे असें काढिले. व बर्लिन वेधशाळेतील अधिकान्यास त्याचा वेध घेण्यास लिहिले. त्याप्रमाणे त्याने तारीख २३ सप्टंबर१८४६ राजा दुबीण लावून पाहतां तो ग्रह सांपडला. त्याला नेपचुन् हें नांव मिळाले. हा ग्रह शोधून काढण्याचा मान आडाम आणि लव्हरिअर ह्या दोघांही ज्योतिष्यांस भाह. इ० स० १७९५ मध्ये फ्रेंचज्योतिषी लालांडी ह्याच्या वेधांत हा आला होता, परंतु ग्रह असा ओळखला नाही. निरनिराळ्या ठिकाणी असलेले काही लोहचुंबक एका लोखंडाच्या गोळीस भागात आहत; त्या लोहचुंबकांची आकर्षणशक्ति, महत्त्व, स्थाने वगैरे माहीत आहत; परंतु त्यांवरून गणित करून लोखंडाची गोळी अमुक ठिकाणी असेल असें काढाव ते प्रत्यक्षस्थितीस मिळत नाहीं; यावरून आणखी एकादा लोहचुंबक गोळीस ढिात असेल असें अनमान करून त्याचे स्थान बिनचूक शोधून काढणे जितके क। आहे त्याहून अनेक पटीने कठिण सदरहु ग्रहाचा शोध करणे हे आहे. न्यू