पान:ज्योतिर्विलास.pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

युरेनस आणि नेचुन् १५७ हणजे ते सूर्यमालेतील ग्रहोपग्रहांप्रमाणे पश्चिमेकड़न पर्वेकडे न फिरतां उलटे फिरतात म्हटले तरी चालेल. किंवा प्रजापतीवरील दिशांसंबंधे पाहिले असता ते दाक्षणेकडून उत्तरेस फिरतात म्हटले तरी चालेल. उपग्रह ज्या पातळीत फिरतात त्याच पातळीत प्रजापति आपल्या आंसाभोवती फिरतो. असे अनुमान आहे. ह णजे त्याचा आंस आणि त्याची कक्षा यांच्यामध्ये फक्त ८ अंशांचा कोन आहे. ही गति देखील विलक्षणच होय. हीमळे त्यावर ऋतही विलक्षण असतील. आप ल्या पृथ्वीच्या आंसाचा कक्षेशी कोन ६६॥ अंशांचा आहे... - प्रजापति अति दूर असल्यामुळे त्याची शारीरघटना पाहण्याविषयी दुबिणाचा कांहींच यत्न चालत नाही. शनीच्या दुप्पट अंतरावर असल्यामुळे शनावर जितका सूर्यप्रकाश पडतो त्याचा चवथा हिस्सा प्रजापतीवर पडतो. आणि ता शनीच्या दुप्पट अंतरावरून आपलेकडे यावयाचा यामुळे शनीच्या षोडशांश हातो. आणि शनीच्या पृष्ठाच्या पंचमांश प्रजापतीचे पृष्ठ आहे. यामुळे शनाच्या ८० वा हिस्सा प्रजापतीचा प्रकाश आहे. अर्थात् मोठ्या दुर्बिणीतूनही तो पहाण किती कठिण पडत असेल ह्याचे अनुमान होईल. त्याच्यावरील स्थाईक खुणा मुः कीच दिसत नाहीत. यामुळे त्यास अक्षप्रदक्षिणेस किती काळ लागतो हेही समजत नाही. नुसत्या दुर्बिणीतून प्रजापतीच्या वातावरणाची स्थिति कांहीच समजत नाही; परंतु वर्णलेखकाने ती समजली आहे. डाक्टर छजिन्स ह्याने ग्रहांचे आणि तारांचे वर्णलेख घेण्याच्या कामी फार प्रयत्न केले आहेत. त्यांत प्रजापतीच्या वर्णलेखांवरून दिसून आले आहे की त्याच्या वातावरणांत हायड्रोजन वायु फार आहे. आपल्या वातावरणाचे आक्सिजन आणि नैट्रोजन हे जसे घटक आहेत तसे प्रजापतीच्या वातावरणांत हायड्रोजन में मुख्य घटकतत्त्व आहे. पृथ्वीवराल महासागरांच्या सर्व पाण्याचे पृथक्करण होऊन त्यांतला हायड्रोजनवायु वातावरणात गेला तर त्याचे चिन्ह बुधावरील लोकांस दिसेल त्यापेक्षाही जास्त चिन्ह प्रजापतीच्या वातावरणाच्या वर्णलेखांत दिसते. नायट्रोजन, कार्वानिक आसिड, पाण्याची वाफ, ह्यांचे कांहींच चिन्ह प्रजापतीवर दिसत नाही. तसेच, आपल्या दृष्टीने प्राण्यांच्या जीवनास आवश्यक जो प्राणवायु (आक्सिजन) तो त्यावर असण्याचा मुळीच संभव नाही. आपल्या पृथ्वीच्या वातावरणांत प्रजापतीवरच्या इतका हायड्रोजन उत्पन्न होईल तर पृथ्वीवरचा विस्तव अगोदर नाहींसा केला पाहिजे; व वीज नाहीशी झाली पाहिजे. कारण आक्सिजन आणि हायड्रोजन ह्यांच्या मिश्रणास नैसर्गिक किंवा कृत्रिम विस्तवाची एक ठिणगी लागली तरी प्रचंड भडका होऊन सर्व प्राण्यांचा नाश होईल. किंबहुना पृथ्वीही जळून जाईल. तेव्हां प्रजापतीवर आक्सिजन मळीच नसला पाहिजे, किंवा असेल तर तेथे कोणत्याही प्रकारचा आग्न नसला पाहिजे. सारांश, ह्या स्थितीवरून प्रजापतीवर प्राण्यांची वस्ती नाहीं असे दिसून येते. इ० स० १८२० मध्ये फ्रान्स देशांतील बोवर्ड नामक ज्योतिष्याने गुरु, शनि,