पान:ज्योतिर्विलास.pdf/158

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१४२ ज्योतिर्विलास. कडांचा आणि गुरूवरच्या काही भागांचा रंग वारंवार बदलतो. निरनिराळ्या पव्यांच्या मधला भाग कधी कधी गुलाबी रंगाचा दिसतो. गुरूच्या शारीरस्थितीचे पृथ्वीशी मुळीच साम्य दिसत नाही. सूर्याशी बरेच साम्य दिसते. सूर्यापेक्षा तो कडेपेक्षां मध्यभागी सुमारें तिप्पट चकचकित दिसतो. आणि दुसरी महत्वाची गोष्ट ही की त्याला स्वतःचा थोडासा प्रकाश आहे. त्याच्या पष्ठावर अनेक उलाढाली झपाट्याने चाललेल्या दिसतात. तेथील वारे दर तासांत सुमारे २०० मैल या वेगाने वाहतात. गुरूवरील पट्टे आणि कधी कधी दिसणाऱ्या खुणा ह्यांचे आकार आणि रंग वारंवार बदलतात. त्याच्या गोलाच्या वरच्या काही भागांतून पलीकडे असणारे त्याचे उपग्रह दिसतात असें एक दोन वेळां अनुभवास आले आहे. यावरून असे दिसते की गुरूचा गोल आपणांस दिसतो तो त्याचा वास्तविक गोल नव्हे; दृश्यगोलांत वरच्या भागी अत्युष्णतेमुळे वायुरूप झालेली अशी द्रव्ये अगदी विरल पसरलेली आहेत; व त्यांच्या खाली बरेच विस्तृत दाट वातावरण आहे; त्यांत दाट वाफा अथवा अभ्रे आहेत. ह्या सर्व गोष्टी घडवून आणणारी उष्णता येते कोठून ? सूर्यापासून तर गुरूला आपल्या सुमारे पंचविसावा हिस्सा प्रकाश आणि उष्णता मिळते. यांच्या योगाने वरील परिणाम होणे संभवत नाही. यावरून असे अनुमान होते की सूर्याचा अंतर्भाग अत्यंत उष्ण आहे, त्याप्रमाणे गुरूचा अंतर्भाग तितका नव्हे, तरी पुष्कळ उष्ण आहे. गुरूचा वास्तव गोल तोच होय. मोठ्या महासागरांतील सर्व पाण्याचा वाफ होऊन राहील इतकी उष्णता त्याच्या अंगी आहे. तो वरच्या आवरणापक्षा पुष्कळ दाट आहे तरी कदाचित् घनावस्थेत असला तर असेल. परंतु प्रायता प्रवाही किंवा वायरूपी आहे. आपल्या पृथ्वीवर जसे जमिनीचे कवच आहतस धनकवच त्यावर अद्यापि बहधा बनले नाही. त्यांतील उष्णतेने उत्पन्न होमाया वाफा पृष्ठभागी सर्वत्र पसरलेल्या असतात. त्यांतील वाफा पोटांतन नुकत्याच बाहर पडतात तेव्हां स्वयंप्रकाश असतात. यामुळे गुरु किंचित् स्वयंप्रकाश दिसतो. गुरूवरचा वैषुवपट बहुधा नेहमी पांढरा असतो. परंतु इ० सन १८६९ पासून १९७१ पर्यंत तो कधी तांबस, कधी नारिंगी रंगाचा, कधी हिरवापिवळा, अनक प्रकारच्या रंगांचा दिसला. याप्रमाणे इ. सन १८६० मध्येही पात पुष्कळ चलबिल झाली होती. व चमत्कार हा की याच सुमारासस्चावर डाग फार दिसले. ह्या गोष्टींच्या समकालीनत्वावरून असे अनमान ज्यातिष्यानी काढिले आहे की सर्याच्या वातावरणाशी ग्रहांचा काही तरी संबंध आ. है. व त्यांत गुरूचा संबंध विशेष आहे. हा संबंध काय आहे हे मात्र अद्यापि गुढ आहे. सूर्याच्या फार जवळ गुरु असतो, तेव्हांच दोघे परस्परांस उपाधि देतात अस नाही; दोघांचे अंतर फार असतांही दोघांच्या वातावरणांत उपाधि हो