पान:ज्योतिर्विलास.pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुरु. १४३ तात. ग्रहांच्या या परस्परसंबंधावरून फलज्योतिषांतील गोष्टी साधार असाव्या असें सहज मनांत येते. वर लिहिलेल्या वर्णनावरून गुरूवर वस्ती असेल असे दिसत नाही. तेथे प्राणी असलेच तर ते अग्नीमध्ये राहूं शकतील, असे असले पाहिजेत. गुरूवर सांप्रत जरी वस्ती नाही तरी कालांतराने त्याची उष्णता कमी होऊन तो वसतियोग्य होईल असें अनुमान आहे. आपल्यास जसा एक चंद्र आहे तसे गुरूला पांच चंद्र आहेत. ह्यापैकी चोहोंचा शोध गॅलिलियोने लाविला. ह्या चोहोंच्या आंत पांचवा उपग्रह आहे. त्याचा शोध नुकताच म्हणजे इ० स० १८९२ च्या आगष्ट महिन्यांत लागला. जगांतील सांप्रतची अति मोठी वक्रीकार दुर्बीण अमेरिकेंत हामिलटन पर्वतावरील लिक नांवाच्या वेधशाळेंत आहे. तीतून तो प्रथम दिसला. तो १३ व्या प्रतीच्या तारेएवढा आहे. गुरूपासून तो सुमारे ११,२,४०० मैलांवर आहे. गुरूच्या तेजांत लुप्त होऊन तो दिसत नाही. परंतु कधीकधी ६॥ इंचांच्या दुर्बिणीतून दिसतो. तो सुमारे १७ तास ३६ मिनिटें इतक्या वेळांत गुरूभोवती फिरतो. त्याजविषयी इतर गोष्टींच्या शोध गुरूच्या इतर उपग्रहांप्रमाणे पूर्णपणे अद्यापि लागला नाही म्हणून त्याच्या बाहेरच्या चार उपग्रहांचे मात्र वर्णन पुढे केले आहे. बाहेरच्या चार उपग्रहांचे व्यास २२०० मैलांपासून ३७०० मैलांपर्यंत आहेत. त्यांत आकाराने तिसरा उपग्रह सर्वांत मोठा आहे. आणि दुसरा सर्वांत लहान आहे. तरी तो आपल्या चंद्राहून थोडासा मोठाच आहे. पहिला गुरूपासून २६०००० मैल अंतरावर आहे. म्हणजे आपला चंद्र आपल्यास जितका दूर आहे त्याहून गुरूचा पहिला चंद्र गुरूपासून दूर आहे. बाकीचे त्याहून दूर आहेत. हे उपग्रह लहानशाही दुर्बिणीतून दिसतात. गुरूच्या तेजामुळे ते नुसत्या डोळ्यांनी दिसत नाहीत. परंतु दृष्टि फार उत्तम असेल आणि गुरु न दिसतां त्याच्या बिंबाच्या बाहेरचा अगदी जवळचा प्रदेश दिसेल अशी तजवीज केली, तर बाहेरचे दोन उपग्रह जवळजवळ असतां नुसत्या डोळ्यांनी देखील दिसतील असा संभव आहे. आपल्या चंद्राहून मोठे असतां ते आपल्यास दिसण्याची इतकी पंचाईत आहे, हे त्यांच्या अतिदूरत्वामुळे होते. ह्या उपग्रहांचे तेज वारंवार बदलते. ह्या उपग्रहांच्या गतीसंबंधे एक चमत्कारिक नियम आहे. पहिल्याची गति, आणि तिसऱ्याच्या गतीची दुप्पट, यांची बेरीज दुसऱ्याच्या गतीच्या तिप्पट होते; आणि पहिल्याचा भोग आणि तिसऱ्याच्या भोगाची दुप्पट ह्यांच्या बेरजेतून दुसऱ्याच्या भोगाची तिप्पट वजा केली असतां, नेहमी सहा राशी बाकी राहते. पहिला आणि तिसरा ह्यांची गति एका दिवसांत अनुक्रमें २०३.४८९ अंश आणि ५०.३१७७ अंश आहे. ह्यांतील गति आणि भोग ही मध्यम समजावी. । गुरूवरून पहाणान्यास गुरूच्या चंद्रांची अमाप्रदक्षिणा होण्यास जो काळ