पान:ज्योतिर्विलास.pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गुरु. दक्षिणोत्तर व्यास पूर्वपश्चिम व्यासापेक्षा सुमारे ५००० मैल कमी आहे. ह्यामुळे ह्याचा आकार ध्रुवांकडे किंचित् चापट आहे. म. गुरूच्या पृष्ठभागावर स्थाईक-खुणा नाहीत म्हटले तरी चालेल. सन १८७९ मध्ये त्याच्या दक्षिणगोलार्धात एक तांबडा ठिपका दिसू लागला, तो मात्र सन १८८३ पर्यत दिसत होता. तो दीर्घवर्तुलाकृति होता. त्याचा बृहदक्ष विषुववृत्ताशी समांतर होता; व तो लघ्वक्षाच्या चौपट होता. त्याचे क्षेत्रफळ जवळ जवळ आपल्या पृथ्वी एवढे होते. असा एकादा ठिपका दिसतो त्यावरून गुरूचा अक्षप्रदक्षि. णाकाळ काढिला आहे. त्यांत असे दिसून आले आहे की गुरूचा विषुववृत्तावरील भाग जितका जलद फिरतो त्यापेक्षां ध्रुवांकडील भाग कमी वेगाने फिरतात. ह्या गोष्टीत गुरूचे सूर्याशी साम्य आहे. हे ठिपके बहुधा काळसर दिसतात. परंतु कधी कधी ते चकचकित दिसतात. दुर्बिणीतून गुरु कसा दिसतो, ह्याचा एक नमुना अंक १२ च्या चित्रांत दाखविला आहे. गुरूवर विषुववृत्ताशी समांतर असे कांहीं पट्टे दिसतात. विषुववृत्तावरच एक चकचकित पट्टा दिसतो. त्याचा रंग बहुतकरून मोत्यासारखा दिसतो. ह्याच्या उत्तरदक्षिणभागी दोन तेजोहीन पट्टे दिसतात. त्यांचा रंग तांबुस दिसतो. कधी त्यांत जांभळ्या रंगाची झांक मारते. याप्रमाणे ध्रुवापर्यंत क्रमाने चकचकित व ते POUNA साचंजालक याचगलय चित्रांक १२–दुर्बिणीतून पाहिलेला गुरु. जोहीन पट्टे दिसतात. चकचकित पट्टे विषुववृत्ताशी पिवळसर पांढरे दिसतात; व उत्तरोत्तर काळसर होत जातात. तेजोहीन पट्टे तांबस दिसतात. ध्रुवांजवळचे प्रदेश बहुधा किंचित् निळे दिसतात. ह्या पट्ट्यांत ढगांसारख्या व फारच चित्रविचित्र अशा असंख्य आकृति दिसतात. व त्यांचे थर झालेले दिसतात. त्या आकृति क्षणोक्षणी बदलतात. यामुळे गुरूचा पृष्ठभाग सतत सारखा असा दोन दिवस देखील दिसत नाही. त्या आकृति विषुववृत्ताच्या दोन बाजूंस विशेष स्पष्ट दिसतात. म्हणून लहान दुर्बिणीतून त्या पट्ट्यासारख्या दिसतात. त्या पट्ट्यांच्या