पान:ज्योतिर्विलास.pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. १८९४ जून १९ उदय पूर्वेस. यापुढे ३ महिने पहाटेस पूर्वार्धी दिसेल. , जुलै ४ अग्नीच्या दक्षिणेस ६ अंश. , , २० गुरुशुक्रयुद्ध. शुक्र दक्षिणेस.. , सप्टेंबर २८ पश्चात्-त्रिभांतर. यापुढे २॥ महिने पहाटेस पश्चिमेस दिसेल. , आक्टोबर २४ वक्री. , दिसेंबर २३ षड्भांतर. पुढे २॥ महिने आवशीस पूर्वार्धी दिसेल. १८९५ फेब्रुआरी २० मार्गी. " मार्च १८ पूर्वत्रिभांतर. पुढे ३ महिने आवशीस पश्चिमा( दिसेल. " जून २६ अस्त पश्चिमेस. , जुलै २३ उदय पूर्वेस. पुढे ३ महिने पहाटेस पूर्वार्धी दिसेल. , आक्टोबर ३१ पश्चात्-त्रिभांतर. नोव्हेंबर २६ वक्री. गुरूची अमाप्रदक्षिणा ३९९ दिवसांत होते. म्हणून त्याचे षड्भांतर, त्रिभांतर, वक्रत्व, मार्गित्व, अस्त, उदय ह्यांच्या एकदांच्या वेळेत १ सौरवर्षे व ३४ दिवस मिळविले म्हणजे त्या त्या गोष्टीचा पुढला वेळ निघतो. गुरु आपणांस डोळ्यांनी लहानसा एक बिंद दिसतो. परंतु तो एवढा मोठा आहे की आपल्या पृथ्वी एवढाले १२४० गोल एकत्र करावे तेव्हां गुरुएवढा एक गोल होईल. त्याचे द्रव्य पृथ्वीच्या सुमारे ३०० पट आहे. अर्थात् पृथ्वीच्या ३०० पट त्याचे वजन आहे. तो इतका मोठा आहे की त्याच्या द्रव्यांतून सूर्यमालेतल्या बाकीच्या प्रत्येक ग्रहा एवढाले दोन दोन ग्रह घडविले तरी काही द्रव्य शिलक राहून त्याची आणखी काही भुवनें निर्माण करितां येतील. त्यास गुरु हैं नांव आमच्या लोकांनी दिले आहे ते यासंबंधे अगदी अन्वर्थ आहे. त्याचे घटककण पृथ्वीच्यांहून विरल आहेत. त्याची घनता सरासरीने पृथ्वीच्या चतुर्थांश आहे. परंतु यावरून गुरूचे सर्वच द्रव्य इतके पातळ असेल असे नाही. गुरु इतका मोठा आहे, तेव्हां तो मंद असेल असें मनांत येते. परंतु तसे नाही. सूर्याभोवती फिरत असतां तो एका सेकंदांत ८ मैल चालतो. आणि त्याची अक्षभ्रमणगतिही अशीच विलक्षण आहे. पृथ्वीच्या तुलनेने पाहिली तर ती फारच विलक्षण आहे. पृथ्वीच्या विषुववृत्तावरील प्रत्येक बिंदु एका सेकंदांत जितका चालतो त्याच्या २७ पट, म्हणजे सुमारे ८ मैल, गुरूवरील बिंदु चालतो. आपल्या पृथ्वीच्या २ अक्षप्रदक्षिणा होतात तो गुरूच्या ५ होतात. यामुळे गुरूवरील दिवस आपले ९ तास ५५|| मिनिटें एवढाच काय तो आहे. परंतु त्याचे वर्ष फार मोठे आहे. आपली बारा वर्षे होतात तेव्हां त्याचे एक वर्ष होते. आपले वर्ष होते तेव्हां कोठें त्याचा एक सौरमहिना होतो. सूर्यापासून पृथ्वीच्या पांचपट अंतरावर गुरु आहे. कधी तो सूर्यापासून ४६ कोटी मैलांवर असतो, कधी ५० कोटी मैलांवर असतो. ह्याच आहे की आपल्या द्रव्य पृथ्वीच्या सुमारमोठा आहे की त्याल तरी काही द्र पर त्याचे वजन आहे. दोन दोन ग्रह बडा त्यास गुरु है