पान:ज्योतिर्विलास.pdf/107

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

९१ माला तीच मुंबईच्या त्र उपयोगी पडतीबड्याळ दुसया पृथ्वीवरील सर्व घड्याळांचे घड्याळ. ठिकाणचा निजकाल दाखविते. एकाद्या ठिकाणचे घड्याळ बरोबर लावले असले तर त्यावरून दुसऱ्या ठिकाणचे लावितां येईल. त्या दोन ठिकाणांचे रेखांतर माहित असले म्हणजे झाले. दर अंशास ४ मिनिटें फरक पडतो. मद्रास आणि पुणे ह्यांचे पूर्वपश्चिम अंतर म्हणजे रेखाशांचे अंतर ६॥ अंश आहे. मद्रासच्या पश्चिमेस पुणे आहे. म्हणून मद्रासचे (मद्रास टाईमचे) घड्याळ बरोबर लावलेले असले तर त्याहून २६ मिनिटें कमी केली म्हणजे पुण्याचा निजकाल दाखविणारें घड्याळ होईल. मुंबईच्या पूर्वेस १ अंश पुणे आहे म्हणून मुंबईटाईमच्या घड्याळापेक्षा ४ मिनिटे पुण्याच्या घड्याळांत जास्त करावी. किंवा याप्रमाणे अंतर एकदां माहित असले म्हणजे मद्रासटाईमच्या घड्याळावरूनही कोणत्याही ठिकाणचा निजकाल समजेल. जन्मपत्रिका, विवाहमुहूर्त, इत्यादिकांमध्ये निजकाल पाहिजे. नाही तर ती पत्रिका व मुहूर्त चुकीचा होईल. नक्षत्रपटांतील स्थिति अमुक वाजतां दिसेल असे लिहिले आहे, ते निजकालमानाने लिहिले आहे. पुण्याच्या निजकालाचे ७ वाजतां पुण्यास जी स्थिति दिसेल तीच मंबईच्या निजकालाचे ७ वाजतील तेव्हां मुंबईस दिसेल. अर्थात नका. शांतल्या वेळा सर्वत्र उपयोगी पडतील. मात्र त्या निजकालावरून लाविलेल्या घड्याळावरून पाहिल्या पाहिजेत. घड्याळ दुसऱ्या ठिकाणचे असेल तर दोन्हींमधील कालांचे अंतरावरून निजकाल काढून पहावें. आपली घटिका ही मध्यमकाल दाखविणारीच आहे. परंतु ती स्पष्ट सर्यो प्रत्यक्ष सर्य अर्धा क्षितिजावर आला असे पाहून तेव्हां पाण्यात टाकितात. यामळे ती स्पष्टकाल दाखविते. आपण विवाहादि सर्वे कृत्यांत स्पष्टकाल. मान चालतों व ते योग्यही आहे. परंतु घड्याळ मध्यममानाचे असते. त्यांत किंवा सर्यास्ती नेहमी ६ वाजतात असे नाही. म्हणून घड्याळावरून या दिवशी सूर्याचा उदय किंवा अस्त त्या ठिकाणी केव्हां होतो हैं माहीत असले पाहिजे. म्हणजे त्यावरून स्पष्टकाल काढितां येईल. मा ११ वाजतां कोणी स्त्री प्रसूत झाली. आणि त्या दिवशी सूर्योदय ५॥ तर प्रसतिकाली ५॥ तास म्हणजे १३॥ घटका दिवस आला समजावे. याप्रमाणेच विवाहादिकांचे मुहूर्ताविषयी समजावें. बिनचक आहे अशी खात्री नाही किंवा ते अजमासाने लावलेले आहे आणि तशांत घडलेल्या एकाद्या गोष्टीचा वेळ बरोबर समजला पाहिजे. तर त्या वेळी किती वाजले हे पाहून ठेवाव. पुढे घड्याळ दुरुस्त करण्याची संधि सांपरे किती मागे किंवा किती पुढे आहे हे पहावे. म्हणजे त्यावरून त्या गोष्टीचा वेळ कायम ठरवितां येईल. पृथ्वीच्या दैनंदिनप्रदक्षिणेस नेहमी समानकाल लागतो असें वर सांगितले. परंतु ते सर्वांशी खरे नाही. पृथ्वी हे घड्याळ दोन हजार वर्षापूर्वी लावून ठेविलें होते अशी कल्पना केली, तर इतक्या कालांत ते सुमारे सवा तास मागे पडले आहे.