पान:ज्योतिर्विलास.pdf/106

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

ज्योतिर्विलास. आणि कोणत्याही स्थळी सूर्याचे उदयास्त काढण्याची रीति, प्रोफेसर छत्रे यांच्या ग्रहसाधनकोष्टक या पुस्तकांत आहे; व सायन पंचांगांत असते. हल्ली मुंबईस व पुण्यास छापणाऱ्या पंचांगांत सूर्योदयास्त वेळा असतात. परंतु त्या मुंबईच्या आहेत. म्हणून मुंबईच्या इतके म्हणजे सुमारे १९ अक्षांश ज्या स्थलांचे आहेत त्यांस मात्र त्या लागू आहेत. उत्तरेस व दक्षिणेस एक एक अंशपर्यंत लागू केल्यास चालेल. परंतु कधी कधी २ मिनिटांची चूक पडेल. त्याच्या दक्षिणेस किंवा उत्तरेस त्या वेळा उपयोगी नाहीत. हल्ली रोजनिश्यांतही तेच उदयास्त छापतात. व त्या रोजनिश्या व ती पंचांगें पाहिजे त्या ठिकाणी चालतात. मुंबईच्या अंक्षांशांपेक्षां धुळ्याच्या अक्षांशांवर सूर्योदय कधी कधी ४ मिनिटें लवकर किंवा उशिरा होतो. (रेखांशांच्या फरकामुळे अंतर पडेल तें निराळे). दिसेंवरांत उशिरां होतो, जून महिन्यांत लवकर होतो. बेळगांवच्या अक्षांशांहून बडोद्याच्या अक्षांशांवर तर १२ मिनिटे लवकर किंवा उशिरा होतो. एका याम्योत्तरवृत्तावर जितकी स्थाने असतात त्यांस मध्यान्ह एकदम होतो. दोन स्थलांमध्ये पूर्वपश्चिम अंतर म्हणजे रेखांशांचे अंतर १ अंश असले तर मध्यान्हास ४ मिनिटांचा फरक पडतो. पूर्वेकडील १ अंशावर सूर्य ४ मिनिटें अगोदर मध्यान्हीं येतो, पश्चिमेकडच्या स्थळी ४ मिनिटें मागाहून येतो. पुणे आणि मुंबई यांचे रेखांतर (देशांतर ) एक अंश आहे. पुण्याच्या पश्चिमेस मुंबई आहे. आज १२ वाजतां सूर्य मध्यान्हीं येतो असे पंचांगांत दिले आहे असे समजा. पुण्यास सूर्य मध्यान्हीं दिसला तेव्हां पुण्याच्या घड्याळांत १२ वाजले. त्याच्या मागाहून ४ मिनिटांनी मुंबई येथें सूर्य मध्यान्हीं दिसला, तेव्हां मुंबईच्या घड्याळांत १२ वाजले. या वेळी पुण्याच्या घड्याळांत १२ वाजून ४ मिनिटे झाली असली पाहिजेत. दोन्ही घड्याळांत मध्यान्ही १२ वाजले. परंतु ती एके ठिकाणी आणिली तर पुण्याचे घड्याळ मुंबईच्या पुढे ४ मिनिटें आहे असे दिसून येईल. हे अंतर सर्वकाल सारखे असावयाचे. यावरून दिसून येईल की, प्रत्येक ठिकाणचा निजकाल भिन्न आहे. मद्रास आणि मुंबई यांचे रेखांतर ७॥ अंश आहे म्हणून दोहों ठिकाणच्या घड्याळांत ३० मिनिटांचा फरक असतो. यावरून वास्तविक वेळ समजण्यास ज्या त्या ठिकाणचा निजकाल दाखविणारे घड्याळ पाहिजे हे उघड आहे. कोणत्याही ठिकाणी सूर्यादिकांवरून लाविलेले घड्याळ त्या

  • दोन स्थळांच्या सूर्योदयांत किंवा अस्तांत फरक पडण्यास रेखांशांखेरीज आणखी एक कारण असते. म्हणून एका ठिकाणचा उदय झाल्यावर त्याच्या पश्चिमेस एक अंशावर असणाऱ्या ठिकाणी चारच मिनिटें मागाहून होईल असा नियम नाही. मुंबईच्या पूर्वेस दोन रेखांशांच्या अं. तरावर धले आहे. त्या मानाने तेथें सूर्योदय ८ मिनिटे अगोदर व्हावा. व मुंबईच्या अक्षांशांवर धुळे असते, तर त्याप्रमाणे नेहमी झाला असता. परंतु मुंबईहून धुळ्याचे उत्तर अक्षांश २ जास्त आहेत. म्हणून दिसेंबरांत धुळ्यास मुंबईच्या अगोदर ४ मिनिटें मात्र सूर्योदय होतो. जूनांत १२ मिनिटे अगोदर होतो.