पान:जाणिवांची आरास (Janivanchi Aaras).pdf/122

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे





नवे वारे

 नव्या शतकातील प्रथम दशक सरत आलंय. एकविसावे शतक अनेक नव्या विचारांची मांडणी घेऊन पुढे जात आहे. त्यामुळे पुरोगामी असणार हे स्पष्ट करणाच्या दोन घटना या आठवड्यात घडल्या. पश्चिम बंगालमध्ये असलेल्या माक्र्सवादी सरकारने राज्याचे औद्योगिकीकरण व्हायचे असेल तर भांडवलशाही स्वीकारली पाहिजे हे मान्य केले. दुसरीकडे मुंबईतील अंधेरी येथील दंडाधिकारी न्यायालयाने कौटुंबिक छळ प्रतिबंधक कायद्यांतर्गत चाललेल्या एका खटल्यात पतीच्या बाजूने निकाल देऊन कायदा ‘डोळस' असतो हे सिद्ध केले आहे.

 कोणताही विचार, वाद, प्रवाह हा सार्वत्रिक व सर्वकात्मिक असत नाही. मुळातच समाजात प्रस्थापित होणारे विचार प्रवाह हे त्या त्या समाजाच्या पूर्वानुभवाच्या संचितातून जन्म घेत असतात. समकालीन वा पूर्वकालीन जे हेच आहे, त्याज्य आहे, ते नाकारण्यासाठी, नष्ट करण्यासाठीच नवे विचार, वाद जन्म घेतात. जे लोक, समाज, राज्य, राष्ट्र स्वीकारतात ते टिकवतात. नव्या विचारांना स्वीकारण्यासारखे शहाणपण दुसरे असत नाही. ‘जुने जाऊ द्या मरणालागुनि' म्हणून तुतारी फुकणारा कवी आपणास हेच समजावतो. 'चकाकते ते सोने' असं असत नाही. भांडवलशाहीतून दिसणारी प्रगती ही चकाकी आहे. समाजवादी विचारसरणीस समाजातील तळागाळात असलेला जो सामान्य माणूस असतो, तो विकासाचा केंद्र असतो. शेतकरी, मजुरांना भांडवलशाहीत स्थान असत नाही. सत्तेची खेळी खेळण्यासाठी हुकमी पाने हाती धरायचा मतलबीपणा सर्व राजकारणी करत असतात. त्यास कोणतेही पक्ष अपवाद नसतात हेच या विधानाने सिद्ध होते.

जाणिवांची आरास/१२१