पान:अशोक.pdf/48

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

वतन-वृात. হৎ परत्वें व जातिपरत्वें जातपाटलाला पुढ़ें लिहिल्याप्रमाणें संज्ञा प्राप्त झाल्या, राजा (लाडू वंजा-यांचा) राव, गादीवालु, प्रधान, सरपाटील, देसाई, परगण पाटाल,महालकरा, नाईक,फडनाईक, खांत, मुकादम, अधिकारी, मानकरी, कारभारी, अगेवान, मुखी, पाटीदार, महाजन, शेटिया, बुधवंत, गांवडा, कट्टीमनी, मेहतर, देशमेहतर, वडेरो इत्यादि. जात-- चौगुल्याला हवालदार, कोतवाल, मोहलेदार, पोलकर, तळवार, ठाणी, हाळी, तेलिया, पडुर वगैरे. कांहीं जातींत ह्यांखेरीज इतर कामगारही नजरेस येतात. अहमदनगर जिल्ह्यांत ‘ तेलंगी कानडी ? नांवाची जात आकोलें डांगाणांत आहे. तिच्या जातपाटलाला ‘नाईक’ म्हणतात. त्याच्या हुकमतींत ' प्रधान ' आणि ‘ शिपाई ? असतो. प्रधानाच्या सांगण्यावर शिपाई जात गोळा करतो, व अपराध्यास पाटलासमोर इनसाफासाठीं धरून आणतो. नाशिककडील भिलुांच्या जातपाटलाला 'मेहतर 'म्हणतात; आणि त्याचे हाताखाली 'फौजदार', * हविलदार ? असतात. हविलदाराचें काम जमातीला लोक बोलावणें व फौजदाराचें काम त्या वेळीं बंदोबस्त ठेवणें हें असतें. कनीटकांतील' बेडगू’ जातीमध्यें जातपाटलाला ' बुधवंत ? म्हणतात, आणि त्याचे मंत्र्यास ' चौलगो ” व शिपायास ' कोलकर ? म्हणतात. जातकामगारांचा अंमल बहुधा सबंध जातीवर चालतो. कांहीं जातींत त्यांच्या अधिकारास स्थलसीमा घातलेली पाहण्यांत येते. कर्नाटकांतील ‘काळकुणबी ? जातींत * गांव बुधवेत ? असून त्याचा वरिष्ठ 'महाल बुधवत ? आहे. पुण्याचे सुतारांना 'मेहतर 'व त्याचे वर ' देश मेहतर ? आहे. न्हाव्यांमध्येंही हे अधिकारी आहेत. आगरी लोकांच्या “ गांवपंचायती ? असून ' तर्फपंचायती ' ऊर्फ ' पेटापंचायती ? आहेत. रत्नागिरीकडील चांभारांच्या जातपाटलाला ' महालकरी ' म्हणतात आणि त्याच्या वरिष्ठास ' मामलेदार ' म्हणतात. विजापुराकडील महारांचा दर गांवीं 'नाईक' आहे. तेहतीस गांवांच्या नाईकांवर 'कसबेदार? नांवाचा अंमलदार आहे. कसबेदारांचे वरिष्ठाला ' कट्टीमनी' म्हणतात