पान:अमेरिका पथदर्शक.pdf/5

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
प्रस्तावना.



 स्वामी सत्यदेव यांच्या सुप्रसिद्ध 'अमेरिका-पथ-दर्शक' या पुस्तकानें हिंदी तरुणांना ज्ञान व अनुभव मिळविण्याचा एक नवाच मार्ग दाखवून दिलेला आहे. १९११ सालीं या पुस्तकाचा हिंदी भाषेमध्यें अवतार झाला व त्या पुस्तकानें हिंदी भाषेच्या कक्षेंतील प्रांतांत अमेरिकेच्या प्रवासाची मोठीच गोडी उत्पन्न केली. शेंकडों हजारों गरीब पण उत्साही व धाडशी अशा विद्याथ्र्यांनीं आपली जिज्ञासा व ज्ञानाची भूक अमेरिकेंत जाऊन तृप्त करून घेतली आहे. स्वामी सत्यदेव यांच्या या पुस्तकानें या दृष्टीनें अत्यंत मोठी कामगिरी केली आहे यांत शंका नाहीं.
 परदेशांत जाणा-या हिंदी लोकांमध्यें मजुरांचा भरणा फार असतो व प्रांतवार पाहूं गेल्यास व परदेशी जाणाऱ्या मजुरांच्या संख्येचाच विचार केल्यास, महाराष्ट्राचा नंबर शेवटचाच लागेल, किंबहुना त्याला नंबरहि मिळणार नाहीं. महाराष्ट्रांत गेल्या दहावीस वर्षांत बरेचसे विद्यार्थी मात्र जाऊं लागले आहेत व ही संख्या वाढत्या प्रमाणावर आहे, ही फारच आनंदाची गोष्ट आहे. जपान, इंग्लंड अगर युरोपखंडांतील इतर देशांत विद्यार्जनाकरितां जाण्यापेक्षां अमेरिकेंत जाणें अधिक श्रेयस्कर आहे. युरोपांतच जावयाचें असल्यास जर्मनी देश सर्वांत सोयीचा; पण स्वावलंबी गरीब विद्यार्थ्यांस अमेरिका देशच हात देऊं शकतो. अर्थात अमेरिकेच्या प्रवासाची व तेथें गेल्यावर कोणत्या त-हेनें राहणें अधिक सोयीचें व फायदेशीर आहे, हें माहित असणें अत्यंत जरूर आहे. अशा माहितीचीं जितकीं पुस्तकें होतील तितकीं बरी. किंबहुना अशा प्रवासाची व तिथें मिळणा-या उंद्योगधंद्यांची व सोयींची माहिती करून देणा-या सुसंघटित संस्था उत्पन्न करण्याचीहि अत्यंत जरूरी आहे.
 स्वामी सत्यदेव यांनीं त्यांचें पुस्तक १९११ साली लिहिलें. त्यानंतर अमेरिकेची माहिती देणारी साधनेंहि पुष्कळ निर्माण झाली. अनेक विद्यार्थीहि तिकडे गेले. तेथील परिस्थितींतहि एवढया काळांत पुष्कळ फरक पडला आहे. तथापि स्वामीजींच्या पुस्तकांत देशभक्तीचा, स्वाभिमानाचा व कणखर वृत्तीचा जो एक सूर आहे तो महत्त्वाचा आहे. भाषांतर करणारे रा. हुद्दार यांनीहि तो