पान:अमेरिका पथदर्शक.pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.
१०
अमेरिका-पथ-दर्शक

 केंस विंचरण्याची फणी, ब्रश, टूथ ब्रश, वस्तरा, साबण व अशाच नित्य उपयोगी पडणा-या वस्तु विकत घेतल्या. ज्या दिवशीं जावयाचें होतें,त्याचे आदले दिवशीं आम्हीं सिंगापूरच्या घाटावर गेलों होतों, तेथे कित्येक जहाजें आमच्या नजरेस पडली. सिंगापूर हे एक मोठें बंदर असल्यामुळे जगांतील सर्व बाजूंकडून येणारीं जहाजें येथें येऊन थांबतात. हें एक लहानसें बेट असून ह्याच्या एका बाजूस चीन व जपान, व दुस-या बाजूस हिंदुस्थान आहे. मोठमोठ्या देशांच्या मध्यभागी असलेलें हे एक नाक्याचें ठिकाण आहे. सिंगापूरमध्यें सर्व देशांतील लोक दृष्टीस पडतात. अर्थात् येथील लोकवस्ती संमिश्र (Cosmopolitan) स्वरूपाची आहे.
 ह्यांवेळीं आम्हीं जर्मन कंपनीचे टिकीट विकत घेतलें. ह्यामुळे सिंगापूरपासून हांगकांग पर्यंतच्या प्रवासांत आम्हांस मुळीच त्रास झाला नाहीं. परंतु चीनी भुतें ह्या जहाजावरहि होती. एकदां त्यांच्याशी झटपट करण्याचाहि प्रसंग मजवर आला. तो प्रसंग असा-मी आपले अंथरूण जेथे ठेविलें होतें, तेथें चार पांच चीनी मजूर आपल्या गुडगुडया घेऊन आले व अफूचे धूम्रपान करावयास बसले. त्या धूराच्या दुर्गधीनें माझे डोकें फिरावयास लागलें. त्यांना तेथून दुसरीकडे जाण्यास मी सांगून पाहिलें, परंतु त्यांनी माझ्या सांगण्याप्रमाणें करावयाचे सोडून उलट, चीनी भाषेंत ते ' घाँ घाँ ' करूं लागलें. ज्याप्रमाणें एक कावळा कांव कांव करूं लागला म्हणजे इतर कावळे त्याचेजवळ येऊन कांव कांव करावयास लागतात, त्याप्रमाणेंच पुष्कळसे चीनी मजूर येथें जमलें व ओरडूं लागले. माझ्या मनांत आलें कीं, चारपांच मजुरांच्या शेंडया धरून त्यांस चांगला चोप द्यावा. परंतु माझे मित्र पालासिंह यांनी मला तसे करूं दिलें नाही. म्हणून कप्तानाकडे जाऊनच ह्या बाबीचा निवाडा करविण्याचे मी ठरविले. चीनी मजुरांपैकी एका मजुरास इंग्रजी येत होतें. त्याला जेव्हां माझा विचार समजला, तेव्हां ते सर्व तेथून दुसरीकडे गेले, व मी आपलें आंथरूण नीटनेटकें करून झोंपण्याची व्यवस्था केली.
 सिंगापूरहून हांगकांगला जाण्यास सहा दिवस लागतात. हा प्रवास चीनी समुद्रांतून करावा लागतो. हा समुद्र फार धोकेबाज आहे. ह्या समुद्रांत मोठमोठी