पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/95

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

भाग चवथा. くミ करावा लागे. पुष्कळ कुटुंबांत वडील भावानें लग्न करातें व बाकीच्यांनीं अविवाहित राहावें अशी चाल होती. १८ हृल्लीं असलीं उदाहरणें डोळ्यांपुढें नसल्यामुळे, अविवाहित राहाण्याकडे फारसा कोणाचा कल दिसत नाहीं, पण हें बरोबर नाहीं. हल्लींही अविवाहित स्थितीची आपल्यास बरीच जरूरी आहे. इंग्लंड वगैरे सुधारलेल्या देशांत अनेक कला नव्यानव्या निघत आहेत, शास्रीय ज्ञानांत अनेक प्रकारचे शोध लागत आहेत, त्यांचे ज्ञान मिळविण्याची जरूरी आपल्यास भासत आहे, त्याकरितां परदेशगमन करण्याची आपल्यास फार जरूरी आहे, याकरितां अविचाहित राहणें,-निदान बराच वेळ अविवाहित राहणें,-आपणांस अगलयाचे झाले आहे. परोपकारांचीं अनेक कामें करणें, देशहिताचीं अनेक कामें करणे, यांसही अविवाहितपणा फार उपयोगीं पडतो. पाठीशीं पोरांबाळांचें लचांड असलें, म्हणजे धाडसाचीं कामें अांगावर घेणे कठीण पडतें. मोठमोठीं कामें, नवेनवे शोध, परदेशांतील प्रवास, मोठे मोठे व्यापार, थोडेंतरी धाडस केल्याशिवाय कसे सिद्धीस जाणार ? याकरितां अशा गोष्टी कराव्या असें ज्यांस वाटत असेल, त्यांनीं सवामणाची विडी आपल्या पायांत अडकवण्यापूर्वी, पुष्कळ विचार अवश्य करावा. १९ मुलें कर्तबगार निघतील असे वाटल्यास, त्यांच्या विवाहाचा काल लांबणीवर टाकणेंच चांगलें. त्यांचा विवाह त्यांच्या इच्छेविरुद्ध करूं नये. पण त्यांचा विवाह करणे श्रेयस्कर आहे, असें वाटल्यास-त्यांच्या अनुमतीनें-ती करून द्यावा, कारण मुलांसकित्येक वाईट संवयॉपासून-विवाहाच्या योगानें बचावतां येतें. २० मुलीचे मात्र लग्न झालें पाहिजे, व मुलांस अविवाहित ठेवावयाचे, असें म्हणून चालणार नाहीं. मुलांस अविवाहित ठेवावयाचे मनांत आणल्यास, कांहींतरी मुली अविवाहित राहिल्यावांचून गर्खतर नाही. मुलगे लप्तास मोठे करावयाचे, असें मनांत अगल्यास मुलीही मोठ्या होणारच. कांहीं पुरुषांनी अविवाहित राहावें असें मनांत आणल्यास, कांहीं खिया अविवाहित राहाण्यास हरकत