पान:AaiBapancha Mitra Moro Ganesh Londhe.pdf/94

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

く。 आईबापांचा मित्र. १६ आपल्यास सामथ्यै नसेल, तर वरास कांहीं देऊं नये. नवरा गरीब कां असेना, पण तो तरुण, सुशील, व उद्योगी असावा, हें चांगलें. दारिद्य हा कांहीं दोष नाहीं. दोघेही उद्योगी असतील, तर ती आपल्या प्रयत्नानें थोड्याच दिवसांत दारिद्यापासून मोकळीं होतील. म्हाताच्यास आपलें सामथ्र्य किंवा निघून गेलेलें तारुण्य, कोणत्याही उपायानें परत आणवणार नाहीं. जराम्रस्तास तरुण स्रीपासून-त्याच्या हातापायांस उपयोगीं पडण्याचा-जरी उपयोग घडला, तरी त्याच्यापासून त्याच्या स्रीस कांहीं उपयोग घडणार नाहीं. विवाह या लोकांत एक महत्वाचा व जन्मभर उपयोगीं पडणारा विधि आहे. तो करतांना फार विचार करावा. वधुवरांची संमति घेणें हेंच त्यांतलें प्रधान अंग समजावें. विवाहानें बद्ध झाल्यावर, उभयतांवर केवढी जबाबदारी पडते, हें आईबापांनी आपल्या अपल्यांस चांगलें समजून सांगावें. विवाह योग्य विचारानें करून, ती जबाबदारी संभाळण्यास आपण त्यांस मदत करावी. अयोग्य विवाह करून, संततीच्या दुःखास आईबापांनीं कारण होऊं नये. त्यापेक्षां तें कर्तव्य यांनीं लांबणीवर टाकावें किंवा मुलांवर सॉपवाचें. अज्ञानपणीं मुलांचे विवाह सहसा करूं नयेत. दोघे जणें साधारण वयांत आलीं, लयांच्या आवडीनिवडी त्यांस कळू लागल्या, विचार करण्याची त्यांस संवय झाली, म्हणजे त्यांच्या विवाहाचा विचार करावा, म्हणजे त्यांची संमति घेण्यास अडचण पडणार नाहीं. १७ अविवाहित राहाण्याकडे हल्लीं कोणाचा फारसा कल नसतो, विवाहित व्हावें ही इच्छा प्रबल दिसते. याचे कारण अविवाहित पुरुषांची उदाहरणें दृष्टीपुढे नाहीत, हें आहे. रामदासांच्या वेळीं रामदास खतां ‘सावधान’ म्हणतांच निघून गेल्यामुळे-पुष्कळ पुरुष विवाहाशिवाय राहात, व त्यांचे अनुयायी बनत. महाराछ्रांत साधुसंतांचे अवतार झाले, त्या काळांत-त्यांचे अवतारकृत्य डोळ्यांसमोर असल्यामुळे-पुण्कळ लोकांची प्रवृत्ति अविवादित राहण्याकडे असे, व कांहीं लोकांस विवाहित होण्याबदल **६