Ganapati aarati
Appearance
सुखकर्ता दुखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची । सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी झळके माळ मुक्ताफळाची ॥०१॥
जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ।
रत्नखचित फरा तूज गौरीकुमरा । चंदनाची उटी कुंकुमकेशरा । हिरे जडित मुकुट शोभतो बरा । रुणझुणती नुपुरे चरणी घागरिया ॥०२॥
लंबोदर पितांबर फनी वरवंदना । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना । दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवंदना । जय देव जय देव जय मंगलमूर्ती । दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥०३॥