साहित्यिक:गोपाळ हरि देशमुख

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
गोपाळ देशमुख
(१८२३–१८९२)

  हे मराठी भाषेतील एक साहित्यिक होते.

  साहित्य[संपादन]

  • इतिहास : (एकूण १० पुस्तके)
   • भरतखंडपर्व (हिंदुस्थानचा संक्षिप्त इतिहास ,१८५१)
   • पाणिपतची लढाई(काशिराज पंडित यांच्या मूळ फार्सी ग्रंथाच्या इंग्रजी भाषांतरावरून, १८७७.)
   • ऐतिहासिक गोष्टी भाग १ (१८७७)
   • ऐतिहासिक गोष्टी भाग २ (१९७८)
   • ऐतिहासिक गोष्टी भाग ३ (१९८०)
   • हिंदुस्थानचा इतिहास - पूर्वार्ध (१८७८)
   • गुजरात देशाचा इतिहास (१८८१)
   • लंकेचा इतिहास (१८८८)
   • सुराष्ट्र देशाचा ससाक्ष इतिहास (गुजराथीवरून अनुवादित,१८९१)
   • उदेपूरचा इतिहास (कर्नल टॉडच्या ‘अ‍ॅनल्स ऑफ राजस्थान‘चे भाषांतर, १८९३)
  • चरित्रे : (एकूण २ पुस्तके)
   • पृथ्वीराज चव्हाण यांचा इतिहास (चांद बारदाई यांच्या ‘पृथ्वीराज रासो‘ नावाच्या इ.स.११९१मध्ये मूळ प्राकृत भाषेत लिहिल्या गेलेल्या काव्यावर आधारित, १८८३)
    • टीप: पृथ्वीराज चव्हाण इ.स. ११९२मध्ये लढाईत मारले गेले. म्हणजे ‘पृथ्वीराज रासो‘ पृथ्वीराजांच्या हयातीत लिहिले गेले होते.
   • पंडित स्वामी श्रीमद्‌दयानंद सरस्वती (१८८३)
  • धार्मिक-नैतिक : (एकूण ७ पुस्तके)
   • खोटी साक्ष आणि खोटी शपथ यांचा निषेध (१८५९)
   • गीतातत्त्व (१८७८)
   • सुभाषित अथवा सुबोध वचने (संस्कृत ग्रंथांतील सुभाषितांचे भाषांतर, १८७८)
   • स्वाध्याय
   • प्राचीन आर्यविद्यांचा क्रम, विचार आणि परीक्षण (१८८०)
   • आश्वलायन गृह्यसूत्र (अनुवाद, १८८०)
   • आगमप्रकाश (गुजराथी, १८८४). या ग्रंथाचे मराठी भाषांतर पुढे रघुनाथजी यांनी केले.
   • निगमप्रकाश (मूळ गुजराथी, इ.स. १८८४)
  • राज्यशास्त्र-अर्थशास्त्र : (एकूण ५ पुस्तके)
   • लक्ष्मीज्ञान (क्लिफ्टच्या पॉलिटिकल इकॉनॉमी या पुस्तकाचे मराठी रूपांतर, १८४९)
   • हिंदुस्थानात दरिद्रता येण्याची कारणे आणि त्याचा परिहार, व व्यापाराविषयी विचार (दादाभाई नौरोजी यांच्या ‘पॉव्हर्टी इन इंडिया’ या निबंधाच्या आधारे, १८७६)
   • स्थानिक स्वराज्य व्यवस्था (१८८३)
   • ग्रामरचना त्यातील व्यवस्था आणि त्यांची हल्लीची स्थिती (१८८३)
   • स्वदेशी राज्ये व संस्थाने (१८८३)
  • समाजचिंतन :(एकूण ५ पुस्तके)
   • जातिभेद (१८८७)
   • भिक्षुक (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
   • प्राचीन आर्यविद्या व रीती (१८७७)
   • कलियुग (मुंबई आर्यसमाजात दिलेले व्याख्यान, १८७७)
   • निबंधसंग्रह (शतपत्रे आणि इतर निबंध, १८६६)
   • विद्यालहरी (?)


  • संकीर्ण : (एकूण ७ पुस्तके)
   • होळीविषयी उपदेश (१८४७)
   • महाराष्ट्र देशातील कामगार लोकांशी संभाषण (१८४८)
   • सरकारचे चाकर आणि सुखवस्तू हिंदुस्थानातील साहेब लोकांशी संभाषण (१८५०)
   • यंत्रज्ञान “इन्ट्रॉडक्शन टु फिजिकल सायन्सेस‘ ह्या पुस्तकाचा अनुवाद, १८५०)
   • पदनामा (फार्सी पुस्तकाचा अनुवाद,१८५०)
   • पुष्पयन(शेख सादीच्या ‘गिलिस्तॊं‘तील आठव्या अध्यायाचा अनुवाद, १८५१)
   • शब्दालंकार (१८५१)
  • हस्तलिखित न सापडल्याने प्रसिद्ध करता न आलेली पुस्तके :(एकूण ४ पुस्तके)
   • आत्मचरित्र
   • एका दिवसात लिहिलेले पुस्तक
   • विचारलहरी
   • हिंदुस्थानातील बालविवाह
  • लोकहितवादींनी चालवलेली नियतकालिके : (एकूण २ )
   • लोकहितवादी (डेमी आकारमानाचे वीस पृष्ठांचे मासिक, ऑक्टोबर १८८२पासून १८८७पर्यंत)
   • लोकहितवादी (ऐतिहासिक ग्रंथ प्रकाशित करणारे त्रैमासिक, एप्रिल१८८३पासून ते १८८७पर्यंत)