सामराज

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

नभतनयानंदनरिपू जो त्या कुळीच जो उद्भवला |

नगारीरिपुच्याजनकासह कुळासी घात केला |

अनुप्रासक सारथी बंधू धराधीपती जो जाला |

करुणालय मोठा जाणा सूर नरही स्तविती ज्याला |

काये वर्णू मी आता तत्पदी च ठेवीन माथा ||

केशरीरिपूपतीरतीअंतक तो नीज जवळी |

पौलस्तीसुत काननरिपू ठेविला निजपद कमळी|

कुम्भोद्भव अरी ज्याते रती न हो रम्य सकाळी |

अनुपम्य लीळा ज्याची कंदर्प कोटी झळाळी ||

अनळउद्भवधिपनंदनप्रिय तो हा ची स्वये गुण गातो |

नेती नेती म्हणती ज्याते तो सज्जन हृदयी वसतो |

स्वामी तो सद्गुरू माझा कल्याण जननी जनक तो|

साम्राज्य निजसुख भोगी मंगळदायकनिधी तो ||


वरील काव्य कल्याण शिष्य श्री सामराज स्वामी यांनी लहिले आहे