साचा:Featured text

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

"'मराठी विकिस्रोत"' म्हणजे विकितत्त्वानुसार स्वयंसेवी योगदान देणाऱ्या सदस्यांमार्फत गोळा केलेल्या, मुद्रितशोधन (प्रूफरीडिंग) केलेल्या, टीका-टिप्पण्या जोडलेल्या मराठी "स्रोत" दस्तऐवजांचा ग्रंथालय प्रकल्प आहे. हा प्रकल्प विकिमीडिया प्रतिष्ठानाद्वारे चालवला जात असून विकिपीडिया या मुक्त ज्ञानकोश प्रकल्पाचा बंधुप्रकल्प आहे. विकिस्रोतात आढळणाऱ्या अस्सल दस्तऐवजांचा आणि विकिपीडियावरील ज्ञानकोशीय लेखांचा एकत्रित उपयोग वापरकर्त्यांना आपल्या संशोधनात्मक उद्दिष्टांसाठी होऊ शकतो. भारतीय लेखकांसाठी असलेल्या नियमाप्रमाणे लेखकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. मरणोत्तर प्रकाशित साहित्य प्रथम प्रकाशनानंतर ६० वर्षांनी प्रताधिकारमुक्त होते. येथे मराठी भाषेतील सर्व प्रताधिकार मुक्त साहित्य उपलब्ध करण्याचा प्रयत्न आहे.

  • जे साहित्य उदा. कादंबरी, कविता, काव्य संग्रह, कथा इ. पहायचे आहे ते उजव्या बाजूच्या "शोध खिडकी" (Search Window) मध्ये भरून शोधू शकता. उदा. दासबोध, तुकाराम गाथा
  • साहित्यिकाचे नाव माहिती असेल तर "शोध खिडकी" मध्ये साहित्यिक:(साहित्यिकाचे नाव) भरून शोध घेतल्यास त्या साहित्यिकाचे पान उपलब्ध होईल. त्या साहित्यिकाच्या पानावर त्या साहित्यिकाच्या सर्व साहित्याची जंत्री उपलब्ध होईल. उदा. साहित्यिक:राम गणेश गडकरी, साहित्यिक:श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. येथे सर्व लेखक, कवी, संत यांच्यासाठी एकच "साहित्यिक" असा शब्दप्रयोग करण्यात आला आहे. आणि "साहित्यिक" हे वेगळे नामविश्व बनविले आहे.
  • सर्व साहित्यिकांची यादी वर्ग:साहित्यिक येथे एकत्रित पणे मिळते.
  • सर्व साहित्यिकांची आणि साहित्याची माहिती पाहायची असेल तर विकिस्रोत:साहित्यिक येथे टिचकी द्या. येथे "वर्णमालेप्रमाणे अनुक्रमणिका" असून मराठी भाषेतील प्रत्येक स्वर आणि व्यंजनापासून आडनावाने सुरू होणार्‍या साहित्यिकांच्या याद्या तयार केल्या आहेत. सर्व पाने नामविश्व या प्रमाणे मांडलेले आहे. संपूर्ण यादी येथे तयार होते. उदा. विकिस्रोत:साहित्यिक-ट मध्ये "ट" पासून सुरू होणार्‍या आडनावाच्या साहित्यिकांची यादी येथे आहे, जसे साहित्यिक:बाळ गंगाधर टिळक. जेथे साहित्यिकाचे आडनाव ज्ञात नाही तेथे त्यांच्या प्रसिद्ध नावाने यादीमध्ये नोंद आहे. उदा. साहित्यिक:समर्थ रामदास स्वामी