Jump to content

सत्यार्थ प्रकाश/८. सातवा समुल्लास

विकिस्रोत कडून

सातवा समुल्लास

ईश्वर

देवता व परमेश्वर

ऋचो अक्षरे परमे व्योमन्यस्मिन्देवा अधि विश्वे निषेदुः । यस्तन्न वेद किमृचा करिष्यति य इत्तद्विदुस्त इमे समासते ।।१।।– ऋ० मं० १। सू० १६४। मं० ३९।।

     (ऋचो अक्षरे) या मंत्राचा अर्थ ब्रह्मचर्याश्रम विषयक प्रकरणात दिला आहेजो सर्वदिव्य गुणकर्मस्वभाव व विद्या यांनी युक्त आहे. ज्याच्यामध्ये पृथ्वी, सूर्य आदी लोक स्थित आहेत, जो आकाशाप्रमाणे सर्वव्यापक आहे व जो सर्व देवांचा देव आहे त्या परमेश्वराला जे लोक जाणत नाहीत, मानीत नाहीत व त्याचे ध्यानही करीत नाहीत ते नास्तिक व मंदमति लोक सदैव दुःखसागरात बुडालेले राहतात, म्हणून जे लोक त्याचीच जाणीव बाळगतात ते सर्व सुखी होतात.

(प्रश्न) वेदामध्ये ईश्वर अनेक आहेत, ही गोष्ट तुम्ही मान्य करता की नाही? (उत्तर) आम्ही ते मान्य करीत नाही. कारण चारही वेदांमध्ये असे कुठेही लिहिलेले नाही की ज्यायोगे ईश्वर अनेक आहेत हे सिद्ध होऊ शकेल. परंतु ईश्वर एक आहे, असेच लिहिले आहे (प्रश्न) मग वेदांमध्ये ज्या अनेक देवतांचा उल्लेख येतो त्याचा अर्थ काय? (उत्तर) जे दिव्यगुणयुक्त असतात त्यांना देवता असे म्हणतात. उदाहरणार्थ पृथ्वी, परंतु तिला कोठेही ईश्वर अथवा उपासनीय मानण्यात आलेली नाही. पाहा या मंत्रात असे सांगितले आहे की, “ज्याच्यामध्ये सर्व देवता वास करतात तो जाणण्यास व उपासना करण्यास योग्य ईश्वर आहे." जे लोक देवता या शब्दाचा अर्थ परमेश्वर असा करतात त्यांची ती चूक आहेपरमेश्वर हा देवांचा देव असल्याने त्याला महादेव असे म्हणतात तोच साऱ्या जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करणारा, न्यायाधीश व अधिष्ठाता आहे.

    ‘त्रयस्त्रिंशत् त्रिंशता.’ इत्यादी वेदमंत्रांमध्ये जे प्रमाण आहे त्याची व्याख्या शतपथ ब्राह्मणामध्ये अशी करण्यात आली आहे की तेहतीस देव आहेत. पृथ्वी, जल, अमी, , आकाशचंद्रमा, सूर्य आणि नक्षत्रे ही आठ. सर्व सृष्टीची निवासस्थाने असल्याने ते आठ वसू आहेत. प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कूर्म, कृकल, देवदत्त, धनंजय व जीवात्मा हे शरीराला सोडून जाताना रुदन करायला लावतात म्हणून या अकरांना रुद्र असे म्हणतात. संवत्सराच्या बारा महिन्यांना बारा आदित्य म्हणतात. कारण ते सवांचे आयुष्य घेऊन जातात. विजेचे नाव इंद्र यासाठी आहे की तो परम ऐश्वर्याचा हेतू असतो. यज्ञाला प्रजापती म्हणण्याचे कारण असे की त्यामुळे वायु, वृष्टि, जल व औषधी यांची शुद्धी होते. विद्वानांचा सत्कार व नाना प्रकाराने शिल्पविद्येच्या प्रजेचे पालन होते. या तेहतीसांमध्ये पूर्वोक्त गुण असल्यामुळे त्यांना देव असे म्हणतात. त्यांचा स्वामी व सर्वाहन श्रेष्ठ असा जो चौतीसावा परमात्मा तोच उपास्यदेव आहे असे शतपथाच्या चौदाव्या कांडामध्ये स्पष्ट सांगितले आहे. असेच इतरत्रही लिहिलेले आहे. लोकांनी ही शास्त्रे पाहिली असती तर वेदांमध्ये अनेक ईश्वर मानल्याप्रमाणे भ्रमजाळात गुरफटून ते कशाला भरकटले असते ? ॥१॥

ईशा वास्य मिदँ् सर्वं यत्किञ्च जगत्याञ्जगत् । तेन त्यक्तेन भुञ्जीथा मा गृधः कस्य स्विद्धनम् ।।२।।-यजु० अ० ४०। मं० १।।

हे मनुष्या जे काही या जगात गतिमान आहे त्या सर्वांमध्ये व्यापक होऊन जो सर्वांचे नियमन करतो त्याला ईश्वर असे म्हणतात. त्याला भिऊन तू कोणाच्याही धनाची अन्यायाने अभिलाषा बाळगू नकोस अन्यायाचरणाचा त्याग कर आणि न्यायाचरणरुपी धर्माने आपल्या आत्म्याने आनंदाचा उपभोग घे. ॥२॥

अ हम्भुवं वसुनः पूर्व्यस्पतिरहं धनानि सं जयामि शश्वतः । मां हवन्ते पितरं न जन्तवोऽहं दाशुषे विभजामि भोजनम् ।।३।।– ऋ० मं० १०। सू० ४८। मं० १।।

ईश्वर सर्वांना उपदेश करतो की, “हे मनुष्यांनो ! मी ईश्वर सर्व जगाच्या आधी विद्यमान होतो व मी जगाचा पती आहे. मी सनातन, जगत्कारण आणि सर्व धनाचा विजय करणारा व देणारा आहे. मलाच सर्व जीवांनी जशी मुले बापाला हाक मारतात तशी हाक मारावी. मी सर्वांना सुख देणाऱ्या जगासाठी नाना प्रकारच्या भोज्य पदार्थांची विभागणी त्यांच्या पालनासाठी करतो." ॥३॥

अ हमिन्द्रो न परा जिग्य इद्धनं न मृत्यवेऽवतस्थे कदाचन । सोममिन्मा सुन्वन्तो याचता वसु न मे पूरवः सख्ये रिषाथन ।।४।।– ऋ० मं० १०। सू० ४८। मं० ५।।

मी परम ऐश्वर्यवान सूर्याप्रमाणे सर्व जगाचा प्रकाशक आहे, माझा कधी पराजय होत नाही अथवा मला कधी मरण येत नाही. मीच जगतरूपी धनाचा निर्माता आहे. मी साऱ्या जगाची उत्पत्ती करणारा, मलाच जाणा हे जीवांनो! ऐश्वर्य प्राप्तीसाठी प्रयत्न करीत असता तुम्ही माझ्याकडे विज्ञानादी धन मागा आणि माझ्या मैत्रीपासून तुम्ही दूर जाऊ नका. ॥४॥

अ हं दां गृणते पूर्व्यं वस्वहं ब्रह्म कृणवं मह्यं वर्धनम् । अ हं भुवं यजमानस्य चोदिताऽयज्वनः साक्षि विश्वस्मिन्भरे ।।५।।– ऋ० मं० १०। सू० ४९। मं० १।।

मानवांनो ! सत्यभाषणरूपी स्तुती करणाऱ्या लोकांना मी सनातन ज्ञानादी धन देतो. मी ब्रह्म म्हणजे वेदांचा प्रकाश करणारा आणि तेच वेद माझ्याविषयी सर्वकाही सांगतात. वेदाद्वारेच मी सर्वांचे ज्ञान वाढवितो. मी सत्पुरुषांचा प्रेरक, यज्ञ करणाऱ्यांना फळ देणारा आणि या विश्वात जे काही आहे ते सर्व कार्य करणारा, धारण करणारा आहे. म्हणून तुम्ही माझ्याऐवजी माझ्या ठिकाणी दुसऱ्या कुणाचीही पूजा करू नका अथवा तर कुणालाही मानू नका व जाणू नका. ॥५॥

हिरण्यगर्भः समवर्त्तताग्रे भूतस्य जातः पतिरेक आसीत् । स दाधार पृथिवीं द्यामुतेमां कस्मै देवाय हविषा विधेम ।।-यजु० अ० १३। मं० ४।।

हा यजुर्वेदातील मंत्र आहे. हे मनुष्यांन! जो या सृष्टीच्या आधी होता, जो सूर्यादि तेजोमय लोकांचे उत्पत्तिस्थान आधार आणि जे काही उत्पन्न झाले होते, आहे द होईल त्याचा स्वामी होतो, आहे व असेल तो पृथ्वीपासून सूर्यलोकापर्यंतची सारी सृष्टी निर्माण करून तिचे धरण (पालन) करीत आहे. त्या सुखस्वरूप परमेश्वराचीच भक्ती जशी आम्ही करतो तशीच तुम्हीसुध्दा करा.

ईश्वराचे अस्तित्व

(प्रश्न) तुम्ही ईश्वर-ईश्वर असे म्हणता. परंतु त्याचे अस्तित्व कसे सिद्ध करता? (उत्तर) सर्व प्रत्यक्षादी प्रमाणांनी (आम्ही ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करतो). (प्रश्न) ईश्वराच्या बाबतीत प्रत्यक्षादी प्रमाणे कधीच लागूए पडत नाहीत (उत्तर) इन्द्रियार्थसन्निकर्षोत्पन्नं ज्ञानमव्यपदेश्यमव्यभिचारि व्यवसायात्मकं प्रत्यक्षम्।। -न्याय० अ० १। सू० ४।। . हे गौतम महर्षीकृत न्यायदर्शनातील सूत्र आहे. कान,त्वचा, डोळे, जीभ, नाक व मन यांचा अनुक्रमे शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, सुख-दु:ख व सत्यासत्य या विषयांशी संबंध होऊन जे ज्ञान उत्पन्न होते त्याला प्रत्यक्ष ज्ञान म्हणतात. पण ते भ्रमरहित असावे.

    आता विचार केला पाहिजे की इंद्रियेव मन यांच्या द्वारे गुणांचे प्रत्यक्ष ज्ञान होते, गुणीचे नव्हे. ज्याप्रमाणे चारही त्वचा वगैरे इंद्रियांनी स्पर्श, रूप, रस व गंध यांचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्याने गुणी म्हणजे पृथ्वी तिचे आत्मायुक्त मनाने प्रत्यक्ष ज्ञान होते, त्याचप्रमाणे या प्रत्यक्ष सृष्टिमधील रचना विशेषादी गुणांचे प्रत्यक्ष ज्ञान झाल्याने परमेश्वराचेही प्रत्यक्ष ज्ञान होते.
    आणि अशाचप्रकारे जेव्हा आत्मा मन व मन इंद्रियांना एखाद्या विषयात लावतो किंवा चोरी वगैरे वाईट कृत्ये किंवा परोपकारासारखी सत्कृत्ये करण्यास ज्या क्षणी प्रारंभ करते त्या क्षणी जीवाच्या इच्छा, ज्ञान वगैरे त्याच इच्छित विषयांकडे आकृष्ट होतात. त्यावेळी आम्यामध्ये वाईट कृत्य करण्याविषयी भय, शंका व लज्जा आणि चांगले काम करण्याविषयी अभय, निशंकता व आनंदोत्साह उत्पन्न होतो. हे सारे जीवाम्याकडून नव्हे तर परमात्म्याकडून होते.
    आणि जेव्हा जीवात्मा शुद्ध होऊन परमेश्वराचा विचार करण्यात तत्पर राहतो तेव्हा त्याला स्वत:चे व परमेश्वराचे प्रत्यक्ष ज्ञान होते. जेव्हा परमेश्वराचे प्रत्यक्ष ज्ञान होत असते. तर मग अनुमान आदींनी परमेश्वराचे ज्ञान होण्यात काय संदेह? कारण कार्यावरून कारणाचे अनुमान होत असते.

(प्रश्न) ईश्वर व्यापक आहे की एखाद्या विशिष्ट क्षेत्रात राहतो? (उत्तर) ईश्वर सर्वव्यापक आहे. कारण जो एका देशात राहतो तो सर्वांतर्यामी, सर्वज्ञ, सर्वनियता, सर्वांचा स्रष्टा, सर्वांचा धर्ता व प्रलयकर्ता होऊ शकत नाही (कारण) अप्राप्त क्षेत्रात कत्र्याची क्रिया असंभव असते. (प्रश्न) परमेश्वर दयाळू व न्याय करणारा आहे किंवा नाही? (उत्तर) होय, आहे (प्रश्न) हे दोन्ही गुण परस्परविरुद्ध आहेत. जो न्याय करतो तो दया कशी करणार? आणि जो दया करील तो न्यायापासून दूर होईल कारण केलेल्या कृत्यानुसार तंतोतंत सुखदु:ख देणे, याला न्याय असे म्हणतात; आणि अपराध्याला शिक्षा न करता सोडून देणे, याला दया असे म्हणतात. (उत्तर) न्याय व दया यांमध्ये नाममात्र भेद आहे. कारण जो हेतू न्यायाने साध्य होतो तोच दयेने साध्य होतो. माणसाने गुन्हा करणे सोडून द्यावे व दु:खात पडू नये हा शिक्षा करण्याचा हेतू असतो यामुळे इतरांचे दुःख दूर करणे, याला दया असे म्हणतात. दया व न्याय यांचा जो अर्थ तुम्ही लावला आहे तो बरोबर नाही. कारण ज्याने जेवढे व जसे वाईट कृत्य केले असेल त्याला तेवढी व तशीच शिक्षा झाली पाहिजे. त्याचेच नाव न्याय आहे. अपराध्याला शिक्षा दिली गेली नाही तर दयेचाच नाश होईल कारण एका गुन्हेगार डाकूला सोडून दिल्याने हजारो धर्मात्मा पुरुषांना दुःख देणे होय. जेव्हा एकाला सोडून दिल्याने हजारो माणसांना दुख प्राप्त होते तेव्हा ती कसली दया ? त्या डाकूला तुरुंगात डांबून ठेवून पायापासून त्याला वाचविणे म्हणजे त्या डाकूवर दया करणे होय आणि त्या डाकूला मारून टाकल्याने हजारो माणसांवर दया प्रदर्शित होत असते. (प्रश्न) तर मग दया आणि न्याय हे दोन शब्द का निर्माण झाले ? दोन शब्दांचा अर्थ एकच असेल तर दोन वेगवेगळे शब्द असणे निरर्थक ठरते. म्हणून एकच शब्द असता तर बरे झाले असते. यावरून हेच सिद्ध होते की दया व न्याय यांचे एक प्रयोजन नाही. (उत्तर) एका अर्थाचे अनेक शब्द व एका शब्दाचे अनेक अर्थ असत नाहीत काय (प्रश्न) असतात (उत्तर) तर मग तुम्हांला पुनः शंका का आली? (प्रश्न) जगात तसे ऐकू येते, म्हणून. (उत्तर) जगात तर खरे आणि खोटे दोन्ही कामांवर येते. परंतु आपण त्याच्या विचाराने निर्णय करणे आपले काम आहे.

    पाहा ! ईश्वराने सर्व जीवांचे मनोरथ सिद्ध व्हावेत म्हणून या जगात सर्व पदार्थ निर्माण करून ते जीवांना दान दिले आहेत. ही ईश्वराची मोठीच दया आहे. याहून दुसरी मोठी दया कोणती आहे? आता न्यायाचे फळ तर प्रत्यक्षच दिसते. सुखदुःखाची व्यवस्था कमी-जास्त फळावरून परमेश्वराचा न्याय दिसून येत आहे. दया आणि न्याय यांमध्ये एवढाच फरक आहे की मनाने सर्वांना सुख प्राप्त व्हावे व दुःख दूर व्हावे ही इच्छा व तशी कृती करणे ही दया होय आणि बंधनछेदनादी बाह्य मार्गांनी अपराधानुसार शिक्षा करणे म्हणजे न्याय होय. सर्वांना पाप व दु:ख यांपासून दूर ठेवणे हेच या दोहोचे उद्दिष्ट आहे.

(प्रश्न) ईश्वर साकार आहे की निराकार? (उत्तर) ईश्वर निराकार आहे. कारण जो साकार असतो तो सर्वव्यापक होऊ शकत नाही. ईश्वर सर्वव्यापक नसता तर त्याला सर्वज्ञ आदी गुणही लागू पडले नसते. कारण परिमित वस्तूमधील गुण, कर्म, स्वभावही परिमित असतात. तसेच तो (साकार असता तर) शीत-उष्ण, क्षुधा, तृषा, रोग, दोष, छेदन, भेदन इत्यादी गोष्टींपासून मुक्त राहिला नसता. यावरून हेच सिद्ध होते की ईश्वर निराकार आहे. तो साकार असता तर त्याचे नाक, कान, डोळे इत्यादी अवयव बनविणारा दुसरा कोणीतरी असला पाहिजे. कारण जो संयोगाद्वारे उत्पन्न होतो त्याचा संयोग घडवून आणणारा निराकार चेतन अवश्य वेगळा असला पाहिजे. येथे कोणी असे म्हणेल की ईश्वराने स्वेच्छेने आपले शरीर बनविले, तर ते शरीर बनण्यापूर्वी तो निराकार होता, असेच सिद्ध होते म्हणूनच परमात्मा कधी शरीर धारण करीत नाही. परंतु निराकार असल्यामुळे साऱ्या जगाला सूक्ष्म कारणांपासून स्थूलाकार बनवित. (प्रश्न) ईश्वर सर्वशक्तीमान आहे की नाही? (उत्तर) आहे. परंतु सर्वशक्तिमान या शब्दाचा जो अर्थ तुम्ही समजता तसा तो नाही, परमेश्वर जगाची उत्पत्ती, पालन (स्थिती), प्रलय (लय) आदी आणि सर्व जीवांना त्यांच्या पापपुण्यांनुसार यथायोग्य सुखदुःख देण्याची व्यवस्था करण्यात आपल्या कामांमध्ये कोणाचीही किंचितही मदत घेत नाही. अर्थात आपल्या अनंत सामर्थ्यानेच तो आपली सर्व कामे पूर्ण करतो. (प्रश्न) आम्ही असे समजतो की ईश्वर त्याला हवे ते करू शकतो; कारण त्याच्यावर दुसरा कोणी नाही. (उत्तर) त्याची काय इच्छा आहे? तुम्ही असे म्हणाल की त्याला सर्व काही हवे असते आणि तो ते करू शकतो. यावर आम्ही तुम्हाला असे विचारतो की परमेश्वर स्वत:चा नाश करू शकतो काय? अनेक ईश्वरांची उत्पत्ती करू शकतो काय? स्वत: अविद्वान बनून चोरी, व्यभिचार वगैरे पाप कर्णे करून तो स्वत: दुःखीही होऊ शकतो काय? ज्याप्रमाणे यागोष्टी परमेश्वराच्या गुणकर्मस्वभावाविरुद्ध आहेत. म्हणून तुमच्या म्हणण्यानुसार तो सर्व काही करू शकतो, असे कधी घडू शकत नाही. म्हणून सर्वशक्तिमान या शब्दाचा जो अर्थ आम्ही केला आहे तोच बरोबर आहे. (प्रश्न) परमेश्वर सादी आहे की अनादी? (उत्तर) परमेश्वर अनादी आहे. ज्याचे आदि काही कारण अथवा समय नसतो त्याला अनादी असे म्हणतात. हे सर्व अर्थ पहिल्या समुल्लासामध्ये सांगितलेच आहेत. तेथे पाहावे. (प्रश्न) परमेश्वर काय इच्छितो? (उत्तर) परमेश्वर सर्वांचे कल्याण आणि सर्वासाठी सुख इच्छितो परंतु स्वतंत्रतापूर्वक तो कोणालाही पाप, अपराधावाचून पराधीन करीत नाही. (प्रश्न) परमेश्वराची स्तुती, प्रार्थना व उपासना केली पाहिजे की नाही? (उत्तर) होय (प्रश्न) स्तुती वगैरे केल्याने ईश्वर आपला नियम मोडून स्तुती, प्रार्थना करणाऱ्याचे पाप मुक्त करील काय? (उत्तर) नाही. (प्रश्न) तर मग स्तुती, प्रार्थना का, कशासाठी करायची? (उत्तर) स्तुती, प्रार्थना करण्याचे फळ वेगळेच आहे. (प्रश्न) ते कोणते? (उत्तर) स्तुतीमुळे ईश्वराविषयी प्रीती निर्माण होते. त्याच्या गुण-कर्म-स्वभावामुळे आपल्या गुणकर्मस्वभावात सुधारणा होऊ शकते. प्रार्थनेने निरभिमानता उत्पन्न होऊन उत्साह वाढतो व साहाय्य मिळते. उपासनेने परब्रह्माशी मेळ होऊन त्याचा साक्षात्कार होतो. (प्रश्न) हे जरा स्पष्ट करून सांगा. (उत्तर ) जसे,

प्रार्थना व उपासना

स पर्यागाच्छुक्रमकायमव्रणमस्नाविरँ्शुद्धमपापविद्धम् । कविर्मनीषी परिभूः स्वयम्भूर्याथातथ्यतोऽर्थान् व्य दधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः ।।१।। -यजु० अ० ४०। मं० ८।।

ईश्वराची स्तुतीः- तो परमात्मा सर्वत्र व्यापक, शीघ्रकारी व अनंत बलवान आहे. जो शुद्ध, सर्वज्ञ, सर्वांचा अंतर्यामी, सर्वावर विराजमान, सनातन, स्वयंसिद्ध तो परमेश्वर अनादी काळापासून आपल्या अनादी सनातन जीवरूपी प्रजेला आपल्या सनातन विधेने यथावत अर्थाचा बोध वेदांद्वारे करीत आहे. ही सगुण स्तुती झाली. परमेश्वरामध्ये जे-जे गुण आहेत त्या गुणांची स्तुती करणे म्हणजे सगुण स्तुती होय. (अकाय) तो परमेश्वर कधी शरीर धारण करत नाही, अथवा जन्म घेत नाही. त्याच्यामध्ये छिद्र अथवा व्रण असत नाही, जो नाडीशिरास्नायूच्या बंधनात अडकत नाही आणि तो कधी पापाचरण करीत नाही, त्याला क्लेश, दु:ख, अज्ञान ही कधीही होत नाहीत. रागद्वेषादी विकारांपासून तो अलिप्त मानून परमेश्वराची जी स्तुती केली जाते ती निर्गुण स्तुती होय. परमेश्वरामध्ये जे गुण आहेत तसे गुण-कर्म-स्वभाव आपलेही करणे हे या स्तुतीचे फळ आहे. जसे परमेश्वर न्यायी आहे. तसेच आपणही न्यायी व्हावे. असे न करता केवळ भाटाप्रमाणे जो परमेश्वराचे गुण कीर्तन करतो पण आपले आचरण सुधारीत नाही त्याचे ते गुणसंकीर्तन व्यर्थ आहे

यां मेधां देवगणाः पितरश्चोपासते । तया मामद्य मेधयाग्ने मेधाविनं कुरु स्वाहा ।।१।।-यजु० अ० ३२। मं० १४।।

हे अग्ने! ज्ञानस्वरूप परमेश्वरा! तुझ्या कृपेने ज्या बुद्धीची उपासना विज्ञान, ज्ञानी व योगी करतात त्याच बुद्धीच्या योगाने मला याच वर्तमान काळात तू बुद्धिमान कर. ॥१॥

तेजोऽसि तेजो मयि धेहि । वीय्यर्मसि वीर्यॄं मयि धेहि । बलमसि बलं मयि धेहि । ओजोऽस्योजो मयि धेहि । मन्युरसि मन्युं मयि धेहि । सहोऽसि सहो मयि धेहि ।।२।।-यजुः अ० १९। मं० ९।।

हे परमेश्वरा! तू ज्ञानस्वरूप आहेस. कृपा करून माझ्यामध्येही ज्ञानाचा प्रकाश कर. तू अनंत पराक्रमयुक्त आहेस. म्हणून आपल्या कृपाकटाक्षाने माझ्यामध्ये पूर्ण पराक्रम धारण करावे. तू अनंत बलयुक्त आहेस. म्हणून माझ्यामध्येही बल निर्माण कर. तू अनंत सामथ्ययुक्त आहेस. तू मलाही पूर्ण सामर्थ्य दे. तू दुष्कृत्ये व दुष्ट माणसे यांच्यावर क्रोध करणारा आहेस. मलाही तू तसाच कर. तू निंदा व स्तुती यांची पर्वा करीत नाहीस आणि तुझा अपराध करणाऱ्यांना सहन करतोस, कृपा करून मलाही तसाच करावे. ॥२॥

यज्जाग्रतो दूरमुदैति दवैं तदु सुप्तस्य तथैवैति । दूरंगमं ज्योतिषां ज्योतिरेकं तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु ।।३।।-यजु० अ० ३४। मं० १।।

हे दयानिधे! तुझ्या कृपेने माझे मन जागेपणी दूरवर जाते आणि दिव्य गुणांनी युक्त राहते. तेच मग मी झोपलो असताना सुषुप्तीत म्हणजे गाढ निद्रेत प्रवेश करते; किंवा स्वप्नात दूरदूर गेल्यासारखा व्यवहार करते. सर्व प्रकाशकांचे प्रकाशक असणारे ते एक माझे मन शुभसंकल्पयुक्त म्हणजे स्वत:चे व इतरांचे कल्याण व हित चिंतणारे होवो. कोणाचीही हानी करण्याची इच्छा बाळगणारे ते कधीही न होवो. ॥३॥

येन कर्माण्यपसो मनीषिणो यज्ञे कृण्वन्ति विदथेषु धीराः । यदपूर्वं यक्षमन्तः प्रजानां तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु ।।४।।-यजु० अ० ३४। मं० २।।

हे सर्वांतर्यामी ! ज्याच्या साह्याने कर्म करणारे धैर्ययुक्त विद्वान लोक यज्ञ व युद्धादी कृत्ये करतात, जे अपूर्व सामर्थ्ययुक्त, पूजनीय व प्रजेच्या अंतकरणात बसणारे आहे ते माझे मन शुभ संकल्याने युक्त होवो. ते सदैव धर्माचरणाची इच्छा बाळगणारे व अधर्मापासून दूर राहणारे होवो॥४॥

यत्प्रज्ञानमुत चेतो धृतिश्च यज्ज्योतिरन्तरमृतं प्रजासु । यस्मान्नऽऋते किञ्चन कर्म क्रियते तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु ।।५।।-यजु० अ० ३४। मं० ३।।

जे उत्कृष्ट ज्ञानाने युक्त आहेजे इतरांना चेतना देते, निश्चयात्मक वृत्तीचे आहे आणि सर्व प्रजेच्या अंतर्यामी असणारा प्रकाशयुक्त आहे, जे अविनाशी आहे. ज्याच्या बाजून कोणी कोणतेही काम करू शकत नाही ते माझे मन शुद्ध गुणांची आकांक्षा बाळगणारे व दुष्ट गुणांपासून दूर राहो. ॥५॥

येनेदं भूतं भुवनं भविष्यत्परिगृहीतममृतेन सर्वम् । येन यज्ञस्तायते सप्त होता तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु ।।६।।-यजु० अ० ३४। मं० ४।।

हे जगदीश्वरा! ज्याच्या योगाने सर्व योगी लोक भूत, भविष्य व वर्तमान काळांतील व्यवहार जाणतात,जे अविनाशी जीवात्म्याचे परमेश्वराशी मीलन घडवून त्याला सर्व प्रकारे त्रिकालज्ञ बनविते, ज्याच्यामध्ये ज्ञान व कर्म आहे, पाच ज्ञानेंद्रिये, बुद्धीब आत्मायुक्त असतो, त्या योगरूपी यज्ञाची वृद्धी होते, ते माझे मन योगविज्ञानयुक्त बनून अविद्या आदी क्लेशांपासून दूर राहो. ॥६॥

यस्मिन्नचृ: साम यजूषि यस्मिन्प्रितष्ठिता रथनाभाविवाराः । यस्मिँश्चित्तँ्सर्वमोतं प्रजानां तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु ।।७।।-यजु० अ० ३४। मं० ५।।

हे परम विद्वन् परमेश्वरा! तुझ्या कृपेने माझ्या मनामध्ये, रथाच्या चाकाच्या मध्यभागी तुंब्यामध्ये बसविलेल्या आऱ्याप्रमाणे, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद व ज्यात अथर्ववेदसुद्धा प्रतिष्ठित होतो आणि ज्याच्यामध्ये सर्वज्ञ, सर्वव्यापक, प्रजांचा साक्षी चित चेतन जाणवते.ते माझे मन अविद्येचा नाश करून सदैव विद्याप्रिय होवो॥७॥

सुषारथिरश्वानिव यन्मनुष्यान्नेनीयतेऽभीशुभिर्वाजिनऽइव । हृत्प्रतिष्ठं यदजिरं जविष्ठं तन्मे मनः शिवसंकल्पमस्तु ।।८।।-यजु० अ० ३४। मं० ६।।

हे सर्वनियंत्या ईश्वरा! जे माझे मन लगाम घातलेल्या घोड्यांप्रमाणे अथवा घोड्यांवर नियंत्रण ठेवणाऱ्या सारथ्याप्रमाणे माणसांना इकडे- तिकडे अनन्तरीत्या फिरविते, जे हृदयामध्ये प्रतिष्ठित, गतिमान व अत्यंत वेगवान आहे, ते माझे मत सर्व इंद्रियांना अधर्माचरणा पासून दूर ठेवून धर्माच्या मार्गाने सदैव नेईल, अशी कृपा तू माझ्यावर कर॥८॥

अ अग्ने नय सुपथा राये अस्मान् विश्वानि देव वयुनानि विद्वान् । युयोध्यॄस्मज्जुहुराणमेनो भूयिष्ठां ते नमऽउक्ति विधेम ।।१।।-यजु० अ० ४०। मं० १६।।

हे सुखदायक स्वप्रकाशस्वरूप सर्वज्ञ परमात्मन! तू आम्हाला श्रेष्ठ मार्गानि ने व सर्वप्रजानांची प्राप्त करून दे आणि आमच्यामध्ये जे काही कुटिल पापाचरणरूप आहे त्यापासून दूर करावे. तू आम्हांला पवित्र करावेस म्हणून आम्ही तुझी नम्रतापूर्वक पुष्कळ स्तुती करतो. ॥१

मा नो महान्तमुत मा नोऽअर्भकं मा न उक्षन्तमुत मा न उक्षितम् । मा नो वधीः पितरं मोत मातरं मा नः प्रियास्तन्वो रुद्र रीरिषः ।।१।। -यजु० अ० १६। मं० १५।।

हे रुद्रा ! दुष्टांना त्यांच्या पापाबद्दल दुःखरूपी शिक्षा देऊन त्यांना रडावयास लावणाऱ्या परमेश्वरा ! आमचे लहानमोठे लोक, गर्भ, माता, पिता आणि प्रिय बंधु वर्ग तसेच शरीरांचा नाश करण्यास तू आम्हांला प्रेरित करू नकोस. ज्यायोगे आम्ही तुझ्या शिक्षेस पात्र होणार नाही अशा मार्गाने तू आम्हांला चालव. ॥१॥

असतो मा सद् गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्योर्माऽमृतं गमयेति।। -शतपथ ब्रा०।।ब्रा० ३।। के०१।। व०३०।।

हे परमगुरो परमात्मन तू आम्हांला असत् मार्गापासून दूर करून सन्मार्गाने ने, अविद्यारूपी अंधकारातून सोडवून विद्यारूपी सूर्य मिळवून दे; आणि मृत्यूरूपी रोगापासून दूर करून मोक्षाच्या आनंदरूपी अमृताची प्राप्ती करून दे. अर्थात ज्या दोषांपासून किंवा दुर्गुणांपासून परमेश्वर मुक्त आहे त्यांपासून आपणांसही अलिप्त समजून परमेश्वराची जी प्रार्थना केली जाते ती प्रार्थना विधि निषेधमुख असल्यामुळे ती सगुणनिर्गुणात्मक प्रार्थना होय. जी व्यक्ती ज्या गोष्टीसाठी प्रार्थना करीत असेल तिने त्याप्रमाणे आपले आचरण ठेवले पाहिजे. उदाहरणार्थ, जसे एखादी व्यक्ती सर्वोत्तम बुद्धी मिळावी म्हणून परमेश्वराची प्रार्थना करीत असेल तर तिने आपणाकडून प्रयत्न होईल तितका विद्याव्यासंग केला पाहिजे. म्हणजे असे की, आपल्या पुरुषार्थाची पराकाष्ठा केल्यानंतरच । परमेश्वराची प्रार्थना करणे उचित होय

    अशी प्रार्थना कधीही करता कामा नये की, "हे परमेश्वरा! तू माझ्या शत्रूंचा नाश कर. मला सर्वात मोठा बनव. माझीच प्रतिष्ठा वाढव आणि माझ्या आथील सर्व राहतील असे कर." अशी प्रार्थना परमेश्वर कधीही स्वीकारीत नाही. कारण जेव्हा दोनही शत्रु एकमेकांच्या नाशासाठी ईश्वराची प्रार्थना करीत असतील तेव्हा परमेश्वराने दोघांची प्रार्थना मान्य करून दोघांचा नाश करावा काय ? कोणी असे म्हणेल की ज्याची भक्ती अधिक असेल त्याची प्रार्थना ईश्वराने ऐकावी. यावर आमचे म्हणणे असे की ज्याची भक्ती कमी असेल त्याच्या शत्रूचाही कमी नाश व्हावा. अशा मूर्खपणाच्या प्रार्थना करता-करता एखादा माणूस अशीही प्रार्थना करील की, "हे परमेश्वरा! तू आम्हाला भाकरी भाजून खाऊ घाल. माझे घर झाडून काढ. माझे कपडे धू आणि माझी शेतवाडीही कसून दे." अशा प्रकारे जे लोक देवावर हवाला ठेवून आळशी होऊन बसून राहतात ते महामूर्ख आहेत. कारण परमेश्वराची पुरुषार्थ करण्याची जी आज्ञा आहे ती आज्ञा जो मोडेल त्याला कधीच सुख मिळणार नाही. पाहा :-

कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतँ्समाः ।।२।। -यजु० अ० ४०। मं० २।।

परमेश्वर आज्ञा देतो की माणसाने शंभर वर्षे म्हणजे जिवात जीव असेपर्यंत कर्म करीत जगण्याची इच्छा धरावी. (कधीही आळशी बनू नये.)

    पाहा ! सृष्टीमध्ये जितके प्राणी अथवा अप्राणी आहेत ते सर्व आपापली कामे व प्रयत्न करीतच असतात.

मुंग्या वगैरे प्राणी सतत प्रयत्न करीत असतात. पृथ्वी वगैरे सदैव फिरत असतात आणि वृक्ष वगैरे सदा वाढतात व घटतात. या गोष्टींवरून माणसानेही धडा घेतला पाहिजे. पुरुषार्थ माणूस पुरुषार्थ करतो त्याला इतर लोक साह्य करीत असतात. त्याचप्रमाणे धर्मयुक्त पुरुषार्थ ईश्वरही मदत करतो. जसे काम करणाऱ्या माणसास नोकर ठेवतात आळशाला कोणी ठेवत नाही. डोळे असणारा व पाहण्याची इच्छा बाळगणारा असतो त्यालाच दाखविले जाते. आंधळ्याला नाही.

    याचप्रमाणे परमेश्वरही सवांच्या परोपकाच्या प्रार्थनत साह्य करतो. हानिकारक कृत्यामध्ये तो सहायक बनत नाही. गूळ गोड आहे असा जप करीत करणाऱ्याला गूळ मिळत नाही किंवा त्याचा स्वादही कधी कळत नाही. परंतु गुळाच्या प्राप्तीसाठी जो यल करतो त्याला लवकर किंवा उशीरा गूळ अवश्य मिळतच असतो. आता तिसरी उपासना-

उपासना

समाधिनिर्धूतमलस्य चेतसो निवेशितस्यात्मनि यत्सुखं भवेत्। न शक्यते वर्णयितुं गिरा तदा स्वयं तदन्तःकरणेन गृह्यते।।१।। मैत्राय प्र० 4।। ख० ४।। व० ९।।

हे उपनिषदांतील वचन आहे. समाधीच्या योगाने ज्या पुरुषाचे अविद्यादी दोष नष्ट झाले आहेत, ज्याने आत्मस्थ होऊन परमात्म्यामध्ये आपले चित्त लावले आहे त्याला परमात्म्याशी संयोगाचे जे सुख प्राप्त होते त्याचे वर्णन वाणीने करता येऊ शकत नाही. कारण जीवात्मा आपल्या अंत:करणाने त्या आनंदाचे ग्रहण करतो. उपासना या शब्दाचा अर्थ जवळ बसणे असा आहे. अष्टांग योगाद्वारे परमात्म्याचे समिपस्थ होणे आणि त्याला सर्वव्यापी, सर्वान्तर्यामी या रूपांत प्रत्यक्ष पाहण्यासाठी जे काही करावे लागते ते ते सर्व केले पाहिजे त्याला उपासना असे म्हणतात.

तत्रऽहिसासत्याऽस्तेयब्रह्मचर्याऽपरिग्रहा यमाः।। योगसू० साध० सू ३०।।

इत्यादी सूत्र पातंजल योगशास्त्रातील आहे. उपासनेचा प्रारंभ हाच आहे की उपासना करू इच्छिणाऱ्याने कोणाशीही वैर ठेवू नये, सर्वावर सर्वकाळ प्रेम करावे. खरे बोलावे. कधीही खोटे बोलू नये. चोरी करू नये. सदैव सत्य व्यवहार करावा. जितेंद्रिय व्हावे विषयलंपट बनू नये निरभिमानी व्हावे. अभिमान कधीही करू नये. कसलाही लोभ धरू नये. हे पाच प्रकारचे यम मिळून उपासनायोगाचे प्रथम अंग आहे.

शौचसन्तोषतपःस्वाध्यायेश्वरप्रणिधानानि नियमाः।। -योगसू०. साध० सू० ३२।।

राग (मोहे) दोषाचा त्याग करून आंतरिक आणि पाणी वगैरे साधनांनी बाह्य शुद्धी करावी. धर्मयुक्त पुरुषार्थ केल्याने लाभ झाला तर त्यात आनंद मानू नये आणि हानी झाली तर दु:ख करू नये. प्रसन्न चित्ताने आळस सोडून सदैव पुरुषार्थ करीत असावे. सदोदित सुखदु:ख सहन करावे आणि धर्माचे अनुष्ठान करावे. अधर्माचे नाही. नेहमी सत्य शास्त्रांचे अध्ययन व अध्यापन करावे. सत्पुरुषांचा संग करावा आणि ओ३म् या एका परमेश्वराच्या नावाचा अर्थ समजून नित्य जप करावा. आपल्या आत्म्याला परमेश्वराच्या आज्ञेनुसार समर्पित करावे. हे पाच प्रकारचे नियम मिळून उपासने योगाचे दुसरे अंग म्हटले जातेयानंतरच्या सहा अंगांचे वर्णन योगशास्त्रात किंवा 'ऋग्वेदादिभाष्यभूमिका' या ग्रंथाच्या उपासना या प्रकरणात पाहून घ्यावे.

    जेव्हा उपासना करावयाची असेल तेव्हा शुद्ध व एकांत ठिकाणी जाऊन आसनात बसून, प्राणायाम करून

इंद्रियांना बाह्या विषयांपासून परावृत्त करून मनाला नाभिप्रदेश किंवा हदय, कंठ, नेत्र, शिखा किंवा पाठीचे मधले हाड इत्यादी स्थानांपैकी कोणत्या तरी एका स्थानावर स्थिर करून आपला आत्मा व परमात्मा यांचे चिंतन करून आणि परमात्म्यामध्ये तल्लीन होऊन संयमी व्हावे.

    साधक जेव्हाही साधना करतो तेव्हा त्याचा आत्मा व अंत:करण पवित्र होऊन तो सत्यपूर्ण होतो. त्याचे ज्ञान व विज्ञान नित्य वाटून तो मुक्तीपर्यंत पोहोचतो. जो आठ प्रहरांमध्ये एक घटकाभर जरी अशा प्रकारे ध्यान करतो तो सदैव उन्नतीची प्राप्ति करतो. सर्वज्ञत्व आदी गुणांसह चिंतन करून परमेश्वराची उपासना करणे ही सगुणोपासना होय आणि दोष, रूप, रस, गंध,स्पर्श आदी गुणांपासून तो अलिप्त समजून अतिसूक्ष्म आत्म्याच्या आत व बाहेर असणाऱ्या सर्वव्यापक परमेश्वरामध्ये दृढ स्थित होणे ही निर्गुणोपासना म्हटली जाते.
    याचे फळ ज्याप्रमाणे थंडीने कुडकुडणारा माणूस अग्नीजवळ जातच तो थंडीपासून निवृत्त होतो त्याप्रमाणे परमेश्वराच्या सानिध्यात गेल्यामुळे सर्व दोष व दुःखे दूर होऊन परमेश्वराच्या गुणकर्मस्वभावाप्रमाणे जीवात्म्याचे गुणकर्मस्वभाव पवित्र होतात. म्हणून परमेश्वराची स्तुती, प्रार्थना व उपासना अवश्य केली पाहिजे. उपासनेची इतर फळे आणखी असली तरी उपासनेमुळे आत्म्याचे बळ इतके वाढते की पर्वतप्राय दुःख कोसळले तरी तो घाबरत नाही आणि सर्व काही सहन करू शकेल. ही काय लहानसहान गोष्ट आहे? जो परमेश्वराची स्तुती, प्रार्थना व उपासना करीत नाही तो कृतघ्न व महामूर्खही असतो. कारण ज्या परमेश्वराने जीवांच्या सुखासाठी सर्व पदार्थ निर्माण केले आहेत त्याच्या गुणांना विसरणे. ईश्वरच न मानणे, ही कृतघ्नता व मूर्खता आहे.

ईश्वरास जाणण्याची पद्धति.

(प्रश्न) परमेश्वराला कान, डोळे वगैरे इंद्रिये नाहीत. तर मग तो इंद्रियांची कामे कशी करू शकतो

(उत्तर) अपाणिपादो जवनो ग्रहीता पश्यत्यचक्षुः स शृणोत्यकर्णः ।

स वेत्ति विश्वं न च तस्यास्ति वेत्ता तमाहुरग्रयं पुरुषं पुराणम्।।१।। श्वेताश्वेतर उ०अ० ३।। मं० १९।।

हे उपनिषदातील वचन आहे. परमेश्वराला हात नाहीत. पण तो आपल्या सामर्थ्यरूपी हातांनी जगाची रचना, ग्रहण करतो. त्याला पाय नाहीत; परंतु तो सर्वव्यापक असल्यामुळे सर्वांहून अधिक वेगवान आहे. त्याला डोळे नसले तरी तो सर्वाना यथावत पाहतो. कान नसले तरी सर्वांच्या गोष्टी ऐकतो. त्याला अंत:करण नाही. तरीही तो सर्व जगतास जाणतो. अशा त्या परमेश्वराला अवधिसहीत जाणणारा कोणीही नाही त्यालाच सनातन, सर्वश्रेष्ठ व सर्वात पूर्ण असल्यामुळे पुरुष म्हणतात. इंद्रिये व अंत:करण नसतानाही तो आपल्या सामर्थ्याने आपली सर्व कामे करीत आहे.

(प्रश्न) अनेक लोक परमेश्वर हा निष्क्रिय व निर्गुण आहे असे म्हणतात (उत्तर) न तस्य कार्यं करणं च विद्यते न तत्समश्चाभ्यधिकश्च दृश्यते। परास्य शक्तिर्विविधैव श्रूयते स्वाभाविकी ज्ञानबलक्रिया च।।१।।श्वेताश्वेतर उ०अ० ६।। मं० ८।।

हे उपनिषदांतील वचन आहे. परमेश्वरापासून कोणतेही तद्रूप कार्य आणि त्याचे कारण अर्थात साधकतम दुसरा अपेक्षित नाही. त्याच्याबरोबरीचा कोणी नाही अथवा त्याच्याहून अधिक मोठा कोणी नाही. त्याच्यामध्ये अनंत ज्ञान, अनंत बळ व अनंत क्रिया म्हणजे सर्वोत्तम शक्ती स्वाभाविकपणे त्याचे ठिकाणी ऐकली जाते. परमेश्वर निक्रिय असता तर त्याने जगाची उत्पत्ती, स्थिती व लय या गोष्टी करू शकला नसता. म्हणून तो 'विभु' तथापि तो चेतन असल्यामुळे त्याच्यात क्रियाही आहे. (प्रश्न) जेव्हा तो एखादी क्रिया करीत असेल तेव्हा ती सान्त असते की अनन्त? (उत्तर) जेवढ्या देशकाळामध्ये क्रिया करणे तो उचित समजतो तेवढ्याच देशकालामध्ये तो क्रिया करतो.जास्त नाही की कमी नाही. कारण तो विद्वान आहे (प्रश्न) परमेश्वर स्वतःचा अंत जाणतो की नाही? (उत्तर) परमात्मा पूर्णज्ञानी आहे. कारण ज्ञान त्यालाच म्हणतात की ज्यामुळे जी वस्तू जशी आहे तशीच तिला जाणणे अर्थात जो पदार्थ जसा असेल त्याला तसेच जाणण्याचे नाव ज्ञान आहे. परमेश्वर अनन्त असताना त्याला अनन्त समजणे हे ज्ञान आणि त्याविरुद्ध समजणे अज्ञान अर्थात अनन्ताला सान्त आणि सान्ताला अनन्त समजणे हा भ्रम म्हटला जातो. 'यथार्थदर्शनं ज्ञानमिति' ज्याचा जसा गुणकर्मस्वभाव असेल त्या पदार्थाला तसेच जाणून मानणे हे ज्ञान व विज्ञान म्हटले जाते. याच्या उलट असेल ते अज्ञान होय. म्हणून

क्लेशकर्मविपाकाशयैरपरामृष्टः पुरुषविशेष ईश्वरः।। -योगसू० समाधी० सू० २४।।

जो अविद्यादि क्लेश आणि कुशल-अकुशल, इष्ट-अनिष्ट व मिश्र फलदायक कमांच्या वासनांपासून अलिप्त आहे तो सर्व जीवांहून विशेष असण्याने ईश्वर म्हटला जातो.

ईश्वराचे अस्तित्व

(प्रश्न) ईश्वरासिद्धेः।।१।।-सांख्य ।।अ० १।।सू० ९२।। प्रमाणाभावान्न तत्सिद्धिः।।२।।-सांख्य ।।अ० ५।।सू० १०।। सम्बन्धाभावान्नानुमानम्।।३।। -सांख्य ।।अ० ५।।सू० ११।।

प्रत्यक्ष (प्रमाणाने) ईश्वर सिद्ध होत नाही. ॥१ ज्याअर्थी त्याची सिद्धी प्रत्यक्ष प्रमाणाने होत नाही त्याअर्थी अनुमानादी प्रमाणेही लागू होत नाहीत॥२॥ व्याप्तिसंबंध नसल्यामुळे त्याचे अनुमानही होऊ शकत नाही. अर्थात प्रत्यक्ष व अनुमान ही प्रमाणे जेथे लागू होत नाहीत तेथे शब्दप्रमाण वगैरेही लागू होऊ शकत नाही. म्हणून ईश्वराचे अस्तित्व सिद्ध होऊ शकत नाही. ॥३ ॥ (उत्तर) येथे ईश्वरसिद्धिसाठी प्रत्यक्ष प्रमाण नाही; आणि ईश्वर हा जगाचे उपादान कारणही नाही, परमात्मा हा पुरुषाहून विलक्षण अर्थात सर्वत्र भरलेला असल्यामुळे त्याचे नाव पुरुष आहे. तसेच जीव हा शरीरामध्ये वास करीत असल्यामुळे त्यालाही पुरुष असे नाव आहे कारण याच प्रकरणात असे म्हटले आहे की,

प्रधानशक्तियोगाच्चेत्संगापत्तिः।।१।। -सांख्य ।।अ० ५।।सू० ८।। सत्तामात्रच्चेत्सर्वैश्वर्य्यम्।।२।। -सांख्य ।।अ० ५।।सू० ९।। श्रुतिरपि प्रधानकार्य्यत्वस्य।।३।। -सांख्य ।।अ० ५।।सू० १२।।

    जर पुरुषाला प्रधानशक्तीचा योग होईल तर त्याच्यामध्ये संगापत्ती होईलयाचा अर्थ असा की ज्याप्रमाणे प्रकृती सूक्ष्माशी मिळून कार्यरूप झाली आहे. त्याप्रमाणे परमेश्वरही स्थूल होईल. म्हणून परमेश्वर हा जगाचे उपादानकारण नसून निमित्त कारण आहे.॥१॥ जर चैतन्यमय परमेश्वर हे जगाचे उपादानकरण मानले तर जसा परमेश्वर समग्र ऐश्वर्ययुक्त आहे तसे हे जगही सर्वेश्वर्ययुक्त झाले पाहिजे. पण तसे ते नाही. म्हणून परमेश्वर जगाचे उपादान कारण नाही परंतु निमित्त कारण आहे. ॥२॥ कारण उपनिषदांतसुद्धा प्रधानप्रकृती हेच जगाचे उपादान कारण आहे असे सांगितले आहे. ॥३॥ जसे,

अजामेकां लोहितशुक्लकृष्णां बह्वीः प्रजाः सृजमानां स्वरूपाः।।श्वेताश्वेतर उ०अ० ४।। मं० ५।।

    हे श्वेताश्वेतर उपनिषदातील वचन आहे. जी जन्मरहित आणि सत्व, रज, तम या तीन गुणांनी युक्तः प्रकृती आहे तीच आपल्या आकाराच्या योगाने बहुप्रजारूपी होत असते. अर्थात प्रकृती परिणामिनी असल्याने ती अवस्थांतरहऊन जाते. याउलट पुरुष हा अपरिणामः असल्याने त्याचे अवस्थांतर होऊन त्याला दुसरे रूप प्राप्त

होत नाही. तो सदा कूटस्थ निर्विकार राहतो आणि प्रकृती ही सृष्टीमध्ये सविकार व प्रलयामध्ये निर्विकार राहते.

    म्हणून जो कोणी कपिलाचार्यांना अनीश्वरवादी म्हणतो तो स्वत:च अनीश्वरवादी आहे. कपिलाचार्य अनीश्वरवादी नाहीत. तसेच मीमांसकांच्या धर्माधर्मानि ईश्वर न्याय वैशेषिकांतसुद्धा 'आत्मा या शब्दप्रयोगाने ते निरीश्वरवादी नाहीत. कारण सर्वज्ञत्वादि धर्मयुक्त आणि अतति सर्वत्र व्याप्नोति इति आत्मा जो सर्वत्र व्यापक आणि सर्वज्ञादि धर्मयुक्त सर्व जीवांचा आत्मा आहे त्याला मीमांसक, वैशेषिककार व नैयायिक ईश्वर मानतात.

ईश्वराच्या अवताराचे खंडन

(प्रश्न) ईश्वर अवतार घेतो की नाही? (उत्तर) नाही. कारण यजुर्वेदात ‘अज एकपात्’ व ‘सपर्यगाच्छुक्रमकायम्’. अशा वचनांवरून परमेश्वर जन्म घेत नाही. (प्रश्न) यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्।। भ० गी०।।अ० ४।।श्लो० ७।। भगवद्गीतेत श्रीकृष्ण म्हणतात की, "जेव्हा जेव्हा धमचा लोप होतो तेव्हा-तेव्हा मी शरीर धारण करतो !" (उत्तर) ही गोष्ट वेदविरुद्ध असल्यामुळे ती प्रमाण नाही आणि असे असू शकते की श्रीकृष्ण हे धर्मात्मे होते आणि ते धर्माचे रक्षण करू इच्छित होते. त्यामुळे युगायुगामध्ये जन्म घेऊन मी सज्जनांचे रक्षण व दुष्टांचा नाश करीन तर त्यात काही वावगे नाही. कारण ‘परोपकाराय सतां विभूतयः’ म्हणजे परोपकारासाठी सत्पुरुषांचे तन, मन, धन असते. तथापि एवढ्यावरून श्रीकृष्ण ईश्वर होऊ शकत नाही. (प्रश्न) जर असे असेल तर जगात ईश्वराचे चोवीस अवतार होतात आणि त्यांना अवतार का मानतात? (उत्तर) वेदांचा अर्थ न जाणल्यामुळे, सांप्रदायिक लोकांनी गैरसमज करून दिल्यामुळे आणि स्वतः अज्ञानी असल्यामुळे लोक या भ्रमजालात फसतात आणि अशा अप्रामाणिक गोष्टी बोलतात व त्यांना मानतात. (प्रश्न) ईश्वराने अवतार घेतले नसते तर कंस, रावण आदी दुष्टांचा नाश कसा होऊ शकला असता? (उत्तर) पहिली गोष्ट जो जन्मला आहे तो अवश्य मरणार. जो ईश्वर अवतार न घेता, शरीर धारण न करता जगाची उत्पत्ती, स्थिती व लय करतो त्याच्या समोर कंस, रावण वगैरे किडमुंगी सारखेही नाहीत. तो सर्वव्यापक असल्यामुळे कंस रावणादिकांच्या शरीरांमध्येही परिपूर्ण झाला आहे त्याने त्याचवेळी मर्मच्छेदन करून त्यांचा नाश करू शकला असता, या अनंत गुणकर्मस्वभावयुक्त परमेश्वराला एखाद्या क्षुद्र जीवाला मारण्यासाठी जन्ममरणयुक्त बनावे लागते असे म्हणणाऱ्याला पूर्व या खेरीज दुसरे कोणते विशेषण मिळू शकेल?

     जर कोणी असे म्हणत असेल की भक्तजनांचा उद्धार करण्यासाठी परमेश्वर जन्म घेतो, तर तेही खरे नाही. कारण जे भक्तजन ईश्वराच्या आज्ञेनुसार चालतात त्यांचा उद्धार करण्याचे पूर्ण सामर्थ्य ईश्वरामध्ये आहे. पृथ्वी, सूर्य, चंद्र आदी विश्वाची उत्पत्ती, स्थिती व लय या कामांहून कंस रावणादिकांचा वध आणि गोवर्धन पर्वत उचलणे ही कामे मोठी आहेत काय?
    जो कोणी या सृष्टीतील परमेश्वराच्या कामांचा विचार करील त्याला त्याच्या सारखा कोणी झाला नाही व होणार नाही, 'न भूतो न भविष्यति' युक्तिवादाने सुद्धा ईश्वराचा जन्म सिद्ध होत नाही. जर कोणी असे म्हणेल की हे अनंत आकाश गर्भात आले किंवा ते मुठीत सामावले, तर ते म्हणणे खरे असू शकत नाही. कारण आकाश हे अनंत व सर्वात व्यापक आहे. त्यामुळे ते बाहेर जात नाही अथवा आत येत नाही त्याचप्रमाणे परमेश्वर हा अनंत व सर्वव्यापक असल्यामुळे त्याचे येणे-जाणे कधी सिद्ध होऊ शकत नाही. जेथे त्याचे अस्तित्व नसेल तेथे जाणे-येणे घडू शकते काय? तो गर्भात व्यापक नव्हता म्हणून तो बाहेरून गेला? आणि काय तो बाहेर नव्हता म्हणून आतून निघाला? ईश्वराच्या बाबतीत अशा गोष्टी बोलणे व मानणे हे अडाण्यांखेरीज दुसरे कोण करणार ? म्हणून परमेश्वराचे येणे-जाणे व जन्म-मरण या गोष्टी कधीच सिद्ध होऊ शकत नाहीत. म्हणून येशू वगैरेही ईश्वराचे अवतार नाही हे समजून घ्यावे. कारण राग, द्वेष, क्षुधा, तृष्णा, भय, शोक, दु:ख, सुख, जन्म, मरण आदी गुणांनी युक्त असल्यामुळे ते माणसेच होते.

(प्रश्न) ईश्वर आपल्याभक्तांचे पाप क्षमा करतो की नाही? (उत्तर) नाही. कारण तो पाप क्षमा करील तर त्याचा न्याय नष्ट होईल; आणि सारी माणसे महापापी बनतील. कारण पाप क्षमेची बाब ऐकताच पाप करण्यात त्यांना निर्भयता आणि उत्साह होत जाईल जसे राजा अपराध्यांचे अपराध क्षमा करील तर ते अधिक जोमाने मोठमोठे गुन्हे करतील कारण राजा आपला अपराध क्षमा करील आणि त्यांनाही विश्वास वाटेल की राजाजवळ आम्ही हातपाया पडून, गयावया करून आपले अपराध क्षमा करून घेऊ आणि जे अपराध करीत नाही तेसुद्धा अपराध करण्यात भीती ठेवणार नाही यामुळे पाप करण्यात प्रवृत्त होतील म्हणूनच सर्व कर्माचे यथायोग्य फळ देणे हेच ईश्वराचे काम आहे. क्षमा करणे नव्हे.

जीवाची स्वतंत्रता

(प्रश्न) जीव स्वतंत्र आहे की परतंत्र? (उत्तर) आपली कर्तव्यकर्मे करण्यात जीव स्वतंत्र आणि ईश्वरी व्यवस्थेत परतंत्र आहे. 'स्वतन्त्रः कर्ता' हे पाणिनीय व्याकरणाचे सूत्र आहे. जो स्वतंत्र म्हणजे स्वाधीन आहे तोच कर्ता आहे (प्रश्न) स्वतंत्र कोणाला म्हणावे? (उत्तर) ज्याच्या आधीन शरीर, प्राण, इंद्रिये व अंत:करण आदी गोष्टी असतात त्याला स्वतंत्र म्हणतात जो स्वतंत्र नसेल तर त्याला त्याच्या पापपुण्याचे फळ कधी मिळू शकत नाही. कारण जसे नोकर स्वामीच्या व सेना सेनापतीच्या आज्ञेने किंवा प्रेरणेने युद्धामध्ये सैनिक अनेकांना मारून देखील ते गुन्हेगार ठरत नाहीत. त्याचप्रमाणे परमेश्वराच्या प्रेरणेने व आधीनतेने जीवांनी कामे केली तर त्यांना पाप किंवा पुण्य लागणार नाही. त्या फळांचा भोक्ता प्रेरक परमेश्वर होईल स्वर्ग-नरक किंवा सुख-दुःख हे परमेश्वरालाच मिळेल. जर एखाद्या माणसाने विशेष शस्त्राने एखाद्याला मारून टाकले तर तो मारणारा पकडला जातो; आणि त्याला शिक्षा होते. शस्त्राला शिक्षा होत नाही. याचप्रमाणे पराधीन जीव पापपुण्याचा भोक्ता होऊ शकत नाही. म्हणून आपल्या सामर्थ्यानुसार कर्म करण्याच्या बाबतीत जीव स्वतंत्र आहे. पण जेव्हा तो पाप करतो तेव्हा ईश्वराच्या व्यवस्थेमध्ये तो पराधीन असल्यामुळे पापाची फळे भोगतो. म्हणून कर्म करण्याच्या बाबतीत जीव स्वतंत्र असून पापाचे दुःख स्वरूप फळ भोगण्याच्या बाबतीत परतंत्र असतो. (प्रन) परमेश्वराने जीवाला निर्माण केले नसते व सामर्थ्य दिले नसते तर जीव काहीच करू शकला नसता. म्हणून परमेश्वराच्या प्रेरणेनेच जीव कर्म करतो? (उत्तर) जीवाची उत्पत्ती कधी झालीच नाही. तो अनादी आहे. जसे जगाचे उपादान कारण आणि ईश्वर हे नित्य आहेत; आणि जीवाचे शरीर व इंद्रियांचे गोलक परमेश्वराने बनविलेले आहेत. पण ते सर्व जीवाच्या आधीन आहेत. म्हणून जो कोणी मन, कर्म व वचन यांच्या द्वारे पाप अथवा पुण्य करतो त्यालाच त्याचे फळ भोगावे लागते. ईश्वराला नव्हे.

    एखाद्या कारागिराने डोंगरातून लोखंड काढले. ते लोखंड कुणा व्यापाऱ्याने विकत घेतले. त्याच्या दुकानातून ते घेऊन लोहाराने त्याची तलवार बनविली.कोणा शिपायाने ती तलवार विकत घेऊन तिने कुणाला तरी ठार मारले. आता या साऱ्या प्रकरणात लोखंड बाहेर काढणारा, ते विकत घेणारा, त्यापासून तलवार बनविणाऱ्यांना अथवा तलवारीला राजा शिक्षा करीत नाही, तर ज्याने तलवारीने हत्या केली त्यालाच शिक्षा मिळते. याचप्रमाणे शरीरादिकांची उत्पत्ती करणारा परमेश्वर त्याच्या कर्मफळांचा भोक्ता होत नाही, तर जीवाला ती फळे भोगावयास लावतो, परमेश्वरच सर्व कर्म करविणारा असता तर कोणत्याही जीवाने पाप केले नसते. कारण परमेश्वर पवित्र व धार्मिक असल्यामुळे तो कोणाही जीवाला पाप करण्याची प्रेरणा देत नाही. म्हणून जीव आपली कामे करण्यात स्वतंत्र आहे. ज्याप्रमाणे जीव आपली कामे करण्यास स्वतंत्र आहे. त्याचप्रमाणे परमेश्वरही आपली कामे करण्यास स्वतंत्र आहे.

(प्रश्न) जीव आणि ईश्वर यांचे स्वरूप व गुणकर्मस्वभाव कसे आहेत? (उत्तर) दोघेही चेतनस्वरूप आहेत. दोघांचाही स्वभाव पवित्र, अविनाशी व धार्मिक आहे. परंतु परमेश्वर सृष्टीची उत्पत्ती, स्थिती व लय करतो, सर्वांना नियमात ठेवतो. जीवांना पापपुण्याची यथायोग्य फळे देतो, ही सर्व धर्मयुक्त कामे करतो. मुलाबाळांना जन्म देणे, त्यांचे पालनपोषण करणे, शिल्पविद्यादि बरीवाईट कामे जीव करतो. ईश्वरामध्ये नित्यज्ञान, आनंद, अनंत सामथ्र्य इत्यादी गुण आहेत. तर जीवामध्ये

इच्छाद्वेषप्रयत्नसुखदुःखज्ञानान्यात्मनो लिंगमिति।। -न्याय० अ० १।। आ० १।। सू० १० ।। प्राणापाननिमेषोन्मेषजीवनमनोगतीन्द्रियान्तिर्वकाराः सुखदुःखे इच्छाद्वेषौ प्रयत्नाश्चात्मनो लिंगानि।। -वैशेषिक सूत्र अ० ३।। आ० २।। सू० ४४।।

    या दोन्ही सूत्रांमध्ये (इच्छा) पदार्थांच्या प्राप्तीची अभिलाषा, (द्वेष) दु:खादिकांविषयी अनीच्छा, वैर, (प्रयत्न) पुरुषार्थ, बल (सुख) आनंद, (दु:ख) विलाप, अप्रसन्नता, (ज्ञान) विवेक किंवा जाणणे हे गुण समान आहेत. परंतु वैशेषिकामध्ये (प्राण) प्राणवायू बाहेर टाकणे, (अपान) प्राणवायू बाहेरून आत घेणे, (निमेष) डोळे मिटणे, (उन्मेष) डोळे उघडणे, (जीवन) प्राण धारण करणे, (मन) निश्चय, स्मरण व अहंकार करणे, (गति) गती करणे, (इंद्रिय) सर्व इंद्रियांना चालविणे, (अंतर्विकार) क्षुधा, तुषा, हर्ष, शोक आदी भिन्न-भिन्न विकारांनी युक्त होणे, हे जीवाम्याचे गुण परमेश्वराच्या गुणांहून भिन्न आहेत. या गुणांद्वारे आत्म्याची प्रचीती करावी कारण तो स्थूल नाही.
    जोपर्यंत आत्मा देहात असतो तोपर्यंतच हे गुण व्यक्त होत असतात. आत्मा जेव्हा शरीर सोडून जातो तेव्हा हे गुण शरीरात राहत नाहीत. जो असताना जे असते व जो नसताना जे नसते ते त्याचेच गुण असतात. ज्याप्रमाणे दिवा आणि सूर्य आदी नसले तर प्रकाश नसतो आणि ते असले तर प्रकाश असतो. याच प्रमाणे जीव व परमात्मा यांचे विशेष ज्ञान त्यांच्या गुणांद्वारे होत असते.

(प्रश्न) परमेश्वर त्रिकालदर्शी आहेत्यामुळे भविष्यातील गोष्टी त्याला कळतात. तो जसे ठवील तसेच जीव करणार, यावरून जीव स्वतंत्र नाही. तसेच ईश्वर जीवाला शिक्षाही देऊ शकत नाही. कारण ईश्वराने आपल्या ज्ञानाने ठरविले असेल तेच जीव करतो. (उत्तर) ईश्वराला त्रिकालदर्श म्हणणे हे मूर्खपणाचे काम आहे. कारण जो होऊन राहत नाही, त्याला भूतकाळ आणि जो सध्या नाही पण नंतर असणार आहे, त्याला भविष्यकाळ असे म्हणतात. काय ईश्वराला झालेले ज्ञान नाहीसे होते आणि आता नसलेले ज्ञान भविष्यकाळी होते ? म्हणून परमेश्वराचे ज्ञान सदैव एकरस, अखंडित व ते वर्तमानकाळाप्रमाणे विद्यमान असते. भूत व भविष्य हे काळ जीवांसाठी आहेत. होय जीवांच्या कर्माच्या संदर्भात ईश्वरामध्ये त्रिकालज्ञता असते. मात्र स्वयंभावाने नाही ज्याप्रमाणे जीव स्वतंत्रपणे कर्म करतो त्याचप्रमाणे सर्वज्ञतेने ईश्वर सर्व काही जाणतो आणि ईश्वर जसे जाणतो तसे जीव करतो. अर्थात भूत, भविष्य व वर्तमान यांचे ज्ञान व फळ देण्याच्या बाबतीत ईश्वर स्वतंत्र आहे. परंतु जीवाला थोडेसे वर्तमान काळाचे ज्ञान आणि कमी करण्याचे स्वातंत्र्य असते. ईश्वराचे ज्ञान अगदी असल्यामुळे त्याला जसे कर्माचे ज्ञान आहे, तसेच शिक्षा करण्याचे त्याचे ज्ञानही अगदी असते. त्याचे दोनही ज्ञान सत्य आहेत काय कर्मज्ञान खरे आणि दंडज्ञान खोटे असे कधी असू शकते ? म्हणून यात काहीही दोष येत नाही. (प्रश्न) जीव हा शरीरात वेगळा विभु आहे की परिच्छिन्न ? (उत्तर) जीव हा परिच्छिन्न आहे. तो विभु असता तर जागृत, स्वप्न, सुषुप्ति, मरण, जन्म, संयोग, वियोग, जाणे, येणे हे कधीही होऊ शकले नसते. म्हणून जीवाचे स्वरूप अल्पज्ञ, अल्प म्हणजे सूक्ष्म आहे. ईश्वर हा अत्यंत सूक्ष्मात सूक्ष्मतर आहे. तो अनंत सर्वज्ञ व सर्वव्यापक स्वरूप आहे. म्हणून जीव व परमेश्वर यांचा व्याप्यव्यापक संबंध आहे. (प्रश्न) ज्या जागी एक वस्तू असते त्याच जागी दुसरी वस्तू राहू शकत नाही. म्हणून जीव व ईश्वर यांचा संयोग संबंध असू शकतो. परंतु व्याप्य व्यापक संबंध असू शकत नाही. (उत्तर) हा नियम समान आकाराच्या पदार्थांच्या बाबतीत लागू होतो. असमान आकृतींना मध्ये लागू होत नाही. ज्याप्रमाणे लोखंड स्थूल व अमी सूक्ष्म असतो; त्यामुळे लोखंडामध्ये अमी व विद्युत व्यापक होऊन एकाच अवकाशात दोघेही राहतात त्याप्रमाणे जीव हा परमेश्वराहून स्थूल व परमेश्वर हा जीवाहून सूक्ष्म असल्याने परमेश्वर व्यापक व जीव हा व्याप्य आहे. जीव आणि ईश्वर यांच्यात हा जसा व्याप्यव्यापक संबंध आहे तसेच सेव्य-सेवक, आधार-आधेय, स्वामी-भृत्य, राजा-प्रजा, पिता-पुत्र वगैरे संबंध त्यांच्यामध्ये आहेत.

अद्वैतवादाची समीक्षा

(प्रश्न) ब्रह्म आणि जीव हे वेगवेगळे आहेत की एक आहेत? (उत्तर) वेगवेगळे आहेत. (प्रश्न) ते जर वेगवेगळे असतील तर

प्रज्ञानं ब्रह्म।।१।। ऐतरेय० ५ ।। 3।।

अहं ब्रह्मास्मि।।२।। बृहदा० उ० १।। ४।। १०।। तत्त्वमसि।।३।। छान्दोग्य० प्रपा० ६।। खं० ८।। व०७।। अयमात्मा ब्रह्म।।४।। माण्डू० व० २।।

(उत्तर) ही वेदवाक्ये नसून ब्राह्मण ग्रंथांतील वचने आहेत आणि सत्यशास्त्रांमध्ये त्यांना कोठेही महावाक्य म्हटलेले नाही. अर्थात ब्रह्म हे प्रकृष्ट ज्ञानस्वरूप आहे. (अहम्) मी (ब्रह्म) म्हणजे ब्रह्मस्थ (अस्मि) आहे. येथे तात्स्थ्योपाधि आहे. उदाहरणार्थ ‘मञ्चाः क्रोशन्ति’ याचा अर्थ "मंच ओरडतात' असा करावयाचा नसतो. मंच हे जड पदार्थ असल्याने त्यांच्यामध्ये ओरडण्याचे सामर्थ्य नसते. म्हणून त्या वाक्याचा अर्थ 'मंचकावरील माणसे ओरडतात' तसेच या बाबतीतही समजावे.
    कोणी म्हणेल की, “सर्वच पदार्थ ब्रह्मस्थ आहेत. मग पुन: जीवाला ब्रह्मस्थ म्हणण्यात काय वैशिष्ट्य आहे?" याचे उत्तर असे की सर्व पदार्थ ब्रहस्थ आहेत परंतु जीव जसा साधर्म्ययुक्त व निकटस्थ आहे तसे अन्य कोणी नाही आणि जीवाला ब्रह्माचे ज्ञान होऊन मुक्तीमध्ये तो ब्रह्माशी साक्षात्संबंधात राहतो. म्हणून जीव हा ब्रह्माशी तात्स्थ्य अथवा तत्सहचारितोपाधि म्हणजे जीव हा ब्रह्माचा सहचारी आहे. म्हणून जीव आणि ब्रह्म हे एक नाहीत.
    'मी व हा एक आहोत" असे जेव्हा कोणी म्हणतो तेव्हा त्याचा अर्थ "मी व हा अविरोधी आहोत." याचप्रमाणे जो जीव समाधिस्थ होऊन परमेश्वरामध्ये प्रेमबद्ध होऊन निगम होतो तो असे म्हणू शकतो की "मी आणि ब्रह्म एक म्हणजे अविरोधी, एक अवकाशस्थ आहोत." जो जीव परमेश्वराच्या गुणकर्मस्वभावानुसार आपले गुणकर्मस्वभाव करतो तोच साधम्र्यामुळे ब्रह्माशी आपली एकता आहे, असे म्हणू शकतो.

(प्रश्न) बरे तर. 'तत्त्वमसि (तत्) ब्रह्म (त्वं) तू जीव (असि) आहेस. म्हणजे हे जीवा, ते ब्रह्म आहेस. याचा अर्थ कसा कराल? (उत्तर) तुम्ही 'तत् ' शब्दाचा अर्थ काय करता? (प्रश्न) "ब्रह्म." (उत्तर) ब्रह्मपदाची अनुवृत्ती कोठून आणली? (प्रश्न) ‘सदेव सोम्येदमग्र आसीदेकमेवाद्वितीयं ब्रह्म।’ या उपनिषदातील पूर्व वाक्यातून ब्रह्म शब्दाची अनुवृत्ती आली आहे (उत्तर) तुम्ही हे छांदोग्य उपनिषद पाहिलेच नाही. ते तुम्ही पाहिले असते तर तेथे ब्रह्म शब्द वापरलेलाच नाही. परंतु, मग तुम्ही खोटे का बोलता? परंतु छांदोग्य उपनिषदात ‘सदेव सोम्येदमग्र आसीदेकमेवाद्वितीयम्।’ छान्दोग्य० प्रपा० ६।। खं० २।। व०१।। असा पाठ आहे. तेथे ब्रह्म हा शब्दच नाही. (प्रश्न) तर मग तुम्ही 'तत्' या शब्दाचा अर्थ काय करता? (उत्तर) स य एषोऽणिमैतदात्म्यमिदँ् सर्वं तत्सत्यँ् स आत्मा तत्त्वमसि श्वेतकेतो इति।। छान्दोग्य० प्रपा० ६।। खं० ८।। व०७।। तो परमात्मा जाणण्यास योग्य आहे. तो अत्यंत सूक्ष्म आणि साऱ्या जगाचाव जीवाचा आत्मा आहे. तोच सत्यस्वरूप असून स्वत:चा आत्मा स्वत:च आहे. हे श्वेतकेतो, प्रियपुत्रा! 'तदात्मकस्तदन्तर्यामी त्वमसि।’ त्या अंतर्यामी परमेश्वराने तू युक्त आहेस. हाच अर्थ उपनिषदांशी अविरोधी आहे कारण,

य आत्मनि तिष्ठन्नात्मनोऽन्तरो यमात्मा न वेद यस्यात्मा शरीरम्। बृहदा० उ० १४।। ६।। आत्मनोऽन्तरो यमयति स त आत्मान्तर्याम्यमृतः।बृहदा० उ० ७।। ३२।।

    हे बृहदारण्यकातील वचन आहे. महर्षी याज्ञवल्क्य आपली पत्नी मैत्रेयीला सांगतात की, "हे मैत्रेयी, परमेश्वर आत्म्यामध्ये म्हणजे जीवामध्ये स्थित आहे; आणि जीवाम्याहून भिन्न आहे. पण मूढ जीवात्मा हे। जाणत नाही की तो परमात्मा माझ्यामध्येच व्यापक आहे. ज्या परमेश्वराचे शरीर जीवात्मा आहे, म्हणजे ज्याप्रमाणे शरीरात जीव राहतो त्याचप्रमाणे जीवांमध्ये परमेश्वर व्यापक आहे; जीवाम्यांहन भिन्न राहन जो जीवांच्या पाप पुण्यांचा साक्षीदार होऊन व जीवांना त्यांच्या कर्मानुसार फळे देऊन नियमात ठेवतो तोच अविनाशी परमात्मा तुझाही अन्तर्यामी आत्मा आहे,"म्हणजे तुझ्यामध्ये व्यापक आहे. त्याला तू जाण." उपनिषदाच्या इत्यादी वचनांचा कुणी अन्यथा अर्थ करू शकतो काय?
    'अयमात्मा ब्रह्म' म्हणजे समाधिदशेत जेव्हा योग्याला परमेश्वराचा साक्षात्कार घडतो तेव्हा तो म्हणतो की, “हाज माझ्यामध्ये व्यापक आहे तोच ब्रह्मा सर्वत्र व्यापक आहे. म्हणून आजकालचे जे वेदांती जीव व ब्रह्माची एकता करतात त्यांना वेदांतशास्त्र समजलेले नाही."

(प्रश्न) अनेन आत्मना जीवेनानुप्रविश्य नामरूपे व्याकरवाणि।। छान्दोग्य० प्रपा० ६।। खं० ३।। व०२ ।। तत् सृष्ट्वा तदेवानुप्राविशत्।। -तैनिरीय० ब्रह्मानं० व० ६।। परमेश्वर सांगतो की, "मी सारे जग आणि शरीर यांची रचना करून जगामध्ये व्यापक आणि जीवरूप होऊन, शरीरामध्ये प्रविष्ट होऊन नाम व रूप यांची व्याख्या करीन.॥१। परमेश्वराने ते जगत व शरीर निर्माण करून तोच त्यात प्रविष्ट झाला.॥२॥ इत्यादी श्रुतचा दुसरा अर्थ कसा करू शकाल? (उत्तर) तुम्हाला पद, पदार्थ व वाक्यार्थ यांचे ज्ञान असते तर तुम्ही असा अनर्थ कधीच केला नसता. कारण येथे असे समजावे एक प्रवेश आणि दुसरा अनुप्रवेश अर्थात नंतर केलेला प्रवेश म्हटला जातो. शरीरामध्ये प्रविष्ट झालेल्या जीवासह अनुप्रविष्ठाप्रमाणे होऊन वेदांद्वारे सर्व नामरूपादी विद्येचा प्रकाश करतो. परमेश्वर शरीरामध्ये जीवाचा प्रवेश घडवून आणि जीवामध्ये स्वत: अनुप्रविष्ट होऊन राहतो. 'अनु' या शब्दाचा अर्थ समजला असता तर तुम्ही असा विपरीत अर्थ कधी लावला नसता. (प्रश्न) ‘सोऽयं देवदत्तो यो उष्णकाले काश्यां दृष्टः स इदानीं प्रावृट्समये मथुरायां दृश्यते’ म्हणजे जो देवदत्त उन्हाळ्यात काशीमध्ये पाहिला होता त्यालाच मी पावसाळ्यात मथुरेमध्ये पाहत आहे. या ठिकाणी काशी देश व उष्णकाल आणि मथुरा देश व वर्षाकाल या गोष्टी सोडून देऊन केवळ शरीराकडे लक्ष दिल्यास देवदत्त लक्षित होत आहे. या भागत्यागलक्षणेद्वारे परमेश्वराच्या परोक्ष देश, काळ, माया या उपाधी आणि जीवाचा हा देश, काळ अविद्या व अल्पज्ञता या उपाधी सोडून देऊन चैतन्याकडे लक्ष दिले असता दोघांमध्ये एकच ब्रह्मवस्तू लक्षित होते. भागत्यागलक्षणेमध्ये काही भाग ग्रहण करून व काही भाग सोडून देणे असे आहे जसे सर्वज्ञत्वादी वाच्यार्थ ईश्वरामधील आणि अल्पज्ञत्वादी वाच्यार्थ जीवामधील सोडून देऊन (दोहोमधील) चैतन्य मात्र लक्ष्यार्थाचे ग्रहण केले असता अद्वैत सिद्ध होते. यावर काय सांगू शकाल? (उत्तर) प्रथम तुम्ही असे सांगा की तुम्ही जीव आणि ईश्वर नित्य आहेत असे मानता की अनित्य? (प्रश्न) हे दोन्ही उपाधिजन्य कल्पित असल्यामुळे ते अनित्य मानतो. (उत्तर) त्या उपाधीला नित्य मानता की अनित्य? (प्रश्न) आमच्या मते, जीवेशौ च विशुद्धाचिद्विभेदस्तु तयोर्द्वयोः। अविद्या तच्चितोर्योगः षडस्माकमनादयः।।१।। सिद्धान्तलेशसंग्रह० पू० ६३।। कार्य्योपाधिरयं जीवः कारणोपाधिरीश्वरः। कार्य्यकारणतां हित्वा पूर्णबोधोऽवशिष्यते।।२।। अनुभूतीप्रकाश अ० १।। श्लो० ६१।।

    'संक्षेपशादिक' व 'शारीरिकभाष्यं' यांतील या कारिका आहेत.आम्ही वेदान्ती सहा पदार्थांना अनादी मानतो.ते असे- एक जीव, दुसरा ईश्वर, तिसरे बाह्य, चौथा जीव व ईश्वर यांच्यातील विशेष भेद, पाचवा अविद्या, अज्ञान आणि सहावा अविद्या व चेतन यांचा योग. परंतु त्यातही एक ब्रह्म अनादी-अनंत असून इतर पाच पदार्थ अनादी सांत जसा प्रागभाव होतो तसे आहेत. जोपर्यंत अज्ञान असते तोपर्यंत हे पाच असतात आणि तोपर्यंत यांच्या प्रारंभीचे ज्ञान होत नसते. म्हणून अनादी असे म्हणतातपण जेव्हा ज्ञान होते तेव्हा ते नाश होतात. म्हणून सांत म्हणजे नाशवान म्हटले जाते

(उत्तर) हे तुमचे दोन्ही श्लोक अशुद्ध आहेत. कारण अविद्येच्या योगाशिवाय जीव आणि मायेच्या योगाशिवाय ईश्वर तुमच्या मताने सिद्ध होऊ शकत नाही. अविद्या त्यामुळे तश्चितोर्योगः हा जो सहावा पदार्थ तुम्ही गणला तो राहिला नाही कारण तो माया जीव व ईश्वरामध्ये चरितार्थ झाला आणि ब्रह्म तथा माया व अविद्या यांच्या योगाशिवाय ईश्वर बनत नाही. ईश्वराला अविद्या व ब्रह्म यांच्याहून वेगळे समजणे व्यर्थ आहे. म्हणून तुमच्या मतानुसार ब्रह्म व अविद्या हे दोनच पदार्थ सिद्ध होऊ शकतात. सहा पदार्थ सिद्ध होऊ शकत नाहीत.

    तसे तुमचे प्रथम कार्योपाधीपासून व कारणोपाधीपासून जीव व ईश्वराचे अस्तित्व सिद्ध करणे तेव्हाच होऊ शकते की जेव्हा अनंतनित्य, शुद्ध, बुद्ध, मुक्त, स्वभाव अशा सर्वव्यापक ब्रह्मामध्ये अजून सिद्ध कराल. जर ब्रह्माच्या एका स्थानामध्ये स्वाश्रय व स्वविषयक अन अनादी सर्वत्र आहे असे मानल तर सर्व ब्रह्म शुद्ध होऊ शकणार नाही आणि जेव्हा एका भागात अज्ञान मानाल तर ते परिच्छिन्न झाल्याने इकडून तिकडे येत-जात राहील. ते अज्ञान जेथे-जेथे जाईल तेथील ब्रह्म अज्ञानी बनेल आणि ज्या-ज्या स्थानाला ते ब्रह्माला सोडून जाईल त्या त्या ठिकाणचे ब्रह्म ज्ञानी होत राहील तर काही ठिकाणच्या ब्रह्माला अनादिशुद्ध ज्ञानयुक्त म्हणू शकणार नाहीत आणि अज्ञानाच्या सीमेतील ब्रह्माला अज्ञानाची जाणीव होईलअशा प्रकारे सज्ञानी ब्रह्म व अज्ञानी ब्रह्म असे आतील व बाहेरील ब्रह्माचे तुकडे होतील
    तुम्ही जर असे म्हणाल की होऊ द्या तुकडे त्याने ब्रह्माची काय हानी होणार? तर ब्रह्म अखंड नाही आणि ते अखंड आहे असे मानले तर ते अज्ञानी नाही ज्ञानाचा अभाव अथवा विपरीत ज्ञान हाही गुण असल्यामुळे तो कोणत्या तरी द्रव्याशी नित्य संबंछित असणार. तसे असेल तर समवाय संबंध असल्याने तो कधी अनित्य होऊ शकत नाही. ज्याप्रमाणे शरीराच्या एका भागामध्ये फोड झाला असता त्याचे दु:ख सर्वत्र पसरते त्याप्रमाणे ब्रह्माच्या एका स्थानात अज्ञान, सुख-दुःख व क्लेश निर्माण झाल्यास सारे ब्रह्म दुःखादिकाच्या अनुभवाने युक्त होईल. मग संपूर्ण ब्रह्म शुद्ध आहे असे तुम्हीच म्हणू शकणार नाही.
    याच प्रमाणे कार्योपाधीच्या म्हणजे अंत:करणाच्या उपाधीच्या योगाने ब्रह्माला जीव मानाल तर आम्ही असे विचारतो की ब्रह्म हे व्यापक आहे की परिच्छिन्न ? तुम्ही जर ब्रह्म व्यापक म्हणाल व उपाधी परिच्छिन्न म्हणाल म्हणजे एकदेशीय व पृथक्-पृथक् आहे तर अंत:करणइकडून -तिकडे जाते-येते की नाही?

(उत्तर) अंत: करण इकडे-तिकडे जात-येत राहते. (प्रश्न) अंत: करणाबरोबर ब्रह्मही फिरते की स्थिर राहते? (उत्तर) ते स्थिर राहते. (प्रश्न) जेव्हा अंत:करण ज्या-ज्या स्थानाला सोडते तेव्हा त्या-त्या स्थानातील शुद्ध ब्रह्म अज्ञानरहित आणि ज्यास्थानी जाईल त्यात्या ठिकाणेच शुद्ध ब्रह्म अज्ञानी बनत असणार. म्हणजे ब्रह्म हे एका क्षणी ज्ञानी तर दुसऱ्या क्षणी अज्ञानी होत राहणार. यामुळे मोक्ष व बंध हेही क्षणभंगुर बनतील. ज्याप्रमाणे एकाने पाहिलेले दुसऱ्याला आठवण करू शकत नाही त्याप्रमाणे काल पाहिलेल्या अथवा ऐकलेल्या गोष्टीचे वा वस्तूचे ज्ञान आज राहू शकत नाही. कारण ज्यावेळी पाहिले-ऐकले होते तो काळ व ते स्थान दुसरे होते आणि ज्यावेळ त्याचे स्मरण केले जाते तेव्हा तो काळ व ते स्थान दुसरे असते.

    तुम्ही म्हणाल की ब्रह्म एक आहे. मग ते सर्वत्र का नाही ? तुम्ही म्हणाल की अंतःकरणे भिन्न-भिन्न आहेत त्यामुळे ते सुद्धा भिन्नभिन्न होऊन जात असे. परंतु ते अंत:करण जड (अचेतन) आहे त्यात ज्ञान असू शकत नाही. तुम्ही असे म्हणाल की केवळ ब्रह्माला अथवा केवळ अंत:करणाला ज्ञान होऊ शकत नाही, परंतु अंत:करणस्थ चिदाभासाला ज्ञान होते तरीसुद्धा अंतः करणाद्वारे चैतन्यालाच ज्ञान होते. तर ते नेत्रादिकांद्वारे थोडे थोडे ज्ञान का होते ? म्हणून कारणोपाधी व कार्योपाधी यांच्या योगाने ब्रह्मच जीव व ईश्वर बनू शकणार नाहीत. म्हणून ईश्वर हे ब्रह्माचे नाव आहे त्या ब्रह्माहून भिन्न असणारा अनादी, अनुत्पन्न व अमृतस्वरूप जो आहे त्याचे नाव जीव आहे.
    तुम्ही असे म्हणाल की जीव हे चिदाभासाचे गाव आहे. पण तो क्षणभंगुर असल्याने तो नष्ट होऊन जाईल

तेव्हा मग मोक्षाचे सुख कोण उपभोगणार? म्हणून ब्रह्म हे जीव आणि जीव हा ब्रह्म कधी झाला नव्हता, झालेला नाही व होणार नाही. (प्रश्न) तर मग ‘सदेव सोम्येदम्ख आसीदेकमेवाद्वितीयम् । ' या छांदोग्य उपनिषदातील वचनाप्रमाणे अद्वैतसिद्धी कशी होणार? आमच्या मते ब्रह्माहून वेगळे असे सजातीय, विजातीय व स्वगत अवयवादी भेद नसल्यामुळे एक ब्रह्मच सिद्ध होते. जीव हा दुसरा आहे तर मग अद्वैतसिद्धी कशी होऊ शकेल? (उत्तर) या भ्रमात पडून तुम्ही का घाबरता? 'विशेष्य-विशेषण' विद्येचे ज्ञान प्राप्त करा. त्याचे फळ काय आहे? तुम्ही म्हणाल की ‘व्यावर्त्तकं विशेषणं भवतीति । म्हणजे विशेषण भेदकारक असते. तर तुम्ही एवढे आणखी मान्य करा की ‘प्रवर्त्तकं प्रकाशकमपि विशेषणं भवतीति । म्हणजे विशेषण हे प्रवर्तक व प्रकाशकही असते तेव्हा अद्वैत हे ब्रह्माचे विशेषण आहे हे लक्षात घ्या. यातील व्यावर्तक धर्म हा आहे की अद्वैत वस्तू म्हणजे जे अनेक जीव व तत्त्वे आहेत त्यांच्यापासून तो ब्रह्माला वेगळे करतो आणि विशेषणाचा प्रकाशक धर्म हा आहे की ब्रह्म हे एक असल्याची तो प्रवृत्ति करतो. जसे ‘अस्मिन्नगरेऽद्वितीयो धनाढ्यो देवदत्तः। अस्यां सेनायामद्वितीयः शूरवीरो विक्रमसिहः।’ एकाने दसुत्र्याला सांगितले की या नगरामध्ये देवदत्त हा अद्वितीय धनाढ्य आहे; आणि या सैन्यात विक्रमसिंह हा अद्वितीय शूर आहे यावरून काय सिद्ध होते की या नगरात देवदत्तासारखा दुसरा धनाढय आणि या सैन्यात विक्रमसिंहासारखा दुसरा शूरवीर कोणी नाही. त्यांच्याहून कमी प्रतीचे तर आहेत. त्याचप्रमाणे पृथ्वी आदि जड पदार्थ, पशु पक्षी वगैरे प्राणी आणि झाडे झुडुपेही आहेत त्यांचा निषेध केलेला नाही. त्याचप्रमाणे जीव अथवा प्रकृती ही ब्रह्मासारखी नाहीत. परंतु ब्रह्माहून ती कमी प्रतीची तर आहेत.

    यावरून असे सिद्ध होते की ब्रह्मा सदैव एक आहे आणि जीव व प्रकृतिस्थ तत्वे अनेक आहेत. त्यांच्याहून वेगळे ब्रह्मच एकत्व सिद्ध करणारे अद्वैत अथवा अद्वितीय हे विशेषण आहे. या विशेषणाने जीव किंवा प्रकृती व कार्यरूपी जगत यांचा अभाव आणि निषेध होऊ शकत नाही. ते सर्व आहेत. परंतु ते ब्रह्माच्या बरोबरीचे नाहीत यावरून अद्वैतसिद्धी आणि नद्वैत सिद्धीला बाधक होत आहे. उगीच गोंधळून जाऊ नका. विचार करा आणि समजून घ्या.

(प्रश्न) ब्रह्माचे सत्, चित् व आनंद आणि जीवाचे अस्ति, भाति व प्रियरुपने एकता होत आहे. मग तुम्ही अद्वैताचे खंडन का करता? (उत्तर) किंचित साधर्म्य मिळाल्याने त्या दोघांमध्ये एकत्व प्रस्थापित होऊ शकत नाही उदाहरणार्थ, पृथ्वी ही जड आणि दृश्य आहे. तसेच जल, अग्नी वगैरेही जड व दृश्य आहेत. एवढ्यानेच त्यांच्यात एकता होत नाही. त्यांच्यात वैधर्म्य म्हणजे भेद करणारे परस्परविरोधी गुणही आहेत. उदाहरणार्थ, पृथ्वीमध्ये गंध, रूक्षता, काठिण्य इत्यादी गुण आहेत. जलामध्ये रस, द्रवत्व, कोमलत्व वगैरे गुण आहेत. तर अग्नीमध्ये रुप, दाहकत्व आदी गुण आहेत. त्यामुळे तीन पदार्थाचे संभवत नाही. त्याचप्रमाणे माणसे व किडे डोळ्यांनी पाहतात, तोंडाने खातात व पायांनी चालतात तथापि माणसाची आकृती त्याला दोन पाय असतात तर किड्यांना अनेक पाय असतात. त्याचप्रमाणे परमेश्वरामध्ये असणारे अनंत ज्ञान, आनंद, बळ, क्रिया, निर्भ्रान्तित्व व सर्वव्यापकत्व हे गुण जीवाच्या अल्पज्ञान, अल्पबल, अल्पस्वरूप, भ्रांतित्व व परिच्छिन्नत्व वगैरे सर्व गुणांहून ब्रह्माचे गुण भिन्न असल्यामुळे जीव व परमेश्वर हे एक नाहीत. शिवाय त्यांची स्वरूपेही भिन्न आहेत. (परमेश्वर अत्यंत सूक्ष्म आहे तर व त्याच्याहून थोडा स्थूल आहे)

(प्रश्न) अथोदरमन्तरं कुरुते, अथ तस्य भयं भवति ।। तै० उप० ब्रह्मा० अनु० ७।। द्वितीयाद्वै भयं भवति।। बृह० उप० १।।४।।२।।

    हे बृहदारण्यक उपनिषदातील वचन आहे. जो कोणी ब्रह्म आणि जीव यांत थोडाही भेद करतो त्याला भय प्राप्त होते. कारण दुसऱ्यापासूनच भय होते.

(उत्तर) याचा अर्थ हा नाही. जो जीव परमेश्वराचे अस्तित्व नाकारतो अथवा परमेश्वर हा एका देश व काल यांमध्ये परिछिन्न आहे असे समजतो, जो परमेश्वरी आज्ञेचे उल्लंघन करतो आणि त्याच्या गुणकर्मस्वभावाविरुद्ध वागतो अथवा दुसऱ्या माणसाशी वैर करतो त्याला भय प्राप्त होते. कारण द्वितीय बुद्धी म्हणजे ईश्वराशी माझा काही संबंध नाही तसेच कुण्या माणसाला म्हणतो की "तुला मी कस्पटासमान समजत नाही, तू माझे काहीही करू शकत नाहीस," असे म्हणून दुसऱ्याचे नुकसान करतो व त्याला दुःख देतो या गोष्टींमुळे माणसाला त्या जीवाला इतरांचे भय वाटू लागते आणि ज्यांच्यामध्ये सर्व प्रकारचा अविरोध असतो तर ते एक आहेत जसे जगात म्हटले जाते की देवदत्त, यज्ञदत्त व विष्णुमित्र हे एक आहेत त्याचा अर्थ त्यांच्यात कसलाही विरोध नाही. विरोध असल्यास दु:ख व विरोध नसल्यास सुख प्राप्त होते (प्रश्न) ब्रह्म व जीवाची एकता किंवा अनेकता असते किंवा कधी दोघे मिळून एक होतात वा नाही, सदैव भिन्न असतात की त्यांच्यामध्ये कधी एकत्वही होते? (उत्तर) थोड्या वेळापूर्वी या प्रश्नाचे काहीसे उत्तर दिले आहे साधर्म्य आणि अन्वयभावाने ऐक्य होते उदाहरणार्थ, आकाशापासून मूर्त द्रव्ये जड असल्यामुळे व आकाशापासून ती केव्हाही वेगळी राहत नसल्यामुळे ती भिन्न नाहीत, त्यांच्यात एकत्व आहे; आणि आकाशाचे विभू, सूक्ष्म, अरूप, अनंत आदी गुणांनी युक्त व मूर्त द्रव्ये परिच्छिन्न दृश्यत्व इत्यादि वैधर्म्य त्यांच्यात भिन्नता येते. अर्थात ज्याप्रमाणे पृथिव्यादी द्रव्ये आकाशाहून कधी वेगळी राहत नाहीत. कारण अन्वय म्हणजे अवकाशाशिवाय मूर्त द्रव्य राहू शकत नाही आणि त्यांच्यात व्यतिरेक, म्हणजे त्यांची स्वरूपे भिन्न आहेत म्हणून त्यांच्यात पृथक्त्व किंवा वेगळेपण आहे. त्याचप्रमाणे ब्रह्म व्यापक असल्यामुळे जीव व पृथिव्यादी द्रव्ये त्याच्यापासून वेगळी राहत नाहीत. परंतु स्वरूपतः ती कधीच एक होत नसतात. ज्याप्रमाणे घर बांधण्यापूर्वी माती, लाकूड व लोखंड वगैरे पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी आकाशातच असतात. घर बांधल्यानंतरही ते आकाशातच असतात आणि घर नष्ट झाल्यानंतर म्हणजे घराचे सारे सामान वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन पडल्यानंतरही ते आकाशातच आहेत. अर्थात तीन्ही काळांत ते आकाशापासून वेगळे होऊ शकत नाहीत आणि स्वरूपतः भिन्न असल्यामुळे ते व आकाश कधी एक नव्हते, नाहीत व नसतील. याचप्रमाणे जीव आणि जगातील सर्व पदार्थ परमेश्वराने व्याप्त असल्यामुळे स्वरूप भिन्न असल्याने ते परमात्म्यापासून तीनही काळी भिन्न आणि कधीही एक होत नाहीत

   आजकालचे वेदांती लोक काण्या (तिरळ्या) माणसांप्रमाणे अन्वयाकडेच जाते आणि सर्व एकच आहे असे ते समजतात. व्यतिरेक भावातून सुटण्याविरुद्ध झाली आहे. असे एकही द्रव्य नाही की ज्यामध्ये सगुणता व निर्गुणता, अन्वयव, व्यतिरेक, साधर्म्य व वैधर्म्य आणि सामान्य व विशेषण हे भाव नाहीत.

परमेश्वराचे सगुणत्व व निर्गुणत्व

(प्रश्न) परमेश्वर सगुण आहे की निर्गुण? (उत्तर) तो दोनही प्रकारचा आहे (प्रश्न) एका म्यानात दोन तलवारी राहू शकतात? एकाच पदार्थामध्ये सगुणत्व व निर्गुणत्व हे दोन्ही गुण कसे राह शकतात ? (उत्तर) ज्याप्रमाणे जडाचे (अचेतनाचे) रूप आदीगुण आहेत आणि चेतनाचे ज्ञानादी गुण जडा (अचेतना) मध्ये नाहीत त्याप्रमाणे चेतनामध्ये इच्छादी गुण आहेत आणि रूपादी जड (अचेतना) चे गुण त्यात नाहीत. म्हणून ‘यद्गुणैस्सह वर्त्तमानं तत्सगुणम्’, गुणेभ्यो यन्निर्गतं पृथग्भूतं तन्निर्गुणम्’ जो गुणांसहित असतो त्याला सगुण आणि जो गुणरहित असतो त्याला निर्गुण असे म्हणतात. आपापल्या स्वाभाविक गुणांनी युक्त आणि दुसन्या विरोधी गुणांनी रहित असल्यामुळे सर्व पदार्थ सगुण व निर्गुण असतात ज्याच्यामध्ये केवळ निर्गुणत्व अथवा केवळ सगुणत्व आहे असा एकही पदार्थ नाही. परंतु एकातच सगुणता व निर्गुणता सदा विद्यमान असते. याचप्रमाणे परमेश्वर आपल्या अनंत ज्ञान, बल आदी गुणांनी युक्त असल्याने सगुण आणि जड़ाचे रूपादी गुण व जीवाचे द्वेषादी गुण यापासून वेगळा असल्याने तो निर्गुण म्हटला जातो. (प्रश्न) जगामध्ये निराकाराला निर्गुण व साकाराला सगुण म्हणतात. अर्थात परमेश्वर जेव्हा जन्म घेत नाही तेव्हा तो निर्गुण आणि जेव्हा अवतार घेतो तेव्हा तो सगुण म्हटला जातो? (उत्तर) ही कल्पना केवळ अज्ञानी व अविद्वान लोकांची आहे. ज्यांच्याजवळ विद्या नसते ते लोक पशुप्रमाणे वाटेल ते बरळत असतात. सन्निपात ज्वर झालेला माणूस काहीतरी बरळत असतो. तसेच हे अविद्वानचे म्हणणे किंवा लेखास निरर्थक समजले पाहिजे. (प्रश्न) परमेश्वर आसक्त आहे की विरक्त? (उत्तर) दोघातही नाही कारण आसक्तीही आपल्यापासून भिन्न उत्तम पदार्थाविषयी असते. परंतु परमेश्वराहून कोणताही पदार्थ वेगळा किंवा उत्तम नाही असे म्हणून त्याच्यामध्ये आसक्तीचा संभव नाही. जो प्राप्त असलेल्या वस्तूचा त्याग करतो त्याला विरक्त म्हणतात. ईश्वर सर्वव्यापक असल्यामुळे तो कोणत्याही वस्तूला सोडू शकत नाही. म्हणून त्याला विरक्तही म्हणता येत नाही. (प्रश्न) ईश्वराला इच्छा असते की नाही? (उत्तर) तशी इच्छा नाही कारण अप्राप्त, उत्तम व जिच्या प्राप्तने विशेष सुख होते अशा वस्तूविषयी इच्छा होत असते. परमेश्वराला कोणताही पदार्थ अप्राप्त नाही. त्याच्याहन कोणीही उत्तम नाही आणि पूर्ण सुखयुक्त आहे. म्हणून त्याला सुखाची अभिलाषाही नाही. म्हणून ईश्वरामध्ये इच्छा संभवनीय नाही. मात्र त्याच्यामध्ये ईक्षण म्हणजे सर्व प्रकारच्या विद्यांचे दर्शन आणि साऱ्या सृष्टीची निर्मिती करणे म्हटली जाते. ती ईक्षण होय इत्यादी संक्षिप्त विषयाद्वाराच सज्जन लोक पुष्कळ विस्तार करून घेतील.

वेदांची उत्पत्ति व त्यांचे नित्यत्व आता थोडक्यात वेदांचा विषय लिहित आहे.

यस्मादृचो अपातक्षन् यजुर्यस्मादपाकषन् । सामानि यस्य लोमान्यथर्वांगिरसो मुखं स्कम्भन्तं ब्रूहि कतमः स्विदेव सः ।। -अथर्व कां० १०।। सू० ७।। मं० २०।।

ज्या परमेश्वरापासून ऋवेद, यजुर्वेद, सामवेद व अथर्ववेद प्रकाशित झाले तो कोणता देव आहे? याचे उत्तर असे की जा सर्वांना उत्पन्न करून धारण करीत आहे तो परमात्मा (वेदांचा प्रकाशकर्ता) आहे.

स्वयम्भूर्याथातथ्यतोऽर्थान् व्यदधाच्छाश्वतीभ्यः समाभ्यः ।।-यजु० अ० ४०। मं० ८।।

जो स्वयंभू, सर्वव्यापक, शुद्ध, सनातन, निराकार परमेश्वर आहे तोच सनातन जीवरूपी प्रजेच्या कल्याणासाठी यथावत रीतिपूर्वक वेदांद्वारे सर्व विद्यांचा उपदेश करीत आहे. (प्रश्न) परमेश्वराला तुम्ही निराकार मानता की साकार (उत्तर) आम्ही परमेश्वराला निराकार मानतो. (प्रश्न) जर तो निराकार आहे तर बिना मुखाने वर्णोच्चार केल्याशिवाय वेदविद्येचा उपदेश कसा झाला असेल ? कारण वर्णाचा उच्चार करण्यासाठी तालू आदी स्थान आणि वाणी आदिचा प्रयत्न अवश्य व्हावा लागतो. (उत्तर) परमेश्वर सर्वशक्तिमान आणि सर्वव्यापक असल्यामुळे जीवांना तो आपल्या व्याप्तीने वेदविद्येचा उपदेश करण्यात त्याला मुखादीची आवश्यकता नाही. कारण आपल्याहून वेगळ्या असलेल्या दुसऱ्या माणसाला बोध करण्यासाठी मुख, जिव्हा आदी द्वारा व वर्णाच्चाराची गरज असते. स्वतःसाठी कांही त्यांची गरज नसते. कारण मुख व जीभ यांचा वापर न करताही मनामध्ये अनेक व्यवहारांचे चिंतन व शब्दोच्चारण होत राहत असते. कानांमध्ये बोटे घालून पाहा, मुख, जिव्हा, तालू आदी स्थानाचे कसे-कसे शब्द होत आहेत. याच पद्धतीने जीवांना अंतर्यामी रूपाने उपदेश केला आहे. मात्र केवळ इतरांना समजावून सागण्यासाठी शब्दाचा उच्चार करण्याची आवश्यकता आहे. परमेश्वर निराकार व सर्वव्यापक आहे. तो आपल्या अखिल वेदविद्येचा उपदेश जीवस्थ स्वरूपाने जीवात्म्यामध्ये व्यक्त करतो. मग तो माणूस आपल्या तोडाने उच्चार करून इतरांना ऐकवितो. म्हणून ईश्वरामध्ये हा दोष येऊ शकत नाही. (प्रश्न) ईश्वराने कोणाच्या आत्म्यामध्ये केव्हा वेदांचा प्रकाश केला?

(उत्तर) अग्नेर्वा ऋग्वेदो जायते वायोर्यजुर्वेदः सूर्यात्सामवेदः।। शतपथ० प्रपा० ११ ।।ब्रा० ५।। के० ८।। व०३।।

   प्रथमतः सृष्टीच्या प्रारंभी परमेश्वराने अमी,वायू, आदित्य व अंगिरा या ऋषींच्या आत्म्यांमध्ये एका एका वेदाचा प्रकाश केला.

(प्रश्न) यो वै ब्रह्माणं विदधाति पूर्वं यो वै वेदांश्च प्रहिणोति तस्मै।। श्वेताश्वेतर उ०अ० ६।। मं० १८।।

उपनिषदाच्या या वचनामध्ये ब्रह्माच्या हृदयात वेदांचा उपदेश केला आहे. मग अमी आदी ऋषीच्या आत्म्यांमध्ये असे का म्हटले आहे ?

(उत्तर) ब्रह्माच्या आत्म्यामध्ये अग्नी आदी ऋषींद्वारे वेदांची स्थापित केलागेला. मनुस्मृतीत काय म्हटले आहे ते पाहा:-

अग्निवायुरविभ्यस्तु त्रयं ब्रह्म सनातनम् । दुदोह यज्ञसिद्ध्यर्थं ऋग्यजुःसामलक्षणम् ।। मनू० अ० १।। श्लो० २३।।

परमेश्वराने आदी सृष्टीमध्ये मनुष्यांना उत्पन्न करून अग्नी आदी चार महर्षीद्वारा चारही वेद ब्रह्मास प्राप्त करविले आणि त्या ब्रह्मानं अग्नी, वायू, आदित्य व अंगिरा यांच्याकडून ऋग्, यजुःसाम व अथर्व वेदांचे ग्रहण केले. (प्रश्न) त्या चार ऋषींमध्येच वेदांचा प्रकाश केला. इतरांमध्ये केला नाही. यावरून ईश्वर पक्षपाती होत आहे. (उत्तर) तेच चौघे इतर सर्व जीवांहून अधिक पवित्र आत्मे होते. इतर कोणी त्यांच्यासारखे नव्हते. म्हणून पवित्र विद्येचा प्रकाश त्याच्यातच केला. (प्रश्न) कोणत्याही देशाच्या भाषेत वेदांचा प्रकाशन करता तो संस्कृतमध्येच का केला? (उत्तर) कोणत्याही देशाच्या भाषेत वेदांचा प्रकाश व्यक्त केला असता तर ईश्वर पक्षपाती ठरला असता. कारण विशिष्ट प्रादेशिक भाषेत वेदांचा प्रकाश केला गेला असता तर वेदांचे अध्ययन व अध्यापन त्या प्रदेशातील लोकांना सोपे गेले असते आणि इतर विदेशातील लोकांना अवघड झाले असते. म्हणून संस्कृतात वेद प्रकाश झाला जी कोणत्याही देशाची भाषा नाही आणि ती वेदभाषा अन्य सर्व भाषांचे मूळ आहे. तिच्यामध्येच वेदांचा प्रकाश केला. ज्याप्रमाणे ईश्वराची पृथ्वी आदी सृष्टी सर्व देश व त्या देशाचे रहिवासी यांच्यासाठी एकसारखीच आहे आणि सर्व शिल्पविद्यांचे कारण आहे त्याप्रमाणे परमेश्वराच्या विवेची भाषा सुद्धा सारखी असली पाहिजे की त्यायोगे सर्व प्रदेशांतील लोकांना तिचे अध्ययन-अध्यापन करण्यासाठी समान परिश्रम करावे लागते. यावरून परमेश्वर पक्षपाती होत नाही हे सिद्ध होते. शिवाय संस्कृत ही सर्व भाषांचे मूळ आहे. (प्रश्न) वेद ईश्वरकृत आहेत, अन्यकृत नाहीत याचे काय प्रमाण? (उत्तर) जसा ईश्वर पवित्र, सर्व विद्या जाणणारा, शुद्धगुणकर्मस्वभाव, न्यायी, दयाळू वगैरे गुणांनी युक्त आहे, तसेच ज्या ग्रंथात ईश्वराच्या गुणकर्मस्वभावानुकूल लिखाण असेल तोच ग्रंथ ईश्वरकृत, दुसरा नाही. ज्यामध्ये सृष्टिक्रम, प्रत्यक्षादी प्रमाणे, आप्त पुरुष व पवित्रात्मे यांचे व्यवहाराविरुद्ध काही सांगितलेले नसेल ते ईश्वरोक्त समजावे जसे ईश्वराचे निघूम ज्ञान असते तसे ज्या ग्रंथात प्रतिरोहित ज्ञानाचे प्रतिपादन आहे तो ईश्वरप्रणीत आहेजसा परमेश्वर आहे व त्याने जसा सृष्टिक्रम ठेवला आहे त्याच्या अनुशंगाने ज्या ग्रंथात ईश्वर सृष्टी, कार्यकारण आणि जीव यांच्याविषयी प्रतिपादन असेल तो परमेश्वरोक्त ग्रंथ असतो आणि ते प्रतिपादन प्रत्यक्षादी प्रमाण विषयाशी आणि अविरुद्ध शुद्धात्म्याच्या स्वभावाच्या विरुद्ध असता कामा नये. याप्रकारचे वेद ग्रंथ आहेत. दुसरे बायबल, कुराण वगैरे ग्रंथ असे नाहीत. त्याचे स्पष्ट विवेचन बायबल व कुराण यांच्या विषयीच्या प्रकरणांत म्हणजे तेराव्या व चौदाव्या समुल्लासांत करण्यात येईल. (प्रश्न) वेद ईश्वराकडून होण्याची आवश्यकता काहीही नाही. कारण माणसे हळूहळू आपले ज्ञान वाढवून असे ग्रंथ करून घेतील. (उत्तर) माणसे ते काम कधीच करू शकत नाहीत. कारणाशिवाय कार्याची उत्पत्ती असंभव आहे. उदाहरणार्थ, जंगली माणसे भोवतालची सृष्टी पाहूनसुद्धा विद्वान होत नाहीत. जेव्हा त्यांना कुणी शिक्षक मिळतो तेव्हाच ते विद्वान होतात आणि सध्याही दुसऱ्याकडून शिक्षण घेतल्याशिवाय कोणी विद्वान होत नाही. याचप्रमाणे परमेश्वराने सृष्टीच्या प्रारंभाच्या त्या चार ऋषींना वेदविद्या शिकविली नसती तर सर्व लोक अडाणीच राहिले असते. एखाद्या मुलाला जन्मापासून एकांत प्रदेशात, अडाणी लोकांमध्ये किंवा पशूच्या संगतीत ठेवले तर तो जशी संगत आहे तसाच होईल. जंगलात राहणारे भिल्ल वगैरे लोक हे याचे उदाहरण आहे

    जोपर्यत आर्यावर्त देशातून विधेचा प्रसार झाला नव्हता तो पर्यंत ईजिप्त, ग्रीस व युरोपीय देश यांच्या लोकांमध्ये विद्येचा प्रसार मुळीच झालेला नव्हता.तसेच युरोपातून कोलंबस वगैरे लोक जोपर्यंत अमेरिकेत गेले नव्हते तोपर्यंत तेथील रहिवासी हजारो, लाखोकरोडो वर्षापासून अडाणी व विद्याहीनच राहिले होते. आता त्यांना उत्तम शिक्षण मिळाल्याने ते विद्वान बनले आहेत. याचप्रमाणे सृष्टीच्या प्रारंभी परमेश्वराकडून विद्या व शिक्षण मिळाल्याने माणसे उत्तरोत्तर काळात विद्वान झाले आहेत.

स पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदात्।। -योगसू० समाधी० सू० २६।।

    ज्याप्रमाणे आजकाल आपण अध्यापकांकडून शिक्षणच घेऊन विद्वान बनतो त्याचप्रमाणे सृष्टीच्या प्रारंभ उत्पन्न झालेल्या अग्नी आदी ऋषींचा गुरू म्हणजे शिकविणारा परमेश्वर आहे कारण जसे जीव सुषुप्तीमध्ये व प्रलयामध्ये ज्ञानरहित होतात तसा परमेश्वर होत नाही. त्याचे ज्ञान नित्य आहे. म्हणून निमित्तावाचून कार्य कधीच घडत नसते हे निश्चितपणे ओळखले पाहिजे.

(प्रश्न) वेद संस्कृत भाषेत प्रकट झाले आणि अशी आदी ऋषीलोक तर संस्कृत भाषा जाणत नव्हते. मग त्यांना वेदांचा अर्थ कसा जाणला? (उत्तर) परमेश्वराने त्यांना तो जाणवून दिला. तसेच धर्मात्मा, योगी, महर्षीलोक हे जेव्हा-जेव्हा ज्याचा ज्याचा अर्थ जाणून घेण्याच्या इच्छेने ध्यानस्थ होऊन परमेश्वराच्या स्वरूपात समाधीस्थ झाले तेव्हा-तेव्हा परमेश्वर त्यांना हव्या असलेल्या मंत्रांचे अर्थ समजावून दिले. अशाप्रकारे जेव्हा अनेकांच्या आत्म्यांमध्ये वेदार्थाचा प्रकाश पडला तेव्हा ऋषीमुनींनी ते अर्थ आणि ऋषीमुनींचे इतिहासपूर्वक ग्रंथ तयार केले. त्यांचे नाव ब्राह्मण म्हणजे ब्रह्म जे वेद त्याच्या व्याख्यानाचे ग्रंथ असल्याने ब्राह्मण नाव झाले. आणि,

ऋषयो मन्त्रदृष्टयः मन्त्रन् सम्प्रादुः।। निरू० अ० १।। मं० २०।।

    ज्या-ज्या मंत्राथनि दर्शन ज्या-ज्या ऋषीला झाले आणि ज्याच्या आधी त्या मंत्राचा अर्थ कोणीच प्रकाशित केला नव्हता, तो अर्थ त्यांनी लावला आणि इतरांनाही शिकविला सुद्धा म्हणून जो कुणी ऋषिंना मंत्र कर्ता संबोधतात त्यांचे म्हणणे मिथ्या समजावे

(प्रश्न) वेद कोणत्या ग्रंथांचे नाव आहे? (उत्तर) ऋक्, यजुः, साम व अथर्व या चार मंत्रसंहितांचे नाव वेद असे आहे. अन्य ग्रंथांचे नाव वेद नाही. (प्रश्न) ‘मन्त्रब्राह्मणयोर्वेदनामधेयम्।। प्रतिज्ञा-परिशिष्ठ १।१।। इत्यादी कात्यायनादिकृत प्रतिज्ञसूत्रादींचा अर्थ तुम्ही काय कराल? (उत्तर) पाहा! मंत्रसंहिता ग्रंथाच्या प्रारंभी आणि अध्यायाच्या शेवटी अनादिकाळापासून वेद हा सनातन शब्द लिहिला जात आला आहे. तसे ब्राह्मण ग्रंथाच्या प्रारंभी अथवा अध्यायाच्या शेवटी कोठेही लिहिलेले नाही. निरुक्तामध्येही,

इत्यपि निगमो भवति। इति ब्राह्मणम्।। निरू० अ० ५।। खं ० ३,४।। छान्दोब्राह्मणानि च तद्विषयाणि।। अष्टाध्यायी अ० ४।। पा० २।। सू० ६६।।

    हे पाणिनीय सूत्र आहे. यावरूनही हे स्पष्ट विदित होते की वेद हा मंत्रभाग असून ब्राह्मण हा व्याख्याभाग

आहे. या बाबतीत विशेष जाणून घेण्याची इच्छा असेल तर त्यांनी माझा ‘ऋग्वेदादिभाष्यभूमिका' हा ग्रंथ पाहावा.तेथे मी अनेक प्रमाणांच्या विरुद्ध असल्याने हे कात्यायनाचे वचन होऊ शकत नाही, असेच सिद्ध केले आहे. कारण तसे मानले तर वेद सनातन कधीच ठरू शकत नाहीत. कारण ब्राह्मणग्रंथांमध्ये अनेक ऋषी, महर्षी व राजा इत्यादिकांचे इतिहास दिले आहेत , आणि इतिहास ज्याचा असेल तो त्याच्या जन्मानंतरच लिहिला जातो. म्हणून तो ग्रंथही त्याच्या जन्मानंतर तयार होतो. वेदांमध्ये कोणाचाही इतिहास नाही परंतु विशेष ज्या ज्या शब्दापासून विद्येचा बोध होतो त्या त्या शब्दाचा प्रयोग केला आहे. त्यामध्ये कोणत्याही विशिष्ट माणसाचे नाव, विशेष कथाप्रसंग यांचा उल्लेख वेदात नाही. (प्रश्न) वेदांच्या किती शाखा आहेत? (उत्तर) एक हजार एकशे सत्तावीस. (प्रश्न) शाखा काय म्हटली जाते? (उत्तर) व्याख्यानाला शाखा म्हणतात. (प्रश्न) जगात विद्वान लोक वेदांच्या अवयवभूत विभागांना शाखा मानतात. (उत्तर) थोडासा विचार कराल तर बरे. कारण जितक्या शाखा आहेत त्या आश्वलायन आदी ऋषींच्या नावाने प्रसिद्ध आहेत; आणि मंत्रसंहिता परमेश्वराच्या नावाने प्रसिद्ध आहेत. ज्याप्रमाणे चारही वेदांना परमेश्वरकृत मानतात त्याप्रमाणे आश्वलायनी वगैरे शाखांना त्या त्या ऋषीने तयार केलेल्या मानतात; आणि सर्व शाखांमध्ये मंत्रांना प्रतीक समजून त्यांचे निरूपण केले आहे. जसे, तैत्तिरीय शाखेमध्ये ‘इषे त्वोर्जे त्वेति’ इत्यादी प्रतीके धरून विवेचन केले आहे. परंतु वेदसंहितांमध्ये अशा प्रकारची प्रतीके ठेवलेली म्हणून परमेश्वरकृत चारही वेद हे मूळवृक्ष आणि आश्वलायन आदी सर्व शाखा ऋषिमुनीकृत आहेत. त्या परमेश्वरकृत नाहीत. ज्यांना या विषयाची अधिक माहिती हवी असेल त्यांनी ‘ऋग्वेदादिभाष्यभूमिका' पाहावी.

    ज्याप्रमाणे आईबाप आपल्या मुलांवर कृपादृष्टी ठेवून त्यांची उन्नति इच्छितात त्याचप्रमाणेच परमेश्वराने सर्व मानवांवर कृपा करून वेदांना प्रकाशित केले आहे त्यामुळे माणसाने अविद्यारूपी अंधकाराच्या भ्रमजाळातून आपली सुटका करून विज्ञानारूप सूर्याला प्राप्त होऊन अत्यंत आनंदात राहावे आणि विद्येची व सुखांची अभिवृद्धी करीत जावे.

(प्रश्न) वेद नित्य आहेत की अनित्य? (उत्तर) वेद नित्य आहेत. कारण परमेश्वर नित्य असल्यामुळे त्याचे ज्ञानादी गुणही नित्य आहेत. नित्य पदार्थाचे गुण, कर्म, स्वभाव नित्य व अनित्य द्रव्यांचे अनित्य होत असतात. (प्रश्न) काय हे पुस्तक देखील नित्य आहे ? (उत्तर) नाही. कारण ग्रंथ हा कागद व शाई यांनी बनलेला असतो.तो नित्य कसा होऊ शकणार? परंतु जे शब्द, अर्थ व संबंध आहेत ते नित्य आहेत. (प्रश्न) ईश्वराने त्या क्रषींना ज्ञान दिले असेल आणि त्या ज्ञानाच्या आधारे त्या लोकांनी वेद तयार केले असतील? (उत्तर) ज्ञान हे ज्ञेयावाचून होत नाही. गायत्र्यादी छंद, व उदात्त-अनुदात्त आदी स्वरांचे यांची ज्ञानपूर्वक गायत्र्यादी छंदाच्या निर्माण करण्यात सर्वज्ञ परमेश्वराशिवाय कुणाचे सामर्थ्य नाही की अशा प्रकारचे सर्वज्ञानयुक्त शाख बनवू शकेल. होय वेदांचे अध्ययन केल्यानंतर व्याकरण, निरुक्त, छंद इत्यादी ऋषीमुनींनी अनेक विद्यांचा प्रकाश सर्व लोकांना मिळावा यासाठी रचले. जर परमेश्वराने वेदांचा प्रकाश केला नसता तर कोणालाही काहीही करता आले नसते. म्हणून वेद हे परमेश्वरोक्त आहेत. वेदांनुसार सर्व लोकांनी चालले पाहिजे आणि ज्याने कोणी कोणास विचारले की तुमचे मत काय आहे? तर हेच उत्तर द्यावे की आमचे मत वेद, म्हणजे जे काही वेदात सांगीतले आहे त्यालाच आम्ही मानतो.

    आता या पुढील भागात सृष्टिविषयी लिहिणार आहोत. वर संक्षेपाने ईश्वर व वेद विषयाचे व्याख्यान

केले आहे.

इति श्रीमद्दयानन्दसरस्वतीस्वामिकृते सत्यार्थप्रकाशे सुभाषाविभूषित ईश्वरवेदविषये

सप्तमः समुल्लासः सम्पूर्णः ॥७॥