सत्यार्थ प्रकाश/११. दहावा समुल्लास

विकिस्रोत कडून

दहावा समुल्लास आचार, अनाचार व भक्ष्याभक्ष्य विवेचन

आचार व अनाचार

धर्मयुक्त कर्मांचे आचरण, सुशीलता, सत्पुरुषांचा सत्संग आणि सद्विद्येचे ग्रहण करण्यात आवड इत्यादी गोष्टींना आचार आणि या विपरीत जे आहे त्याला अनाचार असे म्हणतात. या संबंधी लिहिले आहे.

विद्वद्भिः सेवितः सद्भिर्नित्यं अद्वेषरागिभिः । हृदयेनाभ्यनुज्ञातो यो धर्मस्तं निबोधत ।। १ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० १।।

माणसांनी सदैव ही गोष्ट ध्यानात ठेवावी की ज्याचे सेवन (आचरण) रागद्वेषरहित विद्वान लोक नित्य करतात, हृदयाने म्हणजे आत्म्याने जे सत्य कर्तव्य जाणतात तोच धर्म माननीय व आचरणीय आहे. ॥१॥

कामात्मता न प्रशस्ता न चैवेहास्त्यकामता । काम्यो हि वेदाधिगमः कर्मयोगश्च वैदिकः ।। २ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० २।।

कारण या जगात अत्यंत कामात्मता व अत्यंत निष्कामता श्रेष्ठ गोष्ट नाहीत. वेदार्थज्ञान व वेदोक्त कर्मानी ह्या सर्व कामना देखील कामनेनेच सिद्ध होतात. ॥२॥

संकल्पमूलः कामो वै यज्ञाः संकल्पसंभवाः । व्रतानि यमधर्माश्च सर्वे संकल्पजाः स्मृताः ।। ३ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० ३।।

"मी निरिच्छ व निष्काम आहे किंवा होईन." असे कोणी म्हणत असेल तो कधी होऊ शकत नाही कारण सर्व कर्म म्हणजे यज्ञ, सत्यभाषणादी व्रते, यमनियमरूपी धर्म आदी गोष्टी संकल्पनेच होत असतात.॥३॥

अकामस्य क्रिया का चिद्दृश्यते नेह कर्हि चित् । यद्यद्धि कुरुते किं चित्तत्तत्कामस्य चेष्टितम् ।। ४ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० ४।।

कारण हात, पाय, डोळे, मन इत्यादिकांच्या ज्या हालचाली होतात त्या इच्छेनेच केल्या जातात. इच्छा नसेल तर डोळे उघडणे व मिटणे ही गोष्टही घडू शकत नाही. ॥४॥

वेदोऽखिलो धर्ममूलं स्मृतिशीले च तद्विदाम् । आचारश्चैव साधूनां आत्मनस्तुष्टिरेव च ।। ५ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो०६ ।।

    म्हणून संपूर्ण वेद, मनुस्मृती तसेच ऋषिप्रणीत शास्त्रे, सत्पुरुषांचा आचार आणि जी कर्मे केल्याने आपला आत्मा प्रसन्न राहतो, म्हणजे भय, शंका, लज्जा वाटत नाही ती कर्मे करणे उचित आहे. पाहा! जेव्हा कोणी मिथ्याभाषण अथवा चोरी वगैरेची इच्छा करतो तेव्हा त्याच्या आत्म्यात भय, शंका, लज्जा ही अवश्य उत्पन्न होतात. म्हणून अशी कर्मे करू नयेत. ॥५॥

सर्वं तु समवेक्ष्येदं निखिलं ज्ञानचक्षुषा । श्रुतिप्रामाण्यतो विद्वान्स्वधर्मे निविशेत वै ।। ६ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० ८ ।।

माणसाने सर्व शास्त्रे, वेद, सत्पुरुषांचा आचार, आपल्या आत्म्याच्या विरुद्ध नसलेल्या गोष्टी यांचा उत्तम प्रकारे विचार करून, ज्ञानरूपी नेत्रांचा वापर करून, श्रुतींच्या प्रमाणाने मानून, आपल्या आर्याला अनुकूल आचरण करावे.॥६॥

श्रुतिस्मृत्युदितं धर्मं अनुतिष्ठन्हि मानवः । इह कीर्तिं अवाप्नोति प्रेत्य चानुत्तमं सुखम् ।। ७ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० ९ ।।

कारण जो माणूस वेदोक्त धर्म आणि वेद विरुद्ध नसलेल्या स्मृत्यूक्त धर्म यांचे अनुष्ठान करतो त्याला इहलोकी कीर्ती आणि मरणानंतर सर्वोत्तम सुख प्राप्त होते. ॥७॥

योऽवमन्येत ते मूले हेतुशास्त्राश्रयाद्द्विजः । स साधुभिर्बहिष्कार्यो नास्तिको वेदनिन्दकः ।। ८ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० १।।

श्रुती ही वेद व स्मृतीला धर्मशास्त्र म्हणतात. त्यांच्या साह्याने सर्व कर्तव्याकर्तव्याचा निर्णय केला पाहिजे. जो कोणी मनुष्य वेद व वेदानुकूल आप्तग्रंथांचा अपमान करील त्याला श्रेष्ठ लोकांनी म्हणजे जातीतून बहिष्कृत करावे. कारण जो वेदांची निंदा करतो तो नास्तिक म्हटला जातो. ॥८॥

धर्माचे लक्षण

वेदः स्मृतिः सदाचारः स्वस्य च प्रियं आत्मनः । एतच्चतुर्विधं प्राहुः साक्षाद्धर्मस्य लक्षणम् ।। ९ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० १२।।

म्हणून वेद, स्मृती, सत्पुरुषांचे आचरण आणि स्वत:च्या आत्म्याच्या ज्ञानाशी अविरोधी प्रियाचरण ही चार धर्माची लक्षणे म्हणजे यांच्यानेच धर्मलक्षित होतो..९॥

अर्थकामेष्वसक्तानां धर्मज्ञानं विधीयते । धर्मं जिज्ञासमानानां प्रमाणं परमं श्रुतिः ।। १० ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० १३।।

परंतु जो द्रव्यलोभ आणि कामवासना म्हणजे विषयसेवन यांत गुरफटलेला नसतो त्यालाच धर्माचे ज्ञान प्राप्त होते. जे धर्माला जाणण्याची इच्छा बाळगतात त्यांच्यासाठी वेद हेच परम प्रमाण आहे॥१०॥

वैदिकैः कर्मभिः पुण्यैर्निषेकादिर्द्विजन्मनाम् । कार्यः शरीरसंस्कारः पावनः प्रेत्य चेह च ।। ११ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० २६।।

म्हणून सर्व द्विज लोकांनी म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य यांनी वेदोक्त पुण्यरूप कर्माद्वारे आपल्या मुलांचे निषेक (गर्भाधान) आदी संस्कार करावेत. ज्यामुळे हा जन्म व परजन्म पवित्र होतो. ॥११॥

केशान्तः षोडशे वर्षे ब्राह्मणस्य विधीयते । राजन्यबन्धोर्द्वाविंशे वैश्यस्य द्व्यधिके मतः ।। १२ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० ६५।।

ब्राह्मणाचे सोळाव्या वर्षी, क्षत्रियाचे बाविसाव्या वर्षी आणि वैश्याचे चोविसाव्या वर्षी केशांत कर्म म्हणजे क्षौर किंवा मुंडन झाले पाहिजे. या विधीनंतर केवळ शेंडी ठेवून दाढी-मिशा व डोकीचे केस नेहमी काढले पाहिजेत म्हणजे हे केस पुनः ठेवता कामा नयेत. अत्यंत थंड प्रदेशात राहणाऱ्या लोकांनी त्यांच्या इच्छेप्रमाणे केस ठेवावेत आणि अत्यंत उष्ण प्रदेशात राहणाऱ्यांनी शेंडीसह डोकीवरील केस काढून टाकावेत. कारण डोकीवर केस राहिल्यास उष्णता अधिक होते आणि त्यामुळे बुद्धी कमी होऊन जाते. दाढी-मिशा वाढविल्यास खाणे-पिणे नीट होत नाही आणि केसांत उच्छिष्ट ही अडकते. ॥१२॥

आत्मसंयमन

इन्द्रियाणां विचरतां विषयेष्वपहारिषु । संयमे यत्नं आतिष्ठेद्विद्वान्यन्तेव वाजिनाम् ।। १ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० ८८।।

जी इंद्रिये चित्त विचलित करणाऱ्या विषयवासनेत प्रवृत्त करवितात त्यांना परावृत्त करण्याचा प्रबल करावा. हाच माणसाचा मुख्य आचार आहे. ज्याप्रमाणे सारथी घोड्यांना ताब्यात ठेवून सरळ मार्गाने चालवितो त्याप्रमाणे इंद्रियांवर ताबा मिळवून त्यांना अधर्ममार्गापासून परावृत्त करून आणि सदैव धर्ममार्गाने चालवावे. ॥१॥

इन्द्रियाणां प्रसङ्गेन दोषं ऋच्छत्यसंशयम् । संनियम्य तु तान्येव ततः सिद्धिं निगच्छति ।। २ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० ९३।।

कारण इंद्रियांना विषयासक्ती व अधर्माने चालविण्याने माणसाला नक्कीच दोष लागतो; आणि जेव्हा त्यांना जिंकून तो धर्मधर्माने नेतो तेव्हाच त्याला अभीष्ट सिद्धी मिळते. ॥२॥

न जातु कामः कामानां उपभोगेन शाम्यति । हविषा कृष्णवर्त्मेव भूय एवाभिवर्धते ।। ३ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० ९४।।

ज्याप्रमाणे अग्नीमध्ये इंधन व तूप टाकल्याने तो वाढत जातो त्याप्रमाणे कामाच्या उपभोगाने कामवासना कधी शांत होत नाही, उलट ती वाढतच जाते, यात मुळीच शंका नाही. म्हणून माणसाने कधी विषयासक्त होऊ नये. ॥३॥

वेदास्त्यागश्च यज्ञाश्च नियमाश्च तपांसि च । न विप्रदुष्टभावस्य सिद्धिं गच्छति कर्हि चित् ।। ४ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० ९७।।

जो पुरुष जितेंद्रिय नसतो त्याला 'विप्रदुष्ट' असे म्हणतात. अशा माणसाला वेदज्ञान, त्याग, यक्ष, नियम आणि धर्माचरण सिद्धि प्राप्त होत नाही. परंतु हे सर्व जितेन्द्रिय धार्मिक माणसास प्राप्त होतात. ॥४॥

वशे कृत्वेन्द्रियग्रामं संयम्य च मनस्तथा । सर्वान्संसाधयेदर्थानक्षिण्वन्योगतस्तनुम् ।। ५ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० १००।।

म्हणून पाच कमेंद्रिये, पाच ज्ञानेंद्रिये व अकरावे मन यांना ताब्यात ठेवून युक्ताहारविहाराच्या योगे शरीराचे रक्षण करीत सर्व पुरुषाथांची प्राप्ती करावी. ॥५॥

श्रुत्वा स्पृष्ट्वा च दृष्ट्वा च भुक्त्वा घ्रात्वा च यो नरः । न हृष्यति ग्लायति वा स विज्ञेयो जितेन्द्रियः ।। ६ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० ९८।।

ज्याला स्तुतीने हर्ष आणि निंदेने शोक होत नाही, चांगल्या स्पर्शाने सुख व वाईट स्पर्शाने दुःख होत नाही, जो सुंदर रूप पाहून प्रसन्न व कुरूपता पाहून अप्रसन्न होत नाही, जो उत्तम भोजनाने आनंदित व निकृष्ट भोजनाने दु:खी होत नाही, जो सुगंध वा दुर्गध याविषयी प्रेम किंवा घृणा बाळगत नाही, अशा माणसाला जितेंद्रिय म्हणतात. ॥६॥

नापृष्टः कस्य चिद्ब्रूयान्न चान्यायेन पृच्छतः । जानन्नपि हि मेधावी जडवल्लोक आचरेत् ।। ७ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० ११०।।

जे कोणी विचारले नसता किंवा कपटाने अथवा अन्यायाने विचारले असता त्याला कधीही उत्तर देऊ नाही. अशा कपटी माणसांसमोर बुद्धिवंतांनी जड म्हणजे स्तब्ध, मौन राहवे. मात्र जे निष्कपट व जिज्ञासू असतील त्यांनी विचारले नसताही त्यांना उपदेश करावा. ॥७॥

श्रेष्ठतेचे निकष

वित्तं बन्धुर्वयः कर्म विद्या भवति पञ्चमी । एतानि मान्यस्थानानि गरीयो यद्यदुत्तरम् ।। ८ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० १३६।।

एक धन, दुसरे उत्तम बंधु परिवार कुळ, तिसरे वय, चौथे उत्तम कर्म आणि पाचवे श्रेष्ठ विद्या या पाच गोष्टी मान्यतेची स्थाने आहेत. परंतु धनापेक्षा उत्तम बंधु परिवार, बंधुहून वय, वयाहून श्रेष्ठ कर्म आणि कर्माहून पवित्र विद्या असणारे उत्तरोत्तर अधिक माननीय आहेत. ॥८॥

अज्ञो भवति वै बालः पिता भवति मन्त्रदः । अज्ञं हि बालं इत्याहुः पितेत्येव तु मन्त्रदम् ।। ९ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० १५३।।

कारण शंभर वर्षांचा म्हातारा विद्याविज्ञानरहित असेल तर तो बालक; आणि विद्या व विज्ञान देणारा आहे त्या बालकास देखील वृद्ध असेच मानले पाहिजे. कारण सर्व शास्त्रे आप्त विद्वानअज्ञानीना बालक व ज्ञानी माणसाला पिता म्हणतात॥९॥

न हायनैर्न पलितैर्न वित्तेन न बन्धुभिः । ऋषयश्चक्रिरे धर्मं योऽनूचानः स नो महान् ।। १० ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० १५४।।

वय अधिक वाढल्याने, केस पिकल्याने, अधिक धन असल्याने आणि मोठे कुटुंब असल्याने मनुष्य वृद्ध ठरत नाही. परंतु आमच्यातील विद्याविज्ञानात श्रेष्ठ आहेत तोच वृद्ध पुरुष म्हटला जातो. ऋषी व महात्मे यांचे ठाम मत आहे. ॥१० की जे

विप्राणां ज्ञानतो ज्यैष्ठ्यं क्षत्रियाणां तु वीर्यतः । वैश्यानां धान्यधनतः शूद्राणां एव जन्मतः ।। ११ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० १५५।।

ब्राह्मण जागने, क्षत्रिय बळाने, वैश्य धनधान्याने व शूद्र जन्माने म्हणजे अधिक वयाने वृद्ध समजला.॥११॥

न तेन वृद्धो भवति येनास्य पलितं शिरः । यो वै युवाप्यधीयानस्तं देवाः स्थविरं विदुः ।। १२ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० १५६।।

अंगावरील केस पांढरे झाल्याने माणूस वृद्ध (श्रेष्ठ) होत नाही. परंतु जो युबक विद्या शिकलेला असेल त्यालाच विद्वान लोक मोठा मानतात. ॥१२ ॥

यथा काष्ठमयो हस्ती यथा चर्ममयो मृगः । यश्च विप्रोऽनधीयानस्त्रयस्ते नाम बिभ्रति ।। १३ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० १५७।।

ज्याने विद्याध्ययन केले नाही तो जणू लाकडाचा हत्ती किंवा कातड्याचा मृग असतो. त्याप्रमाणे अविद्वान मनुष्य हा जगात नाममात्र माणूस म्हटला जातो. ॥१३॥

अहिंसयैव भूतानां कार्यं श्रेयोऽनुशासनम् । वाक्चैव मधुरा श्लक्ष्णा प्रयोज्या धर्मं इच्छता ।। १४ ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० १५९।।

म्हणून माणसाने विद्या शिकून विद्वान धर्मात्मा होऊन निर्वैर वृत्तीने सर्व प्राण्यांच्या कल्याणाचा उपदेश करावा आणि उपदेश करताना त्याने मधुर व कोमल वाणीचा वापर करावा. जे पुरुष सत्योपदेशाने धर्माची वृद्धी व अधर्माचा नाश करतात ते धन्य होत. ॥१४॥

    नित्य नान, वस्त्र, अन्न, पान, स्थान वगैरे सर्वशुद्ध (स्वच्छ ) ठेवावे. कारण हे सर्व पदार्थ शुद्ध झाल्याने चित्तशुद्धी आणि आरोग्य प्राप्त होऊन पुरुषार्थ वाढतो. शुचिता तेवढी करणे योग्य आहे की, ज्यायोगे घाण व दुर्गधी नाहीशी होईल एवढी स्वच्छता सर्वत्र ठेवावी.

आचारः परमो धर्मः श्रुत्युक्तः स्मार्त एव च ।।मनु०।। अ०१ ।। श्लो० १०८।। जे सत्यभाषणादी कमचे आचरण करणे हाच वेद व स्मृती यांत सांगितलेला आचार होय. मा नो वधीः पितरं मोत मातरम् ।। -यजु० अ० १६। मं० १५।। आचार्य्य उपनयमानो ब्रह्मचारिणमिच्छते ।। अथर्व कां० ११ ।। सू० ५ ।। मं० ३ ।। मातृदेवो भव। पितृदेवो भव। आचार्य्यदेवो भव। अतिथिदेवो भव।। -तैनिरी०।। ७ ।। ११ ।।

    माता, पिता, आचार्य व अतिथी यांची सेवा करणे हीच देवपूजा होय. ज्या-ज्या कमनि जगावर उपकार होतो ते-ते कर्म करणे आणि हानिकारक कर्म सोडून देणेच माणसाचे मुख्य कर्तव्य कर्म आहे. नास्तिक, लंपट, विश्वासघातकी, चोर, असत्यवादी, स्वार्थी, कपटी, धोकेबाज इत्यादी दुष्ट लोकांची संगत करू नये. आत जे सत्यवादी, धर्मात्मा, परोपकार प्रिय लोक आहेत त्यांचानेहमी सत्संग करण्याचेच नाव श्रेष्ठाचार आहे.

विदेशगमन

(प्रश्न) आर्यावर्त देशवासी आर्यावर्त देशातून वेगवेगळ्या देशात जाण्याने आचारभ्रष्ट होतो किंवा नाही? (उत्तर) हे साफ खोटे आहे. कारण आंतरिक व बाह्य पावित्र्य ठेवणे, सत्यभाषण वगैरे आचरण करणे, आहे हे कोठेही करील तरी आचारभ्रष्ट व धर्मभ्रष्ट होणार नाही. जर कोणी आर्यावर्त्तात राहून दुराचार करील तर तोच धर्मभ्रष्ट व आचारभ्रष्ट समजला जाईल. जर असेच झाले असते तर

मेरोर्हरेश्च द्वे वर्षे वर्षं हैमवतं ततः। क्रमेणैव व्यतिक्रम्य भारतं वर्षमासदत्।।१।। स देशान् विविधान् पश्यंश्चीनहूणनिषेवितान् ।।२।। महा० शांती० प० अ० ३२५।। श्लो० १४, १५।।

    हे श्लोक महाभारताच्या शांतिपर्वातील मोक्षधर्मामध्ये व्यास-शुक संवादात आले आहेत. एकदा व्यास महर्षी आपला मुलगा शुक आणि शिष्य यांच्यासह पाताळ म्हणजे ज्या देशाला सध्या अमेरिका म्हणतात तेथे राहत होते. त्यावेळी शुकाचार्यांनी आपल्या वडिलांना एक प्रश्न विचारला की, "आत्मविद्या एवढीच आहे की याहून अधिक आहे?" व्यासजींनी मुद्दामच त्याप्रश्नाचे उत्तर दिले नाही. कारणत्यांनी त्या विषयाचा उपदेश पूर्वी केला होता. आता त्याला दुसऱ्याच्या साक्षीसाठ त्यांनी आपल्या मुलाला सांगितले, “हे पुत्रा, तू मिथिलापुरीला जाऊन हाच प्रश्न जनकराजाला विचार. ते याचे यथायोग्य उत्तर देतील" पित्याचे बोलणे ऐकून शुकाचार्य पाताळ देशातून मिथिलापुरीला निघाले. ते प्रथम मेरू म्हणजे हिमालयाच्या ईशान्येस, उत्तरेला व वायव्येस जे देश आहेत त्यांचे नाव त्यावेळी हरिवर्ष असे होते. वानरांना हरी असे म्हणतात. त्या प्रदेशातील माणसे आजही लाल तोंडाची व पिंगट डोळ्यांची वानरासारखी आहेत. ज्या देशांना आज युरोप असे म्हणतात त्यालाच संस्कृतमध्ये हरिवर्ष असे म्हणत असत. तेथील देश आणि ज्यांना हुण, यहुदी असे म्हणतात. ते देश पाहन शुकाचार्य चीनला पोचले. तेथून ते हिमालयात आले आणि हिमालयातून मिथिलापुरीला आले.
    तसेच जिला अभियान नौका म्हणजे आगबोट असे म्हणतात त्या अश्वतरी जलयानातून श्रीकृष्ण व अर्जुन पाताळात जाऊन आणि तेथून महाराजा युधिष्ठिराच्या यज्ञासाठी उद्दालक ऋषींना घेऊन आले होते. धृतराष्ट्राचा विवाह गंधार म्हणतात. तेथील राजकन्येशी झाला होता. पांडू राजाची पत्नी माद्री 'इराण' च्या राजाची कन्या होती आणि अर्जुनाचा विवाह, ज्याला आजकाल अमेरिका म्हणतात त्या पाताळ देशाची राजकन्या उलूपी हिच्याशी झाला होता. जर लोक देशदेशांतरी व द्वीपद्वीपांतरी जात-येत नसते तर या सगळ्या गोष्टी कशा घडल्या असत्या? मनुस्मृतीमध्ये समुद्रावर जाणाऱ्या नौकांवर कर घ्यावा असे सांगितले आहेते सुद्धा आर्यावर्त्तातील द्वीपांतरात गेल्या कारणाने आहे आणि जेव्हा महाराजा युधिष्ठिरांनी राजसूय यज्ञ केला होता तेका साऱ्या जगातील लोकांना निमंत्रण देण्यासाठी भीम, अर्जुन, नकुल व सहदेव चारही दिशांना गेले होते. जर परदेशगमनात दोष मानला असता तर ते कधीही गेले नसते. सारांश, प्राचीन काळचे आर्यावर्त्तातील लोक व्यापार राजकार्य आणि पर्यटन यांसाठी जगभर जात असत आणि जो आजकाल शिवाशीव आणि परदेशगमनाने धर्म भ्रष्ट होतो ही कल्पना, या गोष्टी मूख लोक वात्रट वागल्याने व अजून वाढल्याने झाल्या आहेत.
     जे लोक देशदेशांतरीव द्वीपद्वीपांतरी जाण्यायेण्यात मुळीच संकोच करीत नाही ते वेगवेगळ्या देशांतील नाना प्रकारच्या लोकांच्या संपर्कात येतात, त्यांच्या रीतीभाती पाहतात, आपले राज्य व व्यापार वाढवितात, निर्भय, वीर बनतात आणि सद्व्यवहाराचे  ग्रहण व वाईट गोष्टींचा त्याग करण्यास तत्पर होऊन विपुल ऐश्वर्य प्राप्त करून घेतात. जे लोक महाभ्रष्ट म्लेच्छकुलोत्पन्न वेश्यांशी समागम केल्याने आचारभ्रष्ट व धर्मभ्रष्ट बनत नाहीत परंतु देशोदेशीच्या उत्तम पुरुषांच्या संपर्कात मात्र त्यांना शिवाशीव व दोष दिसतो हा निव्वळ मूर्खपणाचा नव्हे तर काय ? होय, पण एक कारण तर आहे की जे लोक मांसभक्षण व मद्यपान करतात त्यांचे शरीर व विर्यादी धातृसुद्धा दुर्गन्धाने दूषित होतात म्हणून अशा लोकांशी संगत केल्यास आर्यांनाही ते दोष लागतील परंतु त्यांच्याशी इतर व्यवहार करण्यात व त्यांचे चांगले गुण घेण्यात काहीच दोष अथवा पाप नाही. त्यांच्यातील मद्यपानादी दोषांपासून दूर राहन ज्ञानादी सद्गुणांचे ग्रहण करण्यात काहीच हानी नाही. जर अशा लोकांना स्पर्श करण्यात आणि त्यांच्याकडे पाहण्यातही पाप आहे असे मूख लोक समजतात. म्हणूनच ते त्यांच्याशी युद्धही करू शकत नाहीत. कारण युद्धामध्ये त्यांना पाहणे व स्पर्श करणे अपरिहार्यच असते.
    सर्व सज्जनांनी राग (मोह), द्वेष, अन्याय, मिथ्या भाषण इत्यादी दोषांचा त्याग करून निवैरता, प्रती, परोपकार सज्जनता इत्यादी गुणांचे धारण करणे हाच उत्तम आचार आहे. आणि तसेच हेही समजून घ्यावे की धर्म हा आपला आत्मा व कर्तव्यात निहित आहे. जेव्हा आपण सत्कृत्ये करीत असतो तेव्हा आपल्याला देशदेशान्तरी आणि द्विप-द्विपान्तरी जाण्यात कोणताही दोष किंवा पाप लागू शकत नाही. दोष तर पापी कामे करण्यात लागतात.
    होय, इतके अवश्य ध्यानात ठेवले पाहिजे की, वेदोक्त धर्माची संपूर्ण माहिती घेऊन आणि पाखंड मताचे

खंडन करणे अवश्य शिकून घेतले पाहिजे. त्यामुळे आपल्याला कोणीही खोटे ठरवू शकणार नाही. देशदेशांतरी व द्विपद्विपान्तरी राज्य व व्यापार केल्याखेरीज आपल्या देशाची उन्नती कधी तरी शक्य आहे काय ? जेव्हा स्वदेशी लोक आपल्याच देशात व्यापार करतात आणि परदेशी लोक येथे येउन व्यापार व राज्य करतात तेव्हा दारिद्र्य व दु:ख यांच्याखेरीज दुसरे काहीही होऊ शकत नाही.

    पाखंडी लोक असे समजतात की जर आम्ही यांना विद्या शिकविली आणि परदेशगमनाची परवानगी दिली तर हे शहाणे होतील आणि आमच्या पाखंडाच्या जाळ्यात अडकणार नाहीत. तसे झाल्यास आमची प्रतिष्ठा व पोटापाण्याची साधने ही नाहीशी होतील. म्हणून खाण्यापिण्याच्या बाबतीत शिवाशिवीचे निर्बंध घालतात ज्यामुळे ते दुसऱ्या देशात जाऊ शकणार नाहीत.

स्पर्शास्पर्श

    परंतु एवढे अवश्य पाहिजे की कोणत्याही परिस्थितीत चुकूनही मद्यमासांचे सेवन करू नये. सर्व बुद्धिमानानी हेच निश्चय नाही केले की राजपुरुषांच्या युद्धांच्या वेळीही स्वत:चा स्वयंपाक स्वत:च करून खाण्याने नक्कीच पराभवाचे कारण होते, वस्तुतः क्षत्रियांनी युद्धाच्या वेळी एका हाताने भाकरी खात व पाणी पीत जावे व दुसऱ्या हाताने शत्रूवर चढाई करणे आणि घोड्यावर किंवा हत्तीवर बसून अथवा पादतळी होऊन कापाकापी करीत विजय होणे हाच त्यांचा आचार आहे व पराजित होणे हा अनाचार होय. अशा मूर्खपणाने या लोकांनी वेगवेगळ्या चुली मांडून व विरोध दर्शवून सगळे स्वातंत्र्य, आनंद, धन, राज्य, विद्या व पुरुषार्थ यांचेवर फटकारा मारून, डोक्याला हात लावून बसले आहेत आणि इच्छा करतात की काही पदार्थ मिळाले तर ते शिजवून खावेत, परंतु असे झाल्याने समजावे की स्पृश्यास्पृशतेने आर्यावर्त देशाला सर्व प्रकारे नष्ट करून टाकले आहे.
    अर्थात स्वयंपाकाची जागा स्वच्छ असलीच पाहिजे. त्यासाठी ती झाडून, सारवून, केरकचरा काढून टाकून निर्मळ करण्याचे प्रयत्न अवश्य केला पाहिजे असे मात्र नाही की, मुसलमान किंवा ख्रिस्ती लोकांसारखी स्वयंपाकघरे घाणेरडी ठेवावीत.

(प्रश्न) सखरी (कच्ची रसोई) व निखरी (पक्की रसोई) हे काय आहे? (उत्तर) जे अन्न पाण्यात शिजविले जाते त्याला सखरी किंवा कच्ची रसोई आणि जे दुधात शिजवून तयार केले जाते त्याला निखरी, चोखी किंवा पक्की रसोई हणतात. हा सुद्धा या धूर्तांनी सुरू केलेला पाखंड आहे. कारण ज्या पदार्थात दूध-तूप जास्त वापरले जाते ते खायला स्वादिष्ट व पोटात स्निग्ध पदार्थ जावेत त्यासाठी त्यांनी ही सारी लबाडी केली आहे. वस्तुतः जो पदार्थ अग्नीवर शिजविलेला किंवा योग्य काळानुसार पिकलेला असतो तो पक्व आणि जो न शिजलेला अथवा अपरिपक्व असेल तो कच्चा होय. शिवाय पक्व पदार्थ खावयाचे व कच्चे खावयाचे नाहीत, हा नियमदेखील सर्वत्र ठीक पाळला जात नाही. कारण चणे वगैरे कच्चेही खाल्ले जातात. (प्रश्न) द्विजांनी स्वतःच्या हातांनी अन्न शिजवून खावे की शूद्रांच्या हातचे अन्न खावे? (उत्तर) शूद्रांनी शिजविलेले अन्न द्विजांनी खावे. कारण ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य वर्णाच्या स्त्रीपुरुषांनी विद्या अध्ययन-अध्यापन, राज्यकारभार आणि पशुपालन, शेती व व्यापार ह्या कामात तत्पर राहवे. मात्र शुद्धाच्या भांड्यांत किंवा त्याच्या घरी शिजविलेले अन्न आपत्काळखेरीज द्विजांनी खाऊ नये. यासाठी प्रमाण हे आहे:-

आर्याधिष्ठिता वा शूद्राः संस्कर्त्तारः स्युः ।। आप० धर्म० प्रपा० २।। पटल २।। खं० ४।। सूत्र ४।।

    हे आपस्तम्बातील सूत्र आहे. आर्यांच्या घरी शूद्रांनी म्हणजे अज्ञानी स्त्रीपुरुषांनी स्वयंपाक पाणी करावे. मात्र त्यांनी आपली शरीरे व वस्त्रेही पवित्र म्हणजे निर्मळ राखावीत. आर्यांच्या घरी स्वयंपाक करताना शुद्धांनी कपड्याने तोंड बांधून करावा. कारण त्याच्या तोंडातील उष्टे वगैरे आणि त्याचा नि:श्वास अन्नावर पडता कामा नये. दर आठव्या दिवशी त्याने डोकीचे केस कापावेत आणि नखे कापून घ्यावीत. त्याने स्नान करून स्वयंपाक करावा आणि आर्यांना जेवू घातल्यावर स्वत: जेवावे

(प्रश्न) शिजविलेल्या अन्नाला शूद्राचा स्पर्श झाल्यास ते अन्न दूषित झाले असे लोक समजतात. मग त्याच्या हातानी तयार केलेले अन्न कसे खाऊ शकतील? (उत्तर) ही गोष्ट कपोलकल्पित, खोटी आहे. कारण ज्यांनी गूळ, साखर, तूप, दूध, दळण, भाजी, फळे, धान्य, कंदमूल हे पदार्थ ज्याने खाल्ले त्याने जणू साऱ्या जगाच्या हाताने तयार केलेले आणि उच्छिष्ट खाल्ले असे ठरते. कारण जेव्हा शूद्र, चांभार, भंग, मुसलमान, खिश्चन वगैरे लोक शेतातील ऊस कापतात, सोलतात, तो पिळून रस काढतात तेव्हा मलमूत्रविसर्जनाच्या वेळी वापरलेले हात न धुता त्याच हातांनी स्पर्श करतात, उचलतात, ठेवतात अर्धा ऊस चोखून अर्धा त्यातच टाकतात. रस शिजत असताना त्यात आपल्या भाकरी टाकून त्या शिजवून खातात. जेव्हा साखर तयार करतात तेव्हा पायातल्या जोड्यांसकट ती तुडवितात. त्या जोड्यांच्या तळाला विष्ठामूत्र, शेण, धूळ वगैरे सर्व काही चिकटलेले असते त्याच जोडयांनी रगडतात. ते सारे त्या साखरेत मिसळते. दुधामध्ये आपल्या घरातील उष्ट्या भांड्याचे पाणी मिसळतात. उष्ट्या भांड्यात तूप ठेवतात आणि पीठ दळताना उष्ट्या हातांनीच ते गोळा करतात आणि त्या पिठात त्यांचा घामही गळत असतो. फळे व कंदमुळे यांच्या बाबतीतही हा सारा खेळ होत असतो असे हे पदार्थ खाल्ले तर समजावे की सर्वांच्या हातचे खाल्ल्यासारखेच होते. (प्रश्न) फळे, कंदमुळे आणि रस, वगैरे बाबतीत अदृष्टात दोष मानीत नाही काय? (उत्तर) मग भंग्याने अथवा मुसलमानाने स्वतःच्या हाताने इतर ठिकाणी बनविलेले पदार्थ आणून दिले तर ते तुम्ही खाल की नाही? जर नाही म्हणाल तर तो अदृष्टातही दोष आहे

     खरे म्हटले तर मुसलमान, ख्रिस्ती इत्यादी मद्य मांसाहारीच्या हातचे खाल्ल्याने आर्यांनाही मद्यमांस खाण्याचे पिण्याचे दोष लागतात. परंतु आर्यांनी आपसात एकत्र भोजन करण्यामध्ये कसलाच दोषे दिसत नाही. जोपर्यंत आर्य लोकांत एकमत, परस्परांचे लाभहानी व सुखदुःखे परस्परांचे मानणार नाहीत, तोपर्यंत त्यांची उन्नती होणे फार कठीण आहे. परंतु केवळ खाणे-पिणे एक झाल्याने सुधारणा होऊ शकत नाही. जोपर्यंत वाईट गोष्टी सोडत नाही व चांगल्या गोष्टी करीत नाहीत तोपर्यत उन्नतीऐवजी अवनतीच होत असते.
     आपसातील दुही, मतभेद, ब्रह्मचर्याचा अभाव, विद्या शिकणे न शिकविणे, बालविवाह, अस्वयंवर विवाहपद्धती, विषयासक्ती, मिथ्याभाषण आदी कुलक्षणे, वेदविद्येचा अप्रचार आदी कुकरी या कारणांमुळे

आर्यावर्त्तावर विदेशी लोकांचे राज्य झाले. तेव्हा भाऊ-भाऊ आपसात भांडतात तेव्हाच तिसरा विदेशी पंच बनून बसत.

    पाच हजार वर्षांपूर्वी घडलेल्या महाभारतातल्या गोष्टी तुम्ही विसरलात काय? पाहा! महाभारतीय युद्धात लढणारे सारे वीर आपापल्या वाहनांवरच खाणेपिणे करीत असत. आपसातील यादवीमुळेच कौरव, पांडव व यादव यांचा सत्यानाश झाला. जे झाले ते झाले परंतु तोच अजूनपर्यंत तोच रोग भारतीयांच्या मागे लागला आहे. हा भयंकर राक्षस कधी सुटेल की आयांना साच्या सुखांपासून वंचित करून दुःखसागरात बुडवून टाकील? आपल्या गोत्राची हत्या करणाऱ्या, स्वदेशाचा विनाश करणाऱ्या, नीच व दुष्ट दुर्योधनाच्या दुष्ट मार्गाने आर्य लोक आजपर्यंतसुद्धा चालले असून आपल्या दु:खात भर घालीत आहेत. परमेश्वराने कृपा करावी की हा राजरोग आम्हा आयांतून नष्ट व्हावा.

भक्ष्य व अभक्ष्य विवेचन

भक्ष्याभक्ष्य दोन प्रकारचे असते. एक धर्मशास्त्रोक्त व दुसरा वैद्यशास्त्रोक्त, धर्मशास्त्राप्रमाणे - अभक्ष्याणि द्विजातीनां अमेध्यप्रभवानि च ।। मनु०।। अ०५ ।। श्लो० ५।।

द्विजांनी म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य आणिशुद्धांनी मलमूत्राच्या संसर्गातून उत्पन्न झालेला भाजीपाला, फळे व कंदमुळे खायला नका. वर्जयेन्मधु ।। मनु०।। अ०२ ।। श्लो० १७७।। जसे अनेक प्रकारची मद्यें, मांस, गांजा, भांग, अफू इत्यादी. बुद्धि लुम्पति यद् द्रव्यं मदकारी तदुच्यते।। शार्ङ्गधर अ०४।। श्लो० २१ ।।

    बुद्धीचा नाश करणारे जे-जे पदार्थ आहेत त्यांचे सेवन कधीही करू नयेआणि सडलेले, गासलेलेदुध

दुषित, योग्य प्रकारे तयार करण्यात न आलेले अन्न आणि ज्यांची शरीरे मद्य मांसाच्या परमाणूनी भरलेली आहेत. अशा मद्यमांसाहारी म्लेच्छांच्या हातचे अन्न खाऊ नये.

उपकारी प्राण्यांचे रक्षण

     उपकारक प्राण्यांची हिंसा जसे एका गायीपासून दूध, तूप,बैल व गायी यांच्या उत्पत्तने तिच्या एका पिढीत चार लाख पंचाहत्तर हजार सहाशे माणसांना सुख प्राप्त होते. अशा पशूंना आपण मारू नये व इतरांना मारू देऊ नये. एखादी गाय वीस शेर दूध देते तर दुसरी एखादी दररोज दोन शेर दूध देते. याचा अर्थ असा की प्रत्येक गायीकडून सरासरीने दररोज अकराशेर दूध मिळते. एखादी गाय अठरा महिने दूध देते तर दुसरी एखादी सहा महिने दूध देते. याचा मध्यभाग म्हणजे सरासरीने बारा महिने झाले. या हिशोबाने प्रत्येक गायीच्या जन्मभराचे जे दूध २४९६० (चोवीस हजार नकशे साठ) माणसे एका वेळी तृप्त होऊ शकतात. तिला एकूण बारा वासरे होतात त्यांतील दोन मेली तरी दहा वासरे जिवंत राहतात. त्यातील पाच कालवडीच्या जन्मभराचे दूध धरले तर त्याने १,२४८०० (एक लाख चोवीस हजार आठशे) लोक तृप्त होतात. आता पाच खोंडांचे बैल उभ्या जन्मात ५,००० (पाच हजार) मणधान्याचे उत्पादन करू शकतात. या धान्याने दर माणशी पाऊणशेरे या हिशोबाने अडीच लाख माणसांची तृप्ति होते. दूध व धान्य मिळून ३,७४८०० (तीन लाख चौऱ्याहत्तर हजार आठशे) माणसे तृप्त होतात. एका गायीच्या एका पिढीमध्ये दूध व धान्य मिळून ४,७५६०० (चार लाख पंचाहत्तर हजार सहाशे) माणसांचे एकावेळी पोषण होते; आणि पिढ्यान् पिढ्यांचा हिशेब केला तर असंख्य माणसांचे पालनपोषण होते. या खेरीज गाडी ओढणे, ओझे वाहणे वगैरे कामातही बैल माणसाला खूप उपकारक होतात. तसेच गाय ही दुधाच्या दृष्टीने अधिक उपकारक आहे. गायी व बेल यांच्या प्रमाणेच म्हैस ही उपकारक पशु आहे. परंतु गायीच्या दुधातुपाने जितका बुद्धिवृद्धि पासून लाभ होतो, तितका लाभ म्हशीच्या दुधातुपाने होत नाही. म्हणून आर्यांनी गायीला अत्यंत उपकारी मानले आहे आणि जे कुणी इतर विद्वान असतील तेसुद्धा याचप्रमाणे समजतील.
     शेतीच्या दुधाने २५,९२० (पंचवीस हजार नऊशे वीस) माणसांचे एका वेळी पालन होऊ शकते. याचप्रमाणे हत्ती, घोडे, उंट, मेंदया, गाढवे वगैरे पशूठी खूप उपकारी आहेत. या पशूना मारणारा साऱ्या माणसांचीच हत्या करतो असे जाणले पाहिजे.
     पहा! जेव्हा आर्याचे राज्य होते तेव्हा गायींसारखे अत्यंत उपयुक्त पशु मारले जात नव्हते. म्हणूनच आर्यावर्त्तात आणि जगातील इतर देशात मनुष्यादी प्राणी आनंदात राहत होते. कारण दुध तुप व बैल यांची विपुलता असल्याने धनधान्य व दूधदुभते भरपूर मिळत असे. पण जेव्हा विदेशी मांसाहारी लोक या देशात आले आणि गायी वगैरे उपयुक्त पशूना मारून मांसाहारी व मद्यपान करणारे राज्याधिकारी झाले तेव्हापासून उत्तरोत्तर आर्यांच्या दुःखाची वाढ होत गेली. कारण

नष्टे मूले नैव फलं न पुष्पम्। वृद्धचाणक्य अ. १० ।। श्लो०१२ ।।

    झाडाची मुळेच कापून टाकली तर फुले व फळे कोठून येणार?

(प्रश्न) सर्वच माणसे अहिंसक बनली तर वाघसिंह वगैरे हिंस्र पशू इतके वाढतील की ते गायी वगैरे प्राण्यांना मारून खातील; आणि (त्यांना वाचविण्याचे) तुमचे सारे प्रयल निष्फळ ठरतील. (उत्तर) जे पशू किंवा माणसे हानिकारक असतील त्यांना शिक्षा करणे आणि वेळप्रसंगी मारूनही टाकणे हे राजपुरुषांचे काम आहे. (प्रश्न) मग काय मारलेल्या प्राण्यांचे मांस फेकून द्यावे ? (उत्तर) फेकून द्यावे किंवा कुत्र्यांसारख्या मांसाहारी प्राण्यांना खाऊ घालावे किंवा जाळून टाकावे किंवा कोणी मांसाहारी माणूस ते खात असेल तर त्याने जगाचे काही नुकसान होणार नाही. मात्र (जो माणूस मांस खातो) त्याचा स्वभाव हिंसक वळूर बनू शकतो.

    हिंसा, चोरी, विश्वासघात, छल, कपट, यांमार्गाने जे पदार्थ प्राप्त होतात त्याचा उपभोग घेणे हे अभक्ष्य (खाण्यास अयोग्य); आणि अहिंसा धर्माचे पालन करून प्राप्त होणारे आहार भोजन हे भक्ष्य (खाण्यास योग्य) होय. ज्या पदार्थापासून स्वास्थ्य, रोगनाश, बुद्धिबळ-पराक्रमादिकांची वृद्धी, आयुर्वेदी होते अशा तांदूळ, गहू, फळे, कंदमुळे, दूध, तूप, मिष्ठाने वगैरे पदार्थाचे सेवन, योग्य प्रकारे स्वयंपाक करून योग्यवेळी मिताहार भोजन करणे उचित होय. या पदार्थाना भक्ष्य म्हटले जाते. याउलट जे पदार्थ प्रकृतीमध्ये विकार निर्माण करतात आणि जे जे पदार्थ वैद्यकशास्त्राने वर्ज्य ठरविले आहेत त्यांचा पूर्णपणे त्याग करावा आणि जे जे ज्याला हे पदार्थ ज्याच्यासाठी विहित (नेमून दिलेले) असतील त्यांचे ग्रहण करणे हेही भक्ष्य होय.

(प्रश्न) एका पात्रात सहभोजनात काही दोष आहे किंवा नाही? (उत्तर) होय, दोष आहे ! कारण एका बरोबर दुसऱ्या माणसांचे स्वभाव व प्रकृती यांचा मेळ नसतो. कुष्ठ वगैरे रोग झालेल्या माणसाबरोबर एका पानात जेवण केल्यास निरोगी माणसाचेही रक्त दूषित होते. याचप्रमाणे इतरांचे उष्टे खाण्याने काही नुकसानच होते. त्यात लाभ नसतो. म्हणून

उच्छिष्टान्न भक्षण निषेध

नोच्छिष्टं कस्य चिद्दद्यान्नाद्यादेतत्तथान्तरा । न चैवात्यशनं कुर्यान्न चोच्छिष्टः क्व चिद्व्रजेत् ।।मनु०।। अ०२ ।। श्लो० ५६।। आपला उष्टा पदार्थ कोणाला देऊ नये; अथवा कोणाच्या ताटात जेवण करू नये. वाजवीपेक्षा जास्त खाऊ नये आणि जेवल्यानंतर हात व तोंड धुतल्याशिवाय इकडेतिकडे जाऊ नये. (प्रश्न) ‘गुरोरुच्छिष्टभोजनम्’ या वाक्याचा काय अर्थ होईल? (उत्तर) याचा अर्थ असा की गुरूने भोजन केल्यानंतर जे अन्न वेगळे व शुद्ध स्थितीत शिल्लक असेलते भक्षण करावे. म्हणजे असे की आधी गुरूला जेवू घालावे मागावून शिष्याने भोजन केले पाहिजे. (प्रश्न) सारे उच्छिष्ट निषिद्ध असेल तर मधमाशांचा उटे मध व वासराने उठे केलेले दूध आणि आपण एक घास खाल्ल्यानंतर इतर अन्न आपलेच उष्टे होते मग त्याचेही सेवन करावयास नको. (उत्तर) मध हा नाममात्रच उष्टा असतो परंतु ते तर अनेक औषधींचे सार ग्राह्य असते. वासरे आपल्या मातेच्या स्तनातून बाहेर येणारे दूध पितात ती स्तनांच्या आतील दूध पिऊ शकत नाहीत. म्हणून ते दूध उष्टे होत नाही. मात्र वासराचे दूध पिऊन झाल्यावर पाण्याने स्तने स्वच्छ धुवून धार काढावी तसेच आपले उच्छिष्ट आपल्याला अपायकारक होत नाही. ही गोष्ट सिद्ध आहे की स्वाभाविकपणे कोणी कोणाचे उष्टे खाऊ नये. जसे आपले स्वत:चे तोंडनाक, कानडोळे, जननेंद्रिये व गुदद्वारातील मलमूत्राला स्पर्श करण्यात आपल्याला किळस वाटत नाही. परंतु दुसऱ्याच्या मलमूत्राला स्पर्श करणे किळसवाणे वाटते, यावरून हेच सिद्ध होते की असे करणे सृष्टिक्रमाच्या विरुद्ध नाही. म्हणून माणसांना योग्य आहे की कुणाचे उच्छिष्ट म्हणजे उष्टे खाऊ नये. (प्रश्न)पतिपत्नींनीही एकमेकांचे उष्टे खाऊ नये काय ? (उत्तर) मुळीच खाऊ नये. कारण त्यांच्या शरीराचे स्वभावही भिन्न भिन्न आहेत. (प्रश्न) अहो महाराज ! कोणत्याही माणसाने तयार केलेले अन्न खाण्यात काय दोष आहे ? कारण ब्राह्मणापासून चांडाळांपर्यंत माणसांची शरीरे हाडमांस व चामडे यांनी बनलेली आहेत आणि जसे रक्त ब्राह्मणाच्या शरीरात आहे तसेच ते चांडाळाचे आहे. तर मग सर्व माणसाच्या हातचे अन्न खाण्यात काय दोष आहे? (उत्तर) दोष आ. हेकारण उत्तम, सात्विक पदार्थ खाण्यापिण्याने ब्राह्मण व ब्राह्मणी यांच्या शरीरात दुर्गंधादी दोषांपासून रहित रज व वीर्य उत्पन्न होते. तसे ते चांडाळ चांडाळणीच्या शरीरात उत्पन्न होत नाही. कारण चांडाळाचे शरीर दुर्गंधाच्या परमाणु दुर्गंधाने भरलेले असते. तसे ब्राह्मणादी वर्गाचे नसते म्हणून ब्राह्मणादी व्यक्तींच्या हातचे अन्न खावे आणि चांडाळादी नीच भंगी, चांभार इत्यादिंच्या हातचे खाऊ नये. आई, सासु बहीण, मुलगी, सून यांचे शरीर जसे हाडामांसाचे व चामड्याचे असते तसेच आपल्या पत्नीचेही असते. म्हणून काय आयबहिणींशी पत्नीप्रमाणे वर्तन करावयाचे असते ? असा प्रश्न कोणी विचारला तर तुम्हाला संकोचाने गप्पच बसावे लागेल. उत्तम अन्न जसे हाताने व तोंडाने खाल्ले जाते तशी घाणही खाल्ली जाऊ शकते. म्हणून काय तुम्ही विष्ठा खाल? काय असेही कोठे होऊ शकते? (प्रश्न) गायीच्या शेणाने तुम्ही स्वयंपाकघर सारवता. मग स्वत:च्या विष्ठेने का सारवीत नाही ? आणि गाईच्या शेणाने सारविलेल्या स्वयंपाकघरात जाण्याने ते अपवित्र का होत नाही? (उत्तर) माणसाच्या विष्ठेची जशी घाण येते तशी गायीच्या शेणाला असत नाही. ते चिकट असल्याने जमीन लवकर उकरत नाही. कपडा मळत नाही अथवा खराब होत नाही. जशी मातीने धूळ बसते तशी वाळलेल्या शेणाने होत नाही. शिवाय माती व शेण यांनी सारवलेली जागा दिसायला खूप सुंद असते. शिवाय जेथे स्वयंपाक केला जातो आणि जेवणखाण केले जाते तेथे दूध, तूप, मिष्टान्न, उष्टे-खरकटे सांडले. त्यामुळे माशा, किडे वगैरे गलिच्छ ठिकाणी राहणारे जीवजंतू तेथे येतात. म्हणून ती जागा रोजच्या रोज झाडून साखून शुद्ध ठेवली नाही तर तिला शेतखान्यासारखी (उकिरड्याची) अवकळा येत जाते. म्हणून दररोज शेणमातीने झाडून-सारखून सर्व प्रकारे स्वच्छ ठेवावे. खाली फरशी किंवा पक्के घर असले तर ती पाण्याने धुवून निर्मळ ठेवली पाहिजे. म्हणजे वर सांगितलेल्या दोषाची निवृत्त होऊन जाते. मुसलमानांच्या स्वयंपाकघरात कोठे कोळसा, कोठे राख, कोठे लाकडे, कोठे फुटकी भांडी, कोठे उष्ट्या थाळ्या, तर कोठे हाडे पडलेली असतात आणि माशा तर काय सांगावे ! ती जागा इतकी घाणेरड असते की एखादा चांगला माणूस तेथे जाऊन बसला तर त्याला उलटी होण्याची संभावना आहे आणि त्या दुर्गधी जागे सारखीच ती जागा दिसते. जर शेणाने स्वयंपाकघर सारवणे दोषपूर्ण आहे असे तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही चुलीत गोवऱ्या का जाळता? शेणकुटाचा निखार गुडगुडीवर ठेवून तुम्ही धूम्रपान का करता? घराच्या भिंती शेणाने कासारवता? या साऱ्या गोष्टींमुळे मुसलमानांचे स्वयंपाकघर भ्रष्ट होत असणार यात काय शंका ! (प्रश्न) स्वयंपाकघरात बसून जेवण करावे की बाहेर बसून? (उत्तर) जी जागा स्वच्छव रमणीय सुंद असेल तेथे बसून जेवावे. परंतु आवश्यक युद्धासारख्या आपत्काळी घोड्यावर किंवा इतर वाहनात बसून अथवा उभ्या उभ्या खाले पिणे अत्यंत उचित आहे. (प्रश्न) काय आपल्या हातचे अन्न खावे आणि इतरांच्या हातचे खाऊ नये? (उत्तर) जे आर्य लोकांच्या शुद्ध रीतीने तयार केलेले अन्न आहे ते सर्व आर्यांबरोबर खाण्यास काहीच हरकत नाही. कारण ब्राह्मणादी तीन वर्णाचे स्त्रीपुरुषस्वयंपाकपाणी करण्यात, सारवण करण्यात आणि भांडी घासण्यात अडकून पडले तर विद्यादी शुभगुणांची वृद्धि कधीचा होणार नाही.

    पाहा! युधिष्ठिर महाराजांच्या राजसूय यज्ञासाठी साऱ्या जगातून राजे, महाराजे, ऋषी, महर्षी आले होते. ते सगळे एकाच पाकशाळेचे अन्न खात होते. जेव्हापासून ख्रिस्ती मुसलमानादिचे मतमतांतर सुरू झाले आपसात वैर सुरू झाले, त्यांनी मद्यपान आणि गोमांसभक्षण करणे ग्राह्य केले तेव्हापासून खाण्यापिण्यातील शिवाशीव सुरू झाली.
    पाहा! काबुल, कंधार, इराण, अमेरिका, युरोप वगैरे देशांच्या राजांच्या कन्या गांधारी, माद्री, उलूपी यांचेशी आर्यावर्त्तातील राजे विवाहादी व्यवहार करीत होते. शकुनी वगैरे कौरव-पांडवांबरोबर खाणे-पिणे करीत होते. त्यात काहीही विरोध करीत नव्हते कारण त्यावेळी सर्व भूमंडळाबर एकच वैदिक मत होते. त्यावरच सर्वांची निष्ठा होती आणि सगळे लोक एकमेकांचे सुखदुःखात व हानीलाभात सहभागी जसे आपलेच आहे असे समजत होते म्हणून सर्व जगात सुख होते. आता अनेक मते झाल्यामुळे पुष्कळशे दुःख व विरोध वाढला आहे. त्यांचे निवारण करणे हे बुद्धिमंतांचे काम आहे
    परमेश्वराने सर्वांच्या अंतःकरणात सत्य मताचे असे बीजारोपण करावे की ज्यायोगे मिथ्या मतमतांतरे लवकरच नाहीशी व्हावीत. याबाबतीत सर्व विद्वान मंडळींनी विचारविनिमय करून विरोधभाव सोडून अविरुद्ध मताचा स्वीकार करून सर्व मानव मिळून सर्वांचा आनंद वाढवावा.
    अशाप्रकारे आचार-अनाचार वभक्ष्याभक्ष्य यांचे थोडक्यात विवरण लिहिले आहे.
    या ग्रंथाचा पूर्वार्ध हा या दहाव्या समुल्लासाबरोबर पूर्ण झाला. या समुल्लासांमध्ये आम्ही विशेष खंडन मंडन यासाठी केलेले नाही की जोपर्यंत माणसांमध्ये सत्यासत्याचा विचार करण्याचे थोडेसेही सामर्थ्य निर्माण होत नाही तोपर्यंत स्थूल व सूक्ष्म खंडाचा अर्थ ते समजू शकत नाही. म्हणून आधी प्रथम सर्वांना सत्य (धर्माचा) शिकवणीचा उपदेश करून, आता उत्तरार्धातील चार समुल्लासांमध्ये विशेष खंडन-मंडन आम्ही करणार आहोत. यांपैकी अकराव्या समुल्लासात आर्यावत्ततील मतमतांतरांचे, बाराव्या समुल्लासात चार्वाक, बौद्ध व जैन यांच्या उपदेशांचे, तेराव्या समुल्लासात ख्रिस्ती पंथाचे व चौदाव्या समुल्लासात इस्लामचे खंडन मंडन करणार शेवटी आम्ही आमचे मन्तव्यही दिले जाईल. ज्या कोणाला विशेष आम्ही आहोत. ग्रंथाच्या खंडन-मंडन जाणून घ्यावयाचे असेल त्यांनी हे चार समुल्लास पाहावेत. तरीपण सामान्यत: कोठे कोठे या दहा समुल्लासांमध्येही थोडेफार खंडन-मंडन केले आहे.
        जो कोणी नि:पक्षपातीपणे व न्यायदृष्टीने चौदा समुल्लासांचे परिशीलन करील त्याच्या आत्म्यामध्ये सत्य अर्थाचा प्रकाश पडून त्याला आनंद होईल. जो कोणी हठवादाने, दुराग्रहाने आणि इर्षेने पाहील व ऐकेल त्याला या ग्रंथाचा यथार्थ अभिप्राय समजणे फार कठिण आहे. म्हणून जो कोणी या ग्रंथातील विवेचनाचा यथायोग्य विचार करणार नाही त्याला या ग्रंथाचा खरा अभिप्राय न कळल्याने तो बुचकळ्या खात राहीलं. सत्यासत्याचा निर्णय करून सत्याचे ग्रहण व असत्याचा त्याग करून परम आनंदित होणे हेच तर विद्वानांचे काम आहे तेच खरे गुणग्राहक लोक विद्वान बनून धर्म, अर्थ, काम व मोक्षरूपी फळे प्राप्त करून आनंदात राहतात.

इति श्रीमदयानन्दसरस्वतीस्वामिकृते सत्यार्थप्रकाशे सुभषाविभूषित आचाराऽनाचारभक्ष्याभक्ष्यविषये दशमः समुल्लासः सम्पूर्णः ॥१०॥ समाप्तोऽयं पूर्वार्धः