सत्यार्थ प्रकाश/१०. नववा समुल्लास

विकिस्रोत कडून

नववा समुल्लास विद्या व अविद्या विवेचन

विद्यां चाविद्यां च यस्तद्वेदोभयँ्सह । अविद्यया मृत्युं तीर्त्वा विद्ययामृतमश्नुते ।। -यजुः० अ० ४० ।। मं० १४।।

       जो मनुष्य विद्या व अविद्या यांच्या स्वरूपांना एकाच वेळी जाणतो तो अविद्येच्या म्हणजे कर्मोपासनेच्या योगाने मृत्यूला जिंकून विधेने म्हणजे यथार्थ ज्ञानाने मोक्षाला प्राप्त होतो.

अविद्येचे लक्षण

अनित्याशुचिदुःखानात्मसु नित्यशुचिसुखात्मख्यातिरविद्या।। पातं० ।। सा०पा० ।। सु० ५ ।।

    हे योगसूत्रातील वचन आहे. हे जग व देहादी भौतिक पदार्थ अनित्य असताही ते नित्य आहेत असे वाटणे,

जे कार्यरूप जण दिसते व ऐकू येते, ते पूर्वीपासून सदैव असेच राहिले आहे व पुढेही राहणार आहे, योगबळाच्या योगाने देवांचे हेच शरीर सदैव राहते, अशी विपरीत बुद्धी होणे हा अविद्येचा प्रथम भाग आहे.

     अशुचि म्हणजे मलयुक्त पदार्थानाः आणि कामवासना, मिथ्याभाषण, चोरी इत्यादी अपवित्रात पवित्र बुद्धि ठेवणे हा दुसरा भाग आहे. अत्यंत विषयसेवनरूपी दुःखामध्ये सुख बुद्धि हा तिसरा भाग आहे. अनात्म पदार्थामध्ये आत्मबुद्धी करणे हा अविद्येचा चौथा भाग आहे. या चार प्रकारच्या विपरीत ज्ञानाला अविद्या असे म्हणतात. याहन जी विपरीत म्हणजे अनित्याला अनित्य, नित्याला नित्य, अपवित्राला अपवित्र, पवित्राला पवित्र, दु:खाला दु:ख, सुखाला सुख, अनात्म्याला अनात्मा आणि आत्म्याला आत्मा आयोजन होणे हीच विद्या होय. अर्थात
    ‘वेत्ति यथावत्तत्त्वं पदार्थस्वरूपं यया सा विद्या। यया तत्त्वस्वरूपं न जानाति भ्रमादन्यस्मिन्नन्यन्नि– श्चिनोति साऽविद्या ।’
    जिच्या योगाने पदार्थाच्या यथार्थ स्वरूपाचा बोध होतो ती विद्या आणि जिच्या योगाने तत्त्वस्वरूप जाणले जात नाही, एकात दुसऱ्याची बुद्धि होते, तिला अविद्या असे म्हणतात. तसेच कर्म व उपासना यांना अविद्या यासाठी म्हणतात. ती बाह्य व आंतरिक क्रियाविशेषणाचे गाव आहे, ज्ञानविशेषाचे नाही. म्हणूनच वरील मंत्रात सांगितले आहे की शुद्ध कर्म व परमेश्वराची उपासना यांखेरीज मृत्यू व दु:ख यातून कुणीही पार होऊ शकत नाही. अर्थात पवित्र कर्म, पवित्र उपासना आणि पवित्र ज्ञानानेच मुक्ती मिळते; आणि अपवित्र कर्म,

मिथ्याभाषण आदी पाषाणमूर्ती आदींची उपासना आणि मिथ्याज्ञान यांच्यामुळे बंधन होते.

    कोणीही माणूस एक क्षणदेखील कर्म, उपासना व ज्ञान यांनी रहित होत नाही. म्हणून धर्मयुक्त सत्यभाषणादी कर्मे करणे आणि मिथ्या भाषणादी अधर्माचा त्याग करणे. हेच मुक्तीचे साधन आहे.

बंधमोक्षाची नित्यनैमित्तिकता

(प्रश्न) मुक्ती कोणाला प्राप्त होत नाही? (उत्तर) जो बद्ध आहे त्याला मुक्ती मिळत नाही. (प्रश्न) बद्धकोण आहे ? (उत्तर) जो अधर्म व अज्ञान यात अडकलेला जीव आहे (प्रश्न) बंध व मोक्ष हे स्वाभाविक आहेत की नैमित्तिक? (उत्तर) नैमित्तिकापासून कारण ते स्वाभाविक असते तर बंध आणि मुक्तीची निवृत्ती कधी झालीच नसतो.

(प्रश्न) न निरोधो न चोत्पत्तिर्न बद्धो न च साधकः। न मुमुक्षुर्न वै मुक्तिरित्येषा परमार्थता ।। गौडपादीय कारिका प्र० २।। कां० ३२।।

    ही मांडूक्य उपनिषदावरील कारिका आहेजीव व ब्रह्म असल्यामुळे वस्तुतः जीवाचा विरोध म्हणजे तो कधी अज्ञानाच्या आवरणात येत नाही, जन्म घेत नाही, बंधामध्ये पडत नाही, तो साधक नाही व काही साधनाही करीत नाही. तो कधी मुक्त होण्याची इच्छा करीत नाही आणि त्याची कधी मुक्ती होत नाही कारण परमार्थाने तो (तत्वतः) बंधच झाला नाही तर मुक्ती कसली?

(उत्तर) आधुनिक वेदांती लोकांचे हे म्हणणे खरे नाही. कारण जीवाचे स्वरूप अल्प असल्याने तो आवरणात येतो. तो शरीरासहित प्रकट रूपाने जन्म घेतो. पापरूप कर्माची फळे भोगण्यासाठी भोगरूप बंधात अडकतो, त्या बंधातून सुटण्याचे उपाय करतो. दु:खातून सुटण्याची इच्छा बाळगतो; आणि दु:खातून मुक्त होऊन परमानंद परमेश्वराची प्राप्त करून घेऊन मुक्तीचाही उपभोग घेतो. (प्रश्न) हे सारे धर्म देहाचे व अंता करणाचे आहेत, जीवाचे नव्हेत. कारण जीव तर पापपुण्यरहित साक्षीमात्र आहे. शीत, उष्ण आदी शरीरादिकांचे धर्म आहेत. आत्मा हा निर्लेप आहे. (उत्तर) देह आणि अंत:करण हे जड (अचेतन) आहेतत्यांना शीतोष्णाची प्राप्त व भोग असत नाहीत ज्याप्रमाणे दगडाला शीत व उष्णता यांची जाणीव अथवा भोग नसतो जे मनुष्यादी चेतन प्राणी त्याला स्पर्श करतात त्यांनाच शीतोष्णांची जाणीव होते व ते त्याचा उपभोग घेतात. त्याचप्रमाणे प्राणही जड (अचेतन) आहेत. त्यांना भूक व तहान लागत नाही. परंतु ते प्राण असणाऱ्या जीवाला तहान-भूक लागते. याचप्रमाणे मनी जड (अचेतन) आहे. त्याला नहर्ष-नाशोक होत नाही. पण मनाद्वारे जीव हा हर्ष-शोक, सुख-दुख यांचा उपभोग घेतो. ज्याप्रमाणे बहिष्करण (बाह्) श्रोत्रादी इंद्रियांद्वारे बऱ्यावाईट शब्दादी विषयांचे ग्रहण करून जीव सुख किंवा दुःखी होतो, त्याचप्रमाणे अंत:करणाच्या म्हणजे मन, बुटी, चित्त व अहंकार यांमुळे संकल्प, विकल्पनिश्चय, स्मरण व अभिमान करणारा जीव शिक्षेस व मोठेपणास पात्र ठरतो.

    ज्याप्रमाणे तलवारीने मारणारा दंडनीय होतो शिक्षेस पात्र असतो पण तलवार शिक्षेला पात्र नसते त्याचप्रमाणे देहेंद्रिये, अंत:करण व प्राण या साधनांनी बरी-वाईट कृत्ये करणारा जीव सुख-दु:खाचा भोक्ता असतो. जीव हा कमांचा साक्षीदार नसून कर्ता व भोक्ता आहे. कर्माचा साक्षीदार तर एक, अद्वितीय परमात्मा

आहे. जो कर्म करणारा जीव आहे. तोच कर्मामध्ये लिप्त होतो. तो (ईश्वरी नव्हे अथवा) ईश्वरसाक्षीही नाही. (प्रश्न) जीव हे ब्रह्माचे प्रतिबिंब आहे. ज्याप्रमाणे आरसा फुटल्याने बिंबाची काही हानी होत नाही, त्याचप्रमाणे जोपर्यंत अंत:करणामध्ये ब्रह्याचे प्रतिबिंब असणारा जीव तोपर्यंत आहे की जोपर्यंत तो अंत:करणाची उपाधी असतो जेव्हा अत:करण नाश पावते तेव्हा जीव मुक्त होतो. (उत्तर) हे बोलणे पोरकटपणाचे आहे. कारण प्रतिबिंब हे साकाराचे साकारात होते जसे मुख व दर्पण हे आकारयुक्त आहेत आणि पृथकही आहेत. जर पृथक नसतील तर त्याचे प्रतिबिंब पडू शकत नाही. ब्रह्म हे निराकार व सर्व व्यापक असल्यामुळे त्याचे प्रतिबिंबसुद्धा होऊ शकत नाही. (प्रश्न) पाहा ! खोल, स्थिर व स्वच्छ पाण्यामध्ये निराकार व व्यापक आकाशाचे (प्रतिबिंब) आभास होतो. त्याचप्रमाणे निर्मळ अंत:करणात। परमेश्वराचा आभास असतो म्हणजे प्रतिबिंब पडते. त्याला चिदाभास म्हणतात (उत्तर) ही सारी बालबुद्धीची निरर्थक बडबड आहेकारण आकाशहेदृश्य नाही तर त्याला डोळ्यांनी कोणीही का म्हणून पाहू शकतो? (प्रश्न) हे जे वर निळे व अंधुक असे दिसते ते आकाश निळे दिसते की नाही? (उत्तर) नाही. (प्रश्न) तर मग ते काय आहे? (उत्तर) पृथ्वी, जल व अमी यांचे वेगवेगळे त्रसरेणू दिसतात. त्याच्यामध्ये जो निळेपणा दिसतो तो जास्त पाणी जे पावसाच्या रूपाने पडते त्यामुळे ते निळे आहे आणि जो धुरकटपणा दिसतो, ती पृथ्वीवरून उडालेली धूळ वातावरणात फिरत असल्याची दिसते. तिचेच प्रतिबिंब पाण्यात किंवा आरशात पडलेले दिसते. ते आकाशाचे प्रतिबिंब कधीही नसते. (प्रश्न) जसे आकाशाचे घटाकाश, मठाकाश, मेघाकाश, व महदाकाश असे भेद व्यवहारात होतात तसेच ब्रह्माचेही ब्रह्मांड व अंत:करण या दोन उपाघ्र भेदाने ईश्वर व जीव नावे आहेत. जेव्हा घटादी पदार्थ नष्ट होतात तेव्हा महदाकाशच म्हटले जाते. (उत्तर) ही गोष्ट अडाणी लोकांची आहेकारण आकाश कधी छिन्न-भिन्न होत नाही. व्यवहारामध्ये घट (मठ) आणा इत्यादी व्यवहार होतातमठातील आकाश (घटाकाश) आणा' असे कोणी म्हणत नाही. म्हणून तुमची ही गोष्ट बरोबर नाही. (प्रश्न) ज्याप्रमाणे समुद्रात मासे व इतर कीटक फिरतात आणि आकाशात पक्षी वगैरे उडतात, त्याचप्रमाणे चिदाकाश ब्रह्मामध्ये सारी अंतःकरणे फिरत असतातती स्वतः जड(अचेतन) आहेत; परंतु सर्वव्यापक परमेश्वराच्या सत्तेने जसे अमीच्या सान्निध्याने लोखंड गरम होते तसे अंतकरणे चैतन्ययुक्त होत असतात. ते जसे चालते आणि आकाश तसेच ब्रह्म हे स्थिर आहेत, त्याप्रमाणे जीवाला ब्रह्म मानण्यात काही दोष येत नाही.

(उत्तर) तुमचा हा दृष्टांतही सत्य नाही. कारण जर सर्वव्यापक ब्रह्म अंत:करणामध्ये प्रकाशमान होउन जीव बनते तर त्याच्यामध्ये सर्वज्ञत्व आदी गुण येतात की नाही? आवरण असल्यामुळे त्यात सर्वज्ञता वगैरे गुण येत नाहीत असे तुम्ही म्हणत असाल तर मग असे सांगा की ब्रह्म आवृत्त व खंडित आहे की अखंडित ? ब्रह्म हे अखंडित आहे असे तुमचे म्हणणे असेल तर त्याच्यामध्ये कोणीही पडदा टाकू शकत नाही. जर पडला नाही तर सर्वज्ञता का नाही? ते आपल्या स्वरूपाला विसरून अंत:करणासह घालणाऱ्या सारखा आहे. परंतु स्वरूपतः ते काय हालचाल करीत नाही. जेव्हा स्वत: चालत नाही तर अंत:करण जितके जितके आपले पूर्वीचे प्राप्त स्थान सोडते आणि पुढेपुढे सरकत जाईल तेथे त्या त्या ठिकाणचे ब्रह्म प्रांत, अज्ञानी होईल आणि जितके जितके अंत:करण सुटत जाईल तेथील ब्रह्म ज्ञानी, पवित्र व मुक्त होत जाईल असे म्हणावे लागेल. कारण सृष्टि निर्मितीच्या ज्याला अंत:करण बिघडवीत जाईल आणि बंध व मुक्ति देखील क्षणोक्षणी होत राहील. तुम्ही म्हणता तसे जर झाले तर कोणत्याही जीवाला पूर्वी पाहिलेल्या व ऐकलेल्या गोष्टीचे स्मरण राहिले नसते. कारण ज्या ब्रह्माने (अंत:करणासही) पाहिले व ऐकले ते राहिले नाही म्हणून बह्म जीव व जीव ब्रह्म हे एक कधीच होत नाहीत.ते नेहमीच वेगवेगळे असतात. (प्रश्न) हा सारा केवळ अध्यारोप आहे म्हणजे एका वस्तूवर दुसया वस्तूचा आरोप याला अध्यारोप असे म्हणतात. येथे ब्रह्म या वस्तूमध्ये सार्या जगाचा व त्याच्या व्यवहाराचा अध्यारोप करून जिज्ञासूला बोध करविला जातो वस्तुतः सर्वं ब्रह्मच आहे. (प्रश्न) अध्यारोप करणारा कोण आहे ? (उत्तर) जीव. (प्रश्न) जीव कोणाला म्हणतात? (उत्तर) अंत:करणावच्छिन्न चेतनाला जीव असे म्हणतात. (प्रश्न) अंत:करणावच्छिन्न चेतन हे दुसरे आहे की तेच ब्रह्म आहे? (उत्तर) तेच ब्रह्म आहे (प्रश्न) मग ब्रह्मानेच आपल्यामध्ये जगाची खोटी कल्पना केली काय? (उत्तर) होय. त्यामुळे ब्रह्माची काय हानी होणार? (प्रश्न) जो मिथ्या कल्पना करतो तो खोटा होत नाही काय? (उत्तर) नाही. कारण जे मन व वाणी यांनी कल्पित अथवा कथित असते ते सारे खोटे असते. (प्रश्न) तर मग मनाने व वाणीने खोट्या कल्पना करणारे व खोट बोलणारे ब्रह्म कल्पित व मिथ्यावादी झाले की नाही? (उत्तर) होय. हा आरोप आम्हाला इष्टापत्ती आहे, वाहरे! मिथ्या वेदांतवादी लोकानो! तुम्ही सत्यस्वरूप, सत्यसंकल्प, सत्यकाम परमेश्वराला मिथ्याचारी करून टाकले काय हेच तुमच्या दुर्दशेचे कारण नाही आहे? कोणत्या उपनिषदात, सूत्रात अथवा वेदात लिहिले आहे की परमेश्वर हा मिथ्यासंकल्प व मिथ्यावादी आहे? चोराच्या उलट्या बोंबा किंवा चोर तो चोरवर शिरजोर या लोकोपचारासारखी तुमची गत दिसते. कोतवालाने चोराला शिक्षा करणे हे योग्य आहे. पण चोरानेच कोतवालाला शिक्षा करणे ही उलटीच गोष्ट झाली. त्याचप्रमाणे तुम्ही स्वतः मिथ्यासंकल्पी व मिथ्यावादी होऊन आपला तो दोषे निष्कारण ब्रह्माला लावीत आहात.

     ब्रह्म जर मिथ्याज्ञानी, मिथ्यावादी, मिथ्याकारी असते तर सर्व अनंत ब्रह्म तसेच झाले असते. परंतु ब्रह्मा तर एकरस, सत्यस्वरूप, सत्यमानी, सत्यवादी व सत्यकारी आहे हे सर्व दोष तुमचे आहेत ते ब्रह्माचे नाहीत.
    जिला तुम्ही विद्या म्हणता ती तर अविद्या आहेआणि तुमचा अध्यारोपही खोटा आहे. कारण आपण ब्रह्म नसताना स्वत:ला ब्रह्म व ब्रह्माला जीव समजणे हे मिथ्याज्ञान (अज्ञान) नाही तर काय आहे? जो सर्वज्ञ व

सर्वव्यापक आहे तो परिच्छिन्न अज्ञानात व बंधनात कधी पडत नाही. कारण अज्ञानपरिच्छिन्न, एकदेशी, अल्प व अल्पज्ञ जीवास होत असतो. सर्वज्ञ, सर्वव्यापी ब्रह्मामध्ये ते माहीत.

मुक्ती व बंध यांचे वर्णन

(प्रश्न) मुक्ती कशाला म्हणतात? (उत्तर) ‘मुञ्चन्ति पृथग्भवन्ति जना यस्यां सा मुक्तिः जिच्यामुळे सुटका होते तिला मुक्ती असे म्हणतात. (प्रश्न) कशापासून, कोणापासून सुटणे? (उत्तर) ज्याच्यापासून सुटावे अशी इच्छा सर्व जीव करतात. (प्रश्न) कशापासून सुटण्याची इच्छा जीव करतात? (उत्तर) दुःखापासून सुटावे अशी इच्छा सर्व जीव ठेवतात (प्रश्न) कशापासून सुरू इच्छितात? (उत्तर) दुःखपासून. (प्रश्न) दुःखापासून सुटून जीव कशाला प्राप्त करतात व ते कोठे राहतात ? (उत्तर) ते सुख प्राप्त करतात व ब्रह्मात राहतात. (प्रश्न) मुक्ती व बंध कोणकोणत्या गोष्टीपासून होतात? (उत्तर) परमेश्वराच्या आज्ञेचे पालन न करणे, अधर्म, अविद्या, कुसंग,कुसंस्कार, वाईट व्यसने यांच्यापासून दूर राहणे आणि सत्य भाषण, परोपकारविद्या, पक्षपातरहित न्यायव धर्म यांची वृद्धी करणे,पूर्वोक्त प्रकाराने परमेश्वराची स्तुती, प्रार्थना व उपासना म्हणजे योगाभ्यास करणे; विद्या शिकणे व शिकवणे, धर्माने पुरुषार्थ करून ज्ञानाची उन्नती करणे; सर्वात उत्तम साधनांचा वापर करणे; आणि जे काही करावयाचे ते सर्व पक्षपातरहित न्यायधर्मानुसारच करणे इत्यादी साधनांनी मुक्ती मिळते आणि याहून विपरीत ईश्वराची आज्ञा भंग करणे वगैरे कामान बंध होतो. (प्रश्न) मुक्तीमध्ये जीवाचा लय होतो की तो विद्यमान राहतो? (उत्तर) तो विद्यमान राहतो. (प्रश्न) तो कोठे राहतो? (उत्तर) तो ब्रह्मामध्ये राहतो. (प्रश्न) ब्रह्म कोठे आहे? तो मुक्त जीव एके ठिकाणी राहतो की स्वेच्छेने सर्वत्र संचार करतो? (उत्तर) जे ब्रह्मा सर्वत्र पूर्ण आहे त्याच्यातच मुक्त जीव अव्याहतगती म्हणजे त्याला कसलाही अडथळा नाही, विज्ञान आनंदपूर्वक स्वतंत्रपणे संचार करतो. (प्रश्न) मुक्त जीवाला स्थूल शरीर असते की नाही? (उत्तर) नाही. (प्रश्न) मग तो सुखाचा व आनंदाचा उपभोग कसा घेतो? (उत्तर) त्याचे सत्य संकल्पादी स्वाभाविक गुणव सामथ्र्य ही सर्व टिकून राहतात. मात्र त्याचा भौतिक (शरीराशी) संबंध राहत नाही. जसे,

शृण्वन् श्रोत्रं भवति, स्पर्शयन् त्वग्भवति, पश्यन् चक्षुर्भवति, रसयन् रसना भवति, जिघ्रन् घ्राणं भवति, मन्वानो मनो भवति, बोधयन् बुद्धिर्भवति, चेतयंश्चित्तम्भवत्यहङ् कुर्वाणोऽहंक्यनरो भवति।। -शतपथ कां० १४।।

    मोक्षामध्ये भौतिक शरीर अथवा इंद्रियांचे गोलक जीवात्म्या बरोबर राहात नाहीत. परंतु त्याचे स्वाभाविक शुद्ध गुण राहतात. जेव्हा तो ऐकण्याची इच्छा करतो तेव्हा कान, स्पर्श करू इच्छितो तेव्हा त्वचा, पाहण्याची इच्छा बाळगतो तेव्हा डोळे, स्वादासाठी जीभ, वास घेण्यासाठी नाक, संकल्प-विकल्प करण्याच्या वेळी मन, निश्चय करण्यासाठी बुद्धी, स्मरण करण्यासाठी चित्तव अहंकारासाठी अहंकाररूप स्वशक्ती योगाने जीवात्मा मुक्तावस्थेत जातो आणि मुक्तीमध्ये त्याचे संकल्पमात्रशरीर असते. ज्याप्रमाणे शरीराच्या आधाराने इंद्रियांच्या गोलकांद्वारे जीव आपले कार्य करतो, त्याप्रमाणे (हे शरीर नसताना) मुक्तीमध्ये आपल्या शक्तीने तो सर्व आनंदाचा उपभोग घेतो.

(प्रश्न) त्याची शक्ती किती प्रकारची व केवढी आहे (उत्तर) मुख्य शक्ती एकाच प्रकारची आहे. परंतु बळ, पराक्रम, आकर्षण, प्रेरणा, गती, भीषण, विवेचन, क्रिया, उत्साहस्मरण, निश्चय, इच्छा, प्रेम, दोष, संयोग, विभागसंयोजक, विभाजक, श्रवण, दर्शन, स्पर्शन, स्वादन आणि गंधग्रहण व ज्ञान या चोवीस प्रकारच्या सामथ्यांनी युक्त असा जीव आहे. यांच्या योगानेच तो मुक्तीमध्येही आनंदाची प्राप्त व त्याचा उपभोग करतो.

    मुक्तीमध्ये जीवाचा विलय झाला तर मुक्तीचे सुख कोणी उपभोगीले असते ? जे लोक जीवाच्या नाशालाच मुक्ती समजतात ते महामूखी आहेत. कारण सर्व दुःखापासून मुक्त होऊन आनंदस्वरूप, सर्वव्यापक, अनंत परमेश्वरामध्ये जीवांचे आनंदात राहणे, हीच जीवाची मुक्ती होय वेदान्त शारीरिक सूत्रांमध्ये म्हटले आहे की,

अभावं बादरिराह ह्येवम् ।। वेदान्त द० अ० ४।। पा० ४।। सू० १०।।

बादरी हा व्यासाचा पिता होय. ते मुक्तीमध्ये जीवाचा त्याच्याबरोबर मनाचा भाव असतो असे तो मानतो. अर्थात जीव आणिर्मन (यांचा मुक्तीमध्ये) लय होतो असे पराशर मुनी मानत नाहीत तसेच,

भावं जैमिनिर्विकल्पामननात् ।। वेदान्त द० अ० ४।। पा० ४।। सू० ११।।

आचार्य जैमिनी मुक्त पुरुषाबरोबर मनासारखे सूक्ष्म शरीरइंद्रिय, प्राण वगैरेही विद्यमान असतात असे मानतात. त्यांचा अभाव मानीत नाहीत.

द्वादशाहवदुभयविधं बादरायणोऽतः ।। वेदान्त द० अ० ४।। पा० ४।। सू० १२।।

व्यासमुनी मुक्तीमध्ये पूर्वोक्त साधनांचा भाव व अभाव हे दोन्ही असतात असे मानतात. अर्थात शुद्ध सामर्थ्ययुक्त जीव मुक्तीमध्ये विद्यमान असतो; आणि अपवित्रता, पापाचरण, दुःख, अन्न आदीचा अभाव ते मानतात.

यदा पञ्चावतिष्ठन्ते ज्ञानानि मनसा सह। बुद्धिश्च न विचेष्टते तामाहुः परमां गतिम् ।। कठो० अ० २।। व० ६।। मं० १०।।

हे उपनिषदाचे वचन आहे जेव्हा शुद्ध मन युक्त पाचज्ञानेंद्रिये जवाबरोबर राहतात आणि बुद्धिचा निश्चय स्थिर असतो तेव्हा त्या स्थितीला परमगती म्हणजे मोक्ष असे म्हणतात.

य आत्मा अपहतपाप्मा विजरो विमृत्युर्विशोकोऽविजिघत्सोऽपिपासः सत्यकामः सत्यसंकल्पः सोऽन्वेष्टव्यः स विजिज्ञासितव्यः सर्वांश्च लोकानाप्नोति सर्वांश्च कामान् यस्तमात्मानमनुविद्य विजानातीति।। छान्दोग्य० प्रपा० ८।। खं० ७।। व०१।।

स वा एष एतेन दैवेन चक्षुषा मनसैतान् कामान् पश्यन् रमते। य एते ब्रह्मलोके तं वा एतं देवा आत्मानमुपासते तस्मात्तेषां सर्वे च लोका आत्ता सर्वे च कामाः स सर्वा श्च लोकानाप्नोति सर्वा श्च कामान्यस्तमा– त्मानमनुविद्य विजानातीति।। छान्दोग्य० प्रपा० ८।। खं० १२।। व०५,६।।

मघवन्मर्त्यं वा इदँ्शरीरमात्तं मृत्युना तदस्याऽमृतस्याऽशरीरस्यात्मनो– ऽधिष्ठानमात्तो वै सशरीरः प्रियाप्रियाभ्यां न वै सशरीरस्य सतः प्रियाप्रिययो– रपहतिस्त्यशरीरं वाव सन्तं न प्रियाप्रिये स्पृशतः।। छान्दोग्य० प्रपा० ८।। खं० १२।। व०१।।

    जो परमेश्वर अपहतपात्मा सर्व पापे, जरा, मृत्यू, शोक, सुधा व पिपासा यांनी रहित, सत्यकाम व सत्यसंकल्प आहे, त्याचा शोध; व त्यालाच जाणण्याची इच्छा बाळगावी परमेश्वराच्या संपर्कांमुळे जो मुक्त जीव सर्व लोकांना व सर्व कामांना प्राप्त होतो, जो परमेश्वराला जाणून घेऊन मोक्षाचे साधन व स्वतःला शुद्ध करणे जाणतो तो मुक्ती प्राप्त जीव शुद्ध दिव्य नेत्र आणि शुद्ध मन यांच्या योगाने कार्याला पाहतो व त्या प्राप्त करून त्यांमध्ये रममाण होतो.
    जे या ब्रह्मलोकामध्ये म्हणजे दर्शनीय परमेश्वरामध्ये स्थित होऊन मुक्त जीव मोक्ष मुखाचा उपभोग घेतात आणि सर्वांचा अंतर्यामी आत्मा असलेल्या याच परमेश्वराची उपासना मुक्तीची प्राप्ती करणारे विद्वान लोक करतात. यामुळे त्यांना सर्व लोक सर्व कामना प्राप्त होतात. म्हणजे (ते उपासक) जे-जे संकल्प करतात ते-ते पूर्ण होऊन त्यांना ते-ते लोक व ते-ते काम प्राप्त होतात आणि ते मुक्त जीव स्थूल शरीर सोडून संकल्पमय शरीराने आकाशामध्ये, परमेश्वरामध्ये संचार करतात कारण जे शरीर युक्त असतात ते ऐहिक दुःखरहित होऊ
     जसे प्रजापतीने इंद्राला सांगितले की, "हे परमपूज्य धनयुक्त पुरुषा । हे स्थूल शरीर मरणधर्मी आहे आणि सिंहाच्या जबड्यात बकरी सापडलेली असावी त्याप्रमाणे हे शरीर मृत्यूच्या जबडचात सापडलेले आहेते हे शरीर मरणाचे व शरीररहित जीवात्म्याचे निवासस्थान आहे
    म्हणूनच हा जीव सुख आणि दु:ख यांनी सदा ग्रस्त राहत असतो. कारण शरीरासहित जीवाची ऐहिक प्रसन्नतेच निवृत्त होतच असते; आणि जो शरीररहित मुक्त जीवात्मा ब्रह्मामध्ये राहतो त्याला ऐहिक सुखदुःखाचा स्पर्शही होत नाही तथापि तो सुदा आनंदातच राहतो.

मुक्तीतून पुनरावृत्ती

(प्रश्न) जीवाला मुक्ती मिळाल्यानंतर तो पुन: कधी जन्ममरणरूपी दुःखामध्ये येतो की नाही? कारण

न च पुनरावर्त्तते न च पुनरावर्त्तत्त इति।। छान्दोग्य० प्रपा० ८।। खं० १५।। अनावृत्तिः शब्दादनावृत्तिः शब्दात्।। वेदान्त द० अ० ४।। पा० ४।। सू० ३३।। यद् गत्वा न निवर्त्तन्ते तद्धाम परमं मम।। भगवद्गीता।। अ० १५।। श्लो० ६।।

    इत्यादी वचनांवरून लक्षात येते की मुक्ती तीच आहे जी संसार दुःखापासून निवृत्त होऊन जीवाला एक मुक्ती मिळाल्यानंतर ती सोडून तो पुनः या जगात कधी येत नाही.

(उत्तर) हे म्हणणे बरोबर नाही. कारण वेदामध्ये याचे खंडन केले आहे.

कस्य नूनं कतमस्यामृतानां मनामहे चारु देवस्य नाम । को नो मह्या अदितये पनु दार्त् पितरं च दृशेयं मातरं च ।।१।। – ऋ० मं० १ ।।सू० २४ ।। मं० १ ।।

(प्रश्न) कोणाचे नाव पवित्र आहे असे आम्ही समजावे ? कोण नाशरहित पदार्थामध्ये असणारा देव सदा प्रकाशस्वरूप आहे ? कोण आम्हाला मुक्तीच्या सुखाचा उपभोग करवून पुनः या जगात जन्माला घालतो आणि आईवडिलांचे दर्शन करवितो ?॥१॥

अग्नेर्वयं प्रथमस्यामृतानां मनामहे चारु देवस्य नाम । स नो मह्या अदितये पुनर्दात् पितरं च दृशेयं मातरं च ।।२।।– ऋ० मं० १ ।। सू० २४ ।। मं० २ ।।

(उत्तर) या स्वप्रकाशस्वरूप(ज्ञानस्वरूप) अनादी, सदामुक्त परमेश्वराचे गाव पवित्र आहे असे आम्ही जाणवे. जोआम्हाला मुक्तीमध्ये आनंदाचा उपभोग करवून पुनः पृथ्वीवर आईवडिलांच्या संबंधाने जन्म देउन त्यांचेदर्शन घडवितो तोच परमेश्वर मुक्तीची व्यवस्था करतो. तोच सर्वांचा स्वामी आहे॥२॥

इदानीमिव सर्वत्र नात्यन्तोच्छेदः।। -सांख्य ।।अ० १।।सू० १५९।।

ज्याप्रमाणे सध्या काही जीव बद्ध व काही मुक्त आहेत, तसेच ते सर्वदा राहतातबंध व मुक्ती यांचा पूर्णपणे विच्छेद कधी होत नाही. तरीपण बंध व मुक्तीही कायमची नसतात. ॥३॥

(प्रश्न) तदत्यन्तविमोक्षोऽपवर्गः। न्याय० अ० १।। आ० १।। सू० २२।। दुःखजन्मप्रवृत्तिदोषमिथ्याज्ञानानामुत्तरोत्तरापाये तदनन्तरापायादपवर्गः।।न्याय० अ० १।। आ० १।। सू० २।।

जो दुःखाचा अत्यंत म्हणजे पूर्ण विच्छेद होतो तीच मुक्ती म्हणवली जाते. कारण जेव्हा मिथ्याज्ञान अविद्या, लोभादीदोष, विषयवासनेसारख्या दुव्यसनांमध्ये प्रवृत्ती, जन्म व दु:ख ही उत्तरोत्तर नाहीशी होण्यापूर्वी पूर्वीच्या गोष्टीपासून निवृत्त झाल्यानेच मोक्ष प्राप्त होतो व तो सदैव राहत असतो. (उत्तर) अत्यंत या शब्दाचा अर्थ अत्यंताभाव असा घेण्याची गरज नाही. जसे, ‘अत्यन्तं दुःखमत्यन्तं सुखं चास्य वर्तते’ या वाक्यात या माणसाला फार दुःख व फार सुख आहे असा अर्थ आहे. यावरून असे दिसून येते की त्याला पुष्कळ सुख किंवा दु:ख आहे. त्याचप्रमाणे येथेही अत्यंत शब्दाचा अर्थ समजला पाहिजे. (प्रश्न) मुक्तीतून जीव परत येत असेल तर तो मुक्तावस्थेत किती काळ राहतो?

(उत्तर) ते ब्रह्मलोके ह परान्तकाले परामृतात् परिमुच्यन्ति सर्वे ।। मुण्डक ३।। खं० २।। मं० ६।।

    ते मुक्त जीव मुक्ती प्राप्त करून ब्रह्मामध्ये आनंद, तोपर्यंत उपभोगून महाकल्पानंतर मुक्तीचे सुख सोडून पुन: जगात येतात. याची कालगणना अशी आहे: त्रेचाळीस लाख बीस हजार वर्षांची एक चतुर्युगी, दोन हजार चतुर्युगीची एक अहोरात्र, तीस अहोरात्रींचा एक महिला, बारा महिन्यांचे एक वर्ष, अशा शंभर वर्षांचा एक परांतकाल होतो. याप्रमाणे गणित करून मुक्तीचे सुख भोगण्याचा काळ किती असतो ते जाणून घ्यावे.

(प्रश्न) परंतु इतरग्रंथकारांचे आणि जगातील सर्वांचे असेच मत आहे की ज्यामुळे पुनः जन्ममरणाच्या फेऱ्यात न येणे हीच मुक्ती किंवा मोक्ष होय. (उत्तर) असे कधीच होणे शक्य नाही. कारण एक तर जीवाचे सामर्थ्य, शरीरादी पदार्थ आणि साधने परिमित आहेत. मग त्यांचे फळ अनंत कसे असू शकेल ? अनंत आनंद उपभोगण्याचे अमर्याद सामर्थ्य, कमें व साधने असणाऱ्या जीवांमध्ये नाहीत. म्हणून ते अनंत सुखाचा उपभोग घेऊ शकत नाहीत. ज्यांची साधने अनित्य आहेत त्यांचे फळ नित्य कधीही असू शकत नाही. शिवाय मुक्तीमधून कोणताही जीव या संसारात परत येत नसता तर जगाचा उच्छेद म्हणजे जीव नि:शेष झाले असते. (प्रश्न) जितके जीव मुक्त होतात तितके पुनः ईश्वर नवीन उत्पन्न करून; आणि त्यांना जगात पाठविते. त्यामुळे जीव संपून जाणार नाहीत. (उत्तर) असे असेल तर जीव अनित्य होतील. कारण ज्याची उत्पत्ति होते त्याचा नाश अवश्य होतो. म्हणजे तुमच्या मताप्रमाणे मुक्ती मिळाल्यावरही जीव नष्ट होऊन जातील. त्यामुळे मुक्ती अनित्य होईल आणि मुक्तीच्या ठिकाणी भयंकर गर्दी होईल. कारण तेथे आगमन जास्त होईल आणि त्यांच्यापैकी कोणीच) यून बाहेर जाणार नसल्याने तेथील वाढीला काही सुमारच राहणार नाही आणि दु:खाच्या अनुभवाशिवायसुख काहीही होऊ शकत नाही.

    कडू नसेल तर मधुर रसाला आणि मिष्ट नसेल तर कडू रसाला काय अर्थ ठरतो ? कारण दोन वेगवेगळ्या रसांचा स्वाद घेतल्याने त्यांची परीक्षा होते. एखादा माणूस केवळ गोडच खात-पीत राहिला तर त्याला तसे सुख होत नाही जसे सर्व प्रकारच्या रसांचा स्वाद घेणाऱ्याला सुख मिळते.
    शिवाय परमेश्वर अंत असणाऱ्या (सीमित) कर्माचे अनंत फळ देईल तर त्याचा न्याय नष्ट होईल. जो जितके ओझे उचलू शकेल तेवढेच त्याच्यावर लादणे हे शहाणपणाचे काम असते. जसे एकामणाचे ओझे उचलू शकणाऱ्या शिरावर दहा सणाचे ओझे लादल्यास ते लादणाऱ्याची निंदा नालस्ती होतेतसेच अल्पज्ञ अल्प सामर्थ्य असणाऱ्या जीवावर अनंत सुखाचा भार घालणे ईश्वरासाठी उचित होत नाही.
    आणि जर परमेश्वर नवे जीव उत्पन्न करतो तर ज्या कारणापासून जीव उत्पन्न होतात ते पदार्थ संपून जातील. कारण खजिना कितीही मोठा असला तरी त्यात भर न पडता नुसताच खर्च होत राहिला तर कधी ना कधी तो रिकामा होतोच. म्हणून मुक्तावस्थेत जाणे व तेथून परत येणे चांगले आहे यासाठी अशी अवस्था असणेचे योग्य होय. काही दिवस कारागृहात काढण्यापेक्षा जन्मठेप, काळे पाणी किंवा फाशीला कोणी चांगले मानतो काय? मुक्तीतून परत यायचेच नसेल तर ह्या जन्मठेपेच्या कैदेत इतकेच अंतर आहे की तेथे मजुरी करावी लागत नाही आणि ब्रह्मामध्ये विलीन होणे हे समुद्रात बुडून मरण्यासारखेच आहे.

(प्रश्न) जसा परमेश्वर नित्य मुक्त व पूर्णसुखी आहे तसाच जीवही नित्यमुक्त व सुखी राहील तर त्यात काही दोष येणार नाही. (उत्तर) परमेश्वर अनंतस्वरूप, सामथ्र्य, गुण, कर्म व स्वभावयुक्त आहेत्यामुळे तो कधी अविद्या आणि दुःख व बंधन यांत पडू शकत नाही. जीव मुक्त होऊनही शुद्ध स्वरूप, अल्पज्ञ आणि परिमित गुण-कर्म-स्वभावयुक्त राहतो. तो परमेश्वरासारखा कधी होत नाही. (प्रश्न) जर मुक्ती देखील अशी जन्म-मरणासारखीच आहे तर तिच्यासाठी श्रम करणे व्यर्थ आहे? (उत्तर) मुक्ती ही जन्म-मरणासारखी नाही. कारण छत्तीस हजार वेळा सृष्टिची उत्पत्ति व लय होण्यास जेवढा वेळ लागतो तेवढ्या वेळेपर्यंत जीवांना मुक्तीच्या आनंदात राहणे, दुख न होणे तर ती काय लहान गोष्ट आहे? आज खाणे-पिणे केले तरी उद्या भूक लागणारच असते. मग यासाठी उपाय कशाला करता? क्षुधा, तृष्णा, क्षुद्र, धन, राज्यप्रतिष्ठा, पत्नी, मुलेबाळे यांच्यासाठी उपाय करणे जर आवश्यक आहे तर मग मुक्तीसाठी प्रयत्न का करू नये ? ज्याप्रमाणे मरणे हे अटळ असले तरी आपल्या जगण्याचा उपाय केला जातो त्याचप्रमाणे मुक्तीनंतर पुन्हा परत येऊन जन्म घेण्यासारखे असले तरीसुद्धा मुक्तीसाठी प्रयत्न करणे आशावश्यक आहे.

मुक्तीची साधने

(प्रश्न) मुक्ती मिळविण्याची काय साधने आहेत? (उत्तर) मुक्तीची काही साधने पूर्वी सांगितली आहेत. तरीपण विशेष उपाय हे आहेत. ज्याला मुक्ती हवी असेल त्याने प्रथम याच जन्मात जीवनमुक्त बनले पाहिजे. म्हणजे असे की ज्या मिथ्याभाषणादी पापकर्माचे फळ दुःख आहे. त्यांचा त्याग आणि सुखरूपी फळ देणान्या सत्यभाषणादी धर्माचरण अवश्य करावे. ज्या कोणाला दुःखापासून सुटका व सुखाच्या प्राप्तची इच्छा असेल त्याने अधर्म सोडून धर्माचे पालन केले पाहिजे. कारण दुःखाचे मूळ कारण पापाचरण आणि सुखाचे मूळ कारण धर्माचरण आहे

    सत्पुरुषांच्या संगतीने विवेक म्हणजे सत्यासत्य, धर्माधर्म, कर्तव्याकर्तव्याचा निश्चय अवश्य करावा यांविषी त्यातील भेद जाणून घ्यावा; आणि शरीर अर्थात जीवाच्या पंचकोशाच्या संबंधी विचार करावा. (है पंचकोश असे आहेत):- एक ‘अन्नमय' कोश. हा त्वचेपासून हाडांपर्यतच समुदाय पृथ्वीमय आहे. दुसरा ‘प्राणमय’ कोश. ज्यात 'प्राण' म्हणजे आतून बाहेर जातो तो 'अपान' म्हणजे बाहेरून आत येणारा वायु 'सम' म्हणजे नाभीमध्ये राहून साऱ्या शरीरात रस पोहचवितो तो वायु, 'उदान' म्हणजे कंठामध्ये राहुन अन्न पाणी ओढतो आणि बलपराक्रम वाढवितो तो वायु आणि व्यान' म्हणजे जीव ज्याच्यापासून शरीराच्या साऱ्या हालचाली करतो तो वायु. तिसरा 'मनोमय' कोश. याच्यामध्ये मनासह अहंकार, वाणी, पाय, हात, गुलाब जननेंद्रिय ही पाच कर्मेद्रिये आहेत. चौथा 'विज्ञानमय' कोश. यामध्ये बुद्धी, चित आणि कान, त्वचा, डोळे, जीभ व नाक ही पाच ज्ञानेंद्रिये ज्यांच्या योगाने जीव ज्ञानविषयक व्यवहार करतो. पाचवा ‘आनंदमय' कोश. यामध्ये प्रीती, प्रसन्नता, अल्प आनंद,भरपूर आनंद, आनंद आणि याचा आधार कारणरूप प्रकृती आहे. या पाच कोशांच्या योगाने जीव सर्व प्रकारची कर्मोपासना व ज्ञानादी व्यवहार करतो.
    तीन अवस्थाः- जागृती, स्वप्न व सुषुप्त या तीन अवस्था आहेत.
    तीन शरीरे - जे आपल्याला दिसते ते ‘स्थूल शरीर' होय. पाचप्राण, पाचज्ञानेंद्रिये पाच सूक्ष्म भूते, मन आणि बुद्धी या सतरा तत्वांच्या समुदायाला ‘सूक्ष्म शरीर' म्हणतातहे सूक्ष्म शरीर जन्ममरणादी अवस्थांमध्ये जीवाबरोबर राहते. याचे दोन भेद आहेत. एक भौतिक व दुसरे स्वाभाविक, भौतिक जे सूक्ष्मशरीर अंशांनी बनलेले आहे. स्वाभाविक सूक्ष्मशरीर जे जोवाचे स्वाभाविक गुणरूप आहे. हे दुसरे (सूक्ष्मशरीर) मुक्तीमध्येही जीवा बरोबर राहते.त्याच्या योगानेच जीव मुक्तावस्थेत सुखाचा उपभोग घेतो. तिसरे 'कारण शरीर' होय. त्यामध्ये सुषुप्तीचा म्हणजे गाढ निद्राच असते. ते मूळ प्रकृतीरूप असल्यामुळे सर्वत्र विभु व सर्व जीवांसाठी एक सारखे) आहे. चौथे ‘तुरीय शरीर' या शरीरामध्ये जीव समाधिस्थ होउन परमेश्वराच्या आनंदस्वरूपात मग्न होतात. या समाधी संस्कारजन्य शुद्ध शरीराचा पराक्रम मुक्तीमध्येही यथावत सहायक होत राहतो.
     हे सारे कोष व अवस्था यांहून जीव पृथक आहेकारण अवस्थांहून जीब वेगळा आहे हे सर्वांना माहीत आहे. जेव्हा माणूस मरतो तेव्हा सगळेजण म्हणतात की जीव निघून गेला. हाच जीव सर्वांचा प्रेरक, धर्ता, साक्षी, कर्ता व भोक्ता आहे. जर कोणी असे म्हणेल की जीव हा कर्ता व भोक्ता नाही, तर तो अज्ञानी अविवेकी है, असे समजावे. कारण जीवविरहित जे सारे जडपदार्थ आहेत, त्यांना सुख-दु:खांचा उपभोग किंवा पापपुणचे कर्तृत्व कधीही होऊ शकत नाही. होय त्यांच्या साह्याने जीव हा पाप-पुण्यांचा कर्ता व सुख-दु:खांचा भोक्ता (असतो) जेव्हा इंद्रिये विषयांमध्ये, मन इंद्रियांमध्ये आणि आत्मा मनाशी संयुक्त होऊन, प्राणांना प्रेरणा होऊन चांगली किंवा वाईट कृत्ये करावयास लावतो, तेव्हाच तो बहिर्मुख होत असतो. त्याच वेळी आतून आनंद, उत्साह, निर्भयता आणि वईट कृत्य करण्यात भय, शंका व लज्जा उत्पन्न होते. ती अंतर्यामी परमेश्वरादी शिकवण आहे. जो प्राणी या शिकवणीप्रमाणे वागतो, त्यालाच मुक्तिजन्य सुखे प्राप्त होतात; आणि जो प्राणी त्याच्या विरुद्ध वर्तन करतो, तो बंधजन्य दुःखे भोगत असतो.
  दुसरे साधन 'वैराग्य’ हे आहे. विवेकाद्वारे सत्यासत्य जाणले असेल, त्यातील सत्याचरणाचे गुण व असत्याचरणाचा त्याग करणे हा विवेक होय. पृथ्वीपासून परमेश्वरापर्यंत सर्व पदार्थाचे गुण, कर्म, भाव जाणून परमेश्वराच्या आतेचे पालन आणि त्याच्या उपासनेत तत्पर राहणे, त्याविरुद्ध आचरण न करणे, सृष्टीपासून उपकार करून घेणे, हा विवेक म्हटला जातो.
    यानंतर तिसरे साधन “षट्क सम्पति' हे आहे. म्हणजे सहा प्रकारची कमी करणे. ती अशी:-(१) ‘शम’

ज्यात आपल्या आत्म्याला व अंतःकणाला अधर्माचरणापासून परावृत्त करून धर्माचरणात सदैव प्रवृत्त करणे. (२) 'दम' ज्यात श्रोत्रादी इंद्रिये आणि शरीर यांना व्यभिचारादी दुष्कृत्यांपासून दूर ठेवून जितेंद्रियत्वादी शुभ कर्मांमध्ये करणे. (३) ‘उपरति’ दुष्कृत्ये करणाऱ्या माणसापासून सदैव दूर राहणे. (४) ‘तितिक्षा' कितीही निंदा, स्तुती, हानी, लाभ झाला तरी हर्ष-शोक सोडून मुक्तीच्या साधनांमध्ये सदैव संलग्न होणे. (५) ‘श्रद्धा' वेदादी सत्यशास्त्र आणि त्यातील ज्ञानाने प्रबुद्ध विद्वान, आग्न सत्योपदेशक, महानुभावाच्या रचनावर विश्वास ठेवणे. (६) ‘समाधान' चित्ताची एकाग्रता हि षटकसंपत्ती मिळून मुक्तीचे तिसरे साधन म्हटले जाते.

    'मुमुक्षुत्व’ हे चौथे साधन होय. ज्याप्रमाणे भूक व तहान यांनी व्याकुळ झालेल्या माणसाला अन्न व पाणी यांशिवाय दुसरे काही सुचत नाही त्याप्रमाणे मुक्ती व मुक्तीची साधने यांखेरीज दुसऱ्या कशातही प्रेम न वाटणे.
     मोक्षप्राप्तीचीही चार साधने आहेत व चार अनुबंध म्हणजे साधनांच्या नंतर ही कसे करावयाची असतात

त्यांना अनुबंध असे म्हणतात. यातील जो (९) अधिकारी - या चार साधनांनी युक्त असणारा पुरुषच मोक्षाचा 'अधिकारी' होतो. (२) संबंध- ब्रह्मप्राप्तिस्वरूप मुक्ती ह्या प्रतिपाद्य विषय आणि वेदादी शास्त्रे ही प्रतिपादकाला यथायोग्य समजून अन्वय करणे याला ‘संबंध’ म्हणतात. (३) विषयी - सर्व शाखांचा प्रतिपाद्य विषय जे ब्रह्म, त्याचा प्राप्तिरूपी विषय असणाऱ्या पुरुषाचे गाव ‘विषयी’ आहे. (४) प्रयोजन - सर्व दुखांची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्त होऊन मुक्तीचे सुख मिळणे हे ‘प्रयोजन' आहे. अशा प्रकारे अधिकारी, संबंधविषयी व प्रयोजन यांना ‘अनुबंध चतुष्टय' असे म्हणतात.

    यानंतर ‘श्रवणचतुष्टय’

(१) श्रवण - जेव्हा कोणी विद्वान उपदेश करतो, तेव्हा तो शांतपणे, ध्यान देऊन ऐकणे, विशेषत: ब्रह्मविद्येचा उपदेश एकाग्रचित्ताने ऐकला पाहिजे. ही सर्व विद्यांमध्ये सर्वात अधिक सूक्ष्म विद्या आहे. याला ‘श्रवण' असे म्हणतात. (२) मनन - ऐकल्यानंतर एकान्त स्थानी बसून ऐकलेल्यावर विचार करणे. ज्या गोष्टीविषयी शंका असेल ती पुनः विचारणे आणि ऐकत असतानाही वक्ताव श्रोता यांची हरकत नसल्यास पुनः विचारणे व आपले समाधान करून घेणे, याला 'मनन' असे म्हणतात (३) निदिध्यासन - श्रवण व मनन केल्यानंतर सर्व संदेह दूर होतो तेव्हा समाधीस्थ होऊन जी गोष्ट ऐकली होती व जिच्याविषयी विचार केला होता ती तशीच आहे की नाही हे ध्यानयोगाने पाहणे म्हणजे ‘निदिध्यासन' होय. (४) साक्षात्कार - पदार्थाचे जे काही स्वरूप, गुण व स्वभाव असेल ते जसेच्या तसे जाणणे म्हणजे ‘साक्षात्कार’ होय. या चारांना 'श्रवणचतुष्टय म्हटले जाते. नेहमी क्रोध, मलिनता, आळस, प्रमाद आदी तमोगुण ईष्र्या, द्वेष, काम, अभिमान, विक्षेप आदी रजोगुण यांचा त्याग करून सत्य अर्थात शांत प्रकृति,पवित्रता, विद्याविचार इत्यादी सत्त्वगुणांना धारण करावे.

    (मैत्री) सुखी जनांशी मित्रता, (करूणा) दुःखजनांवर दया, (मुदि) पुण्यात्म्यांकडून आनंदित होणे आणि (उपेक्षा) दुष्ट लोकांशी प्रेम अथवा वैर न करणे ही उपेक्षा होय.
    मुमुक्षुने दररोज नियमाने कमीत कमी दोन तास अवश्य ध्यानधारणा करावी, ज्यामुळे आंतरिक मन आदी पदार्थाचा साक्षात्कार व्हावा.
    पाहा ! आपण चेतनस्वरूप आहोत, म्हणूनच ज्ञानस्वरूप बमनाचे साक्षी आहोत. कारण जेव्हामन शांत,

चंचल, आनंदित किंवा विषादयुक्त होते तेव्हा त्याला यथायोग्य जाणले जाते तसेच इंद्रिये, प्राण इत्यादींचा ज्ञाता , पूर्वी पाहिलेल्या गोष्टींचा स्मरणकर्ता आणि एकाच वेळी अनेक पदार्थाना जाणणारा, धारण व आकर्षण करणारा आणि सर्वाहन वेगळा (आत्मा) आहे. तो असा वेगळा नसता तर तो स्वतंत्र कर्ता यांचा प्रेरक व अधिष्ठाता कधीही होऊ शकला नसता.

अविद्याऽस्मितारागद्वेषाभिनिवेशाः पञ्च क्लेशाः। -योगेशास्त्रे पादे २। सू० ३।।

    अविद्या, अस्मिता, राग, दोष व अभिनिवेश या पाच क्लेशापैकी अविद्येविषयी यापूर्वी सांगितले आहे. दुसरे असे की बुद्धीस आत्म्याहून भिन्नन समजणे याला अस्मिता, सुख देणाऱ्या पदार्थावर प्रेम करणे याला राग, दु:खाचा तिरस्कार म्हणजे 'दोष आणि सर्व प्राणीमात्रांची नेहमी अशी इच्छा असते की "मी याच शरीरात सदैव राहावे; कधी मरू नये." मृत्यूच्या दुःखाचा हा जो त्रास तो 'अभिनिवेश' आहे. या पाच क्लेशांना योगाभ्यास विज्ञानाने त्यागून ब्रह्माची प्राप्त करून मुक्तीच्या परमानंदाचा उपभोग घेतला पाहिजे.

(प्रश्न) जशी मुक्ती तुम्ही मानता तशी इतर कोणी मानत नाहीत. पाहा! जैन लोक शिवपुरीत जाऊन तेथील मोक्ष शिळेवर मौन धारण करून बसल्यास मोक्ष मिळतो. खिस्ती लोकांच्या मते चौथ्या स्वर्गात (आकाशात) प्रवेश मिळवून गाणे-बजावणे, विवाह व लढाई करणे आणि उत्तमोत्तम व परिधान करून आनंद उपभोगणे याचप्रमाणे मुसलमान लोक सातव्या आकाशात, वाममार्गी लोक श्रीपुरशैव कैलास, वैष्णव वैकुंठ, गोकुळ गोसावी गोलोक इत्यादी ठिकाणी जाऊन तेथे सुंदर स्त्रिया, खाणे-पिणे, वख व निवासस्थान मिळवून आनंदात राहण्यास मुक्ती समजतात. पौराणिक लोक (सालोक्य) ईश्वराच्या लोकात निवास(सानुज्य) लहान भावाप्रमाणे ईश्वराजवळ राहणे, (सारूप्य) उपास्यदैवताच्या आकृति प्रमाणे आपण बनणे, (सामीप्य) सेवकाप्रमाणे ईश्वराच्या सान्निध्यात राहणे आणि (सायुज्य) ईश्वराशी संयुक्त होणेअसे मुक्तीचे चार प्रकार मानतात. वेदांती लोक ब्रह्मामध्ये लय (विलीन) होण्याला मोक्ष समजतात (यात काय सत्य आहे?) (उत्तर) जैन, खिस्ती व मुसलमान यांच्या मोक्षविषय आम्ही अनुक्रमे बाराव्या, तेराव्या व चौदाव्या समुल्लासात विस्ताराने लिहिणार आहोत. वाममार्गी लोक श्रीपूरला जाऊन तेथे लक्ष्मीसारख्या स्त्रियांचा उपभोग घेणे, मद्यमांसादी खाणे-पिणे आणिभोग विलास करणे याला मुक्ती समजतात. परंतु त्यात इहलोकातील जीवनापेक्षा वेगळे असे काही विशेष नाही तसेच महादेव व विष्णु प्रमाणे स्वतःची रूपे करणे शैव व वैष्णावलोक कैलासाला व वैकुंठाला जाऊन आणि पार्वती व लक्ष्मी यांसारख्या स्त्रियांच्या संगतीत आनंद उपभोगणे, याला मोक्ष असे समजतात. त्यांच्या या कल्पनेत येथील धनाढ्य राजापेक्षा लोक एवढेच अधिक आहे की तेथे रोग नसतील व तारुण्य चिरकाल टिकून राहील. त्यांचा हा समज अगदी खोटा आहे. कारण जेथे भोग तेथे रोग व जेथे रोग तेथे वृद्धावस्था अवश्य होईल.

    पौराणिकांना विचारले पाहिजे की तुम्ही जिला चार प्रकारची (चतुर्विध) मुक्ती असे म्हणता, तशी तर कृमी, कीटक, पतंग, पशु, पक्षी इत्यादिकांना ती स्वतःसिद्ध प्राप्त आहे. कारण हे जितके लोक आहेत ते सर्व ईश्वराचे आहेत यातच सर्व लोक राहतात म्हणून त्यांना सालोक्य मुक्ती अनायास प्राप्त होतेईश्वर सर्वत्र व्यापक असल्यामुळे सारे जीव त्याच्या जवळच असतात. त्यामुळे सामीप्य मुक्ती ही स्वतःसिद्ध आहे. जीव हा ईश्वराहुन सर्व प्रकारे लहान व चेतन असल्यामुळे स्वतः तो ईश्वराचा धाकटा भाऊच आहे. म्हणून 'सानुज्य' मुक्तीही विनासायास सिद्ध आहे आणि सारे जीव सर्वव्यापक परमेश्वरामध्ये व्याप्य असल्यामुळे ते त्याच्याशी संयुक्त आहेत. म्हणजे सायुज्य' मुक्तीही स्वतःसिद्ध आहे
    आणि जे इतर सर्वसामान्य नास्तिक लोकांच्या मताने की मनुष्य मेल्यानंतर त्याचे शरीर पंचतत्वामध्ये विलीन होते, तीच परममुक्ती मानतात. ती तर कुत्री व गाढवे यांनाही प्राप्त होतेह्या मुक्ती नसून ते एक प्रकारचे बंधन आहे. कारण हे लोक शिवपुरी, मोक्ष शिला, चौथे आकाश, सातवे आकाश, श्रीपूर, कैलास, वैकुंठ, गोलोक ही विशिष्ट प्रदेशातील स्थाने आहेत असे मानतात. या स्थानांपासून ते दूर गेले तर त्यांची मुक्ती निसटून जाते. म्हणजे जसे १२ (बारा) दगडात दृष्टीबंध होतो त्यासारख्याच बंधनात असतील. मुक्तीमध्ये जीवाला त्याच्या इच्छेप्रमाणे कोठेही संचार करता आला पाहिजे. कोठेही आडकाठी असता कामा नये. त्याला न भय, न शंका, न दुःख होत नाही. आत्म्याचे शरीराशी मीलन झाले की त्याला जन्म किंवा उत्पत्ति म्हणतातआणि त्याला मरण किंवा प्रलय म्हणतात. मुक्त झालेले आत्मे योग्य वेळ पुनजन्म घेतात.

पुर्नजन्म

(प्रश्न) जन्म एक आहे की अनेक? (उत्तर) अनेक (प्रश्न) जर अनेक जन्म असतील तर पूर्वजन्म आणि मृत्यूच्या गोष्टीचे स्मरण माणसाला का नाही? (उत्तर) जीव हा अल्पज्ञ आहे. तो त्रिकालदर्शी नाही. त्यामुळे त्याला स्मरण राहत नाही. शिवाय ज्या मनाने त्याला ज्ञान प्राप्त होते ते मन एका वेळी दोन गोष्टींचे ज्ञान ग्रहण करू शकत नाही. पूर्वजन्माची गोष्ट तर दूरच राहू द्या, पण याच जन्मात जीव जेव्हा गर्भामध्ये होता त्याचे शरीर बनले नंतर जन्मला तेव्हा प्रथम पाच वर्षापर्यंतच्या काळात घडलेल्या गोष्टीचे स्मरण तो का करू शकत नाही ? तसेच जागृती व स्वप्न या दोन अवस्थांमध्ये झालेल्या अनेक व्यवहार प्रत्यक्ष करूनही त्याचे स्मरण सुषुप्तीमध्ये म्हणजे गाढ झोपेत असताना जागृत अवस्थेतील व्यवहाराचे स्मरण त्याला का होत नाही ? तुम्हाला जर कोणी विचारले की, "बारा वर्षांपूर्वी तेराव्या वर्षाच्या, पाचव्या महिन्याच्या नवव्या दिवशी दहा वाजून एक मिनिटानी तुम्ही काय केले होते? तुमचे तोंड, हात, कान, डोळे, शरीर कोणत्या बाजूला व कोणत्या अवस्थेत होते? आणि मनात कोणता विचार होता ?" याच जन्मात अशी स्थिती आहे तर मागील जन्मातील गोष्टींच्या स्मरणाबाबत शंका करणे केवळ पोरकटपणाची गोष्ट आहे

    आणि मागच्या जन्मातील गोष्टींचे स्मरण राहत नाही म्हणूनच जीव सुखी आहे. नाहीतर सर्व जन्मांतील

दुखांच्या आठवणीने तो भयंकर दु:खी होऊन मरून गेला असता. आपल्या पूर्वीच्या व नंतरच्या जन्मातील हकीगत आणण्याची इच्छा केली तरीसुद्धा तो जाणूशकत नाही. कारण जीवाचे ज्ञान व स्वरूप अल्प आहे. ही गोष्ट ईश्वराच्या जाणण्याची आहे. जीवांसाठी योग्य नाही. (प्रश्न) जर जीवाला पूर्वजन्माचे ज्ञान नाही आणि ईश्वराने त्याला दिलेल्या शिक्षेने त्याची सुधारणा कशी होणार? कारण आपण अमुक एक कर्म केले होते व त्याचेच फळ आपल्याला भोगावे लागत आहे हे त्याला समजले तरच तो पापकर्मापासून परावृत्त राहील ना? (उत्तर) तुम्ही ज्ञान किती प्रकारचे मानता? (प्रश्न) प्रत्यक्षादी प्रमाणांद्वारे ज्ञान आठ प्रकारचे असते. (उत्तर) तर जेव्हा या जन्मापासून वेळोवेळी प्राप्त होणाऱ्या राज्य, धन, बुद्धि, विद्या, दारिद्रय, निर्युद्धता, मुखता आदी सुख, दुःख जगात पाहून पूर्वजन्माचे ज्ञान तुम्ही का करीत नाही? उदाहरणार्थ, एक अवैद्य व एक वैद्य यांना एखादा रोग झाला असता त्याचे निदान म्हणजे कारण वैद्याला समजते. अवैद्य जाणू शकत नाही. कारण वैद्याने वैद्यकशास्त्राचे अध्ययन केलेले असतेतसे ते अवैद्याने केलेले नसते. परंतु ज्वरासारखा एखादा आजार झाल्यास अवैद्यालाही एवढे समजते की आपल्याकडून काहीतरी कुपथ्य झाले, म्हणून मला हा आजार झाला आहे. याचप्रमाणे जगातील विचित्र सुख-दुःखाची वाढ व घट पाहन। तुम्ही पूर्वजन्माचे अनुमान का जाणू शकत नाही ? आणि तुम्ही पूर्वजन्म मान्य केला नाही तर परमेश्वर पक्षपाती होऊन जाईल. कारण पाप केल्याशिवाय दारिद्रयादी दुःख आणि पूर्वसंचित पुण्याशिवाय राज्य, संपत्ती, बुद्धिमत्ता त्याला का दिली? पूर्वजन्मी केलेल्या पापपुण्यानुसार परमेश्वर जीवाला सुखदुखदेतो. त्यामुळे तो न्यायकारी योग्य प्रकारे राहतो. (प्रश्न) एकच जन्म मानला तरी परमेश्वर न्यायी होऊ शकतो. जसे सर्वोच्च राजा जे करतो तोच न्याय समजला जातो. माळी आपल्या बागेत लहान व मोठी झाडे लावतो, काहींना कापून किंवा उपटून टाकतो, तर काहींचे रक्षण करून ती वाढवतो. ज्याची जीवस्तू असेल त्याने ती वाटेल तशी ठेवावी. ज्याअर्थी ईश्वरच साऱ्या सुटीत मोठा आहे. त्याचा न्यायनिवाडा करणारा, त्याच्यावरचा असा दुसरा कोणीही नाही. त्याला कोणीच शिक्षा करू शकत नाही. म्हणून ईश्वरास कोणाचेही भय नाही. तो जे करतो तेच न्याय आहे असे समजले पाहिजे. (उत्तर) परमेश्वर ज्याचेसाठी न्याय इच्छितो व करतो तो कधीच अन्याय करीत नाही. म्हणूनच तो पूज्य व श्रेष्ठ आहे. जर तो अन्याय करील तर तो ईश्वरच नव्हे. जर एखादा माळी अविचाराने मार्गात अथवा अस्थानी वृक्ष लावील, जी झाडे कापावयाची नाहीत ती कापून टाकील, अयोग्य झाडांची वाढ करील व योग्य झाडे उपटून टाकील तर दोषी समजला जातो. याचप्रमाणे ईश्वर जर एखादी गोष्ट कारणाशिवाय करील तर तोही दोष ईश्वरास लागेल परमेश्वर स्वभावतःच पवित्र व न्यायी असल्यामुळे न्याययुक्त काम करणे त्याला आवश्यक असते. तो वेड्यासारखा काम करू लागला तरतो या जगातील श्रेष्ठ न्यायाधीशाहूनही न्यून व अश्रेष्ठ समजला जाईल या जगात विना योग्यतेशिवाय उत्तम कर्म करणाराची प्रतिष्ठा आणि दुष्कर्म केल्याशिवाय शिक्षा देणारा निंदनीय व अप्रतिष्ठित समजला जात नाही काय? म्हणून ईश्वर अन्याय करीत नाही व म्हणूनच तो कोणाला भीत नाही. (प्रश्न) परमेश्वराने आधीपासूनच ज्याला जेवढे द्यावयाचे ठरविले असेल तेवढे त्याला देतो आणि जेवढे काम करावयाचे असेल तेवढे करतो. (उत्तर) त्याचा निर्णय जीवांच्या कर्मानुसार होतो अन्यथा नाही. तो जर अन्यथा करील तर तो अपराधी व अन्याय करणारा ठरेल (प्रश्न) लहानमोठ्यांना सारखेच दुःख भोगावे लागते. मोठ्यांची काळजी मोठी तर लहानांची काळजी लहान. जसे, एखाद्या सावकाराचा लाख रुपयांचा खटला कचेरीत चालू असेल आणि तो उन्हाळ्यामध्ये आपल्या घरून पालखीत बसून कचेरीत म्हणजे न्यायालयात जात असेल तर, तो बाजारपेठेतून जात असताना त्याला पाहून अज्ञानी लोक म्हणतात, "हे पाहा ! पापपुण्याचे फळ. एकजण मजेत पालखीमध्ये बसला आहे. तर दुसरे अनवाणी तळपत्या उन्हात घामाघूम होत खांद्यावर पालखी घेऊन चालले आहेत.' परंतु कारण शहाण्या लोकांना माहीत असते की जसजशी कचेरी जवळ येत जाते तसतशी सावकाराची काळजी, संदेह वाढत जातो आणि मुक्कामाचे ठिकाण जवळ येत असल्याचे पाहून भोयांना आनंद होतो. कचेरीत पोचल्यानंतर शेटजी इकडेतिकडे पाहून आपण वकिलाकडे जावे की शिरस्तेदाराकडे जावे याचा विचार करू लागतात.आज आपण जिंकणार की हरणार? कोण जाणतो काय होईल! इकडे भोई लोक तंबाखू ओढत, एकमेकांशी गप्पागोष्टी करीत, मजेत, निश्चितपणे ताणून देतात. सावकाराने खटला जिंकला तर त्याला सुख होते आणि तो हरला तर तो दुःखसागरात बुडून जातो. उलट भोई मात्र पूर्वी जसे होते तसेच राहतात

    याचप्रमाणे राजा सुंदर, मऊगुबगुबीत बिछान्यावर झोपतो, तरी त्याला लवकर झोप येत नाही आणि

कामगार खडखडीत, उंचसखल जमिनीवर झोपतो तेव्हा जमिनीला पाठ टेकताच त्याला झोप लागते. हीच गोष्ट सर्वत्र जाणावी. (उत्तर) असे मानणे अज्ञानी लोकांचे आहेभोयाला सुखाने झोष लागते म्हणून एखाद्या सावकाराला तू भोई बन जा असे सांगितले तर तो भोई बमेल काय? मान्नभोईलोक सावकार बनण्याची इच्छा ठेवतील. जर सुखदु:ख समान असते तर आपापली स्थिती सोडून नव व श्रेष्ठ बनणे ही दोघांची इच्छा नसत.

    असे पाहा! एक जीव विज्ञान, पुण्यात्मा, श्रीमान, राजाच्या राणीच्या पोटी जन्म घेतो आणि दुसरा महादरिद्री मोलकरणीच्या पोटी जन्माला येतो. एकाला गर्भावस्थेपासून सर्व प्रकारचे सुख मिळते आणि दुसऱ्याला सर्वप्रकारचे दु:ख मिळते. पहिला जन्माला येतो तेव्हा त्याची नाळ काळजीपूर्वक कापली जाते आणि सुंदर सुगंधित पाण्याने त्याला न्हाऊ घालण्यात येते. त्याला दुग्धपान वगैरे गोष्टी यथायोग्य मिळतात. त्याला दूध पिण्याची इच्छा होते तेव्हा साखर वगैरे घातलेले दूध भरपूर प्रमाणात त्याला मिळतेत्याला आनंदित ठेवण्यासाठी नकर-चाकर खेळणी, उत्तम स्थानी जाण्यासाठी वाहन व्यवस्था या लाडाने त त्याचा आनंद होतो. याउलट दुसयाचा जन्म जंगलात होतो. त्याला आंघोळीसाठी पाणी देखील मिळत नाही. जेव्हा तो दूध मागतो तेव्हा त्याला दुधाऐवजी चापटांचा मार बसतो. तो कळवळून रडू लागला तरी त्याला कोणी विचारीत नाही. अशा प्रकारे जीवांना पापपुण्याचा विचार न करता सुख-दु:खे भोगावी लागली तर त्याचा दोष परमेश्वराकडे जातो.
    शिवाय जर कविना सुख दु:ख मिळते तर भविष्यात स्वर्ग नरकसुद्धा असावयास नको. कारण जसे

परमेश्वराने बऱ्या-वाईट कमचा विचार न करता इहलोकी सुख किंवा दुःख दिले आहेतसेच मृत्यूनंतरसुद्धा तो त्याच्या मनास येईल त्याप्रमाणे कोणाला स्वगांत पाठवील तर कोणाला नरकात ढकलेल. अशा स्थितीत सारे जीव अधर्माचरण करू लागतील. त्यांनी धर्माचरण का करावे ? कारण धर्माचरणाचे फळ मिळण्यात संदेह निर्माण होईल. सारे काही परमेश्वराच्या हातात आहे, त्याची जशी मर्जी असेल तसे तो करील, त्यामुळे पापकमची भीती न राहता जगात पापाची वृद्धी व धर्माचा क्षय होईल. म्हणून पूर्व जन्मातील पापुण्यानुसार वर्तमान जन्म मिळतो आणि या जन्मात तथा मागील जन्मात केलेल्या कमांनुसार पुढील जन्म होईल. (प्रश्न) माणूस आणि अन्य पशुपक्षी वगैरे यांच्या शरीरात एकाच प्रकारचा जीव असतो की वेगवेगळ्या प्रकारचे जीव असतात ? (उत्तर) जीव एकाच प्रकारचे आहेत. परंतु त्यांच्या पापपुण्यानुसार ते मलिन किंवा पवित्र असतात. (प्रश्न) मनुष्याच्या शरीरातील जीव पशुपक्ष्यांच्या शरीरात आणि पशुपक्ष्यांच्या शरीरातील जीव माणसाच्या शरीरात, तसेच पुरुषाचा जीव स्त्रीच्या शरीरात व स्त्रीचा जीव पुरुषाच्या शरीरात जातो-येतो की नाही? (उत्तर) होय, यतो जातो. कारण जेव्हा पाप वाढते व पुण्य कमी होते तेव्हा माणसाचा जीव पशुपक्ष्यांच्या नीच शरीरात जातो आणि जेव्हा धर्म अधिक व अधर्म कमी होतो तेव्हा जीवाला देवाचे म्हणजे विद्वानांचे शरीर मिळते आणि जेव्हा पापपुण्य समान असते तेव्हा जीवाला सामान्य माणसाचा जन्म मिळतो. यातही पापपुण्य जसे । उत्तम, मध्यम व निकृष्ट असेल तसे मनुष्यादिकांचे उत्तम, मध्यम व निकृष्ट शरीरादि सामुग्री मिळते. जेव्हा अधिक पापाचे फळ पशुपक्ष्यांच्या शरीरात राहून भोगल्यानंतर पापपुण्य समान होते त्यामुळे पुन: जीव मनुष्याच्या शरीरात येतो आणि पुण्याचे फळ भोगून तो सामान्य मनुष्याच्या शरीरात प्रवेश करतो.

    जेव्हा जीवाचा किंवा आत्म्याचा शरीराशी संयोग म्हणजे 'जन्म' आणि जेव्हा शरीरातून बाहेर पडतो तेव्हा त्याचे नाव 'मृत्यू' होय. जेव्हा तो शरीराचा त्याग करतो तेव्हा तो यमालयात म्हणजे आकाशस्थ वायूमध्ये राहतो कारण 'यमेन वायुना' म्हणजे वायूचे नाव यम आहे असे वेदात लिहिले आहे. हा गरुडपुराणातील कल्पित यम नव्हे. या मुद्याचे विशेष खंडन-मंडन अकराव्या समुल्लासात लिहिले जाईल.
    नंतर धर्मराज म्हणजे परमेश्वर त्या जीवाला त्याच्या पापपुण्यानुसार जन्म देतो. तो वायु, शरीरातील छिद्र यांच्या द्वारा दुसऱ्याच्या शरीरात ईश्वराच्या प्रेरणेने प्रविष्ट होतो. शरीरात प्रविष्ट झाल्यानंतर क्रमाने वीर्यात जाऊन गर्भात स्थित होतो व शरीर धारण करून बाहेर येतो. जर त्याची कमें स्त्रीचे शरीर धारण करण्यास योग्य असतील तर स्त्रीचे आणि पुरुषाचे शरीर धारण करण्यास योग्य असतील तर पुरुषाच्या शरीरात प्रवेश करतो. नपुंसक गर्भाचेवेळी स्त्री-पुरुषांच्या शरीर संबंधात रज व वीर्य समान असतात.
    अशाप्रकारे जोपर्यंत उत्तम कमें, उपासना व ज्ञान यांच्या द्वारे जीव मुक्ती मिळवीत नाही तोपर्यंत तो नाना प्रकारच्या जन्ममरणाच्या फेऱ्यात अडकून पडतो. कारण उत्तमकर्म आदी केल्याने जीवाला मनुष्यांमध्ये उत्तम जन्म मिळतो आणि मुक्तीमध्ये महाकल्पापर्यंत जन्म-मरणाच्या दुःखापासून मुक्त होऊन तो आनंदात राहतो.

(प्रश्न) मुक्ती एकाच जन्मात मिळते की अनेक जन्मांत? (उत्तर) अनेक जन्मात कारण,

भिद्यते हृदयग्रन्थिश्छिद्यन्ते सर्वसंशयाः। क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन्दृष्टे पराऽवरे।।१।। -मुण्डक।। खं० २।। मं० ८।।

    जेव्हा या जीवाच्या हृदयातील अविद्या व अज्ञानरूपी गाठ तुटून जाते, सर्व संशय नष्ट होतात आणि दुष्ट कर्माचा क्षय होतो तेव्हाच आत्म्याच्या आत व बाहेर व्यापून राहिलेल्या परमेश्वरामध्ये जीव निवास करतो.

(प्रश्न) मुक्तीमध्ये परमेश्वरात जीव विलीन होतो की वेगळा राहतो? (उत्तर) वेगळा राहतो. कारण जर तो परमेश्वरामध्ये विलीन झाला तर मुक्तीचे सुख कोण भोगणार? आणि मुक्तीची सारी साधने निरर्थक ठरतीलती मुक्ती म्हणता येणार नाही. तो जीवाचा प्रलय जाणला पाहिजे जेव्हा जीव परमेश्वराच्या आज्ञेचे पालन, उत्तम कर्में, सत्संग, योगाभ्यास आणि पूर्वी सांगितलेली सारी साधना। करतो तेव्हाच तो मुक्ती मिळवितो.

सत्यं ज्ञानमनन्तं ब्रह्म यो वेद निहितं गुहायां परमे व्योमन्। सोऽश्नुते सर्वान् कामान् सह ब्रह्मणा विपश्चितेति।। -तै०।। अनु० १।।खं० १।।

   जो जीवात्मा आपली बुद्धी व आत्मा यांमध्ये असणाऱ्या सत्य, ज्ञान व अनंत आनंदस्वरूप परमेश्वराला जाणतो, तो त्या सर्वव्यापक ब्रह्मामध्ये स्थित होऊन त्या विपश्चित् म्हणजे अनंत विद्यायुक्त ब्रह्मासह सर्व कामनांना प्राप्त करून घेतो. अर्थात ज्या-ज्या आनंदाची अभिलाषा न बाळगतो तो तो आनंद त्याला प्राप्त होतो. यालाच मुक्ती म्हटली जाते

(प्रश्न) ज्याप्रमाणे जीवाला शरीरावाचून ऐहिक सुखे भोगता येत नाहीत, त्याप्रमाणे मुक्तीमध्ये शरीरावाचून तो आनंद कसा उपभोगू शकेल? (उत्तर) याचे उत्तर यापूर्वी दिले आहे आणि थोडे अधिक ऐकावे. ज्याप्रमाणे जीव शरीराच्या आधाराने ऐहिक सुखे भोगतो त्याप्रमाणे परमेश्वराच्या आधाराने जीवात्मा मुक्तीचा आनंद उपभोगतो. तो मुक्त जीव अनंत व्यापक ब्रह्मामध्ये स्वच्छंद विहार करतो, शुद्ध ज्ञानाने सारी सृष्टि पाहतो, इतर मुक्त जीवांना भेटतो, सृष्टि विधेतील एकेका क्रमाने चमत्कार पाहन सवं लोकलोकांतरामध्ये अर्थात जे लोक (गोल) दिसतात व जे दिसत नाहीत तेथेही भ्रमण करतो तो सर्व पदार्थांना जे त्याच्या ज्ञान कक्षेत आहेत त्या सर्वांना पाहतो. ज्ञान जेवढे अधिक होते तेवढा त्याचा आनंदही अधिक होतो. मुक्तीमध्ये जीवात्मा निर्मळ होत असल्याने तो पूर्ण ज्ञानी होऊन त्याला सन्निहित सर्व पदार्थाची जाणीव योग्य प्रकारे होते

     हाच सुखविशेष स्वर्ग आणि विषयतृष्णेमध्ये रूजून दु:ख विशेष भोगणे म्हणजे नरक होय. 'स्वः' हे सुखाचे गाव आहे. ‘स्वः सुखं गच्छति यस्मिन् स स्वर्गः, ‘अतो विपरीतो दुःखभोगो नरक इति।' ऐहिक सुखाला सामान्य स्वर्ग असे म्हणतात आणि परमेश्वराच्या प्राप्तीने मिळणारा आनंद विशेष स्वर्ग म्हटला जातो.
    सगळे जीव स्वभावतः सुखप्राप्तीची इच्छा आणि दु:खाचा त्याग करू इच्छितात. परंतु जोपर्यंत धर्माचरण

करीत नाहीत व पापाचरण सोडत नाहीत तोपर्यंत त्यांना सुख मिळत नाही व त्यांचे दुःख दूर होत नाही. कारण ज्या वस्तूचे कारण म्हणजे मूळ विद्यमान असते ती कधी नष्ट होत नाही. जसे

छिन्ने मूले वृक्षो नश्यति तथा पापे क्षीणे दुःखं नश्यति ।

  ज्याप्रमाणे मूळ कापले गेल्याने वृक्ष नष्ट होतो त्याप्रमाणे पापाचा त्याग केल्याने दुःख नष्ट होते. मनुस्मृतिमध्ये पाप आणि पुण्याचे अनेक प्रकारे विवेचन करण्यात आले आहेते असे:

पाप व शिक्षा

मानसं मनसैवायं उपभुङ्क्ते शुभाशुभम् । वाचा वाचा कृतं कर्म कायेनैव च कायिकम् ।। १ ।। मनु०।। अ०१२ ।। श्लो० ८।।

अशाप्रकारे मनुष्याने आपला श्रेष्ठ, मध्यम व निकृष्टस्वभाव जाणून उत्तम स्वभावाचे ग्रहण आणि मध्यम व निकृष्ट स्वभावाचा त्याग करावा. त्याने हेही निश्चयपूर्वक जाणावे की हा जीव मनाने जे शुभाशुभ कर्म करतो त्याने मानाने, वाणीने केलेल्या कर्मांचे वाणीने आणि शरीराने केलेल्या कर्माचे शरीराने फळ म्हणजे सुख दुःख भोगतो. ॥१॥

शरीरजैः कर्मदोषैर्याति स्थावरतां नरः । वाचिकैः पक्षिमृगतां मानसैरन्त्यजातिताम् ।। २ ।। मनु०।। अ०१२ ।। श्लो० ९।।

जो मनुष्य शरीराने चोरी, परस्त्रीगमन, श्रेष्ठांना मारणे इत्यादी दुष्टकृत्ये करतो त्याला वृक्षाची स्थावराचा जन्म: वाणीने केलेल्या पापांबद्दल पशुपक्ष्यांचे आणि मनाने केलेल्या दुष्कृत्यांबद्दल चांडाळा इत्यादींचे शरीर त्याला मिळते.॥२॥

यो यदैषां गुणो देहे साकल्येनातिरिच्यते । स तदा तद्गुणप्रायं तं करोति शरीरिणम् ।। ३ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० २५।।

या जीवांच्या देशांमध्ये जो गुण अधिक प्रमाणात असतो तो गुण त्या-त्या जीवाला आपल्यासारखा करून देतो. ॥३॥

सत्त्वं ज्ञानं तमोऽज्ञानं रागद्वेषौ रजः स्मृतम् । एतद्व्याप्तिमदेतेषां सर्वभूताश्रितं वपुः ।। ४ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० २६।।

जेव्हा आत्म्यामध्ये ज्ञान असते तेव्हा सत्त्वगुणअज्ञान असते तेव्हा तमोगुण आणि जेव्हा राग, (मोह) द्वेषात आत्मा असतो तेव्हा त्या जीवामध्ये रजोगुण आहे हे जाणावे. प्रकृतीचे हे तीन गुण सर्व भौतिक पदार्थामध्ये व्याप्त होऊन राहतात. ॥४॥

तत्र यत्प्रीतिसंयुक्तं किं चिदात्मनि लक्षयेत् । प्रशान्तं इव शुद्धाभं सत्त्वं तदुपधारयेत् ।। ५ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० २७।।

ह्याची ओळख या प्रकारे केली पाहिजे की:- जेव्हा आत्म्यामध्ये प्रसन्नता आणि मन प्रसन्न, प्रशांत, शुद्ध भावनायुक्त असते तेव्हा सत्वगुण प्रमुख बनला असून रजोगुण व तमोगुण गौण बनले आहेत असे समजावे.?॥५॥

यत्तु दुःखसमायुक्तं अप्रीतिकरं आत्मनः । तद्रजो प्रतीपं विद्यात्सततं हारि देहिनाम् ।। ६ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० २८।।

जेव्हा आत्मा व मन हे दु:खयुक्त, अप्रसन्न बनून विषयवासनांमध्ये इकडे तिकडे जाणे येणे करतात तेव्हा राजागुण प्रमुख बनला असून सत्वगुण व तमोगुण गौण बनले आहेत असे समजावे. ॥६॥

यत्तु स्यान्मोहसंयुक्तं अव्यक्तं विषयात्मकम् । अप्रतर्क्यं अविज्ञेयं तमस्तदुपधारयेत् ।। ७ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० २९।।

जेव्हा आत्मा व मन हे मोहात म्हणजे ऐहिक गोष्टीत रममाण झालेले असतात, जेव्हा आत्म्यात व मनात काही विवेक असत नाही आणि ते विषयासक्त होतात, तर्कवितर्क जाणण्यायोग्य असत नाही तेव्हा नक्की समजावे की यावेळी माझ्यात तमोगुण प्रधान आणि सत्त्वगुण व रजोगुण अप्रधान झाले आहेत. ॥७॥

त्रयाणां अपि चैतेषां गुणानां यः फलोदयः । अग्र्यो मध्यो जघन्यश्च तं प्रवक्ष्याम्यशेषतः ।। ८ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ३०।।

आता या तीन गुणांमुळे जे उत्तम, मध्यम व कनिष्ठ फळ निर्मित होते त्याचे विस्ताराने विवेचन करतो.॥८॥

वेदाभ्यासस्तपो ज्ञानं शौचं इन्द्रियनिग्रहः । धर्मक्रियात्मचिन्ता च सात्त्विकं गुणलक्षणम् ।। ९ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ३१।।

वेदांचा अभ्यासधर्मानुष्ठान, ज्ञानाची वृद्धी, पाकियाची इच्छा, इंद्रियनिग्रह, धर्मकृत्ये व आत्मचिंतन करण्याची प्रवृत्ती हेच सत्वगुणाचे लक्षण आहे. ॥९॥

आरम्भरुचिताधैर्यं असत्कार्यपरिग्रहः । विषयोपसेवा चाजस्रं राजसं गुणलक्षणम् ।। १० ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ३२।।

जेव्हा रजोगुणाचा उदय होतो आणि सत्व व तमोगुण यांचा अंतर्भाव होतो तेव्हा आरंभशूरस्त्व, धैर्य-त्याग, असत् कर्माचे ग्रहण आणि निरंतर विषयसेवनामध्ये रुची असते. त्यावेळी आपल्यामध्ये रजोगुणाचे प्राधान्यझालं आहे, हे ओळखावे. ॥१०॥

लोभः स्वप्नोऽधृतिः क्रौर्यं नास्तिक्यं भिन्नवृत्तिता । याचिष्णुता प्रमादश्च तामसं गुणलक्षणम् ।। ११ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ३३।।

जेव्हा तमोगुणाचा उदय होतो आणि इतर दोन गुणांचा अंतर्धान होतो तेव्हा अत्यंत लोभ म्हणजे सर्व पापांचे मूळ वाढते, अत्यंत आळस, निद्रा, धैर्याचा नाश, क्रौर्य, नास्तिकता म्हणजे वेद व ईश्वर यांच्यावर श्रद्धा नसणे, अंत:करणाच्या वेगवेगळ्या वृत्ती प्रभावशाली बनणे आणि मनाच्या एकाग्रतेचा अभाव नाहीसा होणे, भेटेल त्याच्याकडे याचना करणे, प्रमाद म्हणजे मद्यपानादी वाईट व्यसनांधीन होणे इत्यादीगुण असतील. अशा वेळी आपल्यामध्ये तमोगुण बाढला आहे, हे ओळखावे. ॥११॥

यत्कर्म कृत्वा कुर्वंश्च करिष्यंश्चैव लज्जति । तज्ज्ञेयं विदुषा सर्वं तामसं गुणलक्षणम् ।। १२ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ३५।।

अशी तमोगुणाची लक्षणे विद्वानांनी जाणण्यायोग्य आहेत तसेच जेव्हा आपला आत्मा ज्यामध्ये लज्जा, शंका व भयाने ग्रस्त होतो तेव्हा आपल्यामध्ये तमोगुणाची मात्रा खूपच वाढली आहे हे त्याने ओळखावे.॥१२॥

येनास्मिन्कर्मना लोके ख्यातिं इच्छति पुष्कलाम् । न च शोचत्यसंपत्तौ तद्विज्ञेयं तु राजसम् ।। १३ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ३६।।

ज्या एखाद्या कर्माच्या योगाने आपल्याला इहलोकी पुष्कळ प्रसिद्धी मिळावी असे जीवात्मा इच्छितो आणि दारिद्रय आले असताही तोंडपुजे भाट, चारण वगैरे लोकांना धन देणे सोडत नाही तेव्हा समजावे की आपल्यामध्ये ते रजोगुण प्रबळ झाले आहेत. ॥१३॥

यत्सर्वेणेच्छति ज्ञातुं यन्न लज्जति चाचरन् । येन तुष्यति चात्मास्य तत्सत्त्वगुणलक्षणम् ।। १४ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ३७।।

जेव्हा माणसाचा आत्मा सर्वांकडून जाणणे इच्छितो, गुण ग्रहण करीत जातो, सत्कर्म करण्यात लाजत नाही आणि जे कर्म केल्याने आत्मा प्रसन्न होतो, म्हणजे जेव्हा धर्माचरणातच इच्छा राहते तेव्हा आपल्यामध्ये सत्त्वगुण प्रबळ झाला आहे असे समजावे. ॥१४॥

तमसो लक्षणं कामो रजसस्त्वर्थ उच्यते । सत्त्वस्य लक्षणं धर्मः श्रैष्ठ्यं एषां यथोत्तरम् ।। १५ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ३८।।

तमोगुणाचे लक्षण कामवासना, रजोगुणाचे लक्षण धनलिप्सा आणि सत्त्वगुणाचे लक्षण धर्मसेवा होय परंतु तमोगुणापेक्षा रजोगुण व रजोगुणापेक्षा सत्त्वगुण श्रेष्ठ आहे॥१५॥

गुणानुसार शरीरप्राप्ती

आता ज्या ज्या गुणामुळे जीव ज्या-ज्या गतीला प्राप्त होतो त्यांचे विवरण खाली लिहित आहे:-

देवत्वं सात्त्विका यान्ति मनुष्यत्वं च राजसाः । तिर्यक्त्वं तामसा नित्यं इत्येषा त्रिविधा गतिः ।। १ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ४०।।

जो मनुष्य सात्विक आहे तो देव म्हणजे विद्वान. जो रजोगुणी माणसांना असतो ते मध्यम श्रेणीचे मनुष्य आणि जे तमोगुणयुक्त असतील ते नीच गतीला प्राप्त होतात. ॥१ ॥

स्थावराः कृमिकीटाश्च मत्स्याः सर्पाः सकच्छपाः । पशवश्च मृगाश्चैव जघन्या तामसी गतिः ।। २ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ४२।।

जे अत्यंत तमोगुणी असतात त्यांना स्थावर वृक्षादी स्थावरांचा, कृमी, कीटक, मत्स्य, सयं, कासव, पशु व मृग यांचा जन्म मिळतो. ॥२ ॥

हस्तिनश्च तुरङ्गाश्च शूद्रा म्लेच्छाश्च गर्हिताः । सिंहा व्याघ्रा वराहाश्च मध्यमा तामसी गतिः ।। ३ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ४३।।

जे मध्यम तमोगुणी असतात त्यांना हत्ती, घोडे, शुद्ध, म्लेच्छ, निंदित कामे करणारे, सिंह, वाघ, रानडुक्कर याचा त्यांना जन्म प्राप्त होतो. ॥३॥

चारणाश्च सुपर्णाश्च पुरुषाश्चैव दाम्भिकाः । रक्षांसि च पिशाचाश्च तामसीषूत्तमा गतिः ।। ४ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ४४।।

जे उत्तम तमोगुणी असतात त्यांना कवने रचून लोकांची स्तुती करणारे भाटचारण, सुंदर पक्षी, आपल्याच तोंडाने स्वत:ची प्रशंसा करणारे दांभिक पुरुष, हिंसा करणारे राक्षस, मद्यादी प्राशन करणारे, गलिच्छ राहणारे, अमाचारी पिशाच यांचा जन्म म्हणजे उत्तम तमोगुणी कमांचे फळ होय. ॥४॥

झल्ला मल्ला नटाश्चैव पुरुषाः शस्त्रवृत्तयः । द्यूतपानप्रसक्ताश्च जघन्या राजसी गतिः ।। ५ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ४५।।

जे अत्यंत रजोगुणी असतात ते भल्ल म्हणजे भाला, तलवार वगैरे हत्यारांनी मारणारे अथवा कुदळ इत्यादींनी खणणारे मल्लाह म्हणजे, नौका वगैरे वल्हवणारे, दोरीवर किंवा बांबूवर कसरतीचे खेळ करणारे डोंबारी, शस्त्रधारी नोकर आणि मद्यपानात आसक्त असतात असे जन्म हे नीच रजोगुणाचे फळ होय. ॥५॥

राजानः क्षत्रियाश्चैव राज्ञां चैव पुरोहिताः । वादयुद्धप्रधानाश्च मध्यमा राजसी गतिः ।। ६ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ४६।।

जेमध्यम रजोगुणी असतात ते राजे क्षत्रिय वर्णाच्या राजांचे पुरोहित, शास्त्रार्थ करणारे, राजदूत, प्राड्विवाक (वकील बॅरिष्टर), युद्ध विभागाचे अध्यक्ष यांचा जन्म प्राप्त करतात॥६॥

गन्धर्वा गुह्यका यक्षा विबुधानुचराश्च ये । तथैवाप्सरसः सर्वा राजसीषूत्तमा गतिः ।। ७ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ४७।।

जे उत्तम रजोगुणी असतात त्यांना गंधर्व (गाणारे), गुढाक (वादक), यक्ष (धनाढ्य)विद्वानांचे सेवक आणि अप्सरा म्हणजे सुस्वरूप स्त्रिया यांचा जन्म प्राप्त होतो. ॥७॥

तापसा यतयो विप्रा ये च वैमानिका गणाः । नक्षत्राणि च दैत्याश्च प्रथमा सात्त्विकी गतिः ।। ८ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ४८।।

जे तपस्वी, यती, संन्यासी, वेदपाठी, विमानचालक, ज्योतिषी आणि दैत्य म्हणजे देहपोषक मनुष्य असतात त्यांचे कनिष्ठ सत्वगुणाचे ते फळ जाणावे. ॥८॥

यज्वान ऋषयो देवा वेदा ज्योतींषि वत्सराः । पितरश्चैव साध्याश्च द्वितीया सात्त्विकी गतिः ।। ९ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ४९।।

जे जीव मध्यम सत्त्वगुणयुक्त होऊन कर्म करतात ते यज्ञ करणारेवेदांचा अर्थ जाणणारेविद्वान, वेदज्ञ, विद्युत विद्या, कालविद्या जाणकाररक्षक, ज्ञानी व (साध्याः) कार्यसिद्धीसाठी सेवा करण्यायोग्य असे अध्यापक यांचा जन्म प्राप्त करतात. ॥९ ॥

ब्रह्मा विश्वसृजो धर्मो महानव्यक्तं एव च । उत्तमां सात्त्विकीं एतां गतिं आहुर्मनीषिणः ।। १० ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ५०।।

जे उत्तम सत्त्वगुणांनी युक्त असून उत्तम कर्म करतात ते (ब्रह्मा) सर्व वेद जाणणारे, (विश्वसृज्) सारी सृष्टिक्रम विद्या जाणून विविध विमानादि याने बनविणारे, धार्मिक, सर्वोतम बुद्धियुक्त आणि अव्यक्ताचा जन्म व प्रकृतिवशित्व यांची सिद्धी प्राप्त करतात॥१०॥

इन्द्रियाणां प्रसङ्गेन धर्मस्यासेवनेन च । पापान्संयान्ति संसारानविद्वांसो नराधमाः ।। ११ ।।मनु०।। अ०१२ ।। श्लो० ५२।।

जे इंद्रियांच्या आधीन होऊल विषयासक्त, धर्माचा त्याग करून अधर्म करणारे अविद्वान असतात ते मनुष्यांमधील नीच योनीत वाईट वाईट दुःखरूप जन्म प्राप्त करतात. ॥११॥

    अशा प्रकारे सत्व, रज व तम या तीन गुणांनी युक्त होऊनव ज्या प्रकारची कामे करतो त्याला त्याच त्याचप्रकारची फळे प्राप्त होतात
   जे मुक्त होतात त्यांनी गुणातीत म्हणजे सर्व गुणाच्या स्वभावामध्ये गुंतून न राहता महायोगी बनून,

मुक्तीची साधना करावी. कारण,

योगश्चित्तवृत्तिनिरोधः।।१।। योगसू० पा० सू २।। तदा द्रष्टुः स्वरूपेऽवस्थानम्।।२।। योगसू० पा० सू ३।।

ही पातंजल योगशास्त्रातील सूत्रे आहेत. मनुष्याने रजोगुण व तमोगुण यांनी युक्त असलेल्या कर्मांपासून मनाला परावृत्त करून, शुद्धसत्त्वगुणयुक्त कमांपासून मनाला दूर ठेवून केवळ शुद्ध सत्वगुणयुक्त बनावे. नंतर त्यांचाही निरोध करून एकाग्र म्हणजे एक परमेश्वर व धर्मयुक्त कर्म यांच्या अग्रभागावर मनाला स्थिर करून त्याला निरुद्ध म्हणजे सर्व बाजूंनी मनाच्या वृत्तीला रोखून धरावे. ॥१॥

जेव्हा चित्त एकाग्र व निरुद्ध होते तेव्हा सर्वांचा द्रष्टा असणार्या ईश्वराच्या स्वरूपात जीवात्स्याची स्थिती होते. इत्यादी साधने मुक्तीसाठी आचरावीत. आणि,

अथ त्रिविधदुःखात्यन्तनिवृत्तिरत्यन्तपुरुषार्थः।। -सांख्य ।।अ० १।।सू० १।।

(आध्यात्मिक) शारीरिक दुःखे, (आधिभौतिक) इतर प्राण्यांपासून दुःखित व (आधिदैविक) अतिवृष्टी, अत्यंत उन्हाळा, अत्यंत थंड, अनावृष्टी, मन व इंद्रिये यांच्या चंचलतेने दुःखे होतात, या त्रिविध दुखांपासून सुटका करून घेऊन मुक्ती मिळविणे हा अत्यंत पुरुषार्थ आहे.
    पुढील प्रकरणात आचारअनाचार व भक्ष्याभक्ष्याविषयी लिहू.

इति श्रीमदयानन्दसरस्वतीस्वामिकृते सत्यार्थप्रकाशे सुभाषाविभूषिते विद्याऽविद्याबन्धमोक्षविषये नवमः समुल्लासः सम्पूर्ण: ॥१॥