Jump to content

श्री शाकंभरी देवीची आरती

विकिस्रोत कडून

<poem> शताक्षी, बनशंकरी, चामुंडा काली दुर्गम, शुंभ निशुंभा स्वर्गी धाडियली येतां भक्ता संकट धावुनी ही आली दु:खे नाशुनि सकला सुखी ठेविली ॥१॥

जयदेवी जयदेवी जय शाकंभरी ललिते अज्ञ बालकावरी त्वा कृपा करी माते ॥धृ॥

मधुकैटभ, महिषासुर मातले फार दुर्गारूपाने शिवालिक पर्वते दानव संहार शक्ती तुझी महिमा आहे अपार म्हणूनि वंदन करिती ब्रह्मादिक थोर ॥२॥

अवर्षणाने जग हे झाले हैराण अन्नपाण्याविना झाले दारूण शरिरातुनि भाज्या केलिस उत्पन्न खा‌ऊ घालुनि प्रजा केलीस पालन ॥३॥

चंडमुंडादिक भैरव उद्धरिले भानू ब्राह्मणासी चक्षु त्वा दिधले नृपपद्माचे त्वा वंश वाढविले अगाध लीला माते करून दाखविले ॥४॥

पाहुनी माते तुजला मन होते शांत मी पण् उरे न काही मानव हृदयात प्रसन्न चित्ते राही तुझ्या क्षेत्रात ब्रह्मानंदी निमग्न होतो तुझा भक्त ॥५॥

वसंत प्रार्थी शंकरी शाकंभरी तुजसी आलो शरण तुला मी आशिष दे मजसी अखंड सेवा घडु दे इच्छा उरी ऐसी अंती सद्गती द्यावे मम या जीवासी ॥६॥

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.