श्री शांतादुर्गेची आरती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> जय देवी जय देवी जय शांते जननी| दुर्गे बहुदु:खदमने रतलो तव भजनी||धृ||

भूकैलासा ऐसी ही कवला नगरी|शांतादुर्गा तेथे भक्तभवहारी| असुराते मर्दुनिया सुरवरकैवारी|स्मरती विधीहरीशंकर सुरगण अंतरी| जय देवी जय देवी जय शांते जननी| दुर्गे बहुदु:खदमने रतलो तव भजनी||१||

प्रबोध तुझा नव्हे विश्वाभीतरी|नेति नेति शब्दे गर्जती पै चारी| साही शास्त्रे मथिता न कळीसी निर्धारी|अष्टादश गर्जती परी नेणती तव थोरी| जय देवी जय देवी जय शांते जननी| दुर्गे बहुदु:खदमने रतलो तव भजनी||२||

कोटी मदन रूपा ऐसी मुखशोभा|सर्वांगी भूषणे जांबूनदगाभा| नासाग्री मुक्ताफळ दिनमणीची प्रभा|भक्तजनाते अभय देसी तू अंबा| जय देवी जय देवी जय शांते जननी| दुर्गे बहुदु:खदमने रतलो तव भजनी||३||

अंबे भक्तांसाठी होसी साकार|नातरी जगजीवन तू नव्हसी गोचर| विराटरूपा धरूनी करीसी व्यापार|त्रिगुणी विरहीत सहीत तुज कैचा पार| जय देवी जय देवी जय शांते जननी| दुर्गे बहुदु:खदमने रतलो तव भजनी||४||

त्रितापतापे श्रमलो निजवी निजसदनी|अंबे सकळारंभे राका शशीवदनी| अगमे निगमे दुर्गे भक्तांचे जननी|पद्माजी बाबाजी रमला तव भजनी| जय देवी जय देवी जय शांते जननी| दुर्गे बहुदु:खदमने रतलो तव भजनी||५|| <poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.