श्री लक्ष्मी देवीची आरती

विकिस्रोत कडून


जय देवी श्रीदेवी माते ।
वंदन भावे माझे तव पदकमलाते ॥ धृ. ॥

श्री लक्ष्मी देवी तूं श्री विष्णुपत्नी ।
पावसी भक्तालागी अति सोप्या यत्नी ॥
जननी विश्वाची तूं जीवनचित्श्क्ती ।
शरण तुला मॆ आलो नुरवी आपत्ती ॥ १ ॥

भृगवारी श्रद्धेने उपास तव करिती ।
आंबट कोणी काही अन्न न सेवीती ॥
गुळचण्याचा साधा प्रसाद भक्षीती ।
मंगल व्हावे म्हणुनी कथा श्रवण करिती ॥ २ ॥

जे कोणी नरनारी व्रत तव आचरिती ।
अनन्य भावे तुजला स्मरुनी प्रार्थीती ॥
त्यांच्या हाकेला तूं धांवुनिया येसी ।
संतती, वैभव किर्ती धनदौलत देसी ॥ ३ ॥

विश्वाधारे माते प्रसन्न तूं व्हावे ।
भवभय हरुनी आम्हां सदैव रक्षावें ॥
मनिची इच्छा व्हावी परिपूर्ण सगळी ।
म्हणुनी मिलिंदमाधव आरती ओवाळी ॥ ४ ॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.