श्री नन्दकुमाराष्टकम्

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

श्री नन्दकुमाराष्टकम्

सुंदरगोपालं उरवनमालं नयनविशालं दुःखहरम् ।
वृन्दावनचन्द्रमानन्दकन्दं परमानन्दं धरणिधरम् ॥
वल्लभघनश्यामं पूर्णकामं अत्यभिरामं प्रीतिकरम् ।
भज नन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम् ॥१॥

जो सुन्दर गोपाळ आहे, ज्याच्या छातीवर वनमाळा आहेत, ज्याचे डोळे विशाल आहेत, जो दुःखाचे हरण करतो, जो वृन्दावनातला चन्द्र आहे, आनन्दाचा कन्द आहे, परमानन्द आहे, ज्याने पृथ्वीला धारण केले आहे, जो मेघासारखा श्यामवल्लभ आहे, पूर्णकाम आहे, जो अत्यन्त सुन्दर आणि जगावर प्रेम करणारा आहे अशा सर्व सुखाचे सार असलेल्या परब्रह्मरूप, तत्त्वविचाररूप गोपाळकृष्णाला भजा (नमस्कार करा). ॥१॥

सुंदरवारिजवदनं निर्जितमदनं आनन्दसदनं मुकुटधरम् ।
गुत्र्जाकृतिहारं विपिनविहारं परमोदारं चीरहरम् ॥
वल्लभपटपीतं कृतउपवीतं करनवनीतं विबुधवरम् ।
भज नन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम् ॥2॥

ज्याचे मुख सुंदर कमळाप्रमाणे आहे, ज्याने स्वतःच्या सौंदर्यांने मदनाला (कामदेवाला) ही जिंकले आहे, जो आनन्दाचे भांडार आहे, ज्याच्या डोक्यावर मुकुट आहे, ज्याने गुंजाच्या माळा धारण केल्या आहेत, जो वृंदावनात विहार करणारा आहे, जो परम उदार आहे, ज्याने गोपींची वस्त्रे हरण केली, ज्याला पीताम्बर प्रिय आहे, ज्याने यज्ञोपवीत धारण केले आहे, ज्याच्या हातात लोणी आहे, जो श्रेष्ठ बुद्धीमत्तेचा आहे अशा सर्वसुखाचे सार असलेल्या परब्रह्मरूप, तत्त्वविचाररूप नन्दकुमाराला भजा. ॥२॥

शोभितमुखधूलं यमुनाकूलं निपटअतूलं सुखदतरम् ।
मुखमण्डितरेणुं चारितधेनुं वादितवेणुं मधुरसुरम् ॥
वल्लभमतिविमलं शुभपदकमलं नखरुचि अमलं तिमिरहरम् ।
भज नन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम् ॥3॥

जो यमुनातटावर धुळीने भरलेल्या मुखाने शोभत आहे, जो अनुपम सुख देणारा आहे, ज्याचे मातीने भरलेले मुख शोभत आहे, जो गायी चारतो, जो मधुर सुरात बासरी वाजवतो, जो सर्वप्रिय आणि अत्यंत विमल आहे, ज्याचे चरणकमल अतिशय शुभ आहेत, ज्याच्या नखांची कान्ती अतिशय निर्मळ आहे, जो अन्धकाराचा नाश करतो अशा सर्वसुखाचे सार असलेल्या परब्रह्मरूप, तत्त्वविचाररूप नन्दकुमाराला भजा. ॥३॥

शिरमुकुटसुदेशं कुञ्जितकेशं नटवरवेशं कामवरम् ।
मायाकृतमनुजं हलधरअनुजं प्रतिहतदनुजं भारहरम् ॥
वल्लभव्रजपालं सुभगसुचालं हितमनुकालं भाववरम् ।
भज नन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम् ॥4॥

ज्याच्या सुंदर मस्तकावर मुकुट आहे, ज्याचे केस कुरळे आहेत, जो रोज नवीन नवीन रूपें धारण करतो, जो कामदेवाहून सुंदर आहे, मायेमुळे ज्याने मनुष्य देह धारण केला आहे, जो बलरामाचा भाऊ आहे, जो राक्षसांना मारणारा आहे, जो सर्वांचा भार उचलतो, जो व्रजरक्षक आहे, प्रिय आहे, ज्याचे चालणे अतिशय सुंदर आहे, जो प्रतिक्षण हित करणारा आहे अशा सर्वसुखाचे सार असलेल्या परब्रह्मरूप, तत्त्वविचाररूप नन्दकुमाराला भजा. ॥४॥

इन्दीवरभासं प्रकटसुरासं कुसुमविकासं वंशिधरम् ।
ह्रतमन्मथमानं रूपनिधानं कृतकलगानं चित्तहरम् ॥
वल्लभमृदुहासं कुञ्जनिवासं विविधविलासं केलिकरम् ।
भज नन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम् ॥5॥

ज्याची कान्ती नीलकमलाप्रमाणें सुंदर आहे, जो रास क्रीडेत प्रकट रूपात आहे, जो कुसुमासारखा विकसित आहे, जो बन्सीधर आहे, ज्याने कामदेवाचा अहंकार खेचून घेतला आहे, जो अतिशय सुंदर आहे, ज्याचे मधुरगान मन मोहून टाकते, ज्याचे हास्य अतिशय मोहक आहे, जो लताकुंजात राहून अनेक प्रकारच्या लीला करतो अशा सर्वसुखाचे सार असलेल्या परब्रह्मरूप, तत्त्वविचाररूप नन्दकुमाराला भजा. ॥५॥

अतिपरप्रवीणं पालितदीनं भक्ताधीनं कर्मकरम् ।
मोहनमतिधीरं फणिबलवीरं हतपरवीरं तरलतरम् ॥
वल्लभव्रजरमणं वारिजवदनं हलधरशमनं शैलधरम् ।
भज नन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम् ॥6॥

जो अतिशय प्रवीण आहे, दीनांचे पालन करणारा आहे, भक्ताधीन असतो, जो कर्माचा कर्ता आहे, जो अतिशय धीट आहे, मोहक आहे, बलरामापेक्षा श्रेष्ठवीर आहे, जो शत्रूवीरांचा नाश करतो, जो अतिशय चपळ आहे, जो प्रिय व्रजवासी लोकांबरोबर खेळणारा आहे, कमलवदन आहे, बलरामाला शान्त करणारा आहे, गोवर्धन पर्वत धारण करणारा आहे अशा सर्वसुखाचे सार असलेल्या परब्रह्मरूप, तत्त्वविचाररूप नन्दकुमाराला भजा. ॥६॥

जलधरद्युतिअड्गं ललितत्रिभड्गं बहुकृतरड्गं रसिकवरम् ।
गोकुलपरिवारं मदनाकारं कुञ्जविहारं गूढतरम् ॥
वल्लभव्रजचन्द्रं सुभगसुछन्दं कृतआनन्दं भ्रान्तिहरम् ॥
भज नन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम् ॥7॥

ज्याची अंगकान्ती मेघासारखी श्याम आहे, ज्याची त्रिभड्गाकृति अतिशय सुंदर आहे, जो विविध रंगी आहे, परम रसिक आहे, गोकुळ ज्याचा परिवार आहे, मदनासारखी ज्याची सुंदर आकृति आहे, जो कुंजात विहार करतो, ज्याचे भाव अतिशय गूढ आहेत, जो व्रजाचा प्रियचंद्र आहे, ज्याला सौभाग्याचा छन्द आहे, ज्याचे स्मरण आनन्ददायी आहे, जो भ्रान्तीला दूर करणारा आहे अशा सर्वसुखाचे सार असलेल्या परब्रह्मरूप, तत्त्वविचाररूप नन्दकुमाराला भजा. ॥७॥

वन्दितयुगचरणं पावनकरणं जगदुद्धरणं विमलधरम् ।
कालियशिरगमनं कृतफणिनमनं घातितयमनं मृदुलतरम् ॥
वल्लभदुःखहरणं निर्मलचरणं अशरशरणं मुक्तिकरम् ।
भज नन्दकुमारं सर्वसुखसारं तत्त्वविचारं ब्रह्मपरम् ॥8॥

ज्याच्या दोन्ही चरणांचे भक्त वंदन करतात, जो सर्वांना पवित्र करणारा आहे, जगाचा उद्धार करणारा आहे, जो निर्मल भक्तांना ह्रदयात धारण करतो, कालियनागाचे दमन करणारा, शेषनाग ज्याची स्तुति करतो, जो कालयवनाचा घातक आहे, अतिशय कोमल आहे, प्रियजनांचे दुःख हरण करणारा आहे, ज्याचे चरण निर्मल आहेत, अनाथांना शरण देऊन, विकार, भय आणि रोगातून मुक्ति देणारा आहे अशा सर्वसुखाचे सार असलेल्या परब्रह्मरूप, तत्त्वविचाररूप नन्दकुमाराला भजा. ॥८॥
॥ इति श्रीमहाप्रभुवल्लभाचार्य विरचितं नन्दकुमाराष्टकम् सम्पूर्णम् ॥

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.