श्री करवीरपुरवासिनीची आरती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> करवीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता। पुरहरवरदायिनी मुरहरप्रियकांता ॥ कमलाकारें जठरी जन्मविला धाता। सहस्त्रवदनी भूधर न पुरे गुण गाता ॥ १ ॥

जय देवी जय देवी जय महालक्ष्मी । वससी व्यापकरुपें तुं स्थुलसुक्ष्मी ॥ धृ. ॥

मातुलिंग गदायुत खेट्क रविकिरणी । झळके हाटकवादी पीयुषरसपाणी ॥ माणिकदशना सुरंगवसना म्रुगनयनी । शशिधरवदना, राजस मदनाची जननी ॥ २ ॥

तारा शक्ती अगम्या शिवभजकां गौरी ॥ सांख्य म्हण्ती प्रकृती निर्गुण निर्धारी ॥ गायत्री निजबीजा निगमागम सारी । प्रगटे पद्मावती निजधर्माचारी ॥ ३ ॥

अमृतभरिते सरितें अघदुरितें वारी ॥ मारी दुर्घट असुरां भवदुस्तर तारीं ॥ वारी मायापटल प्रणमत परीवारीं । हे रूप चिद्रुप दावी निर्धारी ॥ ४ ॥

चतुराननें कुश्चितकर्माच्या ओळी । लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी ॥ पुसोनि चरणा तळी पदसुमने क्षाळी । मुक्तेश्वर नागर क्षीरसागरबाळी ॥ ५ ॥

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.