श्रीनग्नभैरवराज स्तोत्र

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

॥ ॐ ॐ ॐ॥ ॥ श्रीभूस्वानंदाधिशोमयुरेश्वरोविजयते॥

॥अथ श्रीनग्नभैरवराज-स्तोत्र॥ श्रीगणेशाय नम: ॥ श्रीनग्नभैरवराजाय नम:॥ (श्लोक अनु.)।

श्रीनग्नभैरव देवा, नमस्कार असो तुला। कृपा करूनि रक्षावा, दयाळा दास आपुला ॥1॥ प्रचंड भीमरूपा हे भैरवा परमेश्वरा। सुटतो ऎकूनी कंप, त्वदरवा करमेश्वरां ॥2॥ वज्रदेहा कृपासिंधो, अधर्मिष्ठा भयप्रदा। धर्मिष्ठा रक्षिसीं प्रेमें वारूनी सर्व आपदा ॥3॥ गाणेशांचा प्राणसखा, एकला तूंचि बा खरा।रक्षिसी पुढतीं मागें, मायसा स्वीय लेकरां ॥4॥ श्रीभूस्वानंद सत्क्षेत्रीं, मुख्याधिष्ठान शोभलें। परंतु गाणपत्यार्थ चित्त सर्वत्र लोभलें ॥5॥ सप्रेमें नाचसी देवा। गणेशानाग्रिं जेधवां। देहभान न तें राहे, मोद हा वाढतो नवा ॥6॥ अट्टाहासरवे देवां, दानवा कांपरे भरे। नग्नभैरव हे कानीं, ऎकतां धृति ना उरे ॥7॥ सर्वमायाविहिना हे, सर्व-मायाप्रचालका। सर्वांतर्यामिगा देवा, रक्षिं या दीनबालका ॥8॥ भुक्तिमुक्तिप्रदा स्वामिन, धन्यधान्यविवर्धना। योगींद्रपाला नमितों पाव रे दुष्टमर्दना ॥9॥ त्वदभीतीने विश्व सारें भयभीतचि वर्ततें। त्वत्पादनिष्ठ गणती भवसिंधूसि गर्त ते ॥10॥ कृपाळा भैरवा पाव, नाव आम्हांसि या भवीं। तुझी कृपा एक मात्र, आम्हां दीनां सदा हवी ॥11॥ स्तविती स्तोत्रराजे या, जे तुला करूणाघना। तयातें लेश ना होती भैरवेश्वर यातना ॥12॥ अनुष्टुप वृत्तिं पहिले रत्न श्रीनग्नभैरवा। अर्पी अंकुशधारी हा, करूनी करुणा - रवा ॥13॥ जय जय गणराज समर्थ॥ इति श्रीनग्नभैरवराजार्पणमस्तु॥ श्रीस्वानंदेशार्पणमस्तु॥

वरील स्तोत्राशिवाय आणखी एक स्तोत्र खालीलप्रमाणे आहे.

॥ सकलभयहर श्रीनग्नभैरवराजनमस्कारस्तोत्र ॥ (भुजंगप्रयात श्लोक) मयुरेश्वराचा महाभक्तराज। महासिद्धिसुनु प्रतापी विराज॥ पहा शूलधारी महामुक्तकेशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥1॥ निजानंदलोकीं गणेशासमोर। पहा बालरूपी स्वमायाकुमार॥ करीं नृत्य मोदें हरी भक्तपाशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥2॥ महाव्यक्तसत्ता मुदानंदधारा। गळे व्यक्तरूपें गमें सौख्यसारा॥ जनान्त:स्वरूपे धरी भीमवेषा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥3॥ सुरक्तांग सिंदूरगंधानुलिप्त। कटी वज्रकौपीन-संबद्धहस्त॥ असे भीतिहारी सदा ढुंढिदासां। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥4॥ महामंडपीं देउळीं मायुरांत। सदा रक्षणी क्षेत्रगांच्या रहात॥ महागाणपत्यांविषीं प्रीत ऐशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥5॥ करी फार लीला हरी सर्व बाधा। वळे गाणपां भक्तिभावें न साधा॥ अनन्या जनां रक्षितो त्या परेशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥6॥ अगाणेशभावें जधीं त्रस्त झाला। महाराज देवा शरण्यार्थ आला। तदा भिल्लवेषा धरी आधिनाशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥7॥ जसा ये उमाठ्यावरी अंशुमाळी। तशी दिव्यतेजोज्वळी मूर्ती आली॥ पहा भैरवाची तदा विघ्ननाशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥8॥ दिसे वामहस्तीं धनुष्य प्रयुक्त। तयें दक्षिणें बाण तीक्ष्ण प्रभात॥ कटीं खड्गधेन्वाख्य शस्त्रेच ऐशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥9॥ जटाजूट मौळीं चलदभृंग कृष्ण। सुवेणी-कृत श्यामलांग प्रभीष्ण॥ जपापुष्प-रक्तांबरे भूषिलासा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥10॥ त्रिनेत्र प्रभु सोमभाले विशालें। महारक्तशा इक्षणें भीत काळे॥ पळावें अशा आदरीं भव्यवेषा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥11॥ पहा कुंडलें कानीं शंखाकृतींचीं। गळीं मोतियांच्या प्रभा मालिकांची॥ पहा सुंदरा वीरभावा गुणेशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥12॥ सुफुल्लांबुजासारिखें दिव्य वक्त्र। महापूर्णिमाचंद्रसें ब्रम्हसूत्र॥ दिसे मोरपिच्छीं जटा शोभिताशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥13॥ महा कर्मठीं प्रेरिला आभिचारीं। नृपा गाणपा मारण्या हस्ती भारी॥ तया वारणा वारण्या सिद्धवेषा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥14॥ अशा भिल्लवेषें करी सज्ज चाप। शरा योजिलें पाहुनि लक्ष ताप॥ प्रतापी गजा संस्थिता पांच कोसा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥15॥ धरी धान्य सिहास्य-विघ्नेंश्वराचे। जपीं अस्त्र सिंहास्यमंत्रे तयाचें॥ अशा उज्वला चापधारी परेशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥16॥ टणत्कारिता चाप तो बाण वेगें। झणत्कार शब्दें निघालाच रागें॥ गमे सर्पराजी महापक्षिराट्सा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥17॥ दिशो व्याप्त तेजें मही धुंद झाली। सुरीं इश्वरीं भीती मोठी उडाली॥ राजा लक्षुनि बाण गेलाच ऐशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥18॥ गजा वारिले हारिले सर्व शत्रू। अगाणेश जे पीडिती ढौंढ पात्रू॥ महानंद झाला तसा गाणपेशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥19॥ मयुरेश्वरा वंदिलें भिल्लवेषें। तदा भैरवें नग्नसंज्ञें सुहर्षे॥ तये गौरवीला निजानंदतोषा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥20॥ असें रूप ध्यानीं धरूनी भजावें। प्रभूभैरवा आपदासीं त्यजावें॥ दिला विघ्नपें भैरवा मान ऐसा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥21॥ नसे मयिका लेश ठावा गुणांना। तरी नग्नसंज्ञा तयासी म्हणाना॥ चिदानंद-सत्यार्थभावा गुणेशा। नमो नग्नसंज्ञा तया भैरवेशा॥22॥ (स्त्रग्धरा) नमस्कारस्तोत्र प्रकटमहिमा वीर गरिमा। मनी ध्यातां गातां सतत भयकालीं च परमा॥ तरी मयुरेश्वरप्रभु-सुत अशा भैरववरा। कृपा येई वारीं सकलभयविघ्नादिक दरा॥23॥ (अनु.) श्रीनग्नभैरवेंद्रांचें नमस्कार प्रभावद। स्तोत्र मी बालहेरंबे गाइलें शुद्ध सत्पद॥24॥ ध्यानीं धरुनि तद्रूपा ममाखिलभया पहा। अर्पिलें श्रीमयुरेशपालका मोद दे महा॥25॥ श्रीमद् गणेशार्पणमस्तु। श्रीमन्नग्नभैरवराजार्पणमस्तु॥

ही दोन्ही स्तोत्रे आद्यगाणपत्यपीठ श्रीक्षेत्र मोरगाव, जि. पुणे येथील मंदिरात लावलेली आहेत. श्री अंकुशधारी महाराज व श्री हेरंबराज या गेल्या शतकातील श्रेष्ठ गणेशाचार्यांनी ती लिहिली आहेत. अधिकमाहिती श्रीक्षेत्र मोरगाव येथील श्रीयोगिन्द्र मठातून मिळू शकेल.

बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.