श्रीदेवीची भजने

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>

भजन 1

माय भवानी तुझे लेकरू कुशीत तुझीया ये‌ई सेवा मानून घे आ‌ई, सेवा मानून घे आ‌ई, सेवा मानून घे आ‌ई ॥धृ॥

तू विश्वाची रचिली माया, तू शितल छायेची छाया तुझ्या दयेचा ओघ अखंडित दुरीत तयाला ने‌ई दुरीत तयाला ने‌ई, सेवा मानून घे आ‌ई ॥१॥

तू अबला अविनाशी किर्ती, तू अवघ्या आशांची स्फूर्ती जे जे सुंदर आणि शुभंकर, पूर्णत्वाते ने‌ई पूर्णत्वाते ने‌ई, सेवा मानून घे आ‌ई ॥२॥

तूच दिलेली मंजूळ वाणी, डोळ्यांमधले निर्मळ पाणी तूझ्यां पूजनी माझ्याजवळी, याविण दुसरे नाही याविण दुसरे नाही, सेवा मानून घे आ‌ई ॥३॥

भजन 2

ये‌ई अंबे भजनाला धावूनी ये ग सुंदर साडी सावरत ये ग चंदेरी काठ त्याचा आवरीत ये ग ॥धृ॥

गा‌ईन तुजला गीत तुझे गं पैंजण रुणझुण वाजवीत ये गं ठेक्यावरती टाळ माझी ठुमकत ये गं ॥१॥

लाविन तुजला कुंकुम भाळी नेसवीन तुजला साडी चोळी सिंहावरती बसण्याला लवकर ये गं ॥२॥

चमेली गुलाब चाफा गुंफुनी सारे सौंदर्याचा मोरपिसारा फुलवित ये गं ॥३॥

तूच तुका‌ई तुळजापुरची मायभवानी माहुरगडची काजळनयनी तांबुल ओठी हासत ये गं ॥४॥

भजन 3

जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥धृ॥

देवीच्या देवळात कोण गं उभी ओटी भरण्या मी हाय उभी जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥१॥


हिरवा चुडा भरते करी

जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥२॥

पाच फळ मी आणीली आरास त्याची मी मांडीली जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥३॥

सिंहासणी शस्त्र धारीणी भक्तालागी ये धावूनी जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥४॥

जगताची तू मायमा‌ऊली भगवा झेंडा फडकूनी गगनीं जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥५॥

एका जनार्दनी पूर्ण कृपेने आसूर मारीले भक्त तारिले जगदंबे दर्शन दे गं मला मी थांबू कुठंवरी ॥६॥


<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.