श्रीदेवीची खेळगाणी

विकिस्रोत कडून

<poem> सावर सावर अंबामाता पैठणीचा घोळ गं पैठणीचा घोळ गं अंबामाता खेळ गं ॥धृ॥ पायी पैंजण चाळ गं अंबामाता खेळ गं ॥१॥ हळदकुंकू लेगं अंबामाता खेळ गं ॥२॥ घागर उचलूनी घे गं फुंकर मारुनी खेळ गं फूऽ फूऽ फूऽ फूऽ ॥३॥

____________________________________________________________________________________________________________________________

न‌ऊवारी साडी नेसूनि बा‌ई लुगडी कोल्हापूरात अंबा खेळते फुगडी ॥धृ॥ माहूरगडच्या रेणुकेला फुगडी खेळायला निरोप दिला खणखण वाजते हातातली बांगडी, कोल्हापूरात अंबा खेळते फुगडी ॥१॥ वणी गावची सप्तशृंगी बा‌ई ही आली घा‌ईघा‌ई । खेळ खेळता घालिते बा‌ई, लंगडी, कोल्हापुरात अंबा खेळते फुगडी ॥२॥ मांढर गावची काळूबा‌ई फुगडित बा‌ई ही दंग झाली चमचम करते साताऱ्याची बुगडी ग, कोल्हापुरात अंबा खेळते फुगडी ॥३॥ पाथर्डीची मोठी आ‌ई भक्तिभावाचा मेळ घाली देवीला बसायला टाका की हो घोंगडी, कोल्हापुरात अंबा खेळते फुगडी ॥४॥

__________________________________________________________________________________________________________________________________ कुंकू कुंकू लावू या ग कुंकू लावू या कुंकू लावू या ग कुंकू लावू या कुंकू लावू या ग कुंकू लावू या आपण साऱ्या सुवासिनी कुंकू लावू या ॥धृ॥

कटी हिऱ्यांचा मेखला, कंठी शोभे मुक्तिहारा अशा महालक्ष्मीला कुंकू लावू या ग ॥१॥

करी धरी तलवारीला भाळी कुंकूमाचा टीळा अशा भवानीला आपण कुंकू लावु या ग ॥२॥

मयूराचे ते वाहन नित्य विणेचे वादन अशा सरस्वतीला आपण कुंकू लावू या ग ॥३॥

मुखी तांबुल शोभला स्थान तिचे माहुर गडाला अशा रेणुकेला आपण कुंकू लावु या ग ॥४॥

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.