श्रीकृष्णाची भूपाळी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

भूपाळी १[संपादन]

ऊठि गोपाळजी! जाइ धेनुकडे ।
पाहती सौंगडे वाट तूझी ॥ ध्रु. ॥

लोपली हे निशी मंद झाला शशी ।
मुनीजन मानसी ध्याति तुजला ॥ १ ॥

भानु-उदयाचळी तेज पुंजाळले ।
विकसती कमळे उदकावरी ॥ २ ॥

धेनुवत्से तुला बाहती माधवा ।
ऊठि गा यादवा उशिर झाला ॥ ३ ॥

ऊठि पुरुशोत्तमा वाट पाहे रमा ।
दावि मुखचंद्रमा सकळिकांसी ॥ ४ ॥

कनकपात्रांतरी दीपरत्ने बरी ।
ओंवाळिती सुंदर तूजलागी ॥ ५ ॥

जन्मजन्मांतरी दास होऊ हरी ।
बोलती वैखरी भक्त तुझे ॥ ६ ॥

कृष्णकेशव करी चरणांबुज धरी ।
ऊठि गा श्रीहरी मायबापा ॥ ७ ॥

भूपाळी २[संपादन]

जाग रे जाग बापा । विश्वपालका कृष्णा ।
दीन आम्ही उभे द्वारी । आमुची बोळवी तृष्णा ॥ ध्रु. ॥

त्रासलो प्रपंची या । बहु कष्टलो भारी ।
म्हणवूनि शरण आलो । विभो तुझिया द्वारी ॥ १ ॥

सांग बा न्यून काय । हरि तुझिया भांडारी ।
याचक भीक मागे । प्रेम दीई झडकरी ॥ २ ॥

गुरुकृपे उदयो झाला । हरि उदया आला ।
सुख ते काय सांगू । जिवलग भेटला ॥ ३ ॥

श्रीगुरुनाथराया । कृपासिंधु गोविंदा ।
देवनाथ प्रार्थिताहे । प्रभुपदारविंदा ॥ ४ ॥

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg