श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> श्रीकोल्हापुरवासिनि जननि जगदंबे । आदिमाये आदिशक्ति जय सकलारंभे । जय देवि जय देवि ॥ धृ॥

तुळजापूर गडचांदे बासर बोधन, अंबे जोगा‌ईचे माहूर राशीन । सप्तशृंगगडासि अभिनव तव ठाण, केलें अघोररूपें दैत्यांचे मथन ॥१॥

पावागड कलकत्ता शांतादुर्गा ती, द्र्‌वाविडदेशीं मदुरेमाजीं तव वस्ती । जिकडेपहावे तिकडे अंबे तव व्याप्ती, निर्गुण ब्रह्माची तूं अभेद्यशी शक्ति ॥२॥

पदनत रक्षायातें धरिला अवतार, मर्दुनि कोल्हासुर तो सुखी केले अमर । त्रंबुलीचा महिमा वानिती निर्जर, जवा‌आगळी काशी म्हणती करवीर ॥३॥

आतां हीच विनंती अंबे तव चरणां, कृपाकटाक्षे वारी भक्तांची दैना । आयुबलधन दे‌ऊनि नांदवि सुखसदना, प्रेमें दासगणूच्या मान्य करी कवना ॥४॥

<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg