शुभ्र बुधवार व्रत/बारा राशी आणि बुध

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

प्रत्येक स्थान एक विशिष्ट गोष्ट सांगत असते परंतू त्या स्थानावर इतर ग्रहांची कितवी दृष्टी आहे शिवाय त्यापासून मिळणारे फलीत हे त्या ग्रहाच्या ( बाल्य ,तरुण वृद्ध आणि मृत ) अवस्था असतात त्यावरुन फलीताची तीव्रता समजण्यास मदत होते खालील तक्तावरुन राशी त्या राशीचे तत्व , त्याचा स्वामी आणि स्त्री किंवा पुरुष हे कसे ओळखावे हे समजायला सोपे जाईल . ( जन्मपत्रिका पाहणाऱ्या व्यक्तीला अचूक तर्कशास्त्र , हस्तसामुद्रिक , फेसरिडींग , शरीरशास्त्र , रत्नशास्त्र इ. गोष्टींचे ज्ञान असणे गरजेचे आहे . )

अष्टम स्थान हे मृत्यू स्थान आहे तसेच ते परदेश प्रवासही सांगते हा प्रवास कसा होईल वायू (विमान ) जल ( जलमार्ग ) पृथ्वी ( जमिनीवर ) अग्नी * ( आठवत नाही ) हे त्या स्थानातील आकड्यावरुन दर्शवते त्यानंतर प्रश्न येतो हा प्रवास कसा होईल लवकर / उशीरा तर याचे उत्तर असे की तो आकडा म्हणजे राशीचा क्रमांक आणि ती राशी कोणत्या अवस्थेत आहे ते बघून भविष्य वर्तवले जाते . तरीही इतर ग्रहांची कितवी दृष्टी आहे ते पाहून प्रवास कसा होईल म्हणजे सुखकारक , समाधानकारक , आनंदी , सामान्य , क्लेशदायक हे सुद्धा पाहता येते .

●संबंधित व्यक्तिचा जन्म कोणत्या प्रहरी झाला सकाळी , दुपारी , संध्याकाळी किंवा रात्री हे सुद्धा पाहणे शक्य आहे ? उत्तर :- होय , कुंडलीतील बारा स्थाने आकाशाची निर्देशक आहेत . सूर्य प्रत्येक स्थानातून दोन तासांनी पुढे सरकतो खालील वेळ तक्ता दिला आहे त्यामुळे पत्रिकेत सूर्य ज्या स्थानी असेल त्या स्थानाची वेळ लक्षात घेऊन आपण संबंधित व्यक्तिचा जन्म कोणत्या प्रहरी झाला हे सांगू शकतो ◆प्रथम स्थान ( ६-८) द्वादश (८-१०) एकादश ( १०-१२) , दशम (१२-२ ) नवम (२-४) अष्टम (४-६) सप्तम (६-८) हा झाला उदित गोलार्ध षष्ठम ते प्रथम हे अनुदीत गोलार्थ आहेत . षष्ठम ८-१० पंचम १०-१२ चतुर्थ १२-२ तृतीय २-४ द्वितीय ४-६ आणि प्रथम ६-८ हा झाला अनुदीत गोलार्ध


● पत्रिका स्त्रीची आहे किंवा पुरुषाची हे कसे पाहता येते ? ◆समस्थानी ( २,४,६,८,१०,१२ ) शनी असेल तर स्त्रीची कुंडली आणि विषमस्थानी ( १,३,५,७,९,११, शनी असेल तर पुरुषाची कुंडली


क्र. राशी  तत्व    स्वामी   स्त्री/पुरुष                

१. मेष    अग्नि    मंगळ    पुरुष

२. वृषभ पृथ्वी     शुक्र     स्त्री

३. मिथुन   वायू     बुध      पुरुष

४. कर्क    जल      चंद्र     स्त्री

५. सिंह   अग्नि     रवी      पुरुष

६. कन्या  पृथ्वी     बुध      स्त्री

७. तूळ      वायू      शुक्र     पुरुष

८ वृश्चिक   जल     मंगळ     स्त्री

९. धनू     अग्नि     गुरु      पुरुष

१० मकर    पृथ्वी    शनी     स्त्री

११. कुंभ   वायू     शनी     पुरुष

१२. मीन   जल      गुरु     स्त्री




<poem>


बारा राशी आणि बुध

१. मेष.

२. वृषभ.

३. मिथुन.

४. कर्क.

५. सिंह.

६. कन्या

७. तूळ

८. वृश्चिक

९. धनू

१०. मकर

११. कुंभ आणि

१२. मीन अशा बारा राशी आहेत.

१) प्रथम म्हणजे तनुस्थानी

यात बुध ग्रह - ३, ६, ७ व ११ या राशींपैकी एखाद्या राशीत असेल तर ती व्यक्ती बुद्धिमान व बोलण्यात चतुर असते. आठव्या राशीत बुध असल्यास त्याला औषधाचे व रसायनाचे ज्ञान असते. मात्र शनीसह बुध असेल तर वाईट फळ मिळेल. यासाठी अगोदर स्थानांची नावे देतो; ती अशी -

१ - तनु,

२- धन

३- सहज

४ - सुख

५ - सुत विद्या

६ - रिपु (शत्रु)

७ - जाया

८ - मृत्यु

९ - भाग्य

१० - कर्म

११ - आय

१२ - व्यय.

२) द्वितीय म्हणजे धन व कुटुंब स्थान

यात बुध असल्यास वयाच्या ३२ व्या वर्षापासून भरभराट होते.

३) तृतीय म्हणजे सहजस्थान

यात बुध असल्यास बंधुभगिनी, पराक्रम, कर्तृत्व, दर्जा, प्रवास यांची स्थिती कळते. ही व्यक्ती आपले विचार दुसर्‍यास सांगत नाही. ४ व १२ या राशींत शनीसुद्धा बुध असल्यास ही व्यक्ती अस्थिर चित्ताची व भित्री असते.

४) चतुर्थ स्थान म्हणजेच सुखस्थान

यावरून माता, शेतीवाडी, घरदार यांचा विचार करतात. ३ व ६ या राशींत बुध असल्यास आयुष्याचा उत्तरार्ध सुखात जातो आणि अशा व्यक्तीची स्मरणशक्ती तीव्र असते.

५) पंचम म्हणजे सुत आणि विद्यास्थान

यात बुध असल्यास अशा व्यक्तीचे डोळे सुंदर असतात. ही व्यक्ती उपासना चांगली करते. मंत्रतंत्राची याला आवड असते. सरकारी नोकरी मिळते, असे फळ बुध देतो.

मात्र पंचमातील बुध शनीने युक्त असल्यास एकच संतती हयात राहते. पंचमातील बुध मातेचा नाश करतो.

६) सहावे स्थान म्हणजे रिपू किंवा शत्रुस्थान

यात बुध असल्यास नोकरीत त्रास होतो. पण लेखनकला व मुद्रणकला यांपासून त्याचा चांगला फायदा होतो.

७) सातवे स्थान म्हणजे जायास्थान

जायास्थान म्हणजे पत्‍नीचा विचार करण्याचे स्थान. कोर्ट-दरबाराचे स्थान. यातील बुध चांगली स्त्री मिळवून देतो. पण बुधाचा अस्त असल्यास लग्न उशिरा होते. कोणत्याही विषयावर हा मनुष्य लेख लिहू शकेल.

८) आठवे स्थान म्हणजे मृत्युस्थान

हे अचानक धनलाभाचे स्थान. याने भागीदारीत धंदा करू नये. बुध जर शत्रूराशीत असला तर त्या व्यक्तीचा अधःपात व स्त्रीच्या बाबतीत केलेल्या कृत्यामुळे वाईट कीर्ती होते.

९) नवम स्थान म्हणजेच भाग्य किंवा दैवस्थान

यात बुध असल्यास याची धार्मिक मते संस्कृतीचा आग्रह धरणारी असतात. पण हाच बुध पापग्रहाने युक्त असेल तर व्यक्ती नास्तिक बनते.

१०) दशम स्थान म्हणजे कर्मस्थान

यातील बुध शनीसंबंधित असल्यास ही व्यक्ती खोटे कागदपत्र तयार करते, लाच खाते.

११) एकादश स्थान म्हणजेच आयस्थान किंवा लाभस्थान

यात बुध असल्यास या व्यक्तीचा हेवा करणारे लोक फार असतात आणि यांचे मित्रही टिकून केलेल्या पत्रव्यवहारामुळे गैरसमज होतो.

१२) बारावे स्थान म्हणजे व्ययस्थान

खर्चाचे स्थान. यात बुध असल्यास या व्यक्तीबद्दल वाईट अफवा पसरतात. याची वर्तमानपत्रांतून निंदानालस्ती होते. दुसर्‍यांकडून वारंवार ही व्यक्ती फसते.

<poem>

हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.