शंकराची भूपाळी
Appearance
धवळे भोळे चक्रवर्ती । धवळे अलंकार शोभती ।
धवलें धाम उमापती । सदा चित्तीं चिंतावा ॥ध्रु.॥
धवळ्या जटा गंगाजाळ । धवळा मयंक निर्मळ ।
धवले कुंडलांचा लोळ । शंखमाळ लोंबती ॥१॥
धवळी स्फटिकांची माळ । धवळे गळां उलथे व्याळ ।
धवळे हाती नर-कपाळ । धवळा त्रिशूळ शोभतसे ॥२॥
धवळा सर्वांगे आपण । धवळे विभूतीचे लेपन ।
धवळे गात्र धवळे वसन । धवळे वाहन नंदीचे ॥३॥
धवळे कैलास भुवन । धवळे मध्ये सिंहासन ।
धवळे शंकराचे ध्यान । दास चिंतन करीतसे ॥४॥
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. |
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.