व्यंकटशेस्तोत्रम्

विकिस्रोत कडून


श्री गणेशाय नमः ॥
श्री व्यंकटेशाय नमः ॥

ॐ नमोजी हेरंबा सकळादि तूं प्रारंभा ॥
आठवूनि तुझी स्वरुपशोभा वंदन भाव करीतसी ॥१॥

नमन माझे हंसवाहिनी वाग्वरद विलासिनी ॥
ग्रंथ वदावया निरुपणी भावार्थखाणी जयामाजी ॥२॥

नमन माझे गुरुवर्या प्रकाशरुपा तूं स्वामिया ॥
स्फूर्ति द्यावी ग्रंथ वेदावया जेणे श्रोतेया सुख वाटे ॥३॥

नमन माझे संत सज्जनां आणि योगिया मुनिजनां ॥
सकळ श्रोतेयां सज्जनां नमन माझे साष्टांगी ॥४॥

ग्रंथ ऐका प्रार्थनाशतका महादोषासी दाहका ॥
तोषूनियां वैंकुठनायका मनोरथ पूर्ण करील ॥५॥

जयजयाजी व्यंकटरमणा दयासागरा परिपूर्णा ॥
पंरज्योती प्रकाशगहना श्रवण की जे ॥६॥

जननीपरी त्वा पाळिले पितयापरी त्वा सांभाळिले ॥
सकळ संकटापासूनि रक्षिले पूर्ण दिधले प्रेमसुखा ॥७॥

हे अलैलिक जरी मानवी तरी जग हे सृजिलें आघवी ॥
जनकजननी स्वभावी सहज आले अंगासी ॥८॥

दीनानाथा प्रेमासाठी भक्त रक्षिले संकटी ॥
प्रेम दिधले अपूर्व गोष्टी भजनासाठी भक्तांच्या ॥९॥

आता परिसावी विज्ञापना कृपाळुवा लक्ष्मीरमणा ॥
मज घालोनि गर्भाधाना अलैलिक रचना दाखिवली ॥१०॥

तुज न जाणतां झालो कष्टी आता दृढ तुझे पायी घातलीं मिठी ॥
कृपांळुवा जगजेठी अपराध पोटी घालीं माझे ॥११॥


हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते.
बहूतेक या पानावरील मजकूर प्रताधिकारीत आहे, त्यामुळे हे पान हटवण्यात येईल. या पानातील मजकूराच्या प्रताधिकार स्थितीची तपासणी करून त्यानंतर तो ठेवायचा की काढून टाकायचे हे ठरवले जाईल. आपण कोणत्याही पानाच्या चर्चा पानावर त्या त्या मजकूराच्या प्रताधिकार स्थितीबद्दल चर्चा सुरु करु शकता. ती करित असताना आपण इतर सक्रिय सदस्यांना त्यात सामील करून घ्या. स्थानिक किंवा वैश्विक प्रचालक फक्त समुदायाने घेतलेल्या निर्णयाची तांत्रिक अंमलबावणी करतील. हा विकिस्त्रोत प्रकल्प आहे त्यामुळे या प्रकल्पावर फक्त आणि फक्त स्त्रोत असलेलाच मजकूर जो पूर्व प्रकाशित पुस्तकांमधून घेतलेला आहे, आणि पुरावा म्हणून त्या पूर्व प्रकाशित पुस्तकाची प्रत कॉमन्सवर अपलोड करण्यात आलेली आहे. या व्यतिरीक्त इतर सर्व मजकूर पुराव्या अभावी आणि प्रताधिकाराचा भंग होत असल्याच्या कारणाने काढून टाकण्यात येईल.