Jump to content

पान:ज्ञानेश्वरवचनामृत.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१८४ ज्ञानेश्वरवचनामृत. [६१६० परि आपणणि जे एक । ते तैसेंचि सुख साजुक। सप्रेमालागीं देख । ठेविले जतन ॥ . . . ज्ञा. १०. १२९-१३९.। १६१. " आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया." मग निःसीमभावउल्हासे । मज अर्पावयाचेनि मिसे। फळ एक आवडे तैसे। भलतयाचे हो ॥ . भक्त माझियेकडे दावी । आणि मी दोन्ही हात वोडवीं । मग देठ न फेडितां सेवीं। आदरेसी॥ पैं गा भक्तीचेनि नांवे । फूल एक मज द्यावें। ते लेखें तरि म्यां तुरंवावें । परि मुखींचि घाली ॥ है असो कायसी फुले । पानचि एक आवडते जाहाले। ते साजुकही न हो, सुकले । भलतैसे ॥ परि सर्वभावे भरले देखे । आणि भुकेला अमृते तोखे। तैसे पत्रचि परि तेणें सुखे । आरोगू लागे ॥ अथवा ऐसेही एक घडे । जे पालाही परि न जोडे। . तरी उदकाचे तंव सांकडे । नव्हेल की॥ ते भलतेथ निमोले न जोडिता आहे जोडले। तेचि सर्वस्व करूनि अर्पिले । जेणे मज ॥ तेणे वैकुंठापासोनि विशाळे । मजलागीं केली राउळे। कौस्तुभाहूनि निर्मळे । लेणी दिधलीं ॥...॥ है. सांगावे काय किरीटी । तुवांचि देखिले आपुलिया दिठी। मी सुदामयाचिया सोडी गांठी । पव्हयासाठी ॥ पै भक्ति एकी मी जाणे । तेथ साने थोर न म्हणे । आम्ही भावाचे पाहुणे । भलतेया॥ १ अनुच्छिष्ट, २ अमर्याद प्रेमाच्या उत्कर्षानें. ३ निमित्तानें. ४ हवे ते. ५ पुढे करतोः ६ तोडतां. ७ समज. ८ हुंगावें. ९ तुष्ट होतो. १० खाऊ लागतो. ११ किमतीवांचून १२ घरे.. . . .