म्हणूनच मी तिला पत्रात लिहिलं की, मुलाचं नाव आपण मकरंद ठेवू...
यात माझा थोडा स्वार्थ नक्कीच आहे, पण तिला दुखवावं हा हेतू नव्हता...
माझ्या मनाची गुंतागुंत व माझ्या पत्रामागची ही भूमिका तिला कदाचित समजणारही नाही. पण तिनं वेगळा अर्थ लावू नये हीच मनोमन इच्छा...
जया, मी तुझ्याकडे येतोय ते या भावनेनिशी. मी तुझ्यावर फार प्रेम करतो गं! तू या पत्रानं दुखावली जाऊ नयेस हीच या क्षणी मी आपल्या कुलदेवतेकडे प्रार्थना करतोय...
सकाळी मी नऊ वाजता औरंगाबादला स्टॅण्डला उतरलो आणि रिक्षाने सरांच्या घरी गेलो आणि अधीरतेने, तरीही धडधडत्या अंत:करणाने मी जयाच्या खोलीत प्रवेश केला -
सर मला दारापर्यंत पोहोचवून सुज्ञपणे माघारी गेले.
मी जयाच्या जवळ गेलो, तिचा हात हाती घेतला आणि हृदयाशी धरून पुटपुटलो. “जया, माय डिअर, माय डार्लिग."
ती प्रसन्न हसली आणि म्हणाली, “आपल्या मकरंदला पाहा ना, मी तर नेहमीच आहे. तो रागवेल अशानं..."
मी चमकलो, पाळण्यातून काढून हृदयाशी तो मासांचा इवलासा गोळा धरला. आणि जयाकडे पुन्हा पाहिले.
तिच्या नजरेत अशी ओढ दाटली होती, जी पूर्वी कधीच नव्हती...
आमच्यातली ती अदृश्य छाया... छे, तिचा मागमूसही आता उरला नव्हता.
लक्षदीप ५७