वाचन

विकिस्रोत कडून


वाचन
डॉ. सुनीलकुमार लवटे


भाग्यश्री प्रकाशन
वाचन

(वैचारिक)
डॉ. सुनीलकुमार लवटे
संपर्क
'निशांकुर', अयोध्या कॉलनी,
राजीव गांधी रिंग रोड, सुर्वेनगरजवळ,
पोस्ट- कळंबा, कोल्हापूर- ४१६ ००७
मो. नं. ९८ ८१ २५ ०० ९३
drsklawatesgrail.com
www.dhsunilkumarlawate.in
© डॉ. सुनीलकुमार लवटे
तिसरी आवृत्ती (सुधारित)
जानेवारी, २०१९
ISEN : 978-81-939119-5-2
प्रकाशक
भाग्यश्री प्रकाशन
बिल्डिंग-३ बी, फ्लॅट क्र. १०२,
पहिला मजला, लेक व्हिस्टा, परांजपे स्कीम,
अंबाई टँक परिसर, रंकाळा तलावाच्या मागे,
कोल्हापूर. पिन - ४१६ ०१०
मो.: ७३८७७३६१६८
मुखपृष्ठ
गौरीश सोनार
मुद्रक
भारती मुद्रणालय
८३२, ई, शाहूपुरी ४थी गल्ली,
कोल्हापूर - ४१६००१
फोन - (०२३१) २६५४३२९

मूल्य ₹२००/

मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणेचे
संस्थापक
श्री.अनिलभाई मेहता
हे महाराष्ट्रातील केवळ अग्रगण्य प्रकाशक नसून
ते प्रत्येक वाचकाची वाचन असोशी
पुरविणारे सजग व सक्रिय ग्रंथसेवी होत.
म्हणून हे पुस्तक त्यांच्या अमृत महोत्सवाप्रीत्यर्थ
त्यांना सविनय अर्पण!

  • तुम्ही स्वतःस साक्षर समजता?
  • तुम्ही नुसते शिक्षित की सुशिक्षित?
  • तुम्ही स्वतःस चोखंदळ वाचक मानता ?
  • तुम्ही तुमच्या वाचनावर कधी विचार केलात?
  • तुम्ही वाचनास काय मानता?

या सर्व प्रश्नांच्या तुमच्या उत्तराच्या कसोटीवर हे पुस्तक एकदा वाचून पहा. मग तुमच्या लक्षात येईल की, आपली उत्तरे चुकीचीच होती... तुम्हास प्रगल्भ वाचक व्हायचे असेल तर...
 सन १९०० मध्ये कोल्हापुरातून प्रकाशित होणाऱ्या 'ग्रंथमाला' मासिकात प्रकाशित झालेला सुमारे ८० पृष्ठांचा निबंध त्या मासिकाचे संपादक वि.गो. विजापूरकर यांनी नंतर पुस्तक रूपात प्रकाशित केला होता. त्याचे लेखक यादव शंकर बावीकर होते. त्याची किंमत १० आणे होती. पुस्तकाचे नाव 'वाचन' होते. सुमारे ११८ वर्षांनंतर 'वाचन' विषयावर लिहिलेल्या माझ्या पुस्तकाचे नाव 'वाचन'च आहे. हे अनुकरण नसून केवळ योगायोग अथवा इतिहासाची केवळ पुनरावृत्ती मानावी.
 वाचन हा पूर्वी माझा छंद होता, आता तो व्यासंग झाला आहे.'वाचन' विषयावर पुस्तक लिहिण्याचा विचार गेले अनेक दिवस माझ्या मनात होता; पण अशा प्रकारच्या पुस्तक लेखनास लागणारी उसंत न लाभल्याने हे लेखन लांबत गेले. या पुस्तकाच्या शेवटच्या परिशिष्टात मी 'वाचन विषयक ग्रंथ आणि विशेषांकाची सूची जोडली आहे. १९७५ पासून मी जाणतेपणाने वाचत आलो आहे. तेव्हापासून सतत 'वाचन' विषयक ग्रंथ वाचनात आणि संग्रहात भरच पडत गेली आहे. ही सर्व पुस्तके वाचनाच्या अनुषंगाने अधिक लिहिली जातात; पण वाचन व्यवहार, प्रक्रिया, स्वरूप, पद्धती अशा अंगाने आपण वाचनाचा विचारच करीत नाही. एका अर्थाने हे पुस्तक 'वाचन विषयक व्याख्या, स्वरूप, पद्धती अशा अंगाने वाचनाची सैद्धांतिक मांडणी करू पाहते आहे.
 पुस्तकाचा प्रारंभ होतो आविष्कार, अनुभूती आणि अभिव्यक्ती विषयक मांडणी करत. हे पुस्तक एका अर्थाने वाचनाच्या अंगाने घेतलेला मानवी विकासाचा शोधच होय. माणसाला व्यक्त केव्हा व्हावंसं वाटलं? पहिल्यांदा कसा व्यक्त, अभिव्यक्त झाला? व्यक्त होण्याची त्याची प्रारंभिक पद्धत/रीत काय होती, हे जाणून घेणे मोठी रंजक गोष्ट आहे. माणूस एकदम लिहू नाही लागला. बोलायला पण फार उशिरा लागला. तो प्राण्यांप्रमाणे ओरडायचा; पण प्रसंगनिहाय त्याचं ओरडणं वेगळं असायचं. एकच उदाहरण देतो म्हणजे आपल्या लक्षात येईल. कुत्रा भुंकतो, केकाटतो नि रडतोही (विशेषतः रात्री). त्याच्या आवाजावरून आपण काय झालं असेल ते ओळखतो, मग आपणास अंदाज येतो. वनमानव असताना माणसाचं ओरडणं आनंद, शोक, भय, आश्चर्य इत्यादी क्षणी वेगवेगळं असायचं. या अनुभवातून तो भावसदृश हावभाव करू लागला. त्याची देहबोली बरीच बोलकी होती. मग तो रेषा, रेघोट्यांच्याद्वारे ‘मला काही सांगायचंय' असं न म्हणता बरंच काही सांगून जायचा. त्याच्या रेखाचित्रांतून तो जे सांगू पाहायचा, ते हळूहळू इतरांना उमजू लागलं नि रंग, रेषा, चित्रांद्वारे संवाद, संपर्काची परंपरा सुरू झाली. चित्रांची अक्षरं बनली. लिपी साकारली. हे सर्व तुम्ही वाचत रहाल, तर अशा नव्या विश्वात जाल, जेणेकरून तुमचा तुम्हालाच विकासबोध होत राहील. हे सर्व स्थळ, काळ, इतिहास, विकासाच्या टप्प्यांनी सांगितलं गेलं असल्याने ते वस्तुनिष्ठ नि वैज्ञानिक लेखन होय.
 आपण 'वाङ्मय’ आणि ‘साहित्य' असे दोन शब्द लेखनास वापरतो. ते आज एकमेकांचे पर्यायवाची वा पूरक असले तरी ते आलेत मात्र इतिहासातून. असेच दोन शब्द आहेत ‘लोकवाङ्मय' आणि 'लोकसाहित्य'. भाषेपूर्वी जशी बोली होती तसे लिखित साहित्यापूर्वी ऐकीव/मौखिक साहित्य होते ते ‘लोकवाङ्मय' होय. कारण ते केवळ बोली रूपात होते. श्रुतिस्मृति रूपात ते एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जात जपले, जोपासले जायचे. 'Folklore' म्हणजे ‘लोकवाङ्मय' आणि 'Folk Literature म्हणजे लोकसाहित्य, लोकसाहित्य हे लोकवाङ्मयाचा लिखित अवतार वा संग्रह होय. तो नंतरच्या काळात सायास केला जातो. निरक्षर युगातले साहित्य म्हणजे लोकवाङ्मय. ते वाचिक, ऐकीव, स्मृतिआधारीत असायचे. ते अस्सल असते तसे सहज, स्वाभाविक सौंदर्याने युक्त. ना अलंकरणाची गरज, ना रचनेची. सहजस्फूर्त म्हणून सुंदर! लोककथा, लोकगीते, लोकनाट्य, लोकभ्रम, लोकरूढी, लोकनीती, लोककला, लोकक्रीडा, लोकसंगीत किती रूपात ते प्रकट होते त्याला काही सीमाच नाही.
 लोकवाङ्मयाचं विकसित रूप म्हणजे साहित्य. ते ग्रंथरूप होण्याचा इतिहास म्हणजे लेखन विकास होय. म्हणजे ५००० वर्षांचा विकास समजून घेताना लक्षात येते की, लेखन विकास झाला नसता तर जगच विकसित झाले नसते. पूर्वसुरींनी लिहून ठेवलेले वाचत माणसाने प्रत्येक क्षेत्रात क्रांतीच नाही, तर उत्क्रांती घडवून आणली. ‘इष्टिका ग्रंथ' ते 'ई-बुक'चा प्रवास केवळ थक्क करणारा. तो तुम्ही मुळातूनच वाचायला हवा. कोरणे, लिहिणे, ठसे, मुद्रण नि आता डिजिटल, व्हर्म्युअल होणं माणसाच्या निरंतर विकासाचाच ध्यास नि धडपड ना?  या सर्व पार्श्वभूमीवर वाचन समजून घेणं म्हणजे ज्ञान साधन विकासाचे वरदान समजून घेणं होय. लहान मुलं वाचतात नि मोठी माणसंही. हौशी वाचक वाचतात नि एखादा संशोधक, साहित्यिक, समीक्षक, बुद्धिवंत, विचारवंत वाचतो ते एकच नसतं. ते समजून घ्यायचं तर वाचन प्रक्रिया, प्रकार समजून घ्यायला पाहिजेत. शब्दशः वाचन, सार्थ वाचन, सव्यसाची वाचन या वाचनाच्या परी समजून घेतल्या की लक्षात येतं की, सत्यनारायणाची पूजा ऐकणं, पोथी वाचणं नि विश्वकोश वाचणं यात काय फरक असतो? आपण वेळ घालविण्यासाठी वाचतो की सत्कारणी लावण्यासाठी, यातला फरक तुम्हाला हे पुस्तक समजावेल. म्हणूनही ते तुम्ही मोठ्या जिज्ञासेने आणि चिकाटीने वाचायला हवे. तुम्हाला प्रगल्भ वाचक व्हायचे तर हा ‘वाचन'ग्रंथ वाचण्यास पर्याय नाही.  सदर पुस्तकाचे प्रकाशन भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूरने केल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार.

१ जून, २०१८
डॉ. सुनीलकुमार लवटे
 

हेलन केलर स्मृतिदिन सुधारित तिस-या आवृत्तीच्या निमित्ताने
 ‘वाचन' पुस्तकाची पहिली आवृत्ती अकराव्या विश्व हिंदी संमेलनाच्या निमित्ताने मॉरिशसला गेलो असताना तेथील विश्वहिंदी सचिवालयात प्रकाशित झाली. पोर्ट लुईस इथे २२ ऑगस्ट, २०१८ ला हा प्रकाशन समारंभ संपन्न झाला. प्रमुख पाहुणे होते स्वीडनच्या उप्साला विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख डॉ. हाईन्स वसलर. समारंभात प्रमुख म्हणून उपस्थित होते विश्व हिंदी सचिवालयाचे महासचिव डॉ. विनोद कुमार मिश्र, हंगेरीतील बुडापेस्ट विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. पीटर शानी, गोहत्ती विद्यापीठ, आसामचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. विनोद मैंधी, मिझोरम विद्यापीठाचे हिंदी विभाग प्रमुख प्रा. सुशील कुमार शर्मा यांच्या शिवाय फिजीचे भारतीय उच्चायुक्त शिष्टमंडळासह उपस्थित होते. या पुस्तकाचे मराठी जगतात चांगले स्वागत झाले. त्याचे प्रमुख कारण होते की वाचनाचा शास्त्र म्हणून विचार-विवेचन करणारे हे पहिले पुस्तक ठरले. शिवाय वाचनाच्या शास्त्रीय अंगाने शतकभरात लिहिलेच गेले नव्हते. त्यामुळे पहिली आवृत्ती हातोहात संपली.
 १५ ऑक्टोबर भारतभर वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा केला जातो. भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा हा जन्मदिन. कोल्हापुरातील वाचनकट्टा बहुउद्देशीय संस्था, मराठी बालकुमार सभा, अक्षर दालन, सृजन फाऊंडेशन, अन्य अनेक शिक्षण संस्था आणि या पुस्तकाचे प्रकाशक भाग्यश्री प्रकाशन यांनी एकत्र येऊन 'जिल्हास्तरीय प्रगल्भ वाचक स्पर्धा - २०१८' चे आयोजन केले. शालेय व महाविद्यालयीन स्तरावर सुमारे १२०० विद्यार्थी बसले आणि दुसरी आवृत्तीही प्रकाशन होताच संपली. स्पर्धा यशस्वी झाली ती वाचनप्रेमी माझे शिक्षक मित्र, संस्थाचालक, पत्रकार,विद्यार्थी, पालक इ. सर्वांमुळे.
 डिसेंबर, २०१८ ला प्रकाशित होणारी तिसरी आवृत्ती सुधारित होय. पहिल्या दोन आवृत्तीतील दोषांचे निराकरण करण्यात आले आहे. काही नवीन, उपयुक्त मजकुराचा समावेश यात करण्यात आला आहे. त्यात ‘सृजनात्मक वाचन' या सर्वथा नव्या प्रकारावर विस्ताराने लिहिले आहे. प्राथमिक वा शालेय स्तरावर विद्यार्थी वाचनाचे पहिले धडे गिरवतो. ते वाचन अध्ययन (Learning to read) कसे घडते याचे विवेचन करण्यात आले आहे. अद्याप मराठीत वाचन शिकणे, शिकवणे या अंगांवर न विचार झाला, न अक्षर लिहिले गेले. ती उणीव भरुन काढण्याच्या हेतूने ‘वाचन : अध्ययन आणि अध्यापन' असा स्वतंत्र मजकूर अंतर्भूत केला आहे.
 पहिल्या दोन आवृत्त्यांत प्रकाशित वाचन सुभाषिते मराठी, हिंदी, इंग्रजी दिली गेली असली तरी ती मुख्यत: पाश्चात्य विचारक, साहित्यिक, समीक्षकांची होती. 'महाराष्ट्र टाइम्स'मध्ये ‘वाचन' पुस्तकाचे पहिले परीक्षण लिहिणारे माझे स्नेही नि सन्मित्र डॉ. जी. पी. माळी यांनी ही गोष्ट माझ्या लक्षात आणून दिली. त्या त्रुटीची पूर्तता या आवृत्तीत मराठी हिंदीतील एतद्देशीय साहित्यिक, समीक्षक, विचारक यांच्या सुभाषितांची भर घालून करण्यात आली आहे. शिवाजी विद्यापीठाच्या मराठी विभागातील प्रा. डॉ. नंदकुमार मोरे यांनी ‘साप्ताहिक साधना'मध्ये परीक्षण लिहून ‘वाचन' पुस्तकाचा परिचय साऱ्या महाराष्ट्रास करून दिला याची नोंद घेऊन ‘वाचन'चा अंतर्भाव अनेक विद्यापीठे आपल्या अभ्यासक्रमात करत आहेत, ही स्वागतार्ह बाब होय. लवकरच या सुधारित आवृत्तीचे भाषांतर हिंदीत राजकमल प्रकाशन समूहाकडून व्हावे म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यामुळे वाचनाचा वैज्ञानिक विचार सर्व भारतीय भाषा आणि साहित्यातून होण्यास प्रारंभ होईल असा विश्वास वाटतो.

५ डिसेंबर, २०१८
- डॉ. सुनीलकुमार लवटे
 

अनुक्रम

१.  माणसाचं व्यक्त होणं ११
१.१ पार्श्वभूमी
१.२ माणसाचे बोलणे
१.३ बाबेलचा मनोरा आणि बहुभाषिकत्व
१.४ माणसाचा विकास : बोली आणि भाषा
२. लोकसाहित्य : उगम आणि विकास २०
२.१ लोकसाहित्य प्रकार, २.१.१ लोकगीते , २.१.२ लोककथा
२.१.३ लोकनाट्य, २.१.४ उखाणे, हुमाण, लोकोक्ती
३. लेखन विकास २५
३.१ लेखन उगम, ३.२ लिपीची उत्क्रांती
३.३ भारतीय भाषा आणि लिपी, ३.४ भारतीय लिपी विकास   
४. ग्रंथ निर्मिती व ग्रंथालय विकास ३७
४.१ ग्रंथ, ४.२ ग्रंथ : शब्द, अर्थ, व्युत्पत्ती आणि व्याख्या
४.३ ग्रंथ : स्वरूप आणि व्याप्ती, ४.४ ग्रंथ : उगम आणि विकास
४.५ मुद्रण : उगम आणि विकास,
४.६ ग्रंथवाचन : पद्धती आणि प्रकार
५. वाचन : स्वरूप आणि व्याप्ती ६१
५.१ वाचन, ५.२ वाचन : शब्द, अर्थ, व्युत्पत्ती आणि व्याख्या
५.३ वाचन : स्वरूप आणि व्याप्ती, ५.४ वाचनाचे उद्देश
५.५ वाचन प्रक्रिया, ५.६ वाचन कौशल्ये
५.७ वाचन प्रकार, ५.८ सृजनात्मक वाचन
५.९ वाचन : अध्ययन आणि अध्यापन,
५.१० वाचन : साक्षरता आणि संस्कृती, ५.११ वाचनाचे महत्त्व
५.१२ वाचन वेग, ५.१३ वाचन आवाका
५.१४ वाचन दोष, ५.१५ वाचन : उगम आणि विकास
५.१६ ई बुक / ई-रिडिंग, ५.१७ ई- रिडर्स (अॅप्स)
६. परिशिष्टे १०१
१. वाचकांचे हक्क, २. ग्रंथ सनद
३. वाचन सुभाषित संग्रह, ४. वाचन, पुस्तके आणि कविता
५. वाचन : अभिप्राय, ६. संदर्भग्रंथ सूची
१. माणसाचं व्यक्त होणं

१.१ आविष्कार, अनुभूती आणि अभिव्यक्ती
पार्श्वभूमी
 माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये अंतर निर्माण करणारे जे अनेक घटक आहेत, त्यात भाषा, हास्य, विचार, बुद्धी, अभिव्यक्ती नि आविष्कार इत्यादी घटकांचा समावेश होतो. माणसाचा विकास ही निरंतर प्रक्रिया होय. मनातलं व्यक्त करण्याची ओढ त्याच्यात निर्माण झाली ती व्यक्त होण्याच्या अंत:स्फूर्त ऊर्जा नि उर्मीतून. विकासकाळात शिकारीसाठी बनविलेले टोकदार दगड, बाण, भाले इत्यादी अस्त्र, शस्त्रांचा प्रयोग तो जंगलातील भटकं जीवन सोडून गुहा, गुंफेत राहू लागला, तेव्हा तो मनातले भाव, विचार, अभिव्यक्त करण्यासाठी करू लागला. मऊ पृष्ठांवर कोरून, ओरखडण्यातून तो स्वत:ला व्यक्त करू लागला. गुंफेत अग्नीचा प्रवेश झाला, तेव्हा कितीतरी गुंफा या काळाच्या ओघात कोरलेल्या, चित्रित केलेल्या आढळल्या. माणसाला व्यक्त होण्याची आवश्यकता जीवन व्यवहारात वाढू लागली ती त्याचं जीवन स्थिर होऊन तो शेती, व्यापार करू लागला, समूह जीवन स्थिर झालं तेव्हा. संवाद, देवाण-घेवाण ही त्याची सांस्कृतिक आणि सामाजिक गरज बनत गेली. कोरण्या, चितारण्यातली मनस्विता हा कधी काळी त्याचा व्यक्तिगत नि एकांत उपक्रम, आविष्कार होता. त्याला देहबोली लाभली ती संवाद, संभाषण, संप्रेषण इत्यादी गरजांतून. मग देहबोलीतील क्रियेबरोबरच समांतरपणे वाचिक संवाद करू लागला. विशेषतः शिकार, शेती करत असण्याच्या काळात किंवा तत्पूर्वी जंगलात टोळी करून राहात असतानाही तो हर्ष, शोक, भय इत्यादी भावना व्यक्त करण्यासाठी पुकारा, आरोळी, आक्रोश, क्रंदन, हास्य, छाती बडवून घेणं, मौन पाळणं इत्यादी क्रिया त्याच्या नित्य प्रतिसाद नि प्रतिक्रियांचा भाग होताच. त्याला नंतर कोरणे, चित्र, ध्वनी इत्यादींमुळे सांकेतिक रूप प्राप्त झाले. नित्य भाषिक, वाचिक उद्गारांना चित्र, चिन्हांची जोड लाभली. बोली भाषा झाली म्हणजे संकेतांना सार्वत्रिक व्यवहार मान्यता नि अनुकरणाने समाज मान्यता मिळाली. तीच गोष्ट चिन्ह, चित्रांची. अशाच प्रक्रियेतून लिपी जन्मली. पुढे वाङ्मयाचे रूपांतर साहित्यात झाले.
  माणसाचा हा सर्व जीवन व्यवहार, व्यापार वाढत्या विस्ताराने व्यापक व गुंतागुंतीचा होत राहिला. त्यातून अंत:प्रत्ययास येणारे भाव, विचार अधिक गुंतागुंतीचे होत गेले. अंत:प्रत्ययातील गोष्टी सारभूतरीत्या निरंतर व्यक्त करत राहणे त्याची गरज बनली. हे व्यक्त होणं अधिक मनस्वी करण्याच्या माणसाच्या ध्यास, धडपडीने ध्वनीला नाद, ताल, संगीताची जोड दिली. हावभाव अधिक लयबद्ध करण्यातून नृत्य, नाटक, अभिनयाचा तसेच संगीताचा जन्म झाला. चित्रांचे, शाईचे एकरूप माध्यम असलेला निसर्ग जसाच्या तसा प्रतिबिंबित करण्यातून सप्तरंग जन्माला आले. चित्रं रंगीत झालीत. ती अधिक सजीव करण्याच्या ध्येय आणि ध्यासातून शिल्प जन्मले. शिळा, डोंगर, गुंफांचे मऊ आणि कठीण कातळ कोरून, खोदून, फोडून तो त्यांना आकार देऊ लागला म्हणजे आपलीच प्रतिकृती, प्रतिबिंब बनवू लागला. पूर्वी वस्तीच्या तोंडावर, वेशीवर असलेल्या बृहशिळा वस्तीचे रक्षण करतात म्हणून त्यांच्याप्रती कृतज्ञता भाव व्यक्त करत, पूजा करत त्यातून देव आणि दैत्य जन्मले, ते भय दूर करण्याच्या निरंतरतेतून. ही निरंतर कर्मपूजा भक्ती बनली.  युद्ध, संघर्ष, नैसर्गिक आपत्ती इत्यादींमध्ये असुरक्षित भावनेच्या वेळी आधार देणारे हे घटक त्याच्या जीवनाचा परिपाठ बनला. विचार, कृती, भाषा, लेखन, भजन, नृत्य, नाटकांतून व्यक्त होणा-या माणसाने भाषा आत्मसात करून ती स्थिर व सार्वत्रिक करण्याच्या गरजेतून वापराचे नियम बनविले. त्याचे व्याकरण झाले. रेषा, रफार, वेलांटी, उकार, लपेटीतून लिपीचा उगम झाला. मौखिक असलेले लोकवाङ्मय लिखित साहित्य बनले ते लिपीच्या वरदानामुळे. भाषा, लिपीस वैविध्य लाभले ते प्राकृतिक, सांस्कृतिक वैविध्यामुळे. निसर्ग, ऋतू, प्रदेश वैभिन्यातून भाषा व लिपीची विविधता जन्माला आली. वैचित्र वैभव बनले. वैविध्यानेच एकतेची हाक दिली. एकीकडे माणूस विकसित होत राहिला, तर दुसरीकडे एकात्म, अंतर्मुख आणि कलात्मकही! १.२ माणसाचे बोलणे
 भाषा फक्त माणसाला लाभली आहे; अन्य प्राण्यांत ती नाही. पिढी दर पिढी माणूस विकसित होत राहतो, ते केवळ भाषेच्याच जोरावर. भाषेद्वारे माणूस ज्ञानग्रहण, वहन, उत्सर्जन करू शकतो. भाषा हा माणसाच्या मेंदूत हरघडी घडून येणारा चमत्कार होय. माणसाने मेंदूत घडणा-या भाषिक क्रियांचा आराखडा तयार करण्यात यश मिळविले आहे. माणसाचा मेंदू ज्या ग्रहण, संवेदन, बोधन, विश्लेषण, ज्ञान प्रसारणादी क्रिया करतो, त्या गुंतागुंतीच्या प्रक्रियांची उकल माणसाने प्रयोग, संशोधनातून सिद्धीस नेली आहे. प्राण्यांचे ‘सांगणे व माणसांचे बोलणे' यात अंतर आहे. प्राणी, पक्षी सांगू शकतात. माणूस बोलू, विचार करू शकतो. भाषा समजून घ्यायची तर आपणास उत्क्रांतीशास्त्र, मेंदूशास्त्र, प्राणीशास्त्र, व्याकरणशास्त्र समजून घ्यायला हवे.
 माणूस बोलतो हे खरे आहे; पण त्याची आद्य भाषा कोणती याचा मात्र शोध लागू शकलेला नाही. म्हणून १८६६ मध्ये पॅरिस इथे स्थापन झालेल्या 'सोसायटी फॉर लिन्विस्टिक' संस्थेने जाहीरच करून टाकले होते की, ‘भाषा उगम’ आणि ‘आद्यभाषा' या दोन विषयांवरील लेख संस्थेच्या मुखपत्रिकेसाठी स्वीकारले जाणार नाहीत. कारण प्रश्न होते. त्यांची उकल होत नाही. अशा पार्श्वभूमीवर केलेले लेखन उपहासाचा विषय ठरतो.
 तरी भाषा उगमाविषयी काही एक विचार जगभर झाला आहे. वेगवेगळे धर्म भाषिक उगमाविषयी काही सांगत आलेत.
१. ख्रिश्चन धर्म- माणसाने भोवतालच्या प्रदेशातील प्राणी-पक्ष्यांना नावे देण्याच्या प्रक्रियेतून भाषा उगम पावली.
२. हिंदू धर्म- शिवाच्या डमरूतून (ध्वनी) भाषा उदयाला आली.
३. आदिम जनजाती - नैसर्गिक आपत्तीतून भाषा उदयाला आली.
 प्राचीन काळी ‘सारे काही देवाने निर्मियले' असा जो समज प्रचलित होता, त्यानुसार भाषा हीपण देवनिर्मिती मानली जायची. संस्कृतला 'देवभाषा' आणि नागरी लिपीस 'देवनागरी' नाव का, त्याची इथे उकल होते.
१.३ बाबेलचा मनोरा आणि बहुभाषिकत्व
मानवी जीवनात भाषांची आज आपण जी रेलचेल पाहतो, तिच्यासंदर्भात ‘बायबल'च्या जुन्या करारात ‘बाबेलचा मनोरा' नावाची एक गोष्ट आढळते. होतं असं की पृथ्वीवर राहणारी माणसं स्वर्गारोहण करण्यासाठी एक मनोरा बांधायचे ठरवितात. मनोरा जसा देवलोकांपर्यंत पोहोचू लागतो, तशी देवलोकांत घबराट पसरते. कारण, स्पष्ट होतं माणसाचं देवसृष्टीवरील आक्रमण, देव माणसाचा मनोऱ्याचा मनोदय तडीस जाऊ नये म्हणून शाप देतात, 'तुम्ही वेगळ्या भाषांत बोलाल. जेणेकरून तुमच्यात बेदीली माजेल. माणसाचं स्वर्गारोहणाचं मनोरथ हे मनोरथ राहून जाईल.' देवाची शापवाणी म्हणजे जगाची बहुभाषिकता.
भाषा विकासाच्या संदर्भातील मूलभूत प्रश्न
१. प्राणीसृष्टीची भाषा असते का? असल्यास ती कशी आहे?
२. माणूस बोलू का लागला?
३. विकास काळात (उत्क्रांती) माणसामध्ये कोणते बदल झाले, जेणेकरून त्याने भाषा आत्मसात केली?
४. भाषिक विकास काळात माणसाच्या मेंदूचा बोधन विकास (Cognitive Development) कशी झाली?
५.माणसाची भाषा कशी उत्क्रांत (Evolution) होत गेली?
या प्रश्नांचा शोध हाच भाषेचा शोध होय.
१.४ माणसाचा विकास (उत्क्रांती)
 आजच्या उत्क्रांत विकसित मानवाचा लाखो वर्षांचा इतिहास आहे. पूर्वीच्या माणसाचे शरीर आजच्या इतके विकसित नव्हते. त्यावेळी भाषासुद्धा आजच्या इतकी विकसित नसावी. माणसाचा भाषिक इतिहास पाहू लागलो, तर बोलीचा इतिहास दहा हजार वर्षांचा, तर भाषेचा अवघा पाच हजार वर्षांचा दिसून येतो. माणसाचा कालपट पाहता, पूर्वज असलेला मानवी वंश (होमोसेपिअन) साठ हजार वर्षांपासून अस्तित्वात आहे. चार पायांवर चालणारा माणूस दोन पायांवर चालू लागल्यानंतर बोलू लागला, याचा अर्थ चालण्याचा बोलण्याशी संबंध असावा हे उघड आहे.
 कारण अन्य चार पायांचे प्राणी इतकी वर्षे उलटली तरी बोलताना दिसत नाहीत. जगात आजमितीस ७००० भाषा आहेत. पैकी काही बोली होत. जगातील या भाषा एकाच भाषेपासून निर्माण झाल्यात का? ते अद्याप ठरलेले नाही. तथापि, भाषिक साम्य (Linguistic Universe) आढळले.
बोली
 बोली हे वाचिक अभिव्यक्तीचं मूळ व्यक्तिरूप. म्हणून तिला व्यक्ती भाषा म्हणूनही ओळखलं जातं. पुढे तिला नित्य व्यापार, व्यवहार, वापरातून सामूहिक रूप प्राप्त होतं. मग ती लोकभाषा म्हणून ओळखली जाते. बोली, लोकभाषेचे व्यवहार हे वापर सातत्यातून निर्माण होतात. एका विशिष्ट भौगोलिक प्रांत, प्रदेशातली बोली, भाषा एक असते. याचे कारण त्या विशिष्ट बोली लोकभाषा प्रांत प्रदेशातील लोक समान वाचीव, ऐकिवाच्या आधारे लोकव्यवहार करत असतात. वाचिक व श्रवण क्षमता असलेल्या प्रत्येकाची जशी भाषा असते, तशी ती नसणाच्या मूक बधिर, अंध व्यक्तीचीपण सांकेतिक वा स्पर्शभाषा असतेच. बोली वा भाषा हे माणसाचे सामाजिक व्यवहार विनिमयाचे साधन आहे. त्यासाठी वाचीव, ऐकीव पूर्वज्ञान, परंपरा, पाश्र्वभूमी आवश्यक असते. अशी माहिती म्हणजे तिची (बोली, भाषा) विशेषता. या विशेषतेतूनच बोली भाषेची विविध रूपे अस्तित्वात येतात. ध्वनी वापराच्या विशिष्ट शैली, परंपरेतून बोली आकाराला येते. त्यातून शृंखलाबद्ध एकता, सातत्य हे वापरातून विकसित होत सार्वत्रिक बनते. त्यातून विशिष्ट प्रदेशातील विशिष्ट जनसमूहाची बोली विशिष्ट होत असते. मराठीच्या कोकणी, खान्देशी, वैदर्भी बोलींचा संबंध प्रदेश विशेषाशी निगडित आहे. बोलीत साधर्म्य असते, तसेच ते भाषेत आणि लिपीतही असते. हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली भाषांमध्ये मोठे शब्दसाधर्म्य आढळते. त्याचा संबंध पूर्वापार भौगोलिक समन्वय व विनिमय हेच होय. बोली भाषांमधील एकरूपता ही सांस्कृतिक एकता, समन्वय व संपर्कातून निर्माण होत असते. बोलण्याचे साधर्म्य व सातत्य हाच बोली नि भाषेचा पाया असतो. नैसर्गिक दुर्गम व असंपर्क यामुळे बोलीचे मूळ रूप टिकून राहते. उलटपक्षी नैसर्गिक उगम व संपर्क सुविधा यांमुळे बोली वा भाषा बदलते. नदी, जंगल, डोंगरासारख्या दुर्गम भागात भाषा, बोलींची विकासगती कुंठित राहिल्याने त्यांचे मूळ रूप टिकून राहते. उलटपक्षी पठार, मैदाने, वाळवंट आदी सुगम प्रदेशांत भाषा, बोली तीव्र गतीने बदलतात, विकसित होतात. व्यक्तिसमूहातील घनिष्ठता, साधर्म्य व्यवहार हे बोलीचे बलस्थान असते. बोलीला प्रदेश मर्यादा असते, तशी वांशिक परंपराही. तिचं स्थानिकत्व हीच तिची खरी ओळख असते. भाषेचे मूळ रूप म्हणजे बोली. विशिष्ट बोली समूहाचं एकत्रित रूप म्हणजे भाषा. बोलीचं लिखित, सार्वत्रिक रूप, लिपिबद्ध स्वरूप म्हणजे भाषा.
भाषा
 भाषा हा माणसाच्या जीवनातील अनन्यसाधारण असे महत्त्व असलेला घटक आहे. इतर प्राण्यांपेक्षा माणूस वेगळा होतो तो भाषा वैशिष्ट्यामुळे. मनुष्य अन्य प्राण्यांपेक्षा (हत्ती, वाघ, सिंह इ.) दुर्बल असूनही तो श्रेष्ठ ठरतो, ते त्याच्या बुद्धी व युक्ती सामर्थ्यांमुळे.हे सामर्थ्य माणूस काळाच्या ओघात विविध, कौशल्यांच्या आधारे सतत विकसित करत आला आहे. माकड वंशातून माणूस वेगळा झाला, तो झाडावरून जमिनीवर राहू लागला म्हणून नाही, तर चार पायांवर चालणारा वनमनुष्य (चिंपाझी, गोरिला) दोन पायांवर चालू लागल्याने. तो हातांच्या बोटांचा वापर निर्मितीसाठी करू लागला. त्याच्या मेंदू विकासामुळे त्याला भाषिक कौशल्य आणि सामर्थ्य लाभले. या बळावरच तो अन्य प्राण्यांपेक्षा वेगळा जसा ठरला तसा श्रेष्ठही.
 'Man is a social animal' अशी त्याची व्याख्या करणारे समाज वैज्ञानिक त्याच्या समूहवृत्तीसच अधोरेखित करत असतात. पूर्वी टोळ्यांमध्ये राहणा-या माणसाने स्वत:चे कुटुंब बनविले तसा समाजही. जसा समाज साकारला तशी त्याला संपर्क, संवादाची गरज निर्माण झाली. प्राणी, पक्षी, जीवजंतू सर्वांच्या जीवनात आचाराची परंपरा आणि परिपाठ असतो. हत्ती, मुंगी, बगळे, मासे, खेकडे सर्वांच्या जीवनाचे निरीक्षण करा. काय दिसते? तर त्यांचे जीवन नियमचक्र नि कर्मकांडांनी बद्ध असते. माणूस याला छेद देऊन जगतो म्हणून निराळा. वाचा आणि ध्वनी यांच्या संतुलित सामर्थ्याने त्याने भाषा निर्मिली. भाषेमुळे तो समाजशील बनला. मूक प्राण्याचा बोलका माणूस बनणे, ही त्याची वांशिक उत्क्रांती होय.
 वाचा नि ध्वनीचे विनिमय सामर्थ्य सर्व प्राण्यांमध्ये आढळते. कुत्र्याचे भुंकणे, गाईचे हंबरणे, सापाचा वा नागाचा फुत्कार, वाघाची डरकाळी, पक्ष्यांचा कलकलाट या साऱ्या गोष्टींतून प्राणी हर्ष, शोक, भय, आनंद इत्यादी भाव व्यक्त करत असतात. माणसाचे वेगळेपण अशात आहे की, त्याने या ध्वनी संकेतांना चित्र, चिन्ह्यांद्वारे सांकेतिक अर्थ देऊन संवादाचे सशक्त साधन बनविले आहे. त्यातून ज्ञानग्रहण व संप्रेषण सुबोध बनले. अर्थवाही वाचा व्यवस्था, लेखन, वाचन ही मानवनिर्मित गोष्ट होय. यातून मानव संस्कृती उदयाला आली. समाज, संस्कृती संवाहक भाषा म्हणजे मन्वंतर, युगांतर, परिवर्तन, कायाकल्प, विकास यांकडे टाकलेलं पुढचं पाऊल होय.
 भाषा ही विकास, ग्रहण, वापर अशी त्रिविध संपर्क, क्षमता, संवादाची गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यातील शब्दांना केवळ अर्थ असत नाही, तर तो ज्ञान आणि अनुभवजन्य संकेत असतो. गॉर्गियस, प्लेटोच्या काळापासून भाषाविषयक ही धारणा मानवी समाजात केवळ दृढमूल झाली असे नसून,तिचा कालौघात विस्तार आणि विकास होत राहिला आहे. रुसोने भाषेस भावनिक उद्गार मानले, तर कांटने भाषेस प्रागतिक विचार व तर्काची संयुक्त निर्मिती मानले होते. विट्गेन्स्टाइनने विसाव्या शतकात तर तत्त्वज्ञानाची तुलना भाषेशी करून तिचे योगदान स्पष्ट केले आहे. नोम चॉमस्कीने भाषेला आकलन प्रक्रिया म्हणून तिचे वर्णन केले आहे.
  आज जगात सुमारे ५००० ते ७००० भाषा असल्याचे सांगण्यात येते. त्यातील एकदशांश भाषा (५००) भारतात आहे. हे भारताचे भाषिक वैविध एकीकडे वैभव, तर दुसरीकडे अडथळा आहे. भारतीय राष्ट्रीय एकात्मतेतील तो अडथळा म्हणून अनेकदा पुढे येत राहिला आहे. कॅनडा, रशिया, स्विट्झर्लंडसारखे बहुभाषी देश अशाच अनुभवातून जात असतात. मानवी भाषा सामाजिक परंपरेतून निर्माण होते, तशी समाज संक्रमणामुळे परिवर्तितही होत असते. मेंदूतील ब्रोका आणि वेर्निक स्थळे म्हणजे भाषा केंद्रे होत. तिथेच भाषा ग्रहण, आकलन, संप्रेषणादी क्रिया-प्रक्रिया मेंदुत घडत राहतात. भाषा हे मानवाचे उपजत कौशल्य नाही. ते ग्रहण करावे लागते. शिक्षण, सराव वा श्रवण, वापर या तिच्या कसोट्या होत. भाषा प्रक्रिया भावनिक, मानसिक, तार्किक अशी मिश्रित क्रिया होय. उद्गार त्याचे प्रगट रूप होय. तिची सारी मदार सामाजिक मान्यतेवर उभी असते. म्हणून एक व्यक्त भाषा बदलू शकत नाही. भाषानिर्मिती व विकास ही सामूहिक नि सार्वजनिक क्रिया होय. तिचा आधार व्याकरण, नियम असून त्यामुळे तिचे सार्वत्रिक रूप टिकून राहते.
 भाषा हा मूलत: एक चिन्ह व्यापार किंवा व्यवहार होय. भाषांतील चिन्हे सूचक असतात. ती वस्तू, स्थिती, भाव, व्यक्त करतात. एका चिन्हाचे अनेक अर्थ असू शकतात. परंतु, एका भाषेतील चिन्हे मात्र कायम असतात. ती सहसा बदलत नाहीत. वर्ण, अंक, अक्षरे काही नसून, ती सूचक चिन्हेच होत. भाषानिहाय मात्र ही सूचकता बदलते. त्यामुळे एका भाषेतील शब्द दुस-या भाषेत असेल, तर त्याचा अर्थ एकच असेल असे नाही. सूचन वैभिन्यातून भाषाभेद निर्माण होतात. लिपीपण चिन्हच असते. चिन्ह व्यवस्था पाळण्यातून, नियमातून (एकीकरण) भाषा सार्वत्रिक होत असते. त्यातून संवाद घडतो. भाषेमध्ये होणारे बदल नेहमीच मंदगतीने होतात. एखादी भाषा बदलून अगम्य, अनाकलनीय होण्यास सुमारे एक हजार वर्षांचा काळ लोटावा लागतो. भाषेतील शब्दांची भर वा लोप सामाजिक मान्यतेतून येते. अशा मान्यतेची कसोटी म्हणजे वापर. समाज वापरातून भाषिक संवाद, अर्थनिर्मिती, वहन, आदानप्रदान होत राहते.म्हणून ते प्रभावी असे संपर्क साधन, माध्यम बनते.
 असे सांगितले जाते की, सुमारे ३५ लाख वर्षांपूर्वी माणसाचे पूर्वज, पूर्ववंशीय झाडावर राहात होते. काही मानववंशशास्त्री हा काळ ६० हजार वर्षांपर्यंत अलीकडचा मानतात. ते काहीही असो; पण काळाच्या ओघात मात्र झाडावर राहणारा माणूस जमिनीवर राहू लागला हे खरे! सर्वसाधारणपणे हा काळ २५ लाख वर्षांचा मानण्यात येतो. सुमारे २० लाख वर्षांपूर्वी तो बराचसा भूचर होऊन गेला होता म्हणजे तो ऑस्टॅलो (ऑस्ट्रॅलोपेथिकस) झालेला होता. त्यामुळे त्याच्या समूहजीवनाचा प्रारंभ झाला. त्यातून त्यास संपर्क संवादाची गरज निर्माण झाली.
 झाडावरून उतरून तो जमिनीवर का राहू लागला, याचा अभ्यास करता लक्षात येते की, जसजशी जंगले विरळ होऊ लागली, तशी निवास, भोजन इत्यादींचा तुटवडा सुरू झाला. त्याची भटकंती जमिनीवर अधिक होऊ लागली आणि तो भूचर बनला. जसा तो जमिनीवर राहू लागला, तशा काळाच्या ओघात त्याच्या खाण्या-पिण्याच्या सवयी बदलल्या. परिणामी, त्याचे शरीर उत्क्रांत झाले. शारीरिक बदल घडून आले म्हणजे नखांचा वापर कमी होऊन ती बोथट होत गेली. तीच गोष्ट सुळ्यांची, ते न वापरण्याने छोटे झाले. शिवाय बोथटही. झाडावर राहताना दूरचं दिसायचं. अंधारातही तो पाहू शकायचा. ही क्षमता तो भूचर झाल्यावर कमी झाली. पूर्वी त्याला दूरचं ऐकू येत असे. आता त्याची श्रवण क्षमता २० ते २०,००० हर्ट्झ (श्रवणमापन परिमाण) इतकी कमी झाली. त्याचे घ्राणेंद्रियही अशक्त झाले. त्या सर्वांचा परिणाम असा झाला की, पूर्वीचा सशक्त माणूस दुर्बल झाला. स्वसंरक्षणार्थ त्याला नव्या क्षमतांची गरज भासू लागली. त्याने त्या क्षमता प्रयत्नपूर्वक विकसित केल्या. भाषा त्यापैकीच एक होय. संकल्पना विकासाच्या गरजेतून भाषा कौशल्याचा विकास झाल्याचे मानले जाते.
 चार पायांवर चालणारा भूचर माणूस दोन पायांवर चालू लागण्यासही हजारो वर्षांचा काळ लोटला. दरम्यानच्या काळात पाठीवर ऊन पडण्याचे प्रमाण कमी होऊन पाठीवरचे केस क्षीण, विरळ झाले. चिंपांझी नि माणसात फरक दिसू लागला. त्याच्या आवाजात बदल झाला. आपले पिलू तो स्वतंत्र ठेवू लागला. त्याच्या संगोपनार्थ संवाद सुरू झाला. तो उभयपक्षी (रडणे थांबविणे, बाळाचे मागणे इ.) माणसाच्या बोलू लागण्याच्या या प्राथमिक पाऊलखुणा होत.  माणूस समूहात राहू लागला, तशी श्रमविभागणी सुरू झाली. संवाद,संपर्काची गरज वाढली. तो अधिक बोलका झाला. संपर्क, व्यवहार, संरक्षण इत्यादी गरजांमुळे भाषा अनिवार्य बनत गेली. अधिक बोलण्यातून त्याच्या स्वरयंत्राची उत्क्रांती घडून आली. कान, नाक, जीभ, तोंड, टाळूचा वापर वाढला. त्याचे चलनवलन वाढून चेहरा बदलला. तसा घसा, टाळू, जीभ, स्वरकंठ इत्यादीपण. समांतर मेंदूतही अनुषंगिक बदल घडत राहिले.
 ऑस्ट्रेलो क्षमतेच्या माणसात कौशल्य विकास होऊन तो होमो अर्गेस्टर झाला. म्हणजे तो विकसित मेंदूच्या आधारे हावभाव, देहबोलीचा अधिक सक्षमपणे वापर करू लागला. या बदलाचा भाषानिर्मितीत मोठा उपयोग झाला. ही ‘शब्देविण संवादू'ची अवस्था होय.
  मानवी भाषेची निर्मिती कशी झाली, याचे विवेचन करणारे अनेक सिद्धांत भाषा विज्ञानात जगभर प्रचलित आहेत. ‘पुट पुट', 'ये-हो-ये', ‘डिंग-डाँग', 'बॉब-वॉब' सिद्धांत म्हणून ते सर्वत्र चर्चिले जातात. त्यानुसार भाषा ही परिसर, प्रसंग, घटना, प्रतिसाद, प्रक्रिया इत्यादींतून जन्मते व त्यामुळेच ती परिवर्तित विकसित होत राहते.
 भाषा म्हणून सर्व भाषांची समान वैशिष्ट्ये आहेत. ती ‘भाषा विश्वके' किंवा 'केवळ वैश्विके (Absolute Universals) म्हणून ओळखली जातात. ती पुढीलप्रमाणे आहेत - १.भाषा बोलीतून जन्मते व लिपिबद्ध होते. भाषेत नाम (संज्ञा) व क्रिया स्वतंत्र असतात. म्हणून वाक्य बनते आणि भाषा आशय व्यक्त करते.
२. अपवाद वगळता कर्ता, कर्म आणि क्रिया अशी वाक्यक्रम रचना सर्व भाषांमध्ये आढळते.
३.जगातील सर्व भाषांमध्ये मी, आम्ही, आपण, तो, ती, ते, तुम्ही अशी एकवचनी, बहुवचनी (सूचक) सर्वनामे आढळतात.
४.प्रत्येक भाषेत कालसूचक क्रिया रूपे असतात. (वर्तमान, भूत, भविष्य)
५.स्वर, व्यंजन असतात; पण रचना, संख्या भिन्न आढळते.
६.सर्व भाषांमध्ये काळा, पांढरा इ. रंगासाठी स्वतंत्र शब्द आढळण्यातून भाषा म्हणजे समाज संज्ञासंग्रह असतो हे स्पष्ट होते.
७.भाषा विकासात सर्व रंग, छटा, भाव यांना शब्द लाभतात. ते म्हणजेच भाषा विकास होय.
२. लोकसाहित्य : उगम आणि विकास इंग्रजीत प्रचलित असलेल्या 'Folklore' शब्दास मराठीत लोकवाङ्मय, लोकसाहित्य असे शब्द रूढ आहेत. मूळ इंग्रजी शब्दातील 'Folk' शब्द अविकसित काळातील लोकसमुदाय, समाज सूचित करणारा आहे. त्यातील दुसरा शब्द 'Lore' म्हणजे विशेष ज्ञान, वाङ्मय, साहित्य अशा अर्थाचा आहे. लेखनपूर्व काळातील म्हणजे इ.स. पूर्व ३००० ते ४००० वर्षांपूर्वीचे साहित्य ऐकीव, वाचिक होते, त्या अर्थाने ते ‘लोकवाङ्मय' (Folklore) होते. लेखन परंपरा विकसित झाल्यावर पूर्वसुरींनी आपले लोकवाङ्मय संकलित, संपादित करून मुद्रित रूपात प्रकाशित केले, ते लोकसाहित्य (Folk Literature) बनले; पण ते मूलत: लोकवाङ्मयच होय.  लोकवाङ्मय हा प्राचीन साहित्याचा कलात्मक आविष्कार होय. याचा सर्वप्रथम विचार मानववंशशास्त्र, समाजशास्त्र इत्यादींमध्ये मानव विकासाच्या अभ्यासाचे साधन म्हणून झाला. आज जगभर जे लोकवाङ्मय उपलब्ध आहे, ते कथा, गीते, उखाणे, पोवाडे, ओव्या, कोडी, रूपके इत्यादी रूपात दिसून येते. म्हणी, वाक्प्रचार, बोधकथा, मिथक हा त्याचाच भाग होय. 'लोक' हा शब्द प्राचीन, निरक्षर जनसमुदाय सूचक होय. भारतात तो त्रिलोक कल्पना (पृथ्वी, स्वर्ग, पाताळ) अस्तित्वात आल्यापासून वापरात आहे. डॉ. श्याम परमार यांनी म्हटल्याप्रमाणे, लोक' साधारण जनसमाज है, जिसमें भूभाग पर फैले हुए समस्त प्रकार के मानव सम्मिलित है। यह शब्द वर्गभेदरहित, व्यापक एवं प्राचीन परंपराओं की श्रेष्ठ राशिसहित अर्वाचीन सभ्यता, संस्कृति के कल्याणमय विवेचन का द्योतक है। ‘लोक' हा शब्द नागरपूर्व समाज, साहित्य सूचक होय.  सांस्कृतिकदृष्ट्या समान घडणीच्या लोकसमूहाची जीवनशैली लोकसाहित्यातून अभिव्यक्त होत असते. त्यामागे सामूहिक अबोध प्रेरणा कार्यरत असतात. त्यामुळे लोकसाहित्य आपोआप जन्मते. ते कवितेसारखे उत्स्फूर्त असते. त्याच्या निर्मितीच्या प्रेरणा व्यक्तिगत असल्या तरी लक्ष्य समाज असतो. ती समूह संपदा असते. जतनही समुदायच करतो. हे साहित्य ऐकीव, मौखिक स्वरूपात ठेवा, वारसा म्हणून एका पिढीकडून दुस-या पिढीकडे जात राहते.

 लोकसाहित्य पूर्वापार चालत येते. त्यावर अभिजात साहित्याचा प्रभाव असला तरी पिढीगणिक त्यात प्रक्षिप्त, घट, भर होत राहते. लोकसाहित्याचे हे रूप लक्षात घेऊन लोकसाहित्य अभ्यासकांनी त्यास लोकवाङ्मय, लोकसाहित्य, लोकवार्ता, लोकविद्या, लोकायन, लोकायत असे अनेक शब्द वेळोवेळी वापरले आहेत. हे सर्व लोकसंस्कृतीचे अंग असते.
२.१ लोकसाहित्य प्रकार:

२.१.१ लोकगीते
 प्रत्येक लोकसंस्कृतीची स्वत:ची अशी लोकगीते असतात. ती त्या त्या देश, प्रदेश, प्रांताचे जनमानस, जनसंस्कृती, जनपरंपरासूचक असतात. भारतातल्या वेगवेगळ्या राज्यांत बिह, तुसू, रास, तिजा, हातगा, अशी असंख्य लोकगीते आढळतात. ती सण, वार, उत्सव इत्यादींमध्ये गायली जातात. हर्ष, शोक, आश्चर्य, आनंद भावसूचक ही गीते बारसे, ओटीभरण, विवाह, शोक, विरह इत्यादी प्रसंगाने रचली, गायली जातात. काही धर्म, परंपरा सूचकही असतात.
२.१.२ लोककथा
 लोककथा स्थळ, काळ त्यांचा काही असो, त्या वैश्विक असतात हे मात्र खरे. या सुबोध असतात तशा गूढही. त्यांच्या सादरीकरणाची पद्धत मात्र चित्ताकर्षक असते. कथाकार, कथावाचकास अभिव्यक्ती स्वातंत्र्य असते. त्यामुळे या कलात्मक होतात नि सुदूर त्यांचा प्रचार, प्रसार होतो. त्यामध्ये मिथक, बोध, वृत्तांत, वर्णन असे अनेक प्रकार संभवतात. यात प्राणी, पक्षी, नदी, पर्वत, दऱ्या इत्यादी निसर्ग कथाही असतात. साहस, भय, आश्चर्य साऱ्या भावांनी भरलेल्या या कथा लोकसमूहास भुरळ घालत. त्यांची खुमारी, लज्जत कथावाचक, कथाकारावर अवलंबून असे. या कथा पात्र, प्रसंग, संघर्षांनी ओतप्रोत भरलेल्या असत. उत्कंठावर्धक या कथा शिकार कथा, प्रवास कथा, गिर्यारोहण तर कधी देवादिक, भूतप्रेत इत्यादी वर्णन करणाऱ्या असत.
२.१.३ लोकनाट्य
 लोकनाट्यांचा प्रारंभ सामूहिक रंजन, बोधाच्या गरजेतून झाला. प्रारंभीच्या काळातील लोकनाट्ये देवकथा, अवतार कथा, दैवी चमत्कार कथांवर आधारित असत. संवाद, अभिनय, संघर्ष, संगीत उत्कंठा यांवर बेतलेली ही लोकनाट्ये तत्कालीन जनसमूहाच्या जगण्या-झगडण्याचेच प्रतिबिंब असल्याने ती लोकांना विलक्षण भावत. देवालय उत्सव, गावजत्रा, ग्रामोत्सव इत्यादी प्रसंगी लोकनाट्याचे खेळ होत. भारतात यक्षगान, दशावतारी, भवाई, माच, अंकियानट, कुरवंजी असे अनेक प्रकार वेगवेगळ्या प्रांतात रूढ आहेत. नंतरच्या काळात महाराष्ट्रात रूढ झालेले तमाशे, जलसे हे पूर्व लोकनाट्याचे आधुनिक रंजक रूप होय. २.१.४ उखाणे, हुमाण, लोकोक्ती  भजन, ओव्या, पोवाडे, कोडी, उखाणे, ऋतुगीते, उत्सव कथा, हुमाण, वाक्प्रचार, म्हणी, वंश कथा अशा कितीतरी रूपात लोकवाङ्मय, लोकसाहित्य गद्य, पद्य, संवाद, वाक्यांश, शब्द रूपात आजही उपलब्ध आहे. शिवाय प्रचलितही. अल्पाक्षरी जीवन वास्तव आणि भेदकपणे स्पष्ट करण्याच्या स्वयंप्रेरणेतून हे साहित्य निर्माण होत असले तरी समाजशिक्षण व शिकवण त्याचे उद्दिष्ट असायचे. ‘बोध' म्हणून या विविध लोकसाहित्य प्रकारांचे असाधारण महत्त्व आहे. कारण त्यात इतिहास परंपरांचे प्रतिबिंब पडत आले आहे. ३. लेखन विकास
  मनुष्य मूलतः समाजशील असल्याने परस्परांशी संबंध, संवाद आणि संपर्क ही त्याची उपजत गरज राहिली आहे. प्रागैतिहासिक काळात माणसाने हे संबंध विविध मार्गाने विकसित केल्याचे आढळते. माणूस या काळात आपल्या स्मृती, घटना, प्रसंगांचे चित्रण खाणाखुणा, चिन्हे, चित्रे, संकेत इत्यादींद्वारे कोरून, चित्रण करून ठेवत असे. याशिवाय तो या काळात व्यापार, व्यवहार करू लागल्याने त्यास मोजदाद करण्याची गरज निर्माण झाली. त्यासाठी माणूस काठ्या, दगड, कवड्या, दोरीच्या गाठी यांचा वापर करू लागला. चित्रातून अभिव्यक्त होता येतं याची त्याला प्रचिती चित्र दुस-याला कळतं हे समजण्यातून येऊ लागल्याने त्यास आविष्कार, अभिव्यक्तीद्वारे अनुभूती प्रगट करण्याचा जणू छंदच जडला.
 अभिव्यक्तीची कला पूर्वी दैवी मानली जायची. चित्र, चिन्ह, लेखनाची अधिष्ठात्री देवता मानण्याचा प्रघात बॅबिलोनियन संस्कृती काळात (इ.स. पूर्व ३०००) होता. तसेच इजिप्तमध्येही होते. तिथे थॉनची पूजा कला, लेखन, संगीतासाठी केली जायची. जगातील सर्वाधिक प्राचीन लेखन कला मेसोपोटेमिया (सध्याचा इराक देश)मधील क्युनिफॉर्म लिपीच्या माध्यमातून याच काळात उगम पावली. पूर्वीच्या काळात आर्थिक नोंदी ठेवण्यासाठी चिखलाच्या ठोकळ्यांचा (Tablets) उपयोग केला जात असे. हे ठोकळे ओले असताना त्यावर मजकूर, अंक, नोंदी टोकदार साधनांनी कोरल्या जात असत. हे काम करणारे कारागीर (Sriber) कुशल असत. त्यांना चित्र, चिन्हांद्वारे मजकुरातून संकेत व्यक्त करण्याची कला (बुद्धी) अवगत होती. देवळे, व्यापारी, जमीनदार यांच्याकडील पशुधन, धनधान्य, वस्तू मोजण्यासाठी विविध वस्तूंचा (काठ्या, कवड्या, गजगे इ.) वापर केला जायचा. संचय वाढू लागला तशी संच पद्धती (गठ्ठे, पेंढ्या, मोळ्या इत्यादी) अस्तित्वात आली. याच्या नोंदी रेघा, रेषा, चित्रे, चिन्हे यातून होत अक्षर, अंक जन्माला आले. चित्रांची बनलेली चिन्हे म्हणजेच आजचे वर्ण, स्वर, व्यंजन, अक्षर, विरामचिन्हे होत.
 लेखनासाठी कालौघात पपायरस, भूर्जपत्रे, चामडे, शाई, रंग, कागद इत्यादींचा वापर होऊ लागला. इजिप्त, सिंधू, इत्यादी संस्कृतीत लेखन मुद्रा आढळल्या. त्यातील उत्खननातून लेखनकलेच्या प्रागैतिहासिक होण्यावर शिक्कामोर्तब झाले. भारतातील सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सापडलेली लिपी (मुद्रा) ही प्राचीन मानली जात असली तरी तिचे वाचन, संशोधन पूर्ण होऊ शकलेले नाही. संस्कृतमधील ब्राह्मी लिपी प्राचीन मानली जाते. ती सेमेटिक लिपीतून उदयाला आली असे मानले जाते. पाणिनी, कौटिल्य इ.च्या लेखनात पूर्वी लिपी असल्याचे उल्लेख सापडतात.
 बौद्ध काळातील विपुल हस्तलिखिते उपलब्ध असून, भारतात लेखनकला पूर्वापार होती हे स्पष्ट होते. सातवाहन काळातील शिलालेख (इ.स. पूर्व २५० ते २२७) उपलब्ध आहेत. नाशिक इथे सापडलेल्या शिलालेखात ‘क्षत', ‘उत्कीर्ण’, ‘लिखित' इत्यादी शब्द आढळून आले आहेत. त्यातूनही लेखन, लिपी पूर्वापार असण्याला दुजोरा मिळतो. सम्राट अशोकाच्या काळातील स्तूप, घुमट, शिलालेख, कमानी इत्यादींवर प्राचीन भाषेतील लेखन आढळून आले आहे.
 अलीकडच्या काळातील पोथ्या, दस्त, हस्तलिखिते इत्यादींमधून लिपी, भाषा विकासावर भरपूर प्रकाश पडतो. मोडी, ब्राह्मी पर्शियन, देवनागरी इत्यादी लिप्यांप्रमाणे भारतात अनेक भाषांच्या वेगवेगळ्या लिप्या व त्यातील ग्रंथ आढळून येतात. त्यातूनही भारतभर लेखन कलापद्धती अस्तित्वात होती. शिवाय काळाच्या ओघात सर्व भाषा, लिपींचा विकास दिसून येतो. भारतातील भाषा, लिपींच्या डॉ. गणेश देवी यांच्या लोक सर्वेक्षणातून यावर भरपूर माहिती आता उपलब्ध झाली आहे. भारतीय राज्यघटनेने मान्य केलेल्या २२ राजभाषा व १३ लिपींचा विचार केला तरी भारतीय लेखनाच्या इतिहासावर मोठा प्रकाश पडतो. जागतिकीकरण, सूचना आणि संपर्क क्रांती, माहिती तंत्रज्ञान युग यांमुळे छोट्या भाषा व लिपी अस्तंगत होत असून, मोठ्या संख्येने वापर, व्यवहार असलेल्या भाषा, लिपींवर होणारे  बोलल्या जाणा-या भाषेचे मूर्त वा शरीरी रूप म्हणजे लेखन होय. लेखन चिन्ह, चित्रे, नकाशे, आकृत्या, अंक, अक्षर इत्यादींद्वारे केले जाते. भाषा ही जशी सामुदायिक संपर्क व्यवस्था असते तशी लिपीपण. लिपी अथवा लेखनामुळे घटना, प्रसंग, व्यवहार इत्यादी नोंद शक्य होत असते.
३.१ लेखन उगम
 नाईल आणि तैंग्रीस नदीच्या सुपीक खो-यात लेखनाच्या आरंभिक पाऊलखुणा (Proto writing) आढळतात. हा परिसर म्हणजे भूमध्य सागराच्या उत्तर सिरिया, युफ्राटिस नदीचे खोरे, इराकचे आखात (पर्शियन गल्फ) इत्यादींचा प्रदेश होय. या प्रदेशातील संस्कृतीत जगातील पहिल्या लेखनाच्या खुणा आढळतात. आजचा इजिप्त आणि इराक आणि तत्कालीन सुमेरियन संस्कृतीचा प्रदेश, इ.स. पूर्व ३१००चा काळ हा प्रारंभिक लेखन उगम, स्थळ व काळ म्हणून जगाच्या इतिहासात ओळखला जातो. प्रारंभिक लेखनाच्या खुणा ‘क्युनिफॉर्म' म्हणून ओळखल्या जाणाच्या मातीच्या ठोकळ्यांच्या रूपात आढळतात. इजिप्तच्या पहिल्या राजवंशाच्या काळात चिखलाच्या विटा, ठोकळ्यांवर अंक लेखन केले जायचे. ते संख्या वाढीतून वस्तू, संच अपुरे पडू लागल्यावर या लेखनास हिइरोग्लिफिक (Hieroglyphic) म्हणून ओळखलं जातं. ओल्या मातीवर अणकुचीदार बोरूने लिहिले जायचे.
 नंतरच्या काळात ध्वनिनिहाय लेखन पद्धती (Hieroglyphic) अस्तित्वात आली ती ग्रीक, रोमन साम्राज्य काळात. मेसापोटेमिया संस्कृतीत अस्तित्वात असलेल्या लेखन पद्धतीपेक्षा ही सर्वथा भिन्न लेखन पद्धती होय. ही लेखन पद्धती पुढे पूर्व युरोपमध्ये (अमेरिका) संक्रमण होऊन इ.स. पूर्व ५०० मध्ये विकसित झाली.
 अणकुचीदार हाडांद्वारे लेखनाची पद्धत चीनमध्ये इ.स. पूर्व १२०० मध्ये उदयास आली. ही लेखन पद्धती पूर्व लेखन पद्धतींचे अनुकरण होते की, स्वतंत्र याबाबत धांडोळा घेताना दिसते की, चीनचा तोवर वरील प्रांत, संस्कृतीशी संपर्क नव्हता. त्यामुळे ही स्वतंत्र लेखन पद्धतीचा म्हणून उदयास आली. त्यातून पुढे चिनी चित्र लिपीचा उदय झाला. ही लेखन पद्धती आज चीनशिवाय थोड्याफार फरकाने जपान, कोरिया इत्यादी देशात आढळते. इ.स. पूर्व २५०० मधील सिंधू संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या मुद्रांवर आद्य लिखिताच्या खुणा/पुरावे आढळतात. त्यात प्राण्यांची चित्रे आढळतात. शिवाय काही चिन्हे त्यावरून त्या मुद्रा गणन सूचक आहेत, हे सिद्ध होते. त्यांचा वापर व्यापार, प्रशासनात होत असावा असे दिसते.
३.२ लिपीची उत्क्रांती
 माणसाचे पहिले लेखन हे चित्ररूप होते. त्याला जे व्यक्त करायचे असे ते शब्द नव्हते. होत्या त्या संकल्पना, विचार. तो ते चित्रातून व्यक्त करायचा. पुढे मग अनेक चित्र समुदायातून एक भाव, कल्पना व्यक्त करू लागला. नंतरच्या काळात माणसाने अनुभव व्यक्त करायचा सपाटा लावला. आज आपण वाक्प्रचार, म्हणींमधून सूचक, संघटित अनुभव व्यक्त करतो तसे त्याचे स्वरूप होते. आकारांना चिन्हांची सूचकता यातून मिळाली. चित्रही हळूहळू सूचक बनत गेली. पुढे चित्रांना चिन्हरूप (वर्ण, अक्षरमुळाक्षर) प्राप्त झाले. लिपी विकास खालीलप्रमाणे घडला-
१. चित्राक्षर पद्धती
सुबोध चित्रांद्वारे अभिव्यक्त होण्याची ही पद्धत. यातून सरळ एखादी वस्तू, व्यक्ती, प्रसंग इत्यादी (Object) व्यक्त केले जायचे. यात खालील प्रकार असत-
(अ) स्मरण चिन्हे (Mnemonic) - काही गोष्टी नोंदून ठेवण्यासाठी रेखा अथवा चित्रे.
(ब) चित्राक्षरे (Pictoric) - स्मरण चिन्हातून वस्तू, व्यक्ती सूचित व्हायची, तर चित्राक्षरातून क्रम, सूचन, वहन, पर्यावरणीय संपर्क/संबंध, शीर्षके, नावे, धार्मिक संकेत, रीती, चरित्र इत्यादी व्यक्त करण्याची क्षमता असायची.
(क) सूचकचित्रे - संकल्पना, विचार व्यक्त करणारी गूढ चित्रे.
२. संक्रमण / वहन पद्धती - शीर्षकासह चित्राभिव्यक्तीची पद्धत.
३. चिन्ह पद्धती-ध्वनी, अक्षर, वर्ण, व्यक्त करणारी चिन्हे/अक्षरे ती ध्वनीसूचक, सांकेतिक वा वर्ण असत.
 या सर्व प्रक्रियेतून प्रारंभिक लिपी विकास घडून आला. भाषानिहाय हा विकासक्रम, काळ वेगवेगळा असला तरी सर्वसाधारणपणे अशा अवस्थांमधून संक्रमण होत भाषांच्या लिप्या तयार झाल्याचे दिसून येते. लिपी उत्क्रांती ही ज्या त्या भाषेच्या पर्यावरणीय, सांस्कृतिक स्थितीनुसार कमी, अधिक काळाची राहिली आहे. सुपीक, मैदानी प्रदेशात भाषा, लिपी विकासाची गती अधिक तर डोंगराळ, अडचणीच्या प्रदेशात कमी. लिपीबद्दल अंतरिक व बाह्य दोन्ही प्रकारचे असतात. ते समुदायात घडतात तसे बाह्य संपर्कानेपण.
३.२.१ ध्वनीसूचक वर्ण लिपी
 ध्वनी प्रतिबिंबित करणारे वर्ण/अक्षरे निर्माण झाली इ.पू. पंधराव्या शतकात. या आविष्कार नि प्रयोगात भाषा विकासाच्या असंख्य संभावना होत्या, हे त्यावेळी जरी लक्षात आले नसले तरी नंतरच्या विकास काळात प्रत्ययास आले. यामुळे एक गोष्ट स्पष्ट झाली, ती अशी की पूर्वीच्या चिन्हांची गूढ गम्यता व अनाकलनीयता समाप्त झाली. चिन्ह नि चित्रांचे अर्थ लावण्यात जी तर्कशक्ती खर्च व्हायची ती संपुष्टात आली. लिपी, अक्षरे, वर्ण ध्वनिसूचक झाले. त्यात उच्चार समानता निर्माण होऊन पुढे अर्थविकास घडून आला. अनेक वर्ण जन्माला येऊन नंतरच्या काळात स्वर, व्यंजनात त्यांचे वर्गीकरण झाले. इ.स. पूर्व २००० मध्ये यांचा वापर, विशेषत: अंकांचा, आकडेमोडीचा, गणिताचा वापर सुरू झाला. सेमेटिक भाषा समूह / कुटुंबातील भाषांमध्ये हा वापर रूढ झाला. आर्मेनियन, हिब्रू भाषा उदाहरण म्हणून सांगता येतील. आजची अरेबिक या व्यवस्थेतून जन्मलेली, विकसित झालेली भाषा होय. ग्रीक भाषेने इ.स. पूर्व आठव्या शतकात या व्यवस्थेचा स्वीकार केला. २४ वर्णमाला असलेली लिपी यातून उदयाला आली. अल्फाबेट (Alphabets) शब्द यातून निर्माण झाला. त्याचे मूळ ध्वनिमूलक भाषा व्यवस्थेत (Phonecian System) आढळते. रोमन साम्राज्यात लॅटिन भाषेसाठी अशी वर्णमाला अंगीकारण्यात आली. ती नंतर युरोपात व उत्तरार्धात सर्व जगभर प्रचलित झाली. पपायरस, ठसे, ठोकळे, भूर्जपत्रे इत्यादी वापराने लेखन नित्याची गोष्ट होऊन गेली.
३.२.२ अरबी लिपी इ.स. पूर्व पाचव्या शतकात कोरीव स्तंभांवर ही लिपी वापरात आली. अरेबियात तिची प्रारंभिक रूपे आहेत. मूळ सेमेटिक भाषा समूहात या लिपीचा वापर झाला. कुराणाचे लेखन अरबी (Persian) लिपीत झाले. कुराणाद्वारे या लिपीचा जगभर प्रचार, प्रसार झाला. इस्लाम धर्माची ती लिपी बनली. आज अरब देशांशिवाय अनेक आशियाई देशात या लिपीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. प्राचीन साहित्यही या लिपीत मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. ३.२.३ अमेरिका लिपी
अमेरिका खंडात वापरात असलेल्या लिप्यांमध्ये माया लिपी सर्वाधिक प्राचीन होय. तिचा वापर प्राचीन स्तंभ, शिलालेखात आढळतो. या लिपीची परंपरा ऑम्लेक्स लेखन पद्धतीशी मिळतीजुळती आहे. तिचा वापर कॅलेंडर तयार करण्यासाठी केला जात असे. जोपेटेक्सच्या शिलालेखात या लिपीच्या पूर्व खुणा दिसून येतात. माया लिपी ध्वनी आधारित लिपी होय. प्रारंभी चित्ररूपात तिची अभिव्यक्ती दिसून येते. खगोलशास्त्र, वंशावळी, प्राचीन अभिलेखात या लिपीचा वापर झालेला दिसून येतो. तत्कालीन प्रार्थना मंदिर (चर्च) प्रशासनातही या लिपीचा वापर होत असे. हा काळ सनाच्या दुस-या, तिस-या शतकाचा होय.
उलफिलसची वर्णमाला
 इ.स. ३६० मध्ये उलफिलस या बुद्धिमान गृहस्थाने बोली भाषांना लिपी देण्याचे ऐतिहासिक कार्य केले. त्याने एकूण ८६ वर्णाक्षरे तयार केली. गॉथिक पारंपरिक बोलींना भाषारूप देण्याचे कार्य त्याने केले. ग्रीक, रोमन २७ वर्ण घेऊन त्या आधारे त्याने नवी वर्णमाला तयार केली. ग्रीक बायबलचे लिप्यंतरण त्याने गॉथिक भाषेत केले. जेरोमने लॅटिन बायबलचे रूपांतर केले. त्या अगोदर कितीतरी वर्षे उलफिलसने हे कार्य केले. आपण हे ईश्वरीय पवित्र कार्य करतो आहोत, अशी त्याची धारणा होती. पुढे त्याच्या या उपक्रमाचे अनुकरण सिरिल व मोथेडिअस या मिशनरींनी केले (इ.स. नववे शतक). १९व्या शतकात चेरोकी इंडियन्सनी या लिपीचा स्वीकार केला.
३.३ भारतीय भाषा आणि लिपी भारतीय राज्यघटनेनुसार हिंदी आपल्या देशाची राजभाषा आहे. भारतीय राज्यघटनेने आठव्या परिशिष्टात भारतीय राजभाषा निर्देशित केल्या आहेत. भारतीय प्रजासत्ताकातील संघराज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना आपापल्या प्रदेशातील भाषा व लिपी निवडून त्यांमध्ये राज्यकारभार करण्याची मुभा आहे. त्या त्या प्रदेश वा केंद्रशासित प्रदेशांतील विधानसभा भाषा व लिपींचा निर्णय करतात. भारतीय संघराज्यात ३० राज्ये आणि ६ केंद्रशासित प्रदेश आहेत. (१) आसाम, (२) ओडिसा, (३) आंध्र प्रदेश, (४) अरुणाचल प्रदेश, (५) बिहार, (६) छत्तीसगड, (७) दिल्ली, (८) गोवा, (९) गुजरात, (१०) हरियाणा, (११) हिमाचल प्रदेश, (१२) जम्मू आणि काश्मीर, (१३) झारखंड, (१४) कर्नाटक, (१५) केरळ, (१६) मध्य प्रदेश (१७) महाराष्ट्र, (१८) मणिपूर, (१९) मेघालय, (२०) मिझोरम, (२१) नागालँड, (२२) पंजाब, (२३) पश्चिम बंगाल, (२४) राजस्थान, (२५) सिक्कीम, (२६) तमिळनाडू, (२७) तेलंगणा, (२८) त्रिपुरा, (२९) उत्तर प्रदेश, (३०) उत्तराखंड ही ती ३० घटकराज्ये होत. (१) अंदमान आणि निकोबार बेटे, (२) चंदिगड, (३) दादरा आणि नगर हवेली, (४) दमण आणि दीप, (५) लक्षद्वीप, (६) पोद्दुचेरी (पाँडेचरी) हे केंद्रशासित प्रदेश आहेत. या घटकराज्य व केंद्रशासित प्रदेशांत पुढील २२ भाषांमध्ये राज्यकारभार चालतो. त्या भाषा आहेत - (१) आसामी, (२) उडिया, (३) उर्दू, (४) कन्नड, (५) काश्मिरी, (६) कोकणी, (७) गुजराती, (८) डोगरी, (९) तमिळ, (१०) तेलुगू, (११) नेपाळी, (१२) पंजाबी, (१३) बंगाली, (१४) बोडो, (१५) मणिपुरी, (१६) मराठी, (१७) मल्याळम्, (१८) मैथिली, (१९) संथाळी, (२०) संस्कृत, (२१) सिंधी आणि (२२) हिंदी. या घटनामान्य भाषा खालील १३ लिपींमध्ये लिहिल्या जातात(१) अरबी, (२) आसामी, (३) बंगाली, (४) देवनागरी, (५) गुजराती, (६) गुरुमुखी, (७) कन्नड, (८) मल्याळम्, (९) ओडिआ, (१०) ओलचिकी, (११) तमिळ, (१२) तेलुगू आणि (१३) उर्दू.
३.३.१ भारतीय लिपी : उगम आणि विकास
उगम
  वर्ण अथवा अक्षरांना परंपरेने अमर (अक्षर) मानण्यात आले आहे. भगवद्गीतेत तर अक्षराना ‘ब्रह्म' मानण्यात आले आहे. ‘अक्षरं परं ब्रह्मम।। ईश्वर साकार असतो, तसा निराकारही. परंतु, अक्षरवृत्ती मात्र साकार नि मूर्त असते. माणसात आविष्कार आणि अभिव्यक्तीवृत्ती (Expression) जितकी सहज, स्वाभाविक तितकीच संवादाचीही (Communication). अभिव्यक्ती नि संवादाशिवाय माणसास चैन पडत नाही. व्यक्त होण्याच्या बेचैनीतूनच लिपीची निर्मिती झाली आहे. आदिमानव जो पूर्वी जंगलात रहायचा, भटकत असायचा, पुढे त्याने गुंफेमध्ये राहणे सुरू केले. या काळात त्याला स्थिरता, शांती नि उसंत लाभली. गुहेमध्ये राहण्याच्या काळात आपली उसंत तो चित्र काढण्यात खर्च करू लागला. ही चित्रं काढणं दुसरं तिसरं काही नव्हतं, तर आपल्या मनातील भाव, विचारांची ती मुक्त अभिव्यक्तीच होती. ही प्रारंभीची चित्रं सांकेतिक होती. ती टोकदार दगडाने कोरलेली असायची. मातीने सारवू लागला. त्या पोतलेल्या मातकट, काळ्या, तांबड्या भिंतीवर पांढ-या रंगाच्या मातीने तर कधी पांढ-या रंगाच्या गुहा, भिंतीवर तांबड्या मातीने कधी बोटाने तर कधी काडी, फांदीच्या टोकाने चित्रं काढू लागला. ही चित्रं एका अर्थाने माणसाची चित्रलिपीच होती. सध्याची चिनी, जपानी, कोरियन, परशियन लिप्या म्हणजे आद्यचित्रलिपीची समदर्शी वर्तमान रूपे होत. पूर्वी नुसती चित्रे असत. मग चित्रांना जोडून माणूस काही मजकूर सांकेतिक रूपात लिहू लागला. आपल्या वर्तमान लेखनप्रणालीच्या त्या पहिल्या पाऊलखुणा म्हणून ओळखल्या जातात. प्रारंभीच्या चित्रांमध्ये निसर्ग असायचा तसेच शिकार, शेतीची चित्रं असत. त्यात झाडे, जंगल, प्राणी, पक्षी, गुहा, घरे, सूर्य, नदी, डोंगर इत्यादींचे चित्रांकन असे. अशा चित्रांची झलक आपणास आजच्या आदिवासी चित्रशैलीत (वारली चित्रशैली) प्रतिबिंबित होताना दिसते. अशा चित्रलिपीतून तो स्वतः परिसराशी एकरूप होऊन आपलं जीवन, संघर्ष, प्रसंग (शिकार, नैसर्गिक आपत्ती, शेती इ.) चित्रित करत रहायचा. हे चित्रांकन म्हणजे साहित्याचे आद्य चित्ररूप. प्रारंभिक साहित्य चित्रमय अधिक तर मजकूर सूचक होता. आज लेखनास जोड म्हणून चित्रं असतात. उदाहरणार्थ, या पुस्तकातील चित्रे. म्हणून तर साहित्य हे समाज जीवनाचा आरसा बनून राहतं. त्याचं मूळ या सर्व वरील प्रक्रियेत, प्रतिक्रिया, प्रतिसाद, प्रतिबिंबात आढळतं. पुढे मग अभिव्यक्त होण्यासाठी भाषा आली; पण भाषा नि लिपीचा उगम स्वतंत्र व समांतर होत राहिला तरी तो परस्परपूरक होता. वर्तमान भाषा आणि लिपीच्या अभ्यासात असं दिसतं की, अगोदर भाषा जन्मली आणि नंतर तिचं सूचन वस्तू इ.द्वारे अक्षररूपात होत राहिलं.
३.३.२ लिपी अभ्यासाचा उद्देश
 लिपी असते काळाचं प्रतिरूप. म्हणून आज इतिहास, पुरातत्वशास्त्रात लिपीवरून कालमापन आणि निश्चिती केली जाते. देश, प्रदेश, समाजाची ओळख लिपीवरून केली जाते. तत्कालीन समाजाच्या सांस्कृतिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय परिस्थितीचा बोध लिपीच करत असते. शिलालेख, ताम्रपट, नाणी, दानपत्रे, उतारे, खलिते, हस्तलिखित पोथ्या, या सर्वांचा बोध होतो तो त्यावरील मजकुरातून. या मजकुराचे माध्यम असते मात्र लिपी. गतकाल जिवंत करण्याची क्षमता लिपीत असते. म्हणून लिपी काळ, काम, वेगाचे साधन असते. व्याख्या, विश्लेषण, नोंद, इतिहास लिपीशिवाय अशक्य. ३.३.३ लिपी विकास
 मानव विकासाच्या इतिहासातून प्राचीन संस्कृती आपल्या लक्षात येते. लिपी कालसाधन असली तरी ती कालनिहाय विकसित होत राहिल्याचे दिसून येते. हजारो, लाखो वर्षे त्यासाठी माणसास खर्च करावी लागली. गुणाकर मुळे यांनी म्हटल्याप्रमाणे, “पृथ्वीवरील माणसाच्या अस्तित्वाचा इतिहास दहा लाख वर्षांचा आहे. पाच लाख वर्षांपूर्वी तो दगडाचा हत्यार म्हणून (शिकार, कोरणे, लिहिणे) वापर करत आला आहे. आगीचा शोध लागला होता नि माणसाने भाषेस जन्म दिला होता. त्यांच्या म्हणण्यानुसार सुमारे १० हजार वर्षांपूर्वी माणसाने अंकांचा शोध लावला होता नि अक्षरांचापण. लिपी इतकी जुनी, प्राचीन आहे. सुमारे ६ हजार वर्षांपूर्वीच्या ताम्रयुगात सिंधु, मेसापोटामिया, इजिप्त, चीन संस्कृती अस्तित्वात होती. त्या काळात चित्रलिपी हीच माणसाची भावलिपी होती. सुमेरी लिपी अस्तित्वात होती. मोहों-जो-दडो, हडप्पा संस्कृती उत्खननातील प्राप्त साधनातून सिंधु संस्कृतीची माहिती आपल्या हाती लागली.
 इसवी सन पूर्व १२०० च्या सुमारास पश्चिम आशिया, इराण तसेच भारतातही अक्षरात्मक लिपी उदयास आली होती. लिपी विकासात सेमेटिक परिवाराचे मोठे योगदान लाभले आहे. इसवी सन पूर्व १००० वर्षांदरम्यान व्यंजने अस्तित्वात आल्याचं सांगितलं जातं. अरबी, हिब्रू, इ. सेमेटिक परिवारातील भाषा या व्यंजनांवर आधारित होत्या. फिनिशियन समुदायाच्या समुद्र पर्यटनाद्वारे ग्रीसमधून पश्चिमोत्तर भारतापर्यंत सेमेटिक परिवारातील वर्णमालेचा प्रचार, प्रसार झाल्याचे दिसून येते. इसवी सन पूर्व ६०० मध्ये सेमेटिक लिपीपासून अरमेनिअन लिपी उदयास आली. अरमेनिअन लिपीपासून इसवी सन पूर्व ५००-४०० च्या सुमारास खरोष्ठी लिपीचा उगम झाला. ही लिपी इराण आणि पश्चिमोत्तर भारतात प्रयोगित नि प्रचलित झाली. खरोष्ठी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. सम्राट अशोकाच्या शिलालेखात ही लिपी आहे.
३.३.४ भारतीय लिपी विकास  पुरातत्त्व विशेषज्ञ सांगतात की, इसवी सन पूर्व १५०० च्या सुमारास सिंधु संस्कृती लोप पावली होती. त्यावेळी अस्तित्वात असलेली वैदिक परंपरा प्रामुख्याने श्रुतीआधारित (मौखिक, श्रवण नि स्मरणाधारित) होती. प्राप्त पुराव्यांच्या आधारे लक्षात येते की, ब्राह्मी लिपी भारतातील सर्वाधिक प्राचीन व आरंभिक लिपी होय. सम्राट अशोकाच्या शिलालेखातील खरोष्ठी लिपी आणि ब्राह्मी लिपीत साधर्म्य दिसून येते. ब्राह्मी लिपीच्या दोन शैली विकसित झाल्या- १) उत्तरी शैली, २) दक्षिणी शैली.
३.३.४.१ (अ) उत्तरी शैलीतील लिप्या
१. गुप्त लिपी
 इसवी सनाची चौथी, पाचवी शताब्दी हा गुप्त साम्राज्य काळ म्हणून ओळखला जातो. या काळात प्रचलित असलेली लिपी 'गुप्त लिपी' म्हणून ओळखली जाते. गुप्तकालीन शिलालेख, हस्तलिखितांमध्ये ही लिपी आढळते.
२. कुटिल लिपी
 गुप्त लिपीपासून कुटिल लिपीचा जन्म झाला. पुढे शारदा आणि देवनागरी लिपींचा विकास याच लिपीतून झाला. सहाव्या शतकापासून ते नवव्या शतकापर्यंत कुटिल लिपी अस्तित्वात होती. ३. नागरी लिपी
 ही लिपीच आज देवनागरी लिपी म्हणून ओळखली जाते. संस्कृत भाषेस ‘देवभाषा' (अपौरूषेय) मानले जाते. देवभाषेची लिपी (नागरी) म्हणून देवनागरी' शब्द अस्तित्वात आला. नवव्या शतकात ही लिपी उत्तर भारतात प्रचारित, प्रसरित झाली होती. इसवी सनाच्या आठव्या शतकात तिचा फैलाव दक्षिणेत झाला. करवीर संस्थान (कोल्हापूर)च्या दानपत्रात या लिपीचा वापर दिसून येतो. त्या काळात दक्षिणेत ही लिपी ‘नंदीनागरी' म्हणून ओळखली जायची. या प्राचीन नागरी लिपीतूनच बंगाली, कैथी, मुंडा, महाजनी, राजस्तानी, गुजराती लिपींचा उगम झालेला दिसून येतो.
 ४. शारदा लिपी काश्मीर, पंजाब, तसेच उत्तर पश्चिमी भारतातील प्रदेशात शारदा लिपी वापरात होती. इसवी सनाच्या दहाव्या शतकात शारदा लिपीचा उगम कुटिल लिपीतून झाला. टाकरी, गुरूमुखी लिप्या शारदा लिपींतून उदयास आल्या.
 ५. बंगाली लिपी नागरी लिपीची पूर्व शाखा म्हणून बंगाली लिपी ओळखली जाते. आज मैथिली, ओडिआ लिप्या बंगाली लिपीतून जन्मल्या असे मानले जात असले, तरी तिचा मूलाधार नागरी लिपीच आहे, हे आपणास विसरून चालणार नाही. या भाषांची वर्णमाला आणि देवनागरी वर्णमालेतील साधर्म्य हेच अधोरेखित करते.
३.३.४.२ (ब) दक्षिणी शैलीतील लिप्या
१. पश्चिमी शैली
 ही लिपी इसवी सनाच्या पाचव्या शतकापासून ते नवव्या शतकापर्यंत प्रचलित होती. पश्चिमी लिपी प्राचीन ब्राह्मी लिपीतून जन्मली. पश्चिम भारतातील काठेवाड, गुजरात, नाशिक, खानदेश, सातारा, हैद्राबाद, कोकण, म्हैसूर अशा विस्तृत प्रदेशांत ही लिपी प्रचलित होती. पश्चिमी भारतातील व्याप्त प्रदेशावरूनच या लिपीस ‘पश्चिमी लिपी' असे नाव पडले होते. मराठी, गुजराती, हिंदी, कोकणी भाषा आणि लिपीतील साम्य हेच दर्शविते. मोडी लिपी ही पश्चिमी लिपीचे आद्यरूप म्हणून ओळखले जाते.
२. मध्य प्रदेशी लिपी
 पश्चिमी लिपीशी साम्य असले तरी स्वतंत्र वळणाची लिपी म्हणून मध्य प्रदेशी लिपीचे स्वतंत्र अस्तित्व आहे. या लिपीतील वर्णमाला समकोनी आहे. यात उभ्या, आडव्या रेषांचे प्राबल्य आहे. पश्चिमी लिपीतील गोलाकार वळणांच्या अभावामुळे या लिपीचे वेगळेपण स्पष्ट होते. ही लिपी हैद्राबाद, बुंदेलखंड, मध्य प्रदेश इ. प्रांतात वापरात होती.
३. तेलुगू/कानडी लिपी
 दक्षिण महाराष्ट्र-सोलापूर, विजापूर, धारवाड, हैद्राबाद, म्हैसूर, मद्रास (म्हणजेच आजचा कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, तमिळनाडूचा उत्तरी भाग) म्हणजे या लिप्यांचे क्षेत्र होय. पाचव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत या प्रदेशांची लिपी एक होती. विशाखापट्टणम्, गोदावरी, कृष्णा, नेल्लोर जिल्ह्यांतही तिचा वापर होता.
४. ग्रंथ लिपी
 मल्याळम्, तमिळ लिप्यांचे पूर्वरूप म्हणजे ग्रंथ लिपी होय. सातव्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत ही लिपी प्रचलित होती. आर्कोट, सालेम (सेलम), त्रिचनापल्ली, मदुराई, तिन्निवेली जिल्ह्यात ग्रंथ लिपी वापरली जात असे. तुळू संस्कृत ग्रंथांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो.
५. कलिंग लिपी
 इसवी सनाच्या सातव्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत कलिंग लिपी अस्तित्वात होती. तत्कालीन कागदपत्रात हिचा वापर दिसून येतो. वर्तमान तमिळनाडूमधील चिकाकोल, गंजाम इ. प्रदेशांत ही लिपी प्रचलित होती. कलिंग लिपी म्हणजे वर्तमान देवनागरी, तेलुगू आणि कन्नड लिप्यांचे पूर्वरूप वा पूर्वखुणा होत.
६. तमिळ लिपी
 सातव्या शतकात तमिळ लिपी उदसाय आली. या लिपीवर ब्राह्मी लिपीचा प्रभाव आहे. आज मात्र ही स्वतंत्र लिपी म्हणून विकसित झाली आहे.
७. वट्टेकुत्तु लिपी
 ही लिपी गतीने नि घसटून लिहिली जाते. सातव्या शतकापासून ते चौदाव्या शतकापर्यंत ती वापरली जायची. तत्कालीन दरबारी कागदपत्रात या लिपीचे पुरावे दिसून येतात. दक्षिण लिपीतील शेवटची म्हणून पूर्ववर्ती तेलुगू, कन्नडमध्ये हिचे अस्तित्व दिसते. या लिप्यांत साधर्म्य असूनही लेखनशैली भिन्न दिसून येते.
हस्तलिखित ते मुद्रण
 आज आपण जी मुद्रित पुस्तके वाचतो ती इ.स.च्या सातव्या शतकापासून ते १५व्या शतकापर्यंतच्या लेखन विकासाची परिणती होय. लॅटिन साहित्य चर्मपत्रांवर लिहिले जायचे. ते बांधणे, ठेवणे, वाचणे कठीण होऊ लागले. पृष्ठ संख्या वाढ हे त्याचे कारण होते. हलक्या व पातळ लेखन साधनाच्या गरजेतून हात घडणीचा कागद (Hand made paper) जन्माला आला. तिकडे कित्ता करणे वाढत्या वाचक संख्येने अशक्य झाले. त्यातून मुद्रण यंत्र जन्माला आले. आजची मुद्रित पुस्तके म्हणजे माणसाच्या लेखन विकासाचे फलित होय.

■■

४. ग्रंथ निर्मिती व ग्रंथालय विकास

४.१ ग्रंथ
 सृष्टीच्या विकासात प्राणी व मनुष्य यांच्यामध्ये फरक घडवून आणणारे जे घटक, वृत्ती, गुण आहेत, त्यात हास्य, विचार, लेखन, सृजन, कला इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. प्राण्यापासून मनुष्य ज्या उन्नत अवस्थेस पोहोचला, त्यात आविष्कार, अभिव्यक्ती इत्यादी आंतरिक ऊर्मी नि ऊर्जांचा मोठा वाटा आहे. मनुष्याने प्रारंभीच्या काळात हातवारे करून एकमेकांशी संवाद सुरू केल्याचं सांगितलं जातं. मग तो भय, हर्ष, शोक इत्यादी भावना ध्वनीने व्यक्त करू लागला. ध्वनीनं मग चिन्ह, चित्रांचं रूप धारण केलं. शिकार करत भटकणारा, झुंडीत राहणारा वनमानुष गुंफेत राहात स्थिर झाला. शेतीनं त्याला वरदान दिलं नि तो पुष्ट झाला. मेंदूची वाढ होईल, विकास होईल तसे त्याने अग्नी, चाक, हत्यारे शोधत श्रम बचतीचे उपाय शोधले तसेच तो उन्नत साधनांच्या मागे लागला. आविष्कार नि अभिव्यक्तीच्या नानापरी शोधणाऱ्या माणसाने गुंफांमध्ये कोरणे, ओरखडणे स्मरणासाठी सुरू केले. अभिव्यक्तीसाठी तो चित्रं काढू लागला. चित्र, चिन्हांना हळूहळू सार्वजनिक रूप मिळालं. सूर्य, अग्नी, प्राणी, पक्षी, माणूस चित्रे सूचक बनत गेली. मग धोक्याची, भयाची चिन्हं देव, दैव, दैत्य बनत माणसांनी पूजा बांधल्या. त्या निसर्गाशी इमान बांधायचं म्हणून आपत्ती, भयमुक्तीसाठी तो गाऊ, नाचू लागला आणि सामूहिकपणे प्रतिकार करू लागला. शेकोटीभोवती बसून सांगणारा माणूस लिहिता झाला. लिहिणं त्याची पुनरावृत्ती त्याची गरज बनली. मग त्याने ठसे, ठोकळे, टंच टाक बनविले. शाई, रंग, ब्रश, लेखण्या हत्यार साधन विकासात नवनव्या रूपात प्रगट होऊ लागल्या. कोरणाच्या माणसाने पाने, पापुद्रे, चामडे, कापड इत्यादींवर लिहीत कागद शोधला. कागद, शाई, टाक इत्यादी संस्कृती विकासात संग्रह, संदर्भ, संवाद माध्यम बनत व्यापार, व्यवहारासाठी तो पोथ्या, चोपड्या, चवड, बाड बाळगू लागला. ती जपण्याच्या गरजेतून ती बांधणं, चोपडणं, गुंडाळणे, आवरण घालणं शिकत त्याची पुस्तके, ग्रंथ झाले. त्याचीच ग्रंथालये बनून ज्ञानसंग्रह झाला.
४.२ ग्रंथ : शब्द, अर्थ, व्युत्पत्ती आणि व्याख्या
 ग्रंथ शब्दाचा आशय पुस्तक, बखर, पोथी, चोपडी, चवड, बाड, पाठ अशा अनेक प्रकारच्या शब्दांमधून व्यक्त होत असला तरी पुस्तकाचे जे विद्यमान आधुनिक रूप आहे. तो शब्द पुस्तक हा मूळ संस्कृत पुस्तकं, ‘पुस्तकः'सारख्या शब्दांपासून, प्राकृतातून मराठीत आलेला आहे. त्यात मूळ धातू आहे ‘पुस्त'. पुस्त धातूचा अर्थ होतो वास्तपुस्त, घासणे, चोपडणे, माखणे, लिहिणे, हस्तलेख. पूर्वी जी हस्तलिखिते होती ही सुटी असत. भूजपत्रे, कापड, चामडे, पपायरस इत्यादी स्वरूपात क्रमाने लिहिलेली पत्रे, पाने प्रत्येकवेळी वापरल्यानंतर क्रमाने लावून गठड्यात, आवरणात बांधणे, सुरक्षित ठेवणे हा उद्योग होऊन बसला. मग त्यांना छिद्र करून ओवणे सुरू झाले. मग चिकटविणे आले. बांधणी व चिकटविण्याच्या क्रियेतून पुस्तक आकाराला आले. पहिल्यांदा चामड्यावर, भेंडोळ्यांवर लिहिलेले शिवले गेले. ते अधिक व्यवस्थित ठेवण्याच्या गरजेतून डिंक, सरस आला. मग बांधणी आली.
 आज पुस्तके, ग्रंथ, पुस्तिका, संग्रह, माहितीपत्र, प्रती, आवृत्ती, संहिता, खंड, अध्याय यांच्या जोडकामातून पुस्तक आकारते आहे. पुस्तिकापासून विश्वकोशापर्यंतच्या कथा, कादंबरी, कोश, कविता सारं वाङ्मय, साहित्य, पुस्तकरूप होत. महाग्रंथ, महाकाव्य, महानाट्य बनलं. यामागे माणसाची सतत विकास करण्याची धडपड कारणीभूत आहे. त्या सर्वांमागे पूर्वपरंपरेने पिढी-दर-पिढी चालत आलेलं ज्ञानभांडार सुरक्षित ठेवण्याची धडपड आहे. राजे-महाराजे, सत्ताधीश, धर्मोपदेशक इत्यादींनी ज्ञानरक्षण, ज्ञाननिर्मिती, ज्ञानप्रचार नि प्रसार इत्यादी कामास धर्माश्रय, राजाश्रय दिल्याने आपण पूर्वसंचित जपू, जोपासू शकलो. ज्ञानविस्ताराचा इतिहास याचीच साक्ष देत आला आहे की प्रत्येक पिढीने कालौघात आपले अनुभव, शोधजन्य योगदान दिले म्हणून निरंतर विकास घडून आला. पोथी, बाड, बखर ते ई-बुक, किंडलचा प्रवास, Talk to Tet. पर्यंतचा विकास ही पुस्तकविषयक पोथी, बाड, बखर ते ई-बुक, किंडलचा प्रवास, Talk to Text पर्यंतचा विकास ही पुस्तकविषयक सातत्यपूर्ण संशोधनाचीच परिणती होय. आभासी, अंकीय जगातलं पुस्तक आज फोल्डर, फाईल, पीडीएफमध्ये उपलब्ध झाले आहे.
  ग्रंथ, पुस्तक या अर्थाने इंग्रजीत वापरला जाणारा Book हा शब्द जुन्या इंग्रजीतील 'Boc' शब्दापासून निर्माण झाला आहे. त्याचा व्याकरणाशी संबंध असून, प्राथमिक व्याकरण शिकविणा-या पुस्तकांना (Readers) पुस्तक समजण्याचा प्रघात प्रारंभी होता. लिहिण्यास, वाचण्यास शिकविण्यास उपयोगी साधन म्हणजे जुनी अंकलिपी होय. ती अंक नि अक्षरं (स्वर, व्यंजन, शब्द इ.) शिकण्यास साहाय्यभूत ठरत असे. लॅटिन, संस्कृतादि भाषात ती लेखनासाठी वापरली जाते. पूर्वी लिहायचे लाकडी ठसे हे मातीच्या ठशानंतरच्या काळात वापरले जायचे (Beechwood) . ठसा या अर्थाने पुस्तक शब्द वापरला जायचा. लॅटिनमधील Librum शब्द झाडाच्या आतल्या गाभ्यापासून बनविलेल्या ठशास वापरला जायचा. पुढे यातून त्याचा संग्रह म्हणजे Library झाला. डच, गॉथिक, जर्मन इ. भाषा, साहित्यात Boek, Buch, boka सारखे शब्द हे इंग्रजी BOOKMOM पर्याय म्हणून वापरले जातात.
 माणसाचं भावसंचित जर कुठे परंपरेतून प्रतिबिंबित होत आलं असेल, तर ते ग्रंथांतूनच. मनातलं शब्दबद्ध करून ठेवण्याच्या मनोव्यापारास 'ग्रंथित करणं' असं म्हटलं गेलं आहे. ग्रंथ म्हणजे कागदावर लिहिल्या गेलेल्या दस्तऐवजांचा बांधीव संग्रह. सहज देवाण-घेवाण, वहन, प्रेषणाच्या गरजेतून अगडबंब ग्रंथ काळाच्या ओघात हलके-फुलके होत गेले. सुसंगत वाक्यसंग्रह म्हणजे ग्रंथ. पुस्तक शब्दाचा अर्थ होतो घडण. पूर्वी भाजलेल्या विटा इष्टिकाग्रंथ (क्यूनिफार्म आकृती पाहा) शिळा, धातूचे पत्रे, चमडे, पापुद्रे (पपायरस) इत्यादींवर लिहायचा प्रघात होता, हे ग्रंथाच्या इतिहासातून स्पष्ट होते. पूर्वसंचित जतन करण्याच्या गरजेतून आणि मानवाच्या सातत्यपूर्ण प्रयोग, प्रयत्न आणि संशोधनाचे फलित म्हणजे विद्यमान ग्रंथ, पुस्तके, कोश होत. ग्रंथपूर्व काळात हे सारे ज्ञानसंचित ‘श्रुति स्मृती' पद्धतीने म्हणजे ऐकलेले लक्षात ठेवून जपले गेले. त्या काळात स्मरणशक्ती म्हणजे बुद्धिमत्ता मानली जायची. गुरूमुख हेच त्या काळी ज्ञानसंपादनाचे एकमेव माध्यम होते. मुखोद्गतता हे विद्वत्तेचे लक्षण मानले जायचे. प्राचीन वेद वाङ्मय याच पद्धतीने जतन झाले होते. त्यामुळे लेखनाचा नक्की प्रारंभ केव्हा आणि कसा झाला हे सांगणे कठीण; पण इष्टिका ग्रंथ (क्यूनिफॉर्म) हेच आद्यलिखित रूप सध्या आपल्या हाती आहे. हे प्राचीन असून, त्याचा काळ इ.पू. ३००० वर्षे मानण्यात येतो. मेसोपोटेमिया इथे सापडलेले इष्टिका ग्रंथच आदि ग्रंथ/लिखित होय. प्रागैतिहासिक काळापासून आजअखेर मानवाने केलेल्या सातत्यपूर्ण धडपडीतून साध्या चिखलाचे ठोकळे, मग भाजीव विटा, ठसे, ठोकळे, पपायरस, चर्मपत्रे, भूर्जपत्रे, कागद असे लेखनमाध्यम गरजेतून विकसित केले. शाई, रंग, पिसे, बोरू, वेताच्या/ बांबूच्या चिरफळ्या, धातुपत्रे, दाभण, देरो इ. प्रयोग करत तो लेखन व्यवहार सुलभ व टिकावू करत गेला. पूर्वी धर्मस्थळे, मठ, राजवाडे, चर्च, मंदिरे ही ग्रंथनिर्मिती व संरक्षण, संग्रहाची ठिकाणे होती. धर्मसत्तेची जागा राजसत्तेने घेतल्यानंतर ज्ञानाचे केंद्र दरबार झाले. पुढे संतांनी लोक चळवळ उभारली व ज्ञान हे भाषांतर लेखनातून सर्वसामान्यांपर्यंत पोहोचले. आधुनिक काळ हा ग्रंथ प्रचार, प्रसाराचा खरा वरदान काळ होय.

इष्टिका ग्रंथ (क्यूनिफॉर्म)
ग्रंथ : व्याख्या

ग्रंथ-पुस्तकाचे स्वरूप विशद करताना वेळोवेळी अनेक लेखक, विचारक, कोश इ.द्वारे पुस्तकाची रचना व स्वरूप स्पष्ट करणाऱ्या अनेक प्रकारच्या व्याख्या, परिभाषा, संज्ञा देण्यात आल्या आहेत. त्यापैकी काहींवर दृष्टिक्षेप टाकला तरी आपणास ग्रंथ म्हणजे काय ते कळण्यास मदत होते. - 1
१. "A written or printed work consist of pages glued or sewn together along one side and bound in covers." या व्याख्येतून पृष्ठ बांधणीतून पुस्तक आकारल्याचे स्पष्ट होते. ही व्याख्या पुस्तकाची रचना समजावते.
२."A long written or printed literary composition."2

सदरची परिभाषा साहित्य रचना म्हणजे पुस्तक म्हणते. आज ग्रंथ म्हणजे ज्ञान, साहित्य, तत्त्व, सिद्धांत मानले जाते, ते पुस्तकांच्या या प्रचलित रूपांमुळेच.

३."A book is a series of pages assembled for easy portability and reading, as well as the composition contained in it."3
सदर व्याख्या अधिक स्वयंस्पष्ट होय. पुस्तके अनेक खंडांमध्ये प्रकाशित होतात. शिवाय ती संयुक्त व सुविधाजनक निर्मिती असल्याची गोष्ट सदर व्याख्या सूचित करते.
४."A book is non-periodical printed publication of at least 49 pages, exclusive of cover pages."4
 यात मुखपृष्ठांशिवाय किमान ४९ पृष्ठे ही पुस्तकांची पृष्ठसंख्या आंतरराष्ट्रीय स्तरावर निश्चित केली गेली आहे. शिवाय ते नियतकालिकांसारखे निश्चित काळानंतर (दैनिक, साप्ताहिक, पाक्षिक इ. रूपात) प्रकाशित होत नसल्याचे सांगून पुस्तक व नियतकालिकांतील फरक अधोरेखित केला आहे.


1. A book of selected Poems 2. Merriam - Webster Dictionary 3. Wikipedia 4. Revolution of Book- Unesco. ४.३ ग्रंथ : स्वरूप आणि व्याप्ती   ग्रंथांच्या शास्त्रीय परिभाषा ह्या त्यांचं भौतिक रूप प्रगट करणाच्या असतात. परंतु, पुस्तकांसंबंधी लेखक, कवी, समीक्षक जेव्हा बोलत, लिहीत असतात, तेव्हा त्यातून ग्रंथांचं कार्यरूप कळण्यास मदत होते. "Room without book is a body without soul' म्हणत सिसेरो पुस्तकांची तुलना आत्म्याशी करत घराचं सुसंस्कृतपण ग्रंथांशी निगडित करतो. ऑस्कर वाइल्डनी पुस्तकं वारंवार वाचली गेल्यानं ती आपणास कशी समृद्ध करतात, हे सांगितलं आहे. त्यातून तो पुस्तकास मानवी संस्काराचे साधन मानतो, हे स्पष्ट होते. अर्नेस्ट हेमिंग्वे पुस्तकास जिगरी दोस्त मानतो नि म्हणतो की, "There is no friend as loyal as book.' असं म्हणत तो "Friend in need is friend indeed.' हेच अधोरेखित करतो. पुस्तक जीवनाच्या चांगल्या, वाईट काळात जी सोबत करतात, ती पाठीवरच्या भावा-बहिणीसारखी नि जिवलग मित्रांसारखी नक्कीच जन्मभर साथसंगत करीत राहतात. थॉमस जेफरसननी तर म्हणून ठेवलं आहे की, "I Cannot live without book.' जीवन व पुस्तके परस्परपूरक असतात हेच खरे. 'हॅरी पॉटर' लिहिणाऱ्या जे. के. रोलिंग या विदूषीनं पुस्तकाची तुलना आरशाशी करत म्हटलं आहे की, "Books are like mirrors; if a fool looks in, you cannot expect a genius to look at.' पुस्तकाचं शहाणपण वाचणाऱ्याच्या शहाणपणावर अवलंबून असते. खडे, धान्य टिपणारी कोंबडी मोतीपण खड्यासारखी गिळते; पण रत्नपारखी स्फटिक व हिरा वेगळा करतो. पुस्तकं माणसाचा कायाकल्प घडवून आणतात हे खरं आहे; पण ते समजायचं तर तुमचीसुद्धा सकारात्मकता हवी. पुस्तकांचेही अनेक प्रकार असतात. रंजक, बोधक, प्रणयी, भयावह, संस्कारी, दृष्टिदायक इ. तशीच काही अभिजातही असतात. ती वाचून संपविता येत नाहीत नि संपतही नाहीत. इटॅलो काल्विनोने "The use of Literature' ग्रंथात नमूद केले आहे की, "A classic is a book, that has never finished what it has to say. ती आयुष्यभर आपली पाठराखण करतात, तसाच पाठपुरावाही. म्हणून ग्रंथांची पारायणं करायची नि पुस्तकं वाचत, पचवत जायची. जीवन सभ्य, समंजस, सहिष्णू, सदाचारी, सत्शील बनवायचं तर पुस्तकांना पर्याय नाही. ४.४ ग्रंथ : उगम आणि विकास
 पुस्तके म्हणजे पृष्ठांची बांधीव शृंखला. लिखित पानांचा वाचनीय संग्रह म्हणजे ग्रंथ. पानांच्या बांधणीमुळे आपण पानं पिसा, पंखांप्रमाणे फाकू, पसरू, पिसारून (Fan open) वाचू शकतो. काळाच्या ओघात माती, लाकूड करत धातूचे झालेले टंच, टाक (Font) मुद्रण कलेचं वैभव होतं. आता अक्षरं, शब्द अंकीय युगात आभासी होत आहेत; पण इतिहास प्रवासात त्यांनी चर्मपत्रे, भूर्जपत्रे, पपायरस, वेत, पाम इ. वृक्षांच्या साली, पाठी, पानांवर हस्तलिखिताचं सौंदर्य खुलवलं होतं. तेही छोट्या-मोठ्या रूपांतून. गुंठाळ्या, भेंडोळ्यांचीपण एकेकाळी पुस्तकं होती. नंतर त्यांची बाडे, चोपड्या झाल्या. ठशांपासूनचा ई-बुकपर्यंतचा पुस्तकांचा प्रवास, इतिहास म्हणजे माणसाच्या अविश्रांत श्रम, प्रयत्न, संशोधनाची विकास गाथाच!
४.४.१ प्राचीन काळ
 कालप्रवासात माणसाने लिहिण्यासाठी दगड, चिखल, वाळू, पाने, साली, चामडे, पत्रे (Teen sheets), हाडे, कवट्या, फरशा वापरल्या. मिळेल त्या माध्यमातून व्यक्त होण्याच्या ध्यासाने भाषा, लिपी, लेखन, भाषांतर, ग्रंथ जन्माला घातले. प्रारंभीच्या माती, चिखलाच्या विटा म्हणजे लिहिण्याचं मृदू माध्यम. दगडावर कोरणं कष्टाचं म्हणून माणूस माती, वाळूवर रेघोट्या ओढू लागला खरा; पण ते वारा, पावसात नि वादळात जपणं अशक्य होतं. म्हणून मग त्यानं चिखलाचे ठसे बनवले. पुढे तेच लाकडी, लोखंडी झाले. बृहतकाय अक्षरं महत्प्रयासाने छोटी होत गेली. ते कमी जागेत अधिक मजकूर, चित्र मावण्या, कोंबण्याच्या ध्यास-धडपडीतून. बोरू, ब्रशचे टाकसुद्धा याच धडपडीतून टोकदार होत अक्षर ठशीव, मोत्याचे झाले. अश्म युगानंतर नि धातुयुगापूर्वी लाकडी पाचरावरही (cuneiform) लिहिण्याचा प्रघात होता. मेणाचे ठसेपण मधल्या काळात वापरले गेले. मेणावर अणकुचीदार टाकाने लिहिले, कोरले जायचे. तत्कालीन पाठशालांच्या प्राथमिक काळात धुळपाटी, ठसे, शाई, नीफ हीच लेखनाची साधने होती. मेणाची पुस्तकं असत. (‘प्राचीन लेखन साहित्य' छायाचित्र पहा.) गुंडाळी (Scroll)
 पूर्वी पपायरस (Papyrus) वनस्पती कुटून, चेचून ते भिजवून त्यापासून धागे तयार करून, ते विणून कागदासारखा पातळ पापुद्रा तयार करून त्यावर लिहिले जायचे. आपल्याकडे घायपातापासून भिजवून, कुजवून त्याच्या रेषा, धाग्यांपासून वाक, दोरखंड तयार केले जातात, तशीच ही काहीशी पद्धत. प्राचीन इजिप्तच्या पहिल्या राजवंशाच्या काळात (इ.स. पूर्व २४००) मध्ये पपायरसवर लिहून त्याच्या गुंडाळ्या दरबारात, ग्रंथालयात ठेवल्या जात असत. किंग नेफेरटीटी काकईच्या काळात अशा गुंडाळ्या उपलब्ध असल्याचे ऐतिहासिक नोंदींवरून दिसून येते. या गुंडाळ्या चिकटवून त्याच्या चोपड्या केल्या जात असत. हिरोडोटस या ध्वनिशास्त्रज्ञाने इ.स. पूर्व ९०० च्या दरम्यान पपायरस प्रथमतः ग्रीसमध्ये आणला. बिब्लॉस बंदरातून ग्रीसला पपायरसची निर्यात करण्यात आली होती असं सांगितलं जातं. हेलेनिस्टिक, रोमन, चिनी, हिब्रू तसेच मॅक्डोनियन संस्कृतीत पपायरस प्रचलित असल्याचे पुरावे आढळतात. ग्रंथांचे आद्यरूप, उगम म्हणून या गुंडाळ्यांचे ऐतिहासिक महत्त्व वादातीत आहे. (गुंडाळी वाचक व गुंडाळी फडताळाचे छायाचित्र पहा.)

गुंडाळीच्या रूपात असलेले पुस्तक असे वाचले जात असे.

गुंडाळी पुस्तके ग्रंथालयातील फडताळावर अशी ठेवली जात असत.

संग्रह ग्रंथ (Codex)

 अनेक ग्रंथ बांधून, शिवून एकत्र जपण्याची परंपरा इतिहासात आढळते. पपायरसच्या गुंडाळीवर एक पुस्तक असे. अशा अनेक गुंडाळ्या वाचन सुलभता व सुरक्षिततेच्या दृष्टीने एकत्र करण्याची परंपरा नंतरच्या काळात सुरू झाली. पपायरस, चर्मपत्रे, भूर्जपत्रे, वेताच्या पट्या इत्यादींवर केलेले लेखन एकत्र करण्यातून संग्रह ग्रंथ (Codex) निर्माण झाले. ते दरबार, ग्रंथालय इत्यादी ठिकाणी असत. यातूनच पुराभिलेखागार (Archives) चा जन्म झाला. पुरातन वारसा, ज्ञान, अनुभव (Heritage) इ.चे रक्षण करण्याची कल्पना संग्रह ग्रंथांतून उदयाला आली. झाडांच्या सालीवरील असे लेखन वेलींच्या देठांमध्ये गुंफून ठेवण्याची जी परंपरा प्राचीन काळात होती, त्यातून संग्रह ग्रंथ तयार केले जाऊ लागले. खरे तर यातूनच 'ग्रंथ' (Book) संकल्पना अस्तित्वात आली.
  एकाच आकाराची पाने एकत्र शिवून वाचण्यास सुलभ करण्याच्या गरजेतून पुस्तकांचा जन्म झाला. ते सुरक्षित ठेवण्यासाठी आवरण, वेष्टन (Cover) उदयाला आले. पाने, पत्रे सुटू नयेत म्हणून चिकटवून शिवले जाऊ लागले (Binding). सर्वांत जुना संग्रह ग्रंथ म्हणून मार्शलच्या 'Apophoreta Cxxxiv' चा उल्लेख केला जातो. हा ग्रंथ पहिला सुभाषित कोश (Dictionary Of Quotations) म्हणूनही महत्त्वाचा मानला जातो. (संग्रह ग्रंथ कपाटाचे छायाचित्र पहा.)
हस्तलिखिते(Manuscripts)
 इसवी सनाच्या पाचव्या शतकात रोमन साम्राज्याचा पराभव झाला. त्यामुळे रोमन संस्कृतीची एका अर्थाने अधोगतीच सुरू झाली. इजिप्तशी राजकीय व व्यापारी संबंध संपुष्टात आल्याने पपायरसची आयात थंडावली.

संग्रह ग्रंथ (कोडेक्स) ठेवण्याचे कपाट परिणामी लेखनासाठी पपायरसऐवजी चर्मपत्रांचा वापर वाढला. चर्मपत्रे ही शेळी, मेंढी, वासरांच्या चामड्यांपासून बनविली जात. कातडी कमावून (Tanning) (निवळी, चुनकळीत भिजवून) ती बनवली जात असल्याने लेखनासाठी ती मऊशार कातडी उपयुक्त ठरत असे. ती ताणवून वाळवली जात असल्याने कागदासारखा सरळ पृष्ठभाग असलेली चर्मपत्रे लेखनासाठी सुलभ बनत.
 लॅटिन भाषेतील आद्यलिखिते चर्मपत्रांवर आढळून आली आहेत. पूर्वीच्या धर्मपीठ आणि मठांमध्ये अशा हस्तलिखितांच्या प्रती करणे, कित्ता गिरविणे असे ग्रंथ इतरांना उपलब्ध करून देण्यासारख्या परंपरा इतिहासात आढळतात. विशेषतः पश्चिम रोममध्ये ही परंपरा प्रचलित होती. कॅसिओडोरसने या परंपरेस प्रोत्साहन दिले होते. सहाव्या शतकात सेंट बेनेडिक्टने ग्रंथ वाचनाची परंपरा रुजावी म्हणून प्रयत्न केले होते. तत्कालीन धर्मपीठांच्या आश्रयामुळे लेखन, वाचनकलेस गती आल्याचे दिसून येते. मुद्रणपूर्व युगात कित्ता हेच मुद्रण होते. सर्व धर्मपीठे, मठ हे तत्कालीन ज्ञानभांडाराचे आगर (Information Repository) म्हणून ओळखले जायचे ते हस्तलिखितांच्या संग्रहणामुळेच. ख्रिश्चन धर्मपीठातील पुनरावलोकन सभागार (Chapter house) वर अशी संग्रहालये सर्वत्र आढळतात. ती हस्तलिखित संग्रहालये (SCriotoriums) म्हणून ओळखली जायची. तिथे सूर्यप्रकाश नसे. हस्तलिखिते खराब होऊ नयेत म्हणून अशा संग्रहालयांची रचना अंधारगृह (Dark Room) सदृश असे. अशा संग्रहालयांमधून वळणदार अक्षर लेखक (Calligraphers) , कित्ताकार (piers) , लेखन परीक्षक (correctors) , Falak (Illuminators) , 3791 Ch (Rubricators) (लाल अक्षरात सूचना लिहिणारे) अशी पदे असते. अशा नियुक्त व्यक्तींमार्फत कित्ते डोळ्यांत तेल घालून करवून घेतले जात. कित्त्यांची सत्यता आणि शुद्धता (बरहुकूम) अत्यंत काळजीपूर्वक जपली जात असे. (प्राचीन लेखक छायाचित्र पहा.)

 युरोपप्रमाणे मध्यपूर्वेतील सिरिया, अरबस्तान, इराण, इराक इत्यादी देशांमध्ये ज्यू, ख्रिश्चन, झेइस्ट, मुस्लिम इत्यादी धर्मामध्येही हस्तलिखित ग्रंथांची परंपरा दिसून येते. पर्शियन, अरेबिक, हिब्रू इत्यादी भाषांतील पूर्वापार धर्मग्रंथ इत्यादी वाङ्मय कित्ता करण्याचा प्रघात होता.
प्राचीन लेखक

इसवी सनाच्या आठव्या ते तेराशे शतकाचा काळ हा मुस्लिम धर्माच्या दृष्टीने सुवर्णकाळ होता. त्या काळात कुराणादि साहित्य कलात्मक हस्ताक्षरकांकडून कित्ता करून घेतले जायचे. अशा ग्रंथांची मोठी बाजारपेठ या काळात वरील देशांमध्ये तेजीत होती. एकट्या बगदादमध्ये हिजरी ९०० काळात १०० कित्ता विक्रेते / पुस्तक विक्रेते होते, असे याकुबीने लिहून ठेवले आहे. यावरून तत्कालीन हस्तलिखिताचा प्रचार, प्रसार किती व्यापक होता, ते लक्षात येते. त्या काळात कित्ता वाचन प्रगट व्हायचे. लेखक ऐकून ते प्रमाणित करायचा. मग कित्ता करण्यास परवानगी दिली जायची; पण अधिकांश पुस्तकांच्या मूळ प्रतीच असत, कित्ता अपवाद. कित्ता सर्रास फक्त धर्मग्रंथांचा होत असे.
लाकडी ठसे (Wooden Blocks)
  गुंडाळी, विटा, चर्मपत्रे, भूर्जपत्रे इ.नंतर मुद्रणयंत्र पूर्व युगात छपाईसाठी लाकडी ठसे वापरले जायचे. चीनमधील हान राजवटीच्या काळात इ.स. २२० च्या सुमारास लाकडी ठसे वापरले जायचे. हे ठसे म्हणजे लाकडी उठाव असत. उठाव उलटे असत. शाई, रंगांचा वापर करून चित्रे, अक्षरे कागदावर उठविली जात असत. त्यांच्या बांधणीने हस्तलिखित ग्रंथ तयार होत असत. पूर्व आशियाई देशात अशी हस्तलिखिते तयार होत. Diamond Sutra (इ.स. ८६८) हे लाकडी ठशाच्या छपाईतून साकारलेले प्रसिद्ध पुस्तक होय. लाकडी कारागिरीच्या नमुन्याच्या सुबकतेवर पुस्तकाची प्रत(दर्जा) ठरविली जात असे. ठसा पुस्तके (Block Books) म्हणून ही हस्तलिखिते ओळखली जायची. युरोपमध्ये या कलेचा प्रसार इ.स. १४०० मध्ये झाला. त्यातून पत्ते, धार्मिक चित्रे यांचे उत्पादन पुढे सुरू झाल्याचे दिसून येते. बी शेंग या चिनी संशोधकाने या पद्धतीतून सुटे ठसे (Movable Types) निर्माण केले. ते प्रारंभिक टंक (Fonts) होत. गटेनबर्गने मग लोखंडी टंक निर्माण करून नि मुद्रणयंत्र शोधून काढून मुद्रणकलेचा प्रारंभ इ.स. १४५० मध्ये केला. त्यामुळे पुस्तकांची किंमत स्वस्त होण्यास जसे सहाय्य झाले तसे पुस्तकांच्या हव्या तितक्या प्रती अल्पकाळात निर्माण करणे नित्यक्रम होऊन गेले. मुद्रणकलेने ग्रंथक्रांती घडवून आणली.
४.४.२ एकोणिसावे शतक
 एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात वाफेवर चालणारी मुद्रण यंत्रे अस्तित्वात आली. ही यंत्रे दर ताशी ११०० पानांची छपाई करीत; पण कामगारांना या गतीने मजकुरांची जुळणी करणे अवघड जात असे. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात मोनोटाइप आणि लिनोटाइप मुद्रण यंत्रांचा शोध लागून मुद्रण पूर्वीपेक्षा गतिमान व सुबक बनले. ६००० अक्षरे जुळणी करून छापणे शक्य झाल्याने मुद्रणाची गती तिपटीने वाढली. शिवाय मुद्रण, प्रकाशनावरील पूर्वापार बंधने शिथिल झाल्यानेही पुस्तक प्रकाशनांची संख्या अनपेक्षितपणे वाढली. बौद्धिक संपदा कायदा (Intellectual property Act), मुद्रण स्वांतत्र्य (Freedom of Press), बंधमुक्त प्रकाशने (Public Domen) , मुद्रण हक्क (Copy right) इत्यादी सुधारणांमुळे ग्रंथ मुद्रण, प्रकाशनास शिस्त येऊन ते नियंत्रित झाले.
४.४.३ विसावे शतक
 या शतकात एकामागून एक गतिशील व सुबक मुद्रण करणारी यंत्रे विकसित झाली. ट्रेडल, लिथो, सिलिंडर, ऑफसेट, रोटरी, डिजिटल प्रिंटर इ.मुळे विसाव्या शतकाच्या (मुद्रणयंत्र व मुद्रणालय छायाचित्र पाहा) मध्यास २ लाख पुस्तके प्रकाशित व्हायची. त्यांची संख्या शतकाच्या शेवटी किमान पाच पट वाढल्याचे दिसून आले. माहितीचा विस्फोट एकीकडे तर दुसरीकडे माहिती व तंत्रज्ञान युग यांच्या दुहेरी विकासाचा लाभ व परिणाम म्हणून पुस्तकांचा महापूर लोटला. पुस्तकांची दुकाने, प्रकाशन गृहे, ग्रंथालये यांतील व्यवस्था कोलमडून पडावी असा हा काळ! त्यातच संगणक, इंटरनेट क्रांतीने ई-बुक व ई-प्रकाशनास प्रारंभ केल्याने ग्रंथ संकल्पनेला छेद मिळून अंकीय आवृत्ती (Digital Edition) अस्तित्वात आली. याचा सर्वांत मोठा फायदा म्हणून वाचक संख्येत अगणित वाढ झाली. याने मुद्रण, प्रकाशन, वाचन, लेखन इ. संदर्भातले पूर्वापार आडाखे धुळीला मिळून मुक्त ज्ञान समाज (Free knowledge society) उदयाला आला. वाचन संस्कृती चरमसीमेवर पोहोचली. पाहणेच वाचन होऊन बसले. ग्रंथ गौण ठरले.

कनिख व बौअर यांनी तयार केलेले पहिले स्टॉप-सिलिंडर मुद्रणयंत्र

सोळाव्या शतकातील मुद्रणालयातील विविध क्रिया : (डावीकडून उजवीकडे) मजकुरावरून अक्षरांच्या खिळ्यांची जुळवणी, फर्म्यातील खिळ्यांची दुरुस्ती, खिळ्यांवर शाई लावणे व मुद्रित कागदांचे गठ्ठे लावणे; दाबयंत्राद्वारे दाब देणे, मुद्रित कागद वाळण्यासाठी टांगलेले दिसत आहेत. ४.४.४ एकविसावे शतक
 मुद्रित पुस्तकांची जागा किंडलने घेतली. ऑनलाइन प्रकाशन व विक्रीस गती आली. मुद्रितबरोबर अंकीय आवृत्ती प्रकाशन समांतर होत पुस्तके मुक्त रूपात ज्ञानप्रसारक झाली. कट, पेस्ट, डाऊनलोडने लेखन, वाचन प्रक्रिया स्मरणाकडून संग्रहाकडे नेली. ‘संदर्भापुरते वाचन' असा वाचनाचा नवा तत्पर (Instant) प्रकार अस्तित्वात आला. मोबाईल, लॅपटॉप, वायफाय सुविधेने वाचन हे व्यक्तीसुलभ बनले. मुद्रण व्यवसायात POD यंत्रे (Print On Demand) अस्तित्वात आल्याने प्रकाशन, मुद्रण व्यवसाय संग्रहमुक्त झाला. आता साठा करून ठेवून विकण्याची पद्धत संपून आदेशानुसार मुद्रण प्रकाशन, स्वयंअर्थशासित प्रकाशन (Self publishing) मुळे प्रकाशकाचा एकाधिकार व नियंत्रण इतिहासजमा झाले. सी.डी. रॉम, कॅसेट्स, क्लिप्स, व्हिडिओ टेप्स, ऑडिओ टेप्स इ.द्वारे पुस्तके दृकश्राव्य बनली. पाहणे, ऐकणे वाचनाचे पर्याय बनले. वाचन संस्कृतीचा -हास होत असल्याची हाकाटी ऐकू येणे याला खरे तर मुद्रण, लेखन, प्रकाशन, वाचनाच्या स्वरूपाचा कायाकल्प म्हणून पाहायला हवे. गतीने उसंत गमावली हे वाचन कमी होण्याचे खरे कारण होय. ग्रंथ वाचन हा कधी काळी शिळोप्याचा उद्योग होता. तो त्या स्वरूपात राहिला नाही हे खरे; पण वाचनाचे स्वरूप बदलले याची नोंद घ्यायला हवी.
जगातला पहिला ग्रंथ
 जगातील आद्यलिखिताचा नमुना म्हणजे आदिमानवाने दगड, खडकांवर ओढलेले ओरखडे, रेघा नि कोरीव चित्रे होत. त्यानंतर माणसाने प्रयत्नपूर्वक केलेले लेखन म्हणजे ठशा, ठोकळ्यावर नोंदविलेल्या गोष्टी. असे काही लेखनाचे आद्यठसे बगदादच्या पुरातत्त्व संग्रहालयात आपणास पाहावयास मिळतात. त्यांचा काळ इ.स. पूर्व ४००० वर्षे सांगितला जातो. नंतरच्या काळात माणसाने अशा विटा, ठोकळे, ठसे दीर्घजीवी जपता यावेत म्हणून लिहिल्यानंतर ते भाजून (Baked) सुरक्षित राहतील असे पाहिले. अशी भाजलेल्या विटांची पुस्तके (Clay Books) असत. सर हेन्री लेयार्ड यांनी कॅलडा (बॅसिलोनिया) येथील उत्खननात अशी काही पुस्तके जमा केली आहेत. ती आता ब्रिटिश म्युझियममध्ये ठेवण्यात आली आहेत. सध्या उपलब्ध असलेल्या प्राचीन लेखन नमुन्यातील एक म्हणून याचे असाधारण महत्त्व आहे. त्यावर पुराची माहिती नोंदवलेली आहे.


https://enwikipedia.org/wiki/Book पूर्व सुमारे ४००० वर्षे मानण्यात येतो. या लेखनाची भाषा हिब्रू आहे. हे लेखन बायबलपेक्षा जुने आहे. हे डावीकडून उजवीकडे लिहिलेले आहे.
 इजिप्तचे साहित्य हे कॅलेडियन साहित्यानंतरचे प्राचीन साहित्य म्हणून ओळखले जाते. इजिप्तचे साहित्य पपायरसवर लिहिले जात असे. असे सर्वाधिक जुने पुस्तक म्हणजे 'The Book Of Dead' होय. पिरॅमिड्सची निर्मिती इजिप्तमध्ये होत असल्याच्या काळातच हा आद्य जागतिक ग्रंथ लिहिला गेला. या ग्रंथाची प्रत ब्रिटिश म्युझियममध्ये पाहावयास मिळते. या ग्रंथात प्रार्थना, भक्तांची मनोगते, अनुभव, मृत्यूपूर्व इच्छा इत्यादींच्या नोंदी आढळतात. शिवाय त्यात मृत्यूनंतरच्या जीवन अपेक्षा नोंदल्या गेल्या आहेत. अशाच जुन्या ग्रंथांपैकी एक आहे, 'The prophets of pathotep'. पाथ हॉपचा जन्म मेहफीस येथे झाला होता. त्याचा मृत्यू इ.स. पूर्व ३५५० मानण्यात येतो. हे पुस्तकही पपायरसवर लिहिले गेले आहे. हे पुस्तक पॅरीस येथील फ्रान्सच्या राष्ट्रीय वस्तुसंग्रहालयात आहे. अशा प्रकारची अनेक आद्यलिखित संपदा प्रत्येक भाषेत सुरक्षित असून, वरील ग्रंथ त्यात सर्वाधिक प्राचीन म्हणून ओळखण्यात येतात.
४.५ मुद्रण : उगम आणि विकास
४.५.१ उगम
 कागद अथवा तत्सम पृष्ठावर मुद्रा उठविणे म्हणजे मुद्रण होय. मजकूर अथवा चित्रांच्या अनेक प्रती करण्याच्या गरजेतून मुद्रणकलेचा शोध लागला. पृष्ठावर शाई अथवा रंग लावलेला ठसा अथवा मुद्राक्षरावर दाब देऊन त्याचा छाप उठविणे असे मुद्रणाचे सर्वसाधारण रूप बनले आहे. आता ही क्रिया यंत्राद्वारे होत रोज विकसित होते आहे. मुद्रणतंत्राचा विकास झाल्यापासून ज्ञान संक्रमण, संग्रहण, वहन, प्रेषण, संरक्षणाने ज्ञानास मृत्युंजयी रूप प्राप्त झाले आहे. संदेशवहन, चित्रवाणी, चित्रपट, संगणक, फिती इत्यादींमुळे मजकूर, चित्रेच काय पण ध्वनीमुद्रण, दृश्यमुद्रण (छायाचित्रण) शक्य झाले आहे. मुद्रित माध्यमे आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमे यांच्याबरोबरीने माहिती व संपर्क क्रांतीतील उपकरण आणि साधन विकासातून मुद्रण कल्पना आता आभासी रुपयापर्यंत येऊन पोहोचली आहे. डाऊनलोड, कॉपी, पेस्ट इत्यादी वर्तमान क्रिया नवे व अत्याधुनिक मुद्रणच होय. एकावेळी एक मजकूर, चित्र, संदेश प्रेषण हे मुद्रण व वितरण, प्रसारणाचे संयुक्त रूपच होय.
 इसवी सनाच्या दुस-या शतकाच्या शेवटी चिनी लोकांनी चित्र, अक्षरादि मजकूर मुद्रित करण्याचा शोध लावला. त्या वेळी ही हस्तकला वा क्रिया होती. त्या वेळी मुद्रणासाठी कागद, ठसे (प्रतिमा) व शाई / रंग या तीन गोष्टींची गरज असायची. कागदाचा शोध मुद्रणाआधीचा आहे. मुद्रण कलापूर्व एक दशक कागद निर्मिती सुरू झाली. शाई तयार करण्याची कला / क्रिया मात्र फार प्राचीन म्हणावी लागेल. कारण, कागदाआधी सुमारे अडीच हजार वर्षांपूर्वीच शाईचा शोध लागला होता. याच काळात थोड्या वर्षांनी कोरीव अक्षर ठसे, मुद्रा वापरण्याची पद्धत सुरू झाली. सुरुवातीस अक्षरे लाकडी असत. नंतर ती टिकावू व्हावी म्हणून धातूंची (पंधरावे शतक) करण्यात आली. गोंद इ.ने अक्षरे चिकटवून प्रती काढल्या जात. कागदाचा । प्रसार युरोपमध्ये झाला तसा मुद्रणास गती आली. मुद्रा, मातृका इ. शिशाच्या करून त्या सुट्या किंवा एकत्र करून छापण्याच्या प्रयत्नांतून मुद्रण कला निरंतर विकसित होत गेली. मुद्रण यंत्रपूर्व काळ हा मुद्रणकलेचा मानण्यात येतो. यंत्र शोधाने कलेचे रूपांतर उद्योगधंद्यात झाले.
४.५.२ मुद्रण यंत्र : शोध आणि विकास पंधराव्या शतकात योहान गटेनबर्क याने मुद्रण यंत्राचा शोध लावला. त्याने छापलेल्या ४२ ओळींचा ‘बायबल' ग्रंथाचा मजकूर हे यंत्रावर छापले केलेले आदिमुद्रित होय. टंक (मुद्राक्षरे) मुद्रणपद्धती (Paper to Print) यंत्रामुळे अस्तित्वात आली. या शतकाच्या उत्तरार्धात मुद्रण यंत्राचा अधिक विकास होत गेला. गेल्या ६०० वर्षांत मुद्रण स्वयंचलित होत आज ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे संगणकीय कार्यक्रमाधारित छपाई, बांधणीसह पूर्ण पुस्तक तयार करणारे ‘मागणी तसा पुरवठा' (Print n Demand) करणारे यंत्र बनले आहे.
 अक्षर जुळणी, छायाचित्र छपाई, शिलामुद्रण (लिथोग्राफी), इलेक्ट्रोप्लेटिंग, लेसर, रोटरी, प्रतिरूप मुद्रण (ऑफसेट), चेक, नोट छपाई यंत्र, ओसीआरयुक्त छपाई अशी रोज नव्या तंत्रज्ञानाची मुद्रण यंत्रे वापरात येत आहेत. कागद, मुद्रण ते पुस्तक (Paper to print) अशा सर्व क्रिया सलग व एकत्र करणाच्या यंत्रशोधामुळे मानवी हस्तक्षेपाशिवाय मुद्रणाची कल्पना आज मूर्त झाली आहे. मुद्रण आता रंगीत झाले आहे. वृत्तपत्रे, प्रकाशने, उद्योग, बँका, विमा जीवनाची सर्व क्षेत्रे मुद्रणांनी व्यापली आहेत, ती इतकी की माणूस आता सहीऐवजी परत अंगठा करू लागला. तोपण ई-अंगठा झाला आहे.
 पुस्तके, वर्तमानपत्रे, मासिके, जाहिराती, पाठ्यपुस्तके, धनादेश (चेक), ओळखपत्रे, शीर्षपत्रे (लेटरपॅड्स) ही नित्याची गोष्ट झाली आहे. आता वस्त्र आणि वस्तूवरील छपाई हा नवा स्वतंत्र यशस्वी उद्योग ठरला आहे. मुद्रण कलेवर आज मोठ्या प्रमाणात ग्रंथ, मासिके, संदर्भग्रंथ उपलब्ध असून, मुद्रणाचे छोटे-मोठे अभ्यासक्रम विद्यापीठे शिकवित आहेत. एकेकाळी कला असणारे मुद्रण आज स्वतंत्र विद्याशाखा, तंत्रज्ञान म्हणून विकसित पावले आहे. केवळ मौखिक आदेशाद्वारे मुद्रण करणे आता शक्य झाले आहे. मुद्रणातून सुरक्षा, सांकेतिकता जपण्याचे, गुणवत्ता नियंत्रणाचे, देवाणघेवाण (बार कोडिंग) तंत्र म्हणजे वेळ, श्रम बचतीचे मोठे साधन बनून राहिले आहे. मुद्रणाने मानवाचे अवघे जीवन व्यापून राहिले आहे.
४.६ ग्रंथ वाचन : पद्धती व प्रकार

४.६.१ ग्रंथ कसे वाचावेत?

 ग्रंथ कसे वाचावेत अथवा वाचले जातात, यासंदर्भात फ्रान्सिस बेकनचं एक प्रसिद्ध विधान आहे - 'Some books are to be tasted, other to be swallowed and few to be chewed and digested.' काही पुस्तकांची नुसती चव बघायची, काही गिळायची तर काही चाखत पचवायची.' ग्रंथ कसे वाचावेत याअनुषंगाने मॉर्टिमर अॅडलर यांनी १९४० मध्ये 'How to Read a Book' शीर्षकाचं पुस्तकच लिहिलं असून, त्यात त्यांनी वाचन प्रकार व पद्धतींची विस्ताराने चर्चा केली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रंथ वाचन चार प्रकारचे असते.
४.६.२ ग्रंथ वाचन प्रकार
(१) प्राथमिक वाचन (Elementary Reading) बाल्यावस्थेतलं वाचन असतं तसं हे बालबोध वाचन, प्राथमिक शाळेतल्या विद्यार्थ्याचं वाचन म्हणजे अंक, अक्षरांची ओळख व उच्चारण. शिवाय ते ब-याचदा प्रगट (मौखिक) असतं. शब्दज्ञानाच्या मर्यादेतलं हे वाचन अर्थबोध करणारं असतं. ते विषय समजावतं, आशय नाही. काही एक समज, ज्ञान, भान देणारे वाचन एक कर्मकांड असते.
(२) निरीक्षक वाचन (Inspectional Reading) वाचनासाठी पुस्तक निवडण्यापूर्वी वरवर चाळणं, पाहणं, शीर्षक, प्रारंभिक पानं (प्रस्तावना, मनोगत, मलपृष्ठ मजकूर (ब्लर्ब) वाचून पुस्तकाचा अंदाज घेत केलेलं वाचन म्हणजे निरीक्षक वाचन. आदमास घेत केलेलं वाचन हे पुस्तक चाखणं असतं. याला इंग्रजीत skimming म्हणतात. म्हणजे एका दृष्टिक्षेपात झालेलं वाचन. डोळे फिरविणे इतकंच त्या वाचनाचं स्वरूप असतं. विशेषतः ग्रंथालय, दुकान इत्यादींमध्ये वाचकाने जाऊन पुस्तकाची निवड करण्याच्या क्रियेचं हे वाचन. निवडपूर्व वाचन म्हणता येईल याला. हा एक प्रयत्न असतो. हाताळत केलेलं हे वाचन, लेखक, पुस्तकांचा काही एक अंदाज या वाचनातून वाचकाच्या हाती येतो. कटाक्षात केलेले हे वाचन. त्याआधारे झालेली निवड यातच वाचकाच्या प्रगल्भतेची खरी कसोटी असते. आशय, आकलन त्वरित करण्याच्या इराद्यातून हे वाचन घडतं.
 (३) विश्लेषणात्मक वाचन (Analytical Reading) पुस्तकात गढून (Live) केलेले वाचन म्हणजे विश्लेषणात्मक वाचन. यासाठी पूर्ण एकाग्रता नि मनस्विता अपेक्षित असते. हे वाचन असतं धीराचं नि मन:पूत केलेलं. या वाचनात वाचक लेखकाशी एकरूप होऊन जातो. असे वाचक मात्र अपवाद असतात. असं वाचन अनेकदा होतं नि प्रत्येक वेळी ते नवी अनुभूती, आनंद, ज्ञान देत राहतं.
 (४) सारभूत वाचन (Synoptical Reading) व्यासंगी, अभ्यासक, संशोधक, साहित्यिक, समीक्षक ज्या प्रकारचं वाचन करतात ते सारभूत असतं. यात एकाच विषयावरील अनेक पुस्तकांचे वाचन संदर्भानुसार होतं. यातील वाचन तुलनात्मक, समीक्षात्मक असतं तसं स्वतंत्रही. मूलभूत विचार, सिद्धांत, तत्त्व शोधासाठी केलेले हे वाचन सखोल असतं नि सारग्राही. महाविद्यालयीन शिक्षणानंतरचं हे वाचन पूर्ववाचनाचा पुनर्शोध असतो. नव्या मांडणीसाठी हे वाचन होत राहतं. आसक्ती, छंद, ओढीतून हे वाचन घडतं.
 ४.५.३ ग्रंथवाचन पद्धती (Method of Reading)
 (१) मुखपृष्ठ, शीर्षक नि मलपृष्ठ अवलोकन
वाचनार्थ पुस्तक निवडताना ती चोखंदळ होण्याने श्रम, वेळ, पैशाची बचत होते. वाचनार्थ पुस्तक निवडताना मुखपृष्ठ पाहणे, न्याहाळणे, समजून घेणे महत्त्वाचे असते. शीर्षकातून आशय प्रतिबिंबित होतो हे खरे आहे; पण कथात्मक साहित्य (Fiction) याला अपवाद ठरू शकते. अशा साहित्याची, पुस्तकांची शीर्षके मिथकीय, प्रतीकात्मक, व्यंगात्मक, सूचक, गूढ कधीकधी अनाकलनीयही असतात (उदा. श्याम मनोहरांची शीर्षके). मात्र, विविध ज्ञान, विज्ञान, समीक्षेची शीर्षके वस्तुनिष्ठ असल्याने निवडीस ती साहाय्यक ठरतात. प्रथमदर्शनी केली जाणारी ही पाहणी. वाचन मात्र लक्षपूर्वक गांभीर्याने झाले, तर सर्वप्रकारचा अपव्यय टाळता येणे शक्य असते. दाणे टिपण्याच्या (GLen) तत्परतेने ही निवड होणे आवश्यक असते. पुस्तक शीर्षक, अनुक्रमणिका, प्रकरणातील उपशीर्षकांच्या दृष्टिक्षेपातून होणारं वाचन निवडीस पूरक ठरतं. ग्रंथ काय सांगू पाहतो त्याचा अचूक अंदाज घेता येणं महत्त्वाचं. ही क्रिया व्यक्तिसापेक्ष असते; पण ती प्रतिक्षिप्त होणं आवश्यक. ‘सत्याचा शोध', ‘धर्मचिंतन', 'चाणक्य मीमांसा' अशी स्पष्ट शीर्षके शोधास पूरक ठरतात. मुखपृष्ठे ही सूचक, पूरक असणारी असतील तर ती निवडीत महत्त्वाची भूमिका बजावतात. मलपृष्ठ मजकूर ब-याचदा वाचनास प्रेरणा देणारा, मार्गदर्शन करणारा व त्या अर्थाने निवड सार्थ ठरविणारा असतो. चोखंदळ वाचक मलपृष्ठ मजकूर, मुखपृष्ठाच्या दुमडलेल्या भागावरील (Flap) भाष्य, लेखक परिचय इत्यादी आधारे निवड करतो. त्यामुळे ही सहसा अचूक ठरते. अलीकडच्या काळात विपणन (Marketing) मुख्य झाल्याने असे मजकूर दिग्भ्रमित करण्याची शक्यता असते. तरी असे मजकूरही पुस्तकाचा सुगावा देऊन जातात.
(२) पुस्तकपूर्व मजकूर (मनोगत, प्रस्तावना इ.)  पुस्तकाच्या मूळ संहितेपूर्वी तिचा परिचय, ओळख, क्रम समजावणारी लेखकीय भूमिका, प्रस्तावना, अनुक्रमणिका, विषय विस्तार सांगणाच्या पानांचे वाचन मूळ ग्रंथ वाचनाची भूमिका, मानसिकता तयार करणारी असते. विषय प्रवेश, ओळख म्हणून हा मजकूर वाचणे पुढील वाचन सुलभ करत राहते. पुस्तकाच्या शेवटी असणारा कोष्टके, परिशिष्टे, संदर्भ सूची, विषय, व्यक्ती नामावली इत्यादी मजकूरही असाच महत्त्वाचा असतो. वाचन काळात अथवा वाचनोत्तर सुस्पष्टतेसाठी त्यांचे वाचन तितकेच महत्त्वाचे असते. कथेतर साहित्य वाचनात (Non Fiction Reading) यांचे महत्त्व असाधारण ठरते. संपूर्ण पुस्तकाचे काहीएक आकलन व आवाका ग्रंथ पूर्व आणि ग्रंथोत्तर पृष्ठातून वाचकास येतो. कथात्मक साहित्यात कथाकार आपल्या कृतीची जी भूमिका विशद करतो, ती वाचकांची मानसिक धारणा तयार करते. वाचन प्रेरणा म्हणूनही असा मजकूर मूळ ग्रंथ वा कृती वाचनापूर्वी वाचणे फायदेशीर, उपकारक ठरते. लेखक, उद्देश, ग्रंथ रचना, विषय विवेचन इ. दृष्टिनेही या पानांमुळे वाचक आश्वस्त होत असतो. ग्रंथ वाचनाची पार्श्वभूमी तयार करणारी ही पाने अशा दृष्टींनीही महत्त्वाची असतात की त्यामुळे वाचक वाचनपूर्व गृहितके तयार करून ग्रंथाशी भिडला की मग पुस्तक वाचन अर्धवट राहात नाही. (३) कथेतर ग्रंथांमधील उपशीर्षकरचना, प्रकरणे व उपसंहार
 मूळ ग्रंथ संहितेतील प्रकरणे, अध्याय रचना यांचे आकलन वाचकांस त्यांच्या शीर्षक, उपशीर्षकातून होत असल्याने त्यांचे वाचन व आकलन मूळ ग्रंथ वाचन सुस्पष्ट व समृद्ध करते. शीर्षकांमुळे त्याखालील मजकूर लक्षात येऊन त्याची वाचन शक्यता वाढते तशी रुंदावतेही. ग्रंथाचा आशय, विषय या वाचनातून सुस्पष्ट होतो. प्रकरणाच्या शेवटी असलेले निष्कर्ष, सार वा ग्रंथाच्या शेवटी असलेल्या समारोप/उपसंहार मजकुरातून वाचलेल्या मजकुराच्या आकलनास दुजोरा मिळत असल्याने त्यांचे वाचन मूळ ग्रंथ वाचनाइतकेच महत्त्वाचे असते. ते केलेले वाचन स्थिर, स्थायी व स्मरणीय बनविते. कथात्मक साहित्याचा शेवट कळाला नाही, तर सारे वाचन व्यर्थ ठरते. यावरून समारोप, निष्कर्ष, उपसंहाराचे महत्त्व अधोरेखित होते, हे वेगळे सांगायची गरज नाही. कथात्मक साहित्याचा अंत मात्र क्रमाने शेवटीच वाचायला हवा अन्यथा त्याची गंमत, जिज्ञासा शून्य होते. चित्रपटाचा शेवट माहीत असेल तर तो न पाहिलेलाच बरा.
(४) समीक्षा, परीक्षणे वाचन
 पुस्तकांची समीक्षा, परीक्षणे वाचणे यांतून पुस्तकांविषयी जिज्ञासा निर्माण होते, तसेच वाचनेतर अशा समीक्षा, परीक्षण वाचनातून आपल्याला झालेल्या आकलनाचा धांडोळा घेणे. ताडून पाहणे शक्य होते. म्हणून असे वाचन वृत्तपत्रे, नियतकालिके ई-पत्रिका, संकेतस्थळे, ब्लॉग इत्यादींतून करायला हवे. अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, गुगल, प्रकाशकांची संकेतस्थळे, मुखपत्रके (House Magazines), पुस्तक सूची (Catalogue) वाचन पूरक वाचन म्हणून उपकारक असते. असे मजकूर, लेख संक्षिप्त असल्याने ‘गागर मे सागर' गुणवैशिष्ट्याने युक्त असतात. अल्पाक्षरी व बहुगुणी मजकूर वाचनाने आपली वाचन समृद्धी वाढण्यास साहाय्य होते. कधी कधी असे मजकूर भलावण करणारे असले तरी कधी-कधी ते भ्रमित करणारे पण असतात. परंतु, चोखंदळ वाचकास जाहिरात व लेख यातील अंतर वाचतानाच उमगत जाते. इंटरनेटवरील बहुतारांकित श्रेणी (Star Ratings) प्रत्येक वेळी वस्तुनिष्ठ असेलच असे नाही. तरीही त्यामुळे वाचक कल, मतानुसारी वाचन प्राधान्य ठरविण्यास ते मार्गदर्शक असते.
४.७ ग्रंथालय : उगम आणि विकास
 ग्रंथालय म्हणजे ग्रंथसंग्रहालय. माणूस लिहू, वाचू लागल्यापासून ग्रंथालये अस्तित्वात आहेत. ती आपल्या संस्कृतीचे अभिन्न अंग आहे. माणूस सुसंस्कृत झाला यात ग्रंथालयांचे मोठे योगदान आहे. कारण त्यांनी केवळ ग्रंथसंग्रह केला नाही तर वाचकांच्या पिढ्या घडविल्या. ज्ञानसत्रे, व्याख्यानमाला, चर्चासत्रे, पुस्तक प्रकाशने करून त्यांनी वाचन संस्कृती निर्माण केली. ग्रंथालये समृद्ध असलेला देश ज्ञानसमृद्ध मानला जातो. ग्रंथ, वाचक व सेवक अशा तीन घटकांनी ग्रंथालय आकारते. ग्रंथालयातील ग्रंथसंग्रह संख्या, दुर्मिळ ग्रंथ, संदर्भ पुरविण्याची व्यवस्था, वाचकसेवी प्रशासन, सुसज्ज इमारत हे ग्रंथालयाचे खरे वैभव होय.
  प्राचीन ग्रंथालयात प्रारंभीच्या काळात इष्टिका ग्रंथांचा भरणा असायचा. नंतर पपायरसच्या भेंडोळ्या ग्रंथ बनले. काही काळानंतर टिकाऊ ग्रंथांच्या गरजेतून चमड्यावर लिहिले जाऊ लागले. ते ठेवणे, बांधणे, वाचणे गैरसोयीचे वाटण्यातून कागदाचा जन्म झाला. त्यातून पुस्तके, मासिके, वृत्तपत्रे आकाराला आली नि ग्रंथालये दिवसेंदिवस ज्ञानकेंद्रे बनत गेली. कागदपत्रे, हस्तलिखिते, नकाशे, छायाचित्रे, शिल्पाकृती, शिलालेख, नाणी, तिकिटे, ध्वनिमुद्रिका, ग्रामोफोन, मुद्रितफिती (टेप्स), टेपरेकॉर्डर, फिल्म, प्रोजेक्टर, सूक्ष्मपत्रे (मायक्रोकार्ड, सिमकार्डस्), दृक्-श्राव्य फिती (व्हिडिओ टेप्स), व्हिडिओ रेकॉर्डर/कॅमेरा, डी.एल.पी., टेलिव्हिजन, स्कॅनर, संगणक, प्रिंटर्स इ. साधनांद्वारे ग्रंथालये समृद्ध असतात. दुर्मिळ माहितीचा खजिना, संदर्भसंग्रह असतो म्हणून ग्रंथालय एका अर्थाने पुराभिलेखागार (Archive) असते. ही साधने व संग्रह जतन करण्याचे मोठे कार्य ग्रंथालये करीत असतात.
  ग्रंथालये संस्कृती संरक्षण व संवर्धन करणारे सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक केंद्र होय. ग्रंथालयाद्वारे खालील कार्य केले जाते -
(१) समाजातील सर्व थरांतील, वयोगटांतील वाचक वर्गास पुस्तके, वृत्तपत्रे, मासिके इ.सदृश अत्याधुनिक ज्ञानसाधने (वरील इलेक्ट्रॉनिक संसाधने) पुरविणे.
(२) पुस्तक प्रकाशने, चर्चासत्रे, परिषदा इ. आयोजन करून आधुनिक ज्ञान साधनांच्या आधारे ज्ञानसंवर्धन व ज्ञान प्रसार करणे.
(३) स्थानिक, राज्यस्तरीय, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय घडामोडींची माहिती पूर्वग्रह न बाळगता सर्वांना उपलब्ध करून देणे.
(४) समाजात व्यापार, उद्योग, व्यवसाय वृद्धीसाठी आधुनिक तंत्रज्ञानासंबंधी जागृती घडवून आणण्याकामी मार्गदर्शन सेवा उपलब्ध करून देणे.
(५) वाचक जागृती, लेखन प्रशिक्षण, वाचन-लेखन स्पर्धा इ. उपक्रम योजना वाचन संस्कृतीचा विकास करणे.  अलीकडे झालेले संशोधन, उत्खनन इत्यादींच्या आधारे जगातील सर्वाधिक प्राचीन ग्रंथालय हे सुमेरियन व बॅबिलोनियन संस्कृतीच्या काळात म्हणजे इ.स. पूर्व २७०० वर्षांपूर्वी अस्तित्वात होते असे दिसते. हे ग्रंथालय धार्मिक अमलाखाली असलेले तत्कालीन शासकीय ग्रंथालय गणले जाते. पूर्वी टेयोमध्ये ३०,००० ग्रंथालये होती असे सांगितले जाते. या ग्रंथालयात अधिकांश ग्रंथ क्यूनिफॉर्म रूपात म्हणजे इष्टिका ग्रंथांच्या रूपात होते. पूर्वी देवालये, चर्च, मशिदी, राजवाडे हे ग्रंथसंग्रहांचे केंद्र होते. नंतर ती जागा दरबारांनी घेतली. त्याचीच पुढे शासकीय ग्रंथालये झाली.
 बॅबिलोनियन संस्कृतीस सुमेरियन संस्कृतीची परंपरा नि पाठबळ लाभले होते. त्यामुळे ती अधिक विकसित झाली होती. या संस्कृती काळात बॉर्सिपा इथे एक ग्रंथालय होते. ते तत्कालीन राजकीय, व्यापार, धर्म, संस्कृती घडामोडींची नोंद व जतन करणारे केंद्र होते. जगातील पहिली विधी संहिता (कायदा) हमुराबी राजाने इष्टिका ग्रंथाच्या रूपात कोरून घेतला होता. तो या ग्रंथालयात होता. सध्या तो पॅरिसच्या ग्रंथालयात संग्रहित आहे.
 इ.स. पूर्व ६६८-६२७ या काळात असुर बनिपाल नावाचा एक राजा होता. बॅबिलोनियन संस्कृतीचा हा काळ. अॅसिरियन घराण्याचे राज्य होते. या राजाने आपल्या राजकिर्दीत निनेव्ह येथील मंदिराजवळ मोठे ग्रंथालय स्थापले होते. तेथे त्यांनी बॉर्सिपा ग्रंथालयातील ग्रंथांच्या नकला करवून घेतल्या होत्या. इ.स. १८५० मध्ये ऑस्टिन लेअर्डने जे प्राचीन उत्खनन केले, त्यात या ग्रंथालयाचा शोध लागला. या ग्रंथालयातील काही ग्रंथ आर्ष (ऋषीरचित) होते.
 पपायरसवर लिहिलेल्या व गुंडाळ्यांच्या रूपात असलेल्या ग्रंथांचा संग्रह इ.स. पूर्व २५०० च्या काळात इजिप्तमध्ये होता. गीझा येथील ग्रंथालयात हे ग्रंथ होते. ते हायरोग्लेफिक लिपीत लिहिले गेले होते. ते दुस-या रॅमसीझने स्थापन केले होते. तिथे ‘प्रिसी पपायरस' हा दुर्मीळ ग्रंथ होता. आता तो पॅरिसच्या नॅशनल लायब्ररीत (बिब्लिओथेक नॅशनल) उपलब्ध आहे.
 इजिप्त संस्कृतीतील जगप्रसिद्ध अलेक्झांड्रिया ग्रंथालय इ.स. पूर्व २९० मध्ये ग्रीक राजा टॉलेमीने उभारले होते. तिथे ७ लाख ग्रंथ होते. सीझरने या ग्रंथालयाचा नाश केला. आता ते ग्रंथालय परत उभारण्यात/ पुनरुज्जीवित करण्यात आले आहे.
 रोमन साम्राज्यातही अनेक मोठी ग्रंथालये होती. ग्रीक संस्कृतीची ती वैभव होती. 'कोडेक्स व्हॅटिकेनस' हा रोमन लिपीतील दुर्मीळ ग्रंथ चौथ्या शतकात होता. सिसेरोचा स्वत:चा मोठा ग्रंथसंग्रह होता. ल्युकल्सचेही स्वत:चे ग्रंथालय होते. रोम शहरातच अठ्ठावीस ग्रंथालये होती. ती वस्तुसंग्रहालयेही होती.
 युरोपात सोळाव्या शतकातील प्रबोधन काळात (Renaissance) कागदाच्या शोधामुळे ग्रंथसंग्रहात गती आली. सतराव्या शतकात ग्रंथालयांचे नवयुग अवतरले. एकोणिसाव्या शतकात पाश्चिमात्य देशांत औद्योगिक क्रांती घडून आली. बव्हेरियन स्टेट लायब्ररी (जर्मनी)चे मार्टिन इलेटिंजर, ब्रिटिश म्युझियम, लंडनचे अँटोनी पानित्सी, त्यांचे समकालीन एडवर्ड एडवर्डस् इ. ग्रंथपालांनी ग्रंथालयशास्त्र विकसित केले. पुढे अमेरिकेत विद्यापीठीय ग्रंथालयांची शृंखला विकसित झाली. हॉर्वर्ड विद्यापीठ हेच मुळी एक ग्रंथालय होते. पुढे ते विद्यापीठ झाले. यातून ग्रंथालयांचे महत्त्व अधोरेखित होते. लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन स्थापनेने ग्रंथालये आंतरराष्ट्रीय केंद्रे बनली. सध्या अमेरिका, चीन, रशिया, इंग्लंड, फ्रान्स इ.प्रमाणे सर्व देशांनी आपापली राष्ट्रीय ग्रंथालये उभारली आहेत. भारताचे राष्ट्रीय ग्रंथालय राजाराम मोहन राय ग्रंथालय, कोलकाता येथे असून, तिथे सर्व भारतीय भाषांतील ग्रंथ संग्रहित आहेत. भारतीय ग्रंथांचा विकास हेच ग्रंथालय करते. ५. वाचन : स्वरूप आणि व्याप्ती
५.१ वाचन
  माणसाच्या वाचनाचे स्वरूप भिन्न आहे. छंद, मनोरंजन, अभ्यास, फावल्या वेळेचे साधन, व्यासंग, साधना अशी वाचनाची अनेक रूपे आहेत. सर्वसामान्य माणूस छंद, मनोरंजन, फावल्या वेळचे साधन म्हणून वाचतो. तो काय वाचतो हेही महत्त्वाचं असतं. म्हणजे तो वृत्तपत्र, नियतकालिक वाचतो की ग्रंथ यावरूनही वाचकाच्या वाचनाचे स्वरूप लक्षात येते. ग्रंथ वाचत असेल तर तो साहित्य वाचतो, विज्ञान की तत्त्वज्ञान यावरही त्याच्या वाचनाचा उद्देश लक्षात येतो. कथा, कादंबरी, काव्य वाचन सुलभ तर निबंध, नाटक सायास वाचन. प्रवासवर्णन, साहित्य, जीवनोपयोगी. आत्मकथा, चरित्र प्रेरक वाचन. विद्यार्थी अभ्यास म्हणून वाचतात ते ज्ञानसंपादन व ज्ञानवर्धक वाचन होय. शिळोप्याचा उद्योग म्हणून वाचन करणे व हेतुतः एकाग्र, आकलनक्षम, रसास्वादी वाचन करणे यात मूलत: उद्देश व गांभीर्याचा फरक आहे. परिपाठ म्हणून वाचन करणे कर्मकांड होय. हेतुत: उद्देशमूलक वाचन व्यासंगी व प्रगल्भ वाचन होय. ज्ञान-विज्ञानाच्या आजच्या रोज विस्तारित नि विकसित होत जाणा-या जगात वरील सर्वप्रकारचे वाचन त्या त्या वाचकवर्गाची दैनंदिन गरज होऊन बसली आहे. पूर्वी केव्हातरी लिखित सामग्री पाठ, प्रगट वाचन हा ज्ञानसाधनेचा अविभाज्य भाग होता. पुढे मौन, एकाग्र वाचन खरे वाचन बनले. आज पाहणेसुद्धा वाचनाचा प्रकार होऊन बसला आहे. वृत्तपत्र, जाहिरात, सिनेमा, दृक्-श्राव्य फित, चित्र, मोबाईलवरील संदेश, पोस्ट, ब्लॉग्ज इत्यादींवर नजर फिरविणे हे वर्तमान संक्षिप्त वाचनच होय. वाचन प्रकार व स्वरूप हे काळाच्या ओघात बदलत जाते. काळ, काम, वेगाचे गणित वर्तमानातील उसंत ठरवत असते, हे विसरून कसे चालेल?' 'Seeing Believing' या वाक्यातील गर्भितार्थ वर्तमानाचे वास्तव होय. म्हणून वाचनाचा विचार भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर, वर्तमानाचे भान ठेवून भविष्यवेध घेतच करायला हवा, तरच वाचन संस्कृती टिकेल व भविष्यात ती वर्धिष्णू होत राहील.
५.२ वाचन : शब्द, अर्थ, व्युत्पत्ती आणि व्याख्या
 रूढ अर्थाने ज्यास आपण वाचन म्हणतो, त्याचे स्वरूप भिन्न असल्याने वाचनास अनेक शब्दकळेनी ओळखले जाते. पठन, पाठन, अभ्यास, उच्चारण, परिभाषण, आकलन, अन्वय, संदर्भ, चाळणे, पाहणे, भाषांतर, दृष्टिक्षेप इत्यादी शब्द वाचन-क्रिया सूचित करणाच्या आहेत. या प्रत्येक शब्दामुळे वाचनाचे बदलते रूप-स्वरूप लक्षात यायला मदत होते.
 वाचणे वा वाचन म्हणजे लिहिलेली अक्षरे उच्चारणे. हे उच्चारण प्रगट असते तसे मौनही. वाचन शब्द ‘वच्' धातूपासून बनला आहे. ‘वच्’ धातूचा अर्थ सांगणे, बोलणे, भाषण, वर्णन, पुकारणे (उच्चारण), म्हणणे. पाठांतर, वाचन, घोषणा, व्याख्या असा विविध रूपी असून तो वाचन स्वरूपाशीच निगडित आहे. 'वाच्' धातू ‘वाक्'सदृश होय. वाचन, वाचा, वाच्य, वाच्यता, वाच्यांश, वाच्यार्थ शब्दांनी वाचन व्यापकता लक्षात येते. वाङ्मय हा शब्द त्याचे मौखिक वा वाक्मय रूप सूचित करतो. 'वञ्च'पासून वाचणे, बाँचना (हिंदी), वंच (प्राकृत), बाचा (बंगाली), बंचिबो (ओडिया), बॉन्चु (नेपाळी), वाजणु (सिंधी), वच्यते (संस्कृत), वज्जति (पाली) शब्द वाचनसूचकच होत.
 विष्णुशास्त्री चिपळूणकरांनी आपल्या ‘निबंधमाला' पुस्तकातील ‘वाचन शीर्षक निबंधात वाचनाचा अर्थ 'बोलावणे' असा सांगितला आहे. पुस्तकास बोलवणे म्हणजे पुस्तक वाचते करणे, वाचणे होय. निर्जीव लिखित सामग्रीस वा मजकुरास उच्चाराद्वारे सजीव, प्रगट करणे म्हणजे वाचणे होय. कागदी निर्जीव मजकूर वाचनाने जिवंत करण्याची कला म्हणून पूर्वी वाचनाकडे पाहिले जात असते. वाचलेले घोकणे, स्मरणात ठेवणे यालाच पूर्वी बुद्धिमत्ता मानले जात असे. पाठांतर हे बुद्धीवैभव मानल्या गेलेल्या काळात सर्व ज्ञान-विज्ञानाच्या रक्षणाचे एकमेव साधन स्मरणशक्ती होते, हे यासंदर्भात लक्षात घ्यायला हवे.


१. संस्कृत - हिंदी कोश- वामन शिवराम आपटे/मोतीलाल बनारसीदास पब्लिशर्स, प्रा.लि., दिल्ली/२००१/पृ. ८८९, ८९० ५.२.१ वाचन : व्याख्या
 वाचन ही कृती आहे की कला, ते विज्ञान आहे की प्रक्रिया, याबाबत अभ्यासक, संशोधक यांच्यामध्ये मतभिन्नता दिसून येते. वेगवेगळे विचारक, साहित्यिक, कोश इत्यादींमधूनही हे वैविध्य स्पष्ट होते. वाचनाचे स्वरूप व व्याप्ती समजून घ्यायची तर तिच्या अनेकानेक व्याख्या, परिभाषा समजून घेणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य होऊन जाते. आपण त्यासाठी काही व्याख्यांचा परामर्श घेऊ.
१."Saying a written text aloud or silently. This can be done with or without understanding the content." अर्थात् लिखित मजकुराचे मूक वा प्रगट उच्चारण म्हणजे वाचन होय. हे समजून घेऊन अथवा न समजताही होत असते. लहानपणी मुले वर्ण, अक्षरे वाचतात खरे; पण ते त्यांना समजतेच असे नाही. उच्चारण, पाठांतर, समजणे, आकलन या वाचनाच्या भिन्न परी (प्रकार) होत.
२."Reading is a process undertaken to reduce uncertainty about meaning a text conveys." 2 वाचन ही लिखित मजकुराच्या अर्थाचा संभ्रम दूर करण्याची प्रक्रिया वा पद्धती होय. वाचनाने अर्थ स्पष्टतेस साहाय्य होते.
३."Reading is a complex 'cognitive process' of decoding symbols in ordered to construct or derive meaning. Reading is a means of language acquisation, communication and of sharing information and ideas." यानुसार वाचन ही गुंतागुंतीची समजून घेण्याची रीत असून, तीनुसार आपण सांकेतिक चिन्हांचा (वर्ण, अक्षर, शब्द, वाक्य इ.) अर्थबोध भाषेच्या माध्यमातून करून घेऊन त्यांची देवाण-घेवाण करीत असतो.
४."Reading is the process of constructing meaning from written text. It is complex skill requiring the co ordination of number of interrelated sources of information."4 (Anderson et. al, 1985)


१.UKEssays - htttps:/www.ukessays.com
२. Foreign langage Teaching method- https:/coerll.utezsx.edu.
३. Wikipedia- https:/en.wikipedia.org
४. Education place - https:/www.eduplace.com
वाचन ही लेखनाच्या अर्थशोधाची सकारात्मक पद्धत होय. हे एक गुंतागुंतीचे कौशल्य खरे. त्यातून अनेक प्रकारची माहिती आपल्या हाती लागत असते.
५."Reading is the process of constructing meaning through the dynamic interaction among; (1) the reader's existing knowledge; (2) the information suggested by the text being read; and (3) the context of the reacting situation." 1 (Peter W ixson, 1987)
वाचकांचे वर्तमान ज्ञान, मजकुरातून होणारा प्राप्त आशय आणि वाचन संदर्भ यांच्या परस्परपूरक देवाण-घेवाणीतून हाती येणाच्या ज्ञानप्राप्तीची गतिमान प्रक्रिया म्हणजे वाचन होय.
६."Reading is a multifaceted process involving word recognition, comprehension, fluency and motivation. Lear how readers integrate these facets to make meaning from print."2 (Diane Henry Leipzig) www.readingcodets.org  ‘वाचन ही बहुआयामी प्रक्रिया असून, तिच्यात शब्द परिचय, आकलन, ओघ आणि प्रेरणेचा समावेश असतो. वाचक या सर्व पैलूंच्या समन्वयातून मुद्रित अक्षरांचा अर्थ ग्रहण करत असतो.' शब्द परिचय, आकलन आणि ओघ या तीनही क्रिया मोठ्या गुंतागुंतीच्या असतात; पण तरीही वाचनाच्या संदर्भात त्या अधिक महत्त्वाच्या होत. शब्द परिचयात शब्दोच्चार, वर्णरचना, अर्थ, शब्द व्युत्पत्ती, दृश्यरूप अशा अनेक अंगांचा अंतर्भाव होत असतो. आकलनात ज्ञान व माहितीची पार्श्वभूमी, तोंडी व लिखित शब्दसंग्रह, भाषाअभ्यास, मुद्रित शब्द काय पोहोचवितात, लिखिताचा प्रकार (साहित्य प्रकार), वाचन उद्देश, अर्थ प्रक्रिया इत्यादींचा समावेश होतो, तर ओघ हे अचूकता, वाचन गती, रसग्रहण, वाचन कौशल्याचे समन्वित रूप असते.
 वाचन अभिरूची काहीजणांत उपजत असते, तर काहीजणांत ती प्रयत्नपूर्वक वाचून, प्रेरणा निर्माण करून विकसित करावी लागते. वाचन ही अर्थबोध करणारी एक सार्थक प्रक्रिया आहे. ती आनंददायी असते.


१) Education place - https:/www.eduplace.com २) -- तत्रैव -वाचलेले इतरांना सांगत ती सामाजिक होत जाते. वाचनामुळे आवड निर्माण होऊन न संपणारी ज्ञानपिपासा वाचकांत निर्माण होते. शिवाय तिचे फायदेही अनेक असतात. ज्ञानसंग्रह हा त्यातील सर्वाधिक महत्त्वाचा लाभ होय. वाचनामुळे आपणास विविध साहित्य प्रकारांचा परिचय होऊन आपण बहविध वाचन करू लागलो की, वाचन बहुश्रुत होते. वाचन हा वेळ घालवायचा छंद नव्हे तर वेळ सत्कारणी लावण्याचा तो सृजनात्मक उपक्रम होय. जी माणसं नियमित वाचन करतात, ती नित्य व्यायामाप्रमाणे रोज अधिक प्रगल्भ होत राहतात. एकदा का माणसास वाचनाचा छंद जडला की, तो सुटणे अवघड. वाचन हे सकारात्मक व्यसन म्हटले तरी ते विधायकच म्हणायला हवे ना?
  वरील सर्व व्याख्यांमधून लक्षात येणारी गोष्ट अशी की, वाचन ही ज्ञानप्राप्तीची, आकलनाची पद्धत होय. याद्वारे आपण मुद्रित अंक वा अक्षरांचे सांकेतिक अर्थ समजून घेऊन माहितीचे संकलन, आकलन, विश्लेषण, संग्रहण करत राहतो. त्यातून एकंदरीतपणे आपणास समाज, जग, विविध ज्ञान-विज्ञान यांची समज येते. त्यातून आपल्या जाणिवा विकसित होतात. जगाचे गूढ उकलते. अज्ञान दूर होते. मनोरंजन होते. भाषांतरातून विविध भाषांमधील आशय आपल्यापर्यंत पोहोचतो. तीच गोष्ट लिप्यंतरणानेही घडते. शब्दज्ञान, जाणीव विकास, समज विस्तार यातून आपले व्यक्तिमत्त्व प्रगल्भ होते. वाचन हा एका अर्थाने जाणिवांचा विकास होय. म्हणून परिपाठ वा कर्मकांड म्हणून ते करून चालणार नाही. वाचन एक सायास, सहेतुक कृती होय.
५.३ वाचन : स्वरूप आणि व्याप्ती
वाचनाच्या अनुषंगाने अनेक उक्ती, सुभाषिते, सुविचार, घोषवाक्ये आढळतात. त्या प्रत्येकातून वाचनासंबंधी हेतू, उद्देश, परिणाम, वृत्ती, व्यवहार, परिवर्तन, विशेष इ. अधोरेखित होत असते. त्या सर्वांतून वाचन व्याप्ती व स्वरूपावर प्रकाश पडत असतो. म्हणून ते जाणून घेणे आवश्यक आहे. 'Reading is to the mind what exercise is to the body'.1 असे जोसेफ एडिसन (१६२२-१७१९)नामक ब्रिटिश निबंधकाराने म्हटले आहे. त्यानुसार शरीराला व्यायामाचे जे महत्त्व तेच वाचनाचे मनाला.


१) A Comprehensive Dictionary of Quotation- Three Ess Publication, Delhi. यातून वाचन हे मनोविकासाचे साधन असल्याचे स्पष्ट होते. जी. के. चेस्टर्टन (१८७४-१९३६) या इंग्रजी साहित्यकाराच्या म्हणण्यानुसार, "There is a great deal of difference between the eager man who wants to read a book and the tired man who wants a book to read.1 यातून वाचन हेतू अधोरेखित होतो. वाचन जिज्ञासेने करणे व रंजन म्हणून करणे यात अंतर आहे. चार्ल्स लॅम्ब (१७७५-१८३४) या समीक्षक, विचारकांनी तर नंतरच्या काळात आपले विचार मौलिक ठेवण्यासाठी वाचनच सोडून दिल्याचे सांगितले जाते. यातून माणसावर होणारा वाचना प्रभाव, परिणाम अधोरेखित होतो. गुस्ताव्ह फ्लॉबर्ट (१८२१-१८८०) या फ्रेंच कादंबरीकाराचं वाचनसंबंधी मत सर्वथा अपवाद म्हणावं लागेल. तो म्हणतो, 'Do not read, as children do, to amuse yourself or like the ambitious, for instruction. No, read in order to live.2 वाचन हे लहान मुलांसारखं रंजनासाठी असता कामा नये किंवा एखाद्या महत्त्वाकांक्षी माणसासारखे शिकवण म्हणूनही ते असू नये. वाचन हे जगणे सुंदर करणारे साधन असल्याने 'जीवन त्यांना कळले हो' असं प्रत्यंतर वाचनानंतर यायला हवे.
 वाचन ही एक भाषिक, वाचिक, मानसिक कृती आहे. ती अर्थवाही नि सार्थक व्हायची, तर तिला एका विशिष्ट पठडीतून जावं लागते. अंक वा अक्षर उच्चारण म्हणजे वाचन नव्हे, हे एकदा लक्षात घेतले की मग स्पष्ट होते की, त्यापेक्षा वाचनाचे स्वरूप भिन्न आहे. ती एक बोधगम्य प्रक्रिया आहे. शब्दज्ञान, आकलन, गतिशीलता नि प्रेरणा यांच्या संयुक्त प्रभाव नि परिणामातून वाचन बोधगम्य, ज्ञानवर्धक, प्रेरक, आकलनक्षम होते. वाचनात लिखित वा मुद्रित आशयाचा अन्वय महत्त्वाचा. त्यामुळे वाचन ही ज्ञानप्रक्रिया जशी आहे, तसे ते कौशल्यही आहे. वाचन हा बोधगम्य शोध असल्याने ते आविष्करण आहे. त्याचे प्रभावी प्रगट रूप म्हणजे अभिवाचन, अभिवाचनात आरोह, अवरोह, आघात, अवकाश, स्वर, व्यंजन, शब्दादींचे संयुक्तिक उच्चारण, स्वराभिनय, देहबोली अशा सर्वांगांनी मिळून ती अभिव्यक्ती बनून जाते. वाचन केवळ अंक, अक्षराचे नसते, तर ते चित्र, निसर्ग, माणूस यांचेसुद्धा असते. भाषा, लिपी, साहित्याच्या त्रिवेणी संगमातून वाचनसौंदर्य


(१) A Coprehensive Dictionary of Quotation- Three Ess Publication, Delhi. (२) --- तत्रैव--मुक्त, ललित, मनोहारी बनते. हस्तलिखित, मुद्रित, अंकीय, आभासी वाचन म्हणजे नवकाळाच्या नव्या परीचं आलोडन, परिवर्तन, कायाकल्प. ते कधी एकांगी, कधी गुंतागुंतीचं, तर कधी सामूहिकही असतं. उदाहरणार्थ प्रतिज्ञा वाचन, समूहगीत, सांघिक घोषणा, उद्घोषणा इत्यादी वाचन हे दृक्, श्राव्य नि दृक्-श्राव्य बनत ते आधुनिक संपर्क माध्यम बनून गेलं आहे. वाचनाला दिशा असते तशी तिची दशा, स्थितीही भिन्न असते. उजवीकडून डावीकडे की डावीकडून उजवीकडे वाचायचं ते भाषिक, वाचिक परंपरेने निश्चित होते. उर्दू नि मराठीतील फरक यासंदर्भात लक्षात घेता येतो. वरून खाली की खालून वर हे वाचन प्रयोगकाच्या (वाचक) गरजेवर ठरत असते. जाणीव, नेणीव, आकलन, क्रिया-प्रतिक्रियांनी ते युक्त असते आणि त्याआधारे वाचनाचे स्वरूप निश्चित होते. सुजाण वाचकासंदर्भात वाचकाचे पूर्वज्ञान गृहित असते. त्या गृहितावर वाचनाचं प्रगल्भपण, अभिजातपण निश्चित होतं. दुर्मीळ वा अपवाद ज्ञान-विज्ञान शाखा, अलक्षित संशोधन, मृतप्राय भाषा, तत्त्वज्ञान, प्राच्यविद्या इत्यादींचे चिंतन, मनन, वाचन व्यासंगी ठरते ते त्यामागील तपश्चर्या, कष्ट, सातत्य इत्यादींमुळेच.
५.३.१ वाचन प्रभाव   वाचन हे एकप्रकारचं आस्वादन असतं. आपण निसर्ग पाहतो नि हरखतो. चांदणं पाहतो नि आनंदून जातो. ते आपण नुसतं पाहतो असं नाही. चाखतो, अनुभवतो. चव प्रभावित करते तसे वाचनही. एखादा विचार, सुभाषित, तर्क, म्हण संदर्भाने पूर्वीपेक्षा अधिक भावते. तिचं कारण वाचताना आपण त्याचा संदर्भ पूर्वज्ञान, पूर्वानुभवाशी ताडतो म्हणून. उत्तुंग कल्पना वाचनातून जन्मतात. तो वाचन प्रभाव असतो. वाचनाने माणूस आतून, बाहेरून बदलून जातो. कायाकल्प, परिवर्तन, बदल, परकाया प्रवेश सारं वाचनामुळे घडत राहतं. वाचनापूर्वी आपण जे असतो, ते वाचनानंतर दुसरे बनतो, नवे होऊन जातो; खरे ना? वाचनात एक सुप्तशक्ती वास करीत असते, असं वाचनानं जाणवतं. त्यामुळे वाचनानंतर आपण पूर्वीपेक्षा अधिक शहाणे, समजदार, सुजाण बनतो.
 मार्क ट्वेन एकदा म्हणाला होता की, 'मी अंघोळीनंतर विरघळत नाही.' याचा अर्थ अंघोळीचा प्रभाव वरवरचा, क्षणिक. वाचनाचे मात्र वेगळे. वाचनामुळे माणूस विरघळतो तसाच गोठतोही. वाचनाला इंग्रजीत Decoding असं म्हटलं जातं. म्हणजे काय, तर वाचन हे अंक, अक्षरादी चिन्हांचा अर्थ लावतं, संदर्भ प्राप्त होतात म्हणून ज्ञान, अनुभूती होते. ही सारी एक गुंतागुंतीची प्रक्रिया असते खरी. ती स्पष्ट नाही करता येत. फक्त त्याची प्रचिती शक्य असते. कबीरदासांनी या अनुभवाला ‘गूंगे का गुड' म्हटलं होतं. माणूस मुका आहे. त्याला गूळ चाखायला द्या. त्याला अनुभूती येते. चव कळते पण स्पष्ट, व्यक्त करता नाही येत. वाचन प्रक्रियेच्या दरम्यान वाचकात असंख्य उलाढाली, घालमेल, द्वंद्व चाललेले असते. तसं पाहणं, बोलणं, ऐकणं इत्यादी क्रियांमध्ये घडतंच असं नाही. घडलं तरी ते वाचनाइतकं प्रभावी नि परिणामकारी नसतं. म्हणून वाचनाचे स्वरूप, प्रभाव आगळा नि वेगळा असतो.
  आपण वाचतो तेव्हा लिखित सामुग्रीवर डोळे फिरवितो म्हणजे अंक, अक्षरादी चिन्हांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. ही क्रिया एकाच वेळी शारीरिक, मानसिक तशी बहुआयामीपण असते (भावनिक, तार्किक, तात्त्विक इ.). सेकंदात आपण मजकुरावर दृष्टिक्षेप टाकतो. सेकंदभरात ही क्रिया दोन-चार वेळा घडते. हा दृष्टिक्षेप १०० ते २०० अंशांतून होत राहतो. हे इतक्या क्षणार्धात घडतं की, लक्षातही येत नाही. म्हणून या क्रियेस, वाचनास ‘डोळ्यांच्या मदतीने केलेला विचार' असं म्हटलं गेलं आहे. हा विचार अर्थातच स्मरण, विश्लेषण, तर्क, तुलना इत्यादींद्वारे घडून येतो. वाचन प्रभाव अल्पकालिक असतो तसा दीर्घजीवीही. ते वाचन सामुग्री नि तुमची प्रतिक्रिया, प्रतिसाद यांवर अवलंबून असतं. वाचनातून नवकल्पना, उन्मेष, आविष्कार, ज्ञान इत्यादींची जागृती, निर्मिती होत असते. वाचन ही एक सजीव (Vital) प्रक्रिया आहे. आठवणे, कल्पना करणे, कारणमीमांसा, चिकित्सा, समीक्षा, तुलना, तर्क, विहंगावलोकन, ताडून पाहणे इत्यादी साच्या क्रिया-प्रक्रिया एकाच वेळी वाचताना घडतात. त्या समांतर, संयुक्त, व्यामिश्रपणे घडतात. व्याकरण, अर्थ, अन्वय, आशय, संदर्भ सर्वांचा मेळ घालत हे घडतं म्हणून वाचन प्रभावी, प्रवाही असतं. पटणे, न पटणे, सहानुभूती, टीका, स्मरण, गाळणे, सारं घडत राहतं.
 वाचन ही एक मानसिक कसरत असते. ती कष्टप्रद असली तरी अंतिमतः प्रभावकारी असते. ती माणसाच्या मनात हर्ष, शोक, आश्चर्य, आवेग, दु:ख दु:स्वास, अनुकरण सारं मजकूर बरहुकूम घडवून आणतं. तिचं पूर्वानुमान नसतं नि पश्चात भाकीतही नसतं. वाचन प्रभाव व्यक्तिपरत्वे भिन्न असतो. म्हणजे एकाच मजकुराच्या वाचनाच्या प्रतिक्रिया वा प्रतिसाद


१) वाचा आणि श्रीमंत व्हा - बर्क हेजेस पेंटॅगॉन प्रेस, नवी दिल्ली- पृ. १२४ भिन्न असू शकतात नि असतात. वाचन व्यक्तिसापेक्ष असतं. तुम्ही मजकूर कसा आत्मसात करता, यावर ते अवलंबून असतं. लिखित संहितेचा बोध होणे म्हणजे वाचन. जे समजलं नाही ते वाचन नव्हे. वाचन म्हणजे कळणे. ते कर्मकांड नाही, ती प्रक्रिया आहे. तो उपचार नाही तर ती पद्धती (Therapy) होय. एकाग्रता तिची पूर्वअट असते. मगच परिणाम शक्य असतो. वाचन ही मन नि मेंदू, भावना व विचार, शरीर नि मन यांची संयुक्त क्रिया होय. ती एक सजीव, निरंतर क्रिया असते. बोध, अबोध स्वरूपात ती चालू असते. वाचनपूर्व, वाचनवेळी व नंतरही ती निरंतर सक्रिय असते.
५.३.२ वाचन : एक कृती   वाचनाच्या स्वरूप आणि व्याप्तीचा विचार करत असताना ते नक्की काय आहे? कृती, कला, कौशल्य की विज्ञान, हे निश्चित करायचे झाले, तर त्या सर्व अंगांनी वाचनाचे स्वरूप समजून घ्यायला हवे. वाचन ही भाषिक चिन्हांच्या सांकेतिक आशयाचे आकलन करणारी प्रक्रिया वा कृती (Activity) असेल, तर ती कृती घडते कशी, हे समजून घेणे गरजेचे आहे. वाचनास सोद्देश कृती म्हटले जाते. ती विविध उद्देशांनी घडते; पण शिक्षणाच्या प्राथमिक अवस्थेत ती शिकवायला लागते. नंतर विकास पावत। ती अंगवळणी पडते. वाचक पुढे त्यात पारंगत होतो, प्रगल्भही होतो. ज्ञानप्राप्तीची कृती म्हणून वाचनाकडे आपण पाहतो. ती करत असताना आपले पूर्वज्ञान आणि अनुभव उपयोगी पडतो. त्यासाठी वाचकाचे भाषिक ज्ञान कामी येते. विद्यार्थिदशेत वाचन कृतीने आकलन कौशल्य जसे वाढत जाईल, तसे तो उत्साहाने वाचत जातो. वाचन विद्यार्थ्यांसाठी ज्ञानप्राप्तीची प्रेरणा ठरते. म्हणून प्रारंभीच्या काळात वाचन सहज व्हावे. सक्ती नको. मग गोडी जाते. ती संधी बनायला हवी. वाचन ही अंत:स्फूर्त कृती होईल, तर तिचे रूपांतर पुढे छंदात झाल्याशिवाय राहत नाही. छंदाचे रूपांतर तरुण वा प्रौढपणी (चांगल्या अर्थाने) नादात झाले, तर या कृतीने एक व्यक्तिमत्त्व सुजाण केले असे समजावे. यात शिक्षक व पालकांची सकारात्मक भूमिका मोलाची असते. प्रारंभीच्या काळात रोज अर्धा तास केलेला वाचनाचा सराव पुढे सवय बनून तिचे रूपांतर वृत्तीत होते. वाचनाच्या कृतीचे रूपांतर सवयीत व्हायचे तर वाचलेल्यावर चर्चा, देवाण-घेवाण, लेखन होणे महत्त्वाचे असते. त्यातून एकाच लिखिताचे भिन्न दृष्टिकोन समजण्यास मदत होते. या कृतीतून आत्मविश्वास वाढतो. उच्चार शुद्धता, भाषाधिकार, शब्दसंग्रह, अर्थबोध अशा अनेक अंगांनी वाचन कृती प्रारंभीच्या काळात उपकारक सिद्ध होते. वाचन, उच्चार दोष या विद्यार्थी वयात दूर होतील, तर एक चांगला अभिवाचक तयार होण्यास साहाय्य होय. वाचनामुळे विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता, गुणवत्ता कळण्यास मदत होते. प्रारंभीची प्रगट वाचन कृती म्हणजे उद्याच्या निर्दोष वाचनाचा पाया होय. तो शालेय वयात निर्दोष व मजबूत होणे आवश्यक असते.
५.३.४ वाचन : एक कला
 वाचन ही एक कला आहे. तिची दोन रूपे दिसून येतात - (१) प्रगट आणि (२) अप्रगट (मौन). वाचनाच्या प्रगट कौशल्याचा संबंध उच्चारण्याशी असल्याने व ते बाह्य स्वरूपाचे असल्याने घसा, स्वरयंत्र, जबडा, जीभ यांच्या स्थितीवर त्या व्यक्तीच्या वाचन कलेचे रूप आकारत असते. जेव्हा तिचे अप्रगट वा मौन रूपात अव्यक्त आविष्करण होत असते, तेव्हा तिचे रूप आंतरिक असते. या स्थितीत दृष्टी, बुद्धी, संवेदना, तर्क इत्यादी घटक महत्त्वाचे होतात. दोन्ही स्थितींमध्ये वाचन ही एक सांधेजोडीची कला (Kinesthetic Art) असते. तुम्ही ही जुळणी कशी करता त्यावर वाचन कला आकारते. कला हे सर्जन तसे वाचनही. वाचक लिखिताचा फक्त व्यक्त आशय नाही ग्रहण करत. शब्दार्थापलीकडचे जे अव्यक्त असते ते जाणणारा, वाचक खरा. लेखकाचा अंतरात्मा नि वाचकाचा अंतरात्मा (अंतर्ज्ञान) एक होणे म्हणजे वाचन परिपूर्ण अवस्थेस पोहोचणे. लेखनातील बिंबांपर्यंत पोहोचणे म्हणजे वाचन कला. दृश्य प्रतिमा, चरित्रांपलीकडचे स्वभाव विशेष, वृत्ती वाचता येणे म्हणजे कला. सर्वसाधारण उच्चारण म्हणजे वाचन नव्हे. अलीकडे वाचन सराव वाढल्याने वाचन गती वाढून ही कला गतिमान होते आहे. मिनिटाला ३०० ते ८०० शब्द वाचण्यापर्यंत प्रगत वाचकाची गती अचंबित, चकित करणारी खरी. गतिमान वाचन अधिकाधिक वाचनाकडे अग्रेसर होणारे असते. अग्रेसर वाचन उन्नत वाचनाकडे कूच करते, तर उन्नत वाचन प्रगल्भ वाचनाकडे. हा उंचावणारा आलेख वाचन कलेची पारंगतता अधोरेखित करत असतो. शिवाय तो वाचकाचे व्यक्तिमत्त्व सुजाण करतो.
 वाचनाला केवळ कौशल्य मानला जायचा काळ विसाव्या शतकातला. मुद्रणाचे प्रारंभिक युग वाचनाचे प्राथमिक युग होते. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात वाचनाने कलेचे रूप धारण केले. एकविसाव्या शतकात कलेची कूच विज्ञानाकडे झेपावते आहे. कधी काळी चिन्हांच्या संकेतांचे उच्चारण
वाचन होते. आज वाचनाला एक वेगळे रूप आले आहे. 'Making Sense' असे त्याचे नवे रूप वाचनातील आकलनाचे महत्त्व अधोरेखित करते. त्यातून मानवी सर्जनास उपयोजित कौशल्यास जोडण्याची जी अपेक्षा व्यक्त होते, त्यातून या कलेचं उपयोजित सर्जक कला (Applied Creative Art) म्हणून उगम पावणारं रूप प्रौढ, प्रगल्भ होय. वाचन आता नुसतं उच्चारण कौशल्य राहिलेलं नाही. कल्पना, तर्क, बुद्धीची तिला मिळालेली जोड ही कला उन्नत असल्याचे स्पष्ट करते. वाचक लिखिताच्या ध्वनी, लक्षणा, अभिधादी शक्तींना पार करत व्यंग्यार्थ शोधतो. यात या कलेचे प्रौढत्व सामावलेले आहे. ही एक चिकित्सक प्रक्रिया आहे. ती गुंतागुंतीची आहे. तिला नियम, सूत्र नाही. नवोन्मेषधारी तिचं व्यवच्छेदक रूप वाचनास कला सिद्ध करते. कला शिकविता येत नाही. तिचा माग सांगता येतो. मार्ग मात्र ज्याचा त्याने शोधायचा. म्हणून ही कला एकाच लिखिताचे अनेक अर्थ शोधते. कॅलिडिओस्कोपसारखं वाचन म्हणजे अपरासृष्टीची निर्मिती! 'Making sense approach to reading हे कलारूपामुळेच शक्य होते.
  वाचन कला लेखक नि वाचकात एक गारुड निर्माण करत असते. हे। गारुड वाचकास लेखकाशी एकात्म बनविते. ते इतक्या टोकाचं होतं कधी कधी की वाचक लेखकच बनून जातो. वास्तव लेखक व वाचक यामधून साकारणारा नवा एकात्म लेखक (Implied writer) ही वाचन कलेची चरमसीमा (Climax) असते. वाचन कला वाचकास अभिजात बनविते. त्याच्या अभिरुचीचा पर्याप्त विकास करते. म्हणून टेरिनिअर मॉरसनी म्हणून ठेवलं आहे. (इ.स. १२८६) की, The fate of book depends on the discernment of Reader. वाचन कला लेखनाचा व्यत्यास वा प्रतिबिंबच म्हणायला हवे. बोलण्या-ऐकण्याचं जे अद्वैत तेच लेखन वाचनाचं. लेखन जन्मते ते वाचनार्थच. म्हणून वाचन कलेस आकलन कौशल्य (construal skill or art) मानलं जातं. या कला-कौशल्याच्या आधारेच पट्टीचा वाचक लेखनातील गूढ, गर्भित अर्थाचा धांडोळा घेत वाचत राहतो. चांगलेपणानं, एकाग्रतेने वाचणारा वाचक आपली तहान, भूक हरवतोच; शिवाय स्वत:सही तो विसर्जित करून मोकळा होतो. तो लेखकाचा मुखवटा (Mask) घेऊन जगतो. सामान्य वाचक शब्दार्थगामी तर कलात्मक वाचक गूढार्थगामी असतो. कलेमुळे ही विशेषता वाचक धारण करतो. यामुळे निसर्गवेड्यास जंगलात शिरल्यावर झाडे नाहीत दिसत, दिसतं फक्त जंगल. निसर्गाचं हे रूप तसं वाचन कृतीचंपण समग्र रूप असतं. ते तुमच्या वाचन कलेच्या सर्वसमावेशक, एकात्म रूपामुळे (Hemeneutical Circle) निर्माण होतं. वाचन कला साधली की, वाचावं लागत नाही अशी संपृक्त अवस्था येते. ते वाचनाचं, वाचन कलेचे अलौकिक रूप असतं.
५.३.५ वाचन : एक विज्ञान  वाचनाच्या वैज्ञानिक अंगाचा विचार करताना लक्षात येते की, वाचन प्रक्रियेचा संबंध भाषाशास्त्र, तर्कशास्त्र, मानसशास्त्र इत्यादींशी असतो. त्यात उच्चारण पक्ष भाषाशास्त्राशी, विचारपक्ष मानसशास्त्राशी, तर अव्यक्त आशयाचा (सूचकार्थ) संबंध तर्कशास्त्राशी असतो. या अर्थाने वाचनशास्त्र एक मिश्रशास्त्र (complex Science) होय. वाचनाचा ९८% भाग उच्चार निगडित (श्राव्य), तर २% भाग दृश्य (दृक्) असतो. तो साधनपरत्वे बदलतो. पुस्तक, किंडल, मोबाईल, संगणक, टी.व्ही., सिनेमा प्रकारानुरूप वाचनाचे दृक्-श्राव्य प्रमाण बदलते. इतकेच नव्हे तर त्याचे प्रमाण, भार (वेटेज) हे कमी-अधिक असतो. वाचनशास्त्र हे प्रकारनिहाय वाचन प्रक्रिया, वाचन गती, वाचन पट, वाचन दोष, उच्चारण, श्रवण, आकलन प्रक्रिया यांचा विचार करणारे विज्ञान होय. ते वाचनाच्या विविध पक्षांचा अभ्यास करते. त्यानुसार वाचन, वाचक, प्रक्रियासंबंधी एक पिरॅमिड या शास्त्राने सूचित केले आहे. सर्वसाधारण वाचक शब्दार्थ व श्रवणकेंद्री असतो. यांचे प्रमाण समाजात सर्वाधिक असते, तर आकलनक्षम प्रगल्भ वाचक विरळा. खालील पिरॅमिडने हे शास्त्र सदर प्रमाण सूचित करते.

  वाचा, श्रवण, उच्चार, ध्वनी इत्यादींचे बारकावे, सूक्ष्मता, दोष, उपचार इत्यादींसंबंधी वाचनशास्त्र विचार करते. वाचन ही वर्तमानातली उपचार पद्धती बनली असून, मतिमंद, उदास, धक्का बसलेल्या व्यक्ती, विस्मरण, श्रवण, उच्चार दोष व्यक्तींसाठी वाचन उपचार विधी (Theory) म्हणून वापरली जाते. वाचन दोष, वाचन गती, शब्द पट, दृष्टी पट इत्यादींचा विचार हा वाचनशास्त्राचा एक विभाग आहे. वाचन शिक्षणशास्त्र, वाचन विद्यापीठ आज अस्तित्वात आले आहे. अमेरिकेत रिडिंग युनिव्हर्सिटी आहे. वाचन प्रभुत्व, अस्खलिता (Fluency) गती वाढविणारे आकलन, क्षमता विकसित करणारे अभ्यासक्रम अस्तित्वात आहेत. हे शास्त्र विकसनशील (Developing Science)
५.३.६ अंकीय युग आणि वाचन (Reading in Digital Era)   एकविसाव्या शतकातील नववाचकांची बाल, कुमार, किशोर, युवा पिढी पडद्यावर वाचते आहे. पुस्तकांचा नि त्यांचा संबंध दिवसेंदिवस कमी होत आहे. वाचक सर्वेक्षणानुसार, वाचनाचे प्रमाण गेल्या तीन दशकांच्या तुलनेत निच्चांकी पातळीवर जात आहे. पारंपरिक पुस्तक वाचणा-यांचे प्रमाणही वर्षाला चार-पाच पुस्तकांवर येऊन ठेपले आहे. साधनांच्या सुकाळाने सर्वांत मोठी गोष्ट जर कोणती गमावली असेल, तर ती वाचन एकाग्रता. चॅटस्, व्हॉटस्अॅप, फेसबुक, ट्विटर, ब्लॉग्ज, एसएमएस, ई-मेल्स, व्हिडिओ क्लिप्स, डिजिटल फोटो (डी.पी.), सेल्फी, गिफ्टस् (GIF) या सर्वांतून अंक, अक्षरे, शब्द, वाक्य, परिच्छेद उलट्या दिशेने गायब होत आहेत. भाषा नि लिपीची गल्लत वाचनाचा गुंता वाढवित आहे. मराठी रोमन लिपीत / इंग्रजी लिपीत लिहिली जात आहे- 'Mi yerar nahi' असे संदेश दिले जातात. संदेशांची भाषाही दिवसेंदिवस सूचक होत आहे- 'J1 Zale ka?' (जेवण झाले का) असे लिहिले, विचारले जाते; पण त्यात भाषा आणि लिपी संबंध, भाषिक व्याकरण, विरामचिन्हे इत्यादींचा बोजवारा उडतो आहे. ते विरामचिन्हांशिवाय व उच्चारांची ऐसीतैसी सार्वत्रिक झाली आहे. 'Jl zale ka?', 'jewan gale ka!', 'Zevan Jalhe ka' असं लिहिलेलं तर्कानी वाचायची वेळ येऊन ठेपली आहे. Gn.TC.Sw. म्हणजे 'Good Night. Take Care. Sweet Dream.' असं जाणायचं. तेही पुढे जाऊन आता इमोजीद्वारे सारं दिलं, घेतलं, सांगितलं, केलं जातं.

या चिन्हांतूनच बोललं, समजलं, सांगितलं जातं.

 भाषा नसण्याच्या काळात माणूस देहबोलीतून सारं सूचित करायचा. गुंफेत तो सूचक चित्र काढू लागला. मग आवाज, ध्वनींना लय, ताल, हस्व, दीर्घ करून त्यानं भाषा विकसित केली. चिन्हातून स्वर, व्यंजने, शब्द, वाक्य, वाक्प्रचार विकसित करत लिहिणारा माणूस छापू लागला. कित्त्यांची पुस्तके झाली. या सर्व प्रवासातून जन्मलेली वाचन प्रक्रिया सजीव होती. ध्वनिमय होती. पुढे तार्किक होत आज सूचक, अतार्किक, ‘ता' वरून ताकभात सूचित करणारी झाली. हा सारा अनर्थ शोध साधनांच्या भाऊगर्दीने व जीवघेण्या गतीने घडून आला. माणसाचा ‘कासव' व्हायचा तिथे ‘ससा' झाला. सशाचे सिंहावलोकन करत असता आज संशोधक सांगत आहेत की, अॅमेझॉन, गुगल, फ्लिपकार्ट हे काही वाचन वर्धनाचे उपाय नव्हेत. अॅप्स, किंडल, मोबाइल्स, टी.व्ही., सिनेमा, वाचनाची सजीवता गमावत निर्जीव झाल्याने सजीव माणसाचे वाचन निरंक (Nil) होत आहे. कागद, पेन, पेन्सिल, पाटी, पुस्तक पुन्हा देणेच त्यावरचा उपाय होय. कारण त्या वस्तू होत. पान पलटताना बोटांना होणारी स्पर्श, भावना, पुस्तकाच्या निकटतेने - वास, हालचाल, पलटणे, उलटणे, चाळणे यात जी आत्मीयता आहे; ती ई-कंटेंट देत नाहीत. शिवाय ती इलेक्ट्रॉनिक साधने गतीचा ससेमिरा लावतात. या सर्वांवर रामबाण उपाय म्हणजे परत पुस्तक हाती देणे हाच आहे.
५.४ वाचनाचे उद्देश
 माणूस का वाचतो असं विचाराल, तर त्याचं उत्तर एका वाक्यात नाही देता येणार. कारण माणूस अनेक उद्देश, हेतू मनात ठेवून वाचत असतो. शिवाय वय, मानसिक स्थिती, गरज लक्षात घेता वाचन माणसात इतक्या परीने उपयोगी होत असते की, उद्देशांची यादी करणेच अशक्य. तरीपण काही मूलभूत गरजा म्हणून माणसाचं वाचन होत असतं. बालपणापासून ते वृद्धावस्थेपर्यंत माणूस वाचत राहतो; पण वयपरत्वे वाचनाच्या गरजा बदलत राहतात. बालपणीचं वाचन शिकण्यासाठी असतं, तर वानप्रस्थात ते शहाणपण वाढविण्यासाठी होते.
५.४.१ शब्दार्थ ओळख व संग्रह
 बालपणीचं वाचन स्वर, व्यंजन उच्चारणापासून सुरू होतं. मग ते स्मरण केलं जातं. अक्षरं गिरविली जातात. मग येतात शब्द, शब्दांनी बनतात वाक्ये. वाक्ये आली की, मनातली उत्तरं देणं आलं. या सर्व प्रक्रियेत माणूस स्वर, व्यंजन, अक्षर, शब्द, वाक्यरचना शिकत शब्दसंपदेच्या जोरावर भाषिक कौशल्य प्राप्त करत असतो. शब्द, त्यांचे अर्थ, शब्दसंग्रह गाठी असल्याशिवाय माणूस ना बोलू शकतो, ना लिहू, ना विचार करू शकतो. वाचनाचा हेतूच अशी भाषिक बैठक तयार करणे असतो.
५.४.२ आकलन
 वाचन म्हणजे केवळ अक्षर, चिन्ह, अंकांचा उच्चार असत नाही, तर त्याला चिकटलेला अर्थ समजून घेऊन योग्य ठिकाणी, योग्य शब्द वापराचे सामर्थ्य येणे होय. असे सामर्थ्य निर्माण करणे हा वाचनाचा हेतू असतो. माणसाच्या वयाप्रमाणे त्याची भाषिक समज वाढत जाते. वाचन ऐकण्या, बोलण्याच्या व समाज व्यवहारांच्या वैविध्यातून संपन्न होते. वाक्य, वाक्प्रचार, म्हणी, अलंकार, उपमा इत्यादी ज्ञानाने भाषिक कौशल्यात वाढ होत भाषिक समज विकसित होते. लेखनाचा आशय, दोन शब्दांमधील गर्भित अर्थ, सूचक अर्थ माणूस तर्काने प्राप्त करतो. हे आकलन कौशल्य विकसित करणं हे वाचनाचं लक्ष्य असतं.
५.४.३ भाषिक सौंदर्य व कौशल्य (Fluency)
 माणसाचं वाचन जितकं चतुरस्र व विविध भाषा, ज्ञान, विज्ञानाच्या सीमा पार करत व्यापक होत जातं, तितकं त्याचं भाषिक प्रभुत्व वाढतं. या प्रभुत्वातून त्याची भाषा शब्दशक्ती, अलंकार, सुभाषितं, वाक्प्रचार, म्हणी इत्यादींनी फक्त सुंदरच होत नाही, तर भाषिक सौंदर्याच्या, अभिव्यक्तीच्या लकबी, कुशलता, आरोह, अवरोह, यती, विरामचिन्हांनुसारी वाचन, उच्चारण अशी अनेक कौशल्ये वाचकात विकसित होत असतात. भाषिक सौंदर्याची जाण निर्माण करणे, तशी कौशल्ये वर्धिष्णू करणे हा वाचनाचा उद्देश प्रौढ खरा; पण त्यातून भाषा सामर्थ्याची प्रचिती येत असते. भाषेचा अस्खलित वापर वाचनाशिवाय अशक्य.
५.४.४ साहित्य अभिरुची विकास
 भाषा नि साहित्याचा परस्परपूरक संबंध असतो. एकमेकांमुळे दोन्ही विकास पावतात. वाचकाचे वाचन बहुविध असते ते भाषा, शास्त्र, लिपी, साहित्य, संस्कृती अशा अंगांनी. वाचन अभिरुचीमुळे आपण विविध भाषा शिकतो. विविधभाषी वाचनामुळे आपणास साहित्य श्रेष्ठत्वाची जाणीव होते. एकभाषी वाचन संकुचित असते. तीच गोष्ट विविध ज्ञान-विज्ञानांची. साहित्य, काव्यशास्त्र, भाषा विज्ञान, तत्त्वज्ञान, भौतिकशास्त्र, संगीत असं सारं माहीत असण्यानं आपल्या प्रश्न, समस्या, जगणं इत्यादींसंबंधी अष्टपैलू दृष्टिकोन तयार होतो. शिक्षित माणूस समजदार, सुजाण, सुसंस्कृत करणे हे साहित्य अभिरुची विकास, विस्तारातूनच शक्य असते. म्हणून केवळ भारतीयच नाही, तर युरोपीय, आशियाई, आफ्रिकी असे विविध खंडांतील साहित्य अभ्यासाच्या जाणिवा वाचन उद्देश लक्षात घेऊनच होत राहतात. साहित्य प्रेम वाढविणे हाच वाचनाचा प्रमुख हेतू असतो. ५.४.५ संवाद, संपर्क विचार
 जो अधिक वाचतो तो अधिक आत्मविश्वासी होतो. भाषिक कौशल्य व प्रभुत्व आजच्या माहिती आणि संपर्क युगात आवश्यक जीवन साधन बनून गेलं आहे. माणूस प्रवासी झाल्याने बहुभाषी संवाद त्याची जीवन गरज बनून गेली. तो पर्यटक, प्रवासी झाल्याने त्याची जीवनशैली बदलली. यातून त्याच्या भाषिक गरजा वाढल्या. आज त्याला एकाचवेळी स्थानिक व जागतिक भान लागते. भारतीय भाषांबरोबर जागतिक भाषा येणं आवश्यक झालं. समाज संपर्क, संवाद ही जीवनाची गरज वाचन आणि भाषा विकासाशिवाय असंभव. असं संवाद, संपर्क कौशल्य शिकवणं हाच वाचनाचा हेतू. तो वाचन, भाषा व्यवहारातूनच विकसित होणे शक्य असते.
५.४.६ कल्पना सामर्थ्य व भावसाक्षरता
 वाचनामुळे कल्पना करण्याचे सामर्थ्य जसे वाढते, तशी तर्क करण्याची शक्तीपण विस्तारत असते. ती विस्तारणे हाच मुळी वाचनाचा हेतू असतो. लेखक साहित्य निर्माण करतो ते कल्पना आणि वास्तवाचा मेळ घालत. सामान्य माणसापेक्षा लेखक, कवी, कलाकार वेगळा ठरतो ते प्रतिभेमुळे. प्रतिभेचे बलस्थान असते कल्पना सामर्थ्य, साहित्यामुळे वाचकात भावसामर्थ्य निर्माण करून माणसाला संवेदी बनविणे, परहितदक्षी, सहिष्णू बनविणे हाही वाचनाचा हेतू असतो. वाचनामुळे गुणावगुणांच्या भेदांची जाणीव होऊन वाचक सुसंस्कृत होतो. ते वाचन त्याला दया, क्षमा, शांतीचे महत्त्व समजावते म्हणून. शिवाय हिंसा, क्रोध, घृणा, प्रलोभन मुक्त माणूस घडविणे हा वाचनाचा हेतू असतो, हे विसरून चालणार नाही.
५.४.७ आत्मभान विकास
 वाचनात माणसाला अंतर्मुख करण्याची क्षमता अन्य कोणत्याही साधन, माध्यमांपेक्षा अधिक असते. माणूस वाचतो त्या क्षणी त्याची विचार प्रक्रिया गतिमान असते. ती त्यास गुणदोषांची जाणीव देऊन अंतर्मुख करते. त्यातून आत्मभान येते. ते निर्माण करणे वाचनाचा मूळ हेतू असतो. प्रगल्भ वाचन षडरिपूंवर विजय मिळवू शकते. जग, जीवन म्हणजे विविध रंग, गंध, रस, स्वादांचे संमेलन. ते सर्व एकाच प्रकारचे असत नाही. राजस, तामस, सात्विक असं त्यांचं स्वरूप वैविध्य असतं. ते चांगल्या, वाईट सवयी, वृत्ती निर्माण करतं. अहिंसा, सत्य, अस्तेय इत्यादी एकादश व्रते माणसास सत्शील बनवत असतात. असं वाचकास बनविणे हा वाचनाचा उद्देश. तो विविध ज्ञानस्वरूप वाचनातूनच फळाला येतो. वाचन निरुद्देश नसते. ते परिणामकारकच असते. म्हणून माणसाने 'स्व' जाणीव, 'स्व' विकास, सत्वबोध, सत्यशोधार्थ वाचत राहिले पाहिजे. वाचन सवय, वृत्ती होणं म्हणजे स्वत:चा शोध लागणं होय.
५.५ वाचन प्रक्रिया (Reading Process)
 वाचन म्हणजे लिखित अंक, अक्षर चिन्हांच्या संकेतांचा शोध आणि आकलन होय. माणसाला हे आकलन होते. पूर्वज्ञान, वर्तमान वाचन व वाचलेल्याची तार्किक संगती. ही सारी एक सजीव, तरल अशी गुंतागुंतीची प्रक्रिया वा पद्धत आहे. माणूस या प्रक्रियेतूनच शब्द, अर्थ, वाक्प्रचार, म्हणी, वाक्य इत्यादी रचनापद्धती शिकत असतो. यातूनच तो भाषा शिकतो. एकमेकाशी संवाद, संपर्क ठेवण्याचे साधन म्हणजे भाषा. ती वाचन प्रक्रियेतूनच विकसित होत असते. यातूनच माणसाच्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावतात आणि नवनवीन ज्ञान संकल्पनांचा उदय आणि विस्तार होत असतो. लिखित वा मुद्रित वा अंकीय (Digital) मजकूर आणि वाचक यांच्यातील सहसंबंधांतून वाचन प्रक्रिया आकाराला येत असते. त्याकामी वाचकाचे पूर्वज्ञान, पूर्वानुभव, जाणिवा, संस्कृती, वृत्ती, भाषासमूह प्रभाव उपयोगी पडतो. वाचन प्रक्रियेतून जे ज्ञान विकसित होते वा मिळते त्यासाठी मात्र प्रात्यक्षिक, सराव, पाठांतर, स्मरण यांचा उपयोग होतो. त्यामुळे वाचन प्रक्रियांतून एखादी गोष्ट कळणे वा समजणे सुलभ, सुबोध होत असते. यातून ज्ञानाला झळाळी व स्पष्टता येते. यासाठी मात्र तुम्हाला विश्लेषण, समीक्षा, चिकित्सा, जिज्ञासा इत्यादी कौशल्यांची कास धरणे आवश्यक असते. वाचन प्रक्रिया समृद्ध व्हायची तर वाचकात सृजनात्मक वृत्ती असणं त्याची पूर्वअट असते. साहित्य आकलन, ज्ञानप्राप्तीही एका अर्थाने मुशाफिरी असते. तुम्ही ज्ञान, विज्ञानाची नवनवी क्षेत्रे वाचन प्रक्रियेच्या जोरावर पादाक्रांत करीत असता. त्यासाठी गलिव्हर, कोलंबस, वास्को द गामा, ह्यूआन सांग यांच्यासारख्या जग शोधणाच्या धाडसींची साहसी वृत्ती, आव्हाने पेलण्याची मनीषा उरी असावी लागते. परंपरेची मळलेली पायवाट दूर सारून नवा मार्ग आक्रमिण्याचे साहस जे वीर दाखवितात त्यांनाच नवा देश, प्रदेश, प्रांत सापडत असतो. पामर किनारी विसावतात, तर साहसी भोवरे भेदून नवा प्रदेश मिळवितात. वाचन प्रक्रिया यापेक्षा वेगळी असत नाही. तुम्ही प्रयत्नशील रहाल तरच वाचनाने मोती हाती येतात.   वाचन प्रक्रियेतून ज्ञानाचे जे क्षितिज रुंदावत असते, ते असीम खरेच! तुम्ही जे वाचता त्याचा मतितार्थ, लक्षार्थ, व्यंगार्थ, ध्वन्यार्थ लावणे सर्वस्वी तुमच्या वकुबावर अवलंबून असते. श्रेष्ठ साहित्य एकाच मजकुरातून प्रत्येक वाचकास भिन्न अर्थ, बिंब, भाव देते. कारण वाचन प्रक्रिया ही प्रत्येकाच्या क्षमतांवर कमजोर वा जोरकस, मतिमान वा गतिमंद होणे अवलंबून असते. या प्रक्रियेची एक रीत आहे; पण तिला ठोकळ असे नियम नसतात. त्यामुळेच एक कविता, नाटक, कथा, कादंबरी वेगवेगळ्या वाचकांना अनेक प्रकारची वेगवेगळी अनुभूती देत असते. अन्वय वा अन्विती ही तुमच्या आत्मपरीक्षण, आत्मज्ञान क्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे वाचन प्रक्रियेतून वाचकाचे रूपांतर सर्जकांत केव्हा होते ते कळतसुद्धा नाही. वाचन प्रक्रियेतून मुद्रित आशयाचा होणारा विकास अप्रत्याशित, अनपेक्षितपणे अपरा सृष्टी निर्मिणारा, चकित करणारा असतो. त्यासाठी वाचक आपल्या जाणिवांतील विविध क्लुप्त्या, युक्त्या वापरत असतो. मृत वा निर्जीव अंक, अक्षरादी चिन्ह्यांच्या रूढ सांकेतिक अर्थोपलीकडचा सर्वथा नवा बोध वा अर्थ निर्मिती, अनुभूती एक नवे आविष्करणच असतं. ‘जो न देखें रवि, वह देखें कवि' म्हटलं जातं. त्याचा हाच अर्थ असतो. हीच वाचन प्रक्रियेची खरी फलश्रुती असते. वाचक यासाठी पूर्वी आत्मसात केलेली कौशल्ये, शब्द, शैली, अर्थ, जाणिवा, बोध सर्वांचा लीलया वापर करून हा चमत्कार घडवून आणतो. वाचनाने ब्रह्मानंदी समाधी लागते म्हणजे दुसरे तिसरे काही नसून हाती येणारा वाचनाचा अनपेक्षित आनंद! त्यासाठी वाचन संस्कार हवा. संस्कारातूनच संस्कृतीचा विकास घडत असतो. वाचन प्रक्रिया कधी काळी एक निर्जीव कृती होती. आज ती कला, विज्ञान, संस्कृती इत्यादी अंगांनी विकसित होत आहे. अत्त दीप भव'सारखं ती प्रक्रिया केवळ प्रार्थना, प्रेरणा गीत न राहता तो आत्मविकासाचा महामार्ग, महाद्वार बनते. परंपरागत चौकट मोडून नवा पायंडा, चेहरा, स्वरूप निर्मिणे हे वाचन प्रक्रियेच्या निरंतरेतून घडते. 'केल्याने होत आहे रे, आधी केलेच पाहिजे' हे सूत्र वाचन प्रक्रियेचं खरे रहस्य होय. या प्रक्रियेत तुम्ही जेवढे ढुंबाल, बुडाल तेवढा तुम्हाला आनंद मिळणार.
  पूर्वी वाचन मात्र एक कृती होती. पाठांतर एक प्रकारचे कर्मकांडच होते. आता वाचनाला आकलनाची (Comprehension) पूर्वअट असते. समजून घेऊन वाचणे महत्त्वाचे. केवळ अस्खलित उच्चारण हा अभिनय, अभिव्यक्ती वा अभिवाचन या अंगांनी ते प्रगट आविष्करण ठरते. समजणे सर्वांत महत्त्वाचे. प्रश्न वाचता येण्यापेक्षा उत्तर देता येणे महत्त्वाचे असते. ते आकलन क्षमता आणि कौशल्यावर आधारित असते. म्हणून आज वाचन प्रक्रिया समजून घेणं आवश्यक झालं आहे. वाचन प्रक्रिया विविध टप्प्यांनी पूर्ण होते. त्याची एक रीत आहे. त्यासाठी वाचन कृतिशील असणे महत्त्वाचे. म्हणजे तिच्यात कल्पना, नाद, लय, ताल, हवा तसा आशयही हाती येणे महत्त्वपूर्ण. वाचनातून हाती काही आले नाही, तर ते वाचन व्यर्थ समजावे.
५.५.१ वाचनाचे तीन टप्पे
 वाचन प्रक्रिया तीन टप्पे ओलांडत पूर्ण होते-
१. वाचनपूर्व अनुमान (Preview)
 आपण जे वाचणार आहोत, त्या सामग्रीसंबंधी आपले पूर्वज्ञान, अनुभव यांची संगती पार्श्वभूमी म्हणून महत्त्वाची असते. त्यामुळे लक्ष्य मजकूर समजणे सोपे होते.
२. वाचन कृती (Actin/Activity)
 प्रत्यक्ष वाचनाची कृती करताना अपेक्षित माहिती, ज्ञानाचे दृश्यमान रूप (Visualize form) , पूर्वज्ञानाचे एकात्मीकरण व नवे ज्ञान प्राप्त करण्याची मानसिक तयारी या सर्वांतून तयार होणारे वाचन सामुग्रीसंबंधी स्वत:चे आकलन अधिक महत्त्वाचे असते. त्यामुळे ज्ञान मिळणे शक्य होते.
३. वाचनोत्तर प्रतिसाद / प्रतिक्रिया (Recalling)
 आपण वाचून जे ज्ञान प्राप्त करतो, त्याचे उपयोजन करणारा प्रतिसाद सकारात्मक / नकारात्मक असणे हे आपल्या अभिरुची, वृत्तीवर अवलंबून असते. एकाच वाचन सामुग्रीच्या आकलनानंतरच्या प्रतिक्रिया भिन्न असू शकतात. ‘पिंडे पिंडे मतिर्भिन: स्वाभाविकच म्हणायला हवे. गझल, भजन, लावणीचा श्रोता भिन्न असतो. भक्ती, प्रेम, वात्सल्य, शृंगार, घृणा, आस्वाद इत्यादी भिन्नता त्यातूनच उदयाला येते.
५.६ वाचन कौशल्ये (Reading skills)
 का वाचायचे हे कळल्यावर कसे वाचावे? असा प्रश्न ओघाने येतोच. वाचन ही जर क्रिया, प्रक्रिया पद्धती असेल, तर ती व्यवस्थित, सुनियोजित होण्यासाठी वाचकाने स्वत:मध्ये अशी कौशल्ये निर्माण कशी होतील ते पाहायला हवे. त्यासाठीची पूर्वतयारी, पूर्वपीठिका निश्चित असणे जरुरीचे असते. वाचनासाठी मानसिक तयारी हवी. वेळेचे पूर्वनियोजन हवे. वाचताना एकाग्रता ही सर्वांत महत्त्वाची गोष्ट असते. त्याशिवाय वाचलेले लक्षात राहणे अवघड होते. वाचनाची गती, प्रतिमिनिट वाचनाची शब्दसंख्या यावर संशोधन झाले आहे. जलद व प्रभावी वाचन व्हायचे तर या सर्वांचे अवधान वाचकांनी बाळगायला हवे. वाचनात महत्त्वाचा अडथळा असतो तो कठीण शब्द, संकल्पनांचा. आकलनपूर्ण वाचन व्हायचे तर अशा शब्दांचे अर्थ, संकल्पनांची फोड करून घेणे फायद्याचे ठरते. मग जे वाचायचे त्याची दिशा, लक्ष्य निश्चित करायला हवे. निर्हेतुक वा निरुद्देश वाचन काय कामाचे? वाचन सामुग्रीतील महत्त्वाचे चर्चेचे, वादविवादाचे, विश्लेषणाचे मुद्दे लक्षात घेऊन केलेले वाचन अंतिमतः फलदायी ठरते. वाचताना संदर्भ, अनुमान इत्यादी बाबीपण तितक्याच महत्त्वाच्या असतात. वाचनात येणारे दृष्टांत, पुरावे यांचेसुद्धा आकलनाच्या दृष्टीने महत्त्व असते. आपण एकाच विषयावर अनेक पुस्तके वाचत असतो. अशा स्थितीत पूर्ववाचन व वर्तमान वाचन (दोन पुस्तकांतील) साम्य स्थळे, भेद स्थळे शोधून तुलना करून स्वत:चे मत तयार करता येणे म्हणजे आपले वाचन प्रौढ, प्रगल्भ, सुजाण झाल्याची खूण समजावी. अशी प्रचिती येणे ही वाचन सार्थक्याची कसोटी वा खूणगाठ मानावी. यासाठी आपले वाचन चतुरस्र असणे आवश्यक असते. वाचन कौशल्यांचा विकास होतो तो अशा सर्वग्राही, सर्वंकष वाचनातूनच. वाचन हे चौकस हवे तसे चतुरस्रही. ते अशासाठी की त्यामुळे आपणाला एका प्रश्न, समस्येचे अनेक पक्ष उमजतात. अशी उमज पडणे म्हणजे तुम्ही अष्टपैलू होणे होय. वैविध्यपूर्ण वाचन वाचकास मर्मग्राही, चोखंदळ बनवत असते. म्हणून वाचनाची विविध कौशल्ये आपण समजून घेऊन ती आत्मसात करण्याचा प्रयत्न करायला हवा.
५.६.१ प्रभावी वाचन
 वाचक अनेक प्रकारचे वाचन करत असतो, तसा तो अनेक स्वरूप, साधनांद्वारे वाचत असतो. माणसाच्या वाचनाच्या कक्षा बहुआयामी असतात. तो पुस्तक, नियतकालिके, वृत्तपत्रे, जाहिराती, संगणक, मोबाइल्स इत्यादींवरील मजकूर वाचतो. ते साहित्य, लेख, समीक्षा, निबंध, वृत्तांत, वर्णन, संशोधन, प्रबंध, प्रकल्प, व्यक्तीलेख अशा स्वरूपाने वैविध्यपूर्ण राहतं. अभ्यास करणारा विद्यार्थी पाठ्यपुस्तके, मार्गदर्शिका, स्वाध्याय, प्रश्नोत्तरे, अशा अंगांनी वाचतो. जे वाचतो त्याची चिकित्सा, चर्चा, पक्षविपक्ष, मूल्यमापन, समीक्षा, विरोधी मत लेखन अशा अंगांनी वाचल्याचा व्यत्यास म्हणून उत्तरपक्षीय वाचन त्याचे होत राहते. ते प्रभावी होण्यासाठी खालील गोष्टी लक्षात घेणे आवश्यक असते.
१. तुम्ही कुठे, कसे वाचता ते महत्त्वाचे. वाचनाची जागा शांत, प्रकाशित,आल्हाददायक असावी. बैठक व्यवस्था वाचन सुलभ हवी.
२. वाचनाचे ठिकाण व व्यवस्था एकाग्रतापूरक हवे.
३. प्रगटपेक्षा मौन वाचन प्रभावी असते. ते दीर्घप्रभावी आणि स्मरणीय होते.
४.वाचनाची वेळही महत्त्वाची. वाचनाच्या वेळेत विरंगुळा हवा. प्रत्येकाची एकाग्रतेची क्षमता भिन्न असते. त्यानुसार थोडा बदल, विश्रांती परत वाचताना एकाग्रतापूरक ठरते.
५.प्रकाश डाव्या बाजूने हवा म्हणजे लिहिताना सावली आड येत नाही. दिव्याचा प्रकाशही तसाच हवा. तो डोक्यावर असू नये.
६. वायुविजनाची सोय वाचन बैठक (काळ) वाढविण्यास उपयुक्त असते.
७. वाचताना पूर्वनिर्धारित लक्ष्य (Target) हवे. (१० पाने, एक प्रकरण इ.) असे प्रतिबद्ध वाचन हवे. मात्र, ते कंटाळा आला की, उसंत घेऊन मग व्हावे तर ते प्रभावी होते.
८. वाचन तुम्ही जितके एकाग्र, मनापासून कराल तितका वाचन काळ रुंदावता येणे, वाढवणे शक्य असते.
९. प्रत्येक प्रकारच्या वाचनाचे प्रकार काळ, काम, वेगाच्या गणितावर अवलंबून असतात.
१०. वाचन ही स्वेच्छा, प्रतिबद्ध क्रिया असेल तर असे वाचन जलद, प्रभावी, दीर्घजीवी ठरते.
५.६.२ वाचनोत्तर पाठपुरावा
वाचन उपयुक्त व्हायचे तर पाठपुराव्यावर भर हवा -
१. सारांशीकरण
आपण जे वाचतो त्याचा सारसंक्षेप करता येणे म्हणजे वाचलेले हाती लागण्याची निशाणी असते.
२. क्रमवारी
आपण एकाच विषयासंबंधी भरपूर वाचतो तेव्हा त्याचे वर्गीकरण, तर्कसंगत क्रमवारी लावणे म्हणजे प्राप्त ज्ञानाची वैज्ञानिक मांडणी करण्यासारखे असते. ३. अनुमान
 वाचनानंतरचा निष्कर्ष महत्त्वाचा. वाचनाचा हेतू लक्षात घेऊन आकलनानंतर मूल्यमापन व मूल्यांकन करायला हवे, तरच आपण लक्ष्य गाठले असे होते. उद्देशपूर्ती म्हणजे वाचनाचे यश.
४. तुलना/भेद
 एकाच प्रकारचं अनेकांगी वाचन व विरोधी वाचन यातून समान दुवे जसे शोधायला हवेत तसे भेदही. त्यामुळे वाचन सामुग्रीची तुलना, चिकित्सा, मीमांसा शक्य होते. ते होणे अनिवार्य.
५. शंकानिरसन
 वाचनातून शंका दूर व्हाव्यात तसेच प्रश्न सुटणेही महत्त्वाचे. वाचन संकटमोचक हवे, तर वाचनाचा नवा पट्टा, टप्पा दृष्टिक्षेपात येऊन वाचन क्षितिज विस्तारते.
६. अन्वय
 वाचलेल्या गोष्टीचा आशय जीवनाशी, प्रश्नांशी, शंकांशी ओळख येऊन शंका-कुशंकांचे ढगाळ आभाळ निरभ्र होणे म्हणजे वाचन क्रांती. धुके जाऊन सूर्यप्रकाश लख्ख होणे म्हणजे ज्ञानाचा साक्षात्कार.
७. मत व वास्तव
 पूर्वमत घासून पुसून नवं होणं, गैरसमज दूर होणं, मतमतांतरांतून मन्वंतर घडून येणं म्हणजे अमृतमंथन.
८. इप्सित साध्यता
 वाचनपूर्व उद्देश व वाचनोत्तर मन्वंतर, मतसंग्रह म्हणजे वाचल्याचे आकलन होणे होय.
५.७ वाचन प्रकार
 वाचनाचा उद्देश व स्वरूप या आधारे वाचनाचे पाच प्रकार पडतात -
५.७.१ सहज वाचन (Light Reading)
 शिळोप्याचा उद्योग, वेळ घालवायचे साधन, मनोरंजन इत्यादी उद्देशांनी होणारे वाचन म्हणजे सहज वाचन होय. ते हेतुतः होत नसते. वरवरची माहिती, सूचना मिळविण्यासाठी केलेले हे वाचन. ते अल्पजीवी असते. वाचताच माणूस ते विसरूनही जात असतो. असे वाचन मिनिटास १००, २०० शब्दगतीने होत असते. ५.७.२ कटाक्ष वाचन (Scanning)
 हॉटेल्सचे मेनुकार्ड, टेलिफोन डिरेक्टरी, वृत्तपत्रांचे मथळे, जाहिराती इत्यादींचे वाचन म्हणजे कटाक्ष वाचन. त्याची उपयोगिता क्षणिक नि प्रभावीही. वरवर नजर फिरवत केलेले हे वाचन. आपण वाच्य सामुग्री पाहतो, वाचतोच असे नाही, अशा प्रकारचं वाचन या सदरात मोडते.
५.७.३ गतिमान वाचन (Skimming)
 वरील प्रकारच्या वाचनाची ही पुढची पायरी. इथे पाहणे, थबकणे विचार करणे, निर्णय करणे महत्त्वाचे. तोपर्यंतचे हे वाचन, गरजेनुरूप होणारं हे वाचन, दृष्टिक्षेप टाकणे व ठरविणे इतक्या अल्पकालापुरतं होणारं हे वाचन याची क्षमता दर मिनिट १००० शब्दांपर्यंत जाऊ शकते. त्वरित निर्णयार्थ होणारं हे वाचन होय.
५.७.४ सोद्देश वाचन (Purposeful Reading)
 हेतुतः घडणारं हे वाचन प्रतिबद्ध, बांधील असल्याने ते गंभीर व एकग्रपणे केले जाते. हे वाचन शब्दशः, विचारपूर्वक होत असते. अभ्यासार्थ केलेले वाचन या कोटीतले असते. हे लक्षपूर्वक वाचन होय. शब्दार्थ, संकल्पना, सूत्रे समजून घेत केलेले हे वाचन परिणाम या कसोटीवर (निकाल, गुण, क्रमांक, श्रेणी, निवड इ.) घडत असल्याने यात कमालीची एकाग्रता असते; पण आकलनापेक्षा स्मरणावर इथे भर असतो, हे लक्षात ठेवायला हवे.
५.७.५ व्यापक वाचन (Extensive Reading)
 आनंददायी वाचनाची ही परी. तणावमुक्त वातावरणात केलेला मुक्तसंचार असे या वाचनाचं स्वरूप असते. याला स्थळ, काळ, विषय इत्यादींचं कसलंच बंधन असत नाही. छंद म्हणून केलेले वाचन. इथे परिणाम, प्रभावाची तमा नसते. निखळ आनंद हाच या वाचनाचा हेतू असतो. ज्येष्ठ नि युवकांचं बरंचसं वाचन या पठडीतले असते. बालपणीचं अबोध वाचन नि हे वाचन यात फरक असतो.
५.७.६ सखोल वा प्रगल्भ वाचन (Intensive Reading)
  ही वाचनाची सर्वांत प्रगत अवस्था म्हणायची. एकतर ते हेतुतः होत असतं शिवाय सखोलही. याची गती मंद असली तरी आकलन ही या वाचनाची खरी कसोटी असते. विद्वान, विचारवंत, संपादक, साहित्यिक, संशोधक, अभ्यासक करत असलेले हे वाचन एकाच वेळी अनेक संदर्भ पुरावे, गोळा करत घडत असते. एखादा प्रश्न, समस्या, गोष्टीचे सर्व पक्ष समजून घेऊन नवमताच्या मांडणीसाठी केलेले हे वाचन संदर्भयुक्त, सोदाहरण घडत निर्मितीक्षम होते. ज्ञानासक्तीतून घडणारे हे वाचन सृजनक्षम असते. नव्याचा शोध ही त्याची कसोटी असते. माहिती पलीकडील अज्ञाताचा शोध ही या वाचनाची ऊर्जा असते. अग्रलेख, वैचारिक लेख, शोधनिबंध, समीक्षा इत्यादी या वाचनाची इतिश्री अथवा फलनिष्पत्ती असते. यास तुलना, विश्लेषण, खंडनमंडन अशा प्रक्रियांतून जात स्वत:ची घडण करावी लागत असते. विश्लेषण, मीमांसा, समीक्षा, सिद्धांत ही अशा वाचनावर उभी ज्ञानसंपदा असते. 'Red between the line' ही या वाचनाची शैली. ती संकेत, चिन्ह इ.पलीकडचे वाचन स्वशोध, बोध असतो. Type and Posted' अशा सोशल नेटवर्किंगच्या काळात असं वाचन म्हणजे उंबराचं फूलच म्हणायला हवं. वाचन ही जर तपश्चर्या असेल, तर त्याचा पुरावा म्हणजे प्रगल्भ वाचन. विचार व अभिव्यक्तीच्या द्वंद्वाने नटलेले हे वाचन. त्याचे स्वरूप कलात्मक खरेच. वाचन, चघळणे, खाणे असते की पचविणे, याचे उत्तर म्हणजे हे वाचन. 'Reading maketh the full men' असं बेकॉननी म्हटलं होतं, त्याला या वाचनाचा संदर्भ होता. बेकॉननीच 'of studies' मध्ये लिहून ठेवलंय की, 'Some books are to be tasted, others to be swallowed' म्हणून मग 'Reader's Digest जन्मलं.
५.८ सृजनात्मक वाचन  अन्य प्राणीमात्रापासून माणसास वेगळा ठरविणारे जे अनेक घटक आहेत, त्यापैकी वाचन हा एक होय. हास्य, विचार, तर्काप्रमाणे वाचन कौशल्य केवळ मनुष्य मात्रातच आढळते. ज्ञान संपादन प्रक्रियेची माणसाइतकी संवेदी प्रक्रिया अन्य जीवजंतूत अभावानेच दिसून येते. आकलन क्षमता विकासाचे वाचनासारखे दुसरे साधन नाही. माहिती संपादन व संग्रहण वाचनामुळे सुलभ होत असते. वाचन म्हणजे केवळ लिखिताचा बोध नव्हे. तर अर्थ, आशय, तर्क इत्यादीद्वारे न लिहिलेला आशय वाचकास उमजतो, तो केवळ वाचकाच्या शहाणपणामुळे. बुद्धी, दृष्टी, मन, आकलन इत्यादीच्या गुंतागुंत प्रक्रियेतून वाचन विकास कौशल्य घडत रहाते. त्यातून मग सृजन क्षमतेचा विकास होतो. लिहित्या लेखकाचं वाचन त्यास लिहितं ठेवतं. अन्य बौद्धिक कौशल्याप्रमाणे वाचन हे पण एक सृजनात्मक कौशल्य होय. वाचन ही शरीरी क्रिया, तशीच ती मानसिक, भावनिक, बौद्धिक समन्वयक प्रक्रिया होय. माणूस वाचतो मुळी अनेक उद्देशांनी. ज्ञान प्राप्ती, जिज्ञासा, मनोरंजन, शोध अशा अनेक हेतुंनी वाचन घडत रहातं. त्याला एका विशिष्ट पठडीत बसवणं कठीण. कल्पना, निर्णय, आकलन, विचार अशा अनेक कृती, क्रियांच्या समन्वित परिणामातून वाचन उदयास येतं. त्यातला संवेदना पक्ष अधिक महत्त्वाचा. त्यामुळे वाचक पुस्तकात गुंग होऊन रहातो. वाचन अनेक प्रकारचं असतं -
१) मुक्त वा स्वच्छंदी वाचन (Open Reading)
२) मीमांसांत्मक वा चिकित्सक वाचन (Critical Reading)
३) सृजनात्मक वाचन (Creative Reading)
मुक्त वाचन
 बालवयातील बालबोध वाचन या प्रकारात मोडतं. प्राथमिक वाचन असंही या वाचनास म्हणता येईल. आगामी प्रगल्भ वाचनाची पायाभरणी या वाचनातून होते.
चिकित्सक वाचन
 वाच्य सामग्रीची चिकित्सा, समीक्षा, मीमांसा करणारं वाचन ते चिकित्सक, उच्च शिक्षणातून असं वाचन आकाराला येत असतं. चांगलंवाईट, विधी-निषेध, सकारात्मक-नकारात्मक गुण विशेषांची जाणीव चिकित्सक वाचनातून येत असते. प्रश्नोत्तर पद्धतीतून हे वाचन उदयाला येतं. यातून आकलन क्षमता विकसित होते. शिवाय स्वमताचा विकास घडून येऊन स्वतंत्र मताची घडण अशा वाचनातून होत असते. मूल्यमापन, विश्लेषण, रसग्रहण, कल्पनाविस्तार, सार-संक्षेप अशी कितीतरी ज्ञानात्मक कौशल्ये चिकित्सक वाचनातूनच आकारास येत असतात.
सृजनात्मक वाचन
सृजनात्मक वाचन दोन प्रकारचं असतं-
१) रुपांतरित वाचन (Convergent Reading)
२) परिवर्तित वाचन (Divergent Reading)
 पैकी रूपांतरित वाचनातून साहित्य आकाराला येत असते, तर परिवर्तित वाचनातून कल्पना आणि दृष्टिकोण विकसित होत असतात. वाचक अशा वाचन वैविध्यातून लेखकाच्या कल्पना आणि भावतरंगांपर्यंत पोहोचत असतो. सृजनात्मक वाचन वाचलेल्या पलिकडचे जग निर्माण करते. ‘जे न देखे रवी, ते देखे कवी'चा बोध म्हणजे सृजनात्मक वाचनाची फलश्रुती होय. लेखकाच्या कल्पना, विचारांशी ताडून वाचक आपलं मत बनवतो. म्हणून वाचन सृजनात्मक (Creative) असल्याचे सिद्ध होतं.
 वरील सर्व प्रकारच्या वाचनांमधून वाचकाची मनो धारणा (Psychomotor Process) आकारत असते. त्यामुळे वाचन बहुआयामी, बहुविध प्रकारचे असण्यातून माणूस बहुश्रुत होत असतो. प्राथमिक वाचन अनुकरण असतं, तर प्रगल्भ वाचन स्वतंत्र. निरंतर चिकित्सक वाचन अनेकदा सृजनक्षमतांच्या दृष्टींनी मारक ठरते. केवळ बौद्धिक, तार्किक विचार माणसाला एकांगी बनवतो. भावनिक, काल्पनिक, रंजक वाचन माणसास सर्वांगी बनवते. माणूस अष्टपैलू होतो ते बहुश्रुत वाचनातून.
 वाचनाने व्यक्तीस केवळ शब्दार्थ कळून येणे पुरेसे नसते. दोन शब्दांमधील आशय हा शब्दार्थापेक्षा अधिक महत्त्वाचा असतो. त्यामुळेच सृजनात्मक वाचन अधिक महत्त्वाचे ठरते. शिक्षणात सृजन, कृती, शोध महत्त्वाचा असतो. बोध ही प्राथमिक क्रिया होय, तर शोध हे अंतिम लक्ष्य असते. त्याप्रत पोहोचायचे तर वाचन सृजनात्मक असणे अनिवार्य असते.
५.८.१ सृजनात्मक वाचनाचे घटक
  सृजनात्मक वाचन हा वाचनाचा एक प्रकार जसा आहे, तसा तो वाचन विषयक दृष्टिकोन (Approach) ही आहे. वाचन प्रक्रियेत वाचकाची तल्लीनता ही सृजनात्मक वाचनाची खरे तर पूर्वअट (Pre-Condition) होय. ही प्रक्रिया नीट घडायची तर त्यासाठी कृती, कल्पना, जिज्ञासा, तुलना, चिकित्सा ही कौशल्ये वाचकात असणे आवश्यकच नाही तर अनिवार्यही असते.
 जगात सर्वप्रथम सृजनात्मक वाचनाचा विचार इमर्सनने सन १८३७ मध्ये केला. त्याने ‘संहितेची पुनर्रचना' (Reordering the Text) आणि ‘संहिता सुधार' (Reforming the Text) या संदर्भात प्रथमत: विचार मांडले.आपण जे वाचतो त्याच्यातील नव्या आशयाचा शोध घेण्याची वृत्ती म्हणजे सृजनात्मक वाचन होय. संहिता जो आशय व्यक्त करते त्यापेक्षा नव्या आशयाच्या मांडणीच्या ध्यासातून सृजनात्मक वाचन जन्माला येत असते. एकाच संहितेतून अनेक वाचकांना अनेक प्रकारचा बोध होतो. कारण प्रत्येकाच्या वाचन व्यवहाराचे स्वरूप आणि प्रक्रिया भिन्न असते. चरित्र एकच पण त्याची मीमांसा भिन्न असते. कवितेची ओळ एकच पण प्रत्येक शिक्षक त्याचा अर्थ आपापल्या परीने भिन्न रूपात कथन करतो. विस्तार भिन्न असे ज्ञानाचे रूप आकारते ते सृजनात्मक वाचनाचे फलित असते. ते अनुभव, वाच्य सामुग्री (Text), विश्लेषण, पूर्वज्ञान, आकलन यातून निर्माण होत असते.
  वाचनावर विचार करणा-या अनेक संशोधकांनी चिकित्सात्मक वाचन आणि सृजनात्मक वाचन यांस एकच मानण्याची चूक केली आहे. वस्तुतः चिकित्सक वाचनासाठी निर्णय नि आकलन क्षमतेची गरज असते, तर सृजनात्मक वाचनास कल्पनेची भरारी आणि स्वच्छन्द वैचारिकता आवश्यक असते. सृजनात्मक वाचनाचा विकार लेखन सातत्यातूनही होत रहातो. काय वाचायचे नि काय नाही याची विवेकी निवड ही लेखकाचे अनुभवजन्य कौशल्य मानावे लागेल.
 सृजन ही मूलतः आंतरिक प्रक्रिया होय. ती ज्ञानीच करू जाणे. नव निर्मितीच्या ध्यास नि ध्येयातून सृजन जन्माला येत असते. कलाकार, वैज्ञानिक, संगीतकार, साहित्यिक प्रत्येक जण नवनिर्मिती करीत असला तरी प्रत्येकाचे सृजनात्मक वाचन जसे भिन्न असते तसे माध्यमही. स्वर ताल, रंग, माती, शब्द ही माध्यमे भिन्न. पण वाचन, विचार प्रक्रियेतून त्यातील नवसृजन आकारत असते, हे कोण नाकारेल. 'नवे व्याख्यायित करणे, त्याचे मोजमाप, मूल्यमापन भौतिकशास्त्र होते, तसे ते परिमाणजन्य (Measurable) नसते, तर असते ते परिणामजन्य (Effective). सृजनात्मक वाचन आणि लेखन घडून यायचे असेल तर समाज हा व्यक्तिस्वातंत्र्य, विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्याने युक्त हवा. स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, धर्मनिरपेक्षता, विज्ञाननिष्ठा, सहिष्णुता, सद्भाव इत्यादी मूल्य व्यवस्थेची कदर करणाच्या समाजातच नवनिर्मितीच्या संभावता असतात, हे आपणास विसरुन चालणार नाही. सृजनात्मक लेखन हे सृजनात्मक वाचन शक्यतेवर अवलंबून असते. जिथे स्वातंत्र्यमूल्य लोपते तिथे सृजन ऱ्हास अटळ असतो.
५.८.२ सृजनात्मक वाचन सोपान (stages of Creative Reading)
 सृजनात्मक वाचन घडून यायचे तर वाचकास वेगवेगळ्या प्रक्रिया नि पाय-या ओलांडाव्या लागत असतात. त्यात दृष्यात्मकता, लेखन प्रकटीकरण, मौखिक वा सांगितिक प्रतिपादन, नाट्यीकरण इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव असतो. दृष्यात्मकता, नाट्यीकरण इ. मधून चरित्र, पात्र समजणे सुलभ असते. त्यातून चरित्र गुण समजण्यास तसेच त्यांचे विश्लेषण, आचरण शक्य असते. संगीत, स्वर, ताल, नाद तसेच अभिवाचन वा संवादातील आरोह-अवरोह यातून भाव प्रगटीकरण व विचारप्रभाव वर्धन शक्य होते. या सर्वांच्या एकत्रित प्रभावामुळे वाच्य सामुग्रीचे आकलन सुस्पष्ट होते. त्यातून नवबोध, नवअनुभूती हा सृजनात्मक वाचनाचा परिणाम असतो. म्हणून वाचन हे सोपाननिहाय घडले तर अपेक्षित परिणाम निर्माण होणे शक्य असते.
५.८.३ सृजनात्मक वाचनाचे फायदे
 सर्व प्रकारच्या वाचनांचा विचार करता सृजनात्मक वाचन हे प्रगल्भ होय. ते कौशल्य होय. ते प्रयत्नसाध्य असते. वाचन निरंतरता अशा वाचन विकासास आवश्यक बाब असते. चोखंदळ वाचकाचे वाचन आणि साहित्यिक वाचन यात हेतु आणि पद्धतीचा फरक असतो. त्यामुळे सृजनात्मक वाचनाचे अनेक लाभ असतात -
१) सृजनात्मक वाचनामुळे वाचकात वाचन अभिरूची विकसित होते. साहित्याप्रमाणे वाचन हे अभिजात या अंगाने विशिष्ट स्वरूप, कार्य, पद्धतीचे असते.
२) सृजनात्मक वाचन ही गंभीर व हेतुपूर्वक प्रक्रिया असल्यामुळे वाचकाच्या साहित्यिक व्यक्तिमत्वात ज्ञानसंपादन, विश्लेषण, संश्लेषणविषयक नवकौशल्य नि वृत्तींचा विकास होणे स्वाभाविक असते.
३) सृजनात्मक वाचनाचा सर्वात मोठा फायदा जर कोणता असेल तर व्यक्तीचे उदारमतवादी बनणे होय. स्वच्छंद विचारानेच ते शक्य होते. उदारमतवादी व्यक्ती म्हणजे सर्वसमावेश शक्यतांची सहिष्णूता होय.
४) सृजनात्मक वाचनामुळे गहन विचार, सर्वांगी विश्लेषण, प्रखर तार्किकता जन्माला येते.
५) प्रश्नांचा निरास होणे, शंका समाधान, जिज्ञासावर्धन हे सृजनात्मक वाचनाचे मोठे फायदे होत.
६) बहुतार्किक बुद्धिमत्ता विकास हे सृजनात्मक वाचनाचे खरे अपत्य होय.
७) एका प्रश्नाचा सर्वांगीण विचार सृजनात्मक वाचनामुळेच शक्य असतो.
८) विश्वाचे सम्यकरूपदर्शन सृजनात्मक वाचनाने संभनीय ठरते.
९) बहुआयामी कल्पनाविकास वा भविष्यलक्ष्यी स्वप्नांची वा शोधांची निर्मिती सृजनात्मक वाचनामुळे शक्य होते.
१०) संवेदनशीलता, परकाया प्रवेश, वस्तुनिष्ठ जीवन व्यवहार, सहअस्तित्व इ. समाजशील गुण निवृत्तींचा विकास ही सृजनशील वाचनाची फलनिष्पत्ती होय.
५.८.४ सृजनात्मक वाचनाने निर्माण होणारी कौशल्ये
 सृजनात्मक वाचनाच्या सरावाने वाचकात काही विशिष्ट कौशल्ये विकसित होतात. ती सर्वसाधारण वाचकात आढळणे दुरापास्त असते. जो सृजनात्मक वाचन करण्यात सराईत होतो, त्यात खालील कौशल्ये आढळतात -
१) आपण वाचनाने काय मिळवू शकतो ते ठरवता येते.
२) का वाचायचे ते वाचनापूर्वी निश्चित करू शकतो.
३) मुखपृष्ठ, मलपृष्ठ (blurb) वाचून पुस्तक वाचनासंबंधीचे पूर्वानुमान करू शकतो.
४) प्रस्तावना वाचून पुस्तकासंबंधी मानसिक तयारी करू शकतो. विषयवस्तुचे आकलन यामुळे सुलभ होते.
५) पुस्तकाच्या विषयवस्तुचे प्रकरणनिहाय विभाजनावर डोळे फिरवून पुस्तकाच्या मजकुराच्या दर्जाचा अंदाज येतो.
६) पुस्तकाच्या सर्वंकष दर्जाचे भान झाल्याने पुस्तक समग्र वाचायचे, निवडक वाचायचे की सोडून द्यायचे याचा आपण निर्णय करू शकतो. त्यामुळे श्रम व वेळ यांची बचत होते.
७) पुस्तकाच्या प्रभाव व परिणामांचे आकलन शक्य होते.
८) पुस्तक मजकूर, दर्जा, चित्रे, आलेख, सांख्यिकी माहिती इ. द्वारे पुस्तकाची उपयुक्तता, अनुपयुक्तता वाचनापूर्वी लक्षात येते.
९) लेखकाचा वकुब वा क्षमतेचे मूल्यमापन शक्य होते.
१०) पुस्तक हाती येताच त्याचे वाचनमूल्य, महत्व इ. चा अंदाज बांधणे शक्य होते.
५.८.५ सृजनात्मक वाचन प्रक्रिया
 सृजनात्मक वाचन प्रक्रिया तीन अवस्थांमधून विकसित होत असते -
१) विकासात्मक प्रक्रिया (Development Process)
२) आकलन प्रक्रिया (Comprehension Process)
३) ज्ञानात्मक प्रक्रिया (Cognative Process)
१) विकासात्मक प्रक्रिया : ही सृजनात्मक वाचन विकासाची प्राथमिक वा सरळ प्रक्रिया होय. यात अर्थग्रहण, स्थित्यंतर, आशय, देवाणघेवाण (Interaction), इतिहास इ. घटकांचा समावेश असतो. या प्रक्रियेत अर्थग्रहणानंतर आशयाकडे वाचक वळतो. तो स्वत:शी प्रश्न करत संहिता वा पाठ्यसामुग्री (Text) समजून घेतो.
२) आकलन प्रक्रिया : अर्थ विकास झाल्यानंतर आकलन, रसग्रहण, विश्लेषण इत्यादी बाबींना महत्व येते. स्मरण, उदाहरणे, दृष्टिकोन समजून घेणे, संकल्पनांचे विश्लेषण या मार्गे वाचक लिखित सामग्री अधिक खोलात जाऊन समजून घेतो.
३) ज्ञानात्मक प्रक्रिया : व्यक्तिगत क्षमतेच्या आधारे पाठ्यसामग्री अन्वय (अर्थ नव्हे!) लावणे, संदर्भासह आशय समजून घेणे (मिथक, रुपक, अलंकारार्थ इ.), पूर्वानुभवाधारे मजकूर बोधन, मजकूर गाभा लक्षात घेणे यातून अर्थ ते आशय, वक्तव्य ते लक्षार्थ, ध्वन्यार्थ इ.चा प्रवास या प्रक्रियेत घडतो.
  या तीनही अवस्थांमधून सृजनात्मक वाचन परिपक्व, अर्थगर्भ, आशय गर्भ होत सृजनक्षम बनते. सृजनात्मक वाचन हे वाचनाच्या विविध प्रकारातील सर्वश्रेष्ठ दर्जाचे वाचन एवढ्याच करिता मानले जाते की अशा वाचनाची इति:श्री नवनिर्मिती असते. सृजनात्मक वाचनवृत्ती वाचकात (विशेषतः साहित्यिक, कलाकार, संगीतकार इ.) उपजत असते. वाचनाने त्या क्षमतेचा चरमोत्कर्ष विकास या वाचनाने शक्य होतो. सृजनात्मक वाचनाचा प्रारंभ जिज्ञासेने होतो तर त्याची फलश्रुती निर्मितीने होते. निर्मितीतून नवे सृजनात्मक वाचन जन्माला येते. या शृंखलाबद्धतेमुळे सृजनात्मक वाचन ही अखंड विकासप्रक्रियाच होय. शिक्षण घेण्याच्या काळात विद्याथ्र्यांत सृजनात्मक वाचन कौशल्याचा विकास घडेल तर ज्ञानरचनावादी शिक्षण सार्थक ठरेल. निर्मिती ही जर ज्ञानाची कसोटी मानू तर सृजनात्मक वाचन त्याचे साधन ठरेल. सृजनात्मक वाचनाचा चरमोत्कर्ष नसतो पण निरंतरता ही तिची कसोटी असते. ती जिथे थांबेल तिथे निर्मिती थांबली असे समजावे.
 साहित्यिक अनेक उद्देशांनी वाचन करीत असतो. तो निखळ आनंदासाठी वाचतो. आपले लेखन समृद्ध करण्यासाठी त्याचे औपचारिक, अनौपचारिक वाचन सुरू असते. लेखनात नव्या कल्पना, पात्रे, बीजे, विचार, शैली यावी म्हणून तो वाचत असतो. स्वत:ला नव्या पद्धतीने, नवे काही लिहिता यावे म्हणूनही तो वाचत रहात असतो. नवशक्यतांच्या शोधार्थ त्याचे वाचन सुरू असते. लेखन नवे शिकण्यासाठी म्हणून पण वाचतो. या सर्व प्रकारच्या वाचनातून त्यास काही हाती येत रहातं. त्यातून त्यास नवी प्रेरणा, ऊर्जा, कल्पना, विचार मिळतो आणि त्यातून लेखकाचं साहित्य सृजन होतं. असं सृजनात्मक वाचन त्याला निर्दोष करत रहातं. नव्या जिज्ञासा, संकल्पांची नवं क्षितीज त्याला सृजनार्थ केलेल्या वाचनातून हाती येत असतात.
  वाचक या भूमिकेतला लेखक नित्य नव्याच्या शोधात असतो. हा शोधाचा ध्यास त्याला नित्य सजग, सक्रिय वाचक बनवतो. मग अनेक शंका, कुशंकांचे ढग दूर होण्यास अशा वाचनातून लेखकास मदत होत रहाते. लेखन आणि वाचन ह्या परस्परपूरक अशा सजीव प्रक्रिया होत. लेखन, विचार, कल्पना यातून आकार घेत रहातात. समकालीनांचं वाचन साहित्यिक अधिक सजगपणे करत स्वत:चं लेखन वेगळे बनविण्याचा प्रयत्न करत असतो. चालू असलेलं हातातलं लेखन अधिक कलात्मक, नवं व्हावं असाही त्याचा प्रयत्न असतो. म्हणूनही तो वाचत असतो.
  आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपण साहित्याशी एकरूप होत असतो. त्यातल्या प्रत्येक शब्द, वाक्य, संकल्पनेवर आपलं लक्ष केंद्रित असतं. आपण जेव्हा मन:पूर्वक, साहित्याशी एकरूप होऊन वाचत असतो, तेव्हा त्या वाचनाचा प्रभाव, परिणाम किती विविध रूपांनी आपल्यावर होत रहातो म्हणून सांगू? पुस्तकातील दृष्य वा प्रतिमा मूर्त होतात. त्यातील भाव आपणास प्रभावित करतात. वाचताना हर्ष, शोक, आश्चर्य, शृंगार, भक्ती, निर्वेद सारे भाव प्रसंगपरत्वे आपल्यात निर्माण होतात. वाचताना आपण हसतो तसे रडतोही. आनंदी होतो, तद्वत दुःखीही! इतकं सर्व असूनही आपण वाचत रहातो. कारण जिज्ञासा, ओढ आपणास पुस्तकाशी बांधून ठेवते. ताणतणाव, भय, सारं असतं, तरी आपण सैल, शिथिल होण्यासाठी वाचतो. कारण वाचनात एक उपजत प्रेरणा असते. ही आपल्यातला वाचक जिवंत ठेवते. असं वाचन आपली अन्तर्दृष्टी विकसित करते.
  म्हणून मग आपण कथा, कादंबरी, काव्य, नाटक, निबंध असं बहुरूप वाचन करत रहातो. या प्रत्येक प्रकारचं स्वत:चं असं वाचकांना बांधून ठेवणारं बलस्थल असतं. वाचन हा गुंतवून ठेवणारा छंद, खेळ आहे खरा! वास्तव नि कल्पनांचा सुमेळ वाचन घडवून आणतं. म्हणून मग साहित्यही तसं निर्माण होतं. गद्य, पद्य दोन्ही शैली वाचकास समानपणे रिझवतात. म्हणून तो हाती येईल ते नि कधी निवडूनही, शोधून वाचत रहातो.
५.९ वाचन अध्यापन (Teaching of Reading)
  वाचन म्हणजे लिखिताचे आकलन. ही एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यात ज्ञान, बोध आणि विचार यांचा संयुक्त प्रभाव नि परिणाम असतो. वाचनात मुख्यत: दोन गोष्टी घडणे आवश्यक असते - १) अक्षर ओळख वा मूळाक्षर परिचय (Alphabet Recognition), २) अक्षराचे आकलन (अक्षरांचा विशिष्ट बोध), विशिष्ट उच्चार झाल्यावर विशिष्ट अक्षर/वर्ण लिहिणे ही वाचनाची पूर्वअट असते. नंतर मग अक्षर बोध होतो. म्हणजे विशिष्ट उच्चार झाल्यावर विशिष्ट मूळाक्षर लिहिणे. त्यानंतर शब्द ओळख, वर्ण, शब्द, वाक्य असा लेखन क्रम उच्चार शिकण्याबरोबर समांतर शिकत रहावा लागतो. प्राथमिक अवस्थेत वाचन अध्यापन हे अनुकरण (उच्चाराची नक्कल) आणि अनुलेखन (गिरवणे) या पद्धतीने होते पण त्यासाठी वस्तु व अक्षर, शब्द यांचे समायोजन आवश्यक असते. 'अ' अननसाचा, ‘आ' आईचा हे पहिल्यांदा समजावे लागते. म्हणजे लक्षात आणून द्यावे लागते. प्राथमिक वाचन, लेखन या हेतुतः घडवून, वदवून घ्यायच्या क्रिया होत. त्या वारंवार करून नोंदवाव्या (खरे तर गोंदवाव्या लागतात. मुलांना वा प्रौढ निरक्षरांना वाचन शिकवणे यात त्यांच्या पूर्वज्ञानाचा वापर महत्वाचा. पूर्वज्ञान आणि अनुभवास मूळाक्षर लेखन आणि उच्चारण जोडणे म्हणजे प्राथमिक वाचन अध्यापन होय.
 इथे एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की औपचारिक वाचन शिकणारे मूल वा निरक्षर प्रौढ मौखिक भाषा अनौपचारिकरित्या त्यापूर्वी शिकलेला असतो. वाचन अध्यापन हा औपचारिक संवाद खरा. पण तत्पूर्वी बालक काही एक मौखिक शब्द संपदा, भाषा शिकलेला असतो. शिक्षकाचे कार्य पूर्वग्रहण केलेल्या मौखिक शब्द, वाक्य इ. भाषा घटकांना शास्त्रीय पद्धतीने लेखन व उच्चारण शिकवणे. हे अत्यंत संयमाचे कार्य असते. आई नि कुटुंब घटक (भाऊ, बहिण, मित्र इ.) जे अनौपचारिक व मौखिक कार्य करत असतात; त्यास लेखन, उच्चारणाची जोड देत प्राप्त ज्ञान विस्तार करणे म्हणजे वाचन विकास होय. ते कार्य वाचन अध्यापनातून शिक्षक करत असतो.
५.९.१ वाचनाचे प्राथमिक घटक (Elements of Basic Reading)
 वाचन हा साक्षरतेचा पाया होय. बालक वा नवसाक्षरास पूर्वग्रहण केलेल्या मौखिक भाषेस लेखन व उच्चारण कौशल्याची जोड देत वाचन विकसित होत असते. ओजपूर्ण वा गतिमान वाचन (Fluent Reading) ही ताबडतोब घडून येणारी गोष्ट नव्हे. त्यासाठी सराव आवश्यक असतो. तो विविधांगी जितका होईल तितका वाचन, लेखनाचा पाया मजबूत होत असतो. त्यासाठी वाचनाचे मूलभूत घटक समजून घेणे आवश्यक असते.वाचनाचे प्राथमिक घटक पुढीलप्रमाणे आहेत १) अक्षर ओळख (Alphabet Recognition)

  वाचनाचे दोन मूळ घटक असतात- शब्दबोध नि आकलन. त्याचा प्रारंभ मूळाक्षर परिचयाने होत असतो. हे अध्यापन अंकलिपी, तक्ता, स्लाईड्स, वस्तू इत्यादीद्वारे आणि उच्चार नि लेखन (गिरवणे) माध्यमातून सुलभपणे सुगम होत असते. मूळाक्षर ओळख ही वाचनाची पहिली पायरी होय. ती सराव वा वारंवारीतेतून (Practice) विकसित होत असते. ही प्रक्रिया संयुक्त नि समान्तर घडून यावी लागते. ती कष्टसाध्य असते. शिवाय वेळखाऊ. प्रत्येक विद्याथ्र्यांची ग्रहणक्षमता त्याच्या बुद्ध्यांकावर वा आकलन क्षमतेवर अवलंबून असते. ती भिन्न व कमी-अधिक असते. त्यामुळे व्यक्तिगत लक्ष व व्यक्तिगत सराव, स्वाध्याय महत्वाचा असतो.

२. उच्चार (Fonics)

 वाचन ही लेखन, उच्चारणाची संयुक्त क्रिया असते. प्राथमिक स्तरावर आकलनापेक्षा मूळाक्षर ओळख व नोंद महत्वाची. त्यात उच्चारणाचे महत्व असाधारण असते. मुले मौखिक भाषा घेऊन बालवाडीत वा शाळेत येत असतात. ती भाषा वा कौशल्य पूर्णपणे विकसित नसते. बोबडे, तोतरे बोल, उच्चार शास्त्रशुद्ध व व्याकरणसंमत करणे हे शिक्षकाचे खरे काम असते. ते उच्चार, खोकमपट्टी, श्रवण, अनुउच्चारणातून व लेखनाला उच्चारणाची जोड देत संयुक्त आणि समांतर होत रहाण्याने अक्षर (वर्ण -स्वर, व्यंजन), शब्द (बहुवर्ण, काना, मात्रा, वेलांटी, उकार, विसर्ग इ.) वाक्य (पदक्रम) असा टप्प्याटप्प्याने घडवून, घटवून घेणे आवश्यक असते. भाषाशास्त्रानुसार ही प्राथमिक व मूलभूत गोष्ट होय. उच्चारण हा लिखिताचा ध्वनीबोध असतो. वाचन, लेखनाच्या सार्वत्रिकीकरणातून भाषा संवादाचे माध्यम बनते. कारण सर्वजण विशिष्ट अक्षर, शब्द, वाक्य यांचा विशिष्ट बोध ग्रहण करून व्यवहारात । त्याचा समान वापर, व्यवहार करत असतात. भाषा ही प्रक्रिया जशी आहे तशी ती व्यवस्थाही आहे (Process and System) हे विसरून चालणार नाही. उच्चार भेदातून वर्ण व वर्ण वैविध्यातून जीवनातील विविध वस्तू, क्रिया इ.ना विविध संकेत प्राप्त होतात. असे संकेत समूह, वा शब्दसंग्रह ही भाषेची खरी संपत्ती. जितका शब्दसंग्रह अधिक, तितकी भाषा समृद्ध. प्रत्येक वर्ण (स्वर, व्यंजन) वा मातृका (Alfabet Or Syllables) भिन्न होतात त्या भिन्न ध्वनी बोधातून (उच्चारण). पुढे मग त्यांना सहअस्तित्वाने (स्वर+वर्ण (एक वा अनेक) शब्दकळा प्राप्त होऊन अर्थधारणा होते. उदाहरणार्थ‘कमळ' शब्द तीन भिन्न वर्ण, लेखन व उच्चारणसमूह (संयोग) असून ते एका फुलाचे नाव आहे हा बोध होणे म्हणजे लेखनास अर्थ प्राप्त होणे. ही क्रिया वाचनातून घडत असते.

३) लिखित बोध
  लिखित हे हस्तलिखित, टंकित, मुद्रित अशा रूपात नवसाक्षरांपुढे येत असते. अंकलिपी, तक्ते, ठोकळे, चित्र, चित्रपट्टिका(Cards/slides), पाठ्यपुस्तक याद्वारे शिक्षक वा पालक अक्षर ओळख करून देतात. पूर्वी कुणीतरी लिहिल्या, छापल्या, टंकित केलेल्या सामुग्रीचे प्रतिबिंबन अनुकरण, सराव इत्यादीतून घडते. त्यामुळे ही सामुग्री बोधगम्य, शुद्ध, सुगम, आकर्षक असणे महत्त्वाचे असते. त्यात स्पष्टता, शास्त्रोक्त आकार, उकार, प्रमाणबद्धता यांचे सर्वमान्य रूप अनुसरणे महत्त्वाचे असते. ‘उ' आणि 'ड' चा फरक जितका महत्त्वाचा तितकाच तो ‘ज' आणि 'झ' चा, तसेच 'ल' आणि 'ळ'चा. 'ऋ', 'लु', 'ज'चे लेखन, उच्चारण महत्वाचे. शब्दात शुद्धता महत्वाची तसा क्रमही. 'कमल' आणि 'कमळ' यातील फरकातून एक व्यक्तिनाम होते तर दुसरे वस्तुनाम. लिखित बोधात सूक्ष्म फरक व भेदावर भर देऊन शिकवणे महत्वाचे असते. शुद्धलेखन हा भाषेच्या सार्वत्रिकीकरणाचा व समान बोधाचा पाया असतो, याचा विचार शिक्षकास पडता कामा नये. शिक्षकांना शुद्धलेखनात सवलत आणि सूट नसते. असेलच तर शिस्तबद्ध, शास्त्रोक्त अनुकरणाची अनिवार्यता.
४) शब्दार्थ (Semantics)
  शब्दार्थाचा संबंध हा शब्द आणि वाक्याशी असतो. यातून अर्थबोध शक्य होतो. त्यासाठी भाषा प्रयोजकास शब्दसंग्रह, अर्थभिन्नता, पदक्रम इ.चे ज्ञान आवश्यक असते. शब्दार्थ निर्मिती ही वर्णांना अर्थ येण्यातून येते. उदाहरणार्थ - ‘ज' म्हणजे जीवन. 'ल' म्हणजे लय. यातून समन्वय, संयोगाने ‘जल' शब्द तयार झाला. ज्यामुळे जगणे सुलभ होते असे द्रव्य म्हणजे 'जल' हे माणसाने अनुभवाने सिद्ध केलेले शब्दरूप. पारंपारिक प्रयोगातून (उपयोग) अर्थ प्राप्त झाला. तसाच शब्द आहे ‘खग'. 'ख' म्हणजे आकाश आणि 'ग' म्हणजे गमन. आकाशात भ्रमण करणारा तो पक्षी हा बोध असाच.
५) पदक्रम (Syntax)
 पदक्रम ही व्याकरण निर्धारित शब्दरचना असून ती क्रमबद्धतेतून आकाराला येत असते. वाक्य हा केवळ शब्दसमूह नसतो तर सार्थक क्रम असतो. 'मी आहे येणार उद्या' हा शब्दसमूह असला तरी ते वाक्य होऊ शकत नाही. कारण वाक्याची पूर्वअट अर्थबोध असते. 'मी उद्या येणार आहे' या शब्दसमूहातून व्यक्तीच्या आगमनाची सूचना मिळते. कर्ता, कर्म, क्रिया इ. चा वाक्यातील क्रम व्याकरण संमत असून त्यातूनच समान संवाद, संप्रेषण शक्य होते.
६) पूर्वज्ञान (Background Knowledge)
 प्राथमिक वाचन अध्यापनात नवसाक्षराचे मौखिक भाषाज्ञान गृहित आहे. बोलायला येत असलेल्याला वाचायला शिकवता येते. मुक्यास हा बोध संकेताने (sign) शिकवता येतो. नवसाक्षरांच्या पूर्वग्रहण केलेल्या मौखिक भाषिक सामुग्रीचे ज्ञान, भान शिक्षकास असणे आवश्यक. ते चाचणी, चाचपणी, निरीक्षण, संवाद, प्रश्नोत्तर इत्यादीतून लक्षात येते. त्या आधारे वाचन शिकवणे अपेक्षित आहे. मौखिकचा लिखिताशी समन्वय हे वाचनाचे सूत्र होय. क्रमात मौखिक प्रथम. कारण ते सोपे नि पूर्वग्रहित असते. लिखित सर्वथा नवसाक्षरासाठी नवे असते. शिक्षकाची खरी कसोटी तिथे असते.
५.९.२ वाचन अध्यापन पद्धती (Teaching Reading Methods)
 विद्यार्थ्यांना वाचायला शिकविण्याच्या पद्धती या व्यक्ती, इयत्ता, स्तर (प्राथमिक, माध्यमिक, महाविद्यालयीन, विद्यापीठीय, संशोधन इ.), विषय इत्यादी आधारे भिन्न आहेत. प्राथमिक अध्यापन (Basic Teaching of Reading) बालवयात (बालवाडी, प्राथमिक शाळा इ.) वाचन शिकवीत असताना प्रत्येक विद्यार्थ्यातील क्षमता व कौशल्य फरक (Individual Differance) लक्षात घेणे महत्वाचे असते. तसेच बालवयात वाचन नाना परीने शिकवावे लागते. उदाहरणार्थ -

हे अध्यापन वेळापत्रकात बसवणे अवघड. तद्वतच त्याचा ठोकताळाही असत नाही. ते सर्व विद्यार्थी व शिक्षक यांच्या समन्वित समझेवर ठरत असते. असे असले तरी त्याचे काही मूलभूत घटक वा पक्ष आहेत. त्यातून ते साधत असते.

 १) मौखिक (oral)
वाचन प्रारंभिक अवस्थेत मौखिक पद्धतीने, शक्य असल्यास ताल, नाद, संगीत, बडबडगीते इत्यादीतून देहबोली, हातभाव इत्यादीद्वारे रंजक पद्धतीने शिकवले गेले तर ते प्रभावी व परिणामकारक ठरते. तत्पूर्वी मात्र व्यक्तिगत अध्यापनावर भर देणे हिताचे (one to one teaching). मोठ्याने वाचन, उच्चारण व नंतर विद्यार्थ्यांनी अनुकरण करत हुबेहुब उच्चारण करणे (अनुउच्चारण/अनुवाचन) महत्त्वाचे. यात दुरुस्ती, सराव, घोकंपट्टीवर भर हवा. त्याच्या स्थिरीकरणासाठी दृक्श्राव्य साधने, तक्ते, ठोकळे, पत्ते, पुढे, पट्टिका (Slides) इत्यादीचा वापर रंजक, बोधगम्य तसाच कायमस्वरूपी अध्ययनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो.
२) दृष्यमानता (visual)
 आपण जे अक्षर, मूळाक्षर, शब्द शिकवणार त्याच्या उच्चारण, लेखनाच्या स्थिरीकरणासाठी तक्ते, ठोकळे, चित्रे, पुढे, पत्ते शिवाय पट्टिका, तालिका वापरणे, अन्य दृकश्राव्य साधनांचा वापर (रेडिओ, दूरदर्शन, प्रोजेक्टर इ.) हा तितकाच महत्वाचा. चित्रफिती, ध्वनिफिती, ऑनलाईन शब्दकोशांतील उच्चारण प्रात्यक्षिके सरावासाठी उपयुक्त ठरतात.
३) शाब्दिक (Verbal)
 शाब्दिक उच्चार, लेखन मौखिक आणि लिखित अध्ययन, अध्यापनाद्वारे अधिक प्रभावी होते. उच्चार स्पष्टता प्राथमिक वाचनात महत्त्वाची. -हस्व, दीर्घ उच्चाराचा सराव महत्त्वाचा. तो उच्चार नि लेखन दोन्ही स्तरावर भर देत व्हायला हवा. साऱ्या शुद्ध, अशुद्ध लेखनाचे भविष्य ठरते ते इथे. शिक्षकांनी इथे अधिक जागृत रहायला हवे. सूट, सवलत, दुर्लक्ष म्हणजे भाषेच्या आणिबाणीकडे मार्गक्रमण असते.
४) देहबोली (Body Language)
 प्राथमिक स्तरावरचे वाचन हे रंजक व्हायचे तर हावभाव, भावभंगिमा, उच्चारांचे आरोह-अवरोह इ. द्वारे अभिवाचन, अभिनय महत्वाचा. कायिक, वाचिक अभिनयातून अध्यापन म्हणजे देहबोलीचा विकास असतो. 'शहाणा' शब्दाच्या उच्चारण फरकातून अर्थभिन्नता निर्माण होते. यांचे शब्दलेखन एक असले तरी उच्चारण फरकाने एकाचा अर्थ समजदार' तर दुस-याचा अर्थ 'मूर्ख' होतो, हे इथे लक्षात घ्यावे.
५) तार्किक (Logical)
 प्राथमिक स्तरावर वाचन अध्यापनाच्या या घटकाचा वापर संयमित वा मर्यादित होत असला, केला जात असला तरी शिक्षकाच्या मनात सुप्तपणे याचे भान शाबूत असल्याशिवाय भेद, फरक, तुलना इ. गोष्टी शिकवता येत नाहीत. म्हणून वाचनाच्या क्रमिक विकासात टप्याटप्याने पुढे जाताना क्रम (शब्द, पद, वाक्य इ.) ठरवणे हे शिक्षकास तर्कानेच करावे लागते. त्याचा ठोकताळा नाही, नियम नाही.
५.९.३ वाचन वैविध्य
 वाचनाच्या अशा किती परी असतात म्हणून सांगू? आपणाला पुस्तक वाचता येणे ही शब्द साक्षरतेची परिणती होय; पण वाचनाने येणारे शहाणपण आले म्हणजे काय? तर आपणास माणूस, निसर्ग, भाव, चित्र इ. वाचता येणे. माणसाचा चेहरा बोलका तसे डोळेही. पाहताच माणूस सुखी, दु:खी, उदास, आनंदी असल्याचे कळते. ‘स्वारी आज खुश दिसते ?', चेहरा का काळा पडलाय?' यांसारखे संवाद माणूस वाचनच असतं. कोण कुणाकडे कोणत्या नजरेनं पाहतं ते उभयपक्षी लक्षात येतं, हे असतं भाव वाचन, पाऊस येणार ते ढग पाहताच उमगतं. ते असतं निसर्ग वाचन. आपण चित्र पाहतो नि समजतं. हे समजणं हा चित्र वाचनाचा बोध होय. एखादा माणूस चांगला नाही, असा आपण अभिप्राय देतो. ते त्याचे आपल्या लेखी चरित्र वाचनच असतं. दीर्घ निरीक्षणातून हाती आलेला हा निष्कर्ष निरंतर वाचनाचे प्रत्यंतर नव्हे का? वाचताना आपण दोन शब्दांतील, ओळींतील अर्थ वाचतो (Reading between the lines). हे काय असतं? न लिहिलेलं सूचन कळणं तुमच्या प्रगल्भ वाचनाची निशाणीच असते. संशयित आपण कसा ताडतो? तर्क हेपण अमूर्त वाचनच नव्हे का? देहबोली उमजणे हे हालचालीचे वाचनच असते. 'His eyes are reliable' असं म्हणतो सहज; पण ते वर्षांच्या अभ्यासाचं फळ असतं. मोनालिसाचं हास्य उमगणं नि बुद्धाचा चेहरा, प्रकाश रचना बदलता भाव बदलतो, हे कळणेपण छाया-प्रकाश वाचनच असतं. माणूस इतरांना वाचतो तसा स्वत:सही वाचत, जाणत असतो. ‘आज कसंसं होतंय', 'मन नहीं कर रहा है', ‘इच्छा नाही', ‘उमेद नाही' असं स्वत:बद्दल म्हणणं आत्मवाचनच. अंतरीच्या खुणा अंतर जाणे ते हेच. ‘परकाया प्रवेश' वाचनच. दुस-याला ओळखता येणं, ही मोठी संवेदन सूचकता होय. वातावरण पाहताच ते शोकाकुल आहे की हर्षोल्हासाने भरलेले आहे, ते शांतता, संगीत, लोकांचं उभं राहणं सर्वांतून उमजत राहतं, ते तुमच्या समाजशीलतेतून येतं. वाचन म्हणजे जीवन सर्वतोपरी समजणं, उमजणं. ते ज्यांना कळलं तो खरा वाचक. “जीवन त्यांना कळले हो' ते हेच.
५.१० वाचन साक्षरता आणि संस्कृती
५.१०.१ वाचन साक्षरता
 साक्षरता म्हणजे लिहिण्या-वाचण्याची क्षमता. वाचन साक्षरता म्हणजे वाचन क्षमता. ती उपजत असत नाही. ती प्रयत्नसाध्य क्षमता असते. एक तर शिकावी लागते. शिवाय वारंवार सराव केल्याने तिच्या गुणवत्तेत वाढ होते. विशेषतः बालवयात मूल जेव्हा घरी, दारी, शाळेत शिकत असते, तेव्हा अक्षर लेखन, उच्चारण, शब्द तयार करणे, गिरविणे, घोकणे, वाचणे, स्मरण करणे यांतून ती क्रमशः विकसित होत असते. शब्दार्थ संग्रह, शब्दप्रयोग, वाक्यरचना इ. कौशल्यांतून वाचन साक्षरता वृद्धिंगत होत वाचन क्षमता आकलन, आशय, तर्क, कल्पना, अन्वय इ.द्वारे प्रौढ, प्रगल्भ होत वाचक हे कौशल्य स्वत:च्या छंदातून व्यासंगापर्यंत नेतो. वाचन व्यासंग ही वाचन साक्षरतेची परिसीमा मानली जात असली, तरी एक गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे की, वाचन साक्षरता ही निरंतर प्रक्रिया आहे. ती आजीवन चालत, विकसित होत राहते. विद्यार्थ्यांच्या, पालकांच्या, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पाश्र्वभूमीचा वाचन साक्षरता निर्मिती व विकासात मोठा वाटा असतो. वाचन साक्षरता विकासात विद्याथ्र्यांच्या स्वत:च्या क्षमता, वृत्तींचे जसे योगदान असते तद्वतच ते पालक, शिक्षक, भाऊ-बहीण, मित्र यांचेपण. विद्यार्थी वाचन साक्षर होतो ते नित्यवाचन सरावातून. बालवाङ्मयाची (बडबडगीते, परिकथा, बालकथा इ.) वाचन साक्षरता वाढीत मोठी भूमिका राहते. चौथीपर्यंतची मुले वाचन साक्षर होतात. पुढे ती स्वयंसाक्षर समजली जातात. वर्तमानातील माहिती व तंत्रज्ञान (ICT) साधनांचा या साक्षरतेत मोठा वाटा असून, पूर्वीच्या तुलनेने या युगातील मुले स्वयंप्रयत्नाने वाचन साक्षर होतात. गमतीचा भाग म्हणजे इंटरनेट युगातील वर्तमान विविध अॅप्स, सॉफ्टवेअर्स व संगणक संसाधनांमुळे (Resources) वाचन साक्षरतेसाठी लिहिण्याची गरज उरली नाही. अंक, अक्षर, बोलता, ओळखता, वापरता आले की केवळ ध्वन्यात्मक आदेशांद्वारे (Voice Command) तो लिखिताचे कार्य करतो व वाचन साक्षर होतो, हे शिक्षण त्याच्या समान वा निकट वयोगटांतील सहाध्यायी, सवंगडी, भावंडे इत्यादींद्वारे मिळते.  पूर्वी वाचन साक्षरता ही लेखन-वाचनाची संयुक्त प्रक्रिया होती. नव्या तंत्रज्ञान युगातील साधन विकासामुळे लेखन, टंकन ही प्रक्रिया इतिहासजमा होऊ लागली असून, उच्चारण व आकलन समन्वय म्हणजे वाचन साक्षरता झाली आहे. शिवाय ही साक्षरता आता बहुआयामी (Multi Literacy) होते आहे. उच्चारण, आकलन, पाहणे, ऐकणे (दृक-श्राव्य फिती, क्लिप्स, पट इ.) आता वाचन साक्षरतेस बहुविध साक्षरतेचे (Multi Literacy) रूप देत आहेत. कोणताही माणूस सर्वक्षमतासंपन्न असत नाही. त्यामुळे सहयोगी (Per) व समाज घटक यांतून बहुविध साक्षरता उगम पावली असून, ती आता व्यक्तिगत न राहता परस्परपूरक होते आहे. बहक्षम साक्षर (Multiliterate) ही नव्या पिढीची खूण व ओळख बनते आहे. कृतिशील साक्षरता (Functional Literacy) ही तंत्रज्ञान साधन विकासाचे नवे अपत्य होय. आजीवन साक्षरता (Life long Literacy) निरंतर शिक्षण गरजेतून निर्माण होत आहे. 'Reading for life' चे नवे सूत्र म्हणजे आजीवन साक्षरतेचा पाया होय. पूर्वी वाचन हे ज्ञान संपादनाचे साधन, माध्यम होते. बदलत्या परिस्थितीत वाचन हा पूर्ववत (विसाव्या शतकाचा पूर्वार्ध) शिळोप्याचा उद्योग (Reading for Pleasure and Leisure) झाला नाही तरच आश्चर्य! लिखिताच्या आकलनासाठी आज वाचन, श्रवण, पाहणे, कृती, निरीक्षण, मुद्रण, अंकीय साक्षर (Digital Literate) होणे आवश्यकच नाही, तर अनिवार्य होऊन बसले आहे. बहुविध साक्षरतेच्या आजच्या काळात माणसाचे बहुभाषी होणे, बहुकुशल असणे, बहुआयामी असणे म्हणजे अष्टावधानी, अष्टपैलू असणे काळाची गरज होय. भाषा ही ज्ञान साधन न राहता साधन प्रयोग (Use of Apps) हीच नव्या युगाची नवी साक्षरता झाली आहे. शिक्षकाचे काम आता शिकविणे नसून, सुविधा उपलब्ध करून देणारा घटक (Facilitator), असे होणे ही काळाचा ङ्कहिङ्का होङ्: शिक्षण कधी काळी chalk and Talk होते, ते आता Plug and Chug झाले आहे. आकलन, उपयोग, प्राधान्य यांवर आता साक्षरता मोजली जाईल. तंत्रकुशल माणूस हा नव्या युगाचा नवा शिल्पकार, शिलेदार राहणार ही काळ्या दगडावरची रेघ होय. ५.१०.२ वाचन संस्कृती
 संस्कृती म्हणजे रीतिरिवाज, परंपरा, प्रवृत्ती, कसोट्या, कल्पना, प्रतीके इत्यादींद्वारे समाज व व्यक्ती व्यवहाराचे व्यवस्थापन आणि नियंत्रण होय. समाजातील व्यक्ती या सर्वांचे पालन करून त्यांना एकप्रकारे मान्यताच देत असतात. एखाद्या व्यक्तीस जेव्हा आपण ‘सुसंस्कृत मनुष्य' अथवा ‘उच्चभ्रू' (High Brow) अशी संज्ञा देतो, तेव्हा त्याचा अर्थ ती व्यक्ती सांस्कृतिक परंपरांचे काटेकोर पालन करणारी म्हणून त्यांचा गौरवपूर्ण उल्लेख करत असतो. वाचन संस्कृतीतही हे अभिप्रेत असते. वाचन संस्कृतीचा सदस्य समाज साक्षर असतो. त्यास सुशिक्षित, प्रगल्भ करणे हे वाचन संस्कृतीचे ध्येय असते. वाचन संस्कृतीची व्याख्या करताना म्हटले गेले आहे की, 'Reading culture is a climate in which all the society is expected and encouraged to read.'
 वाचन संस्कृतीत वाचनसापेक्ष सकारात्मक वातावरण निर्मितीस असाधारण महत्त्व असते. वाचन संस्कृतीचे कार्य नवोदित वाचक पिढीस वाचन संस्कार देणे, रुजविणे असते. तिचा प्रारंभ वाचनाचे प्राथमिक धडे देण्यातून होतो. वाचन संस्कृती ही निरंतर विकसित होणारी अशी समाजव्यवस्था आहे. लेखक, वाचक, विद्यार्थी, शिक्षक, पालक, प्रकाशक, माध्यमे, ग्रंथालये, समाजातील सर्व घटक तिचे स्वयंभू सदस्य असतात. वाचन संस्कृती टिकावी म्हणून शाळा, महाविद्यालये, माध्यमे, प्रकाशन, शासन, ग्रंथालये सर्वतोपरी प्रयत्न करीत असतात. वाचनालय चालविणे, ग्रंथालय सुविधा उभारणे, चर्चासत्रे, वाचक मेळावे, पुस्तक जत्रा, पुस्तक प्रदर्शने, ग्रंथोत्सव, पुस्तक प्रकाशन समारंभ योजणे, वाचन-लेखन स्पर्धांचे आयोजन यांतून वाचन संस्कृतीच्या प्रचार, प्रसारास बळ मिळत असते. भाषांतर, समीक्षणे, संपादन, प्रकाशन, अभ्यास, संशोधन यांतून वाचन संस्कृती नवा चेहरा नित्य धारण करीत असते. वाचन संस्कृतीतूनच सुशिक्षित समाज निर्माण होतो. वाचनाची आवड, सवड आणि सवय निर्माण करणे हे वाचन संस्कृतीचे मूळ कार्य होय.
 वाचन संस्कृती केवळ वाचन संस्कारच रुजवत नाही, तर वाचन प्रक्रिया, वाचन पट, वाचन वेग इत्यादींबद्दल वाचकांत जाणीवजागृती निर्माण करून वाचन निर्दोष व कौशल्यपूर्ण बनविण्याचा प्रयत्न करत असते. वाचन साक्षरता प्रचार करण्याचे कार्य वाचन संस्कृतीतून घडत असते. संस्कृती ही तशी अदृश्य गोष्ट असली तरी तिचे परिणाम मात्र दृश्य नि अनुभवजन्य असतात. वाचनातून घडणाच्या शिक्षण, ज्ञानप्रसार, माहिती प्रसारण, विचार विस्तार यांची प्रचिती आपणास व्यक्तीघडण, विकासातून येते, तशी ती समाज जागृतीतूनही प्रत्ययास येत असते. वाचन संस्कृतीतून वाचकाचा वृत्ती विकास घडून तो प्रगल्भ, कुशाग्र नागरिक बनतो. मानवी मूल्यांचे बीजारोपण करण्याचे महत्त्वाचे कार्य वाचन संस्कृतीतून होते. वाचन संस्कृती भौतिकापेक्षा अभिभौतिक गोष्टींचा विकास घडवून आणत असल्याने समाज विकासात या संस्कृतीचे योगदान असाधारण ठरते. वाचन संस्कृती सुशिक्षित जीवनशैलीचा मार्ग आखून देत असल्याने ती मानवी बदलाचे मोठे साधन बनून समोर येते. मानव संसाधन विकासाचे माध्यम म्हणून वाचन संस्कृतीकडे पाहता येते. ही संस्कृती आदर्श केंद्री असते. तिचे लक्ष्य नेहमीच विधायक राहात आले आहे. मानवी विकासातून समाज स्थित्यंतर आणि परिवर्तन हा या संस्कृतीचा मोठा पायाच होय. मानवी समाज जीवनात स्वातंत्र्य, बंधुता, समता, धर्मनिरपेक्षता, लोकशाहीसारख्या जीवनमूल्यांची पेरणी वाचन संस्कृतीतून । होत राहिल्याने समाज पुरोगामी होतो. भाषा, साहित्य, लिपी इत्यादींचा विकास हे तर वाचन संस्कृतीचे प्रमुख कार्य. ते ती विविध उपक्रमांतून (लेखक, मुलाखत, साहित्य चर्चा, अभिवाचन इत्यादी) घडवून आणते. भारतासारख्या बहुभाषी, बहवंशीय, बहुसांस्कृतिक देशात वाचन संस्कृती एकात्मता, सहिष्णुता, सर्वधर्मसमभाव निर्माण करण्याचे कार्य म्हणजे राष्ट्रीय कर्तव्यपरायणताच नव्हे का? A society is organised group of individuals. A culture is an organised group of learned responses. The individual is living organism capable of independent thought feeling and action, but with his independance limited and all his resources profoundly modified by contact with the society and culture in which he develops. राल्फ लिंटनचे हे विचार वाचन संस्कृतीस पूरक आहेत.
५.११ वाचनाचे महत्त्व
 जीवनात वाचनाचे असाधारण महत्त्व असते, ते वाचनामुळे माणूस आणि जग बदलते म्हणून. वाचन केवळ लिखिताचं उच्चारण असत नाही, तर तो बुद्धी, तर्क, भावना, स्मरण, भाषा, लिपी, आकलन इत्यादींचा सुमेळ असतो. वाचनामुळे मनुष्य भावसाक्षर होतो तसा ज्ञानसंपन्नही! वाचनामुळे जीवनाकडे विधायक दृष्टीने पाहत माणूस आतून, बाहेरून बदलून जातो. परिवर्तनाची, वाचनाची जी ऊर्जा नि शक्यता असते, त्यामुळे वाचनाचे महत्त्व आहे. हजारो वर्षांच्या सृष्टी, संस्कृती विकासात वाचनाचे जे योगदान आहे त्यामुळेच नव प्रांत, साधन, माध्यम, कला, विज्ञान, संस्कृतीचा शोध लागला आणि वनमानुष्य जगनियंत्रक बनला. जगाचा शोध नि बोध ही केवळ वाचन किमया होय.
  माणसाच्या कल्पना नि तर्क विकासात वाचन हे महत्त्वाची भूमिका बजावते. पूर्वीचे सारे साहित्य कल्पनाप्रचूर असायचे. कवीने चंद्राची सफर करणारी कविता काय लिहिली नि वैज्ञानिकांनी चांद्रयान बनविले. वाचनामुळे माणूस जगाच्या संपर्कात येतो. जग, समाजाशी जोडला जातो. त्याची माहिती होऊन मनुष्य ते अधिक वास्तव, सुंदर नि निर्दोष करण्याचा प्रयत्न करतो.'सत्यं, शिवं, सुंदरम्' म्हणजे दुसरे काय असते? एक माणूस दुस-याचा होण्याची कला नि किमया केवळ वाचनामुळे शक्य होते. 'परकाया प्रवेश (Empathy) ही संकल्पना दुस-याचं जीवन आपलं बनवून त्याला यथाशक्य साहाय्य करण्याचाच प्रयत्न ना? 'Be a change' म्हणजे नुसतं परिवर्तन नाही, तर दुस-याचं कुणी तरी होणं, बनणं असतं. यातूनच समूह भावना जन्माला येते. त्यातून समाज बांधला जातो. समाजातून संस्कृती आकाराला येते. संस्कृती माणसाचं जीवन सुसह्य बनविते; पण त्यासाठी साहित्य, समाज, संस्कृतीसंबंधी पुस्तके, ग्रंथ यांचं नुसतं वाचन नाही तर पारायण व्हायला हवं. पारायण म्हणजे एखादा ग्रंथ साद्यंत वाचणं, वारंवार वाचणं नि त्याचा मतितार्थ जाणून तसा आचारधर्म बनविणं. सत्संग म्हणजे केवळ सहवास, सहनिवास नाही, तर साहचर्याने सद्गुण आत्मसात करणे. गुणावगुण भेदाचं भान वाचन देतं. संस्कृती निरंतर परिवर्तनशील राहते. कारण माणूस बदलत, विकसित होत राहतो. त्याचा आधार असतो वाचनाने येणारी जाण.
 संस्कृतीची मूळे असतात भावनाशील, संवेदनशील माणसांच्या मना-हृदयात. हे भाव माणसात जागविण्याचे कार्य साहित्य करतं. म्हणून सुजाण माणसं 'प्रसंगी अखंडित वाचित जावे चा घोष लावत वाचत राहतात. 'परदुःख शीतल' हे न वाचणा-यांसाठी. संत नरसिंह मेहतांना ती मात्र आपली वाटते. त्याचं कारण त्यांची समाजशील वृत्ती जी काव्य लेखनातून, संत साहित्याच्या अभ्यासातून उदय पावली होती? 'डोळ्यात वाच माझ्या गीत भावनांचे म्हणणारा कवी भाव वाचनाची साक्षरताच रुजवितो ना? लिखितपूर्व काळातपण माणूस वाचायचाच. पुस्तकं नसली तरी देहबोली होतीच. पुस्तकासारखे भाव, विचार, आचार संक्रमणाचे दुसरे साधन नाही. तुम्ही माणूस होऊ इच्छिताना, मग वाचन अनिवार्यच! हे हृदयीचे ते हृदयी वाचनामुळेच शक्य होते.  आजच्या काळात मनुष्य एकाच वेळी शाप नि वरदानाचा लपंडाव खेळतो आहे. विज्ञानाने पाणी, वीज, यंत्र यांमधून इतकी साधनं विकसित केली आहेत की, माणसाचं घर हे घर आहे की यंत्रशाळा अशी शंका यावी. प्रत्येक साधन वरदान खरं; पण वाचून सतर्कतेने वापराल, तर वीज प्रकाश देते; पण 'विजेचा प्रवाह तारेतून वाहतो आहे,' वाचता येणारा वाचतो, मुकी जनावरं मात्र विजेच्या धक्क्याने मृत्युमुखी पडतात, तशी अडाणी माणसंही. वाचता येणं म्हणजे संकटापासून सुरक्षित राहणं. लेखन, वाचन ही वर्तमानातली संपर्क साधनं. या काळात वाचता न येणं म्हणजे जिवंत मरण स्वीकारणं होय. 'वाचाल तर वाचाल चा अर्थ काय? समाजाशी जोडून, जुळून राहायचं तर वाचता आलंच पाहिजे. भाषेशिवाय माणूस मुका. 'इथे बोलणा-याची माती विकते, न बोलणा-याचे मोती विकले जाणे दुरापास्त.' अशी भाषाशक्ती वाचनाशिवाय प्राप्त कशी होणार? शब्दाचं सामर्थ्य काय वर्णावं? 'आम्हा घरी धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रे यत्न करू' म्हणणारे संत तुकाराम तुम्हाला वाचनास पर्याय नाही हेच शिकवितात. अभंग, गझल, पोवाडे, लावणी सर्व काव्य प्रकार वाचत आपणास शब्दसौंदर्याची जाणीव होते व आपण वाचता वाचता शब्दप्रभू होतो. शब्दसामर्थ्य ही वाचन साधनेची फलश्रुतीच होय. चपखल शब्दप्रयोग हे ग. दि. माडगूळकरांच्या 'गीतरामायण'चे बलस्थान. त्यांनी केलेलं वाचन इतकं अफाट होतं की, गीत रचताना अनेक शब्द त्यांच्यापुढे 'मला घ्या, मला घ्या' म्हणून अर्जवत उभे ठाकत. हे वाचनाच्या ब्रह्मराक्षसी तपश्चर्येशिवाय अशक्य. 'proper thing for proper place' अशी व्यवस्था साहित्य व्यवहारात वाचन साधनेतूनच शक्य होते. वि. स. खांडेकरांची वाक्ये म्हणजे सुभाषितांची शृंखला असते नि अलंकारांचं नर्तन! हा चमत्कार जन्मतो वाचन जिज्ञासेतून व निरंतरतेतून.
 गांजलेल्या माणसांना जगण्याचं बळ देणारी आत्मकथने, अनुभवकथने वाचल्याने कित्येकांच्या आत्महत्या वाचल्या. अनेकांसाठी ती प्रेरणस्रोत बनली. हे असतं वाचन सामर्थ्य. 'Word makes sense of world' या विधानातून हेच तर सूचित होतं. 'वाचाल तर हसाल' म्हणजे काय? वाचा नि सुखी व्हा. मात्र असं वाचन एकाग्र हवं. पलायनवाद, निराशा, उदासी दूर व्हायची, तर हास्यरसपूर्ण कविता वाचावी. पु. ल. देशपांडे, आचार्य अत्रे यांचं साहित्य म्हणजे दुःस्वास बहिष्कृत करणं नि जीवन आनंदी बनवणं. वाचन माणसाला सकारात्मक बनवतं तसं सक्रियही. आपण आपलं आयुष्य लोळत काढतो, याची जाणीव आळशास करून देते की उद्योगशील माणसाची कष्टकथा. 'रिकामं मन भुताचं घर' होऊ द्यायचं नसेल तर त्यावर पुस्तक वाचनासारखा दुसरा उपाय, उतारा नाही. ज्या कुणाला दुस-याचं जीवन सुखी नि समृद्ध करायचं आहे, त्यानं पुस्तक भेट द्यावीत. एक पुस्तक हजारोंचं जीवन बदलतं ते 'एक होता कार्व्हर'नी दाखवून दिलं आहे. भाषा शिक्षण वाचनाशिवाय अशक्य. गुणवत्ता, यश, ज्ञानसंपादन, प्रावीण्य वाचनाशिवाय कसं शक्य आहे? वाचनाने माणसास दोषांची जाणीव होऊन त्यांचा निरास होतो, तद्वतच गुणांचा गुणाकार केवळ वाचनच घडवून आणू शकतो. वाचनास डोळे उघडण्याचं साधन नि हृदयाची खिडकी का म्हटलं जातं ते समजून घ्यायचं, तर आइन्स्टाइनच्या बरोबरीने सानेगुरुजीही वाचले पाहिजेत. भूत, वर्तमान नि भविष्याची सांधेजोड़ वाचनाशिवाय कशी शक्य आहे? कितीतरी तुरुंगांनी ग्रंथ व वाचन विकासात भर घातली. त्यांचा एकदा इतिहास लिहायला हवा. म्हणजे मग नेल्सन मंडेला, महात्मा गांधी, आचार्य विनोबा भावे, पंडित जवाहरलाल नेहरू यांचं वाचनवेड उजेडात येईल. या सर्वांना तुरुंगवास वरदान ठरला तो या तुरुंगवासाने त्यांना वाचन उसंत दिली म्हणूनच.
  एखादा प्रियजन निवर्ततो नि आयुष्य खायला उठतं. अशा दिवसांत दिलासा देते ते केवळ वाचनच. वाचन संकटमोचक खरेच. भावनांचं उदात्तीकरण (Sublimation) करण्याचं साधन म्हणजे वाचन. चहाच्या पहिल्या कपाबरोबर वाचलं जाणारं वर्तमानपत्र त्याची लज्जत वाचकाशिवाय कुणास कळणार? रोज वाचल्याशिवाय झोप लागत नाही म्हणणाच्या माणसाइतका सुजाण, सूज्ञ माणूस दुसरा असूच कसा शकतो? थंडीचे कोवळे ऊन, संततधार पावसात पहुडणं, बर्फाच्छादित घरात अडकणं यांसारख्या वाचनाच्या सुंदर संधी त्या कोणत्या? सुटीचा दिवस वाचनाचा म्हणणारी माणसंच शहाणी ना? वाचन तंद्री असते. ती लागली की वाचन तुम्हाला तदरूप करतं. मग हेर थरकाप घडवून आणतो, वेताळ पिच्छा पुरवितो, परी वेड लावते, शेरलॉक जिज्ञासा निर्माण करतो, सानेगुरुजी रडवितात नि वि. आ. बुवा हसवितात. ही सारी वाचन किमयाच ना?
 सिनेमा, टी.व्ही., रेडिओपेक्षा पुस्तकच बरे ना? ते सतत तुमच्या जवळ राहतं पिच्छा पुरवितं नि तुम्हाला हवं ते करायला भाग पाडतं. पुस्तकासारखा माणसास सक्रिय करणारा, राखणारा दुसरा प्रेरक नाही. पुस्तक वाचून विसरता येत नाही. वाचनाचा भुंगा, त्याचा पिंगा, गुंजारव म्हणजे निरंतर विकास, विधायकतेचा घोष! पुस्तक वाचनासारखी सुसंगती नाही. 'सुसंगती सदा घडो' हे पुस्तकच करू जाणे. मैत्र जपावं पुस्तकांनीच. पाठराखण करावी पुस्तकांनीच. पहारा द्यावा पुस्तकांनीच. चुकीचं पाऊल पडताना जागं करतं वाचलेलं पुस्तकच. पडत्या काळात (Dark Time) हात देतात वाचलेली पुस्तके नि जोडलेले मित्र! वाचन, लेखन, विचारात स्पष्टता आणतं, मार्गदर्शन करतं. वाचन हे एखाद्या जीवनसत्वासारखं पूरक व सकस असतं. ते तुमच्या वृत्ती नि व्यवहारास सात्विक बनवतं. वाचणारी माणसं व्यसनी होत नाहीत नि व्यभिचारीपण, कारण, पुस्तक वाचन धरण, बंधन होतं.
  कितीतरी पुस्तके भीषण वास्तव चित्रित करतात. मग वाचताना लक्षात येतं की, 'अरे, आपण दु:ख म्हणून सुखच गोंजारत होतो. वाचन तुलनेत तुम्हाला तुमची जागा दाखवत जग समजावतं. म्हणून घेतला वसा टाकू नये' म्हणत निरंतर, अखंड वाचत रहायचं. मोबाईल, टी.व्ही., लॅपटॉप तुमच्या कितीही उपयोगाची साधनं असू देत. ती मिटल्यानंतर चैन, शांतता, स्वास्थ्य, समाधान देऊ शकतं केवळ वाचन. कारण ते काही मागत नाही. ती 'देना बँक' आहे. बाकी सा-या 'लेना बँक. तुरुंग नि घर यामधलं अंतर वाचन समजावतं. मग माणसं कायदा पाळू लागतात. कायदा वाचायचा असतो की पाळायचा, याचं शहाणपण वाचनानेच येतं. माणूस आज वैश्विक झाला म्हणजे काय, तर तो वैश्विक वाचू लागला व वैश्विक विचार, व्यवहार करू लागला. हे वैश्विक भान 'वसुधैव कुटुंबकम्', 'विश्वनिडम्' 'विश्व साहित्य या साच्या कल्पना वाचनाने जन्माला घातल्या. पुस्तक वाचन क्रांतीपेक्षा परिवर्तनावर विश्वास ठेवते, ते त्याचा मूल्यांवर प्रचंड विश्वास आहे म्हणून! कोणत्याही क्षेत्रातील श्रेष्ठत्व संपादन केवळ वाचनामुळेच शक्य असतं. 'विद्वान सर्वत्र पूज्यते' याचं रहस्य त्याचं वाचन श्रेष्ठत्व निर्विवाद असतं. वाचनाशिवाय उच्चता नाही नि अजेयता नाही. 'ज्याने मन जिंकले, त्याने जग जिंकले' खरे! पण मन जिंकणारा जाणकार वाचक असतो. मन जिंकण्याची कला पुस्तके शिकवितात. चकित करणारी प्रतिभा वाचन मंथनातून हाती आलेलं नवनीत ना? सही करता येत नाही. वाचता येत नाहीचा विषाद म्हणजे नाकारलं जाण्याचं शल्य! केवळ सहीनं राष्ट्र स्वतंत्र होणं म्हणजे वाचन वैभवाचा विजय! आज तर जागतिकीकरणाच्या काळात ज्ञान समाज मुक्त झालाय नि ज्ञानीही! डाऊनलोडचा ओव्हरलोड म्हणजे वाचनाचा नुसता महापूर नाही, महाप्रलय! 'महापुरे जिथे वृक्षे जाती, तिथे लव्हाळे वाचती' हे नम्रतेचं वरदान म्हणजे वाचन शहाणपण होय, ‘उथळ पाण्यास खळखळाट' नि 'संथ वाहते कृष्णामाई' या दोन निसर्गगोष्टी ख-या; पण संयम, सभ्यता, शांती, स्थितप्रज्ञता येते ती वाचन व्यवस्थेतून. येते ती वाचन व्यवस्थेतून. फळांनी लगडलेलं झाड झुकलेलं तसं वाचलेली माणसं मौन. त्यांचं न बोलणं बोलकं असतं. ते समजायला तुमचं वाचन प्रगल्भ हवं.
 वाचणारी माणसं संघटित होतात नि देश निर्माण करतात. न वाचणारी माणसं युद्धरत राहतात. दुस-या महायुद्धात होरपळलेला जपान युद्धाची भाषा करीत नाही. कारण त्यानं युद्ध वाचलेलं, पाहिलेलं, अनुभवलेलं आहे. वाचन म्हणजे मूल्य व विचार संस्कार, नैतिकता व अनैतिकता यांच्या सीमारेषा समजावतं. वाचन म्हणून मग शकुनी, कर्ण, धृतराष्ट्र, दुर्योधन, शकुंतला, दुष्यंत, कृष्ण, राम यांच्या चारित्र्याच्या सीमारेषा स्पष्ट करतं. हंस नि बदकाचा फरक उमजायचा तर वाचनाचा खोल संस्कार हवाच.
 ‘जीवन त्यांना कळले हो' म्हणत आपण ज्या साध्या समाजधुरिणांचं अनुकरण नि अनुगमन करत असतो, ते त्यांच्या चरित्र वाचनानेच ना? 'चरित्रे त्यांची पाहा जराचा अर्थ आदर्शाचे अनुकरण करा असाच असतो. जग सुंदर व्हायचं तर आदर्श उन्नत हवेत. स्वत:च्या विवेकाच्या कसोटीवर जगणारे सॉक्रेटिस, गॅलिलिओ. जग विरुद्ध असताना प्रतिबद्ध राहतात. कारण त्यांनी सत्य संपादन केलेले असते. 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही। नाही मानियले जनमता।' हे नाकारण्याचं धैर्य येतं वाचनविश्वासातून. थोरो मरणप्राय थंडीत जीव वाचविण्यासाठी कोट आणायला जातो नि पुस्तक घेऊन येतो, हे वाचनवेड नाही तर वाचनाचे महत्त्व अधोरेखित करतं. जगबुडी होत असताना पुस्तकं कवटाळणारा वाचक महाप्रलयातपण वाचण्याची ईष्र्या, आकांक्षा बाळगतो, वाचनाचा एखाद्यास इतका जीवनाधार वाटावा यासारखं पुस्तकांचं महत्त्व दुसरं कोणतं?
५.१२ वाचन वेग
 भाषा हे संपर्काचे प्रभावी साधन होय. या साधनाद्वारे मनुष्य आपले भाव, विचार, कल्पना व्यक्त करत असतो. भाषिक देवाण-घेवाणीतूनच माणूस समाजाशी संपर्क व संवाद साधतो. ऐकणे, बोलणे, वाचणे, लिहिणे ही सर्व माणसाची भाषिक कौशल्ये होत. ती कमी-अधिक प्रमाणात सर्वांमध्ये असतात. मनुष्य साक्षर झाला की त्यात वाचन क्षमता येते. तिचा वेग असतो. तो कमी-अधिक असतो. कमी आढळल्यास वाढविता येतो. वाचन वेग मोजता येतो. सर्वसाधारणपणे माणसाचा वाचन वेग दर मिनिटाला १०० ते १५० शब्द असतो, असायला हवा. वेग वाढीमुळे वेळेची बचत होते. अधिक वाचन घडून येते. आकलनक्षमता वाढीस साहाय्य होते. वाचन वेग मोजण्याचे सूत्र आहे. ते खालीलप्रमाणे -

 वेग वाढविण्याच्या शास्त्रीय चाचण्या असतात. त्याद्वारे काही कालावधीत वेग कमी असल्यास वाढविणे शक्य असते.
५.१३ वाचन आवाका
  वाचताना आपले डोळे ओळीच्या एका टोकाकडून दुस-या टोकाकडे मंद गतीने सरकत असतात. पुढच्या ओळीचे शब्द वाचण्यास ते मागे वळून परत पुढे सरकत राहतात. प्रत्येक वेळी डोळा थांबल्यावर (वाचनावर केंद्रित झाल्यावर) काही शब्द आपण वाचतो. तो आपल्या डोळ्यांचा वाचन आवाका असतो. तो साधारणपणे २।। ते ३।। सेंटिमीटर असतो. तो सरावाने वाढविता येतो. त्याच्या चाचण्या, सराव पाठ असतात. दृष्टीचा उभा-आडवा टप्पाही आपणास विकसित करता येतो. रोजच्या व्यवहारात वाहन चालविताना आपली दृष्टी जशी रस्त्याच्या मध्यभागी केंद्रित असते तसेच वाचनाचेही असते. पृष्ठाचा मध्य गृहित धरून वाचू लागलो की वाचन केंद्रित होते आणि अवाका वाढतो म्हणजे एका दृष्टिक्षेपात शब्द वाचन व आकलन क्षमतेत वाढ होते. यासाठी ही शब्द वाचन सराव चाचण्या आहेत. त्याद्वारे वाचन आवाका (span of Reading) वाढविणे शक्य असते.
५.१४ वाचन दोष
 वाचावे कसे याचे शास्त्र आहे. प्रारंभीच्या काळात याकडे दुर्लक्ष झाल्यास वाचन दोष अथवा त्रुटी निर्माण होतात. त्या खालीलप्रमाणे असतात.
१. अक्षर किंवा शब्दावर बोट ठेवून वाचणे.
२. एकावेळी एकच शब्द वाचणे.
३. वाचताना डोक्याची हालचाल एका टोकाकडून दुस-या टोकाकडे करणे.
४. एकदा वाचलेले परत वाचणे.
५. वाचताना शब्दोच्चार करणे. (मोठ्याने वाचणे)
६. वाचताना जीभ, ओठ, तोंड हालवणे. ७. वाचताना अस्पष्ट उच्चार करणे इ.
 वरील दोष लक्षात आले की, सरावाने, प्रयत्नाने सदर दोष दूर करता येतात. प्रत्येक दोष/त्रुटी दूर करायचे उपाय भिन्न असून, आदर्श वाचन काय असते, हे एकदा लक्षात आले की त्रुटी दूर करणे सोपे जाते.
५.१५ वाचन : उगम आणि विकास
 वाचन विकास ही माणसाच्या हजारो वर्षांच्या सामाजीकरण प्रक्रियेतून विकसित झालेली प्रक्रिया आहे. स्थळ नि काळाचा विचार करता वाचन हे सदैव श्रेष्ठच राहत आलेले आहे. वाचन हे व्यक्तीस संस्कृती संपृक्त अनुभव प्रदान करत असते. त्यातून माणसाच्या हाती ज्ञान व माहिती येत असते. ऐतिहासिकदृष्ट्या आपण पाहू लागलो तर असे दिसून येते की, लिखित अथवा मुद्रित सामुग्रीच्या आकलनाच्या अनंत संभावना वाचनाने विकसित केल्या. त्यामुळे व्यक्तीकडून असलेल्या सामाजिक अपेक्षेत भर पडून त्या कालपरत्वे उंचावतच राहिल्या आहेत. सध्याच्या माहिती, तंत्रज्ञान व अंकीय युगात (Digital Era) लिखिताच्या निर्मिती व आकलनाची इतकी साधने, परिमाणे, परी (पद्धती) विस्तारलीत की त्यांनी लिखितातच (Text) उत्क्रांती घडवून आणली आहे.
 वर्ण, शब्द, चिन्हे यांचे सांकेतिक अर्थ उमजण्यास वाचन साहाय्यभूत होत आले आहे. प्रत्येक भाषेतील ज्या मातृका (स्वर, व्यंजन) (Alphabet) असतात, त्या अर्थवाही असल्याने त्यांच्या जोडकामातून, संयोगिकरणातून जे शब्द तयार होतात, त्यांनाही विशिष्ट अर्थ राहत असतो. इंग्रजी जगातील ज्ञानभाषा होण्याचे रहस्य अल्पसंख्य मातृकाधारित लेखन पद्धती आहे, हे फार कमी लोक जाणतात. तिचा सारा प्रपंच २६ मुळाक्षरांचा, इंग्रजी मुद्रणासाठी लागणारा मुद्राकोष (मुद्रित चिन्हे/खिळे) अवघा ८० घरांचा असतो. उलटपक्षी मराठीचा आपण मुद्रित संसार पाहू लागू तर लक्षात येते की, मूळ मराठीत ४८ वर्ण असून, १२ स्वरादी आहेत; पण लेखन पद्धतीचा विचार करता इंग्रजी उच्चारण हे व्यंजन व स्वरांच्या संयोगातून येते, तर मराठीत स्वर हे स्वतंत्र चिन्ह्यांनी (अनुस्वार, काना, मात्रा (एकेरी, दुहेरी), वेलांटी आणि उकार (हस्व, दीर्घ, विसर्ग चिन्ह इ.) मूळ व्यंजनास जोडावे लागते.


१) The Invention of Reading and Evolution of Text. - by Genevieve Marie Johnson Journal of Literacy and Technology vol 16, No May 2015 त्यामुळे मराठी मुद्राकोष २०० ते २५० घरांपर्यंत जातो. देवनागरी लिपी शास्त्रोक्त मानली जात असली, सूत्रात्मक, गणिती असली, ती संगणक उपयोगी (Computer friendly) असली, तरी नवशिक्याच्या डोक्यात शिरायला बरेच सव्यापसव्य करावे लागते. अर्थात् दोन्ही लिप्यांचे गुण-दोष आहेत; पण भाषा शिकणारा सुबोधता, अल्प प्रयत्न पसंत करत असतो (प्रयत्नलाघव वृत्तीमुळे), हे विसरून चालणार नाही.
  प्रत्येक भाषेची स्वत:ची अशी लेखन, उच्चारण पद्धती, परंपरा असते. त्यातून वाचनशैली निर्माण होते. तीही प्रत्येक भाषेची आपली अशी वेगळी असते. (म्हणजे उजवीकडून लिहायचे, वाचायचे की डावीकडून, केव्हा उच्चार करायचा, केव्हा नाही इ.) लेखन व वाचन हे परस्परांचे व्यत्यास असल्यासारखे असतात. लेखन एक, वाचन दुसरे असेही असते. (उदा. Knowledge-नॉलेज. मराठीत 'शहाणा' शब्दाचा अर्थ उच्चार, बलाघाताने बदलतो. म्हणजे 'शहाणा' शब्द हुशार व मूर्ख अशा दोन परस्पर विरूद्ध अर्थाने वापरला तरी त्याच्या लेखनात फरक नसतो.) लेखन हे कौशल्य आहे, तर वाचन ही विद्याशाखा (Faculty) आहे. लेखन आविष्करण, तर वाचन अभिव्यक्ती असते. एक उद्गार, तर दुसरा प्रभाव म्हणून प्रगट होतो. लेखन सार्वजनिक असते, तर वाचन (मौन) मात्र अगदी वैयक्तिक. वाचनात संयोगत्व असतं (Tandem) , तर लेखनात आशयार्थ दडलेला असतो.
 भाषा ही माणसास लाभलेली निसर्गदत्त देणगी आहे, तर लिपी ही मानवी शोध व निर्मिती मानावी लागेल. अॅरिस्टॉटलच्या म्हणण्यानुसार, माणसाची मौखिक भाषा ही त्याच्या मानसिक उलघालीतून उदयास आली. लिपी म्हणजे उच्चारणाचे प्रतिबिंब. लेखन आणि वाचन प्रक्रिया सर्वथैव भिन्न असल्या तरी लेखन आधी घडले मग वाचन आले. इतिहास क्रमात लेखन मूलाधार, वाचन त्याचे अन्वयनन, आकलन होय. सुमारे ६००० वर्षांपूर्वी वाचनाचा प्रारंभ झाला, तेव्हा भाषा नव्हती. होते सुटे, सुटे शब्द. तेही माणसाने शेती, व्यापाराद्वारे वस्तुसंग्रह सुरू केला तेव्हा त्याची मोजदाद करण्याची गरज निर्माण झाली. त्यामुळे प्रथम अंकीय शब्द जन्माला आले. मग वस्तुगत व्यक्तिगत शब्दांची निर्मिती झाली असे मानले जाते. ही मोजदाद करणारी माणसे म्हणजे प्रथम वाचक होत. तत्कालीन गणराज्ये मापन परिणामे (वजन, मापन इ.) निश्चित करत. त्यावेळी दास्य प्रथा असायची. दास्यांना भाषा शिकवण्यास गणराज्य काळात बंदी होती. गुलामांना शिकविणा-यांना दंड व तुरुंगवासाची शिक्षा होती. ज्ञानाबरोबर भाषेवरही त्याकाळी अभिजनवर्गाचा एकाधिकार असायचा. मुळाक्षरांची निर्मिती इ.स. पूर्व २००० मध्ये झाली, त्यावेळी व्यंजनेच होती. स्वर नंतर जन्माला आले ते व्यवहारात भिन्नतादर्शक शब्दांच्या गरजेतून. व्यंजन प्रयोगानंतर सुमारे १००० वर्षांनी (इ.स. पूर्व १००० मध्ये) स्वर जन्माला आले. ते रोमनांनी जन्माला घातले. शुद्ध, अशुद्धाची बोधभावना इ.स. पूर्व २०० वर्षांची. व्याकरणाचा जन्म यातूनच झाला. भाषा शुद्धीची संकल्पना शब्दांच्या सार्वजनिक उपयोगाच्या गरजेतून उदयाला आली. पूर्वी सलग लिहायचा रिवाज होता. उदाहरणार्थ मोडी लिपीतील लेखन वा इंग्रजीतील करसिव्ह लेखन यामुळे सर्वसामान्यांच्या आवाक्यापलीकडे वाचन जात राहिले. वाचन, लेखन सार्वत्रिक करण्याच्या गरजेतून लांबपल्ल्यांची शब्दरचना (अग्नीरथगमनागमन नियंत्रक लोहताम्रपट्टिका म्हणजे रेल्वे सिग्नल) संक्षिप्त करण्याच्या गरजेतून दोन शब्दांमध्ये अंतर ठेवून लिहिण्याचा प्रघात सुरू झाला. यातून वाचन सोयीसाठी विरामचिन्हे उदयाला आली. याला इ.स.चे ९वे शतक उजडावे लागले. दोन शब्दांमधील अंतराचा प्रघात भाषिक प्रचार, प्रसाराच्या दृष्टीने क्रांतिकारक ठरला. त्यामुळे सर्वसामान्य माणूसही भाषा वापरू लागला. यामुळे श्रम, वेळ, ताणाची बचत होऊन भाषेच्या सुलभीकरणास गती आली. वाचन यातूनच विकसित होत गेले. अशा छोट्या-मोठ्या प्रयत्न उपायांमधून लिखिताचे वाचन सुबोध झाले.
  प्राचीन इतिहासकारांनी लिहून ठेवले आहे की, पूर्वी जी लिखित चिन्हे होती (चित्र, रेघा इ.) ती अत्यंत सुबोध असायची. त्यात दोन अर्थ, अनेक अर्थ नसत. 'ता' म्हणजे ताकभात ठरलेले. भाषेचे महत्त्व गणित, व्यापाराकडून संस्कृती, संस्कारांकडे सरकत गेले. मग भाषा, वाचन व्यापक व बहुआयामी बनत गेले. पुढे तर ते विविध ज्ञानविस्तारामुळे जटिल झाले खरे, वाचन सुलभतेपूर्वी मौखिक साहित्य काळात पाठांतर, स्मरण हे वाचनाचे अंग होते. पुढे मग अक्षर वाचन परंपरा विकसित झाली. धर्मकथा, मिथककथा काळात सांगोवांगी हेच वाचन होते. मौखिक साहित्यच साहित्य होतं.
 माणसाला शेती संस्कृती विकासामुळे स्थिर जीवन जगता येऊ लागले. पोटभर अन्न मिळू लागल्याने माणसाचा मेंदू पूर्वजांच्या तुलनेने मोठा होत गेल्याची नोंद मानववंशशास्त्र इतिहासात आढळते. त्यामुळे ऐकिव, मौखिक भाषा स्थिर होऊन प्रदेश व बोलींचे अस्तित्व उदयाला आले. शेतीसाठा वाढल्याने व्यापार जन्माला आला. व्यापाराने दळणवळणास गती दिली. यातूनही लेखन, वाचन, भाषाभिन्नतेतून बहुभाषिकता इ.चा जन्म झाला. वेगवेगळ्या लिप्यांची, लेखनपद्धती, साधने, मोजमाप पद्धतींची देवाण-घेवाण होऊन संस्कृतीचा उदय झाला. वर्गव्यवस्था, महाजनी सभ्यता, शब्दसाधना,शस्त्रपूजा इ. व्यवहार रूढ झाले. यातूनही भाषिक प्रयोग वैविध्य व विस्तार घडून आला. परिणामी वाचनास गती आली. वाचन एकाधिकार संपुष्टात येऊन तो सार्वत्रिक आणि सार्वजनिक बनण्यास वरील सर्व परिवर्तनांतून हातभारच लागला. वाचन जगण्याचे साधन बनण्याची स्थिती म्हणजे शिक्षण व्यवस्थेची निर्मिती. हा काळ एकोणिसाव्या शतकाचा.
 विसावे शतक यंत्र युगाचे मानले गेले ते विविध शोधांमुळे. तार, रेल्वे, टेलिफोन, वीज, मोटार, बाष्पयंत्रे इत्यादींमुळे मानवी शक्तीपलीकडची कामे लीलया जशी होत गेली, तशी नवी ज्ञानसंस्कृती उदयाला आली. जागतिक आदान-प्रदानाने भाषा, साहित्य, विज्ञान, तत्त्वज्ञान, धर्मशास्त्र, तर्कशास्त्र, मानसशास्त्र यांच्या विस्तारांमुळे माणसाचे ज्ञान क्षितिज विस्तारले, तसे त्याचे वाचन रुंदावत जाऊन चतुरस्र बनले. जग जवळ आले. भाषांतरांमुळे ज्ञानसंपदेचे आदान-प्रदान शक्य झाले. विसाव्या शतकाचा उत्तरार्ध म्हणजे संगणक क्रांती. माहिती व तंत्रज्ञान साधनांनी मुद्रित ज्ञानसाधनांना अंकीय (Digital) पोशाख चढवून ज्ञान व वाचन हे काळ, काम, वेगाच्या गृहितांपलीकडे नेऊन स्मरणाची गरज इतिहास जमा केली.
 मौखिक संपर्क, संवादांची जागा माहिती व तंत्रज्ञान युगातील संगणक,इंटरनेट, मोबाईल इ.मुळे 'ई' (इलेक्ट्रॉनिक) स्वरूपात विकसित झाले.लेखन व वाचनाच्या ई आवृत्तींची निर्मिती ही एकविसाव्या शतकाची इलेक्ट्रॉनिक साक्षरता, अंकीय साक्षरता, आभासी साक्षरता अशा नव्या स्वरूपात अवतरत गेली. ई-बुक्स, किंडल, गुगल, मायक्रोसॉफ्ट, लॅपटॉप, मोबाईल, वायफाय,उपग्रह, दळणवळण यांतून माणूस निरंतर संपर्कशील होत २४ तास वाचक बनला. त्याचे पाहणेच वाचन झाले. संदेश, फिती, गिफ्ट, डिजिटल फोटो,फेसबुक, ट्रिटर, व्हॉट्सअॅप इत्यावरील दृक-श्राव्य संदेशन वाचनच बनून गेले. त्यांनी वाचन, लेखनांच्या पूर्वसंकल्पना बदलून टंकन, मौखिक आदेशन हेच संपर्क माध्यम बनल्याने मुद्रित वाचनसंस्कृती जागी दृक् वाचन, श्रवण संस्कृती जन्माला घातली. ५.१६ ई-बुक/ई-रिडिंग
  पारंपरिक मुद्रित पुस्तकाची इलेक्ट्रॉनिक आवृत्ती म्हणजे ई-बुक होय. हे पुस्तक आपणास व्यक्तिगत संगणक, मोबाईल, किंडलसदृश उपकरण इत्यादींवर वाचता येते. शिवाय पुस्तकांसारखी त्याची पानेही चाळता येतात. पुढे-मागे करता येतात. ही पुस्तके सीडी अथवा सॉफ्ट कॉपी डाऊनलोड करून घेऊन ऑनलाइन/ऑफलाइन वाचता येतात. ती पुस्तकांसारखी खरेदी करता येतात. त्यांची अदलाबदल, देवाण-घेवाण शक्य असते. ती संग्रहित करता येतात; तीपण पाच एक मिनिटांत. वाचक मजकूर अधोरेखित करू शकतो. अर्थ, टीप लिहू शकतो. खुणा करू शकतो. त्यातला ठरावीक मजकूर बाजूला घेऊन साठवू, उपयोग करू शकतो. मोबाइलसारख्या उपकरणात अथवा संगणकावर आपण आपल्या फोल्डरमध्ये हवी तितकी पुस्तके, संदर्भग्रंथ,कोश साठवू शकतो. हवे तेव्हा त्यांचा उपयोग करू शकतो. मुद्रित पुस्तकात नसलेल्या कितीतरी गोष्टी ई-बुकमध्ये असतात. त्या म्हणजे लहान टाईप (Font) मोठा करून वाचू शकतो, खुणा बदलू शकतो, फोटो/छायाचित्रे संग्रहित करू शकतो इ.ही मुद्रित पुस्तकांच्या तुलनेने वजनरहितच असतात. किंडलचे वजन २२-२५ औंस किंवा ३-४ पाऊंड इतकेच. सुमारे ५ लाखांपर्यंत पाने आपण साठवू शकतो. त्यास लागणारी जागा नगण्य असते. ई-बुक्स आता मोफतही मिळू लागली आहेत. हे मुद्रित पुस्तकांच्या बाबतीत अशक्यच.
 विकिपीडियावर ई-बुकची व्याख्या करताना म्हटलं आहे, 'An Electric Book (e-book) is a book publication made available in digital form, consisting of text, images or both readable on the flat panel of computer or other computer devices.' यातून ई-बुकचं स्वरूप स्पष्ट होतं. सन २००० पासून ई-बुक वाचणे, खरेदी करणे, वापरणे इ.चा ओघ नि गती वाढत आहे. एका सर्वेक्षणानुसार ई-पुस्तक वाचक स्त्री-पुरुष सारखे आहेत. तरुण वाचक मोठे असले तरी प्रौढही नोंद घेण्याइतक्या संख्येचे आहेत. ४०% लोकांकडे आता स्वत:चे वाचन साधन (संगणक, मोबाइल्स, किंडल्स इ.) आहे. वृत्तपत्रे, नियतकालिके ई-आवृत्तीत वाचण्याचे प्रमाण रोज वाढते आहे. ई-बुक्स वाचनापैकी ३०% कथा-कादंब-या, १५% इतिहास इत्यादी वाचले जाते. ई-आवृत्तीरूपात इंटरनेट वाचन मुद्रित वाचनापेक्षा गतीने वाढते आहे. बॉबँ ब्राऊन यांनी १९३० मध्ये संशोधून ई-बुक तयार केले. ई-बुक रिडर्स सॉफ्टवेअर उपलब्ध असून, त्यात कॅरिबर, आयबुक, अॅडॉब अॅक्ट्रोबॅट, अॅडॉब रीडर, अॅडॉब डिजिटल एडिशन, मायक्रोसॉफ्ट रीडर, ब्लू फायर रीडर, गुगल प्ले बुक, नूक, बुकारी, किंडल, ओव्हरड्राइव्ह,बिलिओ, एफबी रीडर, इ. यांचा समावेश आहे.
५.१६.१ ई-बुकचे फायदे
१. ई-बुक आपण संगणक, लॅपटॉप, मोबाइल, किंडल, मॅक, टॅबलेट, स्मार्टफोन इ.वर वाचू शकतो.
२. अगणित पाने/मजकूर/आकृत्या/आलेख/दृक्-श्राव्य फिती इ. ई-बुकमध्ये समाविष्ट करू शकतो.
३. याची खरेदी, देवाण-घेवाण, संग्रहण, वाचन सुलभ असते.
४. ते क्षणार्धात जगातून कुठूनही बसल्याजागी मिळवून वाचता येते व तेही मोफत.
५. पर्यावरण संरक्षित असे हे साधन होय. झाडे कापावी लागत नाहीत,जसे कागदी पुस्तकासाठी ते आवश्यक असते.
६. कोणतीही माहिती, क्षणार्धात ई-बुकमुळे मूळ रूपात उपलब्ध होते.
७. ई-बुक ही आकाराने लघुकाय (Portable) , छोटी असतात. त्याला जागा लागतच नाही मुळी.
८. ई-बुक मुद्रित पुस्तकांसारखीच कुठेही, कशीही वाचता येतात.
९. ई-बुकद्वारे आपण संदर्भ शोध, संग्रह क्षणार्धात करू शकतो.
१०. ई-बुकची मुद्रित, ई-रूपात प्रत मिळणे क्षणार्धात शक्य असते.
५.१६.२ ई-बुकचे भविष्य
  ई-बुकचे भविष्य उज्ज्वल आहे, हे सांगायला कोण्या भविष्यवेत्याची गरज नाही. सन २०१६ मध्ये ‘प्यु न्युएस्ट डाटानी जाहीर केल्याप्रमाणे मुद्रित पुस्तके वाचकांच्या संख्येत घट होत आहे, हे स्पष्ट होते. तिकडे 'अॅमेझॉन'ची किंडलसदृश विक्री १२६० टक्क्यांनी वाढत आहे. हे लक्षात घेता मुद्रित पुस्तके राहतील केवळ स्मृती म्हणून. नवी पिढी ई-बुकच वाचेल. नवी पिढी ज्ञानसंग्राहक राहणार. ती चिकित्सक, समीक्षक, विश्लेषक असणार नाही. हे काम संगणक करेल. त्यामुळे माणसाच्या मेंदूमध्ये उत्क्रांती होईल. मुलांच्या वाचनावर परिणाम शक्य आहे. मुद्रित पुस्तके नष्ट होतील असे अजून ५०-१०० वर्षे तरी शक्य नाही. शेवटी ते वस्तुसंग्रहालयात नक्की भेटेल. कारण, माणूस जतनसाक्षर आहे. ५.१७ ई-रीडर्स (अॅप्स)

  • गुडरीडस्

अँड्रॉईड फोनसाठी उपयुक्त अॅप. हा वाचक गटाशी जोडला असून, जगातले सुमारे चार लाख वाचक या गटाशी जोडले गेले आहेत. १ कोटी संदर्भ पुस्तके, कोश, समीक्षा इत्यादी याच्याशी जोडले गेले आहेत.

  • कॉमिक्सॉलॉजी

हे मुलांसाठी खास तयार करण्यात आलेले वाचन संसाधन होय. यावर १ लाख स्वस्त वा मोफत कॉमिक्स, व्यंगपट, बालचित्रपट कथा इ. वाचता, पाहता येतात.

  • शेल्फी

ग्रंथ वाचकांसाठी पर्वणी ठरणारे हे साधन. यात पुस्तके डाऊनलोड करून वाचता येतात. ती स्वस्त, मोफत, किमती, नवी असे वैविध्य यात आहे. पुस्तक निवड, संग्रहण, नवप्रकाशित ग्रंथ माहिती इत्यादींसाठी उपयुक्त अॅप होय.

  • स्क्राइब

मासिक ९ डॉलर वर्गणीवर हे उपलब्ध, १० लाख पुस्तके उपलब्ध. यात कॉमिक्स, ध्वनिफिती (Audio Books) उपलब्ध आहेत. ६ कोटी लेख, संदर्भ, सांख्यिकी, आलेख, सर्वेक्षण, अहवाल पुरविणारे हे संसाधन संशोधकांना वरदान होय.

  • पोएट्री

काव्य रसिकांना विनोदी, आनंदी, विरह, प्रेम, आशावादी अशा सर्व भाव-विभावांच्या कविता वाचण्यास उपलब्ध करून देणारे साधन. अभिजात नि समकालीन दोन्ही प्रकारच्या कवितांचा अक्षरशः पूर वाहत असतो इथे.

  • ओव्हर ड्राइव्ह

जगातल्या ३० हजार नामांकित ग्रंथालयांना जोडणारे हे साधन म्हणजे ते तुम्हास त्या ग्रंथालयाचा सभासदच बनविते. ग्रंथालयातून पुस्तके घेतल्यासारखा सारा व्यवहार, वाचा नि परत करा.

  • स्टोरीविले

कथा वाचकांचे हे व्यासपीठ. २ डॉलर देऊन किंडलला जोडता येते. प्रत्येक आठवड्याला नवनव्या कथा हे अॅप पुरविते. हे सोशल मीडियाला जोडल्याने वाचक, लेखक संवाद करता येतो.

  • कोबो

हे प्रकाशन संस्था, मासिके, वृत्तपत्रे यांच्या विवरणिका (Catalogues) पुरविणारे संसाधन ग्रंथपाल, प्रकाशक, संशोधक, चोखंदळ वाचक अशा सर्वांना नवप्रकाशनांची माहिती देणारे साधन.

  • ऑडिबल

ध्वनीफितीरूपात असलेली पुस्तके ऐकण्याचे हे साधन. सुमारे २ लक्ष ध्वनी पुस्तके (Audio Books) यावर ऐकण्यासाठी उपलब्ध. अंधांना वरदान असलेले संसाधन डोळसांना व ऐकू येणा-यांना प्रवासात ऐकता येण्यास उपयुक्त.

  • मून + रीडर

हे अत्यंत विकसित असे वाचन साधन होय. एक तर यावर हजारो पुस्तके वाचनार्थ मोफत उपलब्ध आहेत. या साधनाचे वैशिष्ट्य असे की, ते वाचक सेवी आहे. वाचकांच्या सर्व गरजा लक्षात घेऊन ते तयार करण्यात आले आहे. उभे, आडवे ते वाचता येते. अक्षरे लहान-मोठी करता येतात. रात्री वाचता (अंधारात) येते. यात प्रकाशाची स्वयंभू सोय आहे. स्वयंचलित पाने पलटता, मागे-पुढे करता येतात. तुम्ही काय वाचले त्याची नोंद आपोआप घेतली जाते. ती पाहता, तपासता येते. मजकूर अधोरेखित करणे, पुस्तकावर मजकूर लिहिणे (Annotating), वेगवेगळे संदर्भ रंग (पेन) वापरणे इत्यादी सोयींनीयुक्त असे हे साधन जगप्रसिद्ध आहे. परिशिष्ट - १ वाचकांचे हक्क (Reader's Bill of Rights) 1  'पुस्तक दिन', 'वाचक दिन', 'वाचन संस्कृती', 'पुस्तक जत्रा', 'साहित्य संमेलन', 'पुस्तक प्रदर्शन' अशा सर्व उपक्रम, उत्सवांमधून प्रत्येक पिढीत वाचन जिवंत राहावे म्हणून आटोकाट प्रयत्न होत असतात. या सर्वांतून 'वाचाल तर वाचाल' असा संदेश देण्याची धडपड असते. या प्रयत्नाचा भाग म्हणून सुमारे दोन दशकांपूर्वी डॅनिएल पेन्नाक या फ्रेंच लेखकाने १९९२ मध्ये एक पुस्तक लिहिलं. 'दि राइट्स ऑफ द रीडर' त्याचं नाव. 'बाल हुक्क', 'अपंग हक्क', 'महिला हुक्क' असे आंतरराष्ट्रीय स्तरावर सामाजिक, सांस्कृतिक जाणिवा विस्तारणारे हक्क जगाने संयुक्त राष्ट्र संघ (युनो) आणि तिच्या युनेस्को, युनिसेफसारख्या संघटनांमार्फत मान्य करून विविध आंतरराष्ट्रीय कायदे, जनमतसंग्रह, करार, जाहीरनामे इत्यादींमधून अमलात आणले, तसे वाचकांच्या हक्कांचापण जाहीरनामा प्रसारित करून त्यास जागतिक मान्यता मिळायला हवी. ही हक्कांची सनद सर्व लोकसभा,राज्यसभा, विद्यापीठे, महाविद्यालये, शाळांच्या ग्रंथालयांत अग्रभागी लावली जावी, तरच वाचक हक्क जपले, जोपासले जाऊन वाचन पिढ़ी-दर-पिढी समृद्ध होत राहील व वाचन संस्कृती टिकेल. वाचकांचे हक्क ही वाचन संस्कृती संकल्पना रुजविणारी जशी आहे, तशीच त्यातून वाचन जाणीव रुंदावण्यासाठी मोठे साहाय्य होणार असल्याने त्यांचा व्यापक प्रचार, प्रसार व्हायला हवा. त्यासाठी ते हक्क माहीत असणे आवश्यक आहे.


१) मेहता मराठी ग्रंथजगत/जून, २०१३/पृ. १२-१५/शंकर सारडा. ते हक्क पुढीलप्रमाणे आहेत. सदर हक्क सकृत्दर्शनी नकारात्मक वाटले तरी त्यात वाचन व्यासंगाचे स्वातंत्र्य मूल्य म्हणून रुजविणारी स्पष्टता दिसून येते. ते दहा हक्क असे - १. प्रत्येकास वाचनाचा हक्क आहे. प्रत्येक व्यक्ती साक्षर व्हायला हवी. त्यासाठी प्रत्येकाने लेखन, वाचनाचे कौशल्य हस्तगत करायला हवे. ज्ञानसंपादन वाचनाशिवाय अशक्य. ज्ञानप्रचार, प्रसारार्थ प्रत्येकाला वाचनाचा हक्क आहे. तो कोणत्याही सबबीवर कोणासही हिरावून घेता येणार नाही. वाचन हे मनोरंजनासाठी जितके आवश्यक असते, तितकेच ते जीवनाचे आकलन होण्यासाठीपण अनिवार्य असते. जीवनातील इप्सित साध्य करण्यासाठी वाचन अपरिहार्य आहे. २. वाचकास कोणताही मजकूर त्याच्या इच्छेनुसार पूर्ण, अपूर्ण, मधील मजकूर गाळून, पाने पलटून वाचण्याचा हक्क आहे. वाचन ही आस्वादक प्रक्रिया आहे. ती आनंददायक कृती होय. ती इच्छेनुसार घडली, तरच वाचनाचा ब्रह्मानंद वाचकासा मिळणार. म्हणून वाचनाची क्रिया वाचकाच्या निवड नि निकड या निकषांवरच व्हायला हवी. ती तशी व्हायची तर वाच्य मजकूर पूर्ण, अपूर्ण अथवा गाळून वाचण्याचा हक्क वाचकास आहे. वाचन ही सक्ती न होता संधी ठरायला हवी. ३. कोणतेही पुस्तक न वाचता तसेच ठेवण्याचा अथवा अर्धवट वाचून सोडण्याची वाचकास हक्क आहे. ग्रंथ म्हणजे ज्ञानसंग्रह. त्याचे वाचकास ओझे वाटता कामा नये. शिवाय ते कोणासही कोणावर लादता येणार नाही. ज्ञानसंपादनाची क्रिया सक्तीने सृजनात्मक होऊ शकत नाही. कोणतीही कृती स्वेच्छा होईल तितकी ती चिरस्थायी होण्याची शक्यता अधिक, शिवाय कंटाळवाणी, न आवडणारी कृती करणे माणसास असह्य असते, हेही यासंदर्भात लक्षात ठेवायला हवे. ४. एखादे पुस्तक वारंवार वाचण्याचा वाचकास हक्क आहे. गोष्ट आवडणारी असली की, तिची वारंवारिता माणसास आल्हाद देत राहते. वाचन हे रसास्वादन आहे नि ते माणसास आश्वासक, चैतन्यदायी वाटत असेल, ते जीवन समृद्ध करणारे वाटत असेल, तर वाचकास एखादे पुस्तक वारंवार वाचण्याचा, त्याची पारायणे करण्याचा हक्क हवा. शेवटी वाचन ही न संपणारी तहान असायला हवी, याबद्दल कुणाचे दुमत असणार नाही. ५. वाचकास काहीही वाचण्याचा हक्क आहे.  जग हे विधिनिषेधयुक्त असते, तसे वाचनही. वाचन उपकारक असते तसे कधी अपायकारकही ठरू शकते; पण म्हणून वाचनाचे वैविध्य कोणास नियंत्रित करता येणार नाही. साहित्यात परिकथा, रूपककथा, हेरकथा, प्रणयकथा, बोधकथा असे वैविध्य असते. भोजन, जसे सर्वरसग्राही तसे वाचनही. वाचन विवेक जन्माला घालते. चांगल्या-वाईटाचा फरक वाचनच निर्माण करते. हा उत्क्रांतीचा नियमच आहे. अनुकूल परिणाम चांगल्याचा होतो. व्यर्थ ते झडते, सार्थक ते टिकते. त्यामुळे ‘पुस्तक बंदी' ही सार्वकालिक निषेधार्ह कृती होय. ६. पुस्तकातील जग वास्तव असा समज/गैरसमज करून घेण्याचा वाचकास हक्क आहे.  साहित्य वास्तव असते तसे काल्पनिकही, शिवाय ते कल्पना नि वास्तवाचे कधी कधी सुंदर मिश्रणही असते. कल्पना, प्रतिभा, सौंदर्य ही सृजन ऊर्जा होय. ती नवे शोध, नवे बोध जन्माला घालते. कल्पना म्हणजे स्वप्नरंजन हा गैरसमज आहे. कल्पना नव्याची जननी. वास्तव म्हणजे केवळ कालभान. दोन्हींची गरज जीवनास असते; पण माणसाच्या प्रत्येक अवस्थेच्या गरजा भिन्न असतात. हे लक्षात घेऊन पुस्तकाद्वारे रमण्याचा, समज/गैरसमज करून घेण्याचा जसा हक्क आहे, तसा तो दूर करण्याचाही आहे. दोन्ही अधिकारांतूनच प्रगल्भता जन्मते. ७. कोठेही, कसेही वाचण्याची वाचकास हक्क आहे.  वाचनाचे मान्य, अमान्य स्थळ नाही. संचार स्वातंत्र्याइतकेच वाचनस्वातंत्र्य स्वैर आहे. वाचनालय, घर, सार्वजनिक, खासगी ठिकाणे, प्रवास, शाळा, वर्ग कुठेही वाचण्याचा वाचकास हक्क आहे. शिवाय बसून, झोपून, रेलून, उभे राहूनही तो वाचू शकतो. वाचन ही स्वेच्छा कृती म्हणून एकदा का स्वीकारली की ती बंधमुक्त, नियंत्रणमुक्तच राहते. अन्य कृती समांतर वाचण्यास मुभा आहे. टी.व्ही. पाहताना, खेळ पाहताना, जेवताना, शिकताना वाचण्याची मुभा हवी. क्षणभर गैर वाटेल; पण अंतिमतः कोणतेही वाचन, कसेही करून निबंधमुक्त असणे अनिवार्य होय. ८. पुस्तकात गढून जाण्याचा, रमण्याचा वाचकास हक्क आहे. खरे वाचन हे गारुड असते. तो संमोहक असल्याने त्याची मोहिनी म्हणजे वाचन समाधी. ती निरंतर रहायची तर तिच्यात गढणे, रमणे स्वाभाविकच म्हणायला हवे. गूढ, रहस्यमय, मोहक, आस्वादक वाचन म्हणजे जादूई जग. ते तुम्हास एक नवी अपरासृष्टी दाखवतं. त्यातून नवं जग, ज्ञान जन्मतं. ९. प्रगट, मौन, आकलनमय वाचण्याची वाचकास हक्क आहे. वाचनाच्या अनेक परी आहेत. प्रगट, मौन, चिंतनमय, चेतनादी, आस्वादक, पारायणी, इत्यादी पुस्तकं कसेही वाचण्याचा वाचकास हक्क अशासाठी की, प्रत्येकाच्या क्षमता भिन्न असतात. 'जो जो वांछिल तो ते लाहो' असं म्हणणं म्हणजेच स्वातंत्र्याचे समर्थन असेल, तर ते वाचनासही तंतोतंत लागू आहे. १०. वाचनासंबंधी अभिप्राय, प्रतिसाद, प्रतिक्रिया देण्या न देण्याचा वाचकास हक्क आहे.

आविष्कार जर स्वेच्छा असतो, तर अभिप्राय, प्रतिसाद, प्रतिक्रिया वा तटस्थ राहणेही तसेच असते. वाच्य कृतीबद्दल बोलणे, लिहिणे, मौन धारण करणे सर्वांचे स्वैर स्वातंत्र्य वाचकास आहे. त्याबद्दल कुणास, कुणावर बंदी वा जबरदस्ती करता येणार नाही.
परिशिष्ट - २

ग्रंथ सनद




युनेस्कोतर्फे प्रकाशित झालेल्या
‘दि बुक चार्टर' या पुस्तिकेचा काहीसा स्वैर अनुवाद




पाचव्या महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट मुद्रण
पारितोषिक वितरण समारंभाच्या निमित्ताने प्रकाशित
६ जानेवारी, १९७५





शासकीय मुद्रण व लेखनसामग्री संचालनालय, मुंबई

ग्रंथ सनद


भूमिका  सर्व जगाच्या ज्ञानभांडाराचे संरक्षण करण्याचे व त्या ज्ञानाच्या प्रसाराचे ग्रंथ हेच आवश्यक साधन होय अशी खात्री झाल्यामुळे; मुद्रित शब्दाचा जास्तीत जास्त उपयोग करण्याकरिता प्रोत्साहन देणाच्या धोरणांचा अंगीकार केल्यास ग्रंथांच्या कार्यास नवीन जोम येईल असा विश्वास वाटल्यामुळे;  युनायटेड नेशन्स एज्युकेशनल, सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशनच्या संस्थेने आपल्या घटनेत 'शब्द आणि प्रतिमा यांच्याद्वारे विचार आणि कल्पना यांचा मुक्त संचार व्हावा व त्याचबरोबर सर्व देशांतील लोकांना इतर कोणत्याही देशात मुद्रित व प्रकाशित झालेले साहित्य उपलब्ध व्हावे याकरिता आंतरराष्ट्रीय सहकार्याची प्रतिपादन केलेली आवश्यकता' लक्षात घेऊन;  युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेने आवर्जून प्रतिपादन केल्याप्रमाणे 'ग्रंथ हे युनेस्कोच्या उद्दिष्टांची म्हणजे शांतता, विकास, मानवी हक्कांची जोपासना आणि वंशवाद व वसाहतवाद याविरुद्ध मोहीम यांची पूर्तता करण्याकरिता मूलभूत कार्य करीत असतात हेही लक्षात घेऊन';  युनेस्कोच्या सर्वसाधारण सभेने १९७२ हे वर्ष ‘सर्वांकरिता ग्रंथ' या विषयास अनुलक्षून आंतरराष्ट्रीय ग्रंथ वर्ष म्हणून जाहीर केले हे विचारात घेऊन, दि इंटरनॅशनल कम्युनिटी ऑफ बुक सेलर्स असोसिएशन्स, दि इंटरनॅशनल कॉन्फेडरेशन ऑफ सोसायटी ऑफ ऑथर्स अँड कंपोजर्स, दि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ डॉक्युमेंटेशन, दि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ लायब्ररी असोसिएशन्स, दि इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ ट्रान्स्लेटर्स, इंटरनॅशनल पेन व इंटरनॅशनल पब्लिशर्स असोसिएशन;  या संस्था एकमुखाने प्रस्तुत ग्रंथ सनदेचा स्वीकार करीत आहेत आणि त्यामध्ये विशद केलेल्या तत्त्वांचा अवलंब करावा, असे सर्व संबंधितांना आवाहन करीत आहेत. तत्त्वे १. प्रत्येकाला वाचनाचा अधिकार आहे. वाचनाचा फायदा उपभोगण्याची संधी प्रत्येकाला मिळेल अशी दक्षता घेणे हे एक समाजाचे कर्तव्य आहे. जागतिक लोकसंख्येचे फार मोठे विभाग वाचता येत नसल्यामुळे ग्रंथांपासून दुरावले जातात. त्यामुळे निरक्षरतेच्या अरिष्टाचे निर्मूलन करण्याकरिता साहाय्य करण्याची जबाबदारी शासनांवर येऊन पडते. वाचनाचे कौशल्य निर्माण करून ते टिकविण्याकरिता लागणा-या मुद्रित साहित्याचा पुरवठा व्हावा याकरिता शासनांनी उत्तेजन दिले पाहिजे. ग्रंथ व्यवसायांना आवश्यक तेव्हा उभयपक्षीय व बहुपक्षीय साहाय्य उपलब्ध केले पाहिजे. त्याचबरोबर ग्रंथ निर्माते व वितरक यांची ही जबाबदारी आहे की, ते अशा रीतीने प्रसृत करीत असलेल्या कल्पना व माहिती वाचकांच्या आणि अखिल समाजाच्या बदलत्या गरजांना अनुरूप अशीच असतील. २. शिक्षणाकरिता ग्रंथ आवश्यक आहेत. आजचे युग हे शैक्षणिक क्षेत्रातील क्रांतिकारक बदलांचे व शाळांमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर नोंदविण्याच्या दूरगामी कार्यक्रमांचे आहे. तेव्हा शैक्षणिक पद्धतींच्या विकासाकरिता पाठ्यपुस्तक या घटकाचा पुरेसा पुरवठा व्हावा म्हणून नियोजनाची आवश्यकता आहे. शैक्षणिक पुस्तकांची गुणवत्ता व मजकूर यांमध्ये सतत सुधारणा करण्याची आवश्यकता जगातील सर्व देशांत भासते. पाठ्यपुस्तके व त्याचबरोबर विशेषत: शालेय ग्रंथालयांना व साक्षरता कार्यक्रमाकरिता लागणारे सर्वसाधारण शैक्षणिक वाचनसाहित्य यांचा पुरवठा करण्याकरिता विभागीय उत्पादनाची राष्ट्रीय प्रकाशकांना मदत होऊ शकते. ३. लेखकांना आपले सर्जनशील कार्य करता यावे याकरिता अनुकूल अशी परिस्थिती निर्माण करणे, ही एक समाजाची खास जबाबदारी आहे.  मानवी हक्कांच्या जागतिक अधिकथनामध्ये असे म्हटले आहे की, प्रत्येक लेखकास असा हक्क असला पाहिजे की, त्याच्या शास्त्रीय, वाङ्मयीन किंवा कलात्मक निर्मितीपासून मिळणारे नैतिक आणि भौतिक फायदे सुरक्षित राखले जातील. असे संरक्षण अनुवादकांनाही दिले गेले पाहिजे. कारण, त्यांच्या कार्यामुळे ग्रंथ भाषेची सीमा ओलांडू शकतात आणि लेखक व अधिक विस्तृत असा वाचकवर्ग यांमध्ये आवश्यक असा दुवा निर्माण होतो.  सर्व देशांना आपले सांस्कृतिक वैशिष्ट्य व्यक्त करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे संस्कृतीकरिता आवश्यक असणारी विविधता अबाधित राहते. याकरिता त्यांनी लेखकांना आपले सर्जनशील कार्य करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे व तसेच इतर भाषांमध्ये, यात मर्यादित प्रसाराच्या भाषाही अंतर्भूत आहेत. उपलब्ध असलेल्या वाङ्मयातील अक्षरकलाकृती अनुवादित स्वरूपात अधिक मोठ्या वाचकवर्गास उपलब्ध होतील, अशी व्यवस्था केली पाहिजे. ४. राष्ट्रीय विकासाकरिता सुसंघटित प्रकाशन व्यवसायाची आवश्यकता आहे.  आज जगामध्ये ग्रंथनिर्मितीच्या बाबतीत फारच मोठी तफावत असल्यामुळे अनेक देशांत वाचन साहित्याचा पुरेसा पुरवठा होत नाही. याकरिता राष्ट्रीय प्रकाशन व्यवसायाच्या विकासाच्या योजना तयार करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक राष्ट्राने पुढाकार घेतला पाहिजे व आवश्यक त्या आधारभूत यंत्रणेच्या निर्मितीस साहाय्य करण्याकरिता जरूर तेथे आंतरराष्ट्रीय सहकार्य मिळविले पाहिजे.  प्रकाशन व्यवसायाच्या विकासाकरिता शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक नियोजनाशी समन्वय साधणे आवश्यक आहे. शक्यतो ग्रंथांशी संबंधित असलेला सर्व समाज, राष्ट्रीय ग्रंथ विकास समिती व तत्सम संस्था यांच्यातर्फ सहभागी होईल अशा त-हेने व्यावसायिक संघटनांनी या विकासकार्यात भाग घेतला पाहिजे तसेच राष्ट्रीय किंवा दोन वा अधिक राष्ट्रांच्या सहकार्याने दीर्घमुदतीची कर्जे कमी व्याजदराने मिळाली पाहिजेत. ५. प्रकाशन व्यवसायाच्या विकासासाठी ग्रंथ निर्मितीच्या साधनांची आवश्यकता आहे.  आर्थिक धोरण ठरविताना शासनांनी ग्रंथ निर्मितीकरिता आवश्यक असलेल्या आधारभूत यंत्रणेच्या विकासाकरिता लागणारे साहित्य व यंत्रसामुग्री उपलब्ध होईल, याची दक्षता घेतली पाहिजे. त्यामध्ये कागद, छपाई व बांधणीची यंत्रसामुग्री यांचा अंतर्भाव होतो. राष्ट्रीय साधनसामुग्रीचा जास्तीत जास्त उपयोग करून व सवलतीच्या दरात आयात केलेली यंत्रसामुग्री व साहित्य यांच्या आधारे स्वस्त व आकर्षक असे मुद्रित वाङ्मय निर्माण करता येईल. मौखिक भाषांच्या प्रतिलेखनाच्या विकासाकडेही तातडीने लक्ष दिले पाहिजे. ग्रंथ मुद्रकांनी उत्पादन आणि संकलन यांचा दर्जा शक्य तितका उत्कृष्ट ठेवला पाहिजे. अधू लोकांकरिता ग्रंथ निर्माण करण्याकरिता विशेष प्रयत्न केले पाहिजेत. ६. प्रकाशक आणि वाचकवर्ग यांच्यामध्ये दुवा साधण्याचे मूलभूत कार्य ग्रंथ विक्रेते करीत असतात.  समाजामध्ये वाचनाची आवड निर्माण करण्याकरिता आवश्यक असलेल्या प्रयत्नांमध्ये ग्रंथ विक्रेत्यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यास अग्रस्थान दिले पाहिजे. वाचकवर्गास विविध तहेची चांगली निवडलेली पुस्तके पुरेशा प्रमाणात उपलब्ध व्हावीत म्हणून ते करीत असलेले कार्य अत्यंत महत्त्वाचे आहे. पोस्टाचे व विमान वाहतुकीचे सवलतीचे दर, पैसे पाठविण्याकरिता सवलती व इतर आर्थिक प्रोत्साहने यामुळे त्यांना आपले कार्य अधिक सुलभतेने करता येते. ७. ग्रंथसंग्रहालये ही राष्ट्रीय साधनसंपत्ती आहेत. त्यामुळे ज्ञान आणि माहिती यांचा प्रसार होतो आणि सूज्ञता व सौंदर्य यांचा आस्वाद घेता येतो. ग्रंथांच्या वितरणामध्ये ग्रंथसंग्रहालयांचे स्थान मध्यवर्ती आहे. छापील साहित्य वाचकांपर्यंत पोहोचविण्याची ती सर्वांत प्रभावी अशी यंत्रणा आहे. एक सार्वजनिक सेवा या नात्याने ग्रंथसंग्रहालये वाचनाचा प्रसार करीत असल्यामुळे वैयक्तिक कल्याण, आजन्म शिक्षण व सामाजिक आर्थिक प्रगती यांना हातभार लागतो. ग्रंथसंग्रहालयांची व्यवस्था राष्ट्राच्या गरजा व साधनसंपत्ती यांना अनुरूप असली पाहिजे. केवळ शहरातच नव्हे तर विशेषतः जेथे पुस्तके अनेकदा मिळत नाहीत, अशा मोठ्या प्रमाणावरील ग्रामीण विभागातील प्रत्येक शाळेत व वसाहतीत निदान एक तरी ग्रंथसंग्रहालय असले पाहिजे. त्या ग्रंथसंग्रहालयातील नोकरवर्ग शिक्षित असला पाहिजे आणि ग्रंथसंग्रहालयास पुस्तकांकरिता पुरेसे अनुदान मिळाले पाहिजे. उच्चशिक्षणाकरिता व तसेच संशोधनांकरिताही ग्रंथसंग्रहालये आवश्यक आहेत. राष्ट्रीय ग्रंथसंग्रहालयांची जाळी निर्माण केल्यास वाचकांना सर्वत्र ग्रंथ साहित्य उपलब्ध होऊ शकेल. ८. संदर्भ साहित्यनिर्मितीमुळे आवश्यक ती माहिती सुरक्षित राहते व उपलब्ध होत असल्यामुळे ग्रंथ लेखनास मदत होते.  शास्त्रीय, तांत्रिक आणि विशेष ग्रंथांकरिता पुरेशा संदर्भ साहित्याची आवश्यकता असते. त्याकरिता, अशा त-हेच्या साधनांची, शासनांच्या आणि ग्रंथांशी निगडित असलेल्या लोकांच्या सर्व घटकांच्या सहकार्याने वाढ केली पाहिजे. माहिती देणारे साहित्य जास्तीत जास्त प्रमाणात सदैव उपलब्ध होण्याकरिता आवश्यक त्या संदर्भ साहित्याचा परदेशातही अत्यंत मुक्त असा प्रसार व्हावा म्हणून प्रोत्साहक योजना हाती घेतल्या पाहिजेत. ९. देशादेशांमधील ग्रंथांचा अनिर्बधित प्रसार हा राष्ट्रांना लागणाऱ्या इतर गोष्टींच्या पुरवठ्याला पूरक आहे आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय सलोख्यास मदत होते. जगाच्या सर्जनशीलतेचा सर्वांना लाभ मिळावा म्हणून ग्रंथांच्या अप्रतिहत प्रसाराची नितांत आवश्यकता आहे. प्रशुल्क आणि कर यांसारखे अडथळे युनेस्कोच्या करारांचा व इतर आंतरराष्ट्रीय शिफारशी व तहनामे यांचा मोठ्या प्रमाणात स्वीकार करून दूर करता येतात. ग्रंथ व ग्रंथ मुद्रणाकरिता लागणा-या कच्च्या मालाच्या खरेदीकरिता आयात परवाने व परकीय चलन सढळ हाताने दिले पाहिजे आणि अंतर्गत कर व पुस्तक व्यवसायावरील इतर निर्बध शक्य तितके कमी केले पाहिजेत. १०. ग्रंथामुळे आंतरराष्ट्रीय सलोखा निर्माण होतो व शांततामय सहकार्यास मदत होते.   युनेस्कोच्या घटनेत म्हटल्याप्रमाणे, 'युद्धाचा प्रारंभ माणसाच्या मनात होत असल्यामुळे शांततेच्या संरक्षणाची यंत्रणा माणसाच्या मनामध्येच उभारली पाहिजे.' शांततेचे संरक्षण करणा-या महत्त्वाच्या आधारस्तंभांमध्ये ग्रंथांची गणना केली पाहिजे. कारण, स्नेहाचे व परस्पर विश्वासाचे बौद्धिक वातावरण निर्माण करण्याचे कार्य ग्रंथ अत्यंत प्रभावीपणे करीत असतात. ग्रंथांतील मजकूर वैयक्तिक पूर्तता, सामाजिक व आर्थिक प्रगती आणि आंतरराष्ट्रीय सलोखा व शांतता यांना पूरक असेल याची खबरदारी घेणे, हे सर्व संबंधितांचे कर्तव्य आहे. {{|||- अनुवाद : एस. ए. सप्रे, संचालक, शासकीय मुद्रण व लेखन सामग्री संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई- ३२.}} परिशिष्ट ३ वाचन सुभाषिते अ) मराठी विष्णुशास्त्री चिपळूणकर -

  • वाचलेल्या ग्रंथांच्या संख्येचा आणि विद्वत्तेचा मेळ घालणे हे नेहमी बरोबरच

असते असा नेम नाही.

  • वाचायचे ग्रंथ जर लक्ष देऊन मननपूर्वक असे बेताबेताने वाचले तरच

त्यापासून ज्ञानाचा लाभ होऊन निरनिराळ्या मानसिक शक्ती वृद्धिंगत होत जातील.

  • अन्नाचा परिपाक होऊन ते रक्तरूपाने शरीरास मिळाले म्हणजे जसे त्याचे

सार्थक झाले, त्याप्रमाणेच आपण जे वाचले त्याचे पुरतेपणी विवेचन करून त्यातले ग्राह्य कोणते, त्याज्य कोणते वगैरेची नीट व्यवस्था झाली म्हणजे तो मजकूर ज्ञानरूपाने आपल्या मनाशी मिळून तो आपला झाला असे समजावे.

  • 'वर्तमानपत्रे, मासिके, पुस्तके इत्यादिकांची समृद्धी लोकास अपायकारक

होय. कारण की हीच चाळून, पाहून वरवर वाचण्याची सवय एकदा मनास लागून गेली म्हणजे विचारपूर्वक व शोधक बुद्धीने मोठमोठे ग्रंथ सावकाश वाचण्याचा मनाला कंटाळा येऊ लागतो व त्यामुळे वरवरचे शुष्क पांडित्य मात्र चोहोकडे माजून ख-या विद्वत्तेचा लोप होतो.'

महर्षी विठ्ठल रामजी शिंदे -

  • विद्यार्थ्यांच्या मनाची वाट शाळेबाहेरच्या वाचनावर अवलंबून आहे.
  • आधुनिक शिक्षणाला खासगी वाचनाची (पूरक) जोड मिळाल्याशिवाय ते

सर्व निरूपयोगी ठरते.

डॉ. अरूण टिकेकर -

  • काव्यवाचन, कथाकथन, नाट्यवाचन असे काही प्रकार वगळले तर वाचन

ही एकट्यानं, एकांतात करावयाची वैचारिक कृती असते.

  • वाचकाची आवड-निवड मात्र सर्वस्वी त्याची पसंती असते.
  • लेखक वाचकाला निर्मितीक्षम आनंद देत असतात.
  • ग्रंथांपासून वाचनानंद मिळविण्याचा छंद सर्वश्रेष्ठ असतो.
  • वाचनानंदाची चटक लागलेल्या वाचकाला अमर्याद आभाळाची देणगी

लाभते.

  • आपल्या आवडी-निवडीच्या विषयात आवर्जून केलेले वाचन हेच खरे

वाचन होय.

  • मनाचा ठाव घेणारं वाचन म्हणजे खरे वाचन.
  • वाचनयोग्य वयात वाचनगुरू भेटला तर वाचनास दिशा मिळते आणि

आयुष्य वाया जात नाही.

  • वाचन-गुरू काय वाचावे, कसे वाचावे आणि का वाचावे हे सांगतो.
  • प्रत्येक पिढीने कोणत्या अभिजात वाङ्मय कृती वाचाव्यात, याचे मार्गदर्शन

करणारे ग्रंथ मिळत गेले तर अवांतर वाचनात, म्हणजे स्वत:चा मार्ग खाचखळग्यातनं काढत मार्गक्रमण करण्यात, त्या पिढीचा वाया जाणारा कितीतरी वेळ वाचेल.

  • वाचकाच्या जीवनात ग्रंथसंग्राहक अवस्था गाठली जाणं ही त्या वाचकाची

परिपूर्ती म्हणावी.

  • लोक वाचत नाहीत यावर माझा व्यक्तिगत विश्वास नाही.
  • ‘वाचणारा आणि चांगलं काय नि वाईट काय सांगणारा समीक्षक हो

लेखक, प्रकाशक आणि वाचक यामधला खरा दुवा होय. श्याम मनोहर -

  • धर्मग्रंथ वाचताना बुद्धीचा वापर, बुद्धीचा प्रवास, मनाचा मोकळेपणा ह्या

शक्ती कमी प्रमाणात वापरल्या जातात. कारण धर्मग्रंथ वाचण्यात श्रद्धा ही प्रेरणा असते. तंत्रज्ञानावरचे ग्रंथ वाचण्यात बुद्धी खूप खर्च करावी लागते.

  • तंत्रज्ञानावरची पुस्तके वाचण्याची प्रेरणा असते उपयुक्तता, तर अभिजात

कथात्मक वाङ्मय वाचण्यामागे प्रेरणा असते अस्तित्वाबद्दल कुतूहल.

  • वाचकांच्या व्यक्तिमत्वाची जडणघडण आणि वाचनप्रक्रिया यावर संशोधन

होणे ही वाचन संस्कृतीची गरज आहे.

डॉ. सुधीर रसाळ -

  • ज्या भाषिक समाजात वाचन करणे ही आपली नित्याची गरज आहे, असे

वाटणा-या व्यक्तींची भरपूर संख्या असते, त्या समाजाला वाचन संस्कृती आहे, असे समजले पाहिजे.

  • वाचन संस्कृती आणि ज्ञान व वाङ्मय निर्मिती यांचे आंतरिक नाते असून

ते एकमेकांचे नियंत्रण करतात.

  • मुद्रणाचे तंत्र अस्तित्वात आल्यावर आपल्या वाङ्मयीन संस्कृतीने

श्रवणयुगातून वाचन युगात प्रवेश केला.

  • वाचन प्रक्रियेत वाचकाला श्रोत्यापेक्षा अधिक स्वातंत्र्य असते.
  • मराठी भाषेत वाचन संस्कृती अविकसित रहाण्याचे मुख्य कारण आपल्या

संस्कृतीत वाङ्मयादी कलांना अतिशय गौण स्थान आहे. जोपर्यंत त्यांना महत्वाचे स्थान नाही, तोपर्यंत वाचन संस्कृती पूर्णपणे विकसित होऊ शकणार नाही.

  • नुसती वाचक संख्या वाढून उपयोगाची नाही तर पुस्तके विकत घेऊन

वाचणा-यांची संख्या वाढणे म्हणजे समाज सुसंस्कृत होणे होय.

डॉ. बाळकृष्ण कवठेकर -

  • अन्न, वस्त्र, निवारा या मूलभूत गरजांनंतर सुशिक्षित, सुसंस्कृत माणसाची

वाचन ही चौथी मूलभूत गरज असते, असायला हवी. डॉ. द. भि. कुलकर्णी -

  • वाचन संस्कृतीपेक्षा वाचक संस्कृती शब्द अधिक चांगला.

चंद्रकांत देवताळे-

  • भणंगभटक्या आयुष्यात पुस्तकांची सावलीच जगण्याला बळ देऊ शकेल,

यावर माझा विश्वास आहे. महावीर जोंधळे -

  • संगणकावरचे रंग जोपर्यंत तुमच्या लिखाणात येणार नाही तोपर्यंत नव्या

पिढीचा वाचक वाचनाकडे फिरकणार नाही. अरूण जाखडे -

  • वाचक अभिरूची घडवणे हे लेखकांप्रमाणे प्रकाशकांचेही कार्य आहे.

भास्कर आर्वीकर -

  • वाचन संस्कृती वाढविण्यासाठी आपला केंद्रबिंदू 'मुलं' हाच असला

पाहिजे. बाबा भांड -

  • चांगलं साहित्य कोणतं तर जे तुम्हाला वाचताना थकवतं, अस्वस्थ करतं.

यादव शंकर बावीकर -

  • वाचनापासून मनुष्यास उत्कृष्ट विचार उत्कृष्ट भाषेत व्यक्त करण्याची

कला साध्य होते. दिनकर गांगल -

  • संवेदनशीलता, निर्मितीक्षमता, जाणीवजागृती, भावनाविष्कार, विचारप्रक्षोभ

अशा मनाच्या विविध आघाड्यांवर वाचनाचा संस्कार असतो. डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम -

  • एक चांगलं पुस्तक अनेक पिढ्यांसाठी अमूल्य ज्ञानसाठा व संपत्ती असतं.

हेमराज बागूल -

  • नव्या मनूचा युवक घडविण्यासाठी नव्या प्रेरणांचे वाचन हवे. समर्थ रामदास -
  • अक्षरे गाळूनि वाची । का ते घाली पदरिची ।।
 निगा न करी पुस्तकांची | तो येक मूर्ख ।।
  • दिसमाजी काहीतरी लिहावे ।।
 प्रसंगी अखंडित वाचित जावे।।

कुसुमाग्रज -

  • ग्रंथ उजळती अज्ञानाच्या
 अंधाराच्या राती।

बहिणाबाई -

  • अरे छापीसनी आलं, मानसाले समजलं।
 छापीसनी जे राहिलं, देयालेच उमजलं ।।

महात्मा ज्योतिबा फुले -

  • थोडे दिन तरी मद्य वर्ज्य करा। तोच पैसा भरा ।।ग्रंथासाठी।।
 ग्रंथ वाचताना मनी शोध करा। देऊ नका थारा ।।वैरभावा।।
  • पुस्तकांचे मूल्य रत्नांपेक्षा अधिक आहे, कारण रत्नांमुळे बाह्य चमकते तर

पुस्तकांमुळे अंत:करण उज्वल होते.

महात्मा गांधी -

  • पुस्तकांची निवड अनुभवी माणसांच्या हाती सोपवणेच शहाणपणाचे.
  • पुस्तके ज्ञान प्रसाराचे अमूल्य आणि सुगम साधन होय.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर -

  • ग्रंथाशिवाय मी जगूच शकणार नाही.

बर्क हेजेस -

  • वाचनाची सुप्तशक्ती तुमचं आयुष्य अनेक प्रकारे समृद्ध करते.
  • वाचनाने सर्वजण एकाच पातळीवर येतात.
  • दुस-या कोणत्याही माध्यमापेक्षा पुस्तक तुमचे आयुष्य घडवू शकते.
  • वाचनासाठी काय सबब काढता येईल, याचा सतत विचार करा नि वाचा.
  • सामर्थ्यवान ग्रंथ तापलेल्या लोखंडाप्रमाणे असतात. एखाद्या समाजमनावर

त्याचा छाप उमटतो. असे ग्रंथ थोड्या लोकांनी वाचले तरी परिणाम साधतो. जग बदलून जाते.

रॉय एल. स्मिथ -

  • सर्वसाधारणपणे एक चांगलं पुस्तक प्रत्येक खरयाखु-या महान व्यक्तीच्या

यशाचा पाया असतो.

  • चांगल्या बँकेपेक्षा चांगल्या पुस्तकांमध्ये खरी संपत्ती असते.

डॅनियल जे बुरस्टिन -

  • वाचनामुळे आपणास स्वत:ची, जग नि इतिहासाची ओळख होते.

राल्फ वाल्डो इमर्सन -

  • अनेकदा वाचनाने माणसाचा भविष्यकाळ घडविला आहे.
  • पुस्तकं ही फक्त प्रेरणा देण्यासाठीच असतात.

दिदरो -

  • वाक्ये ही टोकदार खिळ्यांप्रमाणे असतात. आपल्या स्मृतीवर ती कायमची

कोरली जातात.

चार्ल्स स्क्रिन्नर ज्युनि. -

  • वाचन हे दुस-याचं मन वाचण्याचं साधन आहे. त्यामुळे तुमचीही

विचारशक्ती ताणली जाऊन विकसित होते.

हेन्री डेव्हिड थोरो -

  • एखादं पुस्तक खरोखर खूप चांगलं असेल, तर मी त्यातून खूप काही

शिकतो. ते लवकरात लवकर वाचून संपवून, त्यानुसार जगायला कधी एकदा सुरुवात करेन असं होऊन जातं.

अॅड्लस हक्सले -

  • वाचता येणा-या प्रत्येकात स्वत:ची उन्नती करण्याचं, जगण्याला अनेक

संदर्भ देण्याचं, पूर्णत्वाने रसरशीत आयुष्य जगण्याचे सामर्थ्य असतं.

थॉमस जेफरसन -

  • मी पुस्तकांशिवाय जगूच शकत नाही. कार्लाइल -
  • आतापर्यंत मनुष्यजातीने जे काही केले आहे, ते सर्व पुस्तकांमुळे आहे।

आणि ते पुस्तकातही आहे.

जॉर्ज बिल -

  • पुस्तके विचारप्रसारचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे.

हॅरी टूमन -

  • प्रत्येक वाचक हा नेता नसतो; पण प्रत्येक नेता वाचक असला पाहिजे.

पीटर ड्रकर -

  • आपल्या नव्या ज्ञानअर्थव्यवस्थेत तुम्ही कसं शिकायचं' हे शिकला

नाही, तर तुम्हाला अवघड परिस्थितीला तोंड द्यावे लागेल.

होरेस मान -

  • दररोज थोडं तरी, अगदी एक वाक्य का होईना वाचा. दिवसाकाठी अशी

पंधरा मिनिटं जरी मिळाली तरी आयुष्याच्या उत्तरार्धात ती तुम्हाला समृद्ध करून टाकतील.

व्हॅना व्हाईट -

  • वाचन हे काही जगातले सर्वाधिक बुद्धिमान काम नाही; पण मला अक्षरे

माहीत असायला हवीत.

जी.के. चेस्टरटन -

  • एखाद्या उत्साही माणसाला वाचायला पुस्तक हवे असणे नि ते तसे एका

दमलेल्या माणसाला हवे असणे, यात फरक आहे.

जॉन लॉक -

  • वाचनाने मनाला फक्त ज्ञानसाधनांची प्राप्ती होते; पण विचारांमुळे जे

वाचलं जातं ते आपलं होतं.

नॉर्मन कझिन्स -

  • ज्याला वाचायला येतं अशी व्यक्ती खोलवर वाचायला शिकते आणि मग

जीवन आतून-बाहेरून बदलून जातं. मार्टायनर अॅडलेर आणि चार्ल्स व्हेन डोरेन -

  • वाचनाची कला म्हणजे प्रत्येक प्रकारचं संज्ञापन शक्य तितक्या चांगल्या

त-हेने ग्रहण करण्याचं कौशल्य होय.

अर्नेस्ट हेमिंग्वे -

  • चांगलं लिखाण हे वास्तुशास्त्राप्रमाणे असतं, अंतर्गत सजावटीप्रमाणे नसतं.

फ्रान्सिस बेकन -

  • काही पुस्तके चाखायची असतात. काही गिळायची असतात. काहीं मात्र

पचवायची असतात. अल्बर्ट मॅग्युएल -

  • वाचन जसं वाढेल तसं भूमितीच्या पटीनं ते वाढत जातं.

मार्क ट्वेन -

  • जो माणूस चांगली पुस्तके वाचत नाही त्याच्यात नि वाचता न येणा-या

माणसात काहीच फरक असत नाही.

मिअँडर -

  • जे वाचतात त्यांना इतरांपेक्षा दुप्पट दिसतं.

अॅल्डस हक्सले -

  • वाचणारा माणूस जीवनाचा पुरेपूर आस्वाद घेतो.

इ.सी. मेकेंझी -

  • काही विद्यार्थी ज्ञानाच्या कारंज्यातले पाणी पितात, तर काही फक्त चुळा भरतात.

बेन फ्रैंकलिन -

  • ज्ञानात केलेली गुंतवणूक उत्तम व्याज देते.

अर्ल नाइंटिंगेल -

  • पृथ्वीसाठी सूर्याचं जे स्थान आहे, ते माझ्यासाठी पुस्तकांचं.

चार्ल्स ई.टी. जोन्स -

  • तुम्हाला दोनच गोष्टी बदलतात. एक भेटणारी माणसे नि दुसरी म्हणजे  वाचलेली पुस्तके.

सॉक्रेटिस -
■ तुमच्या वेळेचा सदुपयोग तुम्ही इतरांनी लिहिलेले वाचण्यात घालवा.
त्यामुळे इतरांना पडलेले कष्ट तुम्हाला पडणार नाहीत.

गुस्ताद फ्लॉबर्ट -
■ जगण्यासाठी वाचन करा

व्हिक्टर ह्युगो -,
■ विचारी लोक आयुष्यातल्या त्रासावर पुस्तकातून दिलासा मिळवितात.

ओप्रा विनफ्रे -
■ इतरांच्या आयुष्याबद्दलचे वाचन तुम्हाला तुमच्या आयुष्याचा विचारकरायला लावेल. हेच तर वाचनाचे खरे सौंदर्य आहे.

विल्यम एलरी चॅनिंग -
■ उत्तम पुस्तकातून थोर लोक आपल्याशी बोलतात. त्यांचे सर्वात मौल्यवान विचार ते आपणास देतात.

थियोडर पार्कर -
जी पुस्तके तुम्हाला जास्तीत जास्त विचार करायला लावतात, ती पुस्तके तुम्हास जास्तीत जास्त मदत करतात.

इरॉस्मस -
■ मला थोडे पैसे मिळाले की, प्रथम मी पुस्तके घेतो. नंतर अन्न, कपडे इत्यादी.

थॉमस ए केंपिस -
■ मी सुखाचा शोध घेत होतो, तो शेवटी मला मिळाला छोट्याशा पुस्तकात.

अर्नेस्ट कार -
■ लिहिता, वाचता न येणे म्हणजे दारं, खिडक्या नसलेल्या घरात राहणं.

फ्रांझ कास्की -
■ जर आपण वाचत असलेले पुस्तक डोक्याला ठोसा देत नसेल, तर ते वाचायचेच कशाला? ■ आपल्या मनातील गोठलेल्या समुद्रासाठी पुस्तकाची कुऱ्हाड हवी.
■ आपण वाचतो ते प्रश्न विचारण्यासाठी.

जोनाथन स्विफ्ट -
■ मी जेव्हा एखादे पुस्तक वाचतो तेव्हा ते चांगले, वाईट कसेही असो, मला ते जिवंत वाटते.

डॉ. वॉल्टर ओंग -
■ इतर कोणत्याही शोधापेक्षा लिहिण्याच्या शोधामुळे मानवाच्या जाणिवेमध्ये क्रांतिकारक बदल झाले.

अज्ञात -
■ शरीराचा व्यायामाशी जो संबंध आहे तो मनाचा पुस्तकाशी.

ख्रिस्तोफर मोर्ले -
■ मनाला आत्मचिंतनाला भाग पाडणे हाच पुस्तकाचा हेतू असतो.

ए.पी. गौथी -
■ वाचनाच्या हातमागावर आपल्या आतलं वस्त्र विणलं जातं. कमी दर्जाचं वाचन मन आणि बुद्धीचं कमी दर्जाचं वस्त्र विणतं.

जॉर्ज लुकाच -
■ मित्रांप्रमाणेच पुस्तकांची निवड पण काळजीपूर्वक करावी.

इमर्सन -
■ जर आपण बुद्धिमान माणसाला भेटलो, तर तो कोणती पुस्तकं वाचतो हे समजून घ्यावं.

विल रॉजर्स -
■ माणूस दोनच गोष्टींतून शिकू शकतो. एक पुस्तकातून आणि दुसरे म्हणजे माणसाच्या सहवासातून.

डेव्हिड शेंक -
■ पुस्तके टेलिव्हिजनविरुद्ध काम करतात. टेलिव्हिजन तुम्हाला निष्क्रिय करतो तर पुस्तके सक्रिय.
सिसेरो -
■ पुस्तकांशिवाय खोली म्हणजे आत्मा नसलेलं शरीर.

अॅल्विन दॉफ्लर -
■ भविष्यातली निरक्षर व्यक्ती म्हणजे ज्याला शिकायचं कसं माहीत नाही ती.

मार्शल मॅकलहॉन -
■ गुटेनबर्गने प्रत्येकाला वाचक बनविले, झेरॉक्सने प्रकाशक.

■ ■





ब) हिंदी

प्रांजलधर/अमिय बिंदु -

■ किताबे पढ़ना, उड़ने के समान आनंद देता है । कल्पना की दुनिया में,विचारों की दुनिया में, भावों की दुनिया में, और सबसे बढ़कर सूचनाओं की दुनिया में आप मुक्त होकर उड़ने का अनुभव ले सकते है।

भारतेंदु हरिश्चन्द्र -

■ घड़ी, छड़ी, चश्मा भये, छन्निन के हथियार।

कुष्णकुमार -

■ हमारी आज की स्कूली शिक्षा व्यवस्था या तो परीक्षार्थी बनाती है या बहुत साक्षर बनाती है । वह पाठक नहीं बनाती किसी को ।

शंभुनाथ

■ किताब की जरुरत तब तक बनी रहेगी, जब तक समाज के लोगों में प्रश्न करने, सन्देह करने का जज्बा है।

■ पुस्तकें है तो तर्क है, अनुभूति है, और आजादी की बाकी लड़ाई है।

■ पढ़ना, स्वाधीन होना है, जिसका कोई विकल्प नहीं।

■ एक अच्छे लेखक की किताब पढ़ना, इस जीवन-विरोधी माहौल में जीवन में लौटना है।


■ पढ़ते समय व्यक्ति का 'स्व' हमेशा जाग्रत और सक्रिय रहता है, जबकी टी.व्ही. देखते समय आदमी बुद्धू-सा बैठा रहता है, निठल्ला।

■ किताबें दर्शक निष्क्रिय से सक्रिय बनाती है, उसे स्तब्ध से आत्मसक्रिय करती हैं। दर्शक का पाठक बनना, कुछ सोचना शुरू करना है।

■ इलेक्ट्रॉनिक मीडिया के बावजून किताबों का कोई विकल्प नहीं है, जैसे शीतपेय (कोल्ड ड्रिक्स) के बावजूद पानी का विकल्प नहीं है।

■ भाषायी संस्कृति को विकसित करने का अर्थ है आत्मविसर्जन को रोकना, राष्ट्रीय आत्मपहचान की रक्षा करना।

■ सस्ती लोकप्रियतावादी चीजों को चारों तरफ बोलबाला है, सच्ची चीजों के लिए यह ऐसी चुनौती है जिसका सामना उन नागरिकों, लेखकों, पाठकों को करना है, जो पुस्तक-संस्कृति के अंग है।

■ किताबों का देश उनका है, जो शब्द से प्यार करते है। पाठकों के बिना देश निर्जन रेगिस्तान है।

■ पुस्तक-संस्कृति के तीन प्रमुख अंग है - लेखक, प्रकाशक और पाठक।

मनोहर श्याम जोशी -

■ किताबें ज्ञान का भंडार होती हैं, इसलिए परिवर्तन में उनकी भूमिका असंदिग्ध है।

चित्रा मुदगल -

■इंटरनेट हमारे सूचना-तंत्र को लगातार नई गति देती चल रही है। जीवन में उनकी महत्त्वपूर्ण भूमिका होने के बावजूद वो पुस्तकों का विकल्प नहीं साबित हो सकती है।

■ आज जो युवा पिढ़ी पर अपने बुजुर्गों के प्रति उपेक्षित रवैया रखने का मुद्दा उठ रहा है, उससे मुठभेड करने का एक ही विकल्प हमारे सामने है कि हम उन्हें पुस्तकों से जोड़े।

अशोक वाजपेयी -

■हमारी पुस्तक संस्कृति हमारी भाषा संस्कृति की जूल है।

■ पुस्तक धरोहर है। ये पुराने इतिहास, भूगोल, परंपरा, जीवन सभी से जोडती है।

■ पुस्तकोंसे अक्षर, शब्द संसार का ज्ञान होता है।

■किताबें पढ़ने से आत्मा का विस्तार, दूसरों के साथ शिरकत, दुनिया की जटिलता-सूक्ष्मता की समझ, आचार-व्यवहार की जानकारी आपको अधिकांशतया किताबों से मिलती है। पुस्तक विहीन व्यक्ति अंततः संवेदनहीन व विचारहीन व्यक्ति ही होगा।

डॉ. मैनेजर पाण्डेय -

■ किताबों से ज्ञान होता हैं। चेतना मिलती हैं। मनोरंजन होता है। सबसे बड़ी बात ये है कि मनुष्य सामाजिक बनता है और समाज का विकास होता है।

डॉ. माधुरी अनिल जोशी -

■बहुश्रुत अच्छे दोस्त की संगत से होनेवाले ज्यादातर लाभ अच्छे पठन से भी होते है।

■ ज्ञान के अन्य साधनों की तुलना में वाचन अत्यंत कम खर्च में किया जा सकता है।

■ मुद्रण कला का विकास होने के कारण 'पढ़ना' - ज्ञान साधना को कोई भी प्राप्त कर सकता है।

■ विचार पुस्तक के रूप में होने से किसी के भी पास जा सकते हैं।

अली सरदार जाफ्री -

■ यदि समाज में युवा वर्ग को पुस्तकें पढ़ने की आदत डाल दी जाय और खाने के लिए दो रोटी की व्यवस्था हो जाय तो अपराध होना कम हो जायेंगे।

डॉ. रतन कुमार पाण्डेय -

■ किसी समय सार्वजनिक पुस्तकालय और वाचनालय जन-मन को पाठक बनाने में अपनी महती भूमिका निभाते थे। आज पुस्तकालय-ग्रंथालय संस्कृति के न्हास ने मनुष्य-वृत्ति का बड़ा क्षरण किया हैं।

शरद जोशी -

■ पुस्तकालय पाठकों के अभाव में पुस्तकों के गोदाम बने हैं।

डॉ. अर्जुन चव्हान -

■ पुस्तक संस्कृति व्यक्ति, समाज और राष्ट्र को उन्नत बनाने वाली संस्कृती है।

डॉ. परमानंद श्रीवास्तव -

■ लेखक रहे न रहे, किताब पुरानी होकर भी नयी रहेगी।

 (संदर्भ:अनभै-पुस्तक संस्कृति विशेषांक - संपा प्रांजलधर/अमिय बिंद)

टपर -

■ आज के लिए और सदा के लिए सबसे बड़ा मित्र अच्छी पुस्तक!

कार्लाइल -

■ पुस्तकों का संकलन ही आज के युग का वास्तविक विद्यालय है ।

ओडोर पार्कर -

■ जो पुस्तकें हमें अधिक विचारने को बाध्य करती है, वे ही हमारी सबसे बड़ी सहायक है ।

रयूफस कोएट -

■ पुस्तक ही एकमात्र अमरत्व है ।

■ केवल पुस्तक ही अमर है ।

वाल्टेयर -

■ असभ्य राष्ट्रों को छोड़कर शेष सम्पूर्ण विश्व पर पुस्तकों का ही शासन है।

लेण्टर -

■ बुद्धिमानों की रचनाएं की एकमात्र ऐसी अक्षय निधि है जिन्हें हमारी सन्तति विनष्ट नहीं करत सकती ।


थॉमस ए. केम्पिस -

■ मैंने प्रत्येक स्थान पर विश्राम खोजा, किन्तु वह एकान्त कोने में बैठकर पुस्तक पढ़ने के अतिरिक्त कहीं प्राप्त न हो सका ।


बाइबल -

■ अधिक पुस्तके संजोने का कहीं अन्त नहीं है । अधिक अध्ययन शरीर की थकावट हैं ।


थोरो -

■ पुराना कोट पहनो और नई किताब खरीदो ।


बनारसीदास चतुर्वेदी -

■ पुस्तक प्रेमी सबसे अधिक धनी और सुखी है ।



■ ■




English

Addison-The Tatler -
■ Reading is to the mind, what exercise is to the body.

Book of common prayer -
■ Read, mark, learn and inwardly digest.

Bulwer-Lytton -
■ In science, read, by preference, the newest works; in literature the oldest. The classic literature is always.

Gibbon-Memoirs -
■ My early and invincible love of reading, I would not exchange for the treasures of India.

Swift -
■ When I am reading a book, whether wise or silly, it seems to me to be alive and talking to me.

Thoreau -
■ Read the best books first, or you may not have a chance to read them at all.

Sir Authur Helps (1813-1875) English writer -
■ Reading is sometimes an ingenious device for avoiding thought.

Charles Lamb (1775-1834) -
English essayist, Critic
■ He has left of reading altogether, to the great improvement of his originality.

William Penn (1644-1718) -
Religious leader, former of Pennsylvania
■ Much reading is an oppression of the mind and extinguishes the natural candle, which is the reason of so many senseless scholars in the world.

James Russell Lowell (1819-1891) -
American poet, editor
■ A reading machine, always wound up and going. He mastered whatever was not worth the knowing.

Ralph Waldo Emerson (1803-1882) -
American essayist, poet, philosopher
■ He is the good reader that makes the good book.

Douglas Jerrold {1803-1857) -
English playwright, humorist
■ Readers are of two sorts : one who carefully goes through a book and the other who as carefully lets the book go through him.

Gustave Flaubert (1821-1880) -
French novelist
■ Do not read, as children do, to amuse yourself or, like the ambitious, for institution. No, read in order to live.

Dr. Samuel Johnson {1709-1784) -
■ A man ought to read just as his inclination leads him; for what he read as a task will do him little good.

G. M. Trevelyan (1876-1961) -
British historian
■ Biration...has produced a vast population able to read but unable to distinguish what is worth reading.

Oliver smith (1727-1774) -
Anglo-Irish author
■ As writers become more numerous, it is natural for readers to become more indolent.

Woody Allen (b. 1935) -
American novelist
■ I took a course in speed reading, learning to read straight down the middle of the page and was able to read War and Peace in twenty miutes. It's about Russia.

Wentworth Dillom, Earl of Roscommon (C. 1633-1685)
Irish author -
■ Choose an author as you Choose a friend.

Emerson, Society and Solitude: Book -
■ The three practical rules, then, which I have to offer are
1. Never read any book that is not old.
2. Never read any but the famed books.
3. Never read any but what you like.

P. G. Hamerton, The intellectual Life -
■ The art of reading is to skip judiciously.

Charles Lamb, Last Essays of Era -
■ I love to lose myself in other man's minds. When I am not walking. I am reading; I Cannot sit and think Books.

Montaigue, Essays -
■ He that I am reading seems always to have the most force.

Thomas North, Diall of Princes (1557) -
■ For men that read much and work little are as bells, the which do sound to call others and they themselves never enter into a church. Joshua Sylvester Tetrasticha -
■ Who readth much and never meditates, is like the greedy eater of much food, who so surcloys his stomach with his cates, That commonly they do him little good.

Thomas a Kempis, limitation of Christ -
■ verify, when the day of judgement comes, we shall not be asked what we have read, but what we have done.

James Thomsom, Sunday Up the River -
■ Give a man a pipe he Can smoke, Give a man a book he can read; And his home is bright with a Calm delight, Though the room be poor indeed.

Francis Bacon, Essay; Of studies -
■ Reading maketh a full man; Conference a ready man; writing an exact man.

Jeremy Collier, of the Entertainment of Books -
■ A man may as well expect to grow stronger always being as wiser by always reading.

■ ■

परिशिष्ट ४

वाचन, पुस्तके आणि कविता

मला आठवतं तो दिवस ४ एप्रिल, २०१८ चा होता. मी 'वाचन पुस्तकाच्या लिखाणात इतका गढून, रमून गेलो होतो की, झोपेतही लिहीतच रहायचो. ४ एप्रिल, २०१८ ला पहाटे ३.०० वाजता जाग आली नि लिहायला बसलो तर पुस्तक लिहायचं सोडून कविताच लिहीत गेलो. एका बैठकीत, एका प्रवाहात लिहिलेल्या या कविता. कोणताही पूर्वविचार, चिंतन न करता झरझर उतरलेल्या-

कठीण समय येता हात देतात पुस्तके बोट धरूनही बुडणाऱ्यास वाचवतात पुस्तके घर पेटेल तेव्हा पुस्तके स्वत:सही पेटवून घेतात.


माणसासारखे राहायला नसते जमत पुस्तकांना वाचकाच्या चितेबरोबर पुस्तके राख होणं करतात पसंत मूकदर्शक होऊन रक्षाविसर्जन त्यांना नसतं जमत, ती असतात इमानी इतबारे होतात स्वाहा स्वेच्छा! वाचकाशिवाय जगायचे कसे? यक्ष प्रश्न असतो त्यांचा...

पुस्तके नसतात धोका देत नि शब्द ही नसतात फिरवत धीर देतात संकट समयी पुस्तके संकटमोचक असतात खरी!


पुस्तके असतात प्रसिद्ध वंचित, उपेक्षित ही, प्रसिद्ध, डांगोरा पिटलेली, वाचनीय असतातच असे काही नाही, माध्यमांच्या युगात या ती गाजवली जातात, दवंडी पिटली जाते, पण एकदा का बहर ओसरला दवंडी नि दिमडीचा मिटली जातात पानं दुमडून राहतात मनं कायमची... पुस्तक परिचय, समीक्षा, पुरस्कार सारं सारं तसं भौतिकच वाचन, विचार, चर्चा, भेट, देवाण-घेवाण पुस्तकांचा खरा उत्सव आणि उद्धारही... फक्त वाचनच...


पुस्तके युद्धाची कारणे झालीत तरी ती कधीच लढत नसतात पुस्तके फक्त विचार पेरतात. अर्थ तुमचा वकुब शहाणीसुरती माणसं पुस्तके नसतात वाचत तंतोतंत. तत्त्व सार सर्वस्व नुसती नजर फिरवली तरी हाती येतं पाथेय.

पुस्तके मंथन पुस्तके खंडन-मंडन पुस्तके टीका, समीक्षा पुस्तके रसग्रहण, आस्वादन पुस्तके रंजन पुस्तके भक्ती पुस्तके युक्ती जीवनाची. पुस्तके असतात सश्रद्ध, अश्रद्ध नि अंधश्रद्धही! निरपेक्ष, निर्मोही पुरोगामी, प्रतिगामी गांधीवादी, मार्क्सवादी; पण ती आपसात मात्र कधीच करत नसतात वादावादी माणसांसारखी!


पुस्तकं गातात पुस्तकं हितगुज करतात पुस्तकं समजावतात पुस्तकं साथ-संगत, सोबत सर्व सर्व करतात. म्हणून कधी कधी वाटतं जायचंच झालं कधी पुस्तकांसोबत जावं सरणाशेजारीदेखील रचली जावीत पुस्तकं. गोव-या जळत राहतील तिकडे इकडे मात्र पुस्तके उजळलेली! रक्षाविसर्जन दिनी पणती नका ठेवू ठेवा नंदादीप पुस्तकांचा निरंतर उजळणारा तरच वाचन वाचेल नि मला मिळेल मुक्ती देऊन नव्या पिढीस वाचन, विचार, युक्ती...

पुस्तके दृष्टी पुस्तके सृष्टी पुस्तके व्यष्टी पुस्तके समष्टी


पुस्तके ध्येय असतात नि धाडसही ती ध्येयधुंदी देतात नि करतात माणसास छंदी-फंदी कधी, अधी, मधी जे ध्येय कवटाळतात पुस्तके त्यांना करतात अजरामर धुंदीत आयुष्य वाया घालवणा-यांना इतिहास पुसून टाकतो अंधारात नि काळाच्या गर्द गुहेत खोलवर कायमचा. पुस्तके देत राहतात, त्यांनी घेतल्याचा इतिहास नाही. पुस्तके मार्ग दाखवतात, त्यांनी अडवल्याचे आठवत नाही. प्रसंगी ती मार्ग दाखवतात नि बजावतातही या वाटेने नको जाऊ जीवनाची होईल वाटमारी. माणसं का नाही सजीव असून भूमिका बजावत भूमिका घेत जगत ? पुस्तकांसारखी. पुस्तकांना नसते जात, नसतो धर्म, पंथ, असतो विचार केवळ असतो आशय, अर्थ माणसं मात्र आपापल्या सोयीने लावतात अर्थ, करतात अर्थाचा अनर्थ पुस्तकांमुळे अनर्थ घडल्याचा इतिहास नाही अनर्थाचा सारा इतिहास मात्र मानवी कर्मफळ!

पुस्तकांचा संग्रह म्हणजे विस्मरणास संधी पुस्तक स्मरण आचरण अवधी. विसरायची असतात पुस्तके कृतघ्न ठरविणारी जपायची असतात पुस्तके कृतज्ञ संस्कार म्हणून!


तू रुसलीस तेव्हा मी पुस्तक घेऊन आलो, कळी खुलली गाठ सुटली. मी आजारी पडलो तेव्हा तुझ्या ‘त्या’ पुस्तकाने मला बरे केले

पुस्तके काही न लिहिताही वाचता येतात

पुस्तके डोळ्यात भरलेली असतात नि श्वासात गुंतलेली पुस्तके गुंतागुंत असते कधी सोडवणूकही पुस्तके चक्रव्यूह आत जाणं सहज, बाहेर पडणं अशक्य

पुस्तके व्यसन, चटक खाये तो पछताये न खाये तो भी!


पुस्तकांची पाने काळाचे शिलालेख वाचणान्याचे बदलतात मात्र ललाट लेख.

पुस्तके मौन पण बोलकी निर्जीव तरी सजीव तटस्थ प्रसंगी हस्तक्षेप पुस्तके अस्वस्थ ज्वालामुखी ज्वालाग्रही शांत संयमी योगी महंत म्हणून शहाणी माणसं पुस्तके मन:पूर्वक वाचतात. विचार करतात कृती मात्र संयमाने सबुरीने म्हणून किती तरी आगी लागण्यापूर्वी निवळल्या भूमिगत अग्नीमुळेच जग शांत अहिंसक संयमी निसभ्यही पुस्तकांमुळेच.


वारंवार आठवणारी पुस्तके वारंवार वाचली जाणारी पुस्तके चिंध्या झालेली पुस्तके परत न येणारी पुस्तके अस्वस्थ करणारी पुस्तके अंतर्मुख करणारी पुस्तके ललित, मनोहर पुस्तके अभिजात पुस्तके.

पुस्तक असतो विचार व्यवहारही असते चिंतन ; पण सर्वांना पुरून उरणारा दिलासा मात्र देतात केवळ नि केवळ
पुस्तकेच.

पुस्तक असते आई
बाप-भाऊ कधी
ताई, माई, मावशी
कवितेआडून
समजावते चार गोष्टी
जीवाभावाच्या,
सबुरीच्या
सल्ल्याच्या
सभ्यता नि शहाणपणाच्या
म्हणून वाचायची असतात
पुस्तके ! पुस्तके!! आणि पुस्तकेच!!!

नसतात पुस्तके
रुसत कधी
दुखावणारी
हसत राहतात
सदाफुली
म्हणून तर पुस्तके
पासरी भरी.

पुस्तकांचं मैत्र
लाभतं ज्याला
तो खरा भाग्यवंत
वैर ज्याच्या
पदरी येतं

दुर्भागी बिचारा
नाशवंत!

पुस्तकांच्या
शब्दाशब्दांत
ओळीओळीत
असतात
रिकाम्या जागा
भरायच्या असतात
शहाणपणाने
आणि सबुरीने
जीवनभर आलेल्या
अनुभवाने.

पुस्तके नसतात
नुसती कागदांची चवड
असतात ती
जीवनाची सवड
निवडून आवड
ती भरतात
जीवन कावड.

पुस्तकात कधी
कविता, तर
कधी कथा
कधी कादंबरी, नाटकेही
जीवनात येणा-या
माणसांसारखी

कधी भावूक, तर कधी औपचारिक कधी जीव लावणारी नि कधी कधी तर जीवघेणीही!

पुस्तकात भेटतात विरामचिन्हे, इथे तिथे सर्वत्र स्वल्पविराम, असते विश्रांती खरी; पण पूर्णविराम... नसतो पूर्णविराम कधी तो नेहमी बजावत असतो 'थांबला तो संपला' म्हणून तर माणूस एकामागून एक नवी-जुनी पुस्तकं वेचित वाचत असतो. परिशिष्ट ५ अभिप्राय - १

क्लिष्ट संकल्पना । नेटक्या शब्दात ।। केल्यात उद्धृत ।। साक्षेपाने ।। १ ।। संदर्भ समृध्दी । याचे शक्तीस्थल ।। पेलते सकल ।। आशयाला ।। २ ।। पुस्तकाचा पट । शास्त्रीय व्यापक । तरीही रंजक ।। वाचावया ।। ३ ।। वाचूनिया ऐसे । रोचक पुस्तक । येतील वाचक । जन्मालागी ।। ४ ।। अभ्यासे आपण प्रकटला यात । घेवूनी कवेत ।। अक्षराना ।। ५ ।। - न्यायमूर्ती महेश्वर लव्हेकर प्रधान व जिल्हा सत्र न्यायाधीश, कोल्हापूर

  • 'वाचन पुस्तकाची काव्यात्मक समीक्षा अभिप्राय - २

वाचनाचा सर्वांगीण वेध घेणारा ग्रंथ   लेखक, समीक्षक, संशोधक, संपादक, अनुवादक, प्रशासक, मार्गदर्शक आणि समाजसेवक म्हणून ओळखले जाणारे संवेदनशील व उपक्रमशील व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. सुनीललकुमार लवटे. 'वाचन' हे त्यांचे नुकतेच प्रकाशित झालेले व लक्षवेधी ठरलेले अभ्यासपूर्ण वाङ्मयीन अपत्य. त्यांनीच मनोगतात म्हटल्याप्रमाणे प्रगल्भ वाचक होण्यासाठी वाचलेच पाहिजे असे पुस्तक. वाचन व्यवहार, प्रक्रिया, स्वरूप, पद्धती अशा अंगाने विचार करून सैद्धांतिक मांडणी करण्याच्या भूमिकेतून डॉ. लवटे यांनी प्रदीर्घ काळ वाचन, चिंतन आणि संशोधन करून याची निर्मिती केली आहे. केव्हा, कुठे, कसे,काय, किती, कसले आणि का वाचन करावे या सर्व प्रश्नांची उत्तरं सापडण्याची सोय व्हावी म्हणून हे लेखन झाल्याचे पुस्तक वाचनात सतत जाणवत राहते.   ‘माणसाचं व्यक्त होणं' या पहिल्या प्रकरणामध्ये माणूस आणि प्राणी यांच्यामध्ये अंतर निर्माण करणा-या भाषा, विचार, बुध्दी, अभिव्यक्ती आणि अविष्कार इत्यादी घटकांच्या अनुगने विश्लेषण करून माणसाच्या बोलण्याचा, भाषेचा, बोलीचा उगम केव्हा व कसा झाला याचा शोध घेतला आहे. तर दुस-या प्रकरणात लोकसाहित्याचा उगम आणि विकास यावर प्रकाश टाकताना लोकवाङ्मय आणि लोकसाहित्य या संकल्पना विशद करून लोकगीते, लोककथा,लोकनाट्य, भजन, पोवाडे, उखाणे, वाक्प्रचार, म्हणी इत्यादी प्रकारांचा परामर्श घेतला आहे. 'लेखन विकास' या तिस-या प्रकरणामध्ये प्रागैतिहासिक काळापासूनच्या अभिव्यक्ती कलांचा शोध घेवून स्थलकाल आणि संस्कृतीनुसार होत गेलेल्या बदलांचा आढावा घेतलेला आहे. कालांतराने चित्ररूप लेखनाचे लिपीत झालेले रूपांतर, लिपीचा विकास, अरबी, अमेरिकन व आपल्या देशातील लिपींचा सविस्तर तपशील विशद केला आहे.   'ग्रंथनिर्मिती व ग्रंथालय विकास' हे या पुस्तकाचे महत्त्वाचे प्रकरण. यात ग्रंथाची व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि विकास यावर लेखकाने विस्ताराने लिहिले आहे. याचबरोबर मुद्रण कलेचा उगम आणि विकासाविषयी साधार विवेचन केले आहे. वाचन पद्धतीविषयी लिहिताना लेखकाने, ‘‘काही पुस्तकांची नुसती चव बघायची, काही गिळायची तर काही चाखत पचवायची' हे फ्रान्सिस बेकनचं विधान उधृत केलं आहे. तर 'How to read Book' या मॉर्टिमर अॅडलर यांच्या पुस्तकात सांगितलेल्या प्राथमिक वाचन, निरीक्षण वाचन, विश्लेषणात्मक वाचन आणि सारभूत वाचन या चारही प्रकारांचा उहापोह केलेला आहे. या दोन्ही संदर्भातून वाचनाची नेमकी दिशा कशी असावी याचा उलगडा होतो. ग्रंथवाचनाच्या विविध पद्धती विशद करून शेवटी ग्रंथालयाचा उगम आणि विकास याविषयीचा तपशील नोंदवला आहे. ‘वाचनः स्वरूप आणि व्याप्ती' हे प्रकरण म्हणजे पुस्तकाचा केंद्रबिंदू. वाचन हा शब्द, त्याचा अर्थ, व्याख्या, स्वरूप, व्याप्ती हा सर्व भाषाशास्त्रीय तपशील नोंदवून लेखकाने वाचकांना, 'वाचन हा वेळ घालवायचा छंद नव्हे तर वेळ सत्कारणी लावण्याचा तो सृजनात्मक उपक्रम होय. जी माणसं नियमित वाचन करतात, ती नित्य व्यायामाप्रमाणे रोज अधिक प्रगल्भ होत राहतात' असा मौलिक संदेश दिला आहे. वाचन ही एक कला, एक कृती, एक विज्ञान कशी आहे हे स्पष्ट करून वाचनाचे उद्देश नमूद केले आहेत. वाचन प्रक्रिया, वाचन प्रकार, वाचन वैविध्य, वाचन संस्कृती, वाचनाचे महत्त्व, वाचनाचा उगम आणि विकास, इ-बुक, इ-रिडींग इत्यादी सर्व विवेचन केवळ वाचायचे नसून त्याची सातत्याने पारायणं केली पाहिजेत तरच हे पुस्तक वाचल्याचा आणि समजून घेतल्याचा उत्कट आनंद वाचकांना मिळू शकतो. असे झाले तरच म्हणून वाचनाचा विचार भूतकाळाच्या पार्श्वभूमीवर, वर्तमानाचे भान ठेवून, भविष्यवेध घेतच करायला हवा, तरच वाचन संस्कृती टिकेल व भविष्यात ती वर्धिष्णू होत राहील' ही लेखकाची अपेक्षा सार्थ ठरेल.   पुस्तकाच्या शेवटी जोडलेल्या परिशिष्टांत वाचकांचे हक्क, ग्रंथ सनद, मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सुभाषित संग्रह, वाचन व पुस्तके याविषयी लेखकाची दीर्घ कविता, संदर्भ ग्रंथ सूची आणि विशेषांक सूची यांचा समावेश असून यामुळे लेखकाची परिश्रमशीलता, चिंतनशीलता, बहुश्रुतता,आकलनक्षमता, गुणग्राहकता याबरोबर व्यासंग, विद्वत्त्व, कवित्व आणि इंग्रजी भाषेवरचं प्रभुत्व यांवर शिक्कामोर्तब होतो. हे पुस्तक मात्र एकदा वाचाल तर वाचनाविषयी तुमची आजवरची संकल्पनाच बदलून जाईल एवढे सामर्थ्य निश्चितच यात आहे. चिपळूणकरांनी म्हटल्याप्रमाणे हे पुस्तक 'वाचाल तर वाचाल' एवढा बोध घेऊन वाचावेच, संग्रही ठेवावेच, पारायणं करावीतच असे पुस्तक म्हणजे 'वाचन'.

- प्राचार्य डॉ. जी. पी. माळी (महाराष्ट्र टाईम्स, कोल्हापूर, दि. १७ ऑक्टोबर, २०१८) अभिप्राय - ३ वाचलेखन-वाचनप्रक्रियेचा विचार करणारे पुस्तक

  वाचन ही व्यक्तीला प्रगल्भ बनवून त्याच्या जाणिवांचा विकास करणारी कृती आहे. लेखन वाचनाचा मूलगामी विचार अनेक विचारवंत आणि कवी-लेखकांनीही केलेला दिसतो. यापैकी मराठीतील दोन नावे सहज आठवतात, ती भालचंद्र नेमाडे आणि विलास सारंग यांची. या दोघांनीही भाषा, भाषांतर, वाचन, लेखन याविषयी चिंतनशील मांडणी केलेली आहे. पैकी विलास सारंग यांनी आपल्या कविता १९६९-१९८४' या संग्रहातील ‘जगणं-बिगणं' कवितेची पाठराखण करताना प्रास्ताविकात ही कविता जगण्याविषयी आहे, तितकीच 'बिगण्याविषयी आहे, असे लिहिले आहे. सारंगांनी येथे 'बिगणं सारख्या अर्थहीन शब्दाला अर्थवाही केले आहे. सारंग बिगण्याविषयी म्हणजे, मराठी भाषेचे एक वैशिष्ट्य साजरं करण्याचा, त्याचा शोध घेण्याचा एक प्रयत्न समजतात. नेमकं हेच डॉ.सुनीलकुमार लवटे यांच्या नुकतंच प्रसिद्ध झालेल्या 'वाचन' या पुस्तकाविषयी सांगता येईल. हे पुस्तक वाचना- बिचना'विषयी आहे. म्हणजे हे पुस्तक जेवढे वाचनाविषयी तेवढेच बिचनाविषयी आहे. येथे बिचनाविषयी म्हणजे वाचनाशी निगडित येणाऱ्या सर्व गोष्टींविषयी असा अर्थ अभिप्रेत आहे. भाषेच्या उत्पत्तीपासून- म्हणजे माणूस कधीपासून भाषा वापरू लागला? त्याने लेखनप्रक्रियेचा शोध कधी लावला? लोकसाहित्य हे त्याच्या अभिव्यक्तीचे पहिले माध्यम कसे होते? प्रारंभी मानवाचे लेखनासाठीचे माध्यम काय राहिले? ग्रंथ आणि ग्रंथालयांची निर्मिती कशी आणि कधी झाली?- म्हणजेच माणसाच्या व्यक्त होण्याच्या प्रारंभापासून लोकसाहित्याची निर्मिती, लेखनप्रक्रियेचा विकास, पुढे ग्रंथांची निर्मिती ते ग्रंथालयांचा विकास आणि वाचनप्रक्रिया अशा सर्वच बाजूंना हे पुस्तक स्पर्श करते. 'वाचन' ही नेमकी काय गोष्ट आहे, याविषयी हे पुस्तक अधिक काही सांगण्याचा प्रयत्न करते. या पुस्तकाची मांडणी संशोधनात्मक असली, तरी वाचन लेखन या बौद्धिक क्रिया-प्रतिक्रियांविषयींचे अनेक प्रकारचे कुतूहल पूर्ण करण्यात ते यश मिळवते.   मानवी जीवनामध्ये भाषेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. स्वतःचे भाषिक अंग विकसित केल्यामुळे मानव इतर प्राण्यांपेक्षा वेगळा ठरला. मानवाव्यतिरिक्त इतर प्राणी हजारो वर्षे मूळ स्वरूपातच आहेत. त्यांनी मानवासारखा भौतिक विकास साधला नाही, याचे कारण 'भाषा' हेच आहे. मानवाने भाषेचा शोध लावला, भाषा अधिकाधिक विकसित केली आणि या भाषेच्या साह्याने स्वतःची प्रगती साधली. वैज्ञानिक प्रगती, मानवी जीवनातील विविधांगी समृद्धता, सर्व क्षेत्रांमधील ज्ञानभांडाराचे संचित भाषेमुळेच मानव प्राप्त करू शकला. हे ज्ञानभांडाराचे संचित भाषेमुळे जतन केले जाते, पुढील पिढीकडे संक्रमित केले जाते; म्हणून मानवी जीवनामध्ये चाकाच्या शोधापेक्षाही भाषेचा शोध महत्त्वाचा मानावा लागतो. परंतु हा शोध सहज-सोपा नव्हता. त्यासाठी माणसाला मोठ्या प्रक्रियेतून जावे लागले आहे यासंदर्भातील संक्षिप्त तरीही रोचक इतिहास माणसाचं व्यक्त होणे' या पहिल्या प्रकरणामध्ये डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी मांडला आहे. भाषेविषयीचे कुतूहल माणसाला नेहमी राहिले आहे. त्यामुळे भाषेच्या निर्मितीचा शोध तो सतत घेत राहिला. या शोधाचा आढावाच येथे वाचता येईल.   मानवाच्या विकासात भाषेला किती महत्त्व आहे, भाषा व बोली म्हणजे काय- यांसारख्या अनेक प्रश्नांना स्पर्श करीत डॉ.सुनीलकुमार लवटे यांनी भाषेची काही वैश्विके अधोरेखित करण्याचा प्रयत्न केला आहे. मानव हा समाजशील प्राणी आहे. समाजाचे अस्तित्व आणि विकासासाठी अविरत कार्यशील असलेली भाषा म्हणूनच मानवी जीवनामध्ये महत्त्वाची आहे. भाषेचे स्वरूप जाणीवपूर्वक समजावून घेतल्याशिवाय तिचे सामर्थ्य आपल्या लक्षात येत नाही. सर्वच मानवी समूहांचा स्वतःच्या भाषेशी घनिष्ठ आणि अतूट संबंध दिसतो. स्वतःच्या भाषेविषयी प्रत्येक समाजाला नितांत आदर असतो. त्यामुळेच भाषेच्या प्रश्नांवर समाज संवेदनशील दिसतो. भाषा प्रत्येक समाजाच्या संस्कृतीचा एक भाग असते. समाजाची संस्कृती, परंपरा, श्रद्धा, ज्ञान इत्यादींचे जतन आणि पुढच्या पिढीकडे वहन करण्याचे महत्त्वाचे कार्य भाषेमार्फत सुरू असते. परंपरेतून चालत आलेल्या आणि संस्कृतीमध्ये अंतर्भूत असलेल्या अनेक गोष्टी भाषेमुळेच मनुष्य शिकतो. त्यामुळे भाषेला समाजाचे संचित म्हटले जाते. हे समाजाचे संचित 'लोकसाहित्याच्या रूपाने समोर येते. त्यामुळे डॉ. लवटे यांनी पुढच्या प्रकरणात लोकसाहित्याची संक्षेपाने ओळख करून दिली आहे.   भाषा बोलली जाते. बोलण्यासाठी भाषेचा प्रभावी वापर होणे, यावरच तिचे अस्तित्व अवलंबून असते. त्यामुळे कोणत्याही भाषेचे लिखित रूप ही एक सोय असते. बोलणे पकडून ठेवण्यासाठी, जतन करण्यासाठी लेखनकला अस्तित्वात आलेली आहे. या लेखन विकासाचा इतिहास या पुस्तकाचा महत्त्वाचा भाग आहे. लेखनकला अवगत होण्यापूर्वी अभिव्यक्ती कशी होत होती, त्याविषयीच्या कोणत्या प्रकारे आणि कोठे लेखनखुणा सापडतात याचा घेण्यात आलेला धांडोळा वाचनीय व रोचक आहे. माणूस नेहमी नदीकिनारी सुपीक भागात वस्ती करत आला आहे. त्या अनुषंगाने नाईल आणि तैग्रीस नदीच्या सुपीक खो-यात लेखनाच्या आरंभिक पाऊलखुणा आढळतात. हा प्रदेश भूमध्य सागराच्या उत्तर सिरिया, यूफ्रेटिस नदीचे खोरे, इराकचे आखात असा आहे. त्यामुळे या पाऊलखुणा शोधताना अभ्यासकांना विविध संस्कृतींचे दर्शन आणि मानवाच्या विकासाची वाटचाल लक्षात येते. पुढे लिपीची उत्क्रांती झाली. मानवाचे पहिले लेखन चित्ररूप होते. त्या चित्राक्षरपद्धतीपासून आजच्या आभासी लेखनप्रक्रिये-पर्यंतची उद्बोधक वाटचाल येथे सांगण्यात आली आहे.  लिपीची उत्क्रांती सांगताना या पुस्तकामध्ये अनेक लिप्यांची करून दिलेली ओळख फार महत्त्वाची आहे. धन्वीसूचक वर्ण लिपी, अरबी लिपी, अमेरिका लिपी, उलफिलसची वर्णमाला आणि नंतर भारतीय लिप्यांची ओळख येथे करून देण्यात आली आहे. भारतीय लिप्यांचा उगम आणि विकास हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने तो अधोरेखित करण्यात आलेला आहे. भारत हा भाषा आणि संस्कृतीच्या पातळीवर प्रचंड विविधता असलेला देश आहे. या देशामध्ये वापरण्यात येणा-या शेकडो भाषा आणि त्यांच्या लिप्या हा प्रचंड मोठा विषय आहे. भारतातील अनेक भाषांना अद्याप लिप्या नाहीत, परंतु हजारो वर्षांपासून त्या व्यवहारात आहेत. भारतीय लिपी विकासाचा आढावा घेताना गुप्त लिपी, कुटिल लिपी, नागरी लिपी, शारदा लिपी, बंगाली लिपी या उत्तरी शैलीतील लिप्या आणि दक्षिणी शैलीतील पश्चिमी लिपी, मध्य प्रदेशी लिपी, तेलुगू/कानडी लिपी, ग्रंथ लिपी, कलिंग लिपी, तमिळ लिपी, व कुत्तू लिपी अशी अनेकांसाठी पूर्णतः नवीच माहिती या पुस्तकातून उपलब्ध होते. डॉ. लवटे यांनी या लिप्यांचा आढावा घेऊन इ.स. सातव्या शतकापासून पंधराव्या शतकापर्यंतची जी लिखित साधने आपण पाहतो, ती या लेखनविकासाची परिणती असल्याचे सांगितले आहे.   लिप्यांच्या विकासाबरोबरच ग्रंथांची निर्मिती आणि ग्रंथालयांचा विकास झालेला आहे. ग्रंथाचे मानवी जीवनातील स्थान वादातीत आहे. ज्ञानाचे वहन ग्रंथाच्या निर्मितीने सुलभ झालेले आहे. डॉ.लवटे यांच्या 'वाचन'चे स्वरूप शास्त्रीय आहे. अनेक संकल्पनांची वस्तुनिष्ठ माहिती सांगण्याबरोबर शब्द, शब्दार्थ, व्युत्पत्ती आणि व्याख्या देण्यावर त्यांचा भर आहे. 'ग्रंथ' या संकल्पनेचा त्यांनी विस्ताराने विचार केला आहे. त्यासाठी ग्रंथाची संकल्पना स्पष्ट करून अनेक प्रकारच्या ग्रंथांची सचित्र माहिती हा या लेखनाचा आणखी एक विशेष आहे. प्राचीन काळापासून माणसाने निर्माण केलेले ग्रंथ, ग्रंथलेखनाची सामग्री, पुस्तकांचे बदलत गेलेले स्वरूप, पुस्तके ठेवण्याच्या जागा, पद्धती, त्याचबरोबर पुस्तके वाचनाची पद्धती अशी बरीच सचित्र माहिती या पुस्तकात येते. त्यामध्ये इष्टिका ग्रंथ, पपायरस वनस्पतीपासून बनवलेल्या कागदी गुंडाळी पुस्तकांसारख्या दुर्मिळ गोष्टी या पुस्तकात पाहायलाही मिळतात. प्राचीन काळीही हस्तलिखित ग्रंथ जमवून त्याचा संग्रह करण्याची पद्धत होती. हा संग्रह ठेवण्याची कपाटे, लेखक त्या वेळच्या पपायरस वनस्पतीपासून बनवलेल्या गुंडाळी कागदावर कोणत्या पद्धतीने लिहायचे- असे सारेच या पुस्तकात आलेले आहे.  अनेक देशांची ग्रंथविषयक संस्कृती येथे संक्षेपाने सांगितली आहे. हस्तलिखित ग्रंथाची परंपरा कुठे दिसते, कठे कित्ता करण्याचा प्रघात होता, वेगवेगळ्या धर्मामध्ये कोणत्या रूढी होत्या, कोणत्या देशांमध्ये पुस्तकांची मोठी बाजारपेठ होती इथपासून एकटया बगदादमध्ये हिजरी ९०० च्या काळात शंभर कित्ता विक्रेते असल्याची माहितीही या पुस्तकातून मिळते. गुंडाळी, विटा, चर्मपत्रे, भूर्जपत्रे इत्यादींच्या वापरानंतर मुद्रणाच्या इतिहासात लाकडी ठसे वापरून छपाई सुरू झाली. इ.स. २२० च्या सुमारास चीनमध्ये हान राजवटीच्या काळात लाकडी ठसे वापरायचा प्रारंभ झाला, शाई, रंगांचा वापर करून चित्रे आणि अक्षरे कागदावर उठवण्याचा तो प्रारंभ होय. त्यानंतर एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात वाफेवर चालणा-या मुद्रण यंत्राचा शोध लागला आणि मुद्रणप्रक्रियेने गती घेतली. ही यंत्रे ताशी ११०० पानांची छपाई करीत असत. परंतु या गतीने ठसेजुळणी शक्य नसे. पुढे याच शतकाच्या उत्तरार्धात मोनोटाइप आणि लिनोटाइप मुद्रण यंत्रांचा शोध लागून छपाई अधिक सुबक आणि गतिमान कशी बनली याची एक कथाच हे पुस्तक सांगते.   विसाव्या शतकात या क्षेत्रत आमूलाग्र बदल झाला. एकामागून एक गतिमान छपाईची यंत्रे विकसित होत गेली. या काळात पुस्तक छपाईची गती प्रचंड वाढली. पुस्तकांची दुकाने, प्रकाशन गृहे, ग्रंथालये यांची वाढ यामुळेच होऊ शकली. छपाई सर्वसामान्यांच्या आवाक्यात आली. त्यामुळे कोणीही आपले पुस्तक स्वत:च छपाई करून प्रकाशित करू शकत होते. आता एकविसाव्या शतकात पुस्तकांची जागा मोबाईल, लॅपटॉप किंवा किंडलसदृश उपकरणे घेऊ लागली आहेत. आदिमानवाने दगड, खडकांवर ओढलेल्या ओरखड्यांपासून लॅपटॉप किंवा आयपॅडवरील आभासी लेखनापर्यंतचा थक्क करून सोडणारा लेखनाचा प्रवास डॉ.लवटे यांनी या पुस्तकात ग्रंथबद्ध केला आहे. आधुनिक जगाच्या विकासात ग्रंथाचे स्थान वादातीत आहे. त्यामुळे मुद्रण आणि ग्रंथाबाबतचे गतीने लागलेले हे शोध आणि मानवाची प्रगती याचा परस्परसंबंधही दाखवता येतो. त्यामुळे अशा प्रकारच्या लेखनातून मिळणारी माहिती अनेक कारणांसाठी आवश्यक अशीच आहे.   या पुस्तकाचा शीर्षविषय ‘वाचन' हा आहे. या विषयाला 'ग्रंथवाचन: पद्धती आणि प्रकार या मुद्यापासून सुरुवात होते. ग्रंथ कसे वाचावेत याविषयीचे विवेचन सुरू करताना डॉ. लवटे यांनी फ्रान्सिस बेकनचं एक प्रसिद्ध विधान उधृत केले आहे. बेकन म्हणतो, 'काही पुस्तकांची नुसती चव बघायची, काही गिळायची तर काही चाखत पचवायची.' अशी विधाने वाचकाला पुस्तकांची वर्गवारी करायला शिकवतात. मॉर्टिमर अडलरचे 'हाऊ टू रीड अ बुक'मधील वाचनाचे प्रकार आणि पद्धती डॉ. लवटे यांनी विस्ताराने दिलेल्या आहेत. प्राथमिक वाचन, निरीक्षक वाचन, विश्लेषणात्मक वाचन, सारभूत वाचन या वाचनाच्या प्रकारांबरोबर मुखपृष्ठ, शीर्षक व मलपृष्ठ वाचन, पुस्तकपूर्व मजकूर (मनोगत, प्रस्तावना इत्यादी), कथेतर ग्रंथामधील उपशीर्षकरचना, प्रकरणे व उपसंहार आणि समीक्षा, परीक्षणे वाचन या ग्रंथाचनाच्या पद्धती सांगून ग्रंथवाचनाला चालना देणाच्या ग्रंथालयांच्या विकासावरही भाष्य केले आहे.   वाचन ही माणसाला उन्नत करणारी प्रक्रिया आहे. वाचनाविषयी बराच विचार झालेला आहे. परंतु तो विखुरलेल्या स्वरूपात आहे. मराठीमध्ये हा विचार क्षीण स्वरूपातच दिसतो. त्यामुळे डॉ.सुनीलकुमार लवटे यांचे हे पुस्तक वाचनप्रक्रियेविषयी बरीच शास्त्रीय व संशोधित माहिती देते. माणसाच्या वाचनाचे स्वरूप एकसारखे नसते, ते स्वभावपरत्वे बदलत असते. छंद, मनोरंजन, अभ्यासव्यासंग, फावल्या वेळेचे साधन, साधना अशी वाचनाची अनेक रूपे आहे. सर्वसामान्य माणूस वाचनाकडे फावल्या वेळेचे साधन म्हणून किंवा एक छंद म्हणून पाहताना दिसतो. परंतु ही गोष्ट एवढ्यापुरती सीमित नाही, ती अजून बरेच काही आहे. त्याविषयी या पुस्तकात पुष्कळ आले आहे. वाचन शब्दाच्या उत्पत्तीपासून अर्थापर्यंत आणि व्याख्यांचाही विस्ताराने विचार येथे करण्यात आलेला आहे. वाचनाचा मूलगामी विचार करणारे जगभरातील विचारवंत-अभ्यासक वाचनाकडे कोणत्या नजरेने पाहतात, हे त्यांनी केलेल्या व्याख्यांवरून दिसून येते. वास्तविक अभ्यासकांमध्ये वाचन प्रक्रियेविषयी मतभिन्नता दिसून येते. ही मतभिन्नता अभ्यासण्यासाठी वाचनाविषयीच्या काही व्याख्या पुरेशा आहेत. त्या येथे देण्यात आलेल्या आहेत. वाचन ही अंतिमतः ज्ञानप्राप्तीसाठीची आणि आकलनाची पद्धत आहे. आपले शब्दज्ञान, भाषाज्ञान, जाणिवांचा विकास, समजविस्तार आणि एकूणच व्यक्तिमत्त्व प्रगल्भ करण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. त्यासाठी वाचन हा परिपाठ किंवा कर्मकांड करून चालणार नाही; तर वाचन एक सायास, सहेतुक कृती असल्याचे सांगायला डॉ.लवटे विसरत नाहीत.   वाचनाचे स्वरूप बहुव्याप्त आहे. त्यामुळेच वाचनाच्या अनुषंगाने अनेक उक्ती, सुभाषिते, सुविचार, घोषवाक्ये वाचनव्यवहाराशी संबंधित दिसतात. त्यापैकी काही प्रसिद्ध लेखकांचे, विचारवंतांचे विचार लेखकाने उद्धृत केले आहेत. हे सर्व विचार वाचनप्रक्रिया समजून घेण्यासाठी खूप आवश्यक आहेत. वाचन ही एक कृती, वाचन एक कला आणि वाचन एक विज्ञान या मुद्यांच्या आधाराने वाचन या संकल्पनेची व्याप्ती विश्लेषिली आहे. त्यानंतर वाचनाच्या विविध उद्देशांची चर्चा केली आहे. हे उद्देश वाचल्यानंतर वाचनातून मिळणाच्या अनेक गोष्टींची ओळख होते. शब्द, शब्दार्थ, आकलनात पडणारी भर, भाषिक सौंदर्याची अनुभूती, भाषिक कौशल्यांचा वापर आणि तिथे घडणारी भाषिक पातळीवरची सर्जनशीलता, साहित्याभिरुचीचा विकास, संवाद, संपर्कविकास, कल्पनासामर्थ्य, भावसाक्षरता, आत्मभानविकास असे वाचनातून होणारे फायदे शास्त्रीय पद्धतीने विशद केले आहेत. वाचनप्रक्रिया ही वाचनविषयक कौशल्यावर निर्धारित राहते. त्यामुळे वाचनप्रक्रिया काय असते, वाचनाचे टप्पे कोणते आणि वाचनाची कौशल्यं कोणती- या प्रश्नांची चर्चा या पुस्तकातून मुळातून समजून घेण्यासारखी आहे. वाचनकौशल्यप्राप्तीनंतर प्रभावी वाचन कसे होते, ते होण्यासाठी कोणत्या गोष्टी ध्यानात घ्याव्यात, या प्रश्नांची चर्चा डॉ.लवटे यांनी केली आहे. वाचन करून थांबायचे नसते, त्याचा पाठपुरावाही करायचा असतो कारण आपण वाचलेले आपल्या हाती लागायचे असल्यास हा पाठपुरावा अतिशय उपयुक्त असतो. त्यासाठी सारांशीकरण, क्रमवारी, अनुमान, तुलना, शंकानिरसन, अन्वये, मत वे वास्तव आणि इप्सित साध्यता या गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत. वाचनाचे अनेक प्रकार आहेत. त्यामध्ये सहज वाचन, कटाक्ष वाचन, गतिमान वाचन, सोद्देश वाचन, व्यापक वाचन, सखोल वा प्रगल्भ वाचन यांचा समावेश होतो. अशा वाचनाच्या प्रकारांची थोडक्यात ओळख येथे करून देण्यात आली आहे.   ‘वाचन साक्षरता आणि संस्कृती' या मुद्यामध्ये डॉ.लवटे याना वाचनाच्या क्षमतेपासून चर्चेला सुरुवात करून आज संगणक, मोबाईलच्या काळात वाचन संस्कृतीच्या वाटचालीचा धावता आढावा घेतलेला आहे. आज वैज्ञानिक प्रगती, माहिती तंत्रज्ञानाचा झालेल्या विकासाने वाचनप्रक्रियेला नव्या टप्प्यावर आणले आहे. ऑनलाईन पुस्तके मागवून ती ऑनलाईनच किंवा किंडलसारख्या उपकरणावर वाचन करण्यापर्यंतचा वाचनाचा प्रवास येथे दिलेला आहे. परंतु ई-बुकचे फायदे सांगताना काही फसगतही झालेली आहे. उदाहरणार्थ, ते क्षणार्धात जगातून कुठूनही बसल्याजागी मिळवून वाचता येते व तेही मोफत सारख्या विधानांमध्ये थोडीशी फसगत दिसते. वास्तविक आपल्याला हवे ते पुस्तक ई-बुक स्वरूपात उपलब्ध असणे, ते मिळवण्यासाठी तांत्रिक सिद्धता आपल्याजवळ असणे आणि ते ऑनलाईन खरेदी करण्याची आपली कुवत असणे येथे महत्त्वाची गोष्ट आहे. ई-बुकही मोठी किंमत देऊन खरेदी करावी लागतात. शिवाय ती वाचनासाठी टॅब, मोबाईल, संगणक, लॅपटॉप सारख्या महागड्या उपकरणांची गरज असते. त्याचबरोबर ही माध्यमे इंटरनेटशी जोडलेलीही असणे आवश्यक आहे. शिवाय वीज ही या उपकरणाची मुख्य गरज आहे. त्यासाठी करावी लागणारी गुंतवणूकही नव्या काळातील या माध्यमांचा विचार करताना लक्षात घ्यायला हवी. त्यामुळे या माध्यमांच्या सामर्थ्याबरोबर मर्यादांचीही ओळख वाचकाना होणे आवश्यक आहे. याखेरीज या पुस्तकामध्ये जोडलेली परिशिष्टे अतिशय मौलिक आहेत. पहिले परिशिष्ट वाचकांचे हक्क याविषयी शंकांचे निरसन करणारे आहे. दुसरे युनेस्कोतर्फ प्रकाशित झालेल्या 'दि बुक चार्टर' या पुस्तिकेचा स्वैर अनुवाद 'ग्रंथ सनद' या नावाने दिला आहे. तो या क्षेत्रात काम करणा-या सर्वांसाठी संग्राह्य झाला आहे. तिसरे परिशिष्ट वाचन सुभाषिते आहेत. चवथे परिशिष्ट सुनीलकुमार लवटे यांना वाचनप्रक्रियेविषयी सुचलेली एक दीर्घ कविताच आहे. ही कविता वाचनाविषयी बरेच काही सांगून जाते. पाचवे परिशिष्ट संदर्भसूचीचे आहे. या सर्व परिशिष्टांमधून वाचनाविषयी लेखकाने भरभरून दिले आहे.   एकूणच हे पुस्तक भाषा, अभिव्यक्ती, लेखन, मुद्रण, मुद्रणसाहित्य, ग्रंथ, ग्रंथालये आणि वाचन अशा अनेक विषयांना स्पर्श करते. ते मानवी जीवनातील ‘वाचन' या क्रियेचे महत्त्व अधोरेखित करते. मानवाच्या जीवनात वाचन ही क्रिया त्याला उन्नत करणारी ठरली आहे, हे निर्विवादास्पद आहे. अशा वाचनप्रक्रियेची शास्त्रीय मांडणी हा या पुस्तकाचा मुख्य चर्चाविषय आहे. वाचनसंस्कृती, अभिव्यक्ती आणि भाषावापराबाबत तीव्र संवेदनशील बनलेल्या आजच्या काळात या पुस्तकाचे स्वागत अनेकार्थाने महत्त्वपूर्ण आहे. डॉ. नंदकुमार मोरे मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर nandkumarmore@gmai1.com Mob. 9422628300 साप्ताहिक साधना, पुणे २० ऑक्टोबर, २०१८ अभिप्राय - ४ वाचनाचा पट उलगडणारा लघुग्रंथ : वाचन   डॉ. सुनीलकुमार लवटे यांच्या 'वाचन' या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच मॉरिशस येथील जागतिक हिंदी परिषदेत झाले. भाग्यश्री प्रकाशन या पुस्तकाचे प्रकाशक आहेत. जागतिक हिंदी परिषदेत मराठी पुस्तक प्रकाशित होणे दुर्मीळ योग! हा योग डॉ. लवटे यांच्या 'वाचन' या पुस्तकास लाभला. प्रकाशन सोहळ्यात अमराठी प्रमुख पाहुण्यांनी या पुस्तकातील उत्स्फूर्तपणे एका उता-याचे वाचन केले आणि तात्काळ उता-याचा संक्षेपाने अनुवादही केला. 'वाचन' या पुस्तकाच्या लेखनाचे हे प्राथमिक यश होते.  डॉ. सुनीलकुमार लवटे हे मराठी, हिंदी वाङ्मयाचे जेष्ठ लेखक म्हणून सुपरिचित आहेत. त्यांची लेखनाची भाषा अत्यंत प्रवाही व वाचकमनाला भिडणारी असते. वास्तव आणि संशोधनपर लेखनावर त्यांचा प्रमुख भर आहे. माणसाच्या दैनंदिन जीवनाला उपयोगी होईल, असा त्यांच्या लेखनाचा व व्याख्यानाचाही कल असतो. त्यांच्या अत्यंत पारदर्शी आणि सत्शील जगण्याचे प्रतिबिंब त्यांच्या लेखनात आणि वर्तनात दिसते. अल्पावधीत त्यांचे वाचन' हे पुस्तक वेगाने वाचकांपर्यंत जात आहे. केवळ १४१ पानांच्या या छोटेखानी पुस्तकात डॉ. लवटे यांनी वाचनाविषयीच्या त्यांच्या आठ-दहा वर्षांच्या चिंतनाचे सारच मांडले आहे. वाचनाच्या उत्पत्ती आणि प्रक्रियेचा स्पष्टपणे पट उलगडणारा लघुग्रंथ, असेच वर्णन या पुस्तकाचे करता येईल.  तुम्हास प्रगल्भ वाचक व्हायचे असेल तर वाचन' ग्रंथ वाचण्याशिवाय पर्याय नाही, असा ठाम विश्वास डॉ. लवटे आपल्या मनोगतात व्यक्त करतात. तसेच अर्पण पत्रिकेत 'वाचन असोशी' हा शब्दप्रयोग वापरून डॉ. लवटे वाचकांची उत्कंठा वाढवितात. प्रत्यक्ष विषयप्रवेशापूर्वी वाचकाला पाच मूलभूत प्रश्न विचारले आहेत. हे प्रश्न वाचून वाचक अंतर्मुख होतील आणि अधिक सजगतेने या पुस्तकाचे वाचन करतील, अशी रचना करण्यात आली आहे.  ‘वाचन' हा लघुग्रंथ डॉ. लवटे यांनी आपल्यासमोर दोन स्तरावर स्पष्ट केला आहे. पहिला स्तर आहे वाचनाच्या उत्पत्तीचा आणि दुसरा स्तर आहे प्रत्यक्ष वाचनप्रक्रियेचा! परिशिष्टात अनभिज्ञ बाबींचा समावेश करून वाचकांना त्यांनी सुखद धक्का दिला आहे.  माणूस हा समाजशील आणि संवादशील प्राणी आहे. दुस-यांशी सातत्याने तो संवाद साधण्यास उत्सुक असतो. संवादासाठी माणूस खुणा, चिन्हे, वस्तू यांचा वापर करायचा. माणूस बोलू लागला आणि त्याचा भाषाविकास विकसित होत गेला... वाचन प्रक्रियेपूर्वी वाचनाच्या उत्पत्तीचा मूळ गाभा समजून घेणे आवश्यक ठरते. पुस्तकाच्या पहिल्या चार प्रकरणात वाचन उत्पत्तीचा उहापोह करण्यात आला आहे. अविष्कार, अनुभूती आणि अभिव्यक्ती या अंगाने माणूस व्यक्त होत असतो. बोलण्याच्या सामर्थ्याने माणसाचं व्यक्त होणं अधिक प्रभावी होतं. आज जगात ५००० ते ७००० भाषा आहेत. पैकी ५०० भाषा भारतात आहेत. परंतु फक्त बोलणे हवेत विरून जातं. आपलं कितीतरी मोठं लोकवाङ्मय मौखिक परंपरेने चालत आलं आहे. लोकगीते, लोककथा, लोकनाट्य, उखाणे, हुमाण, ऋतुगीते अशी काही उदाहरणे या पुस्तकात थोडक्यात स्पष्ट केली आहेत. लेखनलिपी आणि त्यासाठीचे साहित्य आले आणि भाषा विकासात क्रांती झाली. लेखनाचा उगम, लिपीची उत्क्रांती वाचताना डॉ. लवटे यांच्या संशोधनपद्धती आणि अचूक संदर्भाबद्दल आश्चर्ययुक्त कौतुक वाटते. भारतीय भाषा आणि लिपी याचा थोडक्यात आढावाही येथे घेतलेला दिसतो.  लेखन कलेच्या शोधामुळे पुस्तक, ग्रंथांची निर्मिती झाली. 'बुक' हा शब्द जुन्या इंग्रजीतील या BOC शब्दापासून निर्माण झाला आहे, अशी माहिती डॉ. लवटे देतात. लेखन, मुद्रण, यंत्र, ग्रंथांचे स्वरूप आणि ग्रंथवाचन याचबरोबर सर्वाधिक जुने पुस्तक कोणते याविषयीची रंजक व उपयुक्त माहिती वाचन ग्रंथाच्या वाचनानेच वाचकांनी मिळवावी.  लिखित सामग्री समोर आली की तिचे प्रगट वा मौन वाचन करणे ही प्रक्रिया सुरू होते. वाचन ही एक भाषिक, वाचिक आणि मानसिक कृती आहे. ही प्रक्रिया स्पष्ट करण्यासाठी डॉ. लवटे यांनी पुस्तकाची एक्केचाळीस पाने खर्च घातली आहेत. यात वाचनाचे स्वरुप, उद्देश, वाचनाचे टप्पे विशद करून प्रभावी वाचनाच्या दहा 'टिप्स' दिल्या आहेत. वाचनोतर पाठपुरावा व्हावा, अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. वाचनाचे जीवनातील महत्व आणि वाचनसाक्षरता स्पष्ट करून डॉ. लवटे वाचन प्रक्रिया अधोरेखित करतात. ई-बुक विषयी अगदी नवनवी माहिती देऊन वाचकाला पुस्तक खिळवून ठेवते. अनेक वाचकांनी केवळ २४ तासात पुस्तक वाचून अभिप्राय दिले आहेत.कोल्हापुरातील एका न्यायाधिशांनी पुस्तक वाचून काव्यात्म अभिप्राय दिला आहे. इंगवले या सद्गृहस्थांनी तर सोशल मीडियाद्वारे ‘वाचन' पुस्तकातील उतारा अंश दररोज प्रसिद्ध करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. वाचन पुस्तकाच्या सुलभ आकलनाचे हे द्योतक आहे.   परिशिष्टात वाचकांचे हक्क, ग्रंथ सनद तसेच मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील सुभाषिते देऊन वाचकांची वाचन असोशी पुरविण्याचा प्रयत्न केला आहे.विषयाच्या अनुषंगाने डॉ. लवटे यांनी एकाच बैठकीत, एका प्रवाहात लिहिलेली दीर्घ कविता तब्बल बारा पाने व्यापते. दीर्घ असूनही अर्थवाही असणारी त्यांची कविता पुस्तके माणसाचे अविभाज्य अंग आहे असे सूचीत करते. पुस्तके आणि मी परस्परात समरस झालोय, असा आत्मसंवाद या कवितेतून प्रकट होतो. वाचन प्रेरणा दिनी (१५ ऑक्टोबर) भाग्यश्री प्रकाशन आणि वाचनकट्टा, कोल्हापूर यांच्यामार्फत वाचन पुस्तक संदर्भ ग्रंथ ठेवून विद्यार्थ्यांसाठी प्रगल्भ वाचक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. वाचन चळवळ बळकट करणाची ही एक विधायक कृती आहे.   आकर्षक मुखपृष्ठ आणि अंतर्मुख करणारे मलपृष्ठ (ब्लर्ब) वाचले की हे पुस्तक घेण्याचा मोह होणारच? प्रत्येकाने संग्रही ठेवण्याचे आणि इतरांना भेट देण्याचे पुस्तक म्हणून 'वाचन' या पुस्तकाची ओळख होईल. अशी खात्री वाटते! - विश्वास सुतार शिक्षणाधिकारी, कोल्हापूर ९४२०३५ ३४५२ (तरुण भारत, बेळगाव । अक्षरयात्रा । २१-१०-२०१८) परिशिष्ट ६ वाचन : संदर्भसूची

  • निबंधमाला (भाग १,२,३) : विष्णुशास्त्री चिपळूणकर संपा. वा. वि.साठे (१८८८, १८८९, १८९७)
  • अक्षरनिष्ठांची मांदियाळी : अरुण टिकेकर

रोहन प्रकाशन, पुणे, पृ. १७३/किं. रु. १४०/३१ मार्च २००५

  • वाचनवेध : संपा. कौतिकराव ठाले-पाटील/श्रीधर नांदेडकर

मराठवाडा साहित्य परिषद प्रकाशन, औरंगाबाद, पृ. १४०/ किं. रु. १५०/२००८

  • लिहित्या लेखकाचं वाचन : विलास सारंग

शब्द पब्लिकेशन, बोरीवली, मुंबई - ९१. पृ. १६०/किं. रु. १६०/२०११

  • वाचा आणि श्रीमंत व्हा : बर्क हेजेस अनु. प्राजक्ता चित्रे

पेंटॅगॉन प्रेस, नवी दिल्ली, पृ. १७२/किं. रु. १६५/२०१३

  • बुकशेल्फ : अभिलाष खांडेकर

साकेत प्रकाशन, औरंगाबाद, पृ. २०८/किं. रु. २२५/२०१४

  • वाचताना, पाहताना, जगताना : नंदा खरे

लोकवाङ्गय प्रकाशन गृह. मुंबई २५,पृ. १५०/किं. रु. २००/२०१४

  • ग्रंथगप्पा : शरद गोगटे

मॅजेस्टिक पब्लिशिंग हाऊस, ठाणे/पू. १६०/किं. रु. २००/२०१६

  • लीळा पुस्तकांच्या : नितीन रिंढे

लोकवाङ्मय गृह, मुंबई २५/पृ. १८९/किं. रु. २५०/२०१७

  • वाचू आनंदे : माधुरी पुरंदरे (भाग २)
ज्योत्स्ना प्रकाशन, पुणे/पू. १९२/किं. रु. ३००/२००१
  • वाचू आनंदे, मिळवू परमानंदे : नरेंद्र लांजेवार

सुमेरू प्रकाशन, डोंबिवली/पृ. ६३/किं. रु. ५०/२००५

  • एका ग्रंथपालाची प्रयोगशाळा : नरेंद्र लांजेवार

साकेत प्रकाशन, औरंगाबाद/पृ. ११७/किं. रु. १००/२०१२

  • थर्ड अँगल : विनोद शिरसाठ

साधना प्रकाशन, पुणे/पृ. ६३/किं. रु. ५०/जून २०१६

  • दुर्मिळ अक्षरधन : अविनाश सहस्रबुद्धे

वरदा बुक्स, पुणे/पृ. २५९/किं. रु. १२०/मे, १९९३

  • चालता-बोलता माणूस : करुणा गोखले ।

राजहंस प्रकाशन, पुणे/पृ. १६० किं. रु. २२० डिसेंबर २०१७

  • वाचन आणि ज्ञानार्जन : यादव शंकर बाबीकर/केशव हरि पौडवाल/गोविंद सखाराम सरदेसाई/वि.गो. विजापूरकर/ग्रंथमाला/कोल्हापूर (संयुक्त)

पृ. ५५ + ४२/१९००/ मासिक किं. १० आणे + ८ आणे + ५ आणे

  • ग्रंथदर्शन : डॉ. द. दि. पुंडे

पद्मगंधा प्रकाशन, पुणे/पू. १९६/किं. रु. २००/ २६ जाने. २०१३

  • वाचणा-याची रोजनिशी : सतीश काळसेकर

लोकवाङ्मय गृह, मुंबई २५/पृ. २९२/ किं. रु. २५०/जुलै २०१०

  • ग्रंथांच्या सहवासात : संपा. सारंग दर्शने

मॅजेस्टिक प्रकाशन, ठाणे/पृ. १९८/किं. रु. २५०/५ मे २००९

  • शब्दांचं धन : मारुती चितमपल्ली
साहित्य प्रसार केंद्र, नागपूर/पृ. १८४/किं. रु. १८०/१९९३
  • गोष्ट खास पुस्तकांची : संपा. सुहास कुलकर्णी

समकालीन प्रकाशन, पुणे ३०/पू. १८४/किं. रु. २००/१ सप्टें. २०१५ ■ How to Read a Book : Mortimer Adler/Charles Van Doren
Simon And Schuster, New York (USA) , Pages 424/1972
■ The Wonderful World of Books : Ed. Alfred Stafferus
The New American Library, New York (USA) , Pages 311/1953
■ 100 Great Books : Ed. Jim Carning
Odhams Books Ltd. London (U.K.)


विशेषांक
वाचू आनंदे (चतुरा पुरवणी) : संपा. कुमार केतकर
लोकसत्ता, मुंबई/पृ. ३३ / सप्टेंबर, २००६
वाट आनंदाची (चतुरा पुरवणी) : संपा. कुमार केतकर
लोकसत्ता प्रकाशन, मुंबई/पृ. ३२/ऑक्टोबर, २००६
वाचन संस्कृती अभियान अंक : संपा. नरेंद्र दाभोळकर
साधना प्रकाशन, पुणे/पू. ३२ / ३ मार्च, २००७
ग्राहकहित (दिवाळी अंक) : माझी वाचन संस्कृती विशेषांक, २०१४
संपा. सूर्यकांत पाठक/पू. ३७८/किंमत रु. १००
लोकराज्य : वाचन एक अमृतानुभव विशेषांक
संपा. विजय नाइटा/प्रल्हाद जाधव
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, मंत्रालय, मुंबई/पृ. १५४/किं. रु. १०/जून-जुलै, २०११
श्री दीपलक्ष्मी क्लासिक (१९५८-२०००) : संपा. ग.का. रायकर
जयहिंद प्रकाशन, मुंबई/पृ. ३८४/किं. रु. ३५०/नोव्हें., २००१
महाराष्ट्र टाइम्स (सुवर्णमहोत्सवी दिवाळी अंक) : २०११
संपा. अशोक पानवलकर/पृ. २२३/किं. रु. ७०
पालकनीती (वाचन विशेषांक) दिवाळी २००८ :
संपा. संजीवनी कुलकर्णी/पृ. १५८ किं. रु. २३
अंतर्नाद (दिवाळी २००६) : श्रेष्ठ पुस्तके विशेषांक
संपा. भानू काळे/सौ. वर्षा काळे/पू. २३४/किं. रु. ९०/२००६

 100 Books That Can Change Your Life : Outlook New Year Issue)
  Ed. Krishra Prasad/ Pages 178 / RS. 40/ 12 Jan. 2015
 Tehalka {12 Jan. 2013) : Books and Leaders
  Ed. Tann Tejpal/Pages 100/Rs. 25/-

◼◼


डॉ. सुनीलकुमार लवटे : साहित्य संपदा (प्रथम आवृत्ती क्रम)


१.  खाली जमीन, वर आकाश (आत्मकथन)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/फेब्रु. २००६/पृ. २१०/रु. १८० सहावी आवृत्ती
२. भारतीय साहित्यिक (समीक्षा)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/सप्टें. २००७/पृ. १३८/रु. १४० तिसरी आवृत्ती
३. सरल्या ऋतूचं वास्तव (काव्यसंग्रह)
निर्मिती संवाद, कोल्हापूर/९ ऑगस्ट, २०१२/पृ.१००/रु.१००/दुसरी सुधारित आवृत्ती
४. वि. स. खांडेकर चरित्र (चरित्र)
श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर/सप्टें. २०१२/पृ.१८६/रु.२५०/तिसरी सुधारित आवृत्ती
(अक्षर दालन)
५. एकविसाव्या शतकातील शिक्षण (शैक्षणिक लेखसंग्रह)
सह्याद्री प्रकाशन, पुणे/मे, २०१३/पृ.१७६/रु.२२५/दुसरी सुधारित आवृत्ती (अक्षर दालन)
६. कोल्हापूरचे स्वातंत्र्योत्तर समाजसेवक (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१३/पृ.१७५/रु.२००/तिसरी आवृत्ती
७. प्रेरक चरित्रे (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१३/पृ.३१/रु.३५/तिसरी आवृत्ती
८. दुःखहरण (वंचित कथासंग्रह)
लोकवाङ्मय गृह, मुंबई/जुलै, २०१३/पृ.१३०/रु.१७५/दुसरी आवृत्ती (अक्षर दालन)
९. निराळं जग, निराळी माणसं (संस्था/व्यक्तिविषयक लेखसंग्रह)
लोकवाङ्मय गृह, मुंबई/जुलै, २०१३/पृ.१४८/रु.२००/दुसरी आवृत्ती (अक्षर दालन)
१०. शब्द सोन्याचा पिंपळ (साहित्यविषयक लेखसंग्रह)
रावा प्रकाशन, कोल्हापूर/१६ डिसें. २०१३/पृ.२११/रु.२७५/तिसरी सुधारित आवृत्ती (अक्षर दालन)
११. आकाश संवाद (भाषण संग्रह)
स्पर्श प्रकाशन, राजापूर/२८ डिसें. २०१३/पृ.१३३/रु.१५०/दुसरी सुधारित आवृत्ती
१२. आत्मस्वर (आत्मकथनात्मक लेख व मुलाखती संग्रह)
साकेत प्रकाशन, औरंगाबाद/२०१४/पृ.१६०/रु.१८०/प्रथम आवृत्ती

१३.  एकविसाव्या शतकातील समाजिक प्रश्न (सामाजिक लेखसंग्रह)
शब्दवेल प्रकाशन, कोल्हापूर/१५ मार्च, २०१४/पृ.१९४/रु.२००/दुसरी आवृत्ती (अक्षर दालन)
१४. महाराष्ट्रातील महिला व बालकल्याण : दशा आणि दिशा (सामाजिक
लेखसंग्रह) अक्षर दालन, कोल्हापूर/जाने. २०१४/पृ.१७६/रु.२००/तिसरी आवृत्ती (अक्षर दालन)
१५. वंचित विकास : जग आणि आपण (सामाजिक लेखसंग्रह)
श्रमिक प्रतिष्ठान, कोल्हापूर/एप्रिल, २०१४/पृ.११९/रु.२००/दुसरी आवृत्ती (अक्षर दालन)
१६. समकालीन साहित्यिक (समीक्षा)
मेहता पब्लिशिंग हाऊस, पुणे/२०१५/पृ.१८६/रु.२००/दुसरी आवृत्ती
१७. नवे शिक्षण, नवे शिक्षक (शैक्षणिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/ऑक्टो. २०१६/पृ.२१२/रु.२२५/दुसरी आवृत्ती
१८. भारतीय भाषा व साहित्य (समीक्षा)
साधना प्रकाशन पुणे/२ ऑक्टो. २०१७/पृ. १८६/रु. २००/दुसरी आवृत्ती
१९. मराठी वंचित साहित्य (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर/ २०१८/पृ.८३ रु.१५० /पहिली आवृत्ती
२०. साहित्य आणि संस्कृती (साहित्यिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/ २०१८/पृ. १९८ रु. ३०० /पहिली आवृत्ती
२१. माझे सांगाती (व्यक्तीलेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१३६ रु.१७५ /पहिली आवृत्ती
२२. वेचलेली फुले (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर/ २०१८/पृ. २२० रु. ३०० /पहिली आवृत्ती
२३. सामाजिक विकासवेध (सामाजिक लेखसंग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/२०१८/पृ.१८५ रु.२५० /पहिली आवृत्ती
२४. वाचावे असे काही (समीक्षा)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.१५५/रु.२००/पहिली आवृत्ती
२५. प्रशस्ती (प्रस्तावना संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर २०१८/पृ.२८२/रु.३७५ /पहिली आवृत्ती
२६. जाणिवांची आरास (स्फुट संग्रह)
अक्षर दालन, कोल्हापूर/ २०१८/पृ.१७७/रु.२५०/पहिली आवृत्ती
२७. वाचन (वैचारिक)
भाग्यश्री प्रकाशन, कोल्हापूर/१५ ऑगस्ट, २०१८/पृ.१४१/रु.१५०/दुसरी आवृत्ती


आगामी • भारतीय भाषा (समीक्षा) • भारतीय साहित्य (समीक्षा) • भारतीय लिपी (समीक्षा)

  • वरील सर्व पुस्तके मिळण्याचे ठिकाण -

• भाग्यश्री प्रकाशन, बिल्डिंग ३ बी, फ्लॅट क्र. १०२, पहिला मजला, लेक व्हिस्टा,परांजपे स्कीम, अंबाई टॅक परिसर, रंकाळा तलावामागे, कोल्हापूर - ४१६०१० फोन : ७३८७७३६१६८ • अक्षर दालन, २१४१, बी वॉर्ड, मंगळवार पेठ, कोल्हापूर, फोन : ०२३१-२६४६४२४