वर्ग चर्चा:मृत्यूवर्ष अज्ञात असलेले साहित्यिक

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

कृपया उन्मेषानंद ह्या लेखकाची नोंद ह्या वर्गातून काढून टाकावी. http://mr.wikisource.org/wikii/साहित्यिक:उन्मेषानंद ह्या ठिकाणी आलेली आहे. वेदवाणी प्रकाशन

हायकाय नायकाय[संपादन]

काय व्ह मंदारराव, ह्यो कसल्या वर्गाच नाव म्हनता ?(अगंबाई, काही जनांना आपल्या नावात काना मात्रा चुकली तर दुखतं ,पन दुसऱ्य्यास्नी रडवताना डोस्क कुठ फिराया जात्ं म्हन्त्ये मी ?). जगातल्या सर्वच हयात साहित्यिकांची मृत्यूवर्ष आम्हाला अज्ञात न्हव का  ? तुम्हास्नी असली भविष्यवाणी ठावं असल्यास चुक भूल द्यावी घ्यावी :) पण ठासून भरल्यास आमच अन तुमचबी नाव अशा वर्गात येऊ शकन की न्हाई ? आमच मामंजी म्हन्त्यात वर्गाची कल्पना भारी हाय पन येकतर नावाबद्दल पुन्हा ईचारा व्हावा.

आनी दुसरं म्हन्जी, ज्या मानसांची मृत्यूवर्ष म्हर्हाठी इकिपीडियावर आली हायत त्यास्नी शोधायचे बी कष्ट न घ्येता , या वर्गात भरता त्ये बद्द्ल बी ईचार व्हाया हवा . आपली प्र्येमळ हायकाय नायकाय अक्का (चर्चा) १४:५६, १० ऑक्टोबर २०१२ (IST)Reply[reply]

आपला थोडा गैरसमज झाला आहे. हे वर्ग आणि साचे जे मुख्यत्वे करून इंग्रजी विकिस्रोत वरून आणलेले आहेत. आणि त्या साच्यात जर काही आकडा भरला नाही तर आपोआप "जन्मवर्ष अज्ञात असलेले साहित्यिक" किंवा "मृत्यूवर्ष अज्ञात असलेले साहित्यिक" या वर्गात आपोआप ते भरले जाते. याचा अर्थ त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे असा होत नाही. आपण हे इंग्रजी विकिस्रोत वर तपासू शकता. आपल्या भावना त्यामुळे जर दुखावल्या गेल्या असल्यास मी आपली क्षमा मागतो. तूर्त मी ते पण वगळले आहे.... Mvkulkarni23 (चर्चा) २१:२५, ११ ऑक्टोबर २०१२ (IST)Reply[reply]