लक्षदीप

विकिस्रोत कडून

________________

लक्षदीय निवडक लक्ष्मीकांत देशमुख २ ८ नातेसंवंध सी श्रुणहत्या दहशत? बालमजुरी जमरी श्रुटचार संपादक : डॉ. रणधीर शिंदे ________________

लक्षदीय निवडक लक्ष्मीकांत देशमुख ________________

TM दिलीपराज प्रकाशनाची सर्व पुस्तके आता आपण Online खरेदी करू शकता. आमच्या Website ला कृपया एकदा अवश्य भेट द्या. अथवा Email करा. www.diliprajprakashan.in Email - diliprajprakashan@yahoo.in - - l:: F EE: FFTHE 11 ________________

लक्षदीप निवडक लक्ष्मीकांत देशमुख संपादक : डॉ. रणधीर शिंदे ।। 1।। - - -- - --- - TM दिलीपराज प्रकाशन प्रा. लि. २५१ क, शनिवार पेठ, पुणे -४११०३० ________________

लक्षदीप / LAKSHADEEP (निवडक लक्ष्मीकांत देशमुख ) संपादक : डॉ. रणधीर शिंदे प्रकाशक राजीव दत्तात्रय बर्वे, मॅनेजिंग डायरेक्टर, दिलीपराज प्रकाशन प्रा. लि., २५१ क, शनिवार पेठ, पुणे - ४११ ०३०. दूरध्वनी क्रमांक (फॅक्ससहित) | २४४७१७२३ २४४८३९९५ । २४४९५३१४ © लक्ष्मीकांत देशमुख • प्रथमावृत्ती - १४ फेब्रुवारी २०१५ • प्रकाशन क्रमांक - २२०४ ISBN : 978 - 93 - 5117 - 042 - 6 मुद्रक मधुराज प्रिंटर्स अॅण्ड पब्लिकेशन्स् प्रा. लि. स. नं. २९/८-९, पारी कंपनीजवळ, धायरी, पुणे - ४११ ०४१ टाईपसेटिंग का. वि. शिगवण, अक्षरवेल दत्तवाडी, पुणे ४११ ०३० मुद्रित शोधन : एस. एम. जोशी मुखपृष्ठ : सुहास चांडक मूल्य - १ पाचशे मात्र या पुस्तकातील कोणताही मजकूर, कोणत्याही स्वरूपात वा माध्यमात पुनःप्रकाशित अथवा संग्रहित करण्यासाठी लेखक व प्रकाशकाची लेखी पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक आहे.

|| प्रस्तावना[संपादन]

 लक्षदीप हा लक्ष्मीकांत देशमुख यांच्या निवडक साहित्याचा संपादित संग्रह.देशमुख यांनी १९८० नंतर विविधस्वरूपी लेखन केलेले आहे.सनदी अधिकारी म्हणून ते नुकतेच निवृत्त झाले आहेत.कथा, कादंबरी,ललित व वैचारिक असे त्यांच्या लेखनाचे स्वरूप आहे.देशमुख यांनी लिहिलेल्या विविध प्रकारातील प्रातिनिधिक स्वरूपात लेखनाचा समावेश या संपादनात केला आहे.कथा,नाटक,ललित व प्रवासवर्णन व वैचारिक लेखांचा अंतर्भाव या संपादनात आहे.कादंबरीचा अंश देण्यामुळे तिची एकात्मता नाहीशी होईल म्हणून कादंबरी संहिता दिलेली नाही.त्यामुळे या संपादनात कादंबरीलेखनाचा समावेश पृष्ठसंख्येमुळे केलेला नाही.मात्र प्रस्तावनेत त्यांच्या कादंबरीलेखनाचे वेगळेपण नोंदविले आहे.
 एक लेखक म्हणून लक्ष्मीकांत देशमुख यांच्या घडणीमागे विविध ठिकाणचे प्रदेश व अनुभवक्षेत्र साहाय्यभूत ठरले आहेत.तसेच त्या घडणीच्या मागे असणा-या कालधर्माचाही संबंध आहे.साधारणतः स्वातंत्र्यानंतरच्या तीनेक दशकाच्या काळात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची व लेखकपणाची घडण झालेली आहे. स्वातंत्र्यानंतर समूहजीवनात आलेली नवी स्वप्नकांक्षा,या स्वप्नकांक्षेला सांस्कृतिक जगाने दिलेला प्रतिसाद त्या काळात देशमुख घडत होते.तसेच १९६० नंतरच्या मराठी साहित्यविश्वात अनुभवविश्वाचे काही उद्रेक घडत होते.त्याचेही सादपडसाद या काळातील व्यक्तींवर-लेखकांवर घडणे स्वाभाविक होते.मुरुम (जि. उस्मानाबाद) हे लक्ष्मीकांत देशमुख यांचे जन्मगाव,वडील शिक्षक होते.त्यांच्या विविध ठिकाणी बदल्यांमुळे त्यांचे शिक्षण वेगवेगळ्या गावी घडले.निजामी राजवटीच्या खाणाखुणा असणा-या प्रदेशाचे संस्कार त्यांच्यावर झाले.वाचनाचा पहिला संस्कार त्यांना त्यांच्या आईकडून झाला.उस्मानाबाद,नांदेड येथे त्यांचे शिक्षण झाले.डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून त्यांनी रसायनशास्त्र विषयात एम.एसस्सी. पदवी मिळवली.संशोधनाची आवड असल्यामुळे त्यांनी पीएच.डी.साठी नाव नोंदविले.मात्र विद्यापीठीय संशोधनाचा काच त्यांना सहन झाला नाही त्यामुळे ते तेथे रमले नाहीत.दरम्यान स्टेट बँक रिक्रूटमेंटद्वारे त्यांना नोकरी मिळाली.मात्र त्यांच्या मनात आयएएस अधिका-यांचे स्वप्न होते.बँकेत असताना स्पर्धापरीक्षेचा ते अभ्यास करू लागले व लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत त्यांना यश मिळाले.१९८३ मध्ये ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत सर्वप्रथम आले लवकरच ते प्रशासन सेवेत दाखल झाले.आणि १९९६ साली त्यांना आय.ए.एस.चा दर्जा मिळाला.प्रशिक्षण कालावधीसाठी त्यांचे पोस्टिंग दहीवडी (जि. सातारा) येथे झाले.या प्रशिक्षण कालावधीत त्यांना व्ही.पी.राजा नावाचे आय.एस. अधिकारी लाभले.राजा यांच्या कार्यशैलीचा व श्रेष्ठ अशा उच्चतर नैतिक गुणांचा प्रभाव पडला,याचा ते वारंवार कृतज्ञतेने उल्लेख करतात.साधारणत: या काळातील सामाजिक अवकाश,देशमुख यांच्या घरातील वातावरण,संस्कार व वाचन याचा प्रत्यक्षाप्रत्यक्ष परिणाम त्यांच्या लेखनावर आहे.
 त्यानंतर त्यांची भूम (जि. उस्मानाबाद) येथे प्रांत म्हणून बदली झाली.भूम हे तसे आडवळणाचे दुष्काळी गाव.भूममध्ये त्यांनी अनेक लोकाभिमुख कामे केली.त्यानंतर त्यांनी अकोला,नांदेड,परभणी,सांगली,पुणे व कोल्हापूर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी,निवासी जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी म्हणून काम केले.सप्टेंबर २०१४ साली मुंबई येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीचे कार्यकारी संचालक म्हणून ते निवृत्त झाले.त्यांच्या प्रशासकीय कामाचा तपशील मुद्दाम दिला आहे.याचे कारण देशमुख यांच्या लेखनाचे विषय या प्रदेशांनी व तिथल्या अनुभवांनी पुरविलेले आहेत.परभणी,कोल्हापूर गावामध्ये त्यांच्या अनेक साहित्यकृतींची निर्मिती झालेली आहे.दीर्घकाळ त्यांनी ज्या प्रशासकीय व्यवस्थेत काम केले तेथील अनुभवाधारित चित्रणविषय आलेले आहेत.प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी अनेक लोकोपयोगी कामांची आखणी करून त्याची परिपूर्ती केली.विविध ठिकाणच्या त्यांच्या कार्यकाळात सेव्ह द बेबी गर्ल,स्वस्त धान्य दुकानांचा काळाबाजार रोखण्यासाठी सुरू केलेली एम. डिस्ट्रीब्युशन व व्हीटीएस सेवा,औढ साक्षरता अभियान प्रकल्प,ई-चावडी,अकोल्यातील बालमजुरांसाठीचा नवजीवन प्रकल्प व पुणे येथील शिवछत्रपती क्रीडानगरीतील अद्ययावत संकुल ही त्यांची काही लक्षणीय प्रशासकीय स्वरूपाची कामे होत.त्यांच्या लेखनाचे मुख्य केंद्र या जीवनातून उद्भवलेले आहे.एक सकारात्मक रचनात्मक दृष्टिकोनातून प्रशासन व्यवस्थेकडे पाहणारा अधिकारी आणि व्यक्तिमत्त्वातील संस्कार या दुहेरी गोफातून त्यांचे वाङ्मयविश्व अवतरलेले आहे.या विविध तन्हेच्या अनुभवांचा उपयोग त्यांनी लेखनासाठी केला.प्रशासकीय जीवनातील विविध रंगचित्रे त्याच्या भल्याबुच्यासह ललित साहित्यातून मांडली.
 मराठवाडा हा त्यांच्या घडणीचा व प्रशासकीय सेवेचा दीर्घकाळ कालावधी राहिला.या परिसराशी ते आंतरिकरीत्या जोडले गेलेले आहेत.या प्रदेशाने व तिथल्या

लोकजीवनाने त्यांना लेखनाचे अनेक विषय दिले आहेत.लेखक म्हणून परिसराशी त्यांची जैव स्वरूपाची गुंतवणूक आहे.

२.

 देशमुख यांनी विविधस्वरूपी वाङ्मयाची निर्मिती केली आहे.कथांजली (१९८७),अंतरीच्या गूढगर्भी (१९९५),उदक (१९९७) (पुढील आवृत्तीचे शीर्षक - पाणी! पाणी! पाणी!),नंबर वन (२००८),अग्निपथ (२०१०) व सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी (२०१३) हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध आहेत. सलोमी (१९९३),ऑक्टोपस (२००६),अंधेरनगरी (१९९४),होते कुरूप वेडे (१९९७), इन्किलाब विरुद्ध जिहाद (२००४) व हरवलेलं बालपण (२०१४) या त्यांच्या कादंब-या प्रकाशित आहेत.दूरदर्शन हाजीर हो (बालनाट्य, १९९७) व अखेरची रात्र (२०१४) ही त्यांची नाटके प्रकाशित आहेत.याशिवाय प्रशासननामा (२०१३) व बखर प्रशासनाची (२०११) ही त्यांची प्रशासनविषयावरील दोन पुस्तके प्रकाशित आहेत.शिवाय विविध नियतकालिकांतून त्यांनी वैचारिक,सामाजिक व प्रवासवर्णनपर लेखनही केले आहे. त्यांच्या काही कथांवर चित्रपटनिर्मिती होते आहे.

३.

 १९६५-६६ दरम्यान बालवयात साधना साप्ताहिकातील एका बालकथेने त्यांच्या लिखाणाला सुरुवात झाली.पुढे काही रहस्यकथाही त्यांनी लिहिल्या.कथासाहित्यप्रकारात देशमुख यांनी विविधस्वरूपी लेखन केले आहे.'अंतरीच्या गूढगर्भी'पासून ‘सावित्रीच्या गर्भात मारलेल्या लेकी' असे त्यांचे सहा कथासंग्रह प्रकाशित आहेत.आरंभीच्या कथालेखनावर रोमँटिक आदर्शवादाची छाया आहे. कथांजली व अंतरीच्या गूढगर्भी या संग्रहातील कथाविश्व मध्यमवर्गीय भावविश्वाशी संबंधित आहे. स्त्रीपुरुष नात्यांचा शोध,मानवी वर्तनातील काही तणावांचे चित्र या कथाचित्रणात आहे.पुढे मात्र समस्याकेंद्री कथामालिका त्यांनी लिहिल्या.समकाळात भेडसावणाच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांवर त्यांनी लक्ष केंद्रित केले.एका आशयसूत्राच्या विविध परी चित्रित करण्याचा हा प्रयत्न केला आहे.पाणीसमस्या,खेळाडूंचे भावविश्व व स्त्रीभ्रूणहत्येचा प्रश्न या जीवनाधारित कथांचे संग्रह पुढील काळात प्रसिद्ध झाले.एकेक प्रश्न घेऊन त्या प्रश्नांचे विविध कंगोरे धुंडाळण्याची ही रीत आहे.'थीमबेस्ड कथा' असे त्यांना म्हटले आहे.सामाजिक समस्यांचे चित्रण करणाच्या या महत्त्वाच्या कथामाला आहेत.
 या संग्रहात ‘मर्सी किलिंग' ही वेगळ्या विषयावरची कथा आहे.प्रियू नावाच्या कुटुंबवत्सल स्त्रीला मुलगा होतो.तो केवळ शरीराने वाढतो.मेंदू व बुद्धीने वाढ न होणारा तो मांसाचा गोळा होता. आपल्यानंतर त्याचे कसे होईल या भावनेने ती अनिच्छेने मस किलिंग करते,जगणे हे जेव्हा मरणाहून दुःसह होते.तेव्हा रुग्णाच्या नातेवाईकांच्या परवानगीने त्याचा मृत्यू घडविला जातो.त्याप्रमाणे कथानायिका आपल्या मुलाला नाहीसे करते.पुढे ती मनाला विरंगुळा वाटावा म्हणून बालवीरांच्या साहसकथा लिहिते.त्या कथा लोकप्रिय होतात.अनेक बालवाचकांची तिला पत्रे येतात.तिच्या लेखनाची वाचकप्रियता एका बाजूला उंचीवर आलेली असता तिच्या कथेतील मानसपुत्र नंदूचा ती शेवट करते.याचा तिला त्रास होतो.प्रत्यक्षातील जगणे आणि कलानिर्मिती यातला हा ताण आहे.कलानिर्मितीतील जीवनानुभवावर प्रत्यक्षातल्या जगण्यातले दाब असतात.या द्वंद्वातून या कथेची निर्मिती झाली आहे.'अंतरीच्या गूढगर्मी कथेत मानवी मनातील भावस्पंदनाचा विचार आकारला आहे.आत्मपर निवेदनातून उलगडलेली ही कथा आहे.कथेतील मी मानसशास्त्रज्ञ आहे.औरंगाबादला जया नावाच्या मुलीशी त्याचा विवाह झालेला.तिचे आधी मकरंद नावाच्या तरुणाशी लग्न ठरलेले; परंतु लग्नापूर्वीच एका अपघाताने तो मरण पावलेला.तिच्या मनात मकरंदविषयी एक घर असते.मात्र हळूहळू ती ते विसरते.मात्र लग्नापूर्वी नव-याला हा विषय कधी न काढायच्या अटीवर ती लग्नास तयार होते.पुढे त्यांना मुलगा होतो.तो तिला अनाहूतपणे पत्राने मुलाचे नाव मकरंद ठेवायला सांगतो.त्याच्या मनातील मकरंदविषयीची मत्सरभावना वा त्याची अदृश्य छाया त्याला सतावत होती.स्वत:च्या सुखाला कुरतडणाच्या व्यथेमुळे कळत न कळत तो पत्रात उच्चार करतो.आपण केलेल्या उच्चाराबद्दल त्याच्या मनात कमालीचा अपराधभाव आहे.मात्र कथेचा शेवट सुखान्त स्वरूपाचा आहे.मानवी वर्तनात सुप्तपणे वसत असलेल्या अंतरीच्या भावनांचा आविष्कार या कथेत आहे.
 ‘पाणी! पाणी! पाणी!' या कथासंग्रहात महाराष्ट्रातील ग्रामीण जीवनातील पाणी या विषयसूत्राभोवतीच्या कथा आहेत. मराठीतील अशा विषयावरच्या या लक्षणीय स्वरूपाच्या कथा आहेत. ‘भूकबळी' ही उल्लेखनीय कथा यो संग्रहात आहे. महाराष्ट्राच्या अवर्षणग्रस्त परिस्थितीवर भाष्य करणा या कथा या संग्रहात आहेत. मराठवाड्यातील एका दुष्काळी गावी रोजगार हमीवर काम न मिळाल्यामुळे ठकूबाई या स्त्रीचा उपासमार होऊन बळी जातो. त्या घटनेचे तहसीलदार शिंदे या संवेदनशील अधिका याच्या नजरेतून हे वास्तव कथन केले आहे. तहसील कचेरीतील क्लार्क, तलाठी, मुकादम, मुनीम, कृषी सहायक व रेशनदुकानदार मालक; गरीब माणसांना कसे नाडतात, शोषण करतात याचे विदारक असे चित्र या कथेत आहे. काळगाव दिघी या मराठवाड्यातील एका छोट्या गावी गाडीलोहार कुटुंबातील स्त्रीच्या मृत्यूचे केविलवाणे व करुणास्पद चित्र या कथेत रेखाटले आहे. प्रशासनातील यंत्रणा सामान्याच्या शोषणाला व मरणाला कशी कारणीभूत ठरते याचे बारकाईने चित्रण या कथेत आहे. ‘दौरा' या कथेतही दुष्काळी अवर्षणग्रस्ताची पार्श्वभूमी आहे. मराठवाड्यातील रोटेगाव वैजापूर भागातील



८ ■ लक्षदीप दुष्काळी परिसरात पत्रकारांचा पाहणी दौरा आयोजित केला आहे.या पत्रकारांच्या गटात प्रदीप नावाचा संवेदनशील पत्रकार आहे.त्याच्या नजरेतून हा पाहणी दौरा टिपला आहे.सलगच्या दुष्काळाने हा परिसर काळवंडून गेलेला आहे.पत्रकारांचे एक जग या कथेत आहे.जे जग या पाहणी दौ-याकडे केवळ सहल म्हणून पाहते.मौजमजा व साइट सीइंग म्हणून ते याकडे पाहतात.सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी व सद्य:स्थितीशी त्यांचे काहीही देणेघेणे नसते.न पिकलेली शेती,पिण्याच्या पाण्याची समस्या,रोजगार हमीची तुटपुंजी कामे,रेशन दुकानदाराची मनमानी यातून एका कडवट काळ्या,करड्या रंगाचे चित्र उभे केले आहे.एका बाजूला हिरवा सुपीक समृद्ध प्रदेश व दुस-या बाजूला कोरडा भणंग प्रदेश या विषयीच्या भौगोलिक परिसराचे चित्र या कथेत आहे.प्रदीप आपला जुना कॉलेजचा मित्र तहसीलदार पाटील यांच्या बरोबर दुष्काळातील विविध ठिकाणची पाहणी करतो.या पाहणीदरम्यान चांगल्या शासकीय योजनांचा भ्रष्टाचार व लालफितीच्या कारभारामुळे कसा फज्जा उडतो याचे दृश्य प्रदीपला दिसते.प्रदीप मुंबईला आल्यानंतर या दुष्काळी भागावर फार चांगली स्टोरी करतो.मात्र ती वृत्तपत्रात छापली जात नाही.

 'उदक' कथेत सामाजिक संदर्भाची अनेक परिमाणे आहेत.पाण्याविनाची तीव्रता किती खोलवरची असू शकते,पाणी हे बहिष्काराचे व शोषणाचे हत्यार असू शकते,आणि सत्ताधारी वर्ग त्याचा मुजोरपणे वापर करू शकतो याची जाणीव ही कथा देते. दलितांमधील नवजागृतीमुळे गावातील सवर्णांचा पोकळ स्वाभिमान दुखावला जातो व नवबौद्धांवर गाव बहिष्कार टाकतो. एका तांड्यावर त्यांना आश्रय घ्यावा लागतो. तो चढणीवर असल्यामुळे तिथे पाण्याची सोय नसते. बी.डी.ओ. नी तिथे एका टॅकरची सोय केलेली असते. या बौद्धवाड्यातील दहावी झालेल्या विचारी प्रज्ञाची ही शोकान्त कथा आहे. प्रज्ञाची रमावहिनी गर्भवती आहे. ती तापाने फणफणलेली आहे. दवाखान्याची सोय नाही. ताप कमी व्हावा म्हणून अंग पाण्याने पुसून घ्यावे लागते. तेही नीट मिळत नाही. पाणी आणण्यासाठी ती टॅकरकडे जाते, त्या वेळी इब्राहिम ड्रायव्हर तिच्यावर अत्याचार करतो. ती पाणी घेऊन येते त्यावेळी रमावहिनी व तिचे बाळ मरण पावलेले असते. एकाच वेळी जात आणि स्त्रीच्या लैंगिक शोषणाची जाणीव ही कथा करून देते. पाणी माणसाला बहिष्कृत करते. अनेक माणसे, स्त्रिया यात पिचतात, या जाणिवेचे सूचन करणारी ही महत्त्वाची कथा आहे.

 थीम बेस्ड कथेचा आणखी एक आविष्कार म्हणजे 'नंबर वन' (२००८) हा कथासंग्रह. खेळाडूंमधील माणसांच्या कथा असे शीर्षकात त्यांनी म्हटले आहे. खेळाडूंमधील माणूसपण शोधण्याचा हा प्रयत्न आहे. देशमुख यांच्या लेखक म्हणून संवेदनशीलतेचे वेगळेपण म्हणजे त्यांनी ज्या ज्या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी म्हणून काम केले; त्या त्या अनुभवक्षेत्राचा उपयोग त्यांनी आपल्या ललित लेखनात