रामाची भूपाळी

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

उठोनिया प्रातःकाळी । जपा रामनामावळी ।
स्वये ध्यातो चंद्रमौळी । शैलबाळीसमवेत ॥ ध्रु. ॥

राम योग्यांचे मंडण । राम भक्तांचे भूषण ।
राम धर्मांचे रक्षण । संरक्षण दसांचे ॥ १ ॥

रामे तटका मारिली । रामे शिळा उध्दरिली ।
रामे जानकी पर्णिली । गणिका केली ते मुक्त ॥ २ ॥

रामे पाषाण तारिले । रामे दैत्य संहारिले ।
रामे बंदी सोडविले । मुक्त केले सुरवर ॥ ३ ॥

रामे रक्षीले भक्तांसी । रामे सोडविले देवांसी ।
रामदासाचे मानसी । रामदासी आनंद ॥ ४ ॥

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg