रामाची कर्पूरआरती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem> धूप दीप झाला आता कर्पूर आरती । रामा कर्पूर आरती ॥ सहस्त्र सिंहासनी बैसले जानकीपती । बैसले अयोध्यानृपती ॥ धृ ॥

कर्पूरवडीसम मानस माझे निर्मळ राहू दे । रामा निर्मळ राहू दे ॥ कर्पूरवडीचा भावभक्तिचा सुगंध वाहू दे । रामा सुगंध वाहू दे ॥ कर्पूरवडीची लावून ज्योत, पाहीन तव मूर्ति । रामा पाहीन तव मूर्ति ॥ सहस्त्र सिंहासनी बैसले जानकीपती । बैसले अयोध्यानृपती ॥ १ ॥

ध्यान कळेना,ज्ञान कळेना ना कळे काही । रामा ना कळे काही ॥ शब्दरूपी गुंफ़ुनि माला वाहतो पायी । रामा वाहतो पायी ॥ मुखी नाम, नेत्री ध्यान, हृदयी तव मूर्ति । रामा हृदयी तव मूर्ति ॥ सहस्त्र सिंहासनी बैसले जानकीपती । बैसले अयोध्यानृपती ॥ २ ॥

कर्पूरगौरं करुणावतारं । संसारसारं भुजगेन्द्रहारम । सदावसन्तं हृदयारविन्दे । भवं भवानीसहितं नमामि ॥

कर्पूरारार्तिक्यदीपं समर्पयामि ॥

<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg