रामदासस्वामींची आरती

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

<poem>

ओंवाळू आरती सद्गुरु रामदास राणा । पंचही प्राणांचा दीप लाविला जाणा ॥ ध्रु० ॥

अज्ञानतिमिरज्योति सद्गुरु उजळल्या वाती । ज्ञानबोध प्रकटला तेणें प्रकाशली दीप्ती ॥ १ ॥

निर्गुण निरंजन ज्योति सद्गुरु रामदास । दर्शन मंगलप्रद कल्याणाचा कळस ॥ २ ॥

<poem>

PD-icon.svg हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. Flag of India.svg