रामचंद्र गोविंद काटे

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search

रामचंद्र गोविंद काटे तथा रा.गो.काटे हे इतिहास संशोधक व प्राचीन वाङमयाचे अभ्यासक होते.
रा.गो.काटेंचा जन्म इ.स.१८८७ साली झाला. १९१७ साली परभणी जिल्ह्यातील सेलू ह्या व्यापारी गावात वकीलीच्या व्यवसायानिमित्त स्थायीक झाले , तेथेच त्यांना इतिहासाच्या अभ्यासाची गोडी लागली. त्यासाठी त्यांनी उर्दु-फारसी, हिंदी भाषांचा अभ्यास केला.
मराठ्यांच्या इतिहासाच्या आंतरीक ओढीमुळे , हिंदी भाषेतील ऐतिहासिक साधनांचा शोध घेत असताना, कवी भूषण यांच्या ब्रजभाषेतील शिवचरित्रावरील काव्यरचना काटेंच्या हाती लागल्या. ह्या काव्याचे महत्व ओळखून काटेंनी परिश्रमपूर्वक अध्ययन-संशोधन केले व त्याचा मराठीत गद्य अनुवाद करुन संपूर्ण भूषण हा साक्षेपी ग्रंथ तयार केला. १९३० साली. तो ग्रंथ भारत इतिहास संशोधक मंडळाने प्रकाशित केला. ह्या अनुवादामुळे मराठी भाषेला भूषण कवीचा परिचय झाला.
काटे यांचे दुसरे महत्वाचे वाङमयीन कार्य म्हणजे शिवकालीन राज्यव्यवहारकोशा'चे संपादन. ह्या ग्रंथाची छापील आवृत्ती १८८० साली पहिली तर १९१५ साली दुसरी प्रकाशित झाली होती. १९५६ साली अभ्यासपुर्ण प्रस्तावना जोडून तीसरी आवृत्ती काटेंनी संपादित केली. ती मराठवाडा साहित्य परिषदेने प्रकाशित केली.

१२ जून १९६६ रोजी रा.गो.काटे यांचे निधन झाले.