राखेखालचे निखारे

विकिस्रोत कडून


राखेखालचे
निखारे



शरद जोशी





जनशक्ती वाचक चळवळ


प्रकाशकाचे मनोगत


 आदरणीय शरद जोशी यांचे १२ डिसेंबर २०१५ रोजी दुःखद निधन झाले. त्यांचे सर्व लिखाण त्यांच्या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने २०१० मध्ये जनशक्तीने प्रकाशित केले होते. यानंतर इ.स. २०१३ मध्ये दै. लोकसत्तातून 'राखेखालचे निखारे' हे सदर त्यांनी लिहिले. या लिखाणातील बरेच मुद्दे पूर्वीच्या लिखाणात येऊन गेले आहेत. त्यामुळे हे लिखाण जसेच्या तसे प्रकाशित करण्याचा विचार नव्हता. शरद जोशी यांच्या हयातीत या सर्व लिखाणावरती परत संस्कार करून त्याला ग्रंथरूप देता आले असते, पण त्यांच्या शेवटच्या आजारपणाच्या काळात हे शक्य झाले नाही. आज त्यांच्या प्रथम स्मृतिदिनी हे सर्व लेख आहे त्या स्वरूपात आम्ही प्रकाशित करत आहोत.
 शरद जोशी यांच्यावरील वसुंधरा काशीकर यांचे 'शरद जोशी : शोध अस्वस्थ कल्लोळाचा!' तसेच भानू काळे यांचे 'अंगारवाटा : शोध शरद जोशींचा' ही दोन महत्त्वाची पुस्तके त्यांच्या पश्चात प्रकाशित झाली आहेत. शेतकरी संघटनेची चिकित्सा करणारे विनय हर्डीकर यांचे पुस्तक येऊ घातले आहे. या सर्व प्रयत्नांचे आम्ही मनःपूर्वक स्वागत करतो.
 'राष्ट्रीय कृषिनीती' या नावाने शरद जोशी यांनी विश्वनाथ प्रतापसिंग व अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारच्या कारकीर्दीत शासनाला सादर केलेले अहवाल ग्रंथरूपात आणण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. त्याचे प्रकाशन लवकरात लवकर जनशक्तीच्या वतीने करण्यात येईल.
 वाचकांना एक विनंती आहे, जुन्या पुस्तकातील मुद्रणाच्या चुका आमच्या निदर्शनास आणून द्या, म्हणजे पुढील आवृत्त्यांमध्ये त्यात दुरुस्ती करता येईल.


दि. १२ डिसेंबर २०१६
श्रीकांत उमरीकर
 

औरंगाबाद.