युगान्त

विकिस्रोत कडून












 युगान्त


 इरावती कर्वे








  देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि. पुणे
पहिली आवृती : १९६७
 
पाचवी आवृती : १९८१
 
दहावी आवृती : १९९७
 
पंधरावी आवृती : २००४
 
सोळावी आवृती : २००६
 
सतरावी आवृती : २००८
 
अठरावी आवृती : २०१०
 
एकोणीसावी आवृती : २०११
 
वीसावी आवृती : २०१३
 
एकवीसावी आवृत्ती : २०१५
 


संस्थापक :
रा. ज. देशमुख
डॉ. सुलोचना देशमुख


© जाई निंबकर


प्रकाशक :
देशमुख आणि कंपनी (पब्लिशर्स) प्रा. लि.,
४७३ सदाशिव पेठ,
पुणे ४११ ०३०.


किंमत :
३००/- रुपये


अक्षर रचना :
एस. एम. इंटरप्रायसेस
श्री. सुरेश माने
गोकुळनगर, कोंढवा रोड, पुणे ४८.


मुद्रक :
रमेश पाटील
श्री जे प्रिंटर्स प्रा. लि., पुणे ३०.



संपादकीय


 'युगान्त’ मधील लेखांत सर्वत्र लेखनाच्या दृष्टीने एकरूपता रहावी, यासाठी लेखिकेची सर्वसाधारण प्रवृत्ती लक्षात घेऊन पुढील धोरण अनुसरले आहे :

  1. 'हा (ही, हे)' या सर्वनामाच्या प्रथमेतर विभक्तींच्या रूपांत 'ह्' हा घटक राखून येणारे अंग स्वीकारले आहे. जसे : 'ह्याला, ह्याने, ह्यांना’ इत्यादी. ('याला, याने, यांना' इत्यादी नाही.)
  2. प्रयोजक रूपांत 'इ’ आगम केलेला नाही. जसे ‘बसवला, कळवतो. (-वि- नाही.)
  3. '-आयला, -आयचा' हे अंत असलेली कृदन्ते स्वीकारली आहेत. जसे : 'करायला, करायचा’ (‘करावयाला, करावयाचा' नाही.)
  4. अवतरणे शुद्ध केली आहेत : 'वासुदेवोऽस्मि' (-ऽहम् २०६.६) 'पुराणः' (प्रमाणम् २२६.१६ ); 'त्वयोपास्यानि' (ग्रहीतव्यानि २७०.६), 'यो मे' (यो मां २७६.१०)
  5. व्याकरण दृष्टीने जी स्वतंत्र 'पद' आहेत, ती- जेथे जोडून लिहिण्याची रूढी आहे तेथेही- एकमेकांपासून अलग लिहिली आहेत.


पुणे / २०.४.१९७१ कृश्रीअ


टीप :- याखेरीज अन्य काही बदल अर्जुनवाडकरांनी केले होते.
 या किरकोळ बदलांची यादी या आवृत्तीमध्ये समाविष्ट केलेली नाही. 





निवेदन


 हे पुस्तक तयार होण्यास अनेकांची मदत झाली. त्या ऋणाचे कृतज्ञतापूर्वक स्मरण करण्यासाठी हे निवदेन आहे. गेली पाच वर्षे मी हे लेख लिहीत आहे. पुष्कळ वेळा प्रसिद्ध न झालेले पण तयार असलेले संशोधित आवृत्तीचे महाभारताचे भाग मला ताबडतोब पाठवून देऊन प्रो. रा. ना दांडेकरांनी मला मदत केली. सर्व लेख एकत्र करून पुस्तक बांधावे अशी कल्पना आली, तेव्हा प्रो. नरहर कुरुंदकर ह्यांनी सर्व लेख चिकित्सेने वाचून अनेक सूचना केल्या. आमच्या कॉलेजचे मुख्य प्रो. सु. मं. कत्रे ह्यांनी किती वेळा मदत केली, त्याला गणतीच नाही. कोठच्याही संस्कृत शब्दाचा मी करते तो अर्थ बरोबर आहे का, अर्थ कळला नसल्यास तो अर्थ काय, हे समजण्यासाठी डिक्शनरी उघडायची तसदी न घेता मी सरळ प्रो. कत्र्यांकडे जात असे, व तेही हातांतले काम बाजूस ठेवून पहिल्याने माझी जिज्ञासा पुरी करीत. तोच उपयोग प्रो. मेहेंदळ्यांचाही झाला. प्रो. कालेलकरांनी मराठी व त्याचे इंग्रजी संस्करण बारकाईने वाचून कित्येक ठिकाणी चुका दाखवून दिल्या. प्रो. पुंडलीकांबरोबर झालेल्या अनेक संभाषणांमुळे विचार पक्के बांधावयास मदत झाली. माझे पी-

एच.डी.चे विद्यार्थी श्री. डिंगरे ह्यांनी बऱ्याच लेखांची नक्कल केली. टीकाकारांनी व लेख प्रसिद्ध झाल्यावर शंका काढणाऱ्यांनी विचाराला चालना दिली, व लेख परत तपासून त्यांतील चुका काढून टाकण्यास मदत केली. घरची मुले जाई, रजनी, गौरी व आनंद ह्यांच्या, इतरांच्या मानाने जरा जादा निर्भीड मतप्रदर्शनामुळे लेख लिहिताना जास्त खबरदारी घेतली गेली. यजमानांनी मदत केली. व्याकरण तपासले, इंग्रजी शब्दांचे स्पेलिंग तपासले-टीका मात्र मुळीच केली नाही. ज्या अनेक मित्रांनी हे पुस्तक प्रसिद्धीस आणण्यात मदत केली, त्यांत प्रा. अरविंद मंगरुळकर ह्यांचा आवर्जून उल्लेख करावयास पाहिजे. त्यांनी अनवधानाने राहिलेल्या व इतरही कित्येक चुका दाखवून दिल्या व हस्तलिखित सुधारण्याची मला संधी दिली. देशमुख पतिपत्नींची मदत सर्वच बाजूंनी झाली. लेख तपासणे, टीका करणे, नकला करणे व मी अगदी कावून गेले असले, म्हणजे मला संभाळून घेणे ही सर्वच कामे त्यांच्यावर पडली. ही सर्वांची मदत, चालना व टीका नसती, तर लेख लिहूनच झाले नसते.


दिनांक : १४ जानेवारी १९६७
इरावती कर्वे