Jump to content

यांचे सध्या काय चाललेय...

विकिस्रोत कडून

________________

? HON लेखिका : डॉ. राजश्री देशपांडे.. ________________

यांचे संध्या कायचीललेये... लेखिका : डॉ. राजश्री देशपांडे १८८७) DL मुखपृष्ठ : अक्षरजुळणी व मुद्रक : जय कॉम्प्युटर्स, सातारा. चित्रे : | | जिगीषा मुळ्ये मांडणी : धनंजय यादव प्रकाशन : लेक लाडकी अभियान ४९०अ, मुक्तांगण, गुरुवार पेठ, सातारा मूल्य : रु. १००/ ________________

अनुक्रमणिका From From न इत० ला ....... 1 डोस्क फिरलंया.... पोराला व्यसनाने धरलंया... । । । गणिताशी वाकडं.. । । । । । । तर मसनात . लाकडं? ही पोरगी । । । । माझ्या मनातली... :::::: 34 ________________

लेखिकेचे मनोगत मनोविकारतज्ज्ञ म्हणून व्यवसाय करताना तरुण पिढीशी ब-यापैकी संपर्क येतो. आजकाल वयात येणा-या मुलांना/मुलींना उपचारासाठी/समुपदेशनासाठी घेऊन येणा-या पालकांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. अभ्यासामधील अडचणी, त्यामुळे येणारी निराशा, व्यवसनांच्या आहारी जाणे, आकर्षण, मैत्री व प्रेम याबद्दलचा गोंधळ. आईवडिलांचा मुलांशी संवाद नसणे, त्यातून होणारे गैरसमज अशा गोष्टी सातत्याने समोर येत आहेत. या विषयांवर मुलांमुलींशी बोलणे होणे, त्यांच्यापर्यंत योग्य माहिती पोहचणे हे फार गरजेचे आहे. त्यांना कुतूहल वाटावे आणि लगेच समजावे अशा स्वरूपात त्यांच्यासमोर ही माहिती यायला हवी. योग्य माहिती हे संकट टाळण्याचे पहिले पाऊल आहे. म्हणूनच कॉमिक्सच्या आकृतिबंधात अत्यंत सोपेपणाने किशोरवयीन मुलांमुलींसाठीचे काही महत्त्वाचे मुद्दे घेऊन आम्ही समोर येत आहोत. प्रतिसादाची खात्री आहे!.....* डॉ. राजश्री देशपांडे ________________

प्रकाशिकेचे मनोगत दिवस तुझे हे फुलायचे, झोपाळ्यावाचून झुलायचे, असे सुंदर या वयाचे वर्णन केले आहे. कळीचे फूल होत असताना तिच्या आणि त्याच्याही मनामध्ये गोंधळ उडालेला असतो. स्वत:चे निर्णय स्वत: घेण्यासाठी आणि आयुष्यात येणा-या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी, व्यक्तिमत्त्व विकास घडविण्यासाठी, आयुष्याची तत्त्वं आणि मूल्यं यांची माहिती करून घेण्यासाठी,याविषयीची समज वाढविण्यासाठी अतिशय महत्त्वाचा असा हा काळ. उडणा-या गोंधळालाविवेकाने आणि सहज सोप्या पद्धतीने समजून घेण्याची गरज असते. इगो तयार होत असतो. म्हणूनच न दुखावता साध्या शब्दांत महत्त्वाच्या गोष्टी सांगणं गरजेचं असतं. त्या दृष्टीनं सुंदर, सोप्या, सरळ भाषेत लिहिलेलं हे महत्त्वपूर्ण पुस्तक. तरुण मुलामुलींसाठी खास गोष्टीरूप कॉमिक्ससारखं हे सुंदर पुस्तक. या वयोगटातील मुलामुलींना मार्गदर्शन करणा-या डॉ. राजश्री देशपांडे या पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण डॉक्टर आणि व्यक्ती आहेत. ओघवत्या आणि सोप्या भाषेच्या माध्यमातून राजश्री यांनी हे काम सोपं केलं आहे. याच वयोगटातील जिगीषा मुळ्ये वयोगटातील चित्रकार तरुणीनं पुस्तक वाचून चित्रं काढली आहेत. जय कॉम्प्युटर्सचे धनंजय जाधव आणि या प्रवासात आमचे सहप्रवासी असलेले कैलास जाधव यांनी या पुस्तकाची सुंदर मांडणी केली आहे. वसंताचे रंग घेऊन येणारं, वसंतोत्सव साजरा करायला मदत करणारं हे पुस्तक आमच्या मित्र-मैत्रिणींना आवडेल, अशी आशा आहे. अॅड. वर्षा देशपांडे ________________

From From न via त T० ल ________________

राणी : इशा, अगं पूजादीदीला पाहिलंस? कसली कूल दिसतीय, एकदम भारी ! इशा : अगं, माहीत नाही का तुला राणी, तिनं हायलाईट केलंय केसांना. मी पण करणार. राणी : मम्मी, पूजादीदी साखी केस रंगवायचीत मला. आई : आता काय हे। नवीन याड, ते काय बरं दिसतंय व्हय, नुसते नखरे! अजिबात खपणार नाही तुझ्या पप्पांना. ________________

राणी : इशा, माझी मम्मी नाही म्हणतीय, तुझी कशी तयार झाली गं? ईशा : अगं राणी, ती तयार झाली. पण आत्ता नाही, मी पूजादीदीएवढी झाल्यावर. १ साल ए मम्मे, इशा पण । रंगवणारे केस, दे की परमिशन मला.' थोबाडच रंगवीन बग, प्रगती पुस्तकातला लाल रंग कमी करायचं बगा, केस निघाल्यात रंगवायला. ________________

आता केसं रंगवायचा आणि रिझल्टचा काय संबंध? इशा : आई, राणीची मम्मी तिला सगळ्याला नाहीच म्हणते. ट्रीपला नको, सॅन्डॉफ पार्टीला नको, केस रंगवायला पण नको, असं का गं? आई : इशा, तूच सांग का करत असेल राणीची मम्मी. इशा : अं, राणीच्या मम्मीला आवडत नसेल रंगीत केस किंवा त्यांचा मूड खराब असेल... किंवा ... आई : किवा त्या दुष्टच असतील इशा : नाही गं, खूप प्रेमळ आहेत काकू आई : मग त्यांना राणीची काळजी वाटत असेल. इशा : का? आणि मग मी विचारल्यावर तू का हो म्हणालीस? तुला नाही का माझी काळजी? आई : इशा, मी तुला १६ वर्षाच्या वाढदिवसाला परवानगी दिली, तुझ्या १२वी नंतर .... आता नाही. ________________

इशा : पण राणीची आई तर तिला तेव्हा पण नको म्हणतेय आणि मला माहितीय हायलाईटनं केस खराब होतील म्हणून तू म्हणालीस ना! आता नको म्हणून... आई : हो । इशा : राणीच्या मम्मीला माहिती नसणार, नीट काय ते. ईशा: काकू मस्त झाल्यात चकल्या." राणीची मम्मी : हो का! घे गं अजून, आमच्या राणीला काही खायला नको. सगळे लक्ष नख-यात. अभ्यासाचा पत्ता नाही आणि फक्त आरशापुढे मटकणं. - इशा : (मनात) हे राणी अभ्यास करत ::. नाही म्हणून तिची मम्मी तिला परवानगी ••, देत नसणार. = = = ________________

राणी : ए इशे, आवर लवकर, जायचय ना नाक्यावर आई : राणी कुठे चाललाय? सांगायची काही पद्धत आणि कधी येणारे? , राणी : अगं, कोप-यापर्यंत । जाऊन येतो. हे काय सांगतचे होते की, कशाला गं वैतागतेस सारखी? राणी : इशे, संदीप बघ आपल्याकडेच बघतोय. आगाऊ मेला . पण आज एकदम चिकणा दिसतोय. इशा : गप ग तुला काय करायचंय. तो मागं मागं आला की फाटेल तुझी ________________

राणी : अय्या, काई नाई। फाटत. तुला माहितीय का। त्यानं नवी बाईक घेतलीय? इशा : तू चल. तो काही आपला दोस्त नाही. ती सगळी पोरं कधी शाळेत पण येत नाहीत. कुणीही छपरी काय आवडतं गं तुला ! राणी : कसली बोअर आहेस गं आई : आलात का? काय झाल? चेहरे का पडलेत? राणी : मम्मी, तुला गं काय करायचय? आई : राणी, एवढं काय तुमचं प्रायव्हेट? काही लफडे नाही ना? इकडे आम्ही मरमर खस्ता खायच्या, तिकडं तुम्ही दिवे लावा. इशा : अगं, उगाच काकूवर काय चिडतीयस? इशा : (मनात) राणीच्या या वागण्यामुळे तिची मम्मी काळजी करते ________________

इशा : काकू, एक विचारू ? तुम्ही राणीला केस रंगवायला का नको म्हटलात हो ? आई : ते काय बरं दिसतं का गं टोपलं? तुमचं काहीतरी चमत्कारिकच! तू तरी रंगवलेत का? इशा : मी १८ व्या बर्थ डेला रंगवणारेय की. आई : अगं, तेव्हाच तेव्हा. आत्ता १०वी नीट पास व्हा. काही शिकायचं बघा आणि राणीच्या बाबांनाही नाही आवडणार. राणी : पण का? आई : कारण त्यांना घराण्याच्या इज्जतीची काळजी आहे. राणी : बघ इथे मी केस रंगवले की यांची इज्जत जाणार. आई : एकदा आई-बापानं नाही म्हटलं की, ऐकत जा. वाद कशाला वाढवतेस राणी : अगं पण कारण तरी नीट सांग. दरवेळी आपलं घराण्याची इज्जत. आई : अगं गावातले काय म्हणतील, पोरगी घसरली वाटतं आणि तुझे केस पण बाद होतील. मात्रं झालं केसांच की लग्न ठरवताना पंचाईत. आमच्या वेळी नव्हती असली थेरं. राणी : (वैतागून) तुझ्याशी बोलण्यात अर्थ नाही. ________________

इशा : काकू मी निघते पण केस बाद होतायत असं वाटलं तर मी पण नाही रंगवणार केस, मात्र एकदा बघणार रंगवून... राणी : काही नको सांगू तिला... तिला काही पटतच नाही. स्वत:चंच खरं करते. मला तर तिला काही सांगायचीच इच्छा होत नाही. सारखं सगळ्याला 'नाही' आई : बरं, आता बास. जा... इशाला सोडून ये. राणी : इशा, माझ्या आईला मी आवडतच नाही. तिला सगळेच चूक वाटतंय. इशा : अगं चिल यार, तसं नाही. त्यांना काळजी वाटते. तू केस रंगवून, नखरे करून पोरांना लायनी देशील. ती पोरं तुला नादी लावतील. राणी : असं काही नाहीये. इशा : मग मगाशी संदीप, बाईक, काय चाललं होतं तुझं. अगं त्यांची गैंग लई डेंजर. तू खरंच नको नादी लागू. ________________

राणी : पण कुणीतरी बघतंय, लक्ष देतंय म्हणजे भारीच वाटतं गं. नाहीतर घरात सारखी कटकट. इशा : सोड गं, त्या काळजीपोटी बोलतात तसं. तुझे लाडपण करतात की नाही, तुझ्या बर्थ डेला बघ कितीजणी बोलावलेल्या. काकूनी केली की नाही पावभाजी त्यांना बरं नसतानाही. राणी : हो गं खरं तर ... इशा : आणि परवा एक्झामच्या वेळी तुला ताप आलेला तर तीन तास वर्गाबाहेर बसून | राहिलेल्या ना. राणी : हो! इशा : तू पण थोडं अभ्यासाकडे पण लक्ष दे. आईला मदत कर, चिडचिड करू नको. राणी : हो मॅडम! युवर ऑर्डर ! इशा : ए.... ऐकायचं गं.... । ।। १) राणीच्या मम्मीचं चुकतंय का? २) राणी का वैतागली असेल? ३) इशाच्या आईने तिला केस रंगवायला कशी काय परवानगी दिली असेल ? ४) अभ्यास, घराण्याची इज्जत या गोष्टींचा केस रंगवण्याशी नक्की काय संबंध असावा? 9) फॅशनेबल असणं वाईट आहे का? ________________

डोस्क फिरलंया.... पोराला व्यसनान धरलया... ________________

सोनी : ए भावड्या, तुला दाढी आली की रं... पण बघ कशी आलीयं, इथं थोडी, तिथं थोडी. संज्या : गप्प बस हां सोने, चोमडेपणा करू नको. संज्या (मनातल्या मनात) कसली ही दाढी आलीय खुरटी, मिशी पण धड नाही. बॉडी पण नाही बनली माझी अजून. अक्ष्यान तर शेव्हिंगपण सुरू केलंय. आन् तो । बंड्या सारखं ‘नंबर सिक्स' म्हणतुय मला. त्याला हानायलाच पायजे येक डाव. ________________

अक्ष्या : संज्या, घेरे १ एकदम भारी वाटतंय (संज्या : नको रे... बंड्या : जाऊदे अक्ष्या, भागुबाई आहे संज्या) संज्या : ए बंड्या हानीन बर का. आण) ती हिकडं (घेतो)N खरचं की लय / भारी वाटतंय काय हाय रे हे ? बंड्या : गांजाची चिलीम आहे. काल पाकेट मनीमधून दिडशे रुपायाला हा एवढा गांजा मिळाला. आता उद्या अक्ष्या आणणारेय. ________________

| संज्या : आज मी देतो रे. बापाच्या खिशात घावलेत ________________

अक्ष्या : चला की दोस्तांनो नवा माल आलाय. । ( बंड्या : कुटं रं रस्त्यावर की टपरीत? बघायचा माल की ओढायचा? अक्ष्या : लेका बंड्या, पोरीशिवाय सुचतं का दुसरं तुला? अरे गांजा त्या लख्याच्या टपरीत... ए, ) संज्या चल... Gon पात शॉप अॅण्ड टी स्टॉल (15 ________________

अक्ष्या : संज्या, चल लवकर बड्या लई पिसाटलय. आपली तर फाटलीच. ________________

संज्या : आता काय झालं? कुणाशी भांडण काढलं? अक्ष्या : आरं आईच्यान भांडण-बिंडण काय पन नव्हतं झालं. बंड्या : (चारी बाजूनी बघत) ए, कोनाला मस्ती आलीय, म्होरं या, दावतोच एकेकाला. खिमाच करतो आज. ________________

नाना : चला रं पोरांनु आमच्या बरोबर संज्या : कुठे नाना : बंड्याच्या डोक्यावर) परिणाम झालाय त्याला हॉस्पीटलमध्ये न्यायचंय तुम्ही असता तिघं एकत्र. तुमची मदत होईल, ________________

डॉक्टर : बंड्या घाबरु नको, कोणी तुला मारणार नाही. बस बरं. बंड्या : डॉक्टर, पण ते आलेत पकडायला. डॉ. : कोण? बंड्या : पोलीस डॉ. : कुठायत ? बंड्या : हे काय कॉटखाली लपलेत. डॉ. : मी त्यांना सांगतो समजावून ते काही नाही करणार तुला? बंड्या: नक्की. ________________

डॉ.: तू झोप जरा. तुला चक्कर येईल. . । डॉ. : बसा मंडळी. आता झोपला हा. मला जरा माहिती ढ्या ह्याची. - असं पहिल्यांदा होतंय का? आधी कधी झालंय? बंड्याचे बाबा : नाही हो डॉक्टर, पोराला कधी पैशाची दवा नाही लागली. असलं डोक्याचं तर कधीच नाही. डॉ. : तुमच्या घराण्यात कुणाला? बाबा : अढ्याप नाय. पण हां, बंड्याचं एक दोन महिन्यात जरा विचित्रच वागत होता. डॉ. : म्हणजे? बाबा : चिडचिड करायचा, सारखा मागच्या रुममध्ये बसायचा. आपल्याच नादात, नाहीतर बाहेर. सारखा अस्वस्थ, नाहीतर झोपलेला. - 20 ________________

डॉ. : पैसे वगैरे काही उचलले का? बाबा : तुम्हाला कसं कळलं डॉक्टर? त्यांन मागच्या. महिन्यात जवळजवळ हजारभर तरी रुपये उचलले असतील आणि हो मी झडती घेतली त्याच्या खोलीची कालच, तर मला ही पुडी सापडली. डॉ. : मला शंका आलीच होती. अहो, हा गांजा आहे. तुमच्या मुलाला हा त्रास या व्यसनामुळे होतोय. कधीपासून चालू आहे हे व्यसन? बाबा : काय माहित? काय रे पोरांनो, कधीपासून घेतोय हा? संज्या- अक्ष्या (ततपप) झाले असतील ३ महिने... आपलं ६ महिने. नाना : काय रे, मुलांनो तुम्ही पण घेता ना! मी पाहिलंय तुम्हाला तिघांना बिडी पित बसलेले. संज्या-अक्षा - हो म्हणजे कधी... संज्या : मी नव्हतो घेत पण मला याच दोघांनी आग्रह केला. या बंड्यानीच मला 'बायल्या, नं.६' असं चिडवलं. घेत नाही तू, बायल्या असं म्हणाल्यावर मी वैतागून घ्यायला सुरुवात केली. ________________

EMERGENU डॉ. : घेताना कळत नाही का रे तुम्हाला? पोर : खरंच माहिती नव्हतं. संज्या : त्यात काय झालं, मला मी मर्द आहे ते दाखवायचं होतं, हे बायल्या म्हणतात मला. डॉक्टर : हो, मग आता त्या हिशोबानं बंड्या ‘एकदम मर्दपुरूष' होय ना. पोरं : (गांगरुन) नाही.. नाही.. डॉक्टर : हे बघा, पोरांनो मर्द होणं, पुरुष होण म्हणजे काय? तुमची उंची वाढू लागते, आवाज बदलतो, काखेत गुप्तांगावर केस येतात, धातू सांडू लागतो. हे सगळं अचानक होत का? हळूहळू होतं आणि प्रत्येकाचे वाढीचे टप्पे वेगवेगळे असतात. १२ ते १९ वर्षे वयात कधीपण हे बदल घडतात. तुम्ही । १४-१५ चे आहात. किती घाई झालीय तुम्हाला मर्द बनायची! ________________

संज्या : तसं नाही डॉक्टर पण ते वर्गात... पोरं... काय पण बोलतात. डॉक्टर : हं.. कुणीही काही म्हटलं तर ते तपासून बघणार की विश्वास ठेवणार. अरे, विज्ञान काय म्हणतं? प्रत्येक गोष्ट तपासा. माहित कखन घ्या. अक्ष्या : पोरं म्हणत होती 'मर्द' असशील तर दारू पिशील, चिलीम ओढशील. डॉक्टर : तुमचा आदर्श कोण? खरा मर्दपुरूष. संज्या : शिवाजी महाराज । ________________

डॉक्टर : मग ते काय व्यसन करून मर्द झालेत. त्यांनी रयतेची, दीनदुबळ्याची जबाबदारी घेतली. तुम्ही स्वत:ची तरी घेऊ शकता का? आपापला अभ्यास, स्वत:ची कामं, घरात मदत, व्यायाम शाळेतल्या कार्यक्रमात सहभाग यांतलं काय करता? अक्ष्या-संज्या: समजलं. मर्द बनणं म्हणजे जबाबदारी घेणं, आधी स्वत:ची मग इतरांची. डॉक्टर : करेक्ट. अक्ष्या : पण डॉक्टर बंड्याला काय झालं नेमकं? WN Dougs} डॉक्टर : अंमली पदार्थ काही काळासाठी नशा देतात पण प्रत्येक क्षणी तुमच्या शरीराची हानी करत असतात. मेंदूवरचा ताबा सुटतो, हृदय, यकृत, काळीज, नसा अशा महत्त्वाच्या अवयवांची वाट लागते. कावीळपासून कॅन्सरपर्यंत, पुरुषत्व जाण्यापासून ते वेड लागण्यापर्यंत, काहीही होतं. मग सांगा, मर्द बनायला अंमली पदार्थ घेऊन चालेल का? अक्ष्या : व्यसन करुन जर डोकच आऊट होत असेल तर विचार कसा करणार? विचारच नाही करायला जमला तर अभ्यास, कामं, जबाबदारी सगळे गेलं बोंबलत डॉक्टर : बरोबर म्हणूनच खरा मर्द अंमली पदार्थाला 'नाही' म्हणतो. १८अफलदार्थ | | ________________

  • स्वत:ची जबाबदारी घेणं म्हणजे काय? * इतरांची म्हणजे कुणाची जबाबदारी? (कुटुंबीय, मित्र-मैत्रिणी, समाज, लहान भावंड, अनाथ, वृद्ध व्यक्ती, गरीब). * वैज्ञानिक विचार म्हणजे काय ? ________________

गणिताशी वाकड.. तर मसनात । लाकडे? ________________

| | आई : अहो, जरा रिमोट ठेवा खाली. मी काय म्हणतेय? बाबा : बोल तू. आई : संज्या, गणितात फेल झालाय पुन्हा. म्हणतोय डोक्यातच शिरंना. सर काय शिकवत्यात ते. बाबा : थांब, येऊ दे त्याला घरी. बघतोच. गावभर उंडरायचं, घाणेरड्या सवयी, टवाळ दोस्त. आई : अहो, घरीच आहे. मागच्या महिन्यात त्या बंड्याच ‘तसं' झाल्यापासून एकदम लायनीत राहतोय सध्या. अभ्यासाला लागलाय बाबा : तू कड घेऊ नको. आई : मी कशाला कड घेऊ, बाकीच्या विषयातले मार्क सुधारलेत त्याचे. भटकायचा कमी आलाय, एखाद काम लगेच ऐकतोय । बाबा : बोलाव बरं त्याला आई : हे बघा नीट बोला त्याच्याशी. पोरगं लईच नर्वस हाय. काल लई रडलाय. म्हणत होतं, “आई, आता मी क्लासला नीट जातो. शाळेचे तास बुडवत नाही, तरी मी नापास झालो. बाबा : तुला ज्यादा पुळका आलाय. दोन कानाखाली वाजवल्याकी चट सगळी गणित सुटतील. ________________

आई : यात कसला पुळका आणि मारुन गणितं सुटतात का? जरा बोलून बघा, नेमकं काय झालंय बाबा : थकून कामावरून आलं की जरा बसू देत नाहीस, सुरू कटकट. आई : मी काय घरी मजा मारते का दिवसभर? बाबा : संज्या, ए संज्या.. प्रगतिपुस्तक घेऊन ये. संज्या : आलो बाबा : काय रे, परत नापास झालास गणितात. संज्या : हो बाबा : का?

111111।। ।। ii।।।।।।। ६।।।।। ।।।।।।।।।

१६६६६६१ । 5

संज्या : काही समजत नाही. बाबा : बाकीच्यांना समजतं ना? मग तुला का नाही? लक्ष देतोस का वर्गात? संज्या : हो बाबा बाबा : मी क्लास लावलाय दहा हजार रुपये मोजून. तिथं काय? संज्या : ..... बाबा : नीट लक्ष क्ष्यायला नको. सराव करायला नको. उक्ष्यापासून पहाटे ५ ला उठून १ तास गणित सोडवायची. पुढच्या चाचणीत पास नाही झालास तर याद राख. घरात घेणार नाही तुला




बाबा : पोचला नाही का अजून घरी पोरगा. कुठे गेला असंल? मी आलोच गं वरच्या गल्लीत बघून. शाळेतून येतो जरा.

अक्ष्या : काका, संज्याचं दप्तर बघा हे. तो कुठं गेला ते कळलंच नाही. मी थांबलोय शाळेत मुद्दाम. तो परत आला तर म्हणून. बाबा : सांगून नाही गेला का तुला? अक्ष्या : नाही काका, पण आज गणिताचे मार्क कळल्यापासून गप्प झाला व्हता पार. म्हणत होता ‘बाबांनी सांगितलंय घरी यायचं नाही नापास झालास तर....' बाबा : अरे बापरे ! नाना येतात. ________________

नाना : चला शोधू या, असंल कुठं तरी इकडे तिकडे. अक्षय तू घरी जा. माई वाट बघतीय, - मय मई-बाबा |ी नाती ना वा का नाना : संज्याचे बाबा, तुम्ही वरच्या गल्लीकडे जावा, मी इकडं खाली जातो. 30 ________________

सज्या शांत बसलेला नाना : संज्या, अरं काय रे, काय करतोयस इथं. संज्या : गप्प नाना : चल लेका घरी सगळे वाट बघतायत. संज्या : नको नको बाबा घरी येऊ नको म्हणालेत. नाना : बरं माझ्या घरी चल. नाना : माई, संज्या आलाय. जरा पाणी दे गं. माई : देव पावला! आलं का लेकरु! थांब, चहाच आणत्ये. लेकरा, का रं असा गेलास, तिकडं तुझ्या आईचा पाक जीव जायची वेळ आली. तुझ्या वडलांनी आत्तापर्यंत गावात वरखाली ४ तरी खेपा घातल्या असतील संज्या मुसमुसायला लागतो. माई : गप, डू नये. तुझी सोनी, भावड्या...भावड्या करतीय. असं डोक्यात राख घालून घिऊ नये. आरं, बोलला असलं बा रागात... आता पट्टदिशी घरला जा बरं. ________________

आई : आरं बाळा, कुठं गेलेलास असा? - बाबा : अहो त्याला आत । तर येऊ दे. संज्या,अरे मी रागात म्हणालो, पण तुम्हा पोरांपेक्षा आम्हाला काही जास्त आहे का? तुझ्या जीवापेक्षा काही मोठ्ठ हायं का? ________________

आई: सर, तुम्हीच गणित शिकवता ना? सर : होय, संजयची आई. एक काम करा, त्याला रोज शाळेच्या आधी । १ तास पाठवा. बघू काय करता येतं ते. त्याला अगदी सोपं पुन्हा शिकवतो. निदान पास होईल, इतकी तयारी करून घेतो. आई : वॅक्यू सर, पाठवते. संजय : बाबा, सर नीट सांगतायत, आता सोप्पी गणितं जमतायत. मी पास तरी होईन बहुतेक. | | 2+ (="

  • गणितात नापास झाला म्हणून की बाबांच्या रागावण्यामुळे ? संज्या कशामुळे निघून गेला? * संज्याला शोधून काढलं नसतं तर, संज्याने पुढे काय केलं असतं? * गणित न जमणं हा मठ्ठपणा आहे का? ________________

ही पोरगी माझ्या मनातली. ________________

बंड्या : आरं... त्ये बघ ती. ती । ९ वी तील शीतल... माल आहे माल अक्ष्या : ए बड्या, जा की प्रपोझ मार तिला. बंड्या : नको रं, लई डेंजर हाय ती. संज्या : मग काय नुस्त बघणार का? बंड्या : सध्या बघणार. चान्स मिळाला की दाबणार. संज्या : आरं, मी विचारतुय. तिच्याशी बोलणार नाही का? बंड्या : काय करायचंय बोलून? 35 ________________

शीतल : १० वी ब । मधला अक्षय पिसाळ तूच ना? मला गॅदरींगसाठी नाटक बसवायचंय, त्यात रोल करणार का? अक्ष्या : हो, मीच. माझं १० > वी च वर्ष आहे. मी जरा विचार) करून उड्यापर्यंत सांगतो. शीतल : नक्की सांग उढ्यापर्यंत बंड्या : नालायका, वहिनी आहे तुझी ती, लाईन मारु नको. अक्ष्या : गप रे... मी कशाला लाईन मारू? बंड्या : पण माझ्याशी बोलली नाही ती. संज्या : तू बोललास का तिच्याशी. बंड्या : काय बोलायचं पण ?" संज्या : त्येच तर कळत नाही. अक्ष्या : चला रे घरी उशीर होईल ________________

संज्या : सोने, किती वेळ उभीयस आरशासमोर, आवर चल पटपट. बास कर नखरं तुझं." सोने : ए भावड्या... गप बरं का! तुला काय करायचं? मी काय पण करीन. संज्या : काय पण करतीसच तू, काय ती कापडं तुझी, मेकप काय, शोभतं का तुला. सोनी : तुझं काय ? ते स्पाईक्स, ती अंडरपॅन्ट वरुन खाली गळणारी पॅन्ट, शर्टाची उघडी बटणं शोभतं का? पण मी काई म्हणते का तुला ! संज्या : दात काढून हातात दीन म्हणूनच बघ की. बरं मला काय ! काईपण बोलतात पोरं. सोनी : ती अशी तशी कशीही बोलतातच. आता आमच्या वर्गातली शीतल, लई हुशार. गॅदरींगला नाटक बसवतीय. कसली कडक असतीय, तरी तुझा तो बंड्या लाइन मारतो तिच्यावर, ________________

सोनी : काय आवडतं भावड्या त्याला. तिला आवडेल असं हाय का काई त्याच्यात. तोंड बघ आरशात म्हणावं मवाली १ नंबर, संज्या : तिला आवडणार नाही का तो? सोनी : मुळीच नाही." संज्या : चांगला चिकना आहे की, शिवाय बाईक आहे. त्याच्याकडे. स्मार्ट मोबाईल पण. सोनी : भावड्या, तुम्ही मुलं जरा बावळटच असता सगळ्या पोरींना बाईक/मोबाईलमुळे पोंर आवडतात की काय? ब-याच पोरींना पोरं आवडतात ती वेगळीच." संज्या : म्हणजे कसली ? सोनी : लायनीत राहणारी, नीटनेटकी दिसणारी, मोकळे बोलणारी पण चोंबडेपणा न करणारी, अभ्यास-बिभ्यास करणारी ! फालतू शायनिंग टाकणारी पोरं अजिबात आवडत नाहीत. संज्या : बोंबला, म्हणजे आमची वाटच. सोनी : हो ना, त्यात तुला दाढीपण नाहीय आलेली (चिडवत). संज्या : सोने, हाणीन कानफडात. सोनी : आरं मजा केली. दाढी येण्याशी काही संबंध नाही पोरी आवडण्याचा. संज्या : तुला काय माहित गं? सोनी : एक तर मी पोरगी. माझ्या मैत्रीणी पोरी. काल कांबळे बाईंनी वर्गात वयात येताना म्हणून प्रोग्रॅम घेतला. खूप भारी होता. खूप गोष्टी कळल्या त्यातून. संज्या : मला पण सांग की सोने 38) ________________

tr।। fh सोने : त्यांनी आम्हाला महत्त्वाचे पॉईट परत परत म्हणायला लावले. थांब. हे बघ. १) मुलांचा पुरुष आणि मुलीची बाई होताना शरीरात बदल होतात. २) हे बदल हळूहळू प्रत्येकाच्या शरीरात वेगवेगळ्या वेळी होतात. ३) त्यावेळी मनात आणि विचारांत पण बढ़ल होत असतात. ४) बदलांमुळे काही विशेष वेगळं वागावसं वाटतं. 9) पण वागण्यावर मेंदूचं म्हणजे विचारांच नियंत्रण हवं. ६) विचार करण्यासाठी माहिती आणि संवाद गरजेचे आहे. ________________

संज्या : सोने, मनात अन् विचारांत बदल काय होतात गं? सोने : आरं, आता तुला वेगळे वाटायला लागलंय ना. म्हणजे झकास दिसावं, मित्रांबरोबर असावं, पोरींकडे बघावं, माझं मला कळतं, आईबाबांना आमचं काही माहित नाही. संज्या : पोरींना वाटतं का गं पोरांकडे बघावं. सोनी : वाटतं तर काय ! मस्त वाटतं पण भीती पण वाटते. एखाद्या पोरानं बघताना बघितलं, नावं जोडली, चिठ्ठी पाठवलीतर घरचे लगेच आमची शाळाच बंद करतात. तुम्हाला काय, फार फार तर मार खावा लागलं संज्या : त्ये बी खरंच! सोने : संज्या, प्लीज बंड्याला सांग की शीतलीला त्रास देऊ नको. लई हुशार आहे ती. तिची शाळा बंद होईल. त्यांचे बापू भयंकर आहेत. 40 ________________

संज्या : अरे बापरे, सांगतो बंड्याला ! पण मग असं मुलांना मुलीबद्दल मुलींना मुलांबद्दल वाटणं बरोबर आहे. सोनी : वाटणं बरोबर आहे, वागणं नाही. बाई सांगत होत्या या वयात आपण भावनेने वागतो विचरांनी नाही. आणि म्हणून मनात येईल ते करतो. पटकन रडतो, चिडतो, अपमान वाटून घेतो. संज्या : हो गं,तसाच आडकलो ना मी त्या गांज्याच्या भानगडीत. कसला राडा झालेला. सोनी : करेक्ट, तेच पोरींच्या बाबतीत. आवडलं, ठीक आहे, त्या पण पुढच्या पाय-या आता नको. कांबळे बाई सांगत होत्या, शारीरिक आकर्षणाच्या पाय-या ओलांडल्या की, मुलंबाळ, संसार हेच टप्पे असतात. ते या वयात पेलत नाहीत. तेवढं आपलं शरीर तयार नसतं. नोकरी धंदा नसतो. मग कोण कुणाला सांभाळणार? कसं जगणार? शिवाय शरीराचं पण मात्र होतं. निष्काळजीपणा अज्ञानातून होतो. नको असताना बाळ रहातं. खूप नीट समजावून सांगितलं की कशी गोची होती. O००० ________________

संज्या : म्हणजे फ्रेण्डशिप चालेल पण लवशिप नको, असच ना. सोने : हो भावड्याः अगदी बरोबर. संज्या : सोने, शहाणी झालीस तू कसलं भारी बोललीस! सोने : मी शहाणीच आहे, पण तुला कळायला हवं ना! ) संज्या : (तिला चिडवत) अतिशहाणी. ________________

अक्ष्या : बंड्या, ती बघ वहिनी, आजचा दिवस चांगला जाणार. बंड्या : आरं नुस्तं बघून काय होणार? दाबायला मिळालं पाहिजे. ॥ ॥ संज्या : ए बंड्या ऐक जरा, आसलं बोलू नको. | बंड्या : बोलीन काय पन, आपला माल आहे. संज्या : ल्येका तुझी गंमत होईल. तिची शाळा बंद होईल. बंड्या : तुला रं काय माहित? संज्या : आरं, आमच्या सोनीची खास मैत्रीण. सोनी सांगत होती, शीतलीचे बापू कडक आहेत. जरा काही भानगड वाटली तर तिची शाळाच बंद करतील. बंड्या : सोनीची मैत्रीण म्हणालास म्हणून ऐकतोय. संज्या : नाही तर काय करणार होतास? बंड्या : सरळ एकटीला गाठून प्रपोझ करणार होतो. लव्हशिप दे म्हणून. 43 ________________

संज्या : बंड्या त्यापेक्षा ओळख करून घे, फ्रेण्डशिप कर. बंड्या : ह्या, त्यात काय इंटरेस्ट नाहीये, दाबायला कुठं मिळणार मग? संज्या : आरं लेका, ऊशी दिऊ का दाबायला? आरं दाबायला मिळण्यापेक्षा आपल्याबरोबर बोलणारी, हसणारी, आपल्याला चांगला दोस्त समजणारी मैत्रीण असली तर.. भारी वाटेल की नाही? बंड्या : भारी वाटेल, पण अशा चांगल्या मैत्रिणी मिळणार कुठं? त्यो काय सम्राटचा वडापाव हाय का की, चांगली मैत्रीण हमखास मिळण्याचे ठिकाण. तिथं गेलं की मिळाली मैत्रीण संज्या : आपण पहिले चांगले मित्र बनू या.... मग मिळतील. बंड्या : म्हणजे कसा? संज्या : सोनी सांगत होती लायनीत राहणारी, जास्त शायनिंग न करणारी, अभ्यास करणारी असली मुलं मुलींना आवडतात. अक्ष्या : अरे वा.. चला तर मग सुधारुया स्वत:ला. 44 ________________

हे चित्रकथा पुस्तक .... किशोरवयीन मुलामुलींच्या गोष्टी सांगणारं.. त्यांच्या मनातल्या गोंधळांना शब्द-चित्ररुप देणारं... त्यांच्या भाषेत, त्यांच्या स्टाईलमध्ये त्यांच्याशी संवाद साधणार - त्यांचं सध्या काय चाललयं हे शोधू पाहणारं !