मारुतीची भूपाळी
Jump to navigation
Jump to search
उठा प्रातःकाळ झाला । मारुतीला पाहू चला ।
ज्याचा प्रताप आगळा । विरंचीही नेणतो ॥ ध्रु. ॥
आमुचा हनुमंत साह्यकरी । तेथे विघ्न काय करी ।
दॄढ धरा हो अंतरी । तो त्वरीत पावेल ॥ १ ॥
आमुचा निर्वाणींचा गडी । तोचि पावेल सांकडी ।
त्याचे भजनाचे आवडी । दॄढ बुध्दि धरावी ॥ २ ॥
थोर महीमा जयाची । कीर्ति वर्णवी तयाची ।
रामी रामदासाची । निकत भक्ति करवी ॥ ३ ॥
![]() |
हे साहित्य भारतात तयार झालेले असून ते आता प्रताधिकार मुक्त झाले आहे. भारतीय प्रताधिकार कायदा १९५७ नुसार भारतीय साहित्यिकाच्या मृत्युनंतर ६० वर्षांनी त्याचे साहित्य प्रताधिकारमुक्त होते. त्यानुसार १ जानेवारी १९५६ पूर्वीचे अशा लेखकांचे सर्व साहित्य प्रताधिकारमुक्त होते. | ![]() |
